देवी योगेश्वरी माता महिमा भाग 1
नमस्कार मित्रहो सदर कथा सत्यघटनेवर आधारीत आहे .! ही सत्यकथा एका सब्क्राईरने मला सांगितली आहे , आणी तीच सत्यकथा मी एका वेगळ्याच धाटणीसहित, भय मसाला लावून सादर करत आहे!
नोट- लेखकाला कथेमार्फत समाजात अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे - उलट लोकांच्या मनात देवाविषयीची देवभावना आधिकपटीने जागृत व्हावी हाच लेखकाच हेतू आहे , चला तर आपण कथेला सुरुवात करुयात !
सत्य- कथा सुरु :
वर्ष 2003
नमिता विकास शिंदे वय बावीस ह्यांच नुकतच
2000 मध्ये लग्न झाल होत !
नमिताबाईंनी चित्रपटात पाहिल होत , हिरो - हिरोईनच लग्न होत - मग दोघेही एकमेकांना जिवापाड जपतात, प्रेम करतात - मग दोन - तीन वर्षांनी त्यांना एक मुल होत , आणी त्यांच्या संसारात आनंदाचा द्विगुणीत स्फोट होतो, अपत्य येताच हिरोईन आपल्या अपत्याला जिवापाड काळजी घेत जपते , हिरो आपल्या कुटूंबाच उदारनिर्वाह चालवण्या साठी रोजच कामाला जातो आणी संध्याकाळी हिरो दमून घरी आल्यावर आपल्या लेकाला आनंदात उचलून कुशीत घेतो !
नमिताबाईंनी सुद्धा स्वत:हाच लग्न झाल्यावर असंच काहीसा विचार केला होता , की आपला ही संसार असाच सुखाचा होईल, फिल्मी जोडप्यांसारखच आपलाही नवरा आपली काळजी घेईल, आपल्यालाही जिवापाडा जपेल , प्रेम करेल.
नमिताबाईंनी ही गोड स्वप्न पाहिली होती, आणी ते स्वप्न पाहण साहजिकच होत.
पण मित्रहो , कधी - कधी आपण जे विचार करतो तसंच होत नाही, कारण नशीबाचे फासे आपल्या हाती नसून नियतीकडे असतात .
ते म्हंणतात ना काही भक्तांची परमेश्वर ईतक्या टोकाची परिक्षा घेतो , की त्या परिक्षेत तो भक्त थकतो , हरतो, आणी निराशेत जाऊन शेवटी मृत्यु निवड़तो !
पण जर त्या परिक्षेची घटका जर आंतिम
पातळीवर असेल , आणी त्या क्षणाला जर तुम्ही स्वत:च्या जिवाच काही बर वाईट करायचं ठरवलंत
तर तो परमात्मा , ह्या सृष्टीचा निर्माता स्वत:हा चमत्कार घडवूण आणतो , भक्ताला तारतो, त्याला मृत्युच्या जबड्यातून बाहेर काढ़ुन आणतो , आणी
त्या मांणसाचे पुढील दिवस अचानक बदलतात..
कारण देवाच्या परिक्षेत तुम्ही पास झालेला असता..
मग यश,लक्ष्मी,आनंद,सुख, सर्वकाही भरभराटीस येत ,
आणी मित्रहो असंच काहीस नमिता विकास शिंदे ह्यांसमवेत घडले आहे.
देवाने त्यांची कश्याप्रकारे परिक्षा घेतली, त्यांना त्यात किती त्रास झाला, आणी त्यांनी ते कस सहन केल हे सर्व तुम्हाला ह्या सत्यअनुभवात मी सांगणार आहे..-
तर या पाहूयात, काय घदलं होत नमिताबाईं सोबत.
सन 2000 मध्ये नमिताबाईंच विकासरावांशी
धर्मपरंपरा विधींनुसार , हवनकूंडात जळणा-या पवित्र आग्निभोवती सात फे-या मारुन विवाह झाल,
विलासरावांनी लग्न करुन नमिताबाईंना आपल्या घरी आणल, विकासरावांच्या परिवारात आई- वडिल सात वर्षां अगोदरच वारले होते , आपल म्हंणून घेणार कोणी असेल तर फक्त दोन लग्न झालेल्या बहिनी होत्या - त्या दोघिही आप- आपल्या सासरी राहत होत्या.
पण लग्नाच्या निमित्ताने त्या माहेरी आल्या होत्या , मग लग्न झाल्यावर दोन - तीन दिवस राहून
त्या सुद्धा सासरी निघुन गेल्या.
पाच - सहा महिन्यांनी नमिताबाईंचा ख-या
अर्थाने संसार सुरु झाला..!
बाकी नव-यांसारखच विकासरावांनी सुद्धा नमिताबाईंना खुप काही काही आश्वासन दिल, मी तुझ्यासाठी हे करेन, ते करेन, ईतक्या तोल्याच सोन करीन , गंठण करीन, ईतकी महागडी साडी घेईन - तुला आयुष्यात कश्याचीच कमी पडू देणार नाही.
