अनुबंध बंधनाचे. - भाग 4 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 4

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ४ )

दुसऱ्या दिवशी रविवार होता. त्यामुळे प्रेम जरा उशीराच उठला होता.
गेले काही दिवस रोजचे कॉलेज, ऑफिस, आणि रात्री जागरण यामुळे खुप थकुन गेला होता. म्हणुन त्याने आज दिवसभर घरीच आराम केला. 
मधेच त्याला अंजली बद्दल विचार येत होते. पण खुप विचार करून त्याकडे दुर्लक्ष करायचे असे ठरवले. 
दोन दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा होती. त्याचा मित्र त्याला सांगायला येतो. बुधवारी कोजागिरीच्या दिवशी वाजवायची ऑर्डर आहे तिथेच तु येशील का ?
 प्रेम ने सरळ नाही येणार म्हणुन सांगितले. 
त्या दिवशी मुले कमी होती त्यामुळे त्याचा मित्र जाताना पुन्हा त्याला बोलवायला आला. प्रेम नुकताच ऑफिस मधुन घरी आला होता. त्यांच्यासोबत त्याला जाणं गरजेचं वाटले. म्हणुन तो वाजवायला गेला. जाताना तोच विचार प्रेम च्या डोक्यात येत होता.
पुन्हा अंजली समोर आली तर काय...? 
तो तिच्याच विचारात मग्न होता. तेवढ्यात रिक्षा थांबली. रिक्षातून खाली उतरताच प्रेमची नजर इकडे तिकडे फिरू लागली होती. तो तिलाच शोधत होता. पण ती कुठेच दिसत नव्हती. थोड्या वेळासाठी त्याला बरं वाटलं. अंजली दिसत नव्हती म्हणुन... कमीत कमी तिला कसे फेस करायचे, यातुन तर सुटका झाली. 
सर्व तयारी झाली होती. दांडिया खेळायला सुरुवात झाली होती. हळु हळू गर्दी व्हायला लागली होती. प्रेम वाजवण्यात गुंग होता. मधेच त्याचे लक्ष एका खेळत असलेल्या मुलीवर गेले. ती पाठमोरी होवून नाचत होती. प्रेमला वाटले अंजली असेल. पण ती अंजली नव्हती, ते नाचता नाचता त्याच्या समोर आली तेव्हा त्याला समजले. अंजली सारखीच हेअर स्टाईल असल्यामुळे प्रेमला वाटते तीच असेल. पण तिच्या जागी दुसऱ्या मुलीला पाहून प्रेमचा थोडा मुड ऑफ झाला होता. 
त्याचे एक मन बोलत होते. बरे झाले ती नाही. आणि दुसरे मन तिची वाट पहात होते. 
 खुप वेळ गरबा चालु होता. रात्रीचे बारा वाजायला आले होते. आता तर अंजली येणार नाही, याची प्रेमला खात्री पटली होती. तेवढ्यात आयोजकांनी गरबा थांबवला. 
काही मुलं मुली मिळुन स्नॅक्स आणि कोजागिरीच्या दुधाचे ग्लास सर्वांना वाटत होते. 
प्रेम ने काहीच घेतले नाही. त्याचा मुड नव्हता. प्रेम आज ऑफिस मधून आल्यावर डायरेक्ट इकडे निघुन आला होता. जेवलाही नव्हता, खरंतर एवढा वेळ वाजवुन खुप थकला होता, तरीही त्याला आज भुक लागली नव्हती. 
थोड्या वेळाने गरबा पुन्हा चालु होणार होता. प्रेम काही न खाता खुर्चीवर पाणी पित बसला होता. 
 या सर्व हालचालींवर पहिल्या मजल्याच्या गॅलरी मधुन कोणाचे तरी बारीक लक्ष होते. पण प्रेमने आल्यापासुन एकदाही वरती पहिलं नव्हते. त्यामुळे गॅलरीमध्ये बसलेली अंजली त्याला दिसली नव्हती. 
पण तो आल्यापासुन तिचे सर्व लक्ष प्रेमवरच होते. पण ती नाचायला खाली आली नव्हती. कारण देवीच्या विसर्जनाच्या दिवशी प्रेमला न सांगताच ती घरी निघुन गेली होती. तिला त्या गोष्टीचे खुप वाईट वाटले होते. 
