स्फूर्ती आत्मचरित्र - 1 Sudhakar katekar द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्फूर्ती आत्मचरित्र - 1


राहणारे वाशीम जवळ काटे नावाचे गाव आहे.पूर्वज वाशीम येथे आले असतील.व त्या वरून काटे गावचे राहणारे म्हणून काटकर.कटेकरांची जहागिरी होती.त्या वेळेस जहागीरदार गावातील वजनदार मोठे घराणे.पूर्वी नोकरी हा प्रश्न नव्हता.शेती मुख्य उत्पन्न व उपजिविकेचे साधन होते.याचा अर्थ शेती असलीच पाहिजे.वाशीम येथे वाडा आहे.वर एक माडी आहे. वाड्यात विहीर आहे.विहिरीला कायम पाणी असते.मागच्या बाजूला मोकळी जागा भरपूर आहे.
मल्हारराव यांचा मुलगा मार्तंडराव व एक मुलगी होती.तिला एक मुलगा होता त्याचे नाव रघुनाथ.तो अकोल्याला टुरिंग टॉकीज मध्ये ऑपरेटर म्हणून काम करीत होता
माझे वडील म्हणजे,दादा तहसील मध्ये कामास होते। सुरवातीस वाशीम येथे होते नंतर अकोल्याला बदली झाली.आम्ही सगळे अकोल्यास राहावयास आलो.त्या काळी चांदीचे रुपये होते।एक रुपया महणजे 10 ग्रॅम।पगार रु 1000 असेल तर त्यास चांदीचे रुपये 1000 मिळत होते। मांगा
अकोल्याला माझे प्राथमिक शिक्षण झाले।मंगरूळपीर येथे माझा जन्म झाला।प्राथमिक शिक्षण आकोल्यास
झाले।
त्या काळी ऐश्वर्य, समृद्धी होती,आर्थिक स्थिती खूपच चांगली होती।कुठलीही कमतरता नव्हती.आमच्या ताईचे,म्हणजे आईचे दागिने सर्व प्रकारचे होते,पायाच्या बोटा पासून ,डोक्या पर्यंत दागिने होते.
1941 मध्ये दादा सेवा निवृत्त झाले.तेथे जीन कंपनीत काही दिवस नोकरी केली.
पेन्शन मिलत होती.नंतर काही दिवस इंदोर येथे गेलो,तेथे दादा नोकरी करीत होते.काही दिवसा नंतर परत आकोल्या स आलो.चरितार्थासाठी ,नाईलाजाने,ताईचे दागिने विकण्याची वेळ आली.त्या काळी सूत कताई हा व्यवसाय होता.मी टकळीवर सूत काढायला शिकलो.व तेथे कामास जाऊ लागलो.रोज 50 पैसे मिळत असत .अकोल्याला दादांच्या ओळखीचे एक
गृहस्थ हॉटेले ते सराफाच्या दुकानात मुनीम म्हणून काम करीत असत.त्यांनी सांगितले तुमच्या मुलाला माझ्याकडे कामाला पाठवा..मी सारफाचे दुकानात कामास जाऊ लागलो.उधारी वसुली करण्यास जावे लागत असे.संध्याकाळी सराफांच्या घरी पिण्याचे व वापरण्याचे पाणी भरून ठेवणे ।
काही दिवसांनी साधारण पणे 1954 पासून सकरवाडीस आलो। पैशाची अडचण म्हणून ताईच्या माहेरी ब्राह्मणास आलो.त्यांची शेती होती परिस्थिती चांगली होती.आम्हाला पाहिल्याबरोबर आईचे वडील म्हणाले.अने म्हणजे अनुताई आमची आइ.आमच्या मुलांच्या तोंडास पाने पुसावसावयास आली का। वडील मुलीशी आशा कठीण परिस्थितीत मदत करावयाच्या ऐवजी असे वागू शकतात.पण नाईलाजाने काही दिवस तेथेच राहावे लागले.त्या वेळेस ब्राम्हणीस गिरणी नव्हती सोनई येथे जाऊन एक पायली 7 किलो दळण मी आणत होतो बाकी माजा पाहत होते.काही दिवसांनी साकरवाडीस,शाम वाडी येथे क्लार्क म्हणून नेमणूक झाली रोज 3 किलोमीटर जाऊन येऊन करीत असत आर्थिक चण चण कमी झाली.साखरेचा सिझन चालू झाल्यावर वडिलांना सिझनल म्हणून ऑफिस मध्ये क्लार्क म्हणून घेतले। त्याच वेळेस मधुकर यास सुद्धा उसाच्या गाड्या वजन करण्याचे काम दिले.
काही दिवसांनी कंपनीने ठरविले की,जे सिझनल काम करतात ते जर पुढच्या वर्षी हजर झाले तर त्यांना निम्मा पगार द्यायचा.मधूकरला सुद्धा सहा महिन्यांचा निम्मा पगार सुरू झाला.घडी बसण्यास मदत झाली.मी पुणतांब्याला हायस्कुल मध्ये शिकत होतो 1956 मध्ये वडिलांचे निधन झाल्यामुळे शाळा सोडावी लागली.शिकण्याची खूप इच्छा होती.साकारवाडीस आलो.तेथे शेतकी ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कामास लागली.ऑफिस सफाई, टपाल,नेणे आणणे. इत्यादी8 संगतीलबती कामे करावयाचे. मनात नेहमी विचार यायचा मला खूप शिकून मोठे व्हायचे आहे.त्या करिता अकरावी होणे जरूर होते.आकोल्याची एक ओळखीची व्यक्ती तेथे Excise Inspector म्हणून तेथे आली. मला त्यांनी ओळखले.व घरी आले.त्यांनी मला सल्ला दिला की,अकरावीच्या बाहेरून परिक्षा देता येते.,तू बोर्डाकडे अर्ज कर. तो पर्यंत बोर्ड असते हे सुद्धा मला माहित नव्हते.त्यांनी मला पुण्याच्या बोर्डाचा पत्ता दिला.त्या प्रमाणे मी बोर्डाकडे अर्ज केला.त्यांच्या कडून मला एक फॉर्म आला.तर अडचण एक होती की फॉर्म शाळे मार्फत पाठवला पाहिजे.तेवढया कालावधीत,पुण्यास रेल्वे पोलिस भरती सुरू आहे.असे माझ्या मित्राने सांगितले मी पुण्यास गेलो.रेल्वे पोलिस म्हणून माझी निवड झाली.पुण्यात खडकी येथे दीड वर्षे ट्रेनिंग घेतले।तेथून एका हायस्कुल मधून अकरावी परिक्षे करिता फॉर्म भरून पाठविला. पण पहिल्या वर्षी नापास झालो.ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर दादर येथे नेमणूक झाली.तेथे रुपयेव80 दरमहा पागार मिळत असे.त्या पैकी रुपये 40 ताईस साकारवाडीस पाठवीत असे.तेथे अकरावी करिता क्लासेस लावले.अकरावी पास झालो.





.