श्वास तुझ्यात गुंतला - 1 Ajay द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्वास तुझ्यात गुंतला - 1

"समीर यार प्लीज, या वेळेला माझी ऑर्डर तू डिलिव्हरी कर."

 

"सांगितलं ना जमणार नाही, मला माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन मूव्ही थियटरला भेटला जायचं आहे. आणि आजही नाही गेलो तर, माझी ही चौथी गर्लफ्रेंड मला सोडून जाईल आणि मी सिंगल वर्जिन राहील. अरे आज चान्स आहे वर्जनटी तोडण्याचा... तो घेऊ दे यार."

 

"अरे यार, आज भक्तीच्या स्कूलला ॲनिवल फंक्शन आहे तिथे मी यावे साठी भक्तीने हट्ट धरला आहे. तुला कळत कसं नाही?"

 

"सिंगल पेरेंट्स राहाल तर असे हाल होणारच. त्यापेक्षा मी बघ, संध्याकाळी मुव्ही.... लगेच हॉटेलला जेवण... आणि लॉजवर कार्यक्रम. सकाळी तू कोण.. मी कोण."

 

"स्वतः पुरता विचार करतो म्हणूनच तू अद्याप वर्जिन आहेस. आणि तू आज माझा विचार केला नाही तर आजही तुझी वर्जनेटी तुटणार नाही, शाप आहे माझा लक्षात ठेव."

 

"साल्या तू मित्र आहेस का शत्रू? तु साला नशीबवान आहेस. वहिनीच्या नंतरही तुला आजही तरुणींकडून भाव मिळतो. आपल्या पॅकेजिंग विभागातली शायना तुझ्या मागे पुढे फिरते हे बघत नाही का मी?"

 

"ती कुठे फिरो मला त्याच्याशी घेणे देणे नाही. तो तिचा प्रश्न आहे. मला रिकाम्या गोष्टीत इंटरेस्ट नाही. खास करून तुझी वहिनी गेल्यावर."

 

दोघेही डोंबिवली एमआयडीसी मध्ये असलेल्या भारत इंडस्ट्रीज मध्ये सेल्स विभागात कार्यरत होते. त्यांची कंपनी घरात लागणारे विविध उपयोगाची साधने तयार करीत होती. जसे की टॉयलेट क्लिअर, बाथरूम क्लिनर, भांडी घासण्याचे लिक्विड, फ्लोअर क्लिनर इ. सध्या त्यांच्यावर ॲक्टिव्ह टॉयलेट क्लिनर आणि इतर सेल्स करण्यासाठी मार्केटिंग विभागात नियुक्ती केली होती. दिलासा एवढाच होता की, आता त्यांना डेमो करण्यासाठी घरोघरी फिरायला लागत नव्हते. कारण पाच वर्षांपूर्वी अशाच एका कंपनीत अर्णव लोकांच्या घरोघरी जाऊन टॉयलेट क्लिनर चे प्रॉडक्ट डेमो करून दाखवायचा.

 

अर्णव आणि समीर दोघे जिवलग मित्र. गेल्यावेळी मसाले कंपनीत सेल साठी कार्यरत होते. मात्र पगार कमी आणि कामाचा लोड जास्त त्यात मालकाची खालच्या स्तरावरील भाषा यामुळे तिथे जास्त दिवस टिकले नाही. एके दिवशी अर्णवला कामावर उशिरा आल्याने मालकाने खूप झापले. अर्णव ने खुलासा केल्यावरही त्याचे काही एक न ऐकताच त्याला कामावरून काढून टाकले. समीरनेही तात्काळ काम सोडून आपल्या मित्रासोबत राहणं पसंत केले.

 

अखेर आपल्या मित्राच्या मागणीला होकार देऊन समीर अर्णव चे प्रॉडक्ट सेल्स साठी घेऊन गेला.

आणि अर्णव आपल्या लाडक्या लेकीचा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी न्यू मॉडल इंग्लिश स्कूल ला पोहोचला....

 

💕💕💕💕💕💕💕

 

स्थळ : न्यु मॉडर्न इंग्लिश स्कूल, डोंबिवली

प्रमुख पाहुणे : बिझनेस पाॅवर वूमन आणि मेरी उडान फाउंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती मृणाल सरपोतदार.

 

पुढील पार्टिसिपेट आहे, इयत्ता पहिली सेमीची आमची विद्यार्थिनी कु. भक्ती अर्णव देशपांडे सादर करत आहे,

"सगळ्यांनाच असती आई मलाच का नाही"

ही भावस्पर्श कविता...

