ब्लॅकमेल - प्रकरण 1 Abhay Bapat द्वारा क्राइम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

ब्लॅकमेल - प्रकरण 1



ब्लॅकमेल
प्रकरण १
“सर, आपल्या रिसेप्शन मधे एक तरुणी आल्ये, तुम्हाला भेटायला. पण ती आपलं नाव सांगायला तयार नाहीये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली.
“ मग हाकलून दे तिला.” सौंम्याकडे न बघताच पाणिनी म्हणाला.
“ तरी सुद्धा मला वाटतंय की तुम्ही एकदा भेटावं.”-सौंम्या
“ काय विशेष आहे त्यात की मी भेटायलाच हवं ?”
“ तुम्ही स्वत: ते ऐकून घ्यावं सर.”-सौंम्या
“ तू फारच गूढ बोलायला लागल्येस. ठीक आहे तू म्हणते आहेस तर येऊ दे तिला.” पाणिनी म्हणाला
सौंम्या आपल्या बरोबर एका तरुणीला घेऊन आली. अत्यंत निराश असा चेहेरा आणि मानसिक तणावाने सर्वांग थरथरत होतं.
“ घाबरु नकोस.मी तुला मदत करीन. काय हवंय तुला?”
“ पटवर्धन,मला गायब व्हायचंय कुठेतरी, म्हणजे व्हायलाच लागणार आहे, पण माझ्या आई बाबांना शोधता येता कामा नये मला.”
“ पण गायब का व्हायचंय? नेहेमीची कारणं?” पाणिनीने विचारलं.
“ नेहेमी काय कारणं असतात?” तिने विचारलं.
“ माझी उलट तपासणी घेऊ नको.”
“ मला सध्या तरी कारण काय ते फोडायचं नाहीये.पण मला निघून जायचय हे नक्की.”
“ आणि माझी मदत तुला नेमकी कशासाठी हव्ये? पळून जायला?” पाणिनीने विचारलं.
“ माझ्या पूर्वायुष्यातील काही संदर्भ जोडायची वेळ आली तर मला मदत करू शकाल तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमची भूमिका ठेवायची.पण मी तुम्हाला परवानगी दिली तरच तुम्ही ते करायचं.किंवा अशा काही घटना घडल्या की माझ्या आई बाबांशी संपर्क करणे आवश्यकच आहे तर तसा निर्णय तुम्ही घ्यायचा. ”
पाणिनीला तिच्या बोलण्याची गंमतच वाटायला लागली. तिला त्याची मदत हवी होती पण कशी आणि केव्हा ते तिला शब्दात सांगता येत नव्हतं किंवा पाणिनीला ते समजत नव्हतं. तो काहीतरी बोलणार तेवढ्यात इंटरकॉम
वाजला आणि सौंम्या ने तो उचलला. फोन मधे ती बोलली आणि अचानक उठून तिने पाणिनीला लायब्ररीच्या खोलीत यायची खूण केली. दोघेही लायब्ररीत पोचले.तिथे तातडीने त्यांची रिसेप्शानिस्ट,गती आली.
“ सर.तुमच्याकडे आलेल्या बाईच्या पर्स मधे पूर्ण पर्स भरून नोटांची थप्पी आहे.” गती म्हणाली.
“ तुला कसं कळल?” पाणिनीने विचारलं.
“ आलेली बाई आत यायच्या आधी माझ्या जवळ बसली होती.तिला पर्स मधून काहीतरी घ्यायचं होतं किंवा ठेवायचं होतं.म्हणून तिने पर्स उघडली.पण उघडतांना तिने जी हालचाल केली त्यामळे खरं तर माझं लक्ष गेलं तिच्याकडे नाहीतर कदाचित गेलं नसतं. ” गती म्हणाली.
“ काय केलं तिनं?” सौंम्या ने पाणिनी कडे पहात विचारलं.
“ तिने माझ्याकडे पाठ केली.जेणे करून मला पर्स मधले काही दिसणारं नाही. पण मजा अशी झाली की तिच्या पर्स मधे फ्लॅप ला जोडलेला आरसा आहे त्या आरशातून मला बरोब्बर आतल्या नोटांची चळत दिसली. ”
“ म्हणजे तुला म्हणायचं की, तो आरसा ४५ अंशाच्या कोनात उघडला गेला आणि आतलं तुला स्पष्ट दिसलं ?” पाणिनीने विचारलं.
