जर ती असती - 1 Harshad Molishree द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जर ती असती - 1







असं म्हणतात की, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हाच हे ठरून जातं की त्याची मृत्यू कधी होईल, मृत्यू नंतर म्हणतात की शरीर जाडलं तर राख आणि गाडलं तर खाक, पण एक जीवन अस ही असत जे मृत्यू नंतर सुरू होतं ज्याला आपण " आयुष्य नंतर " असं म्हणतो....

अशीच एक आयुष्य नंतर ची ही कथा आहे.... " जर ती असती "

श्रीधरराव देशमुख.... गावातला सर्वात श्रीमंत माणूस, पैसे थाट पाट आणि वाडा तर त्याला विरासत मध्ये भेटलं होत, सुखाचा जणू त्याच्या घरी भंडार होता, पण आज नेमकं सगळं बदलणार होतं....

सकाळचा वेळ होता खूप मस्त वातावरण होता, थंड असा वारा सुटला होता, पक्षींची चू चू ची आवाज कानाला अगदी मोहित करत होती, श्रीधर वाड्याच्या बाहेर स्तीत बागेत चकरा मारत होता, तेव्हाच त्याला वाड्यातून जोराचा ओरडण्याचा आवाज आला....

श्रीधर धावत वाड्यात आला, त्या एक आवाज नंतर वाड्यात जणू शांतता पसरली, श्रीधर धावत वरती मालिनी (श्रीधर ची बायको ) च्या रूम मध्ये गेला दार उघडताच त्याने पाहिलं की...

मालिनी खुडचिवर बसलेली होती, तिच्या कानातून रक्त निघत होतं, जेव्हा श्रीधर ने जवळ येऊन पाहिलं तर तिचे डोळे उघडेच होते, मालिनीचा जीव गेला होता पण त्याहून विचित्र श्रीधरला हे वाटलं की त्याच्या ६ वर्षा चा मुलगा समर तिथं बसून श्रीधर समोर बघून हसत होता....

श्रीधर ने पटकन डॉक्टरला बोलावलं, समर रूम च्या बाहेर गणूकाका सोबत थांबला होता, काही क्षणा नंतर श्रीधर बाहेर आला त्यांनी समरला त्याच्या मिठीत घेतलं आणि रडायला लागला....

मालिनीचा मृत्यू नंतर श्रीधरच मन आतून तुटलं होतं, अश्या परिस्थिती मध्ये समारला संभाडणं कठीण होतं म्हणून त्याने समारला त्याच्या मावशी सोबत अमेरिकाला पाठवून दिलं, समरला अमेरिकाला पटवण्याचा हा एक मात्र कारन नव्हता....

मालिनी गेल्यानंतर श्रीधर च्या मनात जणू काय तरी अडकून रहायलं होतं, त्याला रात्रीला झोपच लागायची नाही, रात्र रात्र भर तो वाड्यात एकटाच फिरत असे....

एक दिवस श्रीधर परत मालिनीज्या रूम मध्ये मेली होती त्या रूम मध्ये गेला, तो मालिनीला आठवुन रडत होता पण तेव्हाच त्याला तिथं एक बाई दिसली, त्या बाईचा चेहरा जळालेला होता, अगदी भयानक दिसत होती ती, ती बाई एकटक श्रीधरला पाहत होती....

श्रीधर तिला बघून खूप घाबरला, भीती मुळे त्याच्या अंगाला सहारे फुटले, हाथ पाय गारठले त्याचे.....

