समर्थ आणि भुते - भाग 6 jayesh zomate द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समर्थ आणि भुते - भाग 6

समर्थकथा  ....         अकाळ-मृत्युरात्री         .                     उत्तरप्रदेश :             डिसेंबरचा  नुकताच  हिवाळा  सुरु झाला  होता..!  आकाशातले ढग खाली उतरल्यासारखे  दिवसभर  वातावरणात धुक साचलेलं असायच , घराच्या भिंती रात्रभर थंडीने कुडकुडत बसायच्या, रात्रभर शोषलेला थंडावा  दुपारच कडक उन्ह पडेपर्यंत तसंच राहत असे -  मग अश्यावेळेला    आपले लाडके समर्थ कृनाल , मठाच्या बाहेर असलेल्या बागेत - हिरवळीवर ठेवलेल्या गवतावरच्या लाकडी खुर्च्यांवर  बसत असत-           समर्थांच्या मठांच्या देशोभरात शेकडोने शाखा होत्या - महाराष्ट्रात मुंबई- पुणे अश्या मोठया शहरांत तर  वीस - वीस होत्या , तर एक नेरळ शहरातील माथेरान मध्ये सुद्धा होती , कधी निसर्ग पाहण्याची आवड झाली तर समर्थ तिथे जात असत -          बर असो -     गबलू - मेनका समर्थांचेच सहकारी, सद्या ते जरा  लोणावळ्याला  गेले आहेत - लोणावल्यात  कोणता तरी एक झपाटलेला  आयेशा विल्ला आहे तिथे म्हंणे जखीण दबा धरुन बसली आहे , तर तीला पकडूनच ते परत येणार आहेत .     ही दोघ सोबत असली की समर्थांना कधी एकट वाटत नाही, परंतू आता ती दोघ ईथे नाहीत म्हंणून   समर्थांनी  एकाकीपणा दूर करण्याकरीता   मला म्हंणजेच जयेश झोमटे मला कॉल करुन ईथे बोलावलं ,  माझ्याबद्दल सांगायचं तर मी   वयाने पन्नाशी उलटलेला मनुष्य, पेशाने मी एक लेखक आहे ,  भयकथा , प्रेमकथा , रहस्यकथा लिहित असतो - परंतू आवडती श्रेणी म्हंणाल तर भयकथाच जास्त लिहित असतो.-         सद्या वाचकाना सत्यभयकथा वाचण्याच -ऐकण्याच -  वेड लागलं आहे ,  म्हंणूनच आज मी समर्थांना एक  सत्यकथा ऐकवण्यास सांगणार आहे ..!           तस आम्ही बागेत बसलोच होतो, अद्याप सकाळचे आठ वाजलेले , हलकासा उन्हाचा मंद क्षीणसर प्रकाश वातावरणात पड़लेला,  बागेतल्या हिरव्या गवतावर बाष्प जमले होते - वर हवेत मंद धुक वाहत होते..  पक्ष्यांची  प्रसन्न किलबिल ऐकू येत होती..!    अर्धातासा अगोदरच आमचा चहा झाला होता , आता मी ठरवलं की समर्थांना एक भय अनुभव सांगावयास विनंती करतो ,  पन झालं वेगळंच ..-         बागेच्या आवारात एक उच्चभृ आसामी अचानकच आली, चेह-यावर तेच ते भितीदायक , चिंता - काळजीमिश्रित  भाव होते ,   त्यासहितच डोळे तांबरटलेले होते - नक्कीच रात्री झोप लागली नव्हती..          खरंतर असा कोणी उदास- भयबित चेह-याने कोणी समर्थांकडे आला तर समजून जाव ,  , काहीतरी अखंड, घातक धोक्याच्या चक्रव्युहात हा माणुस अडकून पडला आहे..-            तसंही रविवारी समर्थांनी फक्त अत्यंत , बिकट गंभीर प्रसंगात सापडलेल्यांसच , गेटमधून सुरक्षा रक्षकांना आत सोडण्यास  परवानगी दिली होती.           आणि हा समोर उभा आसामी म्हंणजे काही मिडल क्लास फेमिली मधून नव्हता , ह्यांना कोण ओळखत नाही- हे तर आकाश शहा ,  रिलायन्स-जियो  कंपनीच्या मालकीन नीता आंबानीचे चुलत भाऊ-       अश्या ह्या उच्चभृ,पैश्यावाल्या आसामिला समोर पाहताच मी बाजूची खुर्ची पूढे सरकावत , स्वत:हूनच  त्यांना बसा म्हंणून , अशी खून केली -       आकाशरावांचा चेहरा तसा ओढळा- ताणल्यासारखा झाला होता , त्यावर भीतीच्या सुरकूत्या होत्या ,  सकाळच्या  थंड  वातावरणातही संपुर्णत चेहरा घामाने भिजल होत -         मधून मधून ते कपाळावरचा,  मानेवरच घाम पुसत होते.-         समर्थांकडे मदत मागायला येणा-यांची परिस्थिती अशीच असायची ,समर्थांनी नेहमीप्रमाणे  प्रथम , आकाशरावांशी प्रेमळ स्वरात संवाद साधला - जरा ओळख  वैगेरे झाल्यानंतर , मग आकाशराव म्हंटले.        " मी फार मोठ्या संकटात सापडलो आहे समर्थ, कृपा करुन माझी मदत करा, तीन दिवस झाले तो - तो छकका रात्री माझ्या बंगल्यावर येतो - मोठ्याने ओरडतो , दरवाजा ठोकतो आणि पळून जातो- प्लीज माझी मदत करा समर्थ !" आकाश ह्यांनी शेवटच्या वाक्यावर हातच जोडले. त्यावर समर्थ म्हंणाले.        " आकाशराव, तुम्ही  असं करा मला सर्व काही अगदी सविस्तर सांगा - एकदा का तुम्ही सांगायला सुरुवात केली की तुमची भीती दूर होईल..- आणि सर्वकाही ऐकल्यावर मला मदत करायलाही सोप्प जाईल..!" समर्थ प्रेमळ स्वरात सावकाश म्हंटले.         बाजुला बसलेलो मी सर्वकाही गप्प पाहत होतो, समर्थांकडे ज्या कामासाठी आलो होतो तेच काम आता सुरु झालं होत,  भयअनुभव मिळत होत.   आकाशरावांनी काहीश्या हळुवार आवाजात बोलायला सुरुवात केली.-             आठवड्या अगोदरच काहीकामानिमित्त मी  पुणे सोडून ईथे उत्तरप्रदेश मध्ये  माझा एक बंगला आहे तिथ रहायला आलो आहे..!         