समर.... बस शांत उभा होता, तो सारखा श्रीधर कडे बघत.... गणू काका जोर जोरात समर ला हाक मारत होते पण समरला जणू काही ऐकूच येत नव्हतं
समर खाली बसला गुडघ्यांवर आणि त्याने श्रीधरच डोकं त्याचा मांडीवर घेतल आणि जोरात ओरडला.... बाबा आआआ.....
*
समर बाहेर बागेत बसला होता.... तेव्हाच एक पुलिस ऑफिसर समर जवळ आला....
Sorry... इथ जे काय घडलं त्या साठी पण.... विष्णू (इन्स्पेक्टर)
नाही ठीक आहे ऑफिसर.... तुम्ही विचारू शकता जे काय तुम्हाला विचारायचं असेल ते.... समर
बघा हे clearly suicide case आहे.... आणि i guess तुम्ही पण agree करता या.... विष्णू पुढे बोलेल त्या आधीच समर बोलला
हो ऑफिसर.... समर
तुमचे बाबांना काय त्रास किंवा काय mental illness.... ???? विष्णु
Proper सांगु नाही शकत पण हो... ते tense होते थोडे, may be जास्त.... समर
समर ला काही सुचत नव्हतं.... पण सध्या त्याला हेच वाटलं की जे झालं त्याला accept करायला हवं.....
Ooook..... तस काय टेन्शन होतं त्यांना..... विष्णू ने थोड स्वंशयजनक नजरेने विचारलं....
समर काही वेळ असच ऑफिसरल बघत रहायला... आणि मग थोड विचार करून बोलला.... माझी बायको pregnant आहे... आणि after baby आम्ही दोघं अमेरिकाला शिफ्ट होणार होतो आणि....
समर बोलतच होता की विष्णू ने मधीच त्याला तोकल..... आणि तुमच्या बाबांचं म्हण असेल की तुम्ही इथ त्यांच्यासोबत.... Most of तीच स्टोरी, काय माहित आज कालच्या मुलांना....
Sorry तुम्ही काय..... समर
नाही... काय नाही..... विष्णू
समर ऑफिसर सोबत बोलतच होता तेव्हा त्याने..... समोर gate जवळ त्याच अनोळखी माणसाला बघितलं.... त्याला बघताच समर ला आठवल की तो त्या झोपडी जवळ तो बोलत होता.... लवकर जा नाहीतर राव....?????
बरं काही हरकत नाही.... post mortem नंतर.... शव तुम्हाला सोपल जाईल.... विष्णू तेवढं बोलून तिकडून निघून गेला.....
पण समरचं लक्ष अजुनही त्या माणूस वर होत.....
*
स्वरा.... झोपली होती, समर ने तिचा हाथ पकडला आणि रडायला लागला, तेवढ्यात स्वरा उठली.....
समर अरे तू काय झालं रडतोय का...... वेडा आहेस का..... स्वरा
अगं अगं.... काही नाही तू झोप झोप.... समर
स्वरा उठून बसायचं प्रयत्न करत होती..... पण समर ने तिला सांभाळला.... डॉक्टर ने सांगितलं प्रमाणे समर ने.... स्वराला श्रीधर बदल काहीच सांगितलं नाही....
समर.... बाबा कशे आहेत, खूप काळजी करत असतील ना....??? स्वरा
हो बेटा.... त्यांना तुला बघायला यायचं होत म्हणजे ते आले पण होते पण तू झोपली होती तर तुला उठवल नाही..... समर बोलता बोलता रडायला लागला
अरे अस काय तू बाबा आले आणि तू मला उठवक नाहीस.... काय तू अरे तू का सारखं रडतोय.... समर काय झाला तुला असा का वागतोय..... स्वरा
नाही... काय नाही, आई बाबा नंतर तूच आहेस फक्त, आई बदल तर मला जास्त काय लक्षात पण नाही आणि.... बाबांन पासून इतके वर्ष.... ( समर बोलता बोलता रडायला लागला..... )
समर सांभाळ स्वतःला काय झालं तुला..... स्वरा ने समर चा हात पकडला
तेव्हाच.... वॉर्ड ची.... लाईट बंद चालू व्हायला लागली..... आणि सगळ एक दम शांत झालं.....
समर अजुनही रडत होता.... तेव्हाच स्वरा बोलली.... पण नेमकं आवाज तिचा नव्हता, तिचे डोळे अचानक काळे पडले.... स्वरा ने समरचा हाथ घट पकडला.... इतकं घट की समर रडता रडता शांत झाला..... जशीच त्याने मान वर केली ..... त्याने पाहिलं की स्वरा चे डोळे एक दम काळे पडलेत.... तिचा चेहरा एकदम भयानक दिसत होता....
समर हळूच बोलला.... स्वरा.... स्वरा....
तुझा बाप मेला..... मेला.... स्वरा असं बोलून जोरात हसायला लागली.....
समर घाबरला होता.... तो पूर्ण घामाघूम झाला होता, त्याचा डोळ्यांसमोर जे काय घडत होत त्याला काहीच कळत नव्हत की.... हे त्याचा भास आहे.... कल्पना की सत्य
स्वरा नाही..... सुवर्णा.... ओळखलं नाहीस..... का तुझ्या बापाने तुला काही सांगितलं नाही, हा..... हा.... हीहीहीहीहीही नाही सांगितलं ना..... कसा सांगणार गेल्या २१ वर्ष त्याच्या गळ्यात साप बनून बसली होती मी..... स्वराच हसन खूप भयानक होत
समर तसाच शांत बसून होता त्याला काहीच सुचत नव्हतं की नेमकं काय करावं.....
पण प्रश्न तो नाहीच आहे.... प्रश्न हा आहे की आता कोणाला मारू.... तुला, तुझा बायकोला.... हा हा.... की तुझा होणारा बाळाला.... स्वराची विकृत अशी हसी आईकुन समर अजून घाबरला....
बरं आधी तुझा बाळाला.... ठीक आहे.... तुला पण कळलं पाहिजे आपल्या बाळाच्या मृत्यूचा.... दुःख कसं अस्त.... स्वरा अगदी रागात जीभ चावून बोलली....
समर... ने जोरात स्वराला हाक... मारली.... स्वरारारा आआआ....
स्वरा ने समर कडे एक नजर पाहिलं एका शनासाठी.... ती शुधित आली पण अचानक परत.... तिचे डोळे पलटले.... पूर्ण काळे पडले आणि तिने दोन्ही हाथ जोरात स्वतःचा पोटावर मारले.... आणि एक दम बेशुद्ध झाली....
डॉक्टर...... समर जोरात ओरडला......
डॉक्टर, सिस्टर सगळे धावत आले.... स्वरा बेशुद्ध पडली होती डॉक्टर ने तिची नाडी तपासली.... आणि लगेच कर्मचारीला हाक मारली.... स्त्रेचर लवकर..... स्वरा लगेच operation room मध्ये शिफ्ट केलं.....
सगळ एक दम शांत झालं..... काही वेळ नंतर विनोद बाहेर आला आणि समरला बोलला
समर वेळ कमी आहे.... प्रयत्न करू, पण दोघांपैकी एक.... आई किंवा बाळ..... विनोद
हे ऐकताच समरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले..... समर एक दम लाचार झाला होता, त्याला काहीच सुचत नव्हतं......
समर डोळे झाकून.... रडायला लागला........
.............................To be continued..............