मुखवटे - 2 Balkrishna Rane द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मुखवटे - 2

मुखवटे भाग ३काही क्षणातच राखणदार एका दगडाखाली असलेल्या  गुहेवजा जागेत पोहचला.मी ही पाठोपाठ होतो. मशालीच्या उजेडात तिथला परिसर उजळला.तिथे एक मनुष्य खडकाला टेकून बसवलेला होता.तो समाधी लावल्यासारखा स्थिर होता.कोण होता तो इसम...एखादा लपवलेला गडा! हो तो गडाच असणार.  त्याच्या अंगावर गड्याचा वेष होता.काल न मिळालेला  गडा म्हणजे कस्टम ऑफिसर बाबीनाईक तर नव्हे ?" तू विचार करतोयस ,तोच हा गडा आहे.पण मी त्याला लपवलेलेनाहीय.तर  काही दुष्ट प्रवृत्ती त्याला पळवत होत्या .पण मी त्याला सोडवलंय. मी असताना...माझ्या सीमेत कुणी अस धाडस करू शकत नाही." राखणदार म्हणाला." पण ...पण मी फक्त हा उत्सव जाणून घेण्यासाठी आलोय. मी काय करू शकतो !" मी घाबरत म्हणालो.राखणदारने डोळ्यांच्या खुणेने  मला शांत केले."ते याला मारण्याचा प्रयत्न करत होते...पण तस झालं असत तर माझ्या नावाला ...माझ्यावरचा विश्वासाला  तडा गेला असता.ती माणसं आजही इथच आहेत...ते पळण्याचा प्रयत्न करत होते.पण मी त्यांना अडवून ठेवलय.त्यांचा निर्णय झाल्याशिवायते इथून जाऊच शकत नाहीत."" मी काय करू...?"" ती माणसं या गड्याला का पळवू पाहत होती ते शोध.त्यासाठीत्या सरकारी माणसांची मदत घे,जी तुला सकाळी भेटली होती."मी दचकून वर पाहिल.मी मुंबई पोलिसांना भेटलो हे राखणदाराना कस कळाल?" मीच भेट घडवून आणली  होती तुमची...आज आणखी एक मोठा माणूस आला होता. त्यालाही मी अडवले आहे.  आज पहाटे पर्यंतत्यातले काहीजण आपल्या कर्माची फळे भोगणार आहेत.मी तुला का इथ आणलं तर माझ्यावर काही मर्यादा आहेत. दिवसा मी काही करू शकत नाही."" हे नाईक, म्हणजे हा गडा आज लोकांना सापडेल?"" नाही, उद्या मिळेल तो !त्याला काही होणार नाही. कारण तो माझ्या नजरेखाली आहे. आज जे घडणार ...म्हणजे मी ते घडवून आणणार आहे...त्यामुळे इतर कुणालाही त्रास होणार नाही. गाड्यांचा खेळ निर्विघ्नपणे पार पडेल. "मी राखणदाराकडे भारावलेल्या नजरेने बघत राहिलो.खरतर मला काही प्रश्न विचारायचे होते.पण कसं विचारायचं यांचा मी विचार करत होतो" विचार... तूझ्या मनातल्या शंका विचार?"खरं तर आता मला अजिबात आश्चर्य वाटले नाही." क्षमा करा. थोडं धाडस करतो.तुम्ही एकूण बारा जण आहात? आणि तुम्ही फक्त होळीच्या वेळीच मशाल दाखवता?"" आम्ही बारा वेगवेगळे नाही तर मीच वेगवेगळ्या बारा रुपात माझ्या पिलगी (गावकरी किंवा भक्त)  आहे तिला दिसतो .त्यांना मदत करतो. फक्त होळीच नाही तर मी दर रात्री ३५० खेड्यात फेर्या मारतो...लोकांना मदत करतो...चकव्यात अडकलेल्यांना रस्ता दाखवतो....अदृश्य शक्तींपासून त्यांना दूर ठेवतो.देवचार म्हणजे देवाचा दूत जो घर जो फिरतो ...पाळत ठेवून संकट दूर करतो तो.आत्ता मला जायचं आहे."अचानक मशाल मंद झाली.समोरचा राखणदार हवेत विरून गेला. आता त्या जागेत त्या भयाण रात्री मी एकटा होतो...आणि बाजूला जाणीवेच्या पलीकडे गेलेला गडा म्हणजे नाईक होते. मी साक्षात देवचाराशी बोललो होतो. ..