भाग २४
सावलीने मग पियुषला फोन लावला आणि त्याला सर्व घडलेला प्रकार सांगीतला. पियुषने तीला सांगीतले कि तो एके दिवशी घरी येऊन कॅमेराचे व्हिडिओ सावलीचा फोनवरती डायरेक्ट २४ तास दिसतील अशी सेटिंग करून देईल, तर मग सावली आपल्या ऑफिसचा कामाला लागली होती तोच सावलीचा फोन वाजला. तीने तो फोन उचलला आणि बोलली, "हेलो सर बोला कसा काय फोन केला.'
तेव्हा समोरून आवाज आला कि येथे
ऑफिस मध्ये एक अती आवश्यक काम आलेले आहे. तर सावलीला उदयाला ऑफिसला यावे लागेल म्हणून. सावलीने मग होकार दिला आणि तीने फोन ठेवला. त्यानंतर ती स्वतःच म्हणू लागली, "बाई मी तर विसरले होते कि मी ऑफिसमध्ये काम करते आणि सध्या रजेवर आहे. चला उद्यापासून आपल्या कामाला लागले पाहिजे मला, शिवाय कोमलचा दोन्ही पायांचे ऑपरेशन झालेच आहे आणि ती सुद्धा काही दिवसांनी स्वतःचा पायावर उभी होईल, आता मला तिची काळजी करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याच बरोबर मी माझी महत्वाची कामे
आता संपूर्ण समर्पित होऊन मन मोकळेपणाने करू शकते." असे म्हणून सावली तिचा कामात व्यस्त झाली.
सावली दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाऊन पोहोचली. तेथे गेल्यावर तीला कळले कि वरचा लोकांनी त्या तीघांचा विरुद्ध लिखित मध्ये तक्रार मागीतली आहे, त्याकरीता त्यांना सगळ्यांना पुन्हा तक्रार लिहून त्यावर सह्या कराव्या लागतील. तेव्हा सावलीने एक शब्दात होकार दिला आणि सगळयांनी मिळून एका कागदावर तक्रार लिहून सह्या केल्या आणि वरचा ऑफिसला पाठवून दिली. परंतु सावलीला काही तरी घडण्याचे संकेत मिळू लागले होते. तीने इतक्या दिवसाने ऑफिस मध्ये पाऊल ठेवलेले होते म्हणून तीने त्या संकेताकडे दुर्लक्ष केले होते. मग ऑफिस
मधील दिवस संपल्यावर ती घराकडे जाण्यास निघाली होती. तेव्हा मात्र ते संकेत अधिकच प्रबळ होऊ लागले होते.
सावली घरी जाण्यासाठी गाडी काढण्यास गेली तर तीची गाडी पंचर आहे असे तिला आढळले. ते बघून सावली म्हणाली, 'अरे यार हे आताच व्हायला पाहिजे होते काय. मग ती अनयासपणे तशीच गाडी पंचरचा दुकानाकडे नेऊ लागली होती. त्यावेळेस तीला तीची गाडी अधिकच जड वाटू लागली होती. ती अपेक्षेपेक्षाही जास्त जोर लावत होती. तेव्हा तीने थांबून बघीतले तर तीला आढळले कि तीचा गाडीची दोन्ही चाक हि पंचर होती. तेव्हा तीने विचार
केला असे नाही होऊ शकत एकाचा वेळेस दोन्ही चाक पंचर होतील. तीला आता कळून चुकले होते कि तीची गाडी
पंचर झाली नाही तर केल्या गेली ती हि मुद्दाम. याच भानगडीत तीला घरी जायला उशीर झाला आणि ती उशिरा घरी पोहोचली. ती पोहोचली तेव्हा हलका
अंधार पडला होता. तर ती घरी गेली आणि घराजवळ गाडी उभी करणार तोच कुणी तरी तेथून पळताना तीला भासला. सावलीने गाडी सोडून त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तीला त्यात यश आले नाही. मग ती परतून घराकडे गेली तेथे तीला त्याची पद चिन्हे दिसली. सावली त्यांचा पाठलाग करत घराचा मागे आणि थेट कोमलचा बेड रूमचा खिडकीचा खाली गेली. कारण कि ती चिन्हे तेथेच जाउन संपलेली होती, मग सावलीने थोडे
पुढे जाऊन बघीतले तर ती चिन्हे फक्त तेथेच संपलेली होती. तर मग सावली परतून घराचा आत गेली आणि थेट
कोमलचा बेडरूम मध्ये जाऊन ठेपली. तीने बघीतले तर कोमल काहीतरी वाचत असल्याचे तीला दिसले. तेव्हा सावलीने तीला काही न बोलता थेट ती खिडकीचा दिशेने गेली. तीने बघीतले तर ती खिडकी अर्धवट उघडी होती. सावलीने मग कोमलला प्रश्न केला, "कोमल तुझा रुममध्ये कोणी आला होता काय?" तेव्हा कोमल उत्तरली, नाही ताई मी तर एकटीच होती आणि आहे.' मग सावलीने तीला पुन्हा विचारले, “मग हि खिड़की कशी काय उघडी आहे." तेव्हा कोमल अनभिग्य होऊन म्हणाली, "मला काय माहित, मी झोपेतून जागले तेव्हापासून माझ्या रुममध्ये मी एकटीच आहे." असे तीने सावलीला अर्धवट असे उत्तर दिले.
"मग सावली काहीच न बोलता सरळ तीचा रुममध्ये गेली आणि तीने लावलेले कॅमेराचे व्हिडीओ चेक करू लागली. त्या व्हिडिओ मध्ये तिला स्पष्ट दिसले कि कोमलचा रूमचा खिडकीतून कुणी तरी आत आलं आणि मग अर्ध्या तासाने जेव्हा सावली घरी आली नेमका त्याच वेळेस ती व्यक्ती खिडकीतून बाहेर पडली. आता मात्र
सावलीचा पारा चढला होता. ती तशीच कोमलचा रुममध्ये गेली आणि तीला खडकावून वीचारले, "कोमल तू मला खर खर एक गोष्ट सांगशील." तेव्हा कोमल म्हणाली, "काय ताई तू वारंवार का बर मला वीचारण्यास येते. आता तुला काय वीचारायचे आहे." मग सावली तापल्या वाणीने बोलली, "तू माझ्याशी खोटी का बर बोललीस.' मग कोमल उत्तरली, " मी काय खोटे बोलली तुझ्यासोबत, मला माहित नाही तू मला का आणि कसल्या बद्दल प्रश्न वीचारत आहेस. मग सावली म्हणाली, " मी त्या तुझ्या खिडकीतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या व्यक्तीबद्दल
वीचारत आहे. मग कोमल उत्तरली, " कसली खिडकी आणि कसला व्यक्ती मला माहित नाही. " कोमलचे उत्तर ऐकून आता सावलीचा रागाची हद्द पार झाली होती आणि ती तशीच तीचा बेडरूमकडे नीघून गेली.
शेष पुढील भागात