जर ती असती - 6 Harshad Molishree द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जर ती असती - 6

संध्याकाळ ची वेळ होती... समर ला काहीच कळेना कि नेमकं काय करावा, तेव्हाच त्याला तो माणूस आठवला.... समर पटकन तिकडून हॉस्पिटल मधून निघाला आणि त्या माणसाला शोधत तो.... मंदिरा जवळ गेला पण तो माणूस नव्हता तिकडं, शेवटी तो वाड्यावर गेला जिथं... वाड्या च्या गेट जवळच तो माणूस बसला होता.....

शेवटी यावंच लागला ना..... तो माणूस

बघ माझं असल्या काही गोष्टींवर विश्वास नाही आहे...... पण माझ्या बायको आणि माझ्या होणाऱ्या बाळाच्या जीवाचं प्रश्न आहे.... जर खरंच तू काय करू शकतो....
समर

करू शकतो.... बोलण्यात वेळ घालवून काय अर्थ नाहीये आधीच खूप उशीर झाला आहे..... तो माणूस (रम्या ) बोलला

काय करावं लागेल.... समर ने विचारलं

समर रम्याला वाड्यात घेऊन आला आणि गणू काकाला समर ने हाक मारली..... गणू काका

गणू काका घरी जायची तयारी करत होते, संध्याकाळ चे ८ वाजले होते.... जसे गणू काका आले

समर त्यांना बोलला.... काका मला तुमची मदत हवी आहे, हा रम्या आहे आणि आता हेच एक शेवटचा पर्याय उरला आहे माझा कडे, डॉक्टर ने हाथ सोडलेत स्वरा किंवा माझं बाळ.....

गणू काका ने रम्याला ओळखलं..... मी रम्याला ओळखतो, रम्या ने रावसाहेब सोबत पण बोलायचा खूप वेळा प्रयत्न केला होता......

काका आता वेळ नाही त्यासाठी, जुनं ते जाऊद्या..... रम्या बोलला

आजची रात्र खूप महत्वाची आहे, जर तुम्ही माझ्या मदतीला थांबले तर.... रम्या पुढे काय बोलेल या आधीच गणुकाका हो म्हणाले.....

आजची रात्र सोपी नाही जाणार तुम्हा दोघांना सांगून ठेवतो अगदी सावध रहा.... कधी कुटून पण वार होऊ शकतो, विचित्र किंवा विकृत द्रिष्य नजरेत पडतील...... पण घाबरू नका कुठे पण अडकला तर लक्षात ठेवा.... फक्त एकच मंत्र श्री हनुमंते नम: होईल तितका शक्ती ने मनापासून बोला....

समर आणि गणू काकांनी होकार मध्ये मान हलवली

या वाड्यात काही तरी असं आहे ज्या सोबत त्या अतृप्त आत्म्याचा संबंध आहे, काय तरी असं ज्यांनी त्यांना या वाड्या सोबत बांधून ठेवलं आहे ते नस्ट केल्या शिवाय त्यांचा आत्माला मुक्ती मिळणार नाही..... रम्या बोलला

पण ते वस्तू काय असणार.... त्याला कस ओळखायचं, वाड्यात भरपूर जुन्या प्राचीन वस्तू आहेत समर बोलला

ते काही आशु शकत ज्यात त्या आत्माचा जीव अडकून आहे आणि आपल्याला ते शोधावी लागेल, लक्षात ठेवा ती वस्तू जवळ आल्यावर ती आत्मा आपल्यावर हमला करणार आपल्याला मारायचं प्रयत्न करेल आणि तीच खरी ओळख असेल त्या वस्तूची बस तेच शोधा ... रात्र सरायचा आधी. रम्या bolla

तिघ रम्या, समर आणि गणू काका वाड्यात वेग वेगळे जाऊन सगळी कडं शोधायला लागले.....

ऐकून तास भर सगळी कडे शोधा शोध करून सुद्धा त्यांना काहीच सापडला नाही, तरी रम्या आणि गणू काका त्यांचा परीने अजूनही वाड्यात सगळी कडे बघत होते.... तेव्हाच समरला काही तरी सुचल तो धावत श्रीधरच्या खोलीत गेला आणि तिकडून त्यांनी मालिनी ज्या खोलीत मेली होती त्या बंद खोलीची चावी शोधून काढली....