हे लक्षात येताच मला दरदरून घाम फुटला. त्या गड्या संदर्भात मी गावकर्यांशी बोलू शकत नव्हतो. जे घडणार होतं त्यात मला बदल करता येणार नव्हता.पण मला राखणदाराने नेमून दिलेले काम करावे लागणार होते.मी वेगाने रानातून बाहेर पडायला सुरुवात केली. मी आज आलेला मोठा माणूस कोण त्याचा विचार करत होतो.खाली गेल्यावर मी विश्वासला फोन लावला." मी रत्नकांत बोलतोय..."" येवढ्या रात्री ? बोल..!"" आज रात्री काही तरी घडणार आहे. कदाचित तुम्हाला हवी असलेली माणसे तुम्हाला आपोआप मिळतील ! "" कसे काय ? आणि हे तुला कसं कळलं? "" ते महत्वाचे नाही. पण या ड्रग्स प्रकरणाची वाच्यता येत्या दोन दिवसांत होवू देवू नका. दुसरं म्हणजे बाबी नाईक नावाचे कस्टम ऑफिसरांना ही माणसं पळवण्याच्या प्रयत्नात आहेत पण का? ते आपल्याला शोधून काढले पाहिजे."" रत्नकांत,ही सगळं माहिती तुला कुठून कळली. तुझा या सगळ्यांशी काय संबंध.?" विश्वासच्या आवाजात संशय होता.मी फक्त हसलो."  कुणीतरी बडा इसम आज गावात आला आहे.त्याचा या प्रकरणाशी काहीतरी संबंध आहे...तो शोधला पाहिजे.मी तुम्हाला सकाळी भेटतो."   मी मांडावर आलो त्यावेळी लपवलेले गडे घेऊन लोक परतले होते. त्यांना न्हावाण पाजण्यात आले.ते पूर्णपणे शुध्दित आले.तो पर्यंत अडीच वाजले होते. अजून तरी काही अघटीत घडले नव्हते.तेवढ्यात माझे यजमान  परब व त्यांचा मुलगा तिथे आले." अहो, तुम्ही कुठे नाहिसे झाला होता?"" मी ... गडबडीत दुसर्या दिशेला गेलो होतो."" चला, घरी जाऊया..." परब म्हणाले.मी त्यांच्या सोबत निघालो.वाटेत मी त्यांच्याकडून कस्टम ऑफिसर नाईक यांची माहिती घेतली.मला एवढंच कळलं की नाईक हे कष्टाने या पदापर्यंत पोहोचले होते.अत्यंत प्रामाणिक व निर्भीड अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध होते.त्यांनी काही  उच्चभ्रू लोकांवर ही कारवाई केली होती." अरे, आज तो रिटायर्ड एस.पी. डिसोजा पण त्यांच्या घरी पावलो होतो"मी चमकलो. मोठा इसम म्हणजे माजी एस.पी.डिसोजा तर नव्हेत? नेमकं चक्कर काय होतं? डिसोजा आणि नाईक यांचा संबंध काय? ड्रग्ज टोळी नाईकांच्या मागे का लागली यांचा अंदाज मला आला होता." काका, डिसोजा साहेब..ताबोडतोब गेले?"" नाही. त्यांची कार बिघडली...कित्ये झाला ते  मॅकेनिकांका पण कळपाना. "" न्यू कार ..आसा. पण बंद पडली . डिमेलो आज पोलीस आऊट पोस्टात राहिलेत." परबांचा मुलगा म्हणाला.म्हणजे डिमेलोंची कार...बंद पडली नाही तर राखणदारांने त्यांना गावाबाहेर जाऊ दिलं नाही.याचा अर्थ डिसोजांना नाईकांना पळवण्याची किंवा त्यांनां मारण्याचा कुणाचा तरी डाव असावा याची कल्पना असावी. सगळं प्रकरण खूप गुंतागुंतीच होत.शिवाय यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचा सहभाग होता. मी विचार करत चालत होतो.अखेर आम्ही घर गाठले.बेडवर पडण्याअगोदर मी कालच्या प्रमाणे खिडकी उघडली पण आज तिथे कुणीच नव्हते.सर्वत्र मंद चांदणं पसरलं होतं.थोड थंड वातावरण होतं मी चादर अंगावर ओढली व डोळे बंद केले.