कापूस S Patil द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तिजोरी - प्रकरण 4

    प्रकरण ४कोलाघाट ला आल्या नंतर बंगली भाषेतली  एक भली मोठी पाट...

  • तोतया वारसदार - भाग 40

    तोतया वारसदार पात्र रचना बबन                       सारंग वकि...

  • टाईम पॅराडॉक्स - 1

    अध्याय १---------------वेड आणि यंत्रणा----------------------...

  • विलक्षण - 1

    विलक्षण १ जानेवारी २०२५जानेवारीचा महिना हवेत खुप गारवा होता....

  • आसरा

    आज त्याचा वाढदिवस होता अप्पाना माहित होते की, आज तो येणार भे...

श्रेणी
शेयर करा

कापूस

व्हीलचेयर चारू आणि एक ट्रकर 


चारूने आपले तपकिरी केस मागे सारले. उन्हामुळे तिचे गाल पार गुलाबी झाले होते. तिच्या कपाळावर घामाचे थेंब साकाळले होते. घामाचे ते ओघळ तिच्या मानेवरुन छातीवर टपकत होते. 

तिची व्हीलचेअर पुढे सरकत होती. बोटं त्या व्हिलचेअरच्या रिमोटची बटणं दाबत होती. तिची चाकं गरागरा फिरत होती. 

"मी पुण्यात चाललेय, शहराकडे," ती अगदी हळू आवाजात म्हणाली.

ट्रकच्या डायव्हर सीटवर बसलेल्या पंकजने मान डोललवली. 

“असं का? एकटीनेच जाता की काय मग?”

स्टेअरिंग व्हीलवरचा हात आवळत पंकज म्हणाला. त्याच्या हातावर जुन्या जखमेच्या खुणा होत्या. 

ट्रकमध्ये चामडं आणि डिझेलचा वास भरून राहिला होता. पंकजने तिला डोक्यापासून पायांपर्यंत न्याहाळलं. जणू तो काहीतरी पारखत असावा. तिचे मऊशार गाल, सडपातळ मान, मनमोहक डोळे. ती दिसायला चित्रपटातल्या नटींसाठी नसली तरी गोरीपान आणि कोवळ्या शरीराची होती. फुलण्याआधी कशी कळी असते ना? नाजूकशी? तशीच. 

“हो,” चारू म्हणाली. 

बिबवेवाडी ते पुणे शहर... तसं अंतर फार नव्हत. ती गाडीत किंवा बसमध्ये असती, तर एक- दोन तासांचा प्रवास. पण चारू? ती होती तिच्या चाकाच्या खुर्चीवर. तिच्या व्हीलचेअरवर. 

रस्त्यावरचा डांबर आता चांगलाच तापला होता. भर दुपारी ती अशी का बाहेर पडली असावी? कोणालाच काही न सांगता? मनात कोणताही मोठा बेत नव्हता. पण कारण मात्र अगदी उघड होतं. तिला आता मोकळं व्हायचं होतं.

तिने घर सोडलं होतं. घरी तिचं होतं तरी कोण? वहिनी तिला बघून बिनपायचं गाठोड म्हणायची. आई नेहमी एक ओझं समजायची. आणि तिचे बाबा? त्यांना वाटायचं की हिचं कसं तरी लग्न उरकून टाकावं. 

ती एखादं जुनं फर्निचर होती का? कुणाच्या तरी गळ्यात मारण्यासाठी? आणि घरातली जागा रिकामी करायचीय म्हणून तिनं निघून जावं? तिचं मन आता कोरडं पडलं होतं.

वैशाखाचं ऊन. ते अंगाची लाहीलाही करत होतं. पण तिला त्याची पर्वा नव्हती. घरातल्या त्या दिखाव्याच्या सावलीपेक्षा हे चटका देणारं ऊन तिला जास्त खरं वाटत होतं.

" मॅडम... प्रवासासाठी रस्ता तर भारीच निवडलायस!” पंकज हसून म्हणाला. “पण अशा नाजूक मुलीसाठी हा रोड सुरक्षित नाहीये," पंकजने सीटवर जरा सरकून म्हटलं. त्याच्या रुंद खांद्यांवरचा तो जुना फ्लॅनेल शर्ट पार ताणला गेला.

