पेहेली तारीख Vrishali Gotkhindikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पेहेली तारीख

पेहेली तारीख 

खुष है जमाना आज पेहेली तारीख है ...दिन है .सुहाना आज पेहेली तारीख है 'रेडीओ सिलोन वर दर एक तारखेला सकाळी साडेसात ला लागणारे हे गाणेअचानक कुठून तरी हे सूर कानावर आले आणी त्यांनी मला चक्क" भूतकाळात" ओढून नेलेखरेच २० .२५ ..वर्षापूर्वी .एक तारीख या गोष्टीला खूप महत्व होते ..मला आठवतेय माझे वडील एक सरकारी कर्मचारी होते .जेमतेम कमाई त्यात खाणारी तोंडे तीन .शिवाय युद्ध काळामुळे महागाईची झळ .त्यामुळे महिना कसातरी पार पडायचा ..आणी मग एक तारखेची वाट आतुरतेने पाहिली  जायची .त्या काळी सर्व सरकारी नोकरांचे पगार एक तारखेला होत व तेही रोख पैश्यात दर.एक तारखेला सिलोन रेडीओवर हे गाणे ऐकू .आले की मनाला अतीव आनंद होत असे याचे कारण .महिन्याचे अखेरचे दिवस खूप ओढ गस्तीचे असत तेल.संपत आलेले,साखर डब्याच्या तळात..,चहापूड जेम तेम दोन ते तीन दिवस पुरू शकणारी भाजी आणायला पैसे नसायचे.मग पातळ पिठले अथवा घट्ट पिठले यावरच भागवले जात असेअगदीच काही अडचण आली तर आईने तिच्या जवळ कधीतरी जपून ठेवलेले डब्यात लपवून ठेवलेले रुपया दोन रुपये कामी येत असत ..... जरी अशी महिना अखेरला कितीही ओढाताण झाली तरी कुठेही ."उधार "उसनवार "केलेले आईला आवडत नसेघरात आहे त्यातच भागवणे इकडे तिचा कल.असे .त्यावेळी कुठलेही" कर्ज काढणे" ही गोष्ट नामुष्कीची समजली जात असे ..!आपल्या ओढ गस्तीच्या संसारात सुद्धा आपल्या नवऱ्याच्या अंगावर कोणतेही कर्ज नाहीअसे  त्या वेळच्या बायका अगदी" अभिमानाने" सांगत असत ......आणी मग ज्याची आम्ही आतुरतेने .वाट पाहत असू .ती" एक तारीख "येई ..त्या दिवशी वडील खूप आनंदात असत .चकचकीत दाढी करूनकडक इस्त्रीचे कपडे घालूनजेवण करून बाहेर पडायची त्यांना .खूप गडबड असे ..आई पण आनंदाने त्याना निरोप द्यायला .दारापर्यंत जात असे .वडील पण त्यादिवशी खुषीत असल्याने."तुला काय आणू "..असे आईला आवर्जून विचारात असत ..!❤️आई काही मागत नसे पण "इश्य".म्हणून एक छानसा मुरका मात्र मारत असे ..!😊😊माझे सुध्धा त्या दिवशी शाळेत फारसे लक्ष लागत नसे ..कधी एकदा शाळा सुटते असे मला होत असे ..शाळा सुटून घरी गेल्यावर मला दिसत असे की आई पण छान" वेणी फणी"करून देवळात जाण्यासाठी तयार असे ..मी देखील तोंड धुवून युनिफॉर्म बदलून पट्कन तिने दिलेले दुध पिऊन तिच्या बरोबर देवळात जात असे ..घरी येईपर्यंत घड्याळाचा काटा सात पर्यंत पोचलेला असायचा ..आई देवापुढे दिवा लावत असे मी आतुरतेने दारात जाऊन वडिलांची वाट पहात बसलेली असायची ..!बरोबर सव्वा सात वाजता वडील घरी येत ..ते आले की मी धावत जावून त्यांच्या हातातली डबा.व पिशवी घेत असे ..आईची लगबग चालू व्हायची आई त्यांच्या साठी चहा ठेवायची ..वडील हात पाय धुवून आल्यावर आई गरम गरम चहा त्यांच्यापुढे करायची हात पाय धुऊन कपडे बदलून वडील पगाराचे रोख पैसे एक मिठाईची पेटी आईकडे देत असत बरोबर एक" गजरा" पण असे ..गजरा पाहून आईचा चेहेरा अगदी फुलासारखा खुलत असे ..."..पैसे मिठाई ..देवापाशी ठेवा "..असे म्हणून ते चहाचा आस्वाद घ्यायला सुरवात करत ..आई .पैसे आणी मिठाई .एका तबकात ठेवून तबक देवापुढे ठेवत असे ..व .देवाला नमस्कार करीत असे ...हा ".सोहळा" .झाला की वडील पण देवाला नमस्कार करून ते सारे .पैसे लगेच आईच्या ताब्यात देत ..आई .त्या दिवशी अगदी "खरोखरीची ".लक्ष्मी वाटत असे ..यानंतर .आम्ही मिठाई खाण्यात गर्क होत असू .आणी मग त्या पैश्याचे .महिन्याच्या खर्च अनुसार वाटे केले जात वाणसामान ,शाळेची फी .दुधाचे बिलवगैरे भगवण्या साठी वेगवेगळया पाकिटात ठेवले जात आकस्मिक येण्याऱ्या खर्चाची पण तरतूद केली जात असे ..!.वडील ऑफिसमध्ये जरी कॅशियर असले तरी घरचा मात्र सारा व्यवहार आईच्या ताब्यात असे .अगदी महिन्याच्या खर्चाचे पैसे सुध्धा वडील आईकडेच मागत असत ..वडिलांचे चहा पाणी झाल्यावर मग आम्ही जवळच्या एका बागेत जात असूबागेतही आई वडिलांचे बोलणे महिन्याच्या खर्चाचे हिशोब या विषयीच असे पण त्या दिवशी .जवळ पैसे असल्याने त्या बोलण्यात भविष्याची "एक विशेष आशा ."डोकावत असेमग आम्ही बागेत छानशी भेळ खात असू .व घरी परत येत असू .अशी ही "संस्मरणीय"एक तारीख अजूनही माझ्या मनाच्या कप्प्यात सुरक्षित आहे❤️..........आता ते ..दिवस राहिले नाहीत पगारही आता एक तारखेला होत नाहीतशिवाय पगार रोख न मिळता .बँकेतील खात्यावर चेकने अथवा ऑनलाईन जमा होतात तेही वेग वेगळया तारखांना सध्याच्या काळात आई वडील दोघेही "कमावते" असलेले व घरात एक किंवा दोन मुले असेलेनेखर्च ही आटोक्यात आहेत पगार झाल्यावर लागणारे पैसे लागतील तसे व सवडीनुसार ए टी एम द्वारा काढले जातात त्यामुळे आजच्या जमान्याला ."पेहेली तारीख ".हा प्रकार नाही समजणार..ती मजा आता नाही !!!..जीवनाची सगळी गणिते आता पूर्ण पणे बदलली आहेत ..!त्यामुळे ..कदाचित ..हे वाचताना ..पण त्यातील "गंमत"..कळेल ..का नाही कोण जाणे..वृषाली