स्फूर्ती आत्मचरित्र - 2 Sudhakar katekar द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

स्फूर्ती आत्मचरित्र - 2

दादर येथे 1960 मध्ये अकरावी पास झालो.पोलीस खात्यात मन रमले नाही.त्याच वर्षी राजीनामा दिला व साकारवाडीस आलो.तिथे मित्र परिवार,व ओळखी होत्या.. सुदैवाने नुकतीच हायस्कुल सुरू झाली होती.8 वि व 9 वी चे वर्ग सुरू होते.शाळेमध्ये एक क्लार्क भरावयाचा होता.व त्याला tyaping आले पाहिजे.मला टायपिंग येत नव्हते.त्या करिता मी कोपरगाव येथे सायकलवर टायपिंग शिकण्यास जात होतो.चाळीस वेगाची परीक्षा पास झालो.कंपनीत टायपिंग ची टेस्ट दिली.ओळखीमुळे माझी माझी शाळेत लेखनिक म्हणून नेमणूक झाली.मुळात मला शिक्षणाची आवड होती व खूप शिकण्याची इच्छा होती.व शिकण्याची जिद्द पण होती.,पुढे शाळेचे वर्ग वाढले।इयत्ता पाचवी ते अकरावी वर्ग सुरू झाले.लेखनिक म्हणून कामाचा व्याप वाढला.आशा परिस्थितीत पुणे विद्यापीठाच्या Pre Degree या परीक्षेस बसलो.पण नापास झालो.एक दिवस नगरला क्लासेस असतात तेथे भेटलो.त्यांनी मला सागितले की,तुम्ही इंदोर ची first year ची परीक्षा द्या.जर पास झाला तर पुणे विद्यापीठ तुम्हाला T.Y. ला प्रवेश देईल.मी इंदोर ला एक महिना राहिलो.First Year परीक्षा देऊन पास झालो.पुणे विद्यापीठा कडे Thard Year ला परीक्षेची परवानगी मागितली.Thard Year म्हणजे मी B.A. च्या परीक्षेस बसलो
पण पहिल्या वर्षी नापास झालो.दुसऱ्या वर्षी पास झालो मला खूप आनंद झाला.आयुष्यात प्रतिकुल परिस्थितीत graduate झालो.मी B. A. झालो ही बातमी कुणितरी आमच्या मामा लोकांना सांगितली,यावर विश्वास ठेवला नाही कारण ते स्पष्ट म्हणाले तो फक्त आठवी पास आहे B.A. होणं शक्य नाही.या वरून त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात येतो.
नंतर मी शाळेत अप्रशिक्षित शिक्षक म्हणून नेमणूक करण्यास संस्थेकडे परवानगी मागितली.संस्थेने मला परवानगी दिली.
प्रशिक्षित म्हणजे B Ed स्व खर्चाणे करावे लागत असे.त्या वर्षी शिक्षण खात्याने ठरविले की जे अप्रशिक्षित शिक्षक असतील.त्यांना खात्या मार्फत प्रशिक्षित केले होईल.त्या प्रमाणे मला B Ed पूर्ण करण्यासाठी., संगमनेर कॉलेज मिळाले.तेथे भाड्याने खोली घेतली.व B Ed पूर्ण केले 1970 मध्ये.शाळेत प्रशिक्षित शिक्षक म्हणून नेमणूक झाली.त्या मुळे वेतन श्रेणी प्रमाणे पगार वाढ झाली.काही काळ पर्यवेक्षक म्हणून काम केले.इथले मुख्याध्यापक यांची लक्षीवाडी येथील शाळेत बदली झाली.त्या मुळे सकरवाडी येथे मुख्याध्यापक पदाची जागा निर्माण झाली.मुख्याध्यापक पद हे सेवा ज्येष्ठतेनुसार असते.त्या शाळेत तीन शिक्षक या पदास पात्र होते.परंतू त्यांनी साकरवाडीस येण्यास नकार दिला.हे पद स्वीकारायचे नसेल तर,शिक्षणाधीकारी यांचे समोर लेखी लिहून द्यावे लागते.ही प्रारक्रिया पूर्ण होण्यास तीन महिने लागले.नंतर माझी रीतसर नियमानुसार मुख्य्याध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली.तेरा वर्षे मी या पदावर काम केले.हे पद class 2 ऑफिसर या दर्जाचे आहे.त्या मुळे स्केल चांगले मिळाले.डिसेंबर 1993 सेवानिवृत्त झालो.
पुण्याला हडपसर येथील गणेश निकेतन येथे घर भाड्याने घेतले.1995 मध्ये गणेश विहार येथे घर भाड्याने घेतले.1996 मध्ये गणेशविहार मध्ये स्वतःचे घर घेतले.आयुष्यात घेतलेले ते पहिले घर.घरा करिता गजाननच्या नावावर लोण घेतले पण ते सर्व HDFC येथे मी माझ्या पेन्शन मधून हप्ते दिले.खरं तर ते घर विकावयास नको होते असे मला नेहमी वाटायचे.तेथे असतांना गजाननची रिलायन्स कंपनीत नेमणूक झाली.तेथे लोधिवली येथे रिलायन्स कंपनीची कॉलनी होती.तेथे गजानन यास quarter मिळाली.तेथे आम्ही सगळे राहावयास आलो.
तेथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला.त्या मुळे तेथे असणारे ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊ
शकले.दर महिन्याला आम्ही एकत्र जमत असू.त्या मुळे मोकळ्या मनाने सवांद साधत असू.त्या नंतर सर्वांनी ठरवले की,वर्षातून एकदा सहल काढावी.व कोकण परिसर पहावा.त्याचा फायदा असा झाला की बाकीचे सुद्धा सामील झाले त्या मुळे बसची संख्या पूर्ण होत असे.कोकणात गणपती पुळे प्रसिद्ध आहे.तेथे असंख्य पर्यटक येतात.मुरुड जंजिरा किल्ला प्रसिद्ध आहे.
एकंदर कोकण परिसर निसर्ग रम्य आहे.
नंतर महाडचा गणपती प्रसिद्ध आहे.
तेथे दर्शनास येणारे असंख्य भाविक आहेत.
ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन आपले अनुभव व विचार एकमेकास सांगत असत.
सगळे जण वेगवेगळ्या क्षेत्रातले होते.
सम वयस्क असल्यामुळे आनंदी होते.हा ज्येष्ठ नागरिक संघाचा फायदा.