पत्र सुमने.. Vrishali Gotkhindikar द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पत्र सुमने..


प्रिय सोना

ट्रिप करणे तुझा अगदी आवडीचा छंद होता

आपल्या दोघांनाही फिरायला खूप आवडायचे

मग ते फिरणे मॉर्निंग, evening Walk असो वा प्रवास

आपल्या 42 वर्षाच्या संपूर्ण वैवाहिक आयुष्यात आपण भरपूर फिरलो

अगदी आपण आपापल्या कामात असताना सुद्धा वेळ काढून ट्रीप केल्या

देश ,परदेश फिरलो

दुबई तर दोन वेळा केले

काश्मीर दोन वेळ झाले

राजस्थान गुजरात तीन चार वेळ घडवून आणले

नवीन विमान सेवा कुठेही सुरू झाली की पहिली चक्कर आपली असे

कोल्हापूर पुणे वंदे भारत सुरू झाल्यावर जाता येता पहिला प्रवास अगदी रीतसर व्यवस्थित बुकिंग करून आपण केला

तिरुपती जाणे मात्र आज उद्या करून राहून गेले

सगळा महाराष्ट्र फिरलो

तू त्याला महाराष्ट्र माझा फिरुन येऊ..

असे म्हणायचा

वेगवेगळे गड किल्ले

अनेक देवस्थाने

अनेक समुद्र किनारे

अनेक निर्जन ठिकाणे

एकदा फिरून आलो की आठ दहा दिवस गेल्यावर परत फिरायची टूम निघायची

आता कुठ जाऊया असा तुझा शोध चालू व्हायचा

इच्छित ठिकाणी आरामदायक प्रवास ..

उत्तम हॉटेल मध्ये आराम दायक वास्तव्य ..

त्या त्या ठिकाणचे उत्तम आणि प्रसिद्ध खाद्य पदार्थ चाखणे

हे आपले दोघांचे खूप आवडते काम असायचे

ट्रॅव्हल कंपनी सोबत टूर बुक करताना तुझा त्याविषयी संपूर्ण अभ्यास असायचा

त्या वेळेस तिथला मौसम कसा आहे

(हवामाना चा अभ्यास यात तुला नेहेमीच फार इंटरेस्ट असायचा)

त्यात काय काय दाखवतात

कुठ किती दिवस मुक्काम आहे

फार पळापळ नाही ना

हॉटेल कोणती आहेत

त्यांची नावे वाचून तू नेट वर त्या हॉटेलचे रिव्ह्यू चेक करायचा

तू स्वतः इतका सखोल अभ्यास करायचा की मला त्यात काही लक्ष घालावे असे बिलकुल वाटायचे नाही

किंबहुना मला काही स्कोपच नसायचा

तुझा इंटरेस्ट पाहून मला भारी कौतुक वाटायचे

प्रत्यक्ष टूर जवळ आली की आठ दिवस आधी पॅकिंग तयारी सुरू व्हायची

तू मला कोणते कपडे घालणार आहेस ते कपाटातून काढून ठेव असे सांगायचा

तुझे ही कपाटातले कपडे निवडायला माझी मदत घ्यायचा

त्यानंतर मग तुझी निवड सुरू व्हायची

हा ड्रेस नको घेऊ .

हा स्कर्ट घे

हा फ्रॉक का नाही घेतला

जाकीट लागणार आहे का

तुझ्या काटेकोर निवडीतून ट्रीपला न्यायच्या कपड्यांच्या घड्या तयार व्हायच्या

माझ्या फॅशनेबल कपड्यांची निवड नेहेमी तुच करत होतास

फॅशन चे पण माझ्या वयाला चेहऱ्याला सूट होणारे कपडे नेहेमीच तू घेत होतास

यानंतर सुरू व्हायचे तुझे काम..