“ करेक्ट.” गती म्हणाली.
“ मला सांग, तिने पर्स उघडली तेव्हा तिची हालचाल सहज होती की ४५ अंशाचा कोन तुला मुद्दाम दिसावा अशी हालचाल होती?” पाणिनीने विचारलं.
“ मला तेव्हा ती सहज वाटली पण आता तम्ही प्रश्न विचारल्यावर मी विचार करत्ये तर मला वाटतंय की सहज हालचाल करते आहे असं ती दाखवत असावी कारण तिने पर्स चा फ्लॅप उघडल्यावर आरसा ४५ अंशात येईल अशा स्थितीत जरा जास्तच वेळ धरून ठेवला. नंतर फ्लॅप पूर्ण उघडला. मला आता कळलं सर,की उलट तपासणी घेतांना तुम्ही साक्षीदारांना कसं कैचित पकडून त्यांच्या स्मरण शक्तीला ताण देता आणि त्यातून खरं उत्तरं काढून घेता. ” गती म्हणाली.
“ मी उलट तपासणी घेतली नाही तुझी, मला जाणून घ्यायचं होतं की पर्स मधे काय आहे हे लपवण्यापेक्षा आत काय आहे हे तुला दिसावं हा तिचा हेतू होता का.”
“ आणि सर त्यात बँकेतून काढल्यासारख्या कोऱ्या कच्च नोटा होत्या.” –गती.
“ किती रुपयांच्या?”
“ शंभर, दोनशे आणि पाचशे ”
“ ठीक आहे गती, खूप छान काम केलंस. आपल्याकडे येणाऱ्या अशीलाकडे असंच लक्ष दिलं जाणं आणि काही वेगळे पणा दिसला तर आम्हाला कळवणं अपेक्षित आहे तुझ्या कडून.” तिची पाठ थोपटत पाणिनी म्हणाला
गती गेल्यावर सौंम्या आणि पाणिनी पुन्हा पाणिनीच्या केबिन मधे त्या मुलीला भेटायला गेले.
“ तर मग, काय बोलत होतो आपण?, तुला वकिलाची गरज लागली भविष्यात,तर मी तुझं प्रतिनिधित्व करावं. बरोबर?” पाणिनीने विचारलं.
“ हो.”
“ आणि तुला तुझी ओळख करून द्यायची नाहीये?”
“ त्याला काही खास कारण आहे पटवर्धन.” ती म्हणाली.
“ असतील,पण मला माझं अशील जर माहितीच नसेल तर तुझ्याशी संपर्क तरी कसा करायचा मी?”
“ मीच तुमच्या संपर्कात राहीन.माझ्या आवाजात मी तुम्हाला माझं नाव सांगायच्या ऐवजी एक सांकेतिक आकडा सांगेन.” ती म्हणाली.
“ फोनवर आवाज खात्रीशीर ओळखता येत नाही.” पाणिनी म्हणाला “ तुला माझी मदत काय स्वरुपात हव्ये?”
“ जे लोक मला शोधून काढू इच्छितात ते फार चतुर आहेत.मला शोधण्यासाठी गुप्तहेर नेमण्याचा खर्च ते करणार नाहीत त्या ऐवजी माझ्यावर एखादा गुन्हा केल्याचा आरोप करून पोलिसांना माझ्या मागे लावतील. आणि...आणि..तो माणूस असा आहे की मला शोधून काढल्या शिवाय काहीही झालं तरी तो थांबणार नाही.”
“ पण तू कुठलाच गुन्हा केला नसशील तर तुला घाबरायचं करणाच नाही.उलट तुझ्यावर तसा आरोप लावणाराच गोत्यात येईल.” पाणिनी म्हणाला
“ पण मी काहीच केलेलं नाही.”
“ मग तुझ्यावर कशाचा आरोप करू शकतो तो?”
“ माहित नाही.खुनाचा सुद्धा करेल तो.”