अश्यातच  तीन दिवसां अगोदर  मी माझ ऑफिसच काम संपवून संध्याकाळी    घरी निघुन आलो....!  बायको मुलांना पुण्यालाच ठेवलं आहे  , म्हंणूनच   बंगल्यात मी  एकटाच असतो, थंडाव्याचा डिसेंबर महिना आहे- पण तीन दिवसां अगोदर अचानकच , अनपेक्षितपणेच - निसर्गाने रुप बदल्लं ,  चौ- दिशेना काळसर विषारी काजळीसारखा  जऊळ पसरला     वातावरणातल्या अंधाराला पाहता मनावर अशुभ,मळीन भावना हावी होऊ लागल्या....!            मध्येच त्या काळ्याभोर ढगांमध्ये ती चंदेरी रंगाची , वाकडी- तिकडी  विज कडाडत होती..      विज कडाडताच खाली पसरलेला अंधार - चार, पाच सेकंदाकरीता गायब होऊन ,सर्वकाही दिवस  असल्यासारख लक्खपणे  उजळून निघत होत... पाऊसाच्या सरींनी माती ओळी झाली होती,  आजुबाजुला असलेल्या  बंगल्याच्या टेरीसवरुन खाली पडणा-या नितोळ्यांच्या पाण्याने वळ्या तैयार झाल्या होत्या...    आकाशरावांच बंगला तस म्हंणायल दोन मजली  होत - बंगल्या मागे बाग होती  , बागेत पेरु, बोर, चिंचेच भलमोठ्ठी झाड  होती. ! आकाशात चमकणा- या चंदेरी लखलखत्या विजेचा प्रकाश  त्या सर्व झाडांवर  पडला जात, त्यांना भेसूरतेचा राक्षसी रुपडा  लाभत होता..!          चंदेरी प्रकाशात बागेतली ती  सर्व झाडे जणू मुर्द्यांची फौज उभी असल्यासारखी भासत होती..        पाऊसाळी वातावरणामुळे वातावरणात एक हळकासा गारठा   पडलेला     धो-धो करत  पाऊसा  कोसळत होता, बंगल्याच्या आवारात असलेली झाडे तुफान हवेच्या ताळावर अभद्र , अश्या वाकड्या तिक्ड्या हाळचाली करत नंगानाच करत थिरकत होते..         मध्येच ह्या निसर्गाच्या  रौद्र अवतारात ती भेसूर चंदेरी रंगाची गडगडाहाट आवाजातली विज कडाडत होती..     आकाशरावांचा तो दोन मजली  विजेच्या फेसाळत्या प्रकाशात भयंकरआसुरी लकाकीने ऊजळून निघत होत...          आकाशरावांना आज  साडे अकरा झाले तरी झोप  काही लागत नव्हती, म्हंणून किचनमधून त्यांनी स्वत:हासाठी कॉफी बनवून आणली..  हॉलमधल्या सोफ्यावरुन बसून कॉफीचे घोट घे लागले..                   रात्रीचे साडे अकरा वाजले होते- आज पाऊसाला न जाणे काय झालं होत - बंदूकीच्या नळीतून गोळी सुटावी तसा पाऊस वेगान कोसळत होता..   मध्येच काळ्या ढगांच्यात वेडी वाकडी नागीणीच्या कमनिय  बांध्यासारखी चंदेरी विज कडाडायची , आणी  बंगल्याआजूबाजुचा   सारा परिसर चंदेरी रंगाने चमकून उठायच... पाऊसाच्या एन हजेरीने लाईट ऑफिसने  -सर्व 360 एरीयाची पावर कट केली होती..!        आकाशरावांच्या बंगल्याबाजुला असलेल्या अवतीभवती सर्व    बंगल्याच्या लाईटी जाऊन अंधार झाला होता -         एकल्या आकाशरावांच्या बंगल्यावरच तेवढा ईनव्हर्टर असल्याने लाईट होती.       बाकी सर्वीकडे एक विळक्षण असा अंधार पड़ला होता , लोक आप-आपल्या बंगल्यात मेंनबत्ती-टॉर्च  पेटवून शांतपणे झोपली होती.. !      म्हंणतात अंधारात - काळ्या कप्टी मृत आत्म्यांचे खेळ सुरु होता , एका ठराविक वेळेत तो प्रहार सुरु होतो - ज्या प्रहारात  आत्मे दिसतात ?         आकाशराव हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते , सोफ्यापासून पुढे टिपॉय होता , त्याही पूढे भिंतीवर मोठी स्मार्ट टिव्ही होती - सोफ्याच्या दोन्ही बाजुला डावी-उजवीकडे दोन मोठ्या उघड्या झापांच्या खिडक्या होत्या ,  खिडकीभोवताली सफेद पडदे ओढले होते -         हवेच्या झोतांनी ते हलत होते , हळताच बाहेरचा अंधारात बुडालेला परिसर - समोरचा तो बंद गेटचा बंगला दिसत होता , मध्येच विज      कडाडली की अंधार बाजुला सारला जात परिसर रंग दिलेल्या  पेंटिंग प्रमाणे  उजळून निघे..        आकाशरावांनी  कॉफीचा शेवटचा घोट घेतला ,सोफ्यावरुन ऊठले - ऊठताच शरीर उजव्या बाजुला वळाल - आण  नजर समोर गेली, तेवढ्यावेळेतच विज चमकायचा यो ही जुळून  आला , सारा अंधारा भेसूर चंदेरी लकाकीने उजळुन निघाला,  प्रकाशात बंगल्याच्या वास्तु श्रापित भासल्या , आण पाच सेकंदाच्या त्या विजेच्या प्रकाशात आकाशरावांना एक अजुन दृष्य  दिसलं - समोरच्या बंगल्याच्या फाटकाचा कर्रर्र असा आवाज झाला ,  उघडलेल्या फाटकातून  कोणितरी काळी साडी, लाल ब्लाउज घातलेल बाहेर आल,  ते जे काही होत - जे कोनी होत मोठ मोठ्याने  श्वास घेत होते - छाती वर खाली वर खाली होत होती.. !         डोळ्यांची  मोठी झालेली  बुभळे  , अंधारात लक्ख - भगव्या विस्तवाच्या लाही प्रमाणे चमकत होती, त्या दोन्ही  डोळ्यांत लाल रंगाच्या  चमचमता ठिंणग्या होत्या - अंधारात डोळे  एक भयाचा रसरसता जहरी स्पर्श देत चकाकत होते..          फुललेल्या श्वावासांहित  ते जे  काही   फाटक उघडून बाहेर पडलं -   फाटकाचा गंजलेल्या बिजागरीसारखा छातीत कळ भरवणारा आवाज झाला -          आकाशरावांना ठावूक होत , आपल्या समोरच्या ह्या बंगल्यात कोणीही राहत नव्हत ,ती वास्तु रिकामी होती , मानवी स्पर्शविरहीत होती..          