माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 6 Pradnya Chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 6

❤️ First Ride ❤️

मीरा अमर आणि अनुरागला बाय करते आणि गाडीत बसून ती घरी जायला निघते.. 

गाडी तिथून थोड्या अंतरावर गेली असेल तोच अचानक तिची गाडी पंक्चर होते... ड्रायव्हर गाडी रस्त्याच्या बाजूला घेतो...

मीरा : काय झालं ड्रायव्हर काका ???

ड्रायव्हर: गाडी बंद झाली का झाल कळेना ....

मीरा : आता काय करायचं???

ड्रायव्हर : इथे कुठे जवळ गॅरेज   आहे का ते पाहतो ...तुम्ही इथेच थांबा... 

त्यांनी गाडी बघितली पण त्यांना काही समजले नाही...

मीरा गाडीपाशी उभी राहते....  त्यावेळी अमर आणि अनुराग सुद्धा गाडीवरून जात असतात ....
त्यांना मीरा रस्त्याकडेला गाडी जवळ उभी असलेली दिसते ....

अमर : काय झाल मीरा ??? 

मीरा : माझी कार अचानक बंद पडली ....

ते दोघे ही तिथेच रत्याकडेला गाडी थांबवून तिच्या जवळ उभे राहिले ....तोच ड्रायव्हर काका आले , सोबत एक माणूस होता .... त्यांनी सांगितले हा गॅरेज वाला आहे ...  तो माणूस म्हणाला ,आम्ही गाडी गॅरेज मध्ये घेऊन झाले ... इथ दुरुस्त होणार नाही... 


मीरा :आता मी कशी जाऊ घरी ???

अमर : अनु तू मीराला घरी सोडशिल का मला हॉस्पिटल मध्ये जायचं आहे आज माझी night आहे... मला घरी जाऊन जरा आवरून हॉस्पिटल मध्ये जावं लागेल....

अनुराग : ओके... काही हरकत नाही मी सोडतो हिला ...
पण मीरा तुला चालेल ना ???

मीरा काय उत्तर देणार तिलाच काही कळत नव्हतं...
पण हृदय जोरात धडधड करत होत ....

ड्रायव्हर काका : मीरा , तू जा यांच्या सोबत घरी ...मी तुझ सामान आणि गाडी रात्री घेऊन येईन ... आता कुठे रिक्षाने जातेस ....

मीरा : ठीक आहे मी जाते अनुराग सोबत ...

ती त्याच्या गाडीवर बसते , एकदमचं कसतरी फिल होत तिला ... मन जोरजोरात धडधडू लागले,  काही उमगेना... त्याने गाडी स्टार्ट केली , तो एकदम सुसाट गाडी चालवत होता... ती मागच्या बाजूच्या हँडेल ला धरून बसली होती... तिला भीती वाटू लागली आता पडतोय का आपण त्यामुळे तिने तिचा एक हात त्याच्या खांद्यावर ठेवते... इतक्यात त्याने गाडी थांबवली ....


मीरा : काय झालं गाडी का थांबवली ???

अनुराग : या आधी कधी मी तुझ्या घरी आलोय का ???

मीरा : नाही .... म्हणजे तुम्ही आल्याचं तस मला काही आठवतं नाही ...
(ती निरागसपणे म्हणाली )

अनुराग : मी तुझ्या घरी कधी आलोच नाहीये ... मग मला तुझ्या घरचा पत्ता कसा माहीत असणार .... सांग पत्ता म्हणजे मी तुला ड्रॉप करतो ....

मीरा : हा ते माझ्या लक्षातच आले नाही..  सॉरी 🥺
मी नंदनवन सोसायटी मध्ये राहते ... तुम्हाला माहित आहे ना ती कुठे आहे ??? की संपूर्ण पत्ता सांगू ...

अनुराग : काही गरज नाही मला माहित आहे, आमचे एक रीलेटिव तिथे राहतात ....

मीरा : ओके..


ती त्याला घट्ट बिलगून बसली होती.... अचानक त्याने  गाडी थांबवली...  नंदनवन सोसायटी आली , तशी ती भानावर आली ...

मीरा : कृष्णकुंज आमच्या घराचं नाव ..... इथून सरळ थोड पुढे आहे घर....

अनुराग : ओके...

तो गाडी कृष्णकुंज पाशी थांबवतो... मीरा बाइक वरून उतरते....

मीरा : चला ना आत , चहा घ्या आणि मग जा तुमच्या मुळे आज मी घरी वेळेत पोहचले नाहीतर खूप वेळ झाला असता....


अनुराग : नाही नाही .... नंतर केव्हा तरी येतो... 

तो गाडी स्टार्ट करून जात असतो .... पण पुन्हा काही तरी मनात येत आणि तो मागे येतो....

