रेशमी बंध - भाग 1 Yugandhara Joshi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रेशमी बंध - भाग 1

स्थळ -श्री कृष्ण मंदिर 


                     सकाळी 8 वा ती मंदिरात आली आणि मनोभावे देवाला नमस्कार करून निघाली...तेव्हढ्यात एक आजींना चक्कर आली आणि त्या पडणार इतक्यात तिने त्यांना सावरल...  आणि आपल्या जवळच पाणि पाजल.. त्यांची आपुलकीने चौकशी करु लागली...

"आजी तुम्ही एकट्याच आहात काय..? तुमच्या सोबत कोणी नाही का..? "  

तशा आजी तीला म्हणाल्या ....

"अग ड्रायव्हर आहे, तो फुलं आणायला गेला आणि मला वाटलं आपण तोपर्यंत वर चढून जाऊ, पण मध्येच चक्कर आली."

"पण आजी तुम्हाला बर वाटत नाही तर कशाला यायच..? 

ती आजींना म्हणाली

"अग एव्हढं काही झाल नाही, तू नको काळजी करू..! "

आजी म्हणाल्या ,तेव्हढ्यात ड्रायव्हर पण आला आणि आजींना असे बसलेले बघून धावत त्यांच्या जवळ आला आणि काय झाले म्हणून विचारू लागला, तसे ती रविला म्हणजे ड्रायव्हरला बोलू लागली....

"असे कसे तूम्ही त्यांना सोडून गेला त्या पडल्या असत्या,त्यांना लागल असत, मग काय केले असते तुम्ही..? "

तशी रवीने माफी मागितली त्यावर ती म्हणाली 

" माफी मागू नका.. त्यांची काळजी घ्या, येते मी "

तीने आजींना नमस्कार केला आणि तिथून निघाली.. या सगळ्या गडबडीत तीला ऑफिसला यायला उशीर झाला, तेव्हढ्यात तीची मैत्रिण माहि तिच्या जवळ आली आणि उशीर का झाला म्हणून विचारले.. तर तीने नंतर सांगते म्हणाली आणि आपल्या कामाला लागली..
 
                           इकडे आजी घरी पोहचल्या आणि रवीने मंदिरातील वृत्तांत सांगितला तसें सगळे आजींभोवती जमा झाले आणि काळजीने त्यांना विचारू लागले कुठे लागले का, तूम्ही ठिक आहात ना वगैरे वगैरे.. तशा आजी म्हणाल्या,

"अरे मी ठिक आहे ,काही झाले नाही आणि माला तीने सावरले..."

तसे सगळ्यांच्या चेहर्‍यावर प्रश्न चिन्ह दिसत होते...श्रीराम (आजींचा मोठा मुलगा) यांनी विचारले... 

"कोण ती..?  "

तसा आजींनी डोक्याला हात लावला आणि म्हणाल्या...

"या सगळ्या गडबडीत तीच नाव विचारायचे राहून गेले..! " 😔

" ठिक आहे आई तुम्ही आराम करा " 

कल्याणी म्हणजे आजींच्या मोठ्या सूनबाई म्हणाल्या आणि धरेशला आजीला रुम मध्ये सोडायला सांगून जो तो आपल्या कामात व्यस्त झाला. 
                       
आजीला चक्कर आली समजता तो तडक आजीच्या रुममध्ये गेला आणि काळजीने तसेच थोडे रागवून त्यानां बोलू लागला,

" काय गरज आहे तुला मंदिरात जायची, घरी आहे ना मंदिर..? मग कशाला जाते तू ..? आणि तूला काही झाल असत म्हणजे..? " 

" अरे मला काही होत नाही, तू काही काळजी करु नको आणि तुझी लेकरं मला माझ्या मांडीवर खेळवायची आहे, त्याशिवाय ही मथुरा मरत नाही बघ..! "

आजींनी हसत उत्तर दिलं. 