आकाशरावांची प्रश्णचिन्हींत नजर - खिडकीच्या हळत्या पडद्यातून बाहेर पाहत होती -          तो आकार एका स्त्रीचा असावा का ? कारण अंगात काळी साडी आण ब्लाऊज होता-  परंतू नुसत्या वेषांतरांनेच लिंग कस ओळखू  शकतो , कारण देहयष्टीने तो आकार पुरुषी वाटत होता - अगदी सहा फुट उंच तो आकार होता , चाल काहीशी तृतीयपंथियां सारखी होती..-         परंतू विचार करायला लावणारी गोष्ट अशी की ते जे काही होत - मानव होती , की आणखी काही होत ? कारण डोळे अंधारात चमकत होते ? होय ते दोन भगव्या रंगाने चमकणारे डोळे फार  आगळे-वेगळे होते , मनाला हे  काहीतरी विचीत्र,अकल्पनिय, क्रूर, अघोरी-आस्तित्व असल्याच जाणिव करुन देत होत.            एखादा निसर्गामार्फत  तैयार झालेला चमकणारा  किडा काजवा असता , तर साहजिकच ती गोष्ट  अगदी शुल्ल्क  होती - परंतू हे ? मांणसाचे डोळे कसे चमकू शकतात ? बुद्धी न पेलणार दृष्य, - अगदी अकल्पनिय!         आकाशरावांनी समर्थांकडे पाहिलं  - समर्थांचा चेहरा गंभीर होता.  आकाशराव पुढे सांगू लागले - त्यांचा आवाज जरा घोगरा होता.        "ती काळ्या साडीतली आकृती, तीची ती मोठी  उंची, आण ती मंद मंद हळुवारपणे चालण्याची पुरुषी चाल- आण कालोखात चमकणारे ते विलक्षण  अघोरी डोळे , आण त्यातल्या त्या चमकणा-या  लाल बाहुल्या, मला न जाणे का परंतू भीतीच वाटू लागली होती, मन ओरडून ओरडून सांगू लागलं हे काहीतरी भलतच , मनाच्या- बुद्धी, आकळण क्षमतेच्या सीमारेषा पलिकडच आहे -               ती स्त्रीची की आणखी काही आकृती - मंद गतीने , मेलेल्या मुर्द्यासारखी  चालत - माझ्या बंगल्याच्या गेटजवळ आली...               आण पुढे जे घडलं त्याने माझ्या होणा-या भीतीचा  उच्चांक त्यांच्या शरीराला पेलण्या पल्याड गेला ..         हे सांगताना आकाशरावांचा कमालीच, अस्वस्था - भयग्रस्तीत झाला होता , आठवड्या अगोदर घडलेली क्रिया, पण ती हकीकत सांगताना  आकाशरावांचे  भाव असे होते  , की ती घटना   आता ह्याक्षणाला ईथे घडत आहे.            परंतू कसा तरी  आकाशरावांनी भीतीवर नियंत्रण ठेवून , पुढे बोलायला  सुरुवात केली.    " समर्थ म्हंणायला तो घडलेला प्रकार तसा अजबच होता ,  मानवाकडे काही  अमानवीय शक्ति नाहीत , की समोर दोन फुटांवर असलेला फाटक नुस्ता नजरेने पाहून , त्याची झाप उघडावी- ? फाटकाजवळ  तो आकार उभा होता,  त्या विस्तवी धगधगत्या डोळ्यांनी  त्याने त्या फाटकाकडे पाहिलं , आण  मी आतून लावलेली कडी कुइं-कुइं आवाज करत आपो-आपो आप उघडली ,  कर्र्रर्र असा आवाज होत  तो फाटक उघड़ला ,          आकाशरावांच्या छातीतले ठोके धड़धड वाढत होते - तो काळ्या साडीतला  आकार फाटकातून चालत आत आला -          आकाशराव खिडकीपाशी उभे होते , पडद्याआड लपून हे सर्व घडणार अघोरी नाट्य पाहत होते , आता तो आकार अगदी  जवळ  होता , फक्त वीस पावळांवर , मध्येच विज कडाड़ताच आकाशरावांना त्या आकृतीचा तो पांढ़राफ़ेक प्रेतासारखा चेहरा चंदेरी रंगाने उजळुन दिसायचा -         खप्पड चेहरा -उभट रुंद कपाळ,  डोक्यावरचे केस  गडद तपकीरी रंगाचे होते , मोकळे सोडलेले , जे दोन्ही खांद्यावरुन खाली लोंबत होते - ओठ काळे पडलेले -  जणु रक्त सुकले आहे ,गालफाड़ आत गेलेले - त्यातील  हाड़ स्पष्ट दिसत होती.. - गळ्यात काहीबाही चांदीचे दाग - दागिने होते -  अंगावर काळी साडी होती , छातीवर लाल ब्लाउज होता - त्यातून बाहेर आलेले हात , पिठ चोळल्यासारखे पांढरे होते..-            हवेत एक कुजकट, सडल्याचा- घाणेरडा   वास घुमत होता , ते जे काही आल होत - त्याच्या सोबत हा दर्प आला असावा!?            ती निर्जीव , प्रेताड आकृती- बंगल्याच्या दरवाज्यापाशी आली- हळूचंच हात वर आला, हातात लाल-पिवळ्या,निल्य्व विविध रंगी बांगड्या होत्या - हात हालताच त्या खणखणल्या होत्या , तो बांगड्यांचा आवाज आकाशरावांना ऐकू गेला..- व पुढच्याक्षणाला दारावर थाप पडली..                " धाप्प..!" तो धापेचा आवाज सा-या बंगल्यात घुमला होता .       पण   आकाशराव काही दरवाजा उघडणार नव्हते , चोरी,लूटमार - लुबाडणा-यांची काय कमी आहे ? आपण दरवाजा उघडला आण ते साथ आठ जण आत घुसतील, आपला काटा काढ़तील ? सारा ऐवज लंपास करतील?          विचारांच्या मुळा दाहे दिशेना भिरकावत होत्या , वाटा चौदिशेना फिरत होत्या , वेगवेगळ्या विचारांनी डोक्यात थैमान घातले होते..-          पण  मन? मन सांगत होते , हे काही मानवी नाही ? त्या पलीकडचे आहे ,  चोर , दरोडेखोर, तरी एकदाच मृत्यु देतील-पण हे आसुरी थट्टेने खेळवत मारत राहिल, जो पर्यंत मन भरत नाही !       