बी.एड्. फिजीकल - 18 Prof Shriram V Kale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बी.एड्. फिजीकल - 18

   बी. एड्. फिजीकल  भाग १८

     बॅचमधला टी. एम. इसो याने वर्षभर मेसमधलं न जेवण घेतलं नव्हतंनी एकही बील भरलेलं नव्हतं. त्या महिन्यात मात्र मेसचा हिशोब ठेवणाऱ्या फडणीसने तोविषय ऐरणीवर आणला नी प्रार्चायांकडे तक्रार केली. ती बाब गंभीर असूनही अद्याप त्यांच्या कानी गेलेली नव्हती. इसो बिलात ९०% सूट मागत होता. पण मेस कंपल्सरी हा नियम असेल तर त्याला सूट देण गैर आहे हा मुद्दा आम्ही सर्वानीच लावून धरला. हा गदारोळ सुरू असतानात्याचं नी मुच्छड थोराताचं काय गुफ्तगू झालं कोण जाणे पण त्याने खाणा खुणा केल्यावर त्याचे धरकरी गप्प झाले. “ आता झालं या त्ये आसूद्या....त्याला आर्ध बील माफ करा” असा प्रस्ताव मुच्छड थोराताने ठेवला आणि तो बहुमताने मंजूरही झाला. त्यावेळी प्राचार्यानी सांगितल की, या पुढे मात्र तुम्ही मेसमध्येच जेवा किंवा लास्ट वर्किंग डे पर्यंत येईलते बील मुकाटपणे भरा. या वेळी मोबदल्यात मुच्छडने दोनशे रुपयाची भाड खाल्ली. पण त्याने सवंगड्याना  शष्पसुद्धा दिले नाही म्हणून ही अंदरकी बात काहीदिवसांनी फुटली.

                कांदिवली स्टेशनवर जाताना  युको बँकेकडे वळायच्या  कॉर्नर पाशी त्यावेळी  एक  इराण्याचं हॉटेल होतं. तिथे  स्पेशल चहा १ रुपयाला  मिळायचा. मोठा मग़ भरून  दुधात काय काय मसाले  घालून  ताजा  चहा ते बनवून देत. प्रभूला  तो फार आवडे. तो दोघाना व्यवस्थित पुरायचा. तिथेकाऊंटरच्या बाजूला  जुन्या  फॅशनचा ग्रामोफोन  असायचा. म्हणजे ते ४×३ फूट  साईझचं दर्शनी भागाला काच बसवलेलं कपाटच होतं. त्यात त्या वेळच्या गोल  तबकड्यांच्या हारीने रचलेल्या पाच  सहा  चळतीअसत. कपाटाच्या  दोन्ही  कडाना  नंबरआणि  गाण्याची यादी आणि  बटणं असायची. तुम्ही  यादी वाचून काऊंटर वर चार आणे दिलेत  मॅनेजर बटणऑन करी. मग तुम्ही पाहिजे त्या गाण्याचा नंबर दाबायचा. त्यानंतर चळतींमधल्या त्या विशिष्ट तबकडीच्या खालच्या वरच्या तबकड्या वर खाली सरकत. रोटेटिंग हॅण्ड नी साऊण्ड बॉक्स वर सरकत येई  नी  तबकडीच्या कडेवर अलगद पीन टेकून गाणं  सुरू व्हायचं.

           एक बाजूचं  गाणं  संपलं  की रोटेटिंग हॅण्ड खालच्या बाजूला सरकून  तिथे पीन टेकली  की तबकडीच्या पलिकडच्या  बाजूचं गाणं वाजायचं. नंतर रोटेटिंग हॅण्डल  मूळ जागी जायचा आणि तबकड्यांची चळत पूर्ववत व्हायची.गाणं ऐकण्या इतकाच  हा नजारा पहाणंही  फॅण्टस्टिक असायचं. प्रभू  बहुसंख्य वेळा ‘ये जिंदगी के मेले’  आणि तलतचं ‘ऐ प्यारतेरा शुक्रिया’ हे गाणं  ऐकायचा. आम्ही  कितीतरी जुनी गाणी त्यहॉटेलात बसून ऐकलेली अहेत. त्या  ग्रामोफोन मध्ये १०० तबकड्यांची एक चळत  अशा किमान चार ते पाचरांगा असायच्या.   आलेली  बहुसंख्य गिऱ्हाईक चहा / खाणं येईतो हमखास एखादं तरी गाणं ऐकत असत. त्याकाळी मुंबईला इराण्याच्या हॉटेलांमध्ये सार्वत्रिक दिसणाऱ्या या विशिष्ट  ग्रामोफोनचं चित्र किंवा फोटोमात्र आज  गुगलवरही सापडत नाही.        

