कोण? - 22 Gajendra Kudmate द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोण? - 22

     आईने आतून कुंकू आणि हळदची कुहिरी आणून सावलीचा कपाळाला टिका लावला. मग आई म्हणाली, " तू बैस पियुष सोबत बोलत मी तुम्हा दोघांसाठी काहिती खायला आणते.' असे म्हणू आई पुन्हा घराचा आत
गेली. मग पियुष म्हणाला, 'सांग सावली काय महत्त्वाचे काम काढले आहेस तू, मला माहित आहे तुझी सवय तू कधीच रिकामी वावरत नाहीस. तू सतत कुठल्या न कुठल्या कामात व्यस्त असतेस, मागील महिन्यात तुझ्याबद्दल ऐकून फारच वाईट वाटत होते. माझा मनाला सारखी आत्मग्लानी होत होती कि ज्या सावलीने आमचा आयुष्याचा एका महत्वपूर्ण वळणावर आमचा बाजूने खंबीरपणे उभे राहून आमचे हक्क आम्हाला मिळवून दिले होते. त्या सावलीला आम्ही कसलीच मदत करू शकत नाही म्हणून." तेव्हा सावली उत्तरली, "पियुष तू त्या गोष्टीचे वाईट वाटून घेऊ नकोस, आज खरे तर मी तुझी मदत घेण्यास आलेली आहे.' तेव्हा पियुष आनंदित होऊन म्हणाला, माझी मदत का नाही मी तर कधीपासून तयार आहे. तू फक्त सांग काय करू मी तुझासाठी, तेव्हा सावली म्हणाली, "हे बघ पियुष मला माहित आहे कि तू टेलीकॉमुनिकेशन मध्ये फार चांगल्या तऱ्हेने काम करतो आहे.तर मला तुझ्या त्याच कलेची आज आवश्यकता आहे. '

   सावलीने पियुषला तिचा बरोबर घडत असलेले प्रकरण संपूर्णपणे सविस्तर सांगितले. त्यानंतर ती त्याला म्हणाली "पियुष तू मला त्या व्यक्तीचा सदर लोकेशनची माहिती क्षणोक्षणी देण्याची कृपा करशील काय आणि ते हि गुपित कुणाला न कळता." तेव्हा पियुषने सावलीला होकार दिला आणि तिला या गोष्टीचा संपूर्ण गुप्ततेचा भरवसा दिला. तेवढ्यात आई दोघांसाठी पोहे आणि चहा घेऊन आली आणि म्हणाली, “घे बेटा थोडा नाश्ता करून घे, म्हणशील तर स्वयंपाक सुद्धा तयार आहे आणि मस्त जेवण ही करून घे.” तेव्हा सावली म्हणाली, आता सध्या नाश्ता करते काकू जेवण करण्यासाठी पुन्हा कधी येईल.” तिघांनी नाश्ता केला आणि मग सावली आईचा आणि पियुषचा निरोप घेऊन घराकडे निघाली. ती बाहेर रस्त्यावर जात असतांना तिचा फोन वाजला तर सावलीने गाडी थांबवली आणि फोन उचलला, समोरून त्याच व्यक्तीचा आवाज आला आणि तो बोलला, काय मिस्स सावली कोणाकडे गेली होतीस, कोण लागतो तो व्यक्ती तुझा.' तेवढ्यात सावलीने गाडीचा आरशात बघितले तर तोच व्यक्ती सावलीचा पाठलाग करत असतांना सावलीला दिसला. तेव्हा सावलीने त्याला म्हटले, काय मिस्टर रिकाम टेकडे तुम्हाला काय काम नाही आहे काय. शिवाय मी कुणाकडे जाते येते ते तुम्हाला तर माहित असते ना तर मग मला काय आणि कशाला विचारत आहेस. तरीही तुझ्या माहितीसाठी सांगते कि ते माझ्या काकूचे घर आहे. त्यांचा प्रकुर्तीची विचारपूस करण्यासाठी गेलेली होती. तुला अधिकच उत्सुकता होत असेल तर ये तुला सुद्धा भेट करून देते.

    तेव्हा तो व्यक्ती बोलला, " जास्ती बोलून राहिली आहेस तू. जेवढे विचारले तेवढे गुमान सांगत जा नाही तर तुला माहित आहेच." तेव्हा मात्र सावली तापली होती आणि ती त्याच स्वरात म्हणाली, “ जा रे भेकाड माणसा हि सगळी माहिती देण्यासाठी मी काही तुझी नौकर नाही आहे. माझी मी स्वतंत्र आहे कुठेही यायला आणि जायला तू कोण होतो माझ्यावर निर्बंध लावणारा.' असे म्हणून तिने फोन कापला आणि तुरंत पियुषला मेसेज केला.
पियुषने हि मोठ्या तातडीने त्या व्यक्तीचा मोबाईल ट्रेस करण्याचा प्रयत्न केला परंतु फोन कटला म्हणून तो ट्रेस होऊ शकला नाही. मग पियुषने सावलीला मेसेज केला कि पुन्हा जर फोन आला तर मला आधी सांग आणि त्या व्यक्तीला पाच मिनिटे तू बोलण्यात गुंतवून ठेव मी मग त्याचा मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून तुला त्याचा लोकेशन पाठवतो. सावलीने गाडी पुन्हा सुरु केली आणि ती घराचा दिशेने निघून गेली. जशी ती घरी पोहोचली तर कुणीतरी तिला तिचा घरापासून जातांना भासला. मग सावलीने तातडीने गाडीवरून उतरून घराचा मागे जाऊन बघितले तर तिला काही पावलांचे चिन्ह दिसले. सावली म्हणाली नक्की कुणीतरी येथे आले होते. तेव्हाच तिचा लक्षात काहीतरी आले आणि ती लगेच घराचा आत गेली. घराचा आत जाऊन तिने सगळ्यात आधी घराचा अवतीभवती लावलेले कॅमेरे चेक केले. त्या कॅमेऱ्यात तिला कुणीतरी तिचा घराचा अवतीभवती वावरतांना आणि मग कोमलचा रूमचा खिडकीचा बाहेरील स्थानी काहीतरी शोधताना दिसला. त्या व्यक्तीने कपडे अशा तऱ्हेने घातले होते कि त्याचा चेहरा आणि शरीराचे अवयव हे
काहीच दिसत नव्हते, शिवाय तो पुरुष आहे कि स्त्री आहे हे सुद्धा स्पष्ट कळत नव्हते. मग सावली कोमलचा रुममध्ये गेली आणि तिने ती खिडकी उघडून बघितली. सावलीने ती खिडकी उघडली तर तिला जाणवले ती खिडकी आधीच उघडलेली होती. त्याबद्दल सावलीने कोमलला विचारले तर ती अनभिग्य असल्यासारखी बोलू लागली. ती म्हणाली तिला त्याबद्दल काहीच माहित नाही आहे, शिवाय ती तर बेडवरून कुणाचा सहाय्यचा शिवाय उठू शकत हि नाही. तर तिने ती खिडकी उघडली असेल हे तर शक्यच होऊ शकत नाही. सावलीला सुद्धा हे जाणवले होते, परंतु प्रश्न हा होता तो किंवा ती व्यक्ती कोण होती.

   शेष पुढील भागात.......