आकाशरावांना मनोमन हा विचार खात होता , की हे मानवी दिसत असली तरी ते नाहीच आहे , हा प्रकार मानवी जिवनातल्या घटनांमध्ये न बसणारा काहीसा विचीत्र - अकल्पनीय आहे.         आकाशराव फक्त पाहायचं काम करत होते. आणी दूसरी धाप पडली.         त्या शांततेत तो आवाज सा-या बंगल्याभर घुमला , घुमून आकाशरावांच्या कानांत घुसला , आवाजाने सर्व शरीर  शहारुन ऊठले ..-         विस्फारलेले डोळे-कपाळावरुन ओघळणारे घामाचे थेंब, भयाने पांढरा पडलेला चेहरा समोर पाहत होता.                तिसरी धाप देण्याकरीता त्या ध्यानाने हात वर केला , धाप  देणार तोच हात मध्येच थांबला...           आकाशराव एकटक खिडकीतून एकटक त्या ध्यानाकडेच पाहत होते , त्यांच्या मनाला वाटत होत की आपण सुखरुप आहोत - आपल्या आस्तित्वाची चाहूल त्याला  लागली नाही,  आकाशराव स्वत:ला सुरक्षित समजत होते -           तेवढ्यात त्या सुरक्षतेचा कवच फुटला - त्या ध्यानाने  गर्रकन, मानेचा हाड़ कट असा आवाज करत , मान वाकडी करुन  थेट जिथे आकाशराव उभे होते , त्या खिडकीच्या दिशेने पाहिलं -            आकाशरावांच्या     छातित एक असहनीय कळ उठली,  डोळे वटारले - तोंडाला लकवा मारला..एक हात छाताडावर आला जात , ते दोन पावळे मागे सरले..     (   म्हंणतात दरवाज्यात उभ असलेल ध्यान  म्हंणजे यमाच दूसर रुप.. )       दरवाज्यात उभा आकाशरावांचा मृत्यू त्यांच्याकडे पाहत होता , दोघांची नजरा -नजर होताच , ते आपले काळसर ओठांच्या पाकळ्या फाकवत हिडिस,कृर, ह्दयाच पाणी-पाणी करणार हास्य दाखवत हसलं -         ती चकचकती , विस्तवधारी- आसुरी -आनंदाने उजळून निघालेल्या डोळ्यांची  नजर अंधारात चकाकली, तो प्रेताड पांढरा चेहरा अंधारात ठळकपणे दिसला गेला..     उघड्या खिडकीतून  हलकीशी थंड हवा अंगाला झोंबून गेली, आणी तेवढ्यात आकाशात बिना आवाजाची विज कडाडली..      विजेचा चंदेरी रंगाचा फेसाळता प्रकाश पडला,  त्याच प्रकाशात त्यांना दरवाज्यात ती   एक तृतीतपंथी स्त्री   उभी दिसली..          हे असल आकलनात  न आलेल , कधीही  विचार न केलेल, पाहिलेल- दृष्य पाहता आकाशरावांचे भीतीने अवसान गळाले..-             त्यांच सर्व शरीर सैल पडल होत , अंगावरची कातडी   थंड झाली होती-  आताच आपल धडधड ह्दय बंद पडेल, आपण मरु ही भावना मनात आली, पुढच्या क्षणाला - त्या तृतीयपंथीने आपला उजवा हात जोरात वर आणला, तोंडावर उज्व्या हाताची बोट आपटत .         " आबाबाबाबाबाबाबाबाबा !" मैत जातावेळेस जस  बायका ओरड़तात तशी भयावह, अपशकूनी , त्या कातरवेळेले किंचाळू लागली..         हे असल भयंकर , अंगावर भीतीचा, भयाचा निवडुंग उगवणार दृष्य पाहून , आकाशरावांना पैनिक एटेक आला, डोक्यात एक ह्ळकीशी वेदना  झाली, आण  डोळ्यांसमोर  अंधारी आली,  व ते जागेवरच बेशुद्ध झाले..            आकाशरावांनी समर्थांकडे पाहिलं -  त्यांचा गला ही विलक्षण हकीकत सांगून सुकला होता  - समोर एक टेबल होत, त्यावर काचेचा पाण्याचा ग्लास होता .         समर्थांनी तो पाण्याचा ग्लास आकाशरावांना दिला, थरथरत्या हातांनी त्यांनी  ग्लास हाती घेतला , मग तोंडाला लावून जन्मभराचा  तहानला असल्याप्रमाणे  अधाश्यासारख पाणी पिऊन टाकलं - पाणी पिताच त्यांना जरा तरतरी आली..!         हकीकत अजुन बरीचशी बाकी  असावी, ग्लास टेबलावर ठेवून त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.         सकाळची वेळ हळूहळू सरत होती, बागेतल धुक जाऊन उन्हाचे कवडसे उष्णताऊर्जेला वातावरणात पसरवू लागले होते.         मी जयेश आणी समर्थ कृणाल आकाशरावांची ती विलक्षण हकीकत ऐकत होतो..       आकाशराव पूढे सांगू लागले.     "  दुस-या  दिवशी म्हंणजे  सकाळी  दरवाज्यावरची घंटी वाजली, जेवण बनवणारी मोलकरीण आज्जी आली होती..-बेलच्या आवाजाने जाग येऊन ऊठलो तर   मी खिडकीपाशी अस्तव्यस्त अवस्थेत पडलो होतो,  - जरा  वेळ मला काय झालं होत ? मी ईथे कसा पडलो? हे विचार करण्यातच गेले  -         मग आकाशरावांना काळरात्री घडलेली ती विलक्षण हकीकत ती घटना  आठवली-         परंतू मानवी मनाचे खेळ भ्रम , ह्या  श्रेणीत ती घटना बसवली गेली , दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात म्हंणे भीतीला थराच नसतो - तेच खर , काल घडलेला तो  वेगळा, अकल्पित प्रकार आकाशरावांनी , डोळ्यांचा फसवा खेळ झालं असाव - ठरवलं , नाहीतर ही भुतखेत आस्तित्वात थोडी असतात ? कामाच्या तापामुळे , किंवा अपू-या झोपेमुळे, तसंही काहीदिवस झाले कामामुळे चांगली झोप लागली नव्हती , म्हंणूनच काळरात्री डोळ्यांसमोर  काहीतरी  खोट , फसव, भ्रमधारी दृष्य  दिसलं असाव ?         आकाशरावांनी तो विचार तिथेच सोडला , त्यांना वाटलं होत , की हा खरच आपला भ्रम आहे ,.