चावी भेटताच तो धावत त्या खोली समोर पोचला आणि कुलूप उघडून त्याने खोलीचं दार उघडला...

आता अजूनही सगळं तसाच होतं ज्या वेळीस मालिनी तिथं मेली त्या वेळे सारखं, फक्त खोलीत भरपूर जाळे होते आणि खूप धूर जमली होती.... समर आत गेला आणि हळू हळू आतल्या सामानला स्पर्श करायला लागला..... प्रत्येक स्पर्श सोबत त्याला काही तरी वेगळं द्रिषय दिसत होतं.....

गणू काकाने खालून बघितलं की.... समर त्या खोलीत शिरला ही बघून त्यांनी जोरात समरला हाक मारली..... पण हाक मारताच एक जोरदार वाऱ्याची झूळूक आली समोरून जी गणुकाकाला ओळत थेट वाड्याचा बाहेर घेऊन गेली..... गणू काका वाड्याचा बाहेर असेल्या बागेत जोरात आपटले.....

इथं खोलीचा दार झटकन बंद झाला आपोआप.... समर ही पाहताच घाबरला, पण तरी तो भक्कम पणे थांबला

त्याला कानात एक आवाज एैकू आला.... समर, हा मालिनीचा आवाज होता, अचानक खोलीतलं द्रिषय बदलला सगळं एकदम नवीन आणि चांगलं झाला...... खिडकीच्या बाहेर समरने पाहिलं की दिवस उजाडला होता.... समरला काहीच समजत नव्हतं की नेमकं काय शुरु आहे.....

तेव्हाच त्याने बघितलं समोर मालिनी बसली आहे.....

मालिनी खुडचिवर बसली होती आणि ६ वर्षाचा समर मालिनी समोर बसला होता.... हा द्रिष्य समर ने आधी एकदा त्याच्या ऑफिस मध्ये सुद्धा पाहिलं होतं, त्याला पटकन आठवलं..... मोठा समर एका कोपऱ्यात थांबून हे सगळं पाहत होता जणू हे सगळं प्रत्यक्षात घडतंय, हा तोच दिवस होता ज्या दिवशी मालिनीची मृत्यू झाली होती....

मालिनी आरश्या समोर बसून केस विंचरत होती. छोटा समर मागे खेळत होता, तेव्हाच मागून गायत्री आली, ती छोट्या समरच्या समोर येऊन बसली आणि बघता बघता तिने त्याच्या अंगात प्रवेश केला.....

हे पाहताच मोठ्या समरच्या कपाळा घाम फुटला, त्याला त्याचं डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, पण शेवटी हे सगळं त्याचा डोळ्यासमोर घलळत होत.

मागून छोटा समर बोलला.... आई ( आवाज एैकताच मालिनी दचकली)

मालिनी ने मागे वळून पाहिलं तर समर तिच्या समोर बघून हसत होता..... आई समर परत बोलला

मालिनी कळलं की हे गायत्री आहे..... मालिनीचा डोळ्यात पाणी आलं..... गायत्री, मालिनी हळूच बोलली.....

ओळखलस मला आई, वाह...... छान!

मला माहित आहे मी तुझ्यासोबत चुकीचं केलं, माफ कर मला.... मालिनी रडत रडत म्हणाली

मला तर प्रश्न पडतो की तुला आई म्हणू की नको, कारण तू आईसारखं माझ्यासोबत वागलीच नाहीस..... तुला सगळं माहित असून सुद्धा, तू काही बोलली नाही, तुझा पोरीला वाचवायचं प्रयत्न ही केला नाही तू....

मला माफ कर बाळा..... ह्यांचा हट्टाचा समोर मी काहीच करू शकले नाही.... मला माफ कर

बाळा तुझा आत्माच्या शांती साठीच तुझा बाबांना मी खूप मनवलं, तुझा देहाचे अंश कलश मध्ये घेऊन आलेत बाबा.... त्याला नदीत विसरजीत करून, शांती पूजा करणार आहोत.

