विडंबन kshitija द्वारा मानवी विज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विडंबन

माणसाच्या भावना कित्ती वेगवेगळ्या आणि कित्ती प्रकारे बदलत असतात.प्रत्येक माणसाचे आचार विचार वेगळे ! खरचं!! नवलचं वाटतं विचार करून कसा निर्मिला असेल सृष्टिकर्त्याने हा देह की प्रत्येक माणसाचे केवळ शरीरचं नाही तर मनही वेगळे विचारांसोबत मनही वेगळेच!!!

            कोणताच व्यक्ती कायम आनंदी राहू शकत नाही. तो कुठल्या न कुठल्या दुःखात गुरफटलेला असतो.काहींचे दुःख खूप जास्त काहींचे खूप कमी असा समज मनात येतो. आपलं दुःख म्हणजे जगविपरित हा समज. देवाने सर्वांगी कुशल बनवून पाठवलयं हे पुरेसं नसतं.कधी हा विचार केलाय का? कसे जगत असतील ती लोकं ज्यांना हात नाहीत,पाय नाहीत,डोळे नाहीत.ही सृष्टी फक्त एका आभासानुसार ते जगत असतात .अनुभवत असतात.जर आणि तर या कल्पनेवर ते जीवन काढत असतात.मनाला धीर देणं यांनाच येत असावं.काहीच नसताना सर्वकाही आहे असं मानून आनंदी असतात ती.त्यांना डोळे नाहीत काहीना पाय नाही की हात नाहीत .ते जगताय ना!! देवाला दोष देणं कदाचित हा यावरचा उपाय नसावा जन्म दिलाय जगावं लागणारचं हा एकच उपाय आणि विचार पुरेसा असतो आनंदी राहण्यासाठी.ते अनुभवणं जितकं सोप्प तेवढं ते जीवनात आणणं कठीण!!ज्यांना हे जमलं त्यांनी आयुष्याचा रस घेतला ज्यांना नाही जमलं त्यांनी फक्त आयुष्याच्या चुका काढल्या.

                व्यक्तीकडे कितीही पैसा असुदेत किंवा नसुदेत प्रत्येक व्यक्तीच्या माघे कसलं न कसलं दुःख असतचं कायम! पण तरीही हा श्रीमंत आणि गरिबीचा खेळ मात्र संपत नाही.माणूस हा माणसालाच माणसासारखा वागवत नाही. नक्की श्रीमंत असणं म्हणजे काय? ज्याकडे पुष्कळ पैसा तो श्रीमंत का? तो श्रीमंत म्हणजे तो सुखी असेलच का? या पैशाने कित्ती माणसं तोडली आहेत हे श्रीमंत आणि गरिबीच्या विभाजनाननेच कळतं. आजची परिस्थिती बघता पैसा माणूस आणि माणुसकी पेक्षाही मोठ्ठा झालायं!

                  प्रेम, माया, करुणा या गोष्टी प्रत्येक व्यक्ती मधे अगदी जन्मल्यापासून असतात.या नैसर्गिक भावनांचे देखील व्यक्ती नुसार गटं पाडली जातात.प्रेम त्याच व्यक्तीला दिलं जातं जी व्यक्ती आपल्याला प्रेम देत असते किंवा त्या व्यक्तीकडून आपल्याला काही फायदा होत असतो.ती व्यक्ती ते करू शकत नसेल तर ती प्रेम करण्यासाठी पात्र नाही असं ठरवलं जातं.प्रेम,माया या गोष्टी विनामूल्य अगदी सहज कुठेही, कुणालाही देता येतात पण इथेही भेद होत समोरच्या व्यक्तीची परिस्थिती बघून. लोकं इथे माणसालाच विचारत नाहीत प्राण्यांचा तर प्रश्नचं खूप लांब! समजतं यावरूनचं इथे प्रेमालही बंधनं आहेत आणि प्रेम कुणावर करावं त्यालाही!!

                   कुणाला आपलंसं करायला प्रेमाचे,मायेचे अगदी दोन शब्द सुद्धा पुरेसे असतात.पण आपण तो दिसतो कसा? तो राहतो कसा? यावरून त्याच्याशी बोलावं की नाही हे ठरवत असतो!! कस्सलं विचित्र!! त्या व्यक्तीचा स्वभाव कुणी बघतचं नाही!! सगळेच आपल्या सारखा विचार करतील असही नसतं . जे घडतयं ते बघावं लागतचं! एका आईच्या कुशीतून एकाच वेळी जन्मलेली जुळी मुलं सुद्धा अगदी वेग वेगळ्या विचाराची असतात!! कधी कधी माणसांच्या या वेगळेपणाचं, वेगळ्या विचारांचं कौतुकही वाटतं पण ते अगदी तत्पुरतं असतं!!

                  जर माणसं,त्यांची मनं, त्यांचे विचार वेगळे असूनही आपण स्वीकार करतो तर आपण पुरूषासोबतीने काम करणारी स्त्री का स्वीकार करू शकत नाही? तिचं अस्तित्व का स्वीकारू शकत नाही? तिचं अस्तिव म्हणजे फक्त वैवाहिक जीवनच का? तिचा कुठलाही निर्णय हा पुरुषांच्या मतावरचं का आधारित असतो? तिला स्वतःचं अस्तित्व नाहीच हे तिने स्वतः मानलेलं आहे की तिला मान्य करावं लागलंय? प्रश्नचं आहे! देश स्वतंत्र झाला, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र झाला असं आपण मोठ्या जोशात सांगत असतो प्रत्येक व्यक्ती खरचं स्वतंत्र झालाय का? हे प्रत्येक घरातील पुरुषाने तिथे काम करणाऱ्या स्त्री ला विचारलं पाहिजे. स्वतंत्रता पुरुषांबरोबर स्त्रीलाही दिली आहे की नाही याचा विचारही करायला हवा.