तैयारी- नाश्ता वैगेरे करुन ते ऑफिसला निघुन गेले..           संध्याकाळी सात पर्यंत पुन्हा बंगल्यावर आलो ,  मोलकरीण  आज्जी जेवण बनवून निघुन गेली होती..        फ्रेश वैगेरे झाल्यानंतर  - जेवण केलं , व पावणे अकरा दरम्यान झोपायला निघुन गेलो-   अर्ध्या तासात मस्त चांगली झोप लागली पाहिजे , पावणे एक दरम्यान मला जाग आली, हॉलमध्ये दरवाज्यावर धापा पडत होत्या -           त्या धापांनी काळचा प्रसंग जसाच्या तसा डोळ्यांसमोर येऊन गेला , आणि सर्व अंग शहारुन ऊठलं -            रात्रीची मध्यरात्रीची वेळ होती , चार दिशेना विलक्षण  अघोरी , मंतरलेला सन्नाटा शुकशुकाट पसरलेला -  आण ह्या अश्या शांत वातावरणात बाहेरुन  त्या धापा ऐकू येत होत्या..            " धप,धप!"     आकाशरावांनी हे भुत-वैगेरे काही नसतं , मनाला समजूत घातली- व  हॉलमध्ये आलो-   दरवाज्याला एक.मैजिक आय होल होत , ज्या होलमधून बाहेर कोणि असेल तर - ते नजरेस पडे..         आकाशरावांनी एक डोळा बंद केला, मान पुढे झुकवत दूसरा डोळा  त्या - आय या होलला लावत बाहेर पाहिलं -          नजरेला बाहेरचा एरीया  दिसला  - बंगल्याचा बंद गेट, त्या गेटजवळून  सरणार सफेद धुक, आणि तो दूरचा अंधारात बुडालेला बंगला , परंतू विचार करायला लावणारी गोष्ट अशी जर समोर कोणीच नाही , मग दरवाजा ठोठवला कोणी ..           आकाशराव विचार करतच होते, आण तोच पुन्हा दरवाज ठोठावला- धप ,धप- आताही नजरेला कोणिही दिसत नव्हत - मग दरवाज्यावर धापा कोण देत होत.       आकाशरावांच आता मात्र भीतीने ससा झाला , हे भ्रम नाही- हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे ,  दरवाज्यापल्याड काहीतरी समजण्या पलिकडच उभ आहे , अंधाराच्या सीमेत दडून , कोणितरी आहे  - ज्याबद्दल आपण अजाण आहोत , घडणारा प्रकार काहीतरी भुताटकी आहे..-          आकाशरावांच्या नजरेसमोर काल दिसलेल्या त्या स्त्रीचा चेहरा आला , आण सर्व शरीर थरथरु लागल-          आणि अचानक बाहेरुन तो किन्नरी ताळस्वरातला,भसाडा,घोग-या आवाजातला स्वर ऐकू आला..         " एय चिकण्या- एय, चिकण्या  दरवाज्या खोल रे  ये एय चिकण्या हिहिहिहिह!" त्या आलेल्या आवाजाने        झटकन आकाशराव दरवाज्यासमोरुन बाजुला झाले ,  बाहेर जे काही अदृश्य उभ आहे - त्याला हा साधारणसा पोकळ बांबूचा , फर्निचरचा दरवाजा रोखू शकेल का ? आताच ते  हा दरवाजा तोडून आत येईल , पूढे जे काही घडेल विचार करुणच अंगावर काटा आला..- आकाशराव जिव मुठीत घेऊन  बैडरुम मध्ये आले , अंगावर पांघरुण घेऊन- बैडखाली लपून बसले ,  बाहेरुन त्या दरवाज्यावरच्या धापा ऐकू येतच होत्या ,           प्रत्येक.धापेसारखी  छातीतले ठोके  अतीतीव्र वेगान धडकत होते.         मग  घड्याळात तीन वाजले तेव्हा कुठे    जाऊन त्या धापांचे आवाज थांबले ,बंद झाले ,  एकदम शुकशुकाट पसरला..!  आकाशरावांची हकीकत सांगून झाली होती , त्यांनी समर्थांकडे पाहिलं  - व पुढे म्हंटले.                    "  समर्थ ह्या घडलेल्या प्रकाराने माझी झोप उडाली , मी रात्रभर जागाच होतो , मग जस उजाडलं गेलं - लागलीच हात - तोंड धुवून  तुमच्याकडे आलो आहे..-  कृपा करुन माझी मदत करा !"  आकाशरावांनी समर्थांना हात जोडून विनंती केली.         त्यावर समर्थांनी फक्त होकारार्थी मान हलवली..!          "  आकाशराव चिंता करु नका , मी आज रात्री तुमच्या घरी येतो ..- आता तुम्ही निवांत घरी जा ! आराम करा , ठिक साडे नऊ वाजता आम्ही तुमच्या घरी येऊ!"  समर्थांनी आकाशरावांना  आश्वासन दिलं -           समर्थांना हात जोडून आकाशराव निघुन गेले.         " समर्थ आपण म्हंणजे नक्की कोण?:"मी समर्थांना विचारलं - आता मी काही समर्थांसारखा दैवी पुरुष थोडी होतो, जो त्यांना मदत करु शकेल-          माझ्या वाक्यावर समर्थ मंद स्मित करत ह्सले -   व म्हंणाले.         " अरे जय, तुला सत्यकथा हवी आहे ना , त्याकरीताच आला होतास ना माझ्याकडे  - मग आता ईंटरवल पर्यंत आलाच आहेस तर एंड़िंग  पाहून ही जा !"  समर्थांच हे बोलण तस आश्चर्यचकित करणा-यांमधलच होत , कारण मी एका शब्दानेही त्यांना सत्य अनुभवाबद्दल सांगितलं नव्हतं , परंतू  समर्थ तर समर्थ होते - त्यांना सर्व कळत -    असो आता पूढे-  दुपार - संध्याकाळ उलटून गेली, साडे नऊ वाजता आम्ही आकाशरावांच्या बंगल्यावर पोहचलो.