सकाळी सहा वाजता मला शरद म्हात्रेंचा फोन आला." रत्नकांत,करेकराच्या घुमटी जवळ या. लवकर या."" काय झालं.?"" तुम्ही म्हणालात तसं घडलंय या."मी झटकन कपडे चढवले. तोंडावर पाणी मारले. कॅमेरा घेतला.सात ते आठ मिनिटे चालत जायला लागणार होती.कारेकर घुमटीजवळ विश्वास ,शरद व काही साध्या विषयातले गोवा पोलिस व पाच सहा ग्रामस्थ उभे होते.एक ॲम्ब्युलन्स उभी होती." रत्नकांत,एकूण पाच जण हात पाय बांधलेल्या अवस्थेत सापडले आहेत. त्यात एक सुलेमान बेग आहे. सगळ्यांच्या हाता पायावर व पाठीवर काठीचे वळ दिसताहेत.कुणीतरी शक्तिशाली इसमाने त्यांना बदडले आहे.पण ते सारे प्रचंड घाबरले आहेत.त्यांना काय घडले तेही माहित नाही...म्हणजे ते बोलताही नाहीत.". विश्वासनी माहिती दिली." त्यातला एक सुलेमान बेग असणार...होय ना?" मी विचारले." हो.तिघेजण विदेशी आहेत तर दोघे गोवन आहेत. सगळ्यांची गुन्हेगारी हिस्ट्री आहे.आणि हो, सुलेमानजवळ तो बच नागिनीचा बॉक्स सापडला आहे. उरलेल्यां जवळ ड्रग्स सापडलेत."' बरं झालं, आता आपल्या कर्माची फळे भोगतील.पण या संदर्भात गावाकर्यांना किंवा इथे उत्सव बघायला आलेल्यांना कळू देवू नका."" नाही कळणार, दोन टोळ्यांची आपसात भांडणे झालीत एवढंच आम्ही सांगितलंय.पण तूला हे असं घडणार हे आधी कसं कळलं?"" नाही मी ते सांगू शकत नाही. माझ्यावर बंधन आहेत आणि मीते मोडू शकत नाही. थोडं बाजूला येता..?" मी शरद म्हात्रेला बाजूला बोलावलं." ऐका...एक माजी एस.पी.आज इथे आलेत...ते का आलेत त्याचा कानोसा घ्या. दुसरं म्हणजे लपवलेला गडा म्हणजे कस्टम वालेनाईक यांची पण माहिती काढा."" पण ते तर अजून सापडेलेच नाहीत." विश्वास म्हणाला." कदाचित आज सापडतील...पण त्यांच्या जीवाला धोका होवू शकतो."  शरद व विश्वास माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत राहिले.पण मी सांगितलं तसं घडलं होतं.त्यामुळे त्यांना माझ्यावर विश्वास ठेवावा लागणार होता.तर माझा विश्वास राखणदारावर होता.  त्या पाचही जणांना ॲम्ब्युलन्स मध्ये घालून पणजीच्या दिशेने   घेऊन लोकल पोलिस गेले. "मी आजच वास्कोला नाईकांच्या ऑफिस मध्ये जातो." विश्वास म्हणाला." मी डिसोजा आणि नाईक यांचा काय संबंध होता याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.मला वाटत या प्रकरणात इथले पोलीस अधिकारी व राजकीय लोकही सहभागी असावेत." शरद म्हात्रे म्हणाले. मी विचार करत होतो की त्या पाचही गुन्हेगारांना देवचारानेकाठीने बडवले असणार व बांधून ठेवले असणार .आता उरलेल्या आयुष्यात ते भ्रमिष्ट किंवा ठार वेडे होवून राहतील हे नक्की होतं.कदाचित पोलीस किंवा कोर्टाने त्यांना शिक्षा दिली असती की नाही हे सांगणे अवघड आहे.पण ज्यांनी देवचाराच्या काठीचा मार खाल्ला ते आता नियतीच्या हातून सुटणार नव्हते.------*******--------******------*****-------****-----*****

​मुखवटे पुढे 

