श्रापीत गाव.... - भाग 2 DEVGAN Ak द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्रापीत गाव.... - भाग 2

  आता वाचनेच शक्य नव्हते कारण समोरच अंशी नव्वद च्या आसपास तुटलेल्या डोक्यांची प्रते उभी होती .त्यातील दोघांकडे सखाराम चे लक्ष गेले , त्यांच्यात हळुहळू बदल घडू लागले . त्यांच्या शरीरावरील रक्त नाहीसे झाले , धडावरती मान सुध्दा प्रगटली . सखारामच्या समोरच एक देखणा तरुण व एक सुंदर तरुणी उभे ठाकले . सखाराम चे लक्ष त्याच्यावरच खिळले होते. त्या तरुणाचा वेस एखाद्या ब्राम्हनासारखा होता ,नव्हे तर तो एक ब्राम्हणच होता . डोक्याची टक्कल आणि मध्येच एक लांब शेंडी होती,त्याचा रेखीव चेहरा नी गळ्यात व बाहू वरती रुद्राक्षाच्या माळा होत्या.तो देखणा तरुण ब्राम्हण , घाबरलेल्या सखाराम ला म्हणाला ," घाबरू नकोस सज्जना! तुला आम्ही काही एक करनार नाही ."ते ऐकून सखाराम ला थोडे बरे वाटले. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला , त्याच्या तोंडून आवाज निघाला. सखाराम त्या तरूणाला म्हणाला ,"  हा सर्व प्रकार काय आहे ? मला तर काहीच समजत नाही ? आपण कोण व ही सगळी माणसे असी का ?"

तो तरुण ब्राम्हण म्हणाला ," तेच तर तुला सांगायचे आहे."

व  तो ब्राम्हण  सांगू लागला.............

" मी कमलाकर एका ब्राम्हणाच्या  घरी माझा जन्म झाला , तो ब्राम्हण दुसरा तिसरा कोणी नसून आताच तुनी पाहीलेला श्वेतकमल आहे . ही घटना सुमारे ३०० - ४०० वर्षांपूर्वीची आहे . श्वेतकमल पोरका होतो. त्याला आई वडील नव्हते , ते तो लहान असतानाच दगावले . एकट्या आजीने त्याला वाढवले . श्वेतकमल गरीबीत वाढत होता , म्हणून त्याला गरीबीचे चटके फार सोशावे लागले.त्याची ओळख जवळच्याच जंगलात राहणाऱ्या एका तांत्रिकासी झाली . तो तांत्रिक नेहमी त्याला विचीत्र गोष्टी सांगे , ते एकूण श्वेतकमल थक्क व्हायचा. तो तांत्रिकाच्या कामात त्याला मदत करू लागला. तांत्रिक कधी बोकड, कधी कोंबडा तर कधी चक्क एखाद्ये लहान मुल घेऊन यायचा व त्याचा उपयोग आपल्या तंत्र शिध्दीष करायचा.श्वेतकमलला ते सर्व पाहण्यात काही रस नव्हते, त्या तांत्रिकाच्या सुंदर मुलीवर त्याचा जीव जडला होता, म्हणून तो तांत्रिकाला खुश करण्यासाठी त्याच्या कामात मदत करू लागला गावातून कोंबडा , बोकड चोरून आणू लागला .

" काय आहे त्या लाल कापडात ?", मांत्रिकाने श्वेतकमलला विचारले."आपणच बघा! ", म्हणून श्वेतकमलने आपले हात पुढे केले.तांत्रिकाने ते कापड सोडले आत एक दोन महिन्याचे मुल होते.मांत्रिक अगदी खुश झाला ," अगदी वेळेवर आणलेस "असे म्हणत तो एका मोठ्या दगडा पासी गेला . त्याने डोळे मिटले व काहीतरी मंत्र म्हटले . तो मोठा दगड आपोआप सरकला . मांत्रिकाने श्वेतकमलला तिथेच थांबण्यास सांगितले व तो आणि त्याची मुलगी असे दोघेही गुहेत शिरले .

