का घडलं, आणि कसं घडलं...???माहित नाही. स्वप्न होत कि तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य . पण आता ती गुलाबाच्या आणि मोगऱ्याच्या फुलांनी सजलेल्या त्या भल्या मोठ्या आलिशान बेडवर गुडघे छातीशी घेऊन बसली होती.
तिची ती थोडीशी घाबरलेली आणि बावरललेली नजर सर्वत्र फिरत होती. तिने स्वप्नात हि कधी पहिली नसेल एवढी मोठी ती रूम होती. ..... प्रत्येक सुख सोयीने भरलेली ...... आणि त्याच रूमच्या मऊशार बेडवर ती बसली होती ..... अंगावर भरजरी पैठणी साडी.... केसात मळलेली मोगऱ्याची गजरे .... हातात त्याच्या नावाचा हिरवा चुडा .... गळ्यात गळाभरून दागिने... आणि त्यात उठून दिसणार ते दोन वाटीच्या काळ्या मान्यच मंगळसूत्र .... कालच लग्न झालेली नववधू होती ती...... आणि आज तिची मधुचंद्राची रात्र होती.... तो विचार मनात येताच पोटात गोळा आला ...... अंग भीतीने शहारून गेले .... घास कोरडा पडला...
काही दिवसापूर्वी जर तिला कोणी बोलल असत कि तुझा आयुष्य असं बदलणार आहे आणि अचानक तुझं लग्न होणार आहे... तर तिने त्याच्यावर विश्वास ठेवला नास्ता..... एका रंगहीन असणाऱ्या तिच्या आयुष्यात अचानक पणे एक वादळ बनून आला होता तो... ज्याने तीच आयुष्य बदलून टाकले होते... तिने कधी स्वप्नात हि विचार केला नव्हता... कि ती ज्याचा ज्याचा सर्वात जास्त तिरस्कार करते तोच तिचा नवरा होईल.... त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिला तिच्या गळ्यात घालावं लागेल.... "पाम तो हि तर माझा तिरस्कार करतो ना... मग का केलं असेल त्याने माझ्याशी लग्न... आणि मला हि भाग पडलं त्याच्याशी लग्न करायला..." ती विचार करत होती.... अश्रू तर आता कधीच सुकून गेले होते.... त्यामुळॆ ते डोळ्यात येत हि नव्हते... पण मन ते तर आतून आक्रंदत होत....
रात्रीचा एक वाजला होता... पण तो अजूनही आला नव्हता.... ती तशीच बसून होती.... ती त्याची वाट पाहत होती.... काळजीने किंवा प्रेमाने नाही... तर त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टी चा जाब विचारण्यासाठी... कालपासून स्वतःला खूप रोखले होते तिने...... पण आता तो कधी येतो आणि कधी आपण त्याला सगळं विचारतोय असं तिला झालं होत... त्याची वाट पाहता पाहता तिने बेडवर मागे डोकं टेकवलं .... दोन दिवसाची दगदग आणि मानसिक तणाव ... यामुळे तिला लगेच झोप लागली....
झोईतच तिला जाणवत होते.... कोणीतरी आपल्या खूप जवळ आली.... त्याचे गरम श्वास आपल्या चेहऱ्यावर जाणवत आहेत.... आता त्याने मानेत हात घातला आहे... त्याचा तो थंड स्पर्श होताच .... तिचा जणू श्वासच अडकला .... तिला तिच्या अंगावर भर जाणवत होता... आता मात्र.... भीतीची एक थंड लहर अंगातून आरपार वाहत गेली आणि तिने खाडकन डोळे उघडले.... तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांनी ती समोर पाहत होती .... आता तिला तेच ब्राऊन डोळे दिसत होते.... ज्यात ती नेहमी च तिच्यासाठी तिरस्कार पाहत अली होती..... पण आज ते डोळे तिच्या खूप जवळ होते.... तो अगदी एकटक आणि आरपार तिच्या डोळ्यात पाहत अला होता..... काही क्षणात ती हि त्याच्या डोळ्यात हरवून गेली.... आता त्याची नजर तिच्या काळ्याभोर डोळ्यावरून तिच्या नाजूक गुलाबी ओठावर गेली..... आणि त्याची ती नजर पाहून ती थरथरली .... ओठ आपोआप विलग जाळे ...... आणि आता तिला त्याचे गरम श्वास तिच्या नाकावर आणि ओठावर जाणवू लागले.... तिला त्याला बाजूला करायच होत... शरीरात काहीच संवेदना होत नव्हत्या.... फक्त त्याचे श्वास तिला जिवंत.. होते.... पण आता एक क्षण असा आला कि तो तिच्या ओठावर ओठ टेकणार .... तिने पूर्ण टाकत लावली आणि त्याला दूर ढकललं.... त्याबरोबर तो मागे लोटला गेला.... आणि ती .... ती बेडवरुन खाली पडली होती .... .
