तुझ्याविना... - भाग 4 swara kadam द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझ्याविना... - भाग 4



आर्यानी नाश्ता संपवला आणि कॉलेज साठी निघाली. रस्त्यात तिची गाडी एका सिग्नल जवळ थांबली होती तेवढ्यात तिच्या बाजूला एका मुलाने त्याची बाईक थांबवली.  आर्याने एक चोरटा कटाक्ष त्याच्या बाईक वर टाकला. लेटेस्ट मॉडेल ची व्हाइट कलर ची बाईक होती. नवीनच वाटत होती एकदम. बाईक बघता बघता तीच लक्ष त्याच्या गोऱ्या हाताकडे गेल. त्यावरच ब्रँडेड  वॉच आणि त्यानंतर असलेल्या टॅटू मुळे तिला एकदा त्याच तोंड पहायची इच्छा झाली. ती बघणार इतक्यात सिग्नल सुटला आणि त्याची गाडी पुढे निघून गेली. तीच मन उगाच खट्टू झालं मग तिने मनातले विचार झटकले आणि गाडी स्टार्ट केली.

आता पुढे...


आर्या कॉलेज ला पोहचली. तिने तिची स्कूटी पार्क केली आणि कॉलेज च्या आत प्रवेश केला. तिला क्लास रूम माहित न्हवता म्हणून तिने तिथल्या पिउन ला विचारलं.

त्यांनी तिला क्लास रूम दाखवला आणि ते निघून गेले. आर्याने एक उसासा सोडला आणि तिच्या क्लास मधे जाण्यासाठी निघाली तेवढ्यात तिला आठवलं की तिने आईला कॉल केलाच नाही.

लेक्चर सुरू व्हायच्या आधी कळवायला हवं नाहीतर नंतर जमणार नाही आणि आई उगाच काळजी करत बसेल. ती चालता चालता तिच्या बॅग मधून मोबाईल शोधत होती की जाऊन कोणालातरी धडकली आणि तिची बॅग खाली पडली. आर्याला आपली पडलेली बॅग पाहून राग आला.

थोड बघून चालता येत ना. ही... आर्याने बोलता बोलता समोर पाहिल आणि तिचे शब्द तोंडातच राहिले. तिच्या समोर तोच उभा होता. सहा फूट उंच. गोरा रंग. सरळ धारधार नाक. काळे सिल्की घनदाट केस जे त्याने जेल लाऊन सेट केले होते. डोळ्याला गॉगल, ब्लॅक शर्ट मधे कमालीचा हँडसम दिसत होता तो. आर्या त्याच्या कडे बघतच राहिली... 

त्याने तिच्याकडे बघत डोळ्यावरचा गॉगल काढला आणि तिच्या चेहऱ्यासमोर टिचकी वाजवत तिला वास्तवात घेऊन आला.. आणि आपण असे कसे त्याच्याकडे पाहत राहिलो ह्या विचारानेच आर्या ओशाळली.

तो - Oye Hello!  

आर्या - सो... सॉरी ते चुकून धक्का लागला.

तो - खाली बघून चालणार तर अजून काय होणार? त्याने रागाने विचारलं.

आर्या - सॉरी म्हटलं ना. त्याच्या अशा बोलण्याने आर्याला त्याचा रागच आला होता.

तो - सॉरी म्हटलं की झालं का? हे बघ काय झालं तुझ्यामुळे. 

तिने पाहिले तिचा धक्का लागल्यामुळे त्याच्या हातातील पाण्याच्या बॉटल मधलं पाणी त्याच्या शर्टवर सांडलं होत. 

आर्या - खरच सॉरी. माझं लक्ष न्हवत.

तो रागाने तिच्याकडे बघत होता. तो तिला अजून काही बोलणार इतक्यात त्याचा मित्र  रोहन तिथे आला.आणि त्याचा भिजलेला अवतार पाहून हसायला लागला..

गंधार.. अरे असा कसा भिजलास. 

गंधार ला  अजूनच राग आला. तो आता आर्या आणि रोहन कडे खाऊ का गिळू नजरेने बघत होता.  त्याच्या नजरेने रोहन च हसन गायब झालं.