तिच्या पण मनात तीच गोष्ट होती. जर प्रेम पुन्हा समोर आला तर त्याला कसे फेस करायचं. म्हणुन तिने पण अजुनपर्यंत स्वतःला थांबऊन ठेवले होते. 
पण प्रेम च्या चेहऱ्यावरील भाव तिला सर्व काही सांगत होते. त्याने काही खायला पण घेतले नाही. दुध पण नाही प्यायला. त्याची अस्वस्थता पाहून तिला रहावलं नाही, ती लगेच खाली आली. 
एका मुलीकडून स्नॅक्स ची डिश आणि दुधाचा ग्लास घेऊन ती प्रेम बसला होता तिथे गेली. आणि पाठीमागून त्याला आवाज दिला. 
अंजली : आज उपवास आहे का...? 😊
प्रेम तिचा आवाज ऐकुन दचकून मागे वळुन पाहतो. आणि बोलतो....
प्रेम : तु.......... कुठे होतीस एवढा वेळ...,? 🤔
अंजली : मी...... मी तर इथेच आहे कधीपासून. तुझेच लक्ष नव्हते.😊
प्रेम : खोटं नको बोलू.....🤨
अंजली : अरे खरंच.....😊
प्रेम : मग मला कशी दिसली नाहीस...?🤔
अंजली : तु मनापासुन शोधलच नाहीस, मग कशी दिसणार मी...?😊
प्रेम : गप्प बस.... कुठे होतीस... सांग ?🤨
अंजली : अरे वरती होते गॅलरी मधे,😊
प्रेम : का.... नाचायला का नाही आली मग ?🤔
अंजली : असच.... मुड नव्हता म्हणुन नाही आले. 😔
प्रेम : काय झाले... मुड नसायला... ?🤔
अंजली : मला वाटले त्या दिवशी मी तुला न सांगता गेले म्हणून तुला राग आला असेल...😔
प्रेम : अरे.... त्यात काय एवढं....😊
अंजली : पण मला वाटलं तसं.....😔
प्रेम : वेडी आहेस का तु....?😊
अंजली : हो....... असेल... माहीत नाही.😊

*दोघेही एकमकांकडे बघुन हसतात. मधेच अंजली तिच्या हातातली डिश आणि दुधाचा ग्लास त्याला देते. आणि खायला सांगते. 
प्रेम : अरे...... थॅन्क्स ....पण एक सांगु.... मला खरच राग वगैरे नाही आला. 😊
अंजली : खरच तु नाही रागवला...?😊
प्रेम : अरे खरच नाही...ओके 😊
अंजली : तरीपण सॉरी त्याबद्दल....ते डॅडी मधेच बोलले घरी चल म्हणुन जावं लागलं.
प्रेम : अरे इट्स ओके, नो प्रोब्लेम 😊
अंजली : अच्छा... 🙂 मग तु खाऊन घे. आणि ते दुध पण पी.
प्रेम : हो.... आता पुन्हा गरबा चालु होईल. तु येशील ना खेळायला...?
अंजली : हो... येतेय दांडिया घेऊन...😊
असे बोलुन ती वरती निघुन जाते.
थोड्या वेळात गरबा पुन्हा चालु होतो. अंजली पण गरबा खेळत असते. राऊंड मधे खेळताना ती त्याच्या समोर आली की दोघेही एकमेकांकडे पाहून गलाताच हसत होते. 
प्रेम सुध्दा आता फ्रेश वाटत होता. दांडिया सोबतच त्या दोघांच्या नजरेचा खेळ असाच रंगात आला होता. 
रात्रीचे दिड वाजले होते. गरबा ५ मिनिटात संपणार होता. फास्ट गाणी चालु होती. सर्व बेधुंद होऊन नाचत होते. प्रेम सुध्दा त्याच जोशात ड्रम वाजवत होता. तो घामाने पुर्ण भिजला होता. 
