Koun - 6 books and stories free download online pdf in Marathi

कोण? - 6

भाग – ६
आईने कोमलला सावलीचा बरोबर घडलेला प्रकार सांगितला आणि तिला ताबडतोब घरी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी कोमल घरी परत आली आणि सावलीला येऊन भेटली. कोमलला घरी आलेलं बघून सावलीला आधी असहज वाटले परंतु कालचा सबंध परिस्थितीचा बद्दल विचार डोक्यात आला तेव्हा आईने केलेल्या त्या अनयास कार्याबद्दल तिला आता बरे वाटू लागले होते. तिचा मनात कोमलचा सुरक्षेची काळजी राहणार नाही कारण कि ती आता तिचा नजरे समोर आणखी विशेष त्या तिघी सुद्धा एकमेकांचा सोबत एकाच घरात राहतील याबद्दल तिला समाधान होते. तर असे एक आठवडा गेला आणि सावली आता बरी होऊन गेली होती. तेव्हा तिने शॉपिंगला जाण्याचा बेत आखला होता. आता त्या तिघीही कुठेही सोबतच जाऊ लागल्या होत्या. त्या दिवशी नियतीचा खेळ म्हणावा कि सावलीचे नशीब, एक गंमतीदार गोष्ट घडली. कोमलने सावली आणि तिचा स्वतःसाठी ड्रेस आणले होते. त्यात गंमत अशी होती कि तिने एकाच सारखे दोन ड्रेस आणले होते. त्यातील एक सावलीसाठी आणि एक तिचा स्वतःसाठी. सावलीने सुद्धा मोठ्या आनंदाने तो ड्रेस घातला होता. दुरून बघितले तर त्या दोघ्याही सारख्याच दिसत होत्या.
तर ठरल्याप्रमाणे त्या तिघीही शोपिंगला जाण्यासाठी घरून निघाल्या. तेव्हा सावली आणि कोमल बाहेर गेटजवळ उभ्या होत्या आणि आई दाराला कुलूप लावत होती. त्या दिवशी काही केल्या आईचा हाताने कुलूप लागतच नव्हते त्यामुळे त्यांना जाण्यास विलंब होत होता. उशीर होत आहे हे बघून कोमल बोलली, “ ताई काय झाले ग आई येत का नाही आहे.” तेव्हा सावली म्हणाली, “ आईला आवाज दे आणि तिला सांग आपल्याला उशीर होतो आहे म्हणून.” तर कोमलने आईला हाक मारली तर आई उत्तरली, “ अग आज हे कुलूप लागतच नाही आहे.” मग सावली म्हणाली, “ कोमल जा बर ते कुलूप लाव आणि लवकर ये.” तेव्हा नियतीला काय हवे होते तर माहित नव्हते कोमलचा तोंडून अनयास निघाले, “ तूच जा ना ताई ते कुलूप मला सुद्धा लावता येत नाही.” मग सावली सहज म्हणाली, “ हो बाई तू तर नाजूक परी आहे असे मेहनतीचे काम तर आम्हालाच करावे लागतील ना.” असे म्हणून दोघिहि हसू लागल्या आणि सावली कुलूप लावण्यासाठी आईकडे गेली. तेथे जाऊन बघितले तर आई सारखी प्रयत्न करत होती आणि कंटाळून गेलेली होती. सावलीला येत बघून ती म्हणाली, “काय जाणे आज काय आणि कसे होत आहे. आपण शॉपिंगला जाण्याचा बेत आखला आणि सकाळपासून काही न काही विचित्र घडते आहे. मी सकाळी दुध तापवायला ठेवले ते नासले, आता एक काळी मांजर माझ्या पायावरून गेली आणि आता हे कुलूप. त्याच बरोबर जेव्हापासून बाहेर जायचे आहे हे ऐकले तेव्हा पासून सारख माझा डावा डोळा फफडफडत आहे. कसल्यातरी अनिष्टाचा संकेत देतो आहे त्या कारण माझे पाय सारखे मागे ओढतायत.”
त्या दोघी तिकडे एकमेकांशी बोलत असतांना इकडे कोमल गाडीवर बसून होती. तिला खरच कोणी ओळखू शकत नव्हते एक दोन ओळखीचा लोकांनी चक्क तिला सावली म्हणून हाक मारली होती आणि स्वतःच ते मूर्ख बनलेले होते. इकडे आता सावली कुलूप लावण्याचा प्रयत्न करू लागली होती. तिचा सुधा हाताने ते कुलूप लागत नव्हते ती सारखी प्रयत्न करत होती आणि तेवढ्यात रस्त्यावर काही तरी आदडण्याचा आवाज आला. आई म्हणाली, “ काय पडले ग सावली.” तेव्हा सावली म्हणाली, “ आई घरात नाही बाहेर रस्त्यावर आहे.” असे म्हणताच रस्त्यावर आरडाओरडा सुरु झाला म्हणून सावली आणि तिची आई कुलूप लावायचे सोडून काय झाले म्हणून बघायला गेले. तर काय बघतात कोमल रक्ताचा थारोड्यात पडलेली होती आणि सावलीचा गाडीचा नक्शा बदललेला होता. कोमलला त्या अवस्थेत बघून आई जोरात ओरडली आणि तिचा कडे धावली. सावली तर ते पसरलेले रक्त बघूनच बेशुद्ध झाली होती. लोकांनी मग कोमलला उचलले आणि इस्पितळात नेले. इकडे सावली बेशुद्ध होती आणि आईची सुद्धा अवस्था तशीच होती. मग सावलीला सुद्धा इस्पितळात दाखल केलं गेलं. शेजारचा लोकांनी सावलीचा आईचा संभाळ केलेला होता परंतु कोमल आणि सावली दोघीही बेशुद्ध होत्या.

त्यात सावलीपेक्षा कोमलचे शुद्धीवर येणे आवश्यक होते. कारण कि डॉक्टर म्हणत होते, “ कोमलचा शरीरासोबत तिचा मेंदूला सुद्धा मार लागलेला आहे. जीतक्या लवकर ती शुद्धीवर येईल तितक्या लवकर आम्ही तिचे उपचार आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणून तिने लवकरात लवकर शुद्धीत येऊन तिचा चांगल्या स्थितीचा संकेत द्यावा.” म्हणून सगळे सावलीला सोडून कोमलचा उपचार करायला लागले होते. इकडे सावली एकटीच बेडवर पडून होती निस्तेज आणि निर्जीव. मग एका दिवसांनी सावलीला आपोआप शुद्ध आली. ती सहज उठून बसली आणि इकडे तिकडे बघू लागली. ती तर आधी समजूच नाही शकली कि काय झाले. मग आसपासची परिस्थिती आणि लोक बघून तिने अनयास एका नर्सला विचारले, “ मी इथे का बर आलेली आहे.” तर त्या नर्सने तिला त्या अपघाताबद्दल सांगितले तेव्हा सावली जोरात किंचाळ्या मारू लागली आणि कोमल कशी आहे म्हणून विचारू लागली. तिचे तसे वागणे बघून डॉक्टर तिचा जवळ आले आणि तिला सागितले कोमल बेशुद्ध आहे . हे ऐकताच सावली कोमलकडे तिला बघण्यासाठी जाऊ लागली. शेष पुढील भागात..........

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED