लग्नगाठ - 3 Neha Kadam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लग्नगाठ - 3

आज अनघाला लवकरच जाग आली आर्वी आणि मनीषा ताई अजुनही झोपलेल्या. तिने फ्रेश होऊन सर्व आवरल आणि बाहेर आली... आता जवजवळ दीड महिना झालेला लग्नाला तरी काही फारसे जवळ आले नव्हते दोघं. कधीतरी बोलायचे कधी तरी तर 7 8 दिवस बोलणंच नसायचं.... आर्वी सोबत रुळली होती अनघा पण अनय अजून तरी तिने फारस ओळखल नव्हत... पण जेवढ दिसत होता त्यावरून तिला अनय च टेन्शन, धावपळ सर्व दिसत होता... म्हणुच रात्री ती स्वतःहून बोलायला गेली...   
              ती रूम मधून किचन मध्ये जातच होती तर तिने पाहिलं अनय अजून झोपलेला आहे... म्हणून ती किचन मध्ये गेली आणि त्याच्या साठी टिफीन तयार केला.... काही वेळाने अनय उठला फ्रेश वैगरे झाला आणि कामाला जायला निघाला तसा अनघा ने त्याला चहा आणून दिला .... त्याने चहा चा कप बघतच शॉक झाला कारण इतक्या दिवसात मनीषा ताई ना त्यांच्या चालू असलेल्या medicines मुळे लवकर उठत नसे... आणि वयानुसार त्यानं जमत नसे म्हणून कधी अनय ने ही त्यानं फोर्स केला नव्हता....पण आज चक्क अनाया चहा घेऊन आली याचा विचार त्याने कधिच केला नव्हता.
             चहा बघतच त्याने विचारले आज लवकर कशी काय उठली?? तो उगीच तिची मज्जा घेत सूर्य पश्चिमेला उगवला वाटत... 
नाही सूर्य उगवलाच नाही आहे अजून पण ती म्हणाली तास तो गप्प झाला ... मग कशाला उठली लवकर?? त्याने विचारले.... ती म्हणाली तस तर मला लवकरच उठयची सवय आहे  आज लवकर झाली झोप म्हणून उठले..... बरं मी टिफीन ठेवला आहे ready करून तो पण घेऊन जा .. त्याला स्वतःवर विश्र्वासच बसत नव्हता.... काय डब्बा नको मी खाईन काही तरी बाहेरून.... तो म्हणाला अहो.... पण मी रेडी केलाय आता आणि एवढा पण वाईट जेवण नाही बनवत मी .... खण्यासारखच बनवते.... तिच्या अश्या बोलण्याने तो माञ फार गोंधलेला... पण त्याला खूप छान वाटच होते ... office मध्ये सर्वजण डब्बे आणतात ... फक्त आपणच नाही नेत पण आज तो डब्बा घेऊन जाणार म्हणून खूप छान वाटत होतं त्याला....
             तीने टिफीन तो बसला बेड वर तिकडे आणून दिला आणि जायला निघणार तर त्याने हाक मारली अनघा त्याच्या तोंडातून पहिल्यांदाच ती तीच नाव ऐकित होती.. तिने मागे वळून पाहिलं आणि विचरले काय?? 
              thank you काल रात्री साठी मला खरच खूप टेन्शन आलेला पैसच पण माझ्या कडे जेव्हा येतील ना पैसे तेव्हा मी तुला देणं ते थोडे थोडे ... करून thank you..... अजून आर्वी ची काळजी घेण्यासाठी ... माझी मदत करण्यासाठी....
              आणि sorry जे झालंय ते मी बदलू तर नाही शकत... पण तुला मी कोणतीही गोष्टी मध्ये अडकवणार नाही मला माहितेय तू लग्नं आधी जॉब करत होतीस पण आता तुला करायचं असेल तरी तू करू शकतेस... तुझ्या वार कोणताही बंधन नाही.... ते पैसे तू घरात दयवे अशी ही बंधनं नाही तुला.... तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू माझ्या शी बोलू शकतेस ..... आई शी मी बोलेन पाहिजे तर ....
              त्याचे विचार ऐकुन तिला खूप समाधान वाटलं पण तिला चांगलं माहिती होता जर तिने जॉब करायचं ठरवलं तर परत अनय ची कसरत होणार म्हणूनच तिला सध्या तरी काम करायचं नव्हतं.... 
               कितिदिवास त्याच्या मनात होतं तिला हे सांगायचं म्हणून आज त्याने सांगितले..... आणि तो कामाला निघून गेला..... 
                अनय गेल्यानंतर अनघा कामाला लागली. तो पर्यंत मनीषा ताई पण उठलेल्या त्यानं ही अनघाने चहा दिला .... आणि आतमध्ये आर्वी च आवरायला गेली ..... आर्वी झोपलेली तो पर्यंत तिने सर्व बिस्तर अवराला आणि बाकी कामं उरकली नंतर आर्वी उठली तास तिला अंघोळ वैगरे घालून तिने ready केलं....