तिने घाबरून इकडे तिकडे पाहिलं तर रूम लख्ख प्रकाशाने उजळून निघाली होती... म्हणजे सकाळ होती... आणि आपण आतापर्यन्त स्वप्न पाहत होतो.... तिने आसपास एक नजर फिरवली.... दरवाजा अजूनही बंद होता.... आणि तो .... तो कुठेच दिसत नव्हता.... म्हणजे तो रात्री रूम मधेच आललच नाही... तिने कपाळावर जमा झालेला घाम हाताने पुसला..... स्वप्न असलं तरी तीच अंग अजूनही थरथरत होते.... काळीज एवढे जोरजोरात उद्यमार्ट होते कि तिने छातीत हात ठेऊन ते... शांत केलं.... ती विचार करत उठली पण कमरेत हलकी काळ उठली कारण बेड वरून पडल्यामुळे तिला चंगळच लागला होत,.... ती तशीच कंबर पकडून बेड वर बसली....
"बाप्पा .... काय आहे हे सगळं.....?स्वप्न कि खार काही कळत नाही.... माझं आयुष्य एवढं गुंतागुंतीचं का झालं आहे....?कशी फेस करणार आहे मी सगळ्या गोष्टी.....?कशी राहणार आहे मी या घरात.....?त्याच्यासोबत लग्न झालं आहे.... त्यालाच नीट ओळखत नाही तर त्याच्या घरच्यांना कास समजून घेणार...?तो माझा तिरस्कार करतो म्हणजे त्या लोकांना हि मी आवडत नसेल ज=का..?"ती विचार करत अशीच बसून होती... आणि तेवढ्यात दरवाजा उघडला गेला... आणि तिची नजर आपोआप त्यादिशेने गेली तर तो आत यात होता.... त्याला पाहून तिला मघाशी पडलेलं स्वप्न आठवलं आणि हाताला पदर घट्ट आवळला गेला.... ती तशाहीच थोडी सावरून बसली.... आता तो आपल्या जवळ येईल आणि मग आपण त्याला आपल्या मनातलं सगळं विचारू असं तिला वाटलं... तिने मनातच त्याला काय काय विचारच ते ठरवलं आणि आता त्याच्याकडे पाहिलं....
पण तो.... त्यांनी एक नजर सुद्धा तिला पाहिलं नाही..... तो आला तसा बाथरूम मध्ये गेला..... आणि मग काही वेळाने शॉवर चा आवाज तिच्या कानावर पडलं..... ती वेड्यासारखी फक्त पाहत होती.... आपल्यासोबत हे काय घडतंय आणि आता आपण पुढे काय करायचं हाच विचार करत होती.... पण काहीच कळत नव्हतं.....
,........,...................
क्रमशः
ज्यांनी हि कथा वाचायला घेतली... पण अजून फॉलो केलं नाही.... त्यांनी प्लिज फॉलो करायला विसरू नका ..... फॉलो केलं तर कथेचं सर्व अपडेट्स तुम्हाला येत राहतील....
कशी वाटली हि कथा ..... स्टोरी जशी पुढे जाईल तसे तुम्हाला ... त्यामुळे वाचत राहा कमेंट्स नक्की करा प्लिज नक्की कळवा