Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 19

भाग २... 

नमिताबाई देवांसमोर उभ्या होत्या - दिवा लावून झाल होत ,तस त्यांनी हळकेच डोळे मिटले ..   
       त्यांच्या मागे पिवळा बल्ब  पेटत होता , 
  नमिताबाईंनी डोळे मिटताच झपकन तो पिवला बल्ब विझला , लाइट गेली होती ना ! 



        नमिताबाईंच्या बंद पापण्यांवर पिवळसर प्रकाश किरणे तरळली..- आणी त्यांनी झटकन डोळे उघडले..

     काहीवेळा अगोदर बल्बचा उजेड होता , आणी डोळे उघडताच गडद अंधार पसरला होता .

        देवांसमोर जळणारा दिवा आणी दिव्याचा तो पिवळसर प्रकाश जेमतेम दोन फुटांपर्यंत अंधाराळा चिरत जात होता , बाकी पुढचा हॉल पुर्णत गडद अंधारात बुडाला होता.  

        नमिताबाईंनी गिरकी घेऊन मागे पाहिल,
त्यांचया डोळ्यांना पुर्णत हॉल अंधारात बुडालेला दिसला .  रोजची पावळाखालची ओळखीची ही जागा आज अनोळखी वाटू लागली होती .    

     " ह्या लाईटला काय झालं आता?"
नमिताबाई   स्वत:शीच म्हंटल्या.  
       तेवढ्यात हॉलच्या उघड्या दरवाज्याच्या फळीवर  कोणितरी जोरात हात आपटल्यासारखा " धप्प!" असा आवाज आला.

        त्या  आवाजाने नमिताबाई जराश्या
   दचकल्या  .

        अंधारात काही दिवस नव्हत , तस  नमिताबाईंनी आवाज दिला .

        " कोण आहे?"    
नमिताबाईंच्या आवाजाला होकार म्हंणून , एक  अपशब्द उच्चारला जात ओळखीचा आवाज आला.


          " तुझा बाप झxxडे..! माझ्याच घरात येऊन मलाच उलट विचारते का ?"  आलेला आवाज विकासरावांचा होता  . 

      गेल्या तीन वर्षाच्या संसारात त्यांनी कधीच नमिताबाईंना  वाईट वागणूक दिली नव्हती, आणी आज?   अक्षरक्ष शिव्या दिल्या होत्या.

हॉलमध्ये पसरलेल्या अंधारात,  दरवाज्याच्या दिशेहून 
विकासरावांचा आवाज ऐकू आला होता ,        

        एकक्षण तर नमिताबाईंना वाटल की  आपल्या कानांना तर आवाजाचा भास झाला नाही ना?, कारण आपला नवरा आपली किती काळजी घेतो, आपल्याला किती जिवापाड़ जपतो ..!

        मग ती शिवी तो अपशब्द ? पन कानांनी तो आवाज तर ऐकला होता ना ?  

     नमिताबाईंच्या मागे दिवा जळत होता , दिव्यातली पिवळसर ज्योत हळकेच हलत होती- 

        तसा प्रकाशही हेळकावे खात होता , 
    देवांच्या तसबिरीवर एक मलभ पसरलेल दिसत होत..! 

        देवांच्या चेह-यावर प्रसन्नता नव्हती, दुखी, अशक्तिहिन भाव होते.

       नमिताबाई जागेवरच उभ्या होत्या,      
समोरचा अंधार ईतका गडद होता,की त्याच अंधारात उभे विकासराव डोळ्यांना दिसत नव्हते. 

        अचानक गेलेली लाईट परत आली, 
हॉलभर पिवळसर प्रकाश पसरला , चार भिंती,खालची शेणाने सारवलेली भुवई, घड्याल , सर्वकाही प्रकाशात दिसू लागले. 

        आणी त्याच प्रकाशात दरवाज्यात अस्तव्यस्थपणे पडलेले विकासरावही दिसले.