  मी पुन्हा परबांच्या घरी आलो." कित्ये झाला?"" तसं काही नाही. दोन गटांची बाचाबाची झाली."" गावा भायले लोक आसतले नू !"" होय." मी झटपट तयारी केली.आज मी पुन्हा एकदा गावाची परीक्रमाकरायची ठरवली.बारा राखणदारांच्या स्थानाच निरीक्षण...तिथले फोटो घेणे.नाईक यांच्या बद्दल माहिती मिळते ते पाहणे.जाणत्या लोकांकडून त्यांचे अनुभव जाणून घेणे.पण मी डोंगरावर जाणे मी टाळणार होतो.मला खात्री होती की नाईक त्या गुहेत असले तरी ते आता मला किंवा कुणालाच दिसणार नव्हते .मी बाराही राखणदारांच्या स्थळी पोहोचलो. मला एक ठिकाणी मोठ्या वहणांचे दहा जोडे दिसले त्यातील काही तळाला झिजलेले होते.हे जोड काही भक्त गण राखणदाराला अर्पण करतात.ह्या वहाणा राखणदार रात्री फिरताना वापरतो त्यामुळे त्या झिजतात अशी त्यांची श्रद्धा आहे.मी त्यांचे फोटो काढले.तेवड्यात मला विश्वासचा फोन आला की कालच्या हॉटेलमध्ये या म्हणून.मी तडक हॉटेल गाठले. ते दोघे चहा पीत बसले होते.मी त्यांच्या समोर बसलो." रत्नकांत,प्रकरण खूप मोठं आहे.नाईकांच्या ऑफिस मधून काही माहिती मिळाली.खर तर तिथले कुणी बोलतच नव्हते."विश्वास म्हणाला." नाईकांच्या जीवाला धोका आहे.योग्य माहिती मिळाली तरच ते वाचतील असं सांगितलं तेव्हा दोघेजण बोलले.दोन महिन्यांपूर्वी नाईकांनी पाच कोटींचे हिरे पकडले होते.त्यात दोन व्यक्तिंना जेरबंद केले होते.पण ते प्रकरण नाईकांवर दबाव टाकून दडपण्याचा आलं. यात डिसोजा व एक माजी मंत्री जो खूप प्रभावशाली आहे त्यांनी नाईकांवर दबाव टाकला होता.पण नाईकांनी ते फोन रेकॉर्ड केले होते." शरद म्हात्रे म्हणाले." हल्लीच नाईकांनी एका शिपवरचे कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ व छोटे शंभरावर बॉक्स ज्यात विषारी साप होते ते जप्त केले आहेत.या प्रकरणाची चौकशी कस्टम व अमली पदार्थ विरोधी दल करत आहे.यात सुध्दा तो नेता व त्याचा मुलगा आहे.व त्यांना वाचवण्यासाठी डिसोजा प्रयत्न करतोय पण नाईक आमिषांना आणि धमक्यांनाही भिक घालत नाहीत म्हणून त्यांना संपवण्याचा घाट घातला गेलाय."" आणि ह्या साठी गड्यांचा खेळ व त्यांना  देवचार लपवितो याचाउपयोग करण्याची त्यांनी ठरवलं असणार...नाईक गायब झाले म्हणजे देवपण बिघडलं अशी ओरड केली जाणार होती."मी अभावितपणे बोलून गेलो." म्हणजे नाईक सापडतील?" विश्वासने विचारले." त्यांचे अपहरण झाले नाही? त्यांना दगाफटका झाला नाही?शरदने विचारले."  आज रात्री नाईक मिळतील." मी बारीक आवाजात म्हणालो." आज सकाळी मिळालेले ते आंतरराष्ट्रीय गुन्हेगार...त्यांना कोणी पकडून दिले?" शरदने शंका विचारली. "सगळंच सांगेन पण उद्या ! आता तुम्ही काय करणार?"" आम्ही सगळा रिपोर्ट मुंबईत पाठवला आहे ...बघूया ."  आम्ही  तिथून बाहेर पडलो.      मी आणखी थोडा वेळ भटकलो.इथला निसर्ग...इथली माणसंत्यांची कोकणी...मालवणी व इंग्रजी मिश्रित भाषा सगळच मजेशीर होत.इथे बायका आबोली,सुरंगी, बकुळ यांच्या माळा केसांत माळतात. इथे या माळा वेळेसार... पाती या नावाने ओळखतात. मला वाटेत ही झाड दिसली होती. पिवळी टपोरी सुरंगी  आणि नाजूक बकुळ यांचा वास धुंद करणारा होता.अबोलीचे ताटवे मला जवळ जवळ प्रत्येकाच्या अंगणात दिसले होते.