-           बंगला तसा ऐस - पेस  दोन मजली होता , आजुबाजुला सुद्धा बंगले होते -परंतू त्यांच्याशी काहीही घेणे देणे नव्हते ,  ,कारण घुमसत्या  वाईट शक्तिने किड लागलेल्या  त्या बंगल्यातून रात्र होताच ते जे काही बाहेर पडत होत -  आकाशरावांच्या बंगल्यावर येऊन दार ठोठावत होत ,  त्याचा त्रास फक्त आकाशरावांच्या बंगल्याला , आनी मालक म्हणुंन आकाशरावांना होता -     प्रथम समर्थांनी आकाशरावांचा बंगला पायाखाली घातला , कोपरा न कोपरा पाहिला - समर्थांच्या लक्षात आलं की ईथे देवघर नाही, समर्थांनी  ह्याबद्दल   आकाशरावांना विचारलं ही , बंगल्यात देवघर का नाही, त्यावर आकाशरावांनी ते नास्तिक असल्याच सांगितलं.  बंगला नेहाळून झाल्यावर हॉलमध्ये समर्थांनी जमिनीवर एक  चटई अंथरली-   डोळे मिटून शांत ध्यानास्थ बसले.. मी म्हंणजेच जयेश सर्वकाही पाहत होतो , समर्थ 9:30 वाजता ध्यानास्थ बसले , ते त्यांनी उघडले ते थेट 11;45 वाजता..         त्यांच्या चेह-यावर आता एक तेज झलकत होता  , चेहरा अगदी ताजातवाना, एका अनामिक, अक्ल्प्नीय शक्तिने ऊजलूण  निघाल्यासारखा, भारल्यासारखा वाटत होता-   नक्कीच त्या ध्यानावस्थेत केलेल्या प्रार्थनेतल्या, उपासनेतल्या त्या दैवी मंत्रांचा हा  चमत्कारीक  बदल, प्रभाव  होता -      ज्या मंत्रांच्या शक्तिचा जागृत अंश ह्या बदललेल्या रुपाने दिसून येत होता.-           पावणे बाराची वेळ झाली होती - वातावरणात हलकासा गारठा पसरला होता , व्हू-व्हू करत वारा वाहत जात होता , रातकीटकांची किरकिर संथ गतीने वाजत होता - कोठेतरी घुबड घुत्कारत होती , तरीसुद्धा- आणि अचानकच  वातावरणात  कसलातरी बदल जाणवू लागला..             काहीतरी भयमय प्रकार घडल जात होत - एन अचानक सर्व आवाज थांबले , हवा थांबली- सन्नाटा, शांती पसरली..!         जणु काहीतरी , कोणीतरी- ह्या निसर्गाच्या नियमांविरुद्ध  त्या तिमीरातून ह्या सृष्टीत पाय ठेवलं होत -          समर्थांनी उघड्या खिडकीतून  बाहेर पाहिलं   काळोखात  तो समोरचा बंगला एक वेगळच रुप धारण करुन बसल्यासारख वाटत होत..-जस एक हिंस्त्र श्वापद , गुहेतल्या अंधारात सावजाची वाट पाहत दबा धरुन बसत..! नक्कीच त्या बंगल्यातली ती आसुरी चेतना रात होताच आता जागी झाली जात, बाहेर पडण्याच्या तैयारीत होती.         खिडकीसमोर समर्थ उभे होते , त्यांच्याबाजुलाच घाबरलेले आकाशराव उभे होते , तर जराबाजुला सर्वात मागे मी लेखक जयेश उभा होतो-          सत्यकथा लिहायच्या भानगडीत मी सुद्धा स्वत:च जिव धोक्यात घातलंच होत - परंतू भिण्याच कारणच नव्हत  , आमच्या पाठीशी , त्या शक्ति लढा द्यायला समर्थांसारखी पौलादी कवचासारखी समर्थ शक्ति उभी होती - मग घाबरायचं कारणच काय?         परंतू मनाला कितीही धीर दिला - तरी विचार सैरभैर धावताच , आता ही विलक्षण वेळच अशी - की विचार मनात कसे येतात पहा ? समर्थ हरले तर ? त्या श्क्तीने समर्थांना अपाय केला तर ? , आण आमच्या मागे लागली तर ?  आमचा हकनाक बळी जाईल- नाही का?  असो पुढे !         बारा वाजेच्या सुमारास तो विलक्षण थरारक प्रकार घडायला सुरुवात झाली-  समोरचा तो बंगला - त्या बंगल्या फाटकाचा कर्रर्र असा छातीत धड़की भरवणारा आवाज झाला , फुफसात श्वास थांबले - कानसुळ्या गरम झाल्या, डोळे ते द्रुष्य पाहून विस्फारले गेले -          आपो-आपो फाटक उघडलं , फाटकातून बेभान - हवेवर धुळ उडावी तसा धुका बाहेर पडू लागला - आण त्या धुक्यातून ती आकृती  बाहेर आली..- तीच ती          खप्पड चेहरा -उभट रुंद कपाळ,  डोक्यावरचे केस  गडद तपकीरी रंगाचे होते , मोकळे सोडलेले , जे दोन्ही खांद्यावरुन खाली लोंबत होते - ओठ काळे पडलेले -  जणु रक्त सुकले आहे ,गालफाड़ आत गेलेले - त्यातील  हाड़ स्पष्ट दिसत होती.. - गळ्यात काहीबाही चांदीचे दाग - दागिने होते -  अंगावर काळी साडी होती , छातीवर लाल ब्लाउज होता - त्यातून बाहेर आलेले हात , पिठ चोळल्यासारखे पांढरे होते..-           हळू हळू प्रेतचाल चालत तो आकार  आकाशरावांच्या बंगल्याच्या फाटकापाशी आला, ते फाटक जणु त्या शक्तीच हेरच असाव - ते आपोआप उघडलं , आण ती भारलेली शक्ति  बंगल्याच्या आत  आली..            दरवाज्यात आली आण धापा देऊ लागली.-         " धप्प,धप्प,धप्प!"   हे असल काळीज धडधडायचं थांबवण्याच द्रुष्य पाहून माझा बिपी लो झाला होता - आजपर्यंत मी कितीतरी कथा लिहिल्या असतील, भुताखेतांची वर्णन केली असती, पण सत्यात आणि कल्पनेत पाहण जमीन आसमानाच फरक हेच खर ,  माझी भीतीने फाटून हातात आली, पाय लटालटा काफू लागले..-          बाजुला उभे आकाशराव त्यांची ही माझ्यासारखी अवस्था होती, पन जरा जास्तच- समर्थ मात्र बिनधास्त न भीता उभे होते.- न जाणे  कसल्या जिगराचा माणुस होता ?        " आकाशराव , आज  तुम्हाला दरवाजा उघडायचं  आहे , कसलाही टेंशन घेऊ नका , मी आहे - सर्वकाही पाहून घेईन - तुमच्या केसालाही धक्का लागून देणार नाही- हा शब्द आहे माझा. आणि हो जस दरवाजा उघडाल तसे  एक वाक्य म्हंणा  , यावे यावे आगमानास्थे  फेराहिंत !"  