        " अहो!" नव-याच्या काळजीने नमिताबाईंच्या हदयात  चर्रर्र झाल.   

        त्या धावतच दरवाज्यापाशी पोहचल्या, 
  विकासरावांच्या जवळ  पोहचताच त्यांच्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये दारुचा आम्ळी वास घुमला , 
   दोनक्षण त्यांनी नाक दाबून धरल.

        विकासरावांना साध पान -मसाला , गुटखा, कसले म्हंणजे कसलेच व्यसन नव्हते , तेच विकासराव आज दारु पिऊन टिंग होऊन- असे अस्सल बेवड्यासारखे दारु पिऊन स्वत:च्या  दरवाज्यात पडले होते. 

        नमिताबाईंनी विकासरावांना कसतरी आधार देत 
उठवल , त्यांच वजन काही ईतकही नव्हत , की काही त्रास होईल. 

        नमिताबाईंनी विकासरावांना दरवाज्याच्या चौकटीतून आत प्रवेश दिल आणी त्याचवेळेस देवांभोवती  जळणारा दिवा  झपकन विझला ..

        नमिताबाईंनी ते पाहिल होत , त्यांच्या डोळ्यांच्या कडा ते दृष्य पाहून विस्फारले होते. 

        विकासरावांना घेऊन नमिताबाई आत आल्या..  
हॉलमध्येच अंथरुण टाकल आणि त्या अंथरुणावर विकासरावांना झोपवल.. 

        त्यांच्या तोंडातून अद्याप तो दारुचा मेंदूला झिंणझिण्या आणणार वास येतच होत. 

    पण नमिताबाई एका अद्यात धोक्यापासून वंचित होत्या, की विकासरावांच्या सोबत आणखी कश्याने तरी त्यांच्या घरात प्रवेश मिळवला होता!  

        दूसरा दिवस उजाडला.       
        
काळरात्री विलासराव झोपले ते झोपलेच होते , 
त्यांचे डोळे उघडले ते थेट सकाळीच . 
      सकाळचे पावणे आठ वाजले होते.
नमिताबाई  नेहमीसारख्या स्वयंपाक घरात चपात्या टाकत होत्या.   

     नेहमीप्रमाणे    विकासराव साडे आठ वाजता कामाला जायला निघायचे , ते एक ट्रक ड्राईव्हर होते , वाळू , खडी, रेती, सिमेंट अशा विविध मालांची ते सप्लाई करायचे.  

        विकासराव अंथरुणातून उठले , डोक जाम दुखत होत - दारुच्या आमळाने नसा खेचल्या गेल्या होत्या. 

        अंथरुणातून उठताच  ते मोरीत गेले .

        " अहो उठलात तुम्ही?" 
नमिताबाई म्हंणाल्या. 

        पन त्यांच्या वाक्याला विकासरावांनी कसलेच प्रतिउत्तर दिले नाही  . 

        काळ झालेल्या घटनेला नमिताबाईंनी जास्त डोक्यावर घेतल नव्हत, कामाच व्याप असल्याने घेतली असावी - थोडीफार दारु, आणी दारु प्याल्यावर
मांणसाच चित्त ताळ्यावर नसत, हे नमिताबाईंना ठावूक होत - म्हंणूनच त्यांनी उच्चारलेल्या अपशब्दाच    
  नमिताबाईंनी ईतकेही मनाला लागून दिले नव्हते.

        " अहो थांबा मी  गरम पाणि देते अंघोळ धुवायला !"  नमिताबाईंनी चुलीवर तापवलेल पाणी       
एकाबादलीत ओतून ते मोरीजवळ आणल..

        तेवढ्यात  थंड पाण्याने चेहरा धूतलेले विकासराव बाहेर आले ,दारुच्या नशेने डोळे  अगदी रक्त उतरल्याप्रमाणे लालसर झाले होते,नजरेत अनोळखी मांणसाला पाहाव तसे भाव होते. 

