अगं बाई थोडं थांब ना.... - 1 Dilip Kapse द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अगं बाई थोडं थांब ना.... - 1

लेखकाचे मनोगत. ...'अगं,बाई थोडं थांब ना"ही कौटुंबिक लघु कादंबरी आहे.या कादंबरीतील पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. जीवंत अथवा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो एक योगा योग समजावा. प्रत्येक भागाचा संदर्भ लेगळा आहे.. या कथेचे सर्व अधिकार लेखकाच्या स्वाधीन राहतील..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹किती मरमर करतेस, तुझ्या हाताला तर दमच नाही.. सकाळ पासून राबराबते. अगं स्वतःसाठी जरा वेळ दे.. बघना तुझा अवतार कसा झाला आहे..
अहो ....काकु मला वेळच मीळत नाही माझे अवरायला.. सकाळची आवराआवरी होत नाही तो पर्यंत यांची कामावर जायची वेळ होते.
सकाळी ह्यांना कामावर जायच असतं त्यांना डबा करुण द्यावा लागतो....
नातीची सकाळची शाळा तिचे आवरायचे... घरातली सगळी कामे मलाच करावी लागतात.. सुनबाई तिचे तिलाच आवरणे होत नाही. सकाळी आठ वाजता उठते चहा पाणी होत नाही तो पर्यंत तिच्या अॉफिसची वेळ होते. दोन घास तोंडात कसे तरी घातले ,पर्स गळ्यात आडकवते आणि निघून जाते अॉफिसला..
घरातील घुणी, भांडी करे पर्यंत वेळ भराभर निघुन जातो.
नाष्टा केल्याची आवरा आवरी होत नाही की लगेच दुपारच्या स्वयंपाकाला लागावे लागतो.. दुपारची जेवणं होत नाहीत की पुन्हा भांडे आवरायचे... बघता बघता पाच कधी वाजले कळत नाही..
घटकाभर पाठ टेकवून आराम केला असे कधी आठवत नाही बाघा काकू....
पाच वाजता नात शाळेतुन येते. सहा वाजता हे दोघे घरी येतात. नातीचे दुध बिस्किट आणि ह्या दोघांचा व माझा चहा ,वेळच पुरत नाही.चहा घेई पर्यंतच थोडा विसावा मिळतो..
हे कामावरून घरी आले की थोडे बरे वाटते.. हे विचारतात अगं जेवलीस का..? चहा बरोबर दोन बिस्किट घे एवढे जरी बोलले तरी कामाचा शिन जातो 'हो' काकु..

कुठे बाहेर जायचं म्हटले तर घरात पसारा तसाच पडतो..
आज कालच्या सुना कुठं घरची कामे करतात..
त्याची नोकरी आणि मोबाईल त्याच्यातून त्यांच डोकं बाहेर निघत नाही.. स्वयंपाकाला थोडा ऊशीर आहे म्हटले की ते दोघे जण सरळ हॉटेल मधे जातात.. रात्री उशीरा घरी येतात. कधी कधी तिकडून तिकडे 'पिक्चर ,बघायला जातात.
काहीच बोलता येत नाही. काही बोलले तर म्हणतात आम्ही स्वयंपाकाची किती वेळ वाट पाहायची. दिवसभर अॉफिस मध्ये काम करुन जीव थकल्या सारखा होतो. नाही तरी आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवणाची हाऊस कधी करायची..
त्याचे पण खरंच आहे, दिवसभर अॉफिस मध्ये काम करुन थकून भागून येतात.
"मग वाटतय आपल्याला हाउस करता आली नाही
त्यांना तरी करु घ्यावी."
'आपण आपल्या नशीबानं घ्यावे'..
मुलाचे" मन "मोडावे वाटत नाही हो काकू त्याला
बघुनच गप्प बसावं लागतं..
मी आहे म्हणून घर आहे.. नाही तर गं बाई.....
मी चारच दिवस माहेरी गेले होते.. अगं बाई ...बाई ..
सांगायला सुद्धा लाज वाटते. 'रेफ्रिजरेटरचा नुसता वास येत होता. किचन ओटा तर मला बघवत नव्हता..
अगं पिठाचा डबा. ..नुसते बच बच हात बुडवलेले.... माणसं काय करणार त्यांच्या लक्षात थोडचं येते..
ते किचन मध्ये काय चालले हे पाहात नाहीत..
काय सांगू बाई आपलेच ओठ आणि आपलेच दात.. काही बोलाव तर सूनबाई म्हणते मी अॉफिस बघू का घरचे काम?
मुलगा पण तिचीच कड घेतो..
तो म्हणतो ....आई तीला नौकरी आणि घर दोन्ही कसं शक्य?
हे मुलाचे बोलणे.. त्याचे पण खरे आहे..

