श्वासांचा बंध प्रेम हे - भाग 1 Pallavi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्वासांचा बंध प्रेम हे - भाग 1


भाग - १


वेड्या मना सांग ना, व्हावे खुळे का पुन्हा
तुझ्यासवे सारे हवे, प्रेमात फसणे नाही रे

धुक्यात जसे चांदणे, मुक्याने तसे बोलणे
हो, सुटतील केव्हा उखाणे

नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा
ना त्याचे काही बंध न व्हावे, तू ही रे माझा मितवा.....!
.
.



सकाळ सकाळी घरातून गाण्याचा आवाज येत होता......एक पंधरा वर्षाची मुलगी टिव्ही जवळ बसुन 9X Jhakaas चॅनलवर लागलेलं गाणं पाहण्यात व्यस्त होती....

इकडे मनस्वी इंटरव्ह्यू ला जाण्यासाठी तिच आवरत होती....आज तिचा ND इंडस्ट्री मध्ये जॉबसाठी इंटरव्ह्यू होता.....मनोमन ती थोडी घाबरलीच होती....रात्री उशिरापर्यंत तिने इंटरव्ह्यू चा अभ्यास केला होता पण तरी मनावर थोडंसं दडपण आलं होतं......तिला दिवसभर तेवढा टाईम नव्हता , नुकतंच तिने BBA Complete केलं होत....तिने जॉबसाठी ND industry मध्ये ऑनलाईन च अप्लाय केलं होतं त्यामुळे तिला कंपनीकडून इंटरव्ह्यूसाठी मेल आला होता........तिचा हा ड्रिम जॉब होता...तिला काही केल्या तिथे सिलेक्ट व्हायचं होतं......तशी तयारी तिने केली होती...


तिने तिचं आवरलं आणि ती जायला निघालीच की तिला मागून आवाज आला.....

" अगं ये येवढ्या सकाळी कुठे चाललीस नारळाचं बारसं आहे का..? आणि सकाळचा नाश्ता कोण बनवणार....तुझा बाप का तुझी आई...?"........

तिचं मन भरुन आलं तिला तिच्या आईबाबांबद्दल बोल्याचं वाईट वाटलं....

" त..ते मोठी आई मी जॉबच्या इंटरव्ह्यूकरिता जात आहे त्यामुळे लवकर जावं लागेल...." मनस्वी

" आली मोठी नोकरी करणारी जसं काय तु खुपच मोठा तीर मारणार आहेस.......ते काही सांगू नकोस आधी नाश्ता बनवायला घे आणि मग जा जिथं तोंड काळं करायचं तिकडे....." ......

तसं तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं......तिने लगेच तिची सॅन्डल काढली आणि तिची पर्स आणि फाईल टेबलवर ठेवून ती किचनमध्ये गेली..... बेसिन च्या नळावर हात स्वच्छ धुवून तिने काल रात्रीच्या उरलेल्या चपातींचा चिवडा करायला घेतला...... डोळ्यातून घळाघळा पाणी गालावर येत होतं पण ती काही करु शकत नव्हती.....तिने एका शेगडीवर चहा उकळायला ठेवला.......

" मनु अजून तु इथेच आज इंटरव्ह्यूसाठी जाणार होतीस ना "


" ह.हा आप्पा जाईलच येवढ्यात ते...ते नाश्ता बनवायचा राहीला होता ती तिचे अश्रू लपवत ती बोलली "मनस्वी

( तिच्या मोठ्या काकांना ती आप्पा म्हणत असे....)


अगं आवर पटकन उशीर होईल न तुला आणि ते राहूदे ते मंजुषा करेल.....

ना...नाही आप्पा झालंच आहे आता सगळं नाश्त्याचं....अजून टाईम आहे जायला.....मी करते सगळं
अप्पांनी एक सुस्कारा सोडला आणि तिथून‌ निघुन गेले....