थोड्याच वेळात ते बाहेर आले . मांत्रिकाचे कपडे रक्ताने माखलेले हाते. श्वेतकमलला कळायला वेळ लागला नाही की त्याने त्या लहान बाळाचा जिव घेतला आहे.मांत्रिक खुश होता चेहर्यावर हास्य पसरलेले होते . तो श्वेतकमलजवळ आला," मी आज फार खुश आहे , तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करीन ,तू फक्त सांग."श्वेतकमल हसला , बहुतेक ह्याच क्षणाची तो कित्येक दिवसांपासून वाट पाहत होता, तो म्हणाला ," तुम्हाला द्यायचेच असेल तर .... तर... मला अमर होण्याची विधा द्या ..... मला अमर करा !"तांत्रिकाचा तोल गेला तो अत्यंत रागात आला तांत्रिक श्वेतकमलवर ओरडलाच ," अरे मुर्खा काय मागतोस तू , आजपर्यंत  ह्या पृथ्वीवर जन्मलेल्या कोणत्याही सजीवाला ते शक्य झाले नाही ."श्वेतकमलही तावातावाने म्हणाला ," आपण मला शब्द दिला आहे , तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल."तांत्रिक ," अमर होण्याची इच्छा तुझ्यासारख्या तुच्छ मणूष्याची पुर्ण करने माझ्या हातात नाही, पण मी तुला सांगेन त्या प्रमाने वागलास तर तू अमर होऊ शकतोस."श्वेतकमल थोडा नाराज झाला ," पण ! मला तुमच्या तंत्र मंत्रातले काही एक समजत नाही ."तांत्रिक," मी आता म्हातारा होत चाललो आहे त्यात मी एक गावातून हाकलून दिलेला तांत्रिक आहे , माझ्या मुलीचे लग्न होने अशक्य आहे ; तू तिच्यासी लग्न करावे , तिची तुला मदत होईल."श्वेतकमल आपल्या चेहऱ्यावरील आनंद लपवत म्हणाला "ते सगळे ठिक आहे मला काय करायचे आहे ते सांगा!"तांत्रिक म्हणाला ," तुला आधी स्वत: च्या घरात शैतानाची स्थापणा करावी लागेल. तो शैतानीदेव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल , सर्व प्रकारे तुझी रक्षाही करेल तसेच तुला असाध्य शैतानी शक्ती प्रदान करेल आणि तुझी अमर होण्याची इच्छाही पूर्ण करेल ; त्याची स्थापणा तुला एका नवजात शिशू च्या शरीरात करायची आहे , त्यासाठी मी स्वत: येईन व त्याला प्रसन्न करण्यासाठी तुला नरबळी द्यायची आहे कमीतकमी शंभर मानसांची नरबळी द्यावी लागेल व त्यानंतर तू त्याच्या कृपेने अमर होसील."

श्वेतकमलची विवेक बुद्धी अमर होण्याच्या हव्यासापोटी मरण पावली. त्याने तांत्रिकाच्या मुलीसी कोणाला न कळता लग्न केले , त्याची आजीही मरण पावली होती आणि त्याला रोखनारे समजावनारेही कोणी नव्हते.श्वेतकमलला पहीलीच दोन जुळी मुले झाली. श्वेतकमलने त्यातल्याच एका नवजात शिशू चा प्राण घेऊन त्याने शैतानीदैवताची स्थापना केली व त्याला गावातील बाया , माणसे व लहान मुलांचा तो बळी देऊ लागला.

ह्या प्रकारे लोनार सारख्या संप्पन गावात एका शैतानाचा जन्म झाला.

कथा वाचल्या बद्दल........     खुप खुप     💐 आभार 🌹 धन्यवाद 💐

टिपः कथा पुर्ण काल्पनीक आहे त्यात बळी देने वा कुठल्याही वाईट कृत्याचे मी समर्थन करत नाही.

पुढचा भाग लवकरच येईल...