"काय झालं राव... ओळखलं नाही का....??? हा चेहरा तर तुमचीच देण आहे, मग आता घाबरताय का".... ती बाई

श्रीधरच्या तोंडून एक शब्द फुटत नव्हता, श्रीधर ने त्या बाईला ओळखकला पण... तो काहीच बोलला नाही

"काय झालं राव बोला, अरे बोला की... ??? ही भीती रहायली पाहिजे, ही भीती रहायली पाहिजे मरे पर्यंत, मी तुला मारणार नाही, तुला तुझे कर्म मारतील तू जे केलं आहे ते न तू कोणाला सांगू शकशील ना सांगितल्या शिवाय सुखाने जगू शकशील तुझी झोप मात्र माझ्या मुठी मध्ये आहे"..... ती बाई

ती बाई एवढं म्हणून गायब झाली, श्रीधर ने त्या रूमला कायम स्वरूपी बंद करून टाकलं, त्या दिवसा नंतर श्रीधर कधी झोपला नाही, त्याने डोळे मात्र बंद केले पण डोळे बंद करताच त्याच्या नजरे समोर ती बाई यायची आणि मालिनीचा तो चेहरा आणि असच बरचकाय पण श्रीधर ने कधी कोणाला काय सांगितलं नाही...

वाड्याला जणू श्राप लागला, त्या दिवस नंतर वाड्यात एकही मंगल कार्य झालं नाही, गावात पण लोक श्रीधर बद्दल कायच काय बोलत होते, पूर्ण गावात ही बातमी पसरली होती की वाड्यात सुवर्णाची आत्मा फिरतेय....

गणू काकाला यातलं थोडं फार माहीत होतं, पण नेमकं काय होत ह्याच्या मागे ते फक्त श्रीधरला माहीत होतं....

गावात कोणाची हिम्मत नव्हती पलटून वाड्यासमोर बघायची.....

बघता बघता २० वर्ष निघून गेली आणि आज समरचा पत्र आलं होतं अमेरिका वरून, गणू काका ने तो पत्र श्रीधरराव ला आणून दिलं....

"बाबा पहिले तर सॉरी पण काय आहे की आधी सांगितलं असतं तर तुम्ही मला इथं येण्याची परवानगी दिली नसती जस तुम्ही नेहमी करता, बाबा आता तरी येऊ द्या मला माझे लग्न झाले आहे आणि आता तर तुमच्या सुनेचा पण हट्ट आहे तिला आपला वाडा बघायचा आहे, तर मुद्दा असा आहे कि जे पर्यंत तुम्हाला पत्र भेटेल तो पर्यंत आम्ही मुंबईला पोचलो असणार, बाबा परत सॉरी आणि भेटुयात लवकरच".....

पत्र वाचताच श्रीधर जागेवरून उठला.... "काय करू मी या मुलाचं, गणू तू ऐक समरला फोन कर विचार त्याला तो कुठे आहे आणि त्याला सांग की परत जा".... श्रीधर त्याचं बोलणं पूर्ण करेल या आधीच

"बाबा..... I am here".... समर

"बाळा तू अस न सांगता"....

"बाबा, हो मला माहित आहे की तुम्ही म्हटले होते मला की इथं".... समर

"बाबा समर ची काय चूक नाहीये, मीच हट्ट केलं इथं यायला"... स्वरा

"बाळा पण तुम्हाला मी कस समजवू आता".... श्रीधर

"बाबा तुम्ही आजोबा होणार आहात".... हे ऐकताच श्रीधर शांत झाला त्याने फिरून प्रेमाने स्वरा कडे बघितलं

"हो बाबा आणि माझी अशी इच्छा होती की माझं बाळ आपल्या ह्या वाड्यात जन्माला यावं".... स्वरा

श्रीधर या पुढे काय बोलला नाही..... "गणू सून पहिल्यांदा आली आहे वाड्यात स्वागत करा तिचं"...

स्वरा आणि समर.... श्रीधर चे पाया पडून आत आले

गणू ने त्यांच्या समान खाली असलेल्या एका खोली मध्ये ठेवलं.....

श्रीधर खुशतर होता पण तितकीच त्याच्या मनाला भीती पण होती, ज्या रहस्य मुळे त्याने समारला वाड्यापासून २० वर्ष लांब ठेवलं आता तो वाड्यात आला होता, ह्या चिंता मुळे श्रीधर चा जीव आर्धा झाला होता......

रात्रीच्या जेवण्यानंतर स्वरा आणि समर दोघे बसले होते बेडरूम मध्ये....

