Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 17

भाग ३ आंतिम 

हळू हळू रात्रीचा प्रहार वर चढत होता , चंद्र आपली जागा बदलत होता ,  

        काळे ढ्ग चंद्राजवळून वाहत पुढे निघुन जात होती . 

       अस म्हंणतात थंड हवेचे झोत दुर दुरचे आवाज आपल्या सहित वाहून नेहतात..  

        कारण जंगलातच कोठेतरी , गुढ गर्भात एका हिंस्त्र श्वापद लांडग्याची विव्हळ फुटली...

        " व्हू..व्हू..व्हू...हुहुह्हू..!" 
तो आवाज कचरुबांच्या झोपेला चालवून गेला, 
आपसूकच त्यांचे दोन डोळे उघड़ले गेले.. 

     कचरुबांच्या डाव्या हातात एक घड्याळ होत ,      
  त्यात मध्यरात्री अडीज वाजले होते..!  

        पुन्हा एक फेरी मारुन  याव अस ठरवून कचरुबा खाटेवरुन उठले ,झोपडीतून बाहेर आले.

        मध्यरात्रीच्या समई आता थंडीचा जोर खुप वाढला होता ,  अवतीभवती गड़द धुका जमा झाला होता. 

        ज्या धुक्यात कोणी घात घालुन उभ राहिल तरी समजणार नाही.

       कचरुबांनी हातात असलेल्या टॉर्चला पेटवल, 
पिवळसर प्रकाश गोळा अंधाराला चिरत पुढे गेला.

        मध्यरात्रीची भयाण स्मशान शांतता पडली होती,
     रातकीड्यांची किरकिर तेवढी स्ंथ गतीने  
सुरु होती..
       मध्येच कोठूनतरी घुबडेचा घुत्कार ऐकू येत होता 
     
हातातल्या घुंगरु बांधलेल्या काठीचा एक लयीत तो छण छण आवाज सुरुच होता. 

       
         
     अंधारात उसाच्या  कांड्या  भयंकर अस  पिशाच्छी रुप  धारण  करुन उभ्या आहेत अस भासत होत.. 


        ज्यांकडे पाहून मनात एक भीतिचा स्फोट होत होता.. 

        कचरुबा शेताच्या वरच्या भागापर्यंत 
  चालत आले होते ,  हा शेताचा शेवटचा , आंतिम भाग होता.. 

        पूढे पाहता काळेकुट्ट  झाडांच घनदाट जंगली रान दिसून येत होत.  

        जिकडे नजर जाईल  तिकडे फक्त आणी फक्त स्तब्ध उभी झाडे दिसत होती..

        कचरुबांनी एककटाक्ष समोर जंगलाकडे टाकल,        
आणी त्यांना अंधारात जंगलातल्या झाडांमधुन एक दिवटी फिरतांना दिसली- ...

        अंधारात तो आगीचा तपकीरी रंगाचा गोळा कधी डावीकडे तर कधी उजवीकडे मंद गतीने फिरतांना दिसत होता.. 

        कचरुबांचे डोळे  सुद्धा जसा तो गोळा आपली जागा बदलायचा तसे डाविकडून उजवीकडे फिरत होते.. 

        तो तपकिरी रंगाचा प्रकाश जणू डाविकडून उजवीकडे फिरत असतांना कचरुबांना संमोहिंतच करत होता..

        कारण कचरुबा एकटक निर्जीव डोळ्यांनी त्या गोळ्यालाच पाहत होते..  

        त्यांच्या हातातली ती घुंगरांची काठी गळुन खाली पडली..

              आणी मग एकक्षण असा आला की त्यांच्या पुर्णत देहावरच नियंत्रणच ढ़ासळल.. , 

        
    हात ,पाय, डोळे सर्व अवयवांवर जणू दुस-याच कोणाचतरी नियंत्रण असल्यासारखे भासू लागले..


             कचरुबांना आपण  त्या  दिवटीच्या मशालीच्या उजेडाच्या दिशेने चालत जात आहोत अस दिसून येत होत..   

       ते ओरडायचा प्रयत्न करत होते , पन घशातून आवाजच  बाहेर पडत नव्हता.. 

        मग अचानक एक ओळखीची हाक आली..
   

        " कच-या..! " कचरुबांच्या डोळे त्या हाकेच्या दिशेने फिरले. 

        समोर  भगवा लुगडा नेसलेली , चेह-यावरची त्वचा वय झाल्याने सुरकूतलेली- व डोक्यावरचे पांढरट केस पिंजारलेले अशी एक हातारी उभी दिसली .
    

           " आईsss..!" कचरुबा मनातच बोल्ले.