समर्थ म्हंटले.        भीतच , आकाशराव दरवाज्यापाशी पोहचले -   हात कडी उघडायला थरथर होते - छातीतले ठोके बंदुकीच्या गोळीतून धाड धाड करत गोळ्या बाहेर पडाव्या तसा ठोके वाजत होते -           शेवटी  एकदाचा आकाशरावांनी दरवाजा उघडला .. - डोळे बंद ठेवतच ते शब्द  उच्चारले आण जसा शब्द उच्चारला , आकाशरावांच्या सर्व शरीराला  एक धकका बसला , बाहुलीसारखे ते जागेवरुन हवेत मागे दूर  भिरकावले , मागच्या भिंतीवर जाऊन आदळले ,  खाली कोसळले..-    बेशुद्ध झाले..-          " गुर्र्र - गुर्र  !" असा आवाज करत ते ध्यान हॉलमध्ये  आल -          हॉलमधल्या लाईट सुरु होत्या -  आण प्रकाशात आकृतीच रुप स्पष्ट दिसत होत ,  ती एक तृतीयपंथी स्त्री होती ,           अंगावर काळी साडी- लाल ब्लाऊज, पांढराफेक चेहरा - विस्तवासारखे चमकणारे दोन डोळे...          उंचीने ते सहा फुट उंच होत -  पाहताच मनात धडकी भरत होती.         घश्यातून  गुर्रर्र असा हिंस्त्र आवाज काढत    ते ध्यान, अभद्र- पापी आत्मा बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या - आकाशरावांच्या दिशेने निघालं..         समर्थ शांत चेह-याने समोर पाहत होते -    मी मात्र  विस्फारलेल्या डोळ्यांनी ते ध्यान पाहत होतो, आजतागायत काल्पनिक कथा लिहिल्या , भुतांची वर्णन लिहिली, पण भीती वाटली नाही- पण आज सपशेल पाहत असतांना माझी भयाने  तडफड़ होत होती..     तो छक्का आकाशरावांपाशी पोहचला ,   दोन्ही गुढघे वाकवत पायांवर खाली वाकला.-                   बसला मग त्याने दोन्ही  हाताच्या टाळ्या वाजवल्या.. !         " दे रे आत्मा दे  रे तेरी ..  !"  घोग-या आवाजात  ते ध्यान उच्चारलं !            तोच ईतकवेळ शांत उभे समर्थ एकदमच त्यांनी विलक्षण पवित्रा धारण केला ..- ते विजेच्या गडगडाटी आवाजात ओरडत म्हंटले..         " थांब  त्यांच्या अंगालाही हात लावू नकोस , अन्यथा तुझी राख रांगोळी करीन.. !"  ईतकवेळ  त्या ध्यानाला समर्थांची उपस्थिती        जाणवली नव्हती का ? की त्याने समर्थांना पाहताच त्याच्या चेह-यावरचे क्रूर भाव भीतीत बदलले...        " तू..तू.. कोण रे  !"  ते ध्यान  किन्नरी आवाजात उर्मट स्वरात म्हंटलं .        त्यावर समर्थ दोन पावळ चालत पूढे आले , धारधार नजरेने  त्या ध्यानाच्या डोळ्यांत डोळे घालुन पाहत म्हंनाले.         " मी समर्थ , समर्थ कृनाल!" समर्थांच नाव ऐकून , त्या ध्यानाचा चेहरा भीतीने पिळवटुन निघाला..   ते घाबरलं ? होय खासच ते घाबरलं होत.               "   काय समर्थ , तू तू कू आये रे यहा हैं , मेरा एरीया हैं  यह- चल.., जा..!" तो छक्का - ते ध्यान हे वाक्य बोलत असतांनाच दोन पावळ मागे मागे जाऊ लागला.-          मध्येच त्याने उजवा हात वेगान वर केला-  त्या हातातून निळसर रंगाची  चमचमती शक्तिलहरी बाहेर पडली, समर्थांच्या रोखाण आली, आण मध्येच समर्थांपासून एक फुटांवर येताच ती समर्थांवर आदळणार तोच हवेत  भगव्या रंगाचा उभट भिंतीसारखा चार इंच रुंद ,  पाच फुट उंच असा कवच निर्माण झाला..  त्या कवचावर तो आघात आदळून हवेत नाहीसा झाला..          समर्थांनी फक्त नाही नाही करत मान हळवली..!         " मी तुला मुक्त  करु शकतो..!ह्या फे-यातून तुझं चक्र मोडुन तुला मोक्ष देऊ शकतो, बोल हवी आहे तुला सुटला.. ..  !" समर्थ  शांत स्वरात म्हंणाले.         " नाय!" तो छकका एकदम समर्थांच्या अंगावर येत ओरडला.          परंतू मध्येच त्याची पाऊळे थांबली - थबकली..           " मला मोक्ष नको, मी ईथेच ठिक आहे - जिवंत असतांना मी खुप पाप केलेत ,  मला तो तुमचा विधाता - नरकात धाडेल , सडत पडेल मी तिथे , मला मुक्ती नकोय - !"  ते ध्यान म्हंटलं.         "  पापाची शिक्षा कधी ना केव्हा मिळायलाच हवी  ना ? हेच तर सृष्टीचे नियम  आहेत , ही जागा - हे जग तुझं नाही, हे जग मानवाच आहे ईथे तु वास्तव्यास राहणे चुकीचे आहे ! माझं ऐक मोक्ष घे..- ही पिशाच्छ योनी सोड  - ! " समर्थ समजावणीच्या स्वरात म्हंटले.         " नाही !"  ते ध्यान चवताळल -  एकदमच खेकसल- पुन्हा त्याने उजवा हात वर आणत अमानवीय शक्तिच्या त्या विद्युत सर्पासारख्या चमचमत्या  शलाखा समर्थांवर आघात करायला भिरकावल्या , परंतू समर्थांच्या देहा भोवताली- दैवी शक्तिशाली कवच निर्माण होत होत..- ज्यावर तो आघात लादला जात - फुटत ,व्यर्थ जात होता..          समर्थांवर आपला वार विफळ होतोय हे पाहून ते ध्यान गर्रकन मागे वळाल - समोर उघडा दरवाजा होता त्या दरवाज्यातून ते बाहेर पडणार तोच  उघडा दरवाजा जोरात आतल्याबाजुने आला जात , धाड आवाज करत बंद झाला..         