"समर इतका मोठा वाडा आहे, पण माहीत नाही का भीती वाटेय, बाबा इथं इतक्या वर्षा पासून कशे रहातात एकटे".... स्वरा

"बाबांची वाड्याला घेऊन खूप आठवणी आहेत, एक सांगू तुला बाबा मला सोडू शकतात पण वाडा नाही".... समर हसत हसत म्हणाला

"समर पण बाबाला तुला वाड्यात यायला नाकारतात का नेहमी, means २० years its being so long"..... स्वरा

"२० वर्षा आधी आईची मृत्यु झाली वाड्यात, मला असं काय आठवत नाही पण मावशी ने सांगितलं होतं की तेव्हा मी खूप घाबरलो होतो, आई गेल्यानंतर खूप आजारी पडलो, बाबांना मला कसं संभडायचं तेच कळत नव्हतं, म्हणून मला मावशी कडे पटवून दिलं".... समर

" बेबी.... मी आहे ना उदास होऊ नकोस परत".... म्हणत स्वरा ने समर ला जवळ घेतलं

"पण नेमकं बाबांनी काय वाडा सोडला नाही, मावशी ने बाबांना खूप वेळा सांगितलं की सगळं विकून अमेरिकेत shift व्हा पण बाबांना वाडा विकणं हे कधी मान्य नव्हतं".... समर

"समर आपण जेव्हा येत होतो ना मी गावात लोकांना वाड्याबदल खूप काय बोलताना ऐकलं, जेव्हा आपण त्या हॉटेलच्या इथं थांबलो होतो चहा पिण्यासाठी तेव्हा, त्यांना जेव्हा कळलं ना की आपण वाड्यात येतोय तर"....

"काय नाय ग कसं आहे, असेल कदाचित मला पण कुठे माहीत आहे"... समर

"म्हणजे इथं खरच भूत आहे का..... तसंही समर इथं किती शांतता आहे बघना"..... स्वरा

"अरे येडू काय आहे की, गेल्या २० वर्षी पासून बाबा आणि गणू काकाच रहातात फक्त इथं, ना कोण येतो ना जातो, म्हणून खूप शांतता आहे इथं, आता आपण आलोय इथं मग आपलं छोटू येईल मग बघ वाडा कसा चमकले आपला".... समर

"बर तू ते उद्या जातोय ना"....?? स्वरा

"हो उद्या जॉइनिंग करतोय"..... समर

"चला मग झोपुया".... स्वरा

"अरे लगेच झोपायचं".... समर

"हो लगेच झोपायचं, मी खूप ठाकली आहे, आज काहीच नाही".... स्वरा

"अच्छा तर मग चल थोडा अजून थकवतो तुला"....

"समर नाही".....

रात्रीचे १:३० वाजले होते, समर झोपला होता वाड्यात एकूण शांतता होती...

तेव्हाच.... " तप तप तप " च्या आवाजाने स्वरा ची झोप मोडली, स्वरा उठली आणि बाथरूम मध्ये गेली, बाथरूमचा नळ अर्धा चालू होता, त्यातून थेंब थेंब पाणी पडत होतं, स्वराने नळ बंद केला आणि मागे फीरली पण मागे फिरताच नळ आपोआप चालू झाला आणि जोरात पाणी वाहू लागलं....

स्वरा घाबरली, तिच्या कपाळाला घाम फुटला पण तरी हिंमत करून तिने जाऊन परत नळ बंद केला आणि तिथंच थांबली....

स्वरा शांत झाली, परत काहीच झालं नाही, स्वरा ने नळ चालू केला आणि तोंड धुतलं, तोंड धुवून स्वरा आरस्यात पाहत होती स्वतःला.....

तेव्हाच तिला आरस्यात एक छोटी मुलगी दिसली....