“ किंवा आर्थिक अफरातफर?” तिच्या डोळ्याला डोळे भिडवित पाणिनी म्हणाला
तिच्या चेहेऱ्यावरचा रंग एकदम उडाला. “ याचा विचार मी केला नव्हता.तो करू शकेल तसाही आरोप माझ्यावर. ”
“ खुनाच्या आरोपापेक्षा तेच सोप आहे त्याच्यासाठी.कारण खण म्हंटलं की मृतदेह दाखवायला लागेल.अफरातफर म्हंटलं की त्याने फक्त मोठी रक्कम हरवली आहे किंवा त्याचा हिशोब लागत नाही असं म्हंटलं तरी पुरेसं आहे.” “ तुमचा मुद्दा पटतोय मला. तुम्हाला मी आगाऊ रक्कम म्हणून काही पैसे देऊन ठेवते.माझी वकिली घेण्यासाठी म्हणून.मी फोन वर कळवीन तुम्हाला कधी गरज लागेल तेव्हा.”
“ तुझ्या डोक्यात किती रक्कम आहे?” पाणिनीने विचारलं.
“ सध्या पाच हजार देऊन ठेवते,पुरतील ना?”
“ ठीक आहे,सध्या. नंतर काय प्रकारची गरज लागते त्यावरून ठरवू ” पाणिनी म्हणाला
तिने पाणिनीला दिसणार नाही अशा पद्धतीने पर्स उघडली आणि पाचशे रुपयाच्या दहा नोटा काढून पाणिनीला दिल्या.
“ एकदम करकरीत आणि अगदी हात कापेल नोटेवरून फिरवला तर अशा आहेत नोटा.”
“ मी खरं तर एवढी मोठी रक्कम बाळगत नाही जवळ पण तुम्हाला देण्यासाठी म्हणून मी बँकेतून काढल्या.”
“ इथल्याच जवळच्या बँकेतून?” सहज बोलतोय असं दाखवून पाणिनीने विचारलं.
“ नाही नाही पटवर्धन, या शहरातल्या बँकेतून नाही ” ती घाई घाईत म्हणाली.
“ मी नेमकं काय करू ?”
“ मी सांगितल्याशिवाय काहीच करू नका.सर्व काही ठीक झालं तर मला पुन्हा इथे तुमच्या ऑफिसात आणि तुमच्या आयुष्यात यायची गरज सुद्धा भासणार नाही. ”
“ आणि सुरळीत नाही झालं सर्व तर?” पाणिनीने विचारलं.
“ तर मी संपर्क करीन तुम्हाला आणि सांगीन.”
“ काय सांगशील?”
“ मी मदत करायला सांगेन.”
“ काय प्रकारची मदत?” पाणिनीने विचारलं.
“ कदाचित सल्ला मागेन तुमचा.”
“ अशा प्रकारच्या आधारावर मी अशिलासोबत संबंध ठेऊ शकत नाही.”
“ म्हणजे आर्थिक?”
“ थोडंस तसचं.” पाणिनी म्हणाला
“ मी त्यावेळी तुमच्याशी जादा फी बद्दल बोलेन.अर्थात मी तुम्हाला अयोग्य आणि अन्याय्य असं काही करायला सांगणार नाही.”
“ किंवा बेकायदा सुद्धा? ” आपले डोळे मिचकावून पाणिनीने विचारलं.
“ तुम्ही बेकायदा काही करणार नाहीच मग उगाचच वेळ कशाला घालवायचा त्या बद्दल बोलून? नाही का?”
“ आणि तू स्वत:च मला संपर्क करशील गरज वाटली तर?” पाणिनीने विचारलं.
“ नक्कीच. मगाशी म्हंटल्याप्रमाणे मी संपर्क करतांना एक कोड नंबर टाकून पेपरात छोट्या जाहिराती सदरात जाहिरात देईन. १२३-३२१ असा कोड नंबर असेल. ” ती म्हणाली आणि बाहेर पडली.
“ तुझ्या लक्षात आलं का त्या पोरीने चांगला अभिनय केला आपल्यासमोर. ” पाणिनी म्हणाला
“ कसला अभिनय?” –सौंम्या
“ की आपण पुन्हा भेटणार नाही कधीच असा. मी पैज लावतो तुझ्याशी, सौंम्या, ही मुलगी पुढच्या पाच दिवसात काहीतरी मोठ्या अडचणीत सापडते की नाही बघ. आपल्याला फोन करते की नाही बघ. अर्थात तिला याची कल्पना आहेच, आपल्यावर काय ओढवणार आहे याची.” -- पाणिनी म्हणाला
“ पहिल्याच भेटीपासूनच आपल्याशी खोटारडेपणा करणारं हे अशील आहे.”
(प्रकरण १ समाप्त)

आवडली असेल तर कॉमेंट करा