व तो साधारणसा लाकडी दरवाजा , त्या दरवाज्यावर एक हिरव्या रंगाची चमचमती जाळीरुप एक कवच पसरल -          त्या ध्यानाने आपल्या चकचकत्या ज्वलंत घृणा,क्रोध, तिरस्कार ह्या घुमसत्या नजरेने समर्थांकडे पाहिलं.        " मला ठावूक होत , तू पळण्याचा प्रयत्न करशील, म्हंणूनच मी पुर्णत बंगलाच मंत्रित केला आहे ,  मोक्ष तर तुला नकोच आहे , मग कैदच स्विकार - " समर्थांनी आपला  उजव्या हाताचा तळवा सरळ  धरला..               " तुझी कैदेची वेळ झाली, तृतीयंत पिशाच्छ घनआत्मशोषक प्रगटम !"  समर्थांच्या उजव्या हातावर निळ्या रंगाचा प्रकाशसाठा निर्माण झाला , त्या निळसर प्रकाशात लहान-लहान चमकीली निलि,हिरवी धुळीकण फिरू लागली- त्या धुळीकणांनी एका घनाकार क्यूबचा आकार धारण केला - व त्या हातात ते घनआत्मशोषक यंत्र तैयार झालं ...            " नाही नाही  कृपया मला सोड समर्था - मी , मी ईथून निघुन जाईन कोणालाही त्रास देणार नाही!" ते ध्यान प्रेमळ विनवणी करत म्हंणालं..         परंतू समर्थांनी ह्या अश्या न जाणे कित्येक विनवण्या ऐकल्या होत्या ,  परंतू शब्दाला कोणिही जगल नव्हत - हे सर्व खोटे बोल असायचे सुटकेचा एक निष्फळ प्रयत्न असायचा.. -           शेवटी समर्थांकडून कसलच उत्तर आल नाही हे पाहता - त्या पिशाच्छाने समर्थांना अक्षरक्ष घाण,खालच्या पातळीवर शिव्या दिल्या..-   हाताचे खुरासारखे पंजे पुढे करत ते समर्थाना माराला पुढे धावल परंतू मध्येच त्या अभद्र ध्यानाच्या देहाच चमचमत्या धुळीकणांत रुपांतर झालं  - व ती निळी धुळीकण  हवेत नागमोडी वळणे घेत- घनआत्मशोषकात येऊन सामावली.            समर्थांनी त्या ध्यानाला कैद केलं होत. - समर्थांचा  विजय झाला होता.      बेशुद्ध झालेले आकाशराव रात्रभर बेशुद्धच होते ,  दुस-या सकाळी  त्यांना जाग आली- तेव्हा त्यांनी समर्थांना विचारलं की ते काय होतं ..         माझ्यामागे का लागलं होत. त्यावर समर्थांनी सांगितलं .         " काही काही गोष्टी  अश्या असतात ज्या कोणालाही न  सांगितलेल्याच ब -या , कारण त्यात तुमच्ंही भल आण माझंही , परंतू  थोडक्यात एवढच सांगेन ती एक तृतीयपंथीयाची  फे-यात अडकलेली दृष्ट आत्मा होती ,  जो कोणि तिचा फेरा पाही त्याला ती मारत असे -  जर  तुम्ही वेळीच माझ्याकडे आला नसतात तर तुमची ही तीच गत होणार होती , परंतू ईश्वर कृपेने तुम्ही वाचलात आकाशराव,  !"  आकाशरावांच्या डोक्यावरच ओझ हळक करुन -          मी व  समर्थ दोघेही त्यांच्या मठात आलो-             आता पुन्हा सकाळचे आठ वाजले होते , काळच्यासारखच थंड  वातावरण होत -  फक्त फरक ईतकाच की आता डोळ्यांवर फार झोप होती..-           " समर्थ मी तुमच्या विश्वासातला माणुस  आहे , त्यासहितच मी एक भयकथा लेखक आहे , ह्या अश्या विचीत्र प्रकारांची मला ही थोडी बहुत माहीती आहेच , तर तुम्ही हा आकाशरावांच्या बंगल्यावरचा हा प्रकार नक्की काय आहे ते मला सांगू शकता का ? तसंही तो माझा व्यवसाय आहे..!" मी समर्थांना विनंती केली.         त्यावर ते मान हळवत - डोळ्यांच्या पापण्या मिटवत मंद स्मित हास्य करत हसले व सांगू लागले.          " मी ध्यानासाथ  बसलो तेव्हा मी त्या बंगल्याचा पुर्व ईतिहास पाहिला - व  मला ही हकीकत कळाली,  की त्या बंगल्यात एक अल्का नामक तृतीयपंथी राहात असे , ह्या अल्काने काळ्या जादूच्या सिद्धी प्राप्त करण्याकरीता नऊ मुलांचे  बळी दिले होते -दहावा बळी दिल्यावर तिला शक्ति प्राप्त होणार होत्या , परंतू त्यारात्री तिच्या हातून काहीतरी चुक झाली, भ्रष्ट देवतेचा कोप बसला जात - तिला त्या भ्रष्ट, तामसी देवतेने अकाळ-म्रित्युरात्रच्या फे-यात अडकवली, व तिच्या आत्म्याला फेराचक्रात फिरवायला सुरुवात केली, व जो कोणी तो फेरा पाहिल - त्याला ती अल्का मारुण टाकत असे , तस ह्या फे -यात अडकलेले आत्मे फार कमजोर असतात म्हंणूनच  मी ती आत्मा पळून जायला नको म्हंणून आकाशरावांच्या बंगला ती येताच मंत्रांनी बांधून ठेवला व तिला पकडलं  !" समर्थ एवढ बोलून थांबले.. -         जरावेळाने एक नोकर  कॉफीच ट्रे- घेऊल आला , व कॉफी घेऊन        मग समर्थांकडून ह्या घडलेल्या घटनेवर एक सत्यकथा लिहिण्याची परवानगी घेतली, जी समर्थांनी स्वखूशीने दिली- व मी सुद्धा  आपल्या लाड़क्या समर्थांचा निरोप घेऊन घरी निघुन आलो...         परंतू भयावह एक सत्यअनुभवाच भाग होऊन..   

    समाप्त :                                                                                                                                                                                                                                                                                                                                                .