"आत येऊन बैस. हा माझा ट्रक तुला जिथे जायचंय तिथे सुखरूप पोहोचवेल... आणि काळजी नको करू, मी उगाच फालतू प्रश्न विचारणार नाही," असं म्हणत पंकजने त्याच्या दाढीखालून एक मिश्किल हसू उमटू दिलं आणि शेजारच्या सीट कडे खुणावलं. 

चारूने आपला भिजलेला ड्रेस थोडा नीट केला. तो पार घामाने डबडबून तिच्या अंगाला चिकटला होता. "मला लिफ्ट नकोय, धन्यवाद! जा तुम्ही. या मॅपवर मी पुण्यापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर आहे," ती पुटपुटली. तो मोठा कागदी नकाशा तिनं कसाबसा दोन हातांच्या मध्ये दुमडून धरला होता. त्यात डोकं घालून ती खुर्चीच्या रिमोटची बटणं बदलत होती. 

दहा मिनिटं? की दहा मैल? हा नकाशा उलटा तर पकडला नाही ना मी? तिनं मनातच म्हटलं. 

"दहा मिनिटं?" पंकज हसला. 

स्टिअरिंग व्हीलवर त्याची खरखरीत बोटं फिरली. 

"ही वाट पुढे कच्ची होते… दगड धोंडे आहेत पुढे. तुझी ही फिरती खुर्ची कशी जाईल? …..आणि तो तुझा नकाशा? माझ्या या ट्रकपेक्षाही जुना वाटतोय मला!"

"मी... मी जाईन . काही हरकत नाही," चारू चाचरत म्हणाली.

पंकजने ट्रकमधलं एसी जोरात चालू केलं. गारव्याची एक झुळूक खिडकीतून बाहेर आली. चारूच्या चेहऱ्याला शिवली. किती गार. थंड. नितळ.

त्याने हात पुढे करून चारूच्या हातातला तो नकाशा घेतला. घेताना त्याचा तो रापलेला हात चारूच्या मऊ हाताला शिवून गेला. 

"तुला वाटतंय मी कुणीतरी भलताच आहे? पोटापाण्यासाठी ट्रक चालवतो. या उन्हात तुला असं सोडून गेलो, तर रात्री झोप लागणार नाही मला."

पंकजचा आवाज आता थोडा मऊ झाला. त्यात एक काळजी होती. "चल, बैस. पुढच्या नाक्यावर चहा पाजतो तुला. मग तिथे बघ तुझा हा नकाशा...आणि ठरव मग. काय?"

तो तापलेला सूर्य आणि तो न संपणारा रस्ता बघून तिने हार मानली. 

"ठीक आहे..." ती पुटपुटली.

पंकजने तिची व्हीलचेयर उचलून ट्रकवर ठेवली. तिने तिचा चांगला पाय ट्रकच्या पायऱ्यांवर ठेवला. पंकजने तिला वर ओढलं. ती काशीबशी पैसेंजर सीटवर बसली. 

बसताना तिचं ते मऊ शरीर, ती छातीवरची ती मऊ वळणं एका लयीत हलली. जणू काही मऊ कापसाचा पुतळा तिथे बसला होता.

पंकजची नजर चारूच्या छातीवर स्थिरावली होती. जणू काही तो तिचं मोजमाप घेत होता. त्याने एक्सिलरेटरवर पाय दाबला, ट्रकने वेग घेतला आणि त्या इंजिनचा आवाज दोघांच्या आजूबाजूला घुमत राहिला.

"खूप सुंदर दिसतेस तू..." पंकजने कुलरमधून पाण्याची एक बाटली काढली. त्याचा तो हात चारूच्या दिशेने सरकला. "तुझ्यासारख्या मुलीला ट्रकमध्ये बसवून फिरवण्याची मजाच न्यारी...नाहीतर आम्हा ट्रकवाल्यांना या काळ्या रस्त्यांवर कुठे दिसतं असं नाजूक रूपडं."