                  घरी जास्त काहीच काम नसायचं त्यामुळें अनघाचा वेळच जात नसे कधीतरी आर्वी सोबत खेळताना वैगरे अस जायचा पण कधी कधी तिला बसून बसून कंटाळा यायचा आज तर लवकर उठलेली त्यामुळें सगळी कामं झालेली मग उरलेलं वेळ काय करायचं म्हणून तिने कपाट आवरायला घेतलेला आर्वी ल खेळणी ठेऊन समोर बसवलेल आणि ती तिकडेच बाजू च कपाट लावत होती..... 
                     कपाटात सर्व कपडे अस्तव्यस्त होते... तीने त्यांच्या घड्या करून नीट व्यवस्थित ठेवले.... ते करताना मधी मधी तिचा लक्ष आर्वी कडे होता....अस पण तिने काढलेल्या पसाऱ्यात आरवि मध्ये मध्ये करत होती ...
                    वरच्या खणात सर्व कपडे लाऊन झलयालवर तिने खलच्या खान साफ करायला काढले... त्यात एक छोटी पेटी ठेवलेली खूप जुनी च होती तशी ती तिने ती खोलून पहिली तास त्यात काही तरी चिठ्ठ्या वैगरे होत्या .. आणि एक फोटो पण होता तेवढ्यात मनीषा ताई तिकडे आल्या..... अनघा ने त्यानं विचारलं आई हे बघा ह्या आर्विच्या आई आहेत ना ?? मनिषा ताईंनी अस ऐकताच त्यांचा चेहरा पडला .. 
                    अनघाने विचारलं काय झालेलं त्या अचानक अस का गेल्या?? मनिषा ताई चे डोळे अचानक पाणावले त्यांनी अनघा जवळ जात म्हंटल बघ चुकीचं नको समजू पण.....  काय झालं आई?? 
आर्विची आई आम्हला सोडून म्हंजे दुसऱ्या मुलांसोबत पळून गेलेली.... हे ऐकताच अनघाचे डोळेच मोठे झाले.... 
                     अनय आणि रीता च लग्नं झाला त्यांचं lovemarraige होतं... सगळा छान चालेल.... लग्नाला वर्ष झालं आणि रीता प्रेग्नंट राहिली... अनय ने सर्व डोहाळे पुरवले..... सगळ काही केलं तिच्या साठी तिला सर्व दिला हवा नको ते अनय रात्र रात्र ओव्हर टाईम करून तिला सर्व लाड पुरवायच तिला कशाचीच कमी नाही पडू ड्याचा.. तरीही ती कधिच खुश नसायची तिला नेहमीच भेटीत त्याहून जास्त लागायचं. delivery झाली त्या नंतर ही ती मुलीकडे बघायचं सोडून तिचं ek मित्र होता त्याच्या सोबत पार्टी ल वैगरे जायची ... कधीच तिने घराचा अनायच कीव आर्विचा विचार केला नाही अनेकदा घरी रात्री रात्री त्याच्यासोबत च असायची..... अनय ल खूप लाज वाटायची तिच्या मुळे आजूबाजूची लोकं ऑफिस मधली लोक ही अनय ल चिडवत असे ..... अनय ने अनेकदा तिला समजवायचा प्रयत्न केला ... पण ती समजण्या पलीकडे गेलेली.....
                     तिला कधीच अनय च प्रेम कीव कही नको होतो तिला फक्त पैसा आणि ऐशो आराम हवा होता.... अनय ची खूप स्वप्नं होतो त्याला स्वतःच बिझिनेस करायचं होतं. पण रीताच्या अशा वागण्यामुळे सगळीकडेच बेइज्जाती झाली.... मग ती नोकरी पण सुटली.... आर्वी लहान होती आणि त्यांचे बाबा ची तब्बेत ही बरी नसायची तेव्हा म्हणून मग मला त्यांच्या जवळच रहल्या लग्यच आणि ह्याला आर्विकडे ..... ह्या सर्व धक्क्याने अनय चे बाबा त्या रडायचा सुरू झालाय अनघा चाया डोळ्यात ही पाणी आले ..... तास तिने शांत केले मनीषा ताईंना. 
                   तरीही मनिषा ताईंना आज खूप बोलायचं होतं म्हणून त्या म्हणाल्या हे गेल्या नंतर मी पण खचले अनय ने कासबस करून आम्हला सवरल पण बाबा गेल्याचं दोष तो अजुनही स्वतःलाच देतो....   नंतर मी आर्वी ल सांभाळले अनय कुठे जॉब भेटो का ह्यासाठी २ ३ महिने फिरत होता.... शेवटी एक जॉब भेटला मग त्याने घर आणि जॉब करत कस बसा सावरला अनेकदा जॉब चंग करायचं विचार करतो पण नंतर लगेच आर्वीचा चेहरा समोर येतो म्हणून मग तो आहे तिकडेच थांबतो... 
                     हे सर्व ऐकून अनघा ल कसंतरीच झाला म्हंजे एवढी चांगलीं माणसं असताना कोणी कसा जाऊ शकत पैश्यच्या पाठी...