Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 16

भाग 16  
भुल्या 2 


!  भुल्या पायाखालचा रस्ता लाल  मातीचा होता , 
दोन्ही तर्फ  उन्हाच्या  झळ्यांनी सुकलेल हिरव गवत ,      
जामिनदोस्त झालेल दिसत होत. 

        रातकीड्यांची किरकिर कानांत ऐकू येत होती- 
हळकीशी थंडी  अंगाला झोंबत होती, आजूबाजुला जरास माळरानच होत..  

        वा-याचा  व्हू व्हू घोंघावण्याचा आवाज कानी पडत होता.  

        हातातळ्या टॉर्चच्या पिवळसर उजेडात कचरुबा आपला मार्ग हेरत चालत निघाले होते.. 

          टॉर्चच्या पिवळसर उजेडात खालची लाल माती , दिसत होती.    

        आजूबाजुला निर्मनुष्य भाग असल्याने , जमिनीवर रेंगाळणा-या किड़यांना फिरायला कसलेच बंधन उरले नव्हते -  

        पिवळ्या रंगाच्या त्या टॉर्चच्या उजेडात दोन- तीन वेळा मोठमोठ्या सर्पांच दर्शन त्यांना घडल होत..

      पण हातात असलेल्या काठीमुळे त्यांना त्या सर्पांची भीति वाटली नाही. 

                शेवटी  एकदाचे कचरुबा शेतावर पोहचले .   

....

        आताला रात्रीचे 8:30 झाले होते. 

     कचरुबांच शेत एक एकरवर पसरलेल होत, आणी पुर्णत शेतात उसाची लागवड केलेली होती, 
        उसाच्या मोठ मोठ्या कांड्यांनी पुर्णत शेत भरल होत -   

        कचरुबा शेतावर येताच प्रथम मळ्यात गेले ,
मग झोपडीत गेले , दहा x दहा ची झोपडी होती..

       
       उजेडासाठी एक रॉकेलचा कंदील होता - 
  तोच कंदील कचरुबांनी पेटवला आणी झोपडीत कंदीलाचा तांबडसर  प्रकाश पडला..  

        कंदीलाच्या प्रकाशात खाट, खाटेवरच अंथरुण- 
आणी बाजुलाच एक  गोल मडका ठेवलेला नजरेस पडला.
  

           कचरुबांनी मडक्यावर ठेवलेल्या ग्लासामार्फत , त्यातून पाणि काढुन पिल..! 

        पाणि प्यायल्याने त्याना जरा तरतरी आली..   


        तसही गावातून शेतावर येईपर्यंत चांगलीच दमछाक झाली होती..ज्यामुळे 
   कचरुबा   जरावेळ खाटेवरच  बसले  , 
मग पंधरा वीस मिनीटांनी पुन्हा झोपडीबाहेर आले..

आकाशातल्या चंदेरी रंगाच्या चंद्राचा प्रकाश चौ- दिशेना पडला होता ,  

        कचरुबांच्या शेताबाजुलाच अजुन खूपसा-या पडीक जमिनी होत्या..! 

        शेतापासून एक किलोमीटर अंतरावर जंगल आणी मोठमोठे डोंगर दिसत होते.. 

       चंद्राच्या उजेडात जंगलातून झाडे गढूळ, काळसर दबा धरुन बसलेल्या हैवानी हिंस्त्र श्वापदासारखी वाटत होती, जी केव्हाही अंगावर धावून येतील आणी क्षणीक आपला फडशा पाडतील..

        कचरुबांनी एका हातात घुंगरांची काठी
  आणि दुस-या हातात टॉर्च घेतली.. 

        घुंगरांच्या काठीचा जमिनीवर आदळताच छण छन आवाज होत होता..

       कचरुबा शेताला चारही दिशेने पहारा द्यायला निघाले. 

       थंडीचा पारा आता  चांगलाच वाढला होता ,               
पांढ-या रेशमी धुक्याची वाफ नाकावाटे शरीरात ओढली जात होती.. 

        कचरुबांनी अंगावर घोंगडी पांघरली होती, 
ज्याने थंडी लागत नव्हती.

              कचरुबांच्या हातात असलेली टॉर्च  अंधार आणी धुक्यातून मार्ग काढत त्यांना समोरच दृष्य दाखवत होती..  

        कचरुबांनी शेताला फेरा मारायला सुरुवात केली, आजुबाजुला कुठे जंगली जनावर असेल ह्या हेतूने अवतीभवती   टॉर्च मारु लागले. 

        पन कुठेच काहीही नव्हत ..! 

     कधी कधी  हवेचे झोत यायचे , आणी उसाची पाने सळसळायची ... 

        त्या स्मशान शांततेत होणारा तो सळसळ आवाज कानांवर धावून यायचा आणी कचरुबांच्या हातातल्या पिवळ्या  टॉर्चचा उजेड झटकन उसांच्या कांड्यावर भिरकावला जायचा.. 

        छातीत एकक्षण धडकी भरायची, की त्या सळसळणा-या जागेतून काही हिंस्त्र प्राणी धावत आल तर , आणी  झटकन आपल्या अंगावर उडी घेतली तर.. ? 
      शेवटी भीति कोणाला वाटत नसते ? नाही का !
        
कचरुबांनी  चारही दिशेने  फिरुन शेतावर एक नजर टाकली,  पन जंगली प्राणी वगेरे अस कुठे काहीही नव्हत .!    




        तसे ते पुन्हा मळ्यावर आले ..    
   आता थोडवेळ आराम कराव  अस ठरवून      
ते झोपडीत शिरले. 

        बाहेर थंडी होती, पन झोपडीत मात्र उब जाणवत होती.. 

        झोपडीत असलेल्या खाटेवर कचरुबांनी अंग टाकल आणी डोळे मिटले..
        डोळे मिटताच त्यांना निद्रादेवी प्रसन्न झाली ! 


क्रमशः 





...

टीप :  कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे -  पण लेखकाच समाज्यातअंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही !
आपला प्रिय लेखक   मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही !   

       
  सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच ,शहराच नाव आणि   हे जरी सत्य असल तरी सुद्धा तिथली परिस्थिती सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत   सर्वच्या सर्वच परिस्थितीच काल्पनिक नजरेने पाहावी- आणी 

    फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

      ह्या कथेत लेखकाने  गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या   कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह   वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून  कडक, एक्शन घेतली जाईल!


        सदर कथेचे सर्व हक्क लेखकाकडे अगदी सुखरुप आहेत - कथा कॉपी पास्ट करुन आपल्या नावे
खपवून घेणा-या चोरांवर दया दाखवली जाणार नाही !
त्यांवर ऑनलाईन कारवाई केली जाईल