ती म्हातारी  कचरुबांची तीन वर्षा अगोदर वारलेली आई होती ? की काही ध्यान त्यांच्या आईच फसव रुप घेऊन तिथ अवतरल होत ? कारण मेलेला माणुस परत येत नाही ना ? कोणास ठावूक !  

          " कच-या , चल माझ्यासोबत !" 
कचरुबांची आई एवढीच म्हंणाली. 

        त्या हळूच पाठमो-या वळल्या..
    पूढे पुढे जाऊ लागल्या..    

       कचरुबा सुद्धा संमोहिंत झाल्यासारखे 
त्या म्हातारीच रुप घेऊन आलेल्या भुल्यासोबत जाऊ लागले.. 

        कचरुबांपासून दहा पावळ दूर ती म्हातारी आकृती चालत होती..   

        काहीही झालं, कितीही झालं तरी दोघांच अंतर काही केल्या कापत नव्हत , कचरुबा चालतच होते ,चालतच होते... 

        जंगलातल्या झाडांतून  वाट काढत , तर कधी उतरण यायची, तर एकदा वहलातून सुद्धा हे दोघे चालत गेले होते.. 

        पाहता - पाहता सकाळ व्हायला आली...
रात्रीच्या अंधाराचा पडदा चिरणारी  प्रकाशाची तलवार हळू हळू वर आली.... 

  सकाळ होताच त्या ध्यानाची माया तूटली      
       कचरुबांचे दोन्ही डोळे मिटले गेले.. आणी ते बेशुध्दावस्थेत जमिनीवरच कोसळले..

ईकडे कचरुबांच्या घरी.    

     साडे अकरा होऊन गेले तरी   कचरुबा अद्याप घरी परतले नव्हते , कचरुबांच्या पत्नी म्हंणजेच शोभाबाई 
नव-याच्या काळजीने चिंताग्रस्त झाल्या होत्या.. 

       

        दिड वाजेच्या सुमारास  कचरुबांचा मुलगा सुधाकर  , आणी त्याची बायको दोघेही सासूरवाडीतून परत आले होते.. 

        शोभाबाईंनी सुधाकर घरी  येताच त्याला तुझे वडिल काळरात्री शेतावर गेले आहेत ते अद्याप घरी परतले नाहीत अस सांगितलं .. 

        त्यावर सुधाकरराव म्हंणाले.

       
       " अंग आई , तू त्रास करुन घेऊ नकोस..! आबा असतील शेतावरच , मी बोलून आणतो!"   

        सुधाकरराव शेतावर जायला निघाले , रस्त्यात गावातली काही ओळखीची मांणस भेटली ..
त्यांच्याशी थोडस बोलतांना अस समजलं की  त्यांनी काल कचरुबांना शेतावर जातांना पाहिल होत.
  त्या नंतर ते दिसले नव्हते .

              
      सुधाकरराव   एकटेच शेतावर आले..
      त्यांच्या मनाला अस वाटत होत , की आपले वडील शेतावरच असतील , पन त्यांची साफ निराशा झाली.. 

        कारण शेतावर कोणीच नव्हत -  एकवेळ त
  त्यांनी मळ्यात , अवतीभवतीच्या शेतांबाजुला सुद्धा पाहिल, मोठ्याने आपल्या वडिलांच नाव घेऊन त्यांना हाका सुद्धा मारल्या   पन प्रतिउत्तर आल नाही. 

         पण हा  त्यांना शेताच्या मागच्या बाजुला ती घुंगरांची काठी मात्र जमिनीवर पडलेली सापडली..

        ती काठी घेऊन सुधाकरराव पुन्हा घरी आले..
सुधाकररावांचा पडलेला चेहरा पाहून शोभाबाई समजून गेल्या  की आपला नवरा मिळाला नाहीये.. 

        दुपारची संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र झाली , तरीसुद्धा कचरुबा काही परतले नव्हते..

     रात्री  शेतावर पहारा द्यायला गेलेले   कचरुबा गायब झालेत ही बातमी गावात वा-यासारखी पसरली.... 

        कचरुबांच्या घराबाहेर अक्खा गाव जमा झाला होता ... 

        पुरुष मंडळी घराबाहेर हाताची घडीघालून उभी 
    होती . बायका  रडणा-या शोभाबाईंना धीर देत होत्या.  

       कचरुबांच्या घराबाहेर जमलेल्या 
मांणसांच्यात काही जाणकार म्हातारे सुद्धा उस्प्थीत होते.. 

        त्यातलेच एक जाणकार बोलू लागले..