         त्यावेळी मार्चअखेरपूर्वी बी. एड्. च्या वार्षिक परीक्षा उरकत नी इन सर्विस लोकाना कॉलेजकडून रिलीव्हिंगऑर्डर दिली जाई. परीक्षेपूर्वी मी गिरगावला दादाकडे भेटायला गेलो होतो.सेण्ट्रल सिनेमामध्ये अजूनही चाचा भतिजा हाच पिक्चर सुरू होता. सिल्वर ज्युबीली पूर्ण करून त्याची गोल्डन ज्युबिलीकडे वाटचाल सुरू झालेली होती. २० ते २४ मार्च आमची परिक्षा पार पडली. शनिवारी शेवटचा पेपर झाला नी रिलिव्हिंग ऑर्डर नी लायब्ररी डिपॉझीटचे २० रुपये घेवून  आम्ही बाहेर पडलो. आज पहिल्यानेच प्रभुने भावाला कार पाठवायला सांगितल होतं.तो कायम साधेपणी रहायचा. सुटी लागली की मुंबईतल्या काही मुलीना न्यायला त्यांचे आईवडिल कार घेवून यायचे त्या वेळी त्या आपली जणु काही कोणाशी ओळखच नाही असा अलिप्तपणा दाखवीत.मी आणि प्रभुने आपापलं सामान भरलं. मग आम्ही खासनीस सराना भेटून त्याना नमस्कार करूनआलो. मला तुरेल पाखाडी रोडला मावशीकडे सोडून प्रभु निघून गेला. बी.एड्. पर्व संपलं.

        १९८०च्या दरम्याने माझी लहान बहिण सी.पी.आर. हॉस्पिटल कोल्हापूर येथे नर्सिंग करीत असताना तिला इंटर्नी शीप साठी जयसिंगपूर हॉस्पिटल मिळालं.ती मला बोलली तेंव्हा अकस्मात मला कांदिवलीतला सहाध्यायी, पामेल हॉर्वरून जंप करताना ढोपराला व्यंग आलेल्या शिंदे मास्तरची आठवण आली. खरंतर त्याच पूर्ण नावही मी विसरलो होतो. त्याचंघर जयसिंगपूरला आहे नी तो शासिरीक शिक्षणाचा शिक्षक आहे हाधागा पकडून काही  ट्रेस लागला तर त्याला जरूर भेट एवढं मी तीला बोललो. तिने हॉस्पिटच्या स्टाफवर चौकशी केली.एक आया त्याला ओळखणारी निघाली. बहिणीने श्रीराम काळे, बी.एड्. फिजीकल कांदिवली याची बहीण असं  लिहिलेला कागद तिच्याकडे दिला. तिने तो शिंदे मास्तरला दाखवला.त्याच सायंकाळी तो आपल्या पत्नीला सोबत घेवून माझ्या बहिणीला जावून भेटला. तिला आपल्या घरी यायचं  आग्रहाचं  निमंत्रण दिलं. इतकंचनव्हे ' सोबत चौघी पाचजणी, तुझा ग्रूप असेल त्यानाही आण' असं निक्षून सांगितलं. त्याप्रमाणे  तिघीजणी जेवायलाच त्याच्याकडे गेल्या. शिंदे बोला, "आमच्या बरोबरची कोकणातली सगळीच मुलं लय प्रेमळ. काळेचे तर माझ्यावर लय उपकार आहेत. त्याच्यामुळे माझे लेसन चांगले झाले."  बहीणीचा जयसिंगपूर मुक्काम असेतो शिंदे कायम तिची चौकशी करून आयाकरवी तिला निरोप देई. त्याचीआई, पत्नी यांच्या अगत्यामुळे तिचा ग्रूप तीन चार वेळा त्याच्याकडे जावून पाहुणचार घेवून आला. 