 

दिक्षीत मॅडमांनी माईकवर उद् घोषणा केल्यावर एक सहा वर्षाची निरागस चिमुरडी स्टेजवर इकडे तिकडे पाहत बावरलेल्या स्थितीत आली. प्रथमदर्शनी तिची अशी अवस्था पाहून तिची क्लास टिचर शुभांगी यांना टेन्शन आले. कारण त्यांची इच्छा नसतांना भक्तीने स्टेजवर परफॉर्मन्स करण्याचा हट्ट धरला होता. तिच्या परफॉर्मन्सची तयारी सुरू होण्या अगोदरच  नेमकी ती आजारी पडली आणि पाहिजे तशी तयारी झाली नव्हती. 

जर स्टेजवर परफॉर्मन्स करतांना ती कमी पडली तर तिच्या कोमल मनावर खोल परिणाम होतील अशी भीती शुभांगी मॅडम यांना वाटली.

 

सगळ्यांनाच असते आई मलाच का नाही...

आठवण आल्या विना एक दिवसही जात नाही..

                      कुठे गेली तू मला सोडूनी

                      प्रेमाची तुझ्या मी गं भुकेली 

वैशाखात धरती जशी असे तहानलेली..

                      आई तुझे लेकरू एकटे पडले

                तुझ्या स्पर्शासाठी खूप आज रडले

कुणासाठी देव तू , कोणासाठी ईश्वर..

आठवण येता तुझी, अश्रू वाहे झरझर..

                               तुझीच सावली गं मी,

                            तरी दूर झालीस तू मला

त्या देवालाही पाझर नाही फुटला..

माझा गं श्वास तुझ्यात गुंतला.....

 

पुढचे शब्द भक्तीने बोलले गेलेच नाही. स्फुदुंन स्फुदुंन ती रडू लागली. तिच्याबरोबरच बहुतांश मॅडम, उपस्थित मुलं-मुली तसेच इतर कार्यक्रम बघण्यासाठी आलेले पालक ही आपल्या भावना आवरू शकले नाही. गोड आवाजात आपल्या आईला साद घालणारी भक्तीची कविता सर्वांनाच रडवून गेली. पाॅवर वूमन असलेल्या मृणाल 

सरपोतदार यांच्याही डोळ्याच्या कडा ओलवल्या.

 

शुभांगी मॅडमनी पुढे होत तिचे सांत्वन करायला प्रयत्न केला मात्र ती अधिकच रडु लागली. मृणाल आपल्या खुर्चीवरून उठून भक्ती कडे गेल्या. त्या तिला जवळ घेणार तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर महत्वाचा काॅल आल्याने त्या थोड्या बाजुला गेल्या. तेवढ्यात तिचे पप्पा कामाच्या व्यापातून कसातरी वेळ काढत, तारेवरची कसरत करत तेथे येऊन पोहोचले.

समोरचे दृश्य पाहून त्यांचा काळजाचा ठोका चुकला. 

 

धावतच जात अर्णवने आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या भक्तीला छातीशी घट्ट  धरले. पप्पा येताच भक्तीला अजून  गहिवरून आले. तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरून केविलवाण्या नजरेने अर्णव तिच्याकडे पाहत होता. अजूनही भक्ती हुंदके देत होती. तिला असे आईच्या आठवणीत भावुक होऊन रडतांना पाहून अर्णवचेही डोळे भरून आले. त्याच्याही नकळत अश्रू त्याच्या डोळ्यातून गालावर ओघळले. 

 

त्याने आपल्या लाडक्या लेक चे अश्रू पुसले आणि तिच्या माथेचे चुंबन घेतले. भक्तीनेही आपल्या पप्पांच्या अश्रू पुसून गालावर पप्पी घेतली. आणि आपली कविता पुढे चालू ठेवली...

 

पप्पा धावून आले, 

माझ्यासाठी तेच माझी आई झाले..

                त्यांच्या स्पर्शातून मला आई कळले...

                    दुःख त्यांनी माझे स्वतःवर घेतले..

माफ कराल पप्पा मी आईसाठी रडले..

तुमच्या मध्ये भेद करुनी मी चुकले..

 

                  प्रेम बापाचे तुम्ही मला डबल दिले,

   राहील आयुष्यभर ऋणी एवढे प्रेम मला केले..

 

तिचे शेवटचे शब्द सर्वांच्या हृदयाचा ठाव चुकवून गेले. संपूर्ण हॉल उभा राहून टाळ्यांचा कडकडाट दहा मिनिटे चालू राहिला. आपल्या लेकीला घेऊन अर्णव तेथुन निघाला....

अशी आमची ही गोंडस भक्ती आपणास भेटायला येत आहे...

 

मी भक्ती...

 

 

क्रमशः 

 

💕💕💕💕💕💕💕

 

वाचकां

ना विनंती की, कथेचा भाग आवडलास कथेला रेटिंग, समीक्षा आणि स्टिकर नक्की देणे.