     ती रक्ताळलेली लालसर नजर पाहता , नमिताबाईंना जराशी भीतिच वाटली.

        " फेकून दे तो पाणि, नाहीतर वत तुझ्या नरडीत,
बाजु हो !" विकासराव आगबबूळा झाल्यागत खेकसले , आणी त्यांनी नमिताबाईंना धक्का देत बाजु केल..!  

        धक्क्याने हातातल्या गरम पाण्याचीबालदी निसटली, आणी गरम पाणि खाली पडल  नमिताबाईंच्या पायांवर पडल.. 

        पाणि ईतकंही कढलेल नव्हत हेच बर झाल, नाहीतर चामडीच निघली असती, पन गरम पाण्याने
पायाला चटके बसले होते - वेदना होत होतीच.

        विकासरावांच हे वागण नमिताबाईंना खुपच
वेगळ आणी आश्चर्यकारक वाटल होत. 

       आपण काही चुकीच बोल्लो का ? असा विचार नमिताबाईंच्या मनात आला - पण  त्यात चुकीच अस काहीच नव्हत.

        विकासरावांनी तोंड पुसल काळचे कपडे काढले ,  तेवढ्यात  नमिता चहा - आणी चपात्या घेऊन आल्या. 

        विकासरावांनी नमिताबाईंकडे न पाहताच चहाचा पेला हातात घेतला , चपाती गोल करुन ती तोंडात कोंबली, तिचा एक लचका तोडला आणी फुर्रर्र करत चहा पेले .. 

        चहा पेताच त्यांच्या चेह-यावर संतापाची भावना पुन्हा उफाळून वर आली-  

       हातातला चहाचा स्टीलचा पेला  त्यांनी समोरच्या भिंतीवर फेकून मारला , पेल्यातला अर्धा चहा भिंतीवर , तर काही भुवईवर सांडल.

        " अंग ए  लक्ष कुठे आहे तुझ, चहात साखर नाय टाकतात येत भेंचोxx- तुझ्या आई××ची गांxx तुझ्या.!"  विकासरावांनी पुन्हा नमिताबाईंना शिव्या दिल्या.  

        नमिताबाई त्यांच्या ह्या भयंकर चिडण्याने
  घाबरल्याच होत्या - भिंतिला पाठ टेकून त्या एकटक त्यांनाच पाहत होत्या. 

         विकासराव तडकाफडकी जागेवरुन उठले ,                
   हातातली चपाती त्यांनी नमिताबाईंच्या तोंडावर फेकून मारली,

        ताड ताड  मोठ मोठ्या   ढेंका टाकत  ते दरवाज्यातून बाहेर पडले  .

      बाजुला राहणा-या मंदा काकू चालत नमिताबाईंच्या घराजवळ आल्या. 

        " नमे काय ग? काय झाल, हा आवाज कसला ? आणी हा विकास असा ताड ताड चालत का गेला." 


        " काय सांगू काकी !" नमिताबाईंना हूंदका आवरत नव्हता "  कालसंध्याकाळी दारु पिऊन घरी आले, येताच मला शिव्या दिल्या आणी  ईथे दारातच पडले , मी उचलून घरात आणल, अंथरुन टाकुन त्यांना ईथ झोपवल  -  मला वाटल कामाचा व्याप असेल  म्हंणून पिले असतील थोडीशी दारु पन उद्या पर्यंत ठिक होतील , पन कसल काय ? उठले आणी मोरीत गेले , मी अंघोळ धुण्यासाठी मोरीत गरम पाणि घेऊन गेले तर खेकसलेच माझ्यावर , मला धक्का दिला , आणी बाहेर आले मगाशी त्यांना चहा प्यायला दिल तर चहात साखर कमी म्हंणून पुन्हा मला नको नको ते बोल्ले..आणी न खाता पिताच रागात निघुन गेले."  नमितबाईंनी एका दमातच सांगितल , आणी साडीचा पदर तोंडात कोंबून रडू लागल्या.


क्रमशः