स्वरा हे ड्रिष्य बघून घाबरली, ती मुलगी स्वरा ला काही तरी सांगत होती पण स्वराला ते ऐकायला येत नव्हतं, त्या मुलीने स्वराला जवळ येण्याचा इशारा केला हाताने.... स्वरा तिचा कान हळूच आरस्या च्या जवळ घेऊन गेली....

ती मुलगी स्वराच्या कानात हळूच बोलली.... " आईईईई , तू आई बनणार आहेस ना, पण बाळाला तर मी घेऊन जाणार मग तुला आई कोण बोलणार".....???? एवढं म्हणत ती मुलगी जोरजोरात हसायला लागली

स्वरा हे ऐकून घाबरली ती मुलगी अजूनही तितच होती, स्वरा धावत रूम मध्ये आली, तिने समर ला उठवलं, भीती मुळे स्वराच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते....

"स्वरा...शहहहह काय झालं, शांत हो... घाबरलीस का"...??? समर

समर ने स्वरा ला शांत केलं.... काही क्षण नंतर स्वरा शांत झाली तिने समर ला सगळं सांगितलं, समर उठून पटकन बाथरूम मध्ये गेला....

"स्वरा.... स्वरा ये इथं बघ"..... स्वरा हळूच आली

"अग ये घाबरू नकोस... बघ कोण नाहीये इथं"..... समर

"समर मी खरच बोलते या आरस्यात ती मुलगी होती"..... स्वरा

स्वरा तू ना खूप थकली आहेस, एकतर आधीच तुला इथं भीती वाटत होती म्हणून अस भास झाला असेल तुला चल".... समर ने स्वराला उचलून घेतलं आणि बेडवर नेऊन झोपवलं....

रात्र जशी तशी निघून गेली, पण स्वराला मात्र झोप काय लागली नाही, सकाळ होताच समर ऑफिसला निघून गेला आज त्याच पहिला दिवस होता....

स्वरा तयार होऊन बाहेर आली "गणुकाका" ..... स्वराने गणूकाकांना हाक मारली...

"होय बोला बोला सुनबाई".... गणुकाका

"बाबा कुठे गेले".... स्वरा

जवळच्या गावात नवीन मंदिर बांधलं आहे आणि तिथं भजन मंडळी बसली आहे, मालक तिथं गेले आहेत उद्या रात्री पर्यंत येऊन जातील"....गणुकाका

"बर चालेल.... अच्छा काका मला वाडा पूर्ण बघायचा होता, समर तर ऑफिस ला निघून गेला सकाळी आणि बाबा पण नाहीयेत, मग तुम्ही जरा".... स्वरा

"हो, हो... चालतंय की सुनबाई".... काका

स्वरा गणुकाका सोबत वाडा बघू लागली, वाड्यातला एक एक रूम,तिथं स्टीत जाणवरांचे मुखोटे, जुन्या कडातली बंदूक.... स्वरा ने सर्व पाहिलं, स्वराला हे सगळं बघून खूप मस्त वाटत होतं, ती खूप खुश होती.....

बघता बघता, स्वरा मालिनी ज्या रूम मध्ये मेली होती त्या रूम जवळ आली...

"काका.... इथं काय आहे"....??? स्वरा


"सुनबाई ह्या खोलीत जाण्याची परवानगी नाहीये, रावने ही खोली कायमची बंद केली आहे, त्यांना सोडून इथं कोण येत नाही"... गणुकाका

"काका असं का... काय खास आहे का इथं"... स्वरा

"सुनबाई... काय तरी २० वर्ष आधी मोठी सुनबाई म्हणजे समरराव ची आईसाहेब ह्यांच ह्या खोलीत मृत्यु झालं होतं, म्हणून राव ने ही खोली बंद केली कायमस्वरूपी".... गणुकाका

"अच्छा..... सॉरी काका मला माहित नव्हतं"... स्वरा

संध्याकाळ झाली, काय तरी ८ वाजले होते.... समर ने आधीच स्वराला फोन करून सांगितलं की त्याला यायला उशीर होईल, गणू काका स्वयंपाक घरात जेवण करत होते आणि स्वरा झोक्यावर बसून पुस्तक वाचत होती.....

