पडद्याआडचे सूत्रधार - 4 - पलायन आणि तो पांढरा ग्रह Ashish Devrukhkar द्वारा विज्ञान-कल्पनारम्य मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पडद्याआडचे सूत्रधार - 4 - पलायन आणि तो पांढरा ग्रह

शोधकार्यात आलेल्या ५ तबकड्या मागे फिरल्यावर या बंडखोर चमूंनी अवकाशात उड्डाण केले आणि त्या पांढऱ्या ग्रहाच्या दिशेने ते उडाले. त्यांचे हे पहिलेच उड्डाण होते कारण या आधी त्यांनी केलेले उड्डाण हे वरिष्ठ शास्त्रज्ञांनी ठरवलेल्या नियमानुसार होते. या सगळ्या बंडखोर चमूसाठी हे सगळे नवीन होते. खरेतर त्यांच्यासाठी ही आत्महत्या करण्यासारखे होते कारण परतीचा मार्ग नव्हताच. पुढे जाऊन काही चांगले हाती लागले तरच आपल्याला पुन्हा स्वीकारले जाईल नाहीतर असाच अवकाशात मृत्यू हे सत्य त्यांनी स्वीकारले होते. कोणालाही कसलाही अनुभव नव्हता. समोर दिसणाऱ्या पांढऱ्या ग्रहाकडे ते आगेकूच करत होते. अजूनही ते मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत होते. अचानक एक जोरात हिसका बसला आणि त्याचा वेग अचानक वाढला. आधी कोण काहीच कळेना नेमके काय होत आहे. सगळेच पहिल्यांदा हवं तसे करत होते. कोणाची ऑर्डर नव्हती. मग त्यांना कळले की ते मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर पडले आहेत. 
आता ते निर्वात पोकळीत प्रवास करत होते. त्यांच्याकडच्या प्रगत तंत्रज्ञानाने त्यांच्याकडे इंधनाची कमतरता नव्हती. अनेक रासायनिक संयोगातून ते अतिप्रचंड उष्णता निर्माण करू शकत होते आणि त्यातूनच त्यांच्या तबकड्या उडत होत्या. निर्वात पोकळीत सूर्य त्यांचे काम करत होता. 
ज्या पांढऱ्या ग्रहाकडे त्यांना जायचे होते तिकडे त्यांनी कूच केले. इकडे मंगळावर त्यांच्या मुख्य तबकडीच्या रडारवर काही वेळासाठी ह्या बंडखोरी केलेल्या चमूच्या तबकड्या दिसत होत्या आणि मग त्या दिसेनाश्या झाल्या. चौकशी अंती त्यातून कोण कोण पळून गेले हे त्यांना कळले. काहीही झाले तरी पळून गेलेल्यांना परत येणे भागच होते, त्यावाचून त्यांना पर्यायच नव्हता असे गृहीत धरून बंडखोरांचा पाठलाग थांबवला गेला. 
बंडखोर चमू आता एकदम निर्धास्त होऊन प्रवास करत होते आणि अचानक पुन्हा त्यांच्या तबकड्यांना धक्का बसला आणि अचानक त्यांचा वेग वाढला. कोणीतरी त्यांना ओढते आहे असे वाटले. त्यांना कळले की आपण कोणत्यातरी ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आलोय. त्यांनी त्वरित आपल्या तबकड्या नियंत्रणात आणल्या. आता त्या पांढऱ्या ग्रहापासून ते जवळपास ५०० किमी अंतरावर घिरट्या मारू लागले. त्या पांढऱ्या ग्रहावर त्यांना बरेच मोठे मोठे खड्डे दिसत होते. बऱ्याच घिरट्या मारल्यावर पाच पैकी एक तबकडी घिरट्या मारत राहिली. एक दक्षिण ध्रुवावर उतरली तर दुसरी उत्तर ध्रुवावर. तिसरी उतरली जिकडे सूर्यप्रकाश आहे तिकडे आणि चौथी उतरली अंधाऱ्या भागात. सगळ्या तबकड्या एकमेकांच्या संपर्कात होत्या. दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या तबकड्यातील शास्त्रज्ञांना तिथे असे खड्डे सापडले जे नेहमी अंधारात असतात. त्या खड्ड्यांमध्ये त्यांना पाण्याचा बर्फ सापडला. त्यांच्या आनंदाला पारावर नाही उरला. ज्या गोष्टीसाठी ते सगळ्यांशी पंगा घेऊन बंडखोरी करून आले होते ते साध्य करायला ही सुरुवात होती. ज्या दोन तबकड्या इतर ठिकाणी उतरल्या होत्या त्यांनी आता आपले संशोधन करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिले त्या हे आढळले की या ग्रहावर वातावरण अजिबात नाही. वातावरण नाही म्हणजे जीवसृष्टी नाही. त्याचा भ्रमनिरास झाला पण तरीही ते आपले प्रयोग करत राहिले. आणखी एक गोष्ट त्यांना कळली की त्या ग्रहाचा रंग पांढरा नसून राखाडी आहे आणि तो त्याला सिलिकेट्स आणि बेसाल्ट खडकांमुळे आला ज्यात मोठ्या प्रमाणात लोह आणि टायटॅनियम असते. 