ही फुले कोल्हापूर...सातारा इथे दिसत नाहीत. इथली माणसं अगत्यशील व मदत करणारी आहेत.   सायंकाळी  माणसं येऊ लागली आज गडे खेळाचा शेवटचा दिवस होता.आज गडे स्मशानात जाणार होते.मलाही उत्सुकता होती. आज काहीतरी विलक्षण घडणार अस राहू राहून वाटत होत. रात्री नऊ वाजता आम्ही बाहेर पडलो. देवळा भोवती प्रचंड गर्दी होती.  ढोल घुमू लागले. गावकरी प्रथम महादेवाच्या देवळात गेले. गाऱ्हाणे झाले.नमन झाले मग सारे भूमिक देवळाजवळ आले.इथे गड्यांचे सांगणे झाले. गडे अवसार अंगात आल्याने नाचू लागले.ढोल ताश्याच्या साथीने रोंबाट पहिल्या राखणदाराच्या तिथे गेले. काही जण तोंडावर मुखवटे धारण करून नाचत होते.      तिथून माघारी फिरुन गडे धावत स्मशानभूमीकडे गेले. त्यांच्या पाठोपाठ काहीजण धावत होते. आता गावातल्या लाईट नव्हत्या.मंद चांदणं होत. स्मशानभूमीत नीरव शांतता होती.गडे तिथे पोहचले आणि अचानक पाने सळसळू लागली . आजूबाजूला वारा नव्हता फक्त स्मशानभूमीतली झाडे सळसळत होती. गडे इकडे तिकडे धावू लागले.तेवड्यात कुणीतरी हसत असल्याचा आवाज आला. सुरूवातीला आवाज मंद होता...अस्पष्ट होता. पण नंतर तो वाढला.काही बायका एकाचवेळी हसत असल्यासारखं वाटतं होत.तो क्षण थरारक होता.अंगावर काटा उभा राहिला. या आवाजातही गडे हू..हू करत हाताला येईल ती वस्तू उचलत होते.कोणी तिथली फुटलेली मडकी उचलली कुणी...टॉवेल तर कुणी अर्धवट जळालेला भलामोठा ओंडका उचलला. हसण्याचा आवाज बंद झाला होता.सगळे परतू लागले तशी एक अस्पष्ट किंकाळी वातावरण चिरीत ऐकू आली.त्यापाठोपाठ करूण रूदण ऐकू आले.सगळी चाळेगत एकाच वेळी उठल्या सारखं वाटत होतं.पण कुणीही पाठीवळून पाहिले नाही.       मांडाला प्रदक्षिणा घालून पुन्हा त्या वस्तू घेऊन गडे स्मशानभूमीत गेले . आणलेल्या वस्तू पुन्हा जाग्यावर ठेऊन परतले.देवळाजवळ आल्यावर सगळे ढोलांच्या आवाजावर नाचू लागले..आज दोन गडे लपवले गेले होते.त्यांना आणायला सगळे रानाच्या दिशेने गेले. आज पहिल्या दिवशी लपवलेला गडा म्हणजे नाईक सापडतील असा सगळ्या गावकर्यांचा विश्वास होता.दोन गडे रानात सापडले तर नाईक रानाजवळच्या शेतात सापडले.सगळे आनंदाने ढोल ताशे बडवत मंदिराच्या दिशेने निघाले.मांडाला फेर्यात मारून गड्यांना न्हावाण देण्यात आलं.तिघेही गडे शुध्दीवर आले.नाईक थोडे थकलेले होते.आता अखेरचे रोंबाट सुरू झाले.चित्र -विचित्र मुखवटे घातलेले लोक नाचत होते.यात मध्यभागी सगळे गडे नाचत होते.मी त्या गर्दीत पुढे सरकलो.माझ लक्ष दोन मुखवटाधार्यांकडे गेलं. ते बाबी नाईक यांच्या दिशेने पुढे सरकत होते.एकाने संकासूराचा मुखवटा घातला होता तर दुसर्याने दोन शिंगी राक्षसांचा.ते हळूहळू नाईक जे उजव्या बाजूला होते तिथे जात होते.तेवड्यात माझं लक्ष एकाच्या खिश्यातून डोकवणार्या रिव्हाॅल्वरच्या मुठीकडे गेलं." अरे ,देवा !" मी पुटपुटलो म्हणजे ते नाईकांवर गोळी झाडणार होते. माझी नजर विश्वास व शरद म्हात्रे कुठे दिसतात का ते शोधत होती. मला ते दिसले पण ते डाव्या बाजूला होते.