त्यांनी त्याची नजर आर्याकडे वळवली आणि एकवेळ तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. त्याच्या अशा पाहण्याचे आर्या गोंधळली आणि इकडे तिकडे पाहू लागली. त्याची जाणीव होताच त्यानेही नजर फिरवली आणि बोलला.

रोहन - Hey it's okay! होत अस कधी कधी. तू काही मुद्दाम केलं नाहीस. So chill.

आर्या - हम्म. ती अजून काहीच बोलली नाही आणि खाली वाकून तिची बॅग उचलू लागली.

रोहन - new admission?

आर्या - हो.

रोहन - which year?

आर्या - Last.

रोहन - wow. आम्ही पण. हाय मी रोहन कुलकर्णी.

आर्या - आर्या देसाई.

रोहन ने तिच्या पुढे हाथ केला. आर्या थोडी गोंधळली. पण नंतर नॉर्मल होत तिने तिचा हात पुढे केला पण तितक्यात गंधार ने रोहनचा हाथ खाली केला आणि त्याला घेऊन निघून गेला...

जाताना आर्या वर एक कटाक्ष टाकायला विसरला नाही. आर्याला गंधारचा राग आला. ती ते गेलेल्या दिशेने पाहत होती आणि मनातच कोण समजतो कोण स्वतःला? म्हणाली.. आणि तिच्या क्लास मधे गेली.

ती जाऊन एका डेस्क वर बसली. नवीन असल्यामुळे सगळे तिच्याकडे पाहत होते तिलाही ते जाणवलं पण तिने दुर्लक्ष केलं आणि आईला कॉल करून पोहचल्याच कळवलं.
.......

रोहन - गंधार अरे मी बोलत होतो ना तिच्याशी? अस का घेऊन आलास मला?

गंधार - तुला काही दुसरी काम नाही का? मुलगी दिसली की लागलास लगेच फ्लर्ट करायला.

रोहन - अरे मी कुठे फ्लर्ट केलं? मी आपला फक्त मैत्री करत होतो. नवीन आहे ना ती. बावरलेली दिसत होती म्हणून फक्त ओळख करून देत होतो काही मदत लागली तर बाकी काही नाही.

गंधार - माहित आहे मला तुझी सगळी नाटकी चल आता गप.

रोहन - अरे खरच.

गंधार - हो माहित आहे चल आता.

रोहन - तुला तर काही कळतच नाही.

गंधार - हम्म आणि तुला जरा जास्तच कळत😄.

रोहन - हो मग काय? विषय आहे का भावा. मुलींच्या बाबतीत मी तुझ्या पेक्षा हुशार आहे. 

गंधार - असूदे.

रोहन - क्यूट होती ना? 

गंधार - कोण?

रोहन - आर्या रे.

गंधार - माहित नाही. मी तुझ्यासाखर मुली बघत बसत नाही. माझं aim सध्या एकच आहे.

रोहन - हा हा तू कशाला मुलींना बघशील? कारण त्याच सगळ्या तुझ्या कडे बघत असतात. कधी कधी वाटत उगाच तुझ्याशी मैत्री केली.

गंधार - काय?

रोहन - नाहीतर काय. मी एवढ जीम मधे मेहनत करून बॉडी बनवली. रोज ढीगभर प्रॉडक्ट लाऊन skin-care करतोय. बघ कसला भारी दिसतोय चेहरा माझा  एकदम तुकतुकीत😉पण साला काही उपयोग आहे का त्याचा. तू बाजूला असलास की सगळ्या मुली फक्त तुझ्याकडेच बघत बसतात. माझ्याकडे काळ कुत्र पण ढुंकून बघत नाही.

गंधार - अरे कुत्र्यांना पण काही चॉइस असेल की नाही? अस कोणाला पण बघत बसतील का त्या?

रोहन - हा ते पण बरोबर आहे.

गंधार गालातल्या गालात हसत होता. रोहनला आधी समजलं नाही पण जेव्हा समजलं तेव्हा तो गंधार कडे रागाने बघत होता.

Tubelight कुठला. गंधार त्याला म्हणाला आणि दोघ क्लास मधे निघाले. 