मालिनी बोलतच होती तेव्हाच समरच्या मागून सुवर्णा आली, तिचा चेहरा पूर्ण जळालेला होता, एक डोळा जळून गळला होता.... एकदम विचित्र आणि भयावय दिसत होती ti

नाही..... इतक्या लवकर सुटका भेटणार नाही तुम्हाला, माझ्या पोरींचे अंश.... शांती पूजा करताय की तुझ्या या पोराला वाचवण्याचा प्रयत्न, पण तुमचे सगळे प्रयत्न मी निष्फळ करणार.... सुखाने जगू नाही देणार, तुम्हाला तुमच्या कर्माची सजा मी देणार..... सुवर्णा बोलली

इतकं करणार होतीस आई तू माझासाठी.... जा मी तुला माफ करते म्हणत गायत्री जी समरच्या अंगात होती जोरात ओरडली...... आईईईईईईईईई

तो आवाज इतका मोठा होता की त्या आवाजा मुळे मालिनीच्या कानाचे परदे फाटले, तिच्या कानातून रक्त यायला लागलं, मालिनी ने जागच्या जागी प्राण सोडले......

हे सगळं बघून मोट्या समरचे डोळे पानावले, त्याच्या मनात हजारो प्रश्न उमटले होते आणि तेच भीतीने त्याचे हाथ पाय गराटले होते....

तेव्हाच सगळं शांत झालं सगळं आधी सारखं झाला...... समर खिडकीच्या बाहेर पाहिलं तर रात्रीच गडद अंधार पसरला होता....

समरला आता कळलं होत की नेमकं ते लोक जे शोधत होते ते गायत्री अर्थात त्याच्या बहिणीचे शेवटचे अंश आहेत जे वाड्यात कुठे तरी एक कलश मध्ये आहेत.... समर ने विचारलं केला कदाचित ते इथंच कुठे तरी असेल, कारण की पूर्ण वाड्यात एक हीच खोली होती जिथं श्रीधरला सोडून दुसरं कोण येत नव्हतं.....

कलश शोधण्यासाठी समर ने जसा पहिला पाऊल पुढे टाकलं..... तो जागच्या जागी स्तब्ध झाला, समरला असं अनुभवत होत की जाणू कोणतरी त्याला बांधून टाकला आहे.

समोरून वाऱ्याचा झूळूक सारखी..... सुवर्णा झटकन आली, तिने समरचा गाडा दाबला, समर लाचार होता, त्याला काहीच हालचाल करता येत नव्हती......

हे सगळं जेव्हा घडत होत तिथं खोलीच्या बाहेर..... गणुकाकाचा आवाज एैकून रम्या धावत त्यांना वाचवण्यासाठी बाहेर गेला.... त्याने त्यांना उठवलं आणि मनातलं मनात काहीतरी बोलला....

गणुकाकाला पाटीवर थोडं लागलं होत पण रम्या त्यांना सांभाळत परत वाड्यात घेऊन आला....
तुम्ही समरच्या नावाने का ओरडले.... रम्या ने विचारलं

समराव.... त्या खोलीत शिरले आणि खोलीचा दार आपोआप बंद झाला..... त्याच खोलीत त्यांचा आईच जीव गेला होता....

हे एैताच रम्या धावत वर गेला गणू काका पण राम्याचा मागे वर आले..... दारा समोर येऊन रम्या ने दार उघडायचा प्रयत्न केला.... पण दार उघडत नव्हता

तेच आता समरचा चेहरा अगदी लाल झाला होता, समरने त्याचे डोळे झाकून घेटले..... तेव्हाच बाहेर रम्या जोरात ओरडला..... श्री हनुमंते नम: आणि दारावर जोरात थाप मारली हाताने, दार झटकन उघडला.....

रम्या ने बघितलं की समर एक भिंतीला चिपक स्तब्ध उभा आहे.... तो धावत तिथं गेला आणि त्याला तिकडं समर जवळ सुवर्णाच्या आत्माचा भास झाला....

रम्या परत एकदा ओरडला श्री हनुमंते नम:......श्री हनुमंते नम:..... श्री हनुमंते नम: सुवर्णा ने समरला सोडलं आणि देवाचं नाव ऐकून ती सध्या पूर्ती तिकडून निघून गेली.....

रम्या ने समरला गालावर हाथ मारून उठवायचं प्रयत्न केला पण समर काहीच प्रतिक्रिया देत नव्हता.......


........................... TO BE CONTINUED ......................