कोरोना विषाणूच्या साथीने दुर्दैवी मनस्वीच्या आईचा मृत्यू झालेला.....तिचे वडील ती लहान असतानाच अपघातात मृत्यू पावले......मनस्वी एकुलती एक होती तिची आई आणि ती भाड्याच्या घरात राहत होते तिची आई लोकांच्या घरी धुणी भांडी करत असे आणि त्यांचं घर सांभाळत होती पण नियतीने त्यांच्या आयुष्यात भलतंच वळण घेतलेलं.......त्या काळात तर तिची जबाबदारी घ्यायलाही कोणीच तयार नव्हते....एकटी मुलीची जात कुठे राहील कोण तिला सांभाळेल हा विचार करुन‌ तिच्या मोठ्या काकांनी तिचा सांभाळ करायचा ठरवले......तिच्या मोठ्या आईचा तिला सांभाळण्यासाठी विरोध होता पण तिच्या अप्पांनी कोणाच एक ऐकलं नाही.....तिची कोरोना टेस्ट करुन तिला त्यांच्या घरी ठेवलं त्यांना दोन मुली असतानाही त्यांनी तिची जबाबदारी घेतली होती त्या कोरोना काळात तिला तिच्या अप्पांनी च् आधार दिला होता. तिचे अप्पा हे मध्यम वर्गीय होते ते एका छोट्याशा कंपनीत कामाला होते त्यांची परिस्थिती ही नाजूकच होती.......त्या काळात खुप खचली होती ती....तिचं जगच संपलं होतं तिची आई तिचं सर्वस्व नशीबाने तिच्याकडून हिरावून घेतलं होतं......तिने सावरलं होतं स्वत; ला त्या दिवसात.....सकाळी कॉलेज करुन ती लायब्ररी मध्ये काम करीत होती आणि दुपारी घरी आल्यावर ती लहान मुलामुलींच्या शिकवण्या घेत असे तिला अप्पांची परिस्थिती माहीत होती म्हणून तिला त्यांच्यावर ओझं राहायचं नव्हतं....तिच्या शिक्षणाचा खर्च ती स्वतः करित होती.......येवढं करुन ही तिची मोठी आई तिला जीव‌ लावत नव्हती नेहमी कठोर वागत असे......तिच्याकडून घरातील सगळी कामं करुन घेत असे......तरी मनस्वी सगळं सहन करीत होती......कारण तिला त्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं......तिच्या वाईट काळात त्यांनीच तिला आधार दिला होता....त्यांचे उपकार म्हणून ती सगळं सहन करीत होती.....तिचे अप्पा मात्र तिला खुप जीव लावत होते......




इथुन पुढे........


काही वेळातच मनस्वी सगळं आटोपून बस स्टॉप वर जायला निघाली.....बस स्टॉपवर जाताच बस आली.....गर्दी असतानाही ती कशीबशी बसमध्ये चढली......उशीर तर झालाच होता त्यात ट्राफिकने घोळ घातला.....तिला जास्तच भिती वाटु लागली....


एकदाची ती कंपनी असलेल्या एरियात पोहचली.....पण अजुन तरी त्या कंपनीचा बोर्ड तिला दिसत नव्हता..... तिचं हृदय धडधडत होतं त्यात पिरीयडस् ची एक भर.....आज पहिलाच दिवस होता म्हणून पिरीयडस ने तर तिचा जीव घेतला होता.....तिने तिथेच जवळपास विचार पुस केली आणि ती पुढे जायला निघाली चालता चालता तिला समोरच ND Industry चा मोठा स्टँडर्ड असा एक बोर्ड दिसला......

ती गेटजवळ आली......Security ला मोबाईल मध्ये आलेला मेल दाखवला आणि तीने आतमध्ये प्रवेश मिळवला...मनात एक प्रकारची हुरहूर लागली होती....जरा घाबरतच ती आतमध्ये झपाझप पाऊल टाकुन चालु लागली..... आतमध्ये असा ओपन एरिया होता त्याच्या मधोमधच वॉटर फाउंटेन होतं.....सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे शो साठी असलेले प्लान्टस होते......ती सगळं बारकाईने पाहत होती...आता तिने मेन डोअर मधून आतमध्ये प्रवेश केला......ती सरळ रिसेप्शन कडे गेली आणि तिथे इंटरव्ह्यू साठी आली आहे असं सांगितले......रिसेप्शन वाली ने तिला 6th फ्लोअरवर जायला सांगितले.....ती पुढे जायला निघाली...बिचारी आधीच एवढी घाबरली होती की त्यात तिथला लेडीज स्टाफ बघून तर तिचे मन अजूनच बैचेन होऊ लागले.....सर्व लेडीज स्टाफ ने शॉर्ट स्कर्ट घातले होते त्यात ही एकटिच शॉर्ट कुर्ती आणि ब्लॅक कलरच्या स्किनी जिन्स वर होती......त्यामुळे तर ती अजूनच Uncomfortable झाली......तिला आधी समजलंच नाही कुठे जावं म्हणून.....एवढी मोठी कंपनी म्हटल्यावर तिला काहीच सुचत नव्हते लिफ्टही सापडत नव्हती....मनात देवाचा धावा‌ करीत ती शोधत शोधत पुढे आली तिला तो एरिया एकदम शांत वाटला ती इकडे तिकडे पाहू लागली तेवढ्यातच तिला लिफ्ट दिसली तसं ती लिफ्टच्या दिशेने जायला निघाली....... तिला लिफ्टचा दरवाजा बंद होतानी दिसला तसं ती ओरडली लिफ्ट थांबवा म्हणून लिफ्टमधील व्यक्तीला दुरुनच सांगू लागली.... लिफ्टमधील व्यक्ती तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती.....ती लिफ्टमध्ये घुसली आणि लिफ्ट चालू झाली......तिने मागे टेकून डोळे मिटले....पिरीयडस मुळे तिच्या पायात त्राण उरले नव्हते......पाय गळुन पडल्यासारखे तिला वाटत होतं....त्यात लिफ्टमध्ये असल्याने तिचं डोकं गरगरायला लागले तिने तिथल्या पाईपला पकडले आणि गच्च डोळे मिटले.....सकाळी ती काहीच खाऊन आली नव्हती त्यात पिरीयडस आणि झालेली धावपळ त्याच्यामुळे तिची ही अशी अवस्था झाली होती......तिच्या हातातली डॉक्युमेंट्सची फाईल खाली पडली तसं त्या व्यक्तीने तिच्याकडे पाहिले.....चेहर्यावर घाम फुटला होता......ती जोर जोराने श्वास घेत होती