                 बी. एड्. फिजीकल करून आल्यावर  तीन वर्षानी कसाल हायस्कूल सिंधुदुर्ग इथे  फिजीकल टीचर्स साठी १० दिवसाचा प्रशिक्षण वर्ग लागला होता. तिथे  गेल्यावर पाहिलं तर प्रभू, रावूळ, गोवेकरआणि आमच्या आधी दोन वर्ष कांदिवली  डिग्री घेतलेले माझे परिचित पाटणकर सर भेटले. अधिक शोध घेता  अन्यत्र फिजीकल बी. एड्.केलेले  मोहिते अणि तेली मॅडम वगळता अन्य सर्वच्या सर्व ४० लोकांपैकी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेला एकही शिक्षक नव्हता. कोणीसी.पी.एड्. (Certificte in Physical Eduction) तर कोणी एन्. डी. एस्. (National Defence Service) असे शॉर्ट टर्म कोर्स झालेले. ऑर्गनायझर एन.डी.एस.वाले. क्रीडांगणावर गेल्यावर काउंटींग देताना ‘एक दोन ती चार पॉंच छे सात आठआठ सात छे पॉंच चार तीन दोन एक’ असे उलटे “बॅक काऊंट”द्यायला लागले. थोड्या वेळाने शिटी वर थ्रूत थ्रूत करीत काऊंट द्यायला लागले.कवायत प्रकार दिले तेही फक्त हाता पायाच्या हालचालीवरचे. आम्हाला कॉलेजने Dos& Don’ts for P.E. Teachers या शिर्षकाची राष्ट्रीय शारिरीक शिक्षण परिषदेने मान्य केलेली संहिता दिली होती.

                  त्या संहिते नुसार बॅक काऊंटआणि शिटीवर काऊंट देवू नयेत अशी सक्त सुचना होती. कारण कवायत करताना  प्रत्येक वेळी केलेल्य कृती पुन्हा उलट क्रमाने करतोच असे नाही. तसेच सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार हात, पाय, कमर यांच्या हालचाली, वाकणे, वळणे आणि संयुक्त कृती (Neuro mscular co-ordination) यांचा समावेश अनिवार्य होता. तसेच क्रीडांगणावर गेल्यावर किमान दहामिनिटांचे वॉर्मिंग अप(उत्तेजक हालचाली) केल्या शिवाय कोणताही व्यायाम प्रकार सुरूकरू नये अशी सुचना होती. वॉर्मिंग़ अप करून शरीर गरम झाले की हलके वाटते आणि पडल्या-झडल्यावर गंभीर  दुखापत होत नाही.कसालला  येताना मी कांदिवलीत ठेवलेली डायरीसोबत आणली होती. दुपारी आम्ही सर्व बी एड्. फिजीकल वाले कोर्स ऑर्गनायझरना भेटून यावर चर्चा केली. ते स्वत: एन.डी.एस.वाले त्याना शारीरीक शिक्षणात झालेल्या परिवर्तानाची, नवविचार प्रवाहांची माहितीच नव्हती. केवळ सर्व्हिस सिनीयॉरिटीच्या बळावर ते उच्च पदावर बसले होते.

              मग आम्ही कसालचे मुख्याध्यापक आप्पासाहेब  पवार सर याना भेटलो. त्यांना कांदिवली कॉलेजची ख्याती माहिती होती, आम्ही संहिता दाखवल्यावर ते आमच्या सोबत आले. ऑर्गनायझर  गुळमुळीत उत्तरं द्यायला लागले. हेडमास्तरनी त्या संहितेच्या सायक्लोस्टाईल कॉपीज काढून दिल्या. सायं सत्रात प्रभू सरानी वॉर्मिंग अप कसं द्यायचं त्याचा डेमो दिला. पाटणकर सरानी शास्त्रशुद्ध खडे आणिबैठे व्यायाम प्रकार दाखवले. दुसरे दिवशी राडे नावाचे कुस्तिगीर आले . ते लॉटस् कसे  पाडायचे ते सांगू लागले. त्यानाही युनिव्हर्सल रूल्स माहितीच नव्हते.  (क्रमश: )