काकू आपलं म्हणून करावं लागतं.. ह्यांना म्हणते धुणे, भांडीवाली लावा हे मनावर घेत नाहीत..

आज काल धुणी, भांडी करणार्या कुठं मिळतात.. आज कालच्या गरिबाच्या पोरी कुठे धुणी भांडी करतात...
सरकार त्यांना मोफत राशेन, पैसा देते म्हणुन त्या कामे करत नाहीत..
'चल गं बाई ,किती वेळ गप्पा मारत बसायचे.. बरीच कामे पडलीत. सूनबाई बडबड करीत असेल , किती वेळ झाला सासूबाई बाहेर जाऊन बसल्यात.. मला अॉफिसला जायचे आहे..
सकाळी सकाळी सासू बाई कचरा कचराकुंडीत टाकायला गेली तिकडे जाऊन बसली..
बिचारीचा मला धाक. ती झाली सासू आणि मी झाले सून.. निघते मी.....
अगं थोड थांब ना चहा तर घेऊन जा.. सुनबाईचा एवढा धाक कशाला लाउन घेतेस..

"अहो काकू ,मला उशीर झाला की त्यांचे टायमिंग बिघडते.
नातीला उशीर झाला की तीची शाळेची गाडी निघून जाते. मला जायला पाहिजे.
कधी नव्हे तेच सुनबाईने चहा करुन घेयला. नातीचे आवरले. डबा करायला माझी वाट पाहात होती. तिला पिटात हात घालायला नको वाटतो . म्हणे कणीक मळीत बसायला मला कुठे वेळ असतो.
मी म्हणते सकाळी थोडं लवकर उठायचे. एखादे वेळी स्वतःचा डब्बा स्वतः केला तर काय बिघडते.?
नौकरी करते म्हणून काय झाले. तुझा जसा जीव आहे तसा मला पण आहे ना?
आपलं धड नाही तिला बोलून काय उपयोग. आताच नवऱ्याच्या डोक्यावर मिरे वाटायला लागली..
आणखी आयुष्य जायचे आहे. मी घरात काम करते तो पर्यंत हिचे असेच नखरे चालणार..
माझ्या अंगात बळ आहे तो पर्यंत ठिक आहे. मी थकल्या वर घरातली कामे करावी लागणार नाही का..?
रोज हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाणार का..?
आम्ही संसार केला नाही का..?
मला पण सासू होती ना ?
तिच्या बरोबर मी असेच वागले का?
आजकालच्या पोरी नौकरी करायला लागल्या ,चार पैसे कमवायला लागल्या की नवर्‍याला आपल्या मुठीत घ्यायला बघतात.. नवरा पण तिचेच ऐकतो.
स्वतःचे अस्तित्व विसरतो.. त्याला पण आई बाप नकोसे वाटतात.
ह्यांचे तर घरात अजीबात लक्ष नसते.
चोवीस तास बाहेरच असतात. सुनबाई काय करते, मुलगा काय करतो, ?
घरात कसे वागतात ..
ह्यांचे अजीबात लक्ष नसते. त्यांना वाटते पोरगं सुन कमावतात..
माझा कामानी जीव जातो ते ह्यांना दिसत नाही..
क्रमशः

दिलीप कापसे धारुर दि, 17जुलै 2021