अंधारात उतरलेली तबकडी आता उजेडात आली होती आणि उजेडातली तबकडी अंधारात गेली होती. सूर्यप्रकाश बंद झाल्याने उपकरणांची बॅटरी चार्ज होत नव्हती आणि त्याचे काम मंदावले पण उजेडात आलेल्या तबकडी मधली उपकरणे आता काम करू लागली. त्यांनी आणखी माहिती मिळाली की रात्री त्या ग्रहावर तापमान - १५६° सेल्सिअस पर्यंत खाली येत होते पण आता उजेडात आल्यावर ते १००° सेल्सिअस पेक्षा जास्त वरती गेले. ही आकडेवारी त्यांना निराश करणारी होती. दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या चमूला पाण्याचा बर्फ सापडला पण तिथे तापमान हे - २७०° सेल्सिअस इतके कमी होते. मंगळावर त्यांच्या वरिष्ठांचे थांबणे योग्य होते असे त्यांना आता वाटू लागले होते.
इकडे मंगळावर प्रयोगशाळा उभारण्याचे काम जोरात सुरू होते. एक मोठी तबकडी जी आधी आलेल्या सगळ्या तबकड्यांपेक्षा प्रचंड मोठी ज्यात सगळ्या तबकड्या सामावल्या असत्या इतकी मोठी तबकडी मंगळावर आता उतरत होती. ती तबकडी सुसज्ज अशी होती. त्यातून आणखी शास्त्रज्ञ आणि कामगार मंडळी उतरत होती. मोठी मोठी मशिन्स आणि बांधकाम साहित्य घेऊन ती तबकडी आली होती. ती तबकडी तिथे पोहचल्यावर त्यातल्या मोठ्या शास्त्रज्ञांनी झालेल्या बंडखोरी बद्दल माहिती घेतली आणि बंडखोर चमूला परत आणायचे ठरवले. अत्यंत हायटेक अशा सिस्टिमने परिपूर्ण अशी ती तबकडी होती. Mother Spaceship असे तिचे नावच होती. आपल्या मूळच्या ग्रहावरून आणलेले सगळे सामान उतरवले की ती mother Spaceship या बंडखोर चमूंना आणायला निघणार होती. 
पांढऱ्या ग्रहावर उतरलेल्या तबकड्या आता आपले प्रयोग संपवण्याच्या तयारीत होत्या तितक्यात त्या ग्रहभोवती फिरणाऱ्या तबकडीने या चार तबकड्यांना एक संदेश पाठवला, "हा पांढऱ्या रंगाचा ग्रह हा ग्रह नसून एका दुसऱ्या मोठ्या ग्रहाचा चंद्र आहे. हा चंद्र एका मोठ्या निळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या ग्रहाच्या भोवती फिरत आहे."
चंद्रावर उतरलेल्या तबकड्यातील चमूने पटापट आपले प्रयोग आवरायला सुरुवात केली. त्यांनी तिथली बरीच माती आपल्या सोबत घेतली. तिथले दगड आणि खोदकाम करताना मिळाले दगड सोबत घेतले. वरच्या तबकडीतून आणखी एक संदेश आला, "पुढचा टप्पा निळा हिरवा ग्रह." चारही तबकड्या आता अवकाशात उडाल्या आणि काही वेळाने एकत्र आल्या. 
खरेतर त्या तबकडी मधील चमूला हा नवा ग्रह आधी दिसला नव्हता पण हळूहळू तो कलेकलेने वाढताना दिसला. या पांढऱ्या ग्रहावर येण्याआधी आपण कोणत्या तरी ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आलो होतो तो ग्रह म्हणजे हाच हिरवा निळा ग्रह होता याची त्यांना कल्पना आली. त्यांनी हळूहळू त्या ग्रहाच्या दिशेने आगेकूच केली.
इकडे मंगळवारची मदर स्पेसशिप आपल्या आगळ्यावेगळ्या मोहिमेवर जाण्यासाठी तयार होत होती. तिचा पसारा एकतर खूप मोठा होता. अशी आणखी एक मदर स्पेसशिप त्यांच्या मूळ ग्रहावरून मंगळावर यायला निघाली होती. आधी आलेल्या या मदर स्पेसशिपने अवकाशात उड्डाण केले आणि आपल्या शक्तिशाली रडारने बंडखोरी केलेल्या चमूच्या तबकड्या शोधायला सुरुवात केली.
निळ्या हिरव्या ग्रहाच्या दिशेने जाणाऱ्या तबकड्यांना आता आपला वेग कमी करून त्या ग्रहभोवती घिरट्या मारायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या लक्षात आले की जो पांढरा रंग त्यांना दिसत होता ते त्या ग्रहावरचे ढग आहेत आणि या ग्रहाला चांगलेच वातावरण आहे. त्यांची उत्सुकता आता वाढली होती. वातावरण आहे म्हणजे जीवसृष्टी असणार या कल्पनेने त्यांना जास्त आनंद होत होता. थोडे पुढे गेल्यावर त्यांना आणखी एक धक्का बसला. त्यांना त्या ग्रहभोवती ठराविक अंतरावर पांढरे ढग दिसले. सुरक्षतेच्या हेतूने त्यांनी खूप उंचावरून घिरट्या मारणे सुरूच ठेवले. हा ग्रह स्वतःभोवती १६०० किमी / तास इतक्या वेगाने गिरक्या घेतो हे निरिक्षण त्यांनी नोंदवले. पण तो ग्रह सूर्याभोवती अतिप्रचंड वेगाने फिरत आहे हे त्यांना कळले. त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत असल्याने ते हळूहळू खाली खेचले जात होते.
मदर स्पेसशिपच्या शक्तिशाली रडारने शेवटी या पाच बंडखोर तबकड्यांना शोधलेच. मदर स्पेसशिप ने त्या तबकड्यांच्या दिशेने आपल्या अचाट वेगाने प्रवास सुरू केला.