     " सूध्या काळ पौर्णिमा होती - आणि काळ रातच्याला तुझा बा गायब झालाय, म्हंणजे हे प्रकरण काय साध वाटत नाय सूध्या , तसंबी तुमच शेत जंगलाजवळ आहे.. आणी मध्यरात्री त्या जंगलात भुल्या नामक भुत फिरतो, त्याला रुप नसतो कालोखासारखा काळा दिसतो  तो , हातात दिवटी, नाहीतर मशाल घेऊन डाविकडून उजवीकडे नाचत फिरतो..! जर कोणी ती दिवटी पाहिली,  तर समोरचा त्याच्या जाल्यात फसून संमोहिंत होतो..! आणि मग तो माणुस ती दिवटी जिथ नाचते , तिथ चालत जातो, आणी मग हा भुल्या , त्या संमोहिंत केलेल्या मांणसाच्या जवळच्या मांणसाच रुप घेऊन त्याला आपल्या सोबत  जाम म्हंणजे जाम दुर चालत घेऊन जातो..! चालतांना त्या मांणसाच आणि भुल्याच अंतर कधीच कमी होत नाही..!  आणि जेव्हा  सकाळ होते 
तेव्हा तो माणुस जागेवर बेशुद्ध होऊन पड़तो.. ! त्या मांणसाला जो पर्यंत कोणी उठवत नाही तो पर्यंत तो तसाच झोपलेलाच राहतो..!  आणी मला वाटतंय तुझ्या आबाला भुल्या आपल्यासोबत घेऊन गेला आहे..!"      

        एवढ सांगून ते म्हातारे आजोबा गप्प बसले..   
  सुधाकररावांनी  ह्यावर त्या म्हाता-या आजोबांना   काही उपाय विचारले तेव्हा ते म्हंटले , की एक उपाय आहे..

        " आपल्या गावात जुन वेताळाच मंदिर आहे, वेताळ म्हंणजे भूतांचा आधिपती होय , सर्व भुत त्याच्या हाताखाली आहेत.! त्याच वेताळ देवाकड तुझ्या आबाला वाचव असा  नवस कराव लागल ,त्या बदल्यात तूला  वेताळाला चार बोकड चढवून  , अक्ख्या गावाला जेवण घालाव  लागल..! आणी आताच ह्याच येळेला  तुला नवस बोलून , जंगलात तुझ्या आबाला शोधायला जाव लागल..! जर वेताळ देवाने तूला कौल दिला तर समज तुझा आबा  भेटणार म्हंणजे भेटणारच..!" त्या म्हाता-या आजोबांच्या सांगितलेल्या माहितीनुसर  सुधाकररावांनी लागलीच हालचाल करायला सुरुवात केली..

        गावात कचरुबा तसे प्रतिष्ठीत व्यक्ती होते, 
सर्वाँच्या ओळखीच्या परिचयाचे होते..! 
गावातली सर्व सुधाकररावांच्या मदतीला धावून आली होती.. 

       सुधाकररावांनी प्रथम वेताळ मंदिरात जाऊन,
वेताळाच्या काळ्याकुट्ट पाषाणी मुर्तीसमोर हात जोडून नवस बोलून दाखवला , आपल्या पित्याला वाचव, ते सुखरुप सहिसलामत भेटु देत अशी विनवणी नवस  केला.. 

        आणी पून्हा घरी आले..! 

    चाळीस पन्नास    गावक-यांनी मशाली दिवट्या पेटवल्या आणि  सर्वजण अकराच्या सूमारास जंगलात घुसले.. 

      मशालीतून भगव्या रंगाची आग बाहेर पडत होती,
तिचा तो तांबरट प्रकाश जंगलातल्या झाडांवर , खालच्या जमिनीवर पडत होता.. 

        तब्बल  अडिज तास जंगलात अगदी खोल 
पर्यंत गेल्यावर ,  एका झाडाखाली कचरुबा बेशुध्दावस्थेत लोकांना पडलेले दिसले... 

     गावातल्या लोकांनी , सुधाकररावांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केल, पन ते उठले नाहीत.. मग सर्वाँनी  मिळुन त्यांना घरी आणल..

        दुस-या दिवशी त्यांना जाग आली, 
तेव्हा कचरुबांनी आपल्यासमवेत घडलेला सर्वप्रकार         
तिथे उपस्थित सर्वाँना सांगितला.. 

       जे ऐकून सर्वजन भीतिने घाबरले होते , पन 
देवाच्या कृपेने कचरुबांवरच संकट  टळल होत..

     सुधाकररावांनी वेताळदेवाला केलेल्या नवसा नुसार चार बोकड कापले आणि गावातल्या मांणसांना जेवू घातल.. 

        आणि अश्यातच एका द्रुष्टचक्राचा सुखरुप रित्या कोणालाही  ईजा न होता अंत झाला..

.       समाप्त..!