टूर आयटीनरी प्रमाणे कपड्यांची निवड

जिथे तिथे त्या ड्रेस कोड प्रमाणे कपडे लावून घेणे

देऊळ, समुद्र किनारा, थंड हवेचे ठिकाण याप्रमाणे कपडे तू सॉर्ट करायचा

त्यातल्या त्यात तुझे कपडे माझे कपडे शक्यतो रंगा प्रमाणे मॅच करणे

हे सगळे झाले की

मग त्या त्या दिवसा प्रमाणे बॅग मध्ये कपडे ठेवणे

म्हणजे शेवटच्या दिवशीचे सर्वात खाली

पहिल्या दिवशीचे सर्वात वर या क्रमाने

शिवाय दोन बुटांचे जोड, अनेक थंडीचे अथवा नेहेमीचे सॉक्स,

फिरायच्या चपला

तुझे रुमाल, माझे स्कार्फ

जाकीट.. हे सर्व असायचे

कपड्यांच्या छान सुबक केलेल्या चौकोनी घड्या ठेवून तू भरलेली बॅग देखणी असे

बॅगच्या आतल्या कप्यात इनर वेअर काही दोन तीन प्लास्टिक पिशव्या रुमाल नॅपकिन

रोज वापरलेले आणि परत न घालायचे कपडे ठेवायला एक पिशवी

एका ठिकाणचे हॉटेल सोडताना सकाळचे आंघोळी नंतरचे ओले कपडे ठेवायला एक पिशवी

(हे ओले कपडे पुढच्या हॉटेल मध्ये गेले की लगेच वाळत घालायची आठवण करणे तुझेच काम 😊)

सोबत दोघांच्या ब्रश पेस्ट चा वेगळा पाउच

माझ्या मेकअप आणि कानातले गळ्यायले याचा एक पाउच

आणि तिसरा पाउच जो कायम तयार असे तो फक्त सोबत घ्यायचा

त्यात कात्री, तुझा दाढीचा ब्रश, तुझ्या दाढीचे लोशन, मेणबत्ती, काडेपेटी, पावडर, पफ, क्रीम, बेटनावेट, अमृतांजन, व्हिक्स, आपल्या घरची आवळा सुपारी, दोन चार छोटी चॉकलेट, अशा नेहेमी लागणाऱ्या वस्तू

शिवाय औषधाचा पाउच

ज्यात दोघांच्या ट्रिप दिवसा पुरत्या किंवा थोड्या जास्त..(ना जाणो ट्रिप लांबली तर..)गोळ्या, इतर डोकेदुखी, ताप, ॲसिडिटी वगैरे नेहेमी लागणाऱ्या गोळ्या असत

हे पाउच व्यवस्थित त्या त्या बॅगेत बसवणे तुझे कसब होते

कोणत्याही टूर मध्ये आपण घातलेले मॅचिंग कपडे ,बूट, गॉगल

आपली रोज सकाळची नियमित फिरायची टूर मधेही जपलेली सवय

आणि अर्थातच चोवीस तास आपण एकमेकात सामावून गेलेले असणे

या सर्व गोष्टींची चर्चा चालत असे

जी कधी कधी डायरेक्ट आपल्याही कानावर घातली जात असे 😊

आपण युरोप टूर वर गेलो तेव्हा तर त्या त्या ठिकाणा नुसार पेन्सिल स्कर्ट, वन पीस,जंप सूट, वेगवेगळे फ्रॉक, जीन पँट, टी शर्ट असे अतिशय फॅशनेबल कपडे तू माझ्या साठी खास ऍमेझॉन वरून मागवले होतेस

आणि त्याच सोबत तुझे सुद्धा मला मॅच होणारे कपडे तू घेतले होतेस

त्या टूर मध्ये रोज सकाळी आपण कोणते कपडे घातले याची चर्चा ग्रुप मध्ये चालत असे

खुप कौतुक वाटत असे लोकांना आपल्या कपड्यांचे आणि समरसपणाचे .

अर्थात याचे जास्त श्रेय मी तुलाच देईन 😊