नमिता विकासरावांच्या ह्या गोड गोड बोलण्याला भुलल्या होत्या , अश्या कित्येक स्त्रीया भुलल्या असतील नाही का? त्यात नमिताबाई सुद्धा आल्या!
विकासराव - नमिताबाई दोघांचाही संसार अगदी साखरे सारखा गोड सुरळीत सुरु होता -
पण लवकरच ह्या साखरेसारख्या गोड संसाराला एका अभद्र सावटाची नजर लागणार होती.
नमिताबाईंच लग्न होऊन पाहता - पाहता तीन वर्ष ऊलटली होती, आणी तिस-याच वर्षी त्या पहिल्यांदाच गरोदर झाल्या होत्या.
24 जानेवारी 2003 हा तो दिवस होता.
नमिताबाईंना आज सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होत , थकवा, चक्कर येण , पोटात मळमळण, चक्कर येणे . असं काहीकाही त्रास होत होत.
नमिताबाईंच्या घराबाजुलाच एक ओळखीच्या मंदा काकू राहत होत्या, मंदाकाकू दिसायला गो-यापान , शरीरयष्टीने लठ्ठ होत्या.- त्यांच वय जेमतेम त्यावेळेस जेमतेम साठीच्या आसपास होत , त्यांना मुलबाळ अस काही नव्हत- त्या कधी कधी नमिताबाईंशी बोलायला येत असत , आजही त्या आल्या होत्या.. आणी मंदाकाकूंनी नमिताबाईंचीही लक्षण ओळखली आणी त्यांना
"तू आई होणार आहेस अस सांगितल !"
मंदा काकूंच ते बोलण ऐकून नमिताबाई खुप खुश झाल्या होत्या , त्यांच्या आनंदाला आज पारा उरला नव्हता ! आपण आई झालो आहोत ह्या जाणिवेने त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.,
मन आनंदाने हवेत उडत होत , ह्या पुर्णत पृथ्वीतळावर कोणि सुखी, आनंदी व्य्क्ती असेल तर त्या फक्त आपण आहोत , अस त्यांना वाटत होत .
नमिताबाईंना अस झाल होत , की कधी एकदाचे विकासराव संध्याकाळी कामावरुन घरी येतात आणी आपण त्यांना ही आनंदाची बातमी ऐकवतो..
आनंदाच क्षण कस वेगान सरत नाही? पण दुखाचे क्षण मात्र हळू हळू मंद गतीने सरत असतात !
त्या दिवशीची वेळ अगदी वेगाने सरली, सकाळची दुपार झाली, दूपारची संध्याकाळ झाली..
आज सकाळपासूनच नमिताबाई खुपच खुष होत्या ,
स्त्रीला हव असणारा खर अलंकार मातृत्व त्यांना प्राप्त जे झाल होत .
संध्याकाळ होताच नमिताबाईंनी देवांसमोर दिवा लावला -
त्यांच घर म्हंणायला एक हॉल , हॉलच्या उजव्या बाजुला एक दरवाजा , तिथे किचन होत, किचनच्या बाजुलाच मोरी होती.
हॉलमध्येच भिंतीला एक फळी ठोकली होती, त्यावर श्रीमहादेव ,श्रीपार्वती, आणी त्या दोघांमधोमध श्री गणेश बसलेले एक तसबीर होती.
तसबीरी समोर तेळाचा दिवा तेवत होता ,
दिव्याच्या ज्योतीचा पिवळाधमक प्रकाश तसबीरीतल्या देवांवर पडलेला , कोठूनतरी संध्याकाळचे मंद हवेचे झुळुक येत होते ,
तस दिव्यातली ज्योत वाकडी तिकडी हळत होती- ज्योत हळताच तिचा पिवळसर प्रकाश देवाच्या तसबीरीवर भेसूरपणे थयथय नाचतांना दिसत होता .
भिंतीवरच्या घड्याळात पावणे सात वाजले होते , हॉलमध्ये पिवळ्या रंगाचा बल्ब पेटलेला , त्या बल्बचा पिवळा प्रकाश हॉलमध्ये सर्वीकडे पसरला होता.
संध्याकाळची रातकीड्यांची किरकिर कानांवर ऐकू येत होती -
थंडीचा महिना असल्याने , हलकीशार थंडी पडायला सुरुवात झाली होती.
नमिताबाई देवांसमोर उभ्या होत्या - दिवा लावून झाल होत ,तस त्यांनी हळकेच डोळे मिटले ..
त्यांच्या मागे पिवळा बल्ब पेटत होता ,
नमिताबाईंनी डोळे मिटताच झपकन तो पिवला बल्ब विझला , लाइट गेली होती ना !
क्रमशः.
काय होईल पुढे जाणून घ्यायचं ना? मग पुढचा भाग वाचायला विसरू नका !