आता काय होणार? पण माझा राखणदारावर विश्वास होता.त्यानेसांगितले होते की माझ्या मर्यादेत कुठल्याच माणसाचं कोणी वाईट करू शकत नाही म्हणून.         अचानक एक वाघाचा मुखवटा घातलेला इसम त्या दोन मुखवटाधारकांच्या दिशेने जाताना दिसला.भरदार शरीरयष्टी..रुंद खांदे लांब हात...मी थोडा दचकलो.माझ लक्ष त्यांच्या पायातल्या वहाणांकडे गेलं...तीच भलीमोठी कोल्हापूरी चप्पलेसारखी वहाण ..म्हणजे तो स्वतः राखणदार होता तर.हातातली काठी जमीनीवर आदळत तो विलक्षण वेगवान नृत्य करत होता.काठीला मध्यावर दोन पितळी घुंगरू बांधलेले होते.खरं तर सारे बेधुंद नाचत होते त्यामुळे कोणाचंच लक्ष त्याच्याकडे गेले नव्हते.शिवाय त्यांची उंची मर्यादित होती.तो राखणदार होतां, आपणास पाहिजे तसा बदल तो करू शकत होता.आता मी आश्वत झालो होतो. मी पण पुढे सरकलो.तो वाघरूपी इसम आता अगदी त्या संशयीतांजवळ पोहचला होता.संकासूराचा मुखवटा घातलेल्या गुंडांचा हात राखणदाराने आपल्या डाव्या हाताने खेचला...शक्तीपात झाल्यागत तो गुंड राखणदाराच्या बगलेत आवळला गेला.त्याचवेळी काठीचा तडाखा दुसऱ्या गुंडाच्या पायावर बसला.तो गुंड निपचित होत राखणदाराच्या उजव्या बगलेत कोसळला.दोघांना लिलया ओढत राखणदार अंधारात गायब झाला.तो पर्यंत विश्वास व शरद कसेबसे तिथे पोहचले.घामाघूम झालेल्या विश्वासाने विचारले..." रत्नकांत, ते ...ते दोघे कुठे गेले ते नाईकना उडवण्यासाठी आले होते."" सकाळी मिळतील...त्यांचा बंदोबस्त झालाय.आता नाईकना धोका नाही." "तू आमच्यापासून काहीतरी लपवत आहेस."" आता नाही पण नंतर जमेल तसं सांगेन." मी हसत म्हणालो.--------*******-------******-------******------*****------ दुसर्या दिवशी सकाळी दोन इसम एका काजर्राच्या झाडाला उलटे टांगलेले दिसले. दोघेही ठार वेडे झाले होते असंबद्ध बडबडत होते.त्यांच्या डोळ्यात भय थैमान घालत होते.काल रात्री डिसोजांना आऊट पोस्टवरच अर्धांगाचा झटका आला होता.त्यांना तातडीने पणजी तांबोळी येथे हलवले होते.त्यांच्या तोंडातून शब्दही धडपणे बाहेर पडत नव्हता.मला खात्री होती....तो माजी मंत्री आणि मुलगाही राखणदाराच्या तावडीतून सुटणार नव्हता.त्यांचे मुखवटे ही  राखणदार उतरवणार होता. कारण त्यांनी राखणदाराच्या मर्यादेत जाऊनत्याला आव्हान दिले होते.मी दुपारी परबांची परवानगी घेतली....त्यांचे आभार मानले.जाता जाता देवळात गेलो नमस्कार केला बाहेर पडताना माझं लक्ष मांडाच्या एका बाजूला चमकत असलेल्या वस्तू कडे गेलं. मी जवळ जाऊन पाहिले तर तो एक घुंगरू होता.काचेच्या गोटीएवडा टपोरा शुध्द पितळीचा ...त्याला छोटी साखळी होती..आणि तो माझ्या ओळखीचा होता. तो राखणदाराच्या काठीचा घुंगरू होता.मी उचलून घेतला... कदाचित राखणदाराची तशी इच्छा असावी की या घटनेची आठवण म्हणून तो माझंयाजवळ राहावा अशी. तो घुंगरू ते भले मोठे पावलांचे ठसे...माझ्या पुराणवस्तू संग्रहालयात आता कायमचे राहणार होते.

समाप्त( कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)बाळकृष्ण सखाराम राणे

      ​