अखेर गाणी वाजवायची बंद होतात, आणि गरबा संपतो. खुप थकल्यामुळे प्रेम बाजुला असलेल्या एका खुर्चीवर बसतो. त्याला पाहून अंजली पटकन मेघाच्या घरून एक थंड पाण्याची बॉटल घेऊन धावतच प्रेमजवळ येते, आणि ती बॉटल त्याला देते. तिच्या हातुन बॉटल घेत तो तिच्याकडेच पहात राहतो, आणि मनातच विचार करतो, किती काळजी करतेय ही मुलगी...नक्की हिच्या मनात काय असेल माझ्याबद्दल,.....
तसा वेगळा विचार केला तर, हि एवढी लहान म्हणजे दहा अकरा वर्षांची आहे, तिला काय कळत असेल हे सर्व,,,,, नाही... 
आपणच काहीतरी चुकीचा विचार मनात आणतोय. ती अजुन खुप लहान आहे. तिला त्या गोष्टींची काहीच कल्पना नसेल. फक्त मी तिला एक मित्र म्हणुन आवडत असणार, बाकी काही नाही. 
एवढा घाणेरडा विचार मनात तरी कसा येऊ शकतो माझ्या...असा विचार करून प्रेम स्वतःलाच दोष देत असतो. 
अंजली त्याच्या समोर हाताची घडी घालुन त्याच्याकडेच बघत उभी असते. तिला असं पाहून प्रेम पटकन भानावर येतो. त्याची ती अवस्था पाहून अंजली बोलते. 
अंजली : काय झालं....कुठे हरवला होतास...?🤔
प्रेम : अरे काही नाही....ते असच...😊
अंजली : अच्छा... म्हणजे विचार करतोय ना, उद्यापासून भेट होणार नाही याचा...😊
प्रेम : हो ना... कसे भेटणार आपण आता ? पुढच्या वर्षी भेटू मग...नवरात्रीमध्ये 🙂
अंजली : खरच भेटणार नाहीस की तुलाच मला भेटायचं नाही...?🤨
प्रेम : अरे... रागावते काय... गम्मत केली.😊
( अंजली प्रेम च्या हातात एक चिठ्ठी देते )
अंजली : हे घे... यात माझ्या घरचा फोन नंबर आहे. मी स्कूल मधुन दुपारी १ वाजेपर्यंत येते. आणि संध्याकाळी ६ ते ८ ट्युशन ला जाते. मधल्या वेळात तु मला कधीही कॉल करू शकतो.
प्रेम : कोणत्या स्टॅंडर्ड मधे आहेस, आणि स्कूल चे नाव काय...?
अंजली : 5th स्टॅंडर्ड, सेंन जॉन स्कूल.
प्रेम : ओके.... अरे पण घरी मम्मी पप्पा असले तर...? कॉल कसा करणार मी...?
अंजली : डॅड दिवसभर ऑफिसमधे असतात. ते रात्री ९ वाजता येतात. मॉम म्युझिक क्लास घेते. ४ ते ६ या वेळेत.
प्रेम : अरे व्वा... छानच म्हणजे तुझी मॉम गाणं शिकवते.😊
अंजली : हो....😊
प्रेम : मग तु पण शिकत असशील ना...?
अंजली : हो... पण कधी कधी... मुड असेल तेव्हा...😊
प्रेम : छान ... पण शिक तु... तुझ्या घरीच शिकायला भेटतं तुला. लकी आहेस तू....😊
अंजली : हो... तुला आवडतात गाणी...?
प्रेम : हो.... खूपच...आवडतात..😊
अंजली : ओके मग शिकेन मी...👍🏻
प्रेम : अरे... ☺️ ओके गुड...👍
अंजली : बरं तु कॉल करशील ना..?🤔
प्रेम : हो ... नक्की करेन.. पण आता मला निघायला हवं, तु पण जा, घरी वाट पहात असतील. 
अंजली : हो... जाते, बाय, टेक केअर, नीट जा...आणि कॉल कर नक्की...😊
असे बोलून अंजली तिथून निघून जात असते. जाताना दोन तीन वेळा ति मागे वळुन पाहते. आणि पुढे अंधारात दिसेनाशी होते.
 थोड्या वेळाने प्रेम पण त्याच्या मित्रांसोबत घरी निघुन आला. आज तो जेवलाही नव्हता,आणि आल्यावर पण तसाच काहीतरी विचार करत रात्री उशिरा झोपुन गेला.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️