अचानक तिच्या हातातल पुस्तक खाली पडलं, स्वरा झोक्यावरून खाली उतरली आणि जशीच ती पुस्तक उचलायला गेली, ती छोटी मुलगी ती पुस्तक उचलून पळून गेली....

हे बघताच स्वरा जोरात ओरडली... "काका".....

गणुकाका धावत आले.... "काय झालं सुनबाई"....

"काका इथं एक छोटी मुलगी आली होती आता, ती माझी पुस्तक घेऊन पळून गेली".... स्वरा

"बाळा पण पुस्तक तर खालीच पडली आहे, ते काय तुझ्यापायच्या इथं"..... गणूकाका

स्वराने खाली बघितलं तर पुस्तक तिथंच होती, तिने पुस्तक उचलली

"बाळा तू बस मी चहा करतो, चहा पिलास की बर वाटेल"....

"नको नको काका.... चहा नको, मी जाऊन जर झोपते समर आला की उठवा मला"....

"बर ठीक आहे".....

स्वरा बेडरूम जवळ जात होती तेव्हाच तिला काकांनी हाक मारली....

" सुनबाई काय झालं ...??? हाक मारली होती तुम्ही, ते मी जरा डाळला फोडणी देत होतो ना म्हणून पटकन आलो नाही बोला काय हवं आहे".... गणुकाका

" स्वरा हे ऐकताच दचकली.... काका तुम्ही आताच मला चहा विचारून गेले ना आत".... स्वरा

"आत कुठे, मी तर आता बाहेर आलो"...... गणुकाका

स्वराला काहीच समजत नव्हतं की नेमकं काय होत आहे....

"काका मी जाऊन झोपते तुम्ही समर आला की त्याला सांगा मी बेडरूम मध्ये आहे"..... स्वरा

"ठीक आहे चालेल".... म्हणत गणू काक परत स्वयंपाक घरात जात होते, तेव्हाच स्वरा ने त्यांना परत हाक मारली

"काका"...

"हा बाळा"...

"काय नाय आठवणीने सांगा".... स्वरा बघत होती की नक्की गणू काका आहेत की परत तिला भास होत आहे....

स्वरा बेडरूम मध्ये जाऊन झोपली, स्वराला झोपेत अस वाटत होतं की जणू तिला कोण बघत आहे.... स्वरा ने पटकन डोळे उघडले पण समोर कोण नव्हतं....

स्वरा तिच्या सोबत जे काय घडत होतं त्याचं विचार करत होती, तिला काहीच समजत नव्हतं ती स्वतासोबतच बोलत होती...

"काका आधी आले की नंतर, ती पुस्तक पडली.... ती मुलगी, काहीच समजत नाहीये, समर कधी येशील तू.... ९ वाजत आले म्हणत जसच स्वरा ने दारा जवळ बघितलं तिला एक बाई दिसली, ही तीच बाई होती, ती बाई जळालेली होती, भयानक असं स्वरूप दिसत होतं तिचा....

"सुवर्णा".....

स्वरा तिला बघताच जोरात ओरडली...

"अरे स्वरा काय झालं, मी आहे"..... समर

स्वराचा आवाज ऐकताच गणुकाका पण धावत आले.... "बाळा काय झालं"....

"काय नाही काका, जरा ती मला बघून घाबरली"... समर

"स्वरा शांत हो"..... समर

"समर मला खूप भीती वाटेय, काय माहित पण इथं काय तरी विचित्र आहे"..... स्वरा खूप घाबरली होती

"काही नाही स्वरा मी आहे ना, चल बाहेर चल मी आहे ना, मग का घाबरते".... समर स्वरा ला बाहेर बागेत घेऊन गेला

पण ती छोटी मुलगी तिथंच रूम मध्ये होती, दोन्ही हाथ तोंडावर ठेवून ती गालातच हसत होती.....
---------------------------------------------------- To Be Continued ----------------------------------------------------------------------