( तर हा आपल्या कथेचा नायक गंधार कारखानीस. अतिशय हुशार दिसायला कमालीचा हँडसम. घरची परिस्थिती ही उत्तमच होती. वडिलांचा business होता. घरात आजी सुमित्रा कारखानीस आजोबा देवधर कारखानी. आई वनिता कारखानीस  बाबा विक्रम कारखानीस. त्याचा लहान  भाऊ पार्थ आणि बहीण प्रिशा. पार्थ आणि प्रिशा दोघं जुळे होते. अस छान हसरं कुटुंब होत.)


गंधार आणि रोहन  बोलत बोलत त्यांच्या क्लास मधे पोहचले. रोहन ची नजर आर्या ला शोधत होती आणि त्याला ती एका कोपऱ्यात बसलेली दिसली. त्याने गंधार ला कोपर मारून खुणावले आणि आर्या बसलेली तिथे पहायला सांगितलं.

गंधार ने  रोहन सांगत होता तिथे बघितलं त्याला आर्या दिसली....कोणा सोबत तरी फोन वर बोलत होती. गंधार ने नकारार्थी मान हलवली आणि रोहन  ला घेऊन त्याच्या डेस्क वर आला. 

रोहन - किती बोरिंग आहेस यार तू. कधीतरी पुस्तकातून डोक बाहेर काढ आणि जरा बाहेरचा नजारा पण बघ. किती सुंदर सुंदर मूर्ती देवाने बनवल्या आहेत त्या काय फक्त आपण त्यांना इग्नोर करावं म्हणून आहेत का? अरे आपण त्यांना बघावं त्याची तारीफ करावी त्यांच्यात हरवून जावं त्या साठी देवाने इतक्या फुरसत मधे त्यांना बनवून जमिनीवर पाठवलंय. आणि तू आहेस की एक नजर पण बघत नाहीस. स्वतः तर बघत नाहीस आणि मला पण बघू देत नाहीस. अरे हे डोळे  पुस्तक वाचून वाचून ते दुखायला लागतात रे. जरा बाहेरचा नजारा पाहिला की कस त्यांना आराम मिळतो. तुला काय कळणार म्हणा. पुस्तकी किडा कुठला.


गंधार - ह्यापेक्षा अभ्यासावर लक्ष दे. जर फर्स्ट क्लास नाही मिळाला ना तर तुझे आई बाबा घरातून हाकलून देतील तुला. मग अख्खा दिवस अन्  रात्र बघत बस हा सुंदर नजारा. तो हसतच म्हणाला.

रोहन ने भीतीने अवांडा गिळला त्याला लगेच त्याच्या वडिलांचे शब्द आठवले. डिस्टिंक्शन सोड ते तुला ह्या जन्मात शक्य नाही, पण जर फर्स्ट क्लास नाही मिळाला तर घरात पाय सुद्धा ठेवायचा नाही. त्याने नाही मधे मान हलवली आणि नको नको त्यापेक्षा मी अभ्यास करतो अस म्हणाला.
त्याच बोलण ऐकून गंधार हसायला लागला.
.............................

फर्स्ट लेक्चर सुरू झालं. आर्या नवीन असल्याने सरांनी तिची ओळख क्लास मधे करून दिली. गंधार ने एकदा आर्या कडे  बघितलं रोहन म्हणत होता तशी क्यूट तर होती ती. त्याची नजर एक वेळ तिच्यावर खिळली.

ती पुस्तकात डोक घालून बसली होती. मधेच पेन ओठात ठेवून पुस्तकच पान पालटत होती. हवेमुळे तिच्या केसांची एक चुकार बट तिच्या गालावर येत होती आणि ती सारखी कानामागे टाकत होती.

मेकअप चा लवलेश ही न्हवता तिच्या चेहऱ्यावर. पीच कलर चा स्लीवलेस कुर्ता घातला होता तिने. गंधार तिला बघतच राहिला. 

रोहन - मस्त नजारा आहे ना?

गंधार - हम्म. 

रोहन हसायला लागला. त्याच्या हसण्याने गंधार भानावर आला आणि आता आपण काय माती खाल्ली याची जाणीव त्याला झाली. त्याने रोहन कडे रोखून बघितलं आणि म्हणाला लेक्चर मधे लक्ष दे.


.....,.........................................      


To be continued....