" What happened??? " त्याने तिच्या गालावर टॅप करून विचारले

ती भितीदायक नजरेने त्याला पाहत होती.....त्याने तिला नीट पकडले आणि तिचा त्याच्या हातात गुंफवला.....तिला त्रास होत होता....तो काय करतोय हेच ती बघत होती...तिला काही च सुचत नव्हतं


" Calm down......breath in....breath out.....!!!" ती‌ व्यक्ती सारखं हेच रिपीट करत होती.....

जे तो सांगत होता ते ती ऐकत होती...... काही क्षणातच ती शांत झाली

ती आता बेटर फिल करत होती......

त्याने पडलेले ते डाक्युमेंटस उचलुन त्या फाईल मध्ये ठेवून तिच्याकडे दिले.....लिफ्ट बरोबर 6th फ्लोअरवर थांबली....कदाचित तिचे डॉक्युमेंट्स बघून त्याला कळाले असेन......ती लिफ्टमधून बाहेर पडली...तिच्याकडे येणारे जाणारे लोक तिच्याकडे पाहत होते तिला खूप विचित्र वाटत होते...

तेवढ्यात एक security पळतच तिच्या जवळ येऊन थांबला आणि तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिला. ती कावरीबावरी होऊन इकडे तिकडे पाहू लागली....तिचे गोंधळलेले expressions पाहून त्यानी तिला विचारलं

" तुम्ही इथे काय करता आणि ही Private lift आहे या lift मधून यायची permission तुम्हांला कोणी दिली ही lift फक्त मेन बॉस ची आहे त्यांना जर समजलं तर ते तुम्हाला आणि मलाही नोकरी वरुन काढतीन" तो रागातच तिला ओरडला तिला ओशाळल्यासारखं वाटलं ती खुपच घाबरली तिला आता खुपच भरुन येत होतं.‌...

"So....sorry मला माहित नव्हते मी पहिल्यांदाच इथे आली आहे " असं म्हणत ती पुढे जायला निघाली तिचा कंठ आता भरुन आला होता......

तिने आधी वॉश रूम शोधलं... वॉश रुममध्ये आल्यावर तिने पहिले चेहर्यावर पाणी मारलं...तिला खुप रडु येत होतं....तिने मनसोक्त रडून घेतलं परत तोंडावर पाणी मारलं...तिने तिच्या पर्स मधून स्कार्फ काढला आणि चेहरा पुसला.....बॉटल काढून गटागट पाणी पिलं आणि चेहरा एकदम नॉर्मल ठेवून ती बाहेर आली...

पुढे आल्यावर तिला एका बाजूला खुप जण खुर्चीवर रांगेत बसलेले दिसले....तिने तिथल्याच एका मुलीला विचारलं

" Excuse me mam...इंटरव्ह्यू साठी कुठे जावं लागेल..."मनस्वी

" तु इथे बसु शकतेस.....इथे सर्व जण इंटरव्ह्यू देण्यासाठीच आले आहे "
ती मुलगी एका रिकाम्या खुर्चीकडे हात दाखवत म्हणाली....‌".......

Thanks....

तसं मनस्वी खुर्चीवर बसली......एक एक जण आतमध्ये जाऊन इंटरव्ह्यू देऊन बाहेर येत होते.....मनस्वी बाहेर येणार्यांचे एक्सप्रेशन्स बघत होती काही आनंदी वाटत होते तर काही निराश......जसं जसं एक एक जण कमी होत होते तसं तिची धडधड वाढू लागली होती मन बैचेन होऊ लागलं होतं भिती वाटत होती काय प्रश्न विचारतील? आणि मला जर सांगता नाही आलं तर..... खुपच भिती वाटत होती...थरथरायला लागली होती.....थोड्यावेळातच तिला आत बोलावलं गेलं......तीने एक मोठा श्वास घेतला आणि ती आतमध्ये गेली......

**********************************
क्रमशः

©® ~ पल्लवी

ही कथा लेखिकेची स्वनिर्मित असून , कथा पुर्ण काल्पनिक आहे कथेतील पात्र, घटना, स्थळ सर्व काही लेखिकेची स्वकल्पना आहे .याचा कोणत्याही जिवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही.तसे कुणाला आढळून आल्यास निव्वळ एक योगायोग समजावा. कथेचा उद्देश फक्त वाचकांचे मनोरंजन करणे हाच आहे. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा लेखिकेचा हेतू नाही . तरीही नकळत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यासाठी दिलगीर आहे.......

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत. त्यामुळे लेखिकेची परमिशन न घेता कुणीही कोणत्याही इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर कॉपी करून टाकल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल.....!!

( WAITING FOR YOUR COMMENTS....! ❤️ )