"मीरा माझं नाव अनुराग आहे तू मला अनुराग म्हण किंवा अनुराग दादा .... हे असं अहो जाओ करू नको ....

मीरा : ओके ..,... 

"तो जायला निघतो,ती त्याला बाय करून जात असतो...

मीरा : bye bye... हळू गाडी चालव , नीट जा...

(असं म्हणत ती आत जाते.... तिच्या रूमच्या दिशेने निघून जातो...)


आज तिचं हृदय जरा जास्त धडधड करत होत.... आयुष्यात तिने असं कधी वाटलं नव्हत.... पण हे असं का होतं आहे हे काही तिला समजत नव्हत... तो समोर असला कीचं तिच्या शरीरात काही तरी व्हायचं पण असं का ??? याचा अर्थ काय ??? त्याने जेव्हा तिला तू माझ्या बहिणी सारखी आहेस अस म्हटलं तेव्हा ते तिला अजिबात आवडल नव्हत.... पण का ???? या सर्वाचा  विचार करत होती , प्रश्न खूप पडले होते उत्तर मात्र नव्हतं....


मृगजळ : - रात्री आठ वाजता 

काय तू दादा शी बोलून सर्व क्लिअर केलेस म्हणजे आपल्या बद्दल पण सांगितले काय....

प्रीतम तिला विचारत होता 


आपल्या बद्दल काय ??? आपल्यात काही आहे.... मला तरी काही वाटत नाही... आपण तर बहीण भाऊ आहोत .... हो ना.....

प्रीतम : हे काय बोलतेस तू ??? अक्कल आहे का तुला ???

तो रागातचं बोलतो 

ऐश्वर्या : मला अक्कल नाही.... खरं तर तुला अक्कल नाही ये .... प्रेम आहे ना माझ्या वर मग तुला जरा ही काही वाटतं नाही का काही... सकाळी आत्या म्हणाली ऐश्वर्याला अनुराग देव दर्शन करायच आहे तुझ्या सोबत घेऊन जा.... त्यावेळी कुठे होतास तू सांग ना .... 
मला तर हे ही वाटतं की तुझ माझ्यावर प्रेमच नाही....
जर तुझ प्रेम असत ना तर तू तुझा काहीतरी स्टँड घेतला असतास... पण तू काही च रिऍक्ट झाला नाहीस...

प्रीतम : अग माझं ही तुझ्यावर खूप प्रेम आहे ग... तुला माहीत आहे ना आईला तू दादाची बायको म्हणून या घरात हवी आहेस ... ती जेव्हा तुझ नाव दादा शी जोडते तेव्हा मला ही त्रास होतो.... पण मी तो व्यक्त करत नाही ... Trust me jaan ❤️ I love you from my bottom of the heart 💕 💕 💕 



तो तिला मिठीत घेतो ... ती पाघळत ही असते , पुढच्या moment ला  सावरते आणि त्याला स्वतः पासून दूर करते...

ऐशवर्या : लांब व्हायचं माझ्या पासून.... काय तर म्हणे प्रेम करतो , प्रेम आहे प्रेम आहे हे फक्त बोलून नाही तर कृतीतून सिद्ध होते.... तू फक्त बोलबच्चन सारखा बोलतोस .... त्यासाठी काही करत नाहीस....

प्रीतम : जान.... असं काही नाही आहे , माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर .... प्लीज ट्रस्ट मी....😭


तो रडकुंडीला येत म्हणाला ....  तो पुढे बोलत असतो इतक्यात प्रीतम ची आई ऐश्वर्याला हाक मारत असते ....
त्यामुळे ती पटकन खाली पळते .... त्याचं काहीही न ऐकता ....


इकडे अनुराग मात्र ऑफिसला घालायला कपडे चेक करत होता.... परवा पासून ऑफिस सुरू होणार म्हणून आपल्याला काय काय हवं आहे ते पाहत होता....  प्रिया त्याच्या रूम मध्ये येते त्यानेच तिला बोलावलं होतं....


प्रिया : दादा, तू मला  का बोलावलंस ??? काही काम होत का ???


अनुराग : काम काही नाहीये.... उद्या मी शॉपिंगला जायचं म्हणतोय.... तू येणार का माझ्या सोबत ???


प्रिया :  काय  शॉपिंगला .... हो मी येते तुझ्यासोबत आपण जाऊया उद्या.... 

तोच एक नोकर येऊन त्यांना सांगतो .... तुम्हाला जेवायला बोलावलं आहे....



पुढे काय होणार यासाठी वाचत रहा माझिया प्रियाला प्रीत कळेना...❤️❤️❤️



ज्यांनी ज्यांनी  रेटिंग दिले त्यांचे मनापासून धन्यवाद...🙏🙏🙏 असेच मला प्रोत्साहन देत रहा.... 
आणि माझ्या  पेजला फॉलो करा....

.







.






.





Bye bye stay tunned ❤️❤️❤️