"आज्जी sss....!!! "

तो थोडा रागातचथोडस चिडून म्हणाला..

"काहीही काय बोलते..!?  "


तशा आजी हसल्या आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाल्या...

"मी खर तेच बोलतेय, तुझ लग्नाच वय झालंय, आम्हि किती दिवस वाट बघायची तुझ्या लग्नाची..? " 

"आजी तू आराम कर, मला काम आहे..! "

असे सांगून तो तिथून निघून गेला... तशा आजी तो गेला त्या दिशेला बघु लागल्या, आणि मनातच श्रीकृष्णाला प्रार्थना करू लागल्या,

"हा भूतकाळातून लवकर बाहेर पडू दे आणि याच्या जिवनात चांगली मुलगी येऊ देत 🙏"..

क्षण भर मथुराबाईंच्या डोळ्या समोर तीचा चेहरा तरळून गेला आणि त्यांचा डोक्यात विचार आला..
'  हि जर माझी नातसून झाली तर..??  पण, हे घडेल कसे...? ' 

या विचारात त्या हरवल्या असतांना श्रीराम आणि लक्ष्मण त्यांच्या जवळ आले आणि

"कसला विचार चाललाय आईसाहेब, बर वाटतय ना..? कि,  डॉक्टरला बोलवू..? "

असे काळजीने लक्ष्मण यांनी विचारले,

"अरे मला काही झाले नाही ....मी नातसूनेचा विचार करतेय, तुम्हाला सांगू मला ती मंदिरात भेटलेली मुलगी खूप आवडली.... "

"काय...??? "  ..... दोघ एकदम ओरडले ,

"आई काही काय विचार करते, कोण कुठली मुलगी आणि तु इतका पूढचा विचार करतेय... "

लक्ष्मण थोडे त्रासिक स्वरात म्हणाले..

"अरे लक्षु....!!! मी काहितरी विचार करून बोलतेय ना...! तीच्या सारखी मुलगी माझ्या "नमिश " च्या (नमिश आपल्या कथेचा हिरो)  आयुष्यात आली ना तर सगळ सगळ चांगल होईल बघ ...." 

"पण आई....!!! "

श्रीराम बोलतच होते की मध्येच त्यांना अडवून मथुराबाई म्हणाल्या,

"आता पण नाही आणि बिण नाही ,मलाच त्याच्या लग्नाचे बघावे लागेल, तुम्ही बसा हातांवर हात धरून..!  "

त्या थोड्या चिडूनच म्हणाल्या. तेव्हढ्यात तिथे कल्याणी आणि नेत्रा दोघी आल्या आणि काय झाले विचारू लागल्या, तसे त्या दोघींना पण काय बोलण झाल ते सांगितले, ते ऐकून त्या दोघीं खूप खूष झाल्या, कल्याणी थोडी भाऊक झाली आणि म्हणाली ....

"आई.... !!! सगळ ठिक होईल ना ओ ..?  माझा नमिश परत पहिल्या सारखा होईल ना? .."

" हो कल्याणी...!! सगळ छान होणार बघ, तू काळजी करू नकोस "

आजी तीला धिर देत म्हणाल्या. 
           

ऑफिस मध्ये लंच ब्रेक झाला तसा माहि आणि ती कँटीनमध्ये गेल्या आणि टिफीन काढून जेऊ लागल्या. एकदम माहिला लक्षात आले आणि तीने ,' तुला सकाळी उशीर का झाला म्हणून विचारले, मग तीने पण मंदिरात काय झालं होतं ते सांगितले..... 

"ओहsss ..!! मला वाटलं घरी परत काहि झाले का...? " 
माहि म्हणाली. 
त्यावर ती फक्त हसली आणि म्हणाली
 
" ते रोजच आहे, जाऊदे चल लवकर Back to work..! "


असे म्हणत दोघी कामाला लागल्या...



 क्रमशः