ट्रक रस्त्यावरून धावत होता. चारुची छाती नी तिचे गोंडस गाल वर खाली हलत होते. केबिनमधला एसी चारूच्या त्या घामेजलेल्या त्वचेला शिवून जात होता. प्रत्येक झोताबरोबर तिचे ओठ शहरात होते. केबिनमध्ये पंकजच्या मर्दान्या शरीराचा तो पुरुषी दर्प हळूहळू पसरला. 

तो हिंदी चित्रपटांची गाणी गुणगुणू लागला. 

"कुठे राहतेस गं?" त्याने चारुकडे वळून म्हटलं. 

"तुला एखादा बॉयफ्रेंड असेलच की...? कोणाचं नशीब उघडलंय?"

चारू थोडी अस्वस्थ झाली. तिने आपले हात स्वतःच्या छातीवर आडवे धरले. ती तिच्या शरीराला पंकजच्या नजरेपासून वाचवू पाहत होती. 

"मी... मी खूप लांबून आलेय. माझं आता असं कोणतं घर उरलेलं नाहीये," ती अगदी कातर आवाजात म्हणाली. तिच्या डोळ्यांतली ती असहायता पंकजच्या काळजाला भिडली.

पंकजच्या चेहऱ्यावरचे कठोर भाव थोडे निवळले, पण त्याच्या डोळ्यांतली ती भूक तशीच होती. 

रेडिओवरचं ते जुनं संगीत मंद आवाजात वाजत होतं आणि ट्रक आपली वाट कापत होता.

"घर नाहीये?" पंकजने एसीचं तोंड तिच्या चेहऱ्यावरून खाली करून थेट तिच्या अंगावर नेलं. त्याची नजर कधी रस्त्याकडे, तर कधी चारूच्या त्या लुसलुशीत गालांकडे वळत होती. "किती दिवसांपासून अशी एकटीच फिरतेयस या रस्त्यांवर?" तो म्हणाला. "आणि का जातेस घर सोडून?"

चारू त्यावर काहीच बोलली नाही. 

पंकजाच्या शर्टाच्या बाह्या दुमडल्या होत्या. त्याचे ते पिळदार, रापलेले हात स्पष्ट दिसत होते. बाहेरच्या सूर्याचा तो तांबूस प्रकाश त्याच्या रांगड्या आणि घामटलेल्या चेहऱ्याला अधिकच रांगडा बनवत होता. 

" ठीक आहे...घर नाही. मग नाव? ते तरी आहे का?"  

त्याने त्याचा आवाज थोडा बदलला. मऊ आणि शांत स्वरात तो म्हणाला. 

"आणि ते डोळे, तो चेहरा..तुझं ते शरीर…लाजू नकोस गं. रस्त्यावर मी खूप काही पाहिलंय. लाजण्यासारखं यात काय आहे?"

"मी चारू..." 

ती अगदी हळू आवाजात पुटपुटली. ट्रक जेव्हा त्या खडबडीत रस्त्यावरून उसळत होता, तेव्हा त्या प्रत्येक झटक्यासोबत ती सिटवरून उसळत होती. तिने आपले ते मऊ पाय एकमेकांना घट्ट चिटकवून घेतले. सीटवर स्वतःला धरून घेत ती थोडी वाकून बसली.

चारूची ती प्रत्येक हालचाल पंकजच्या नजरेतून सुटत नव्हती. तिने पाय जवळ घेताच त्याच्या डोळ्यांत एक शिकारी चमक आली. समोरचा रस्ता अगदी रिकामा होता, फक्त अधूनमधून वाळलेलं गवत वाऱ्याने उडताना दिसत होतं.

"चारू..." पंकजने ते नाव जणू जिभेवर घोळवलं. "छान नाव आहे. मला इथे 'डिझेल' म्हणतात, पण तसं माझं नाव पंकज. सोळाव्या वर्षापासून ट्रक चालवतोय.... खूप दुनिया पाहिलीये मी."

पंकजने रेडिओचा आवाज थोडा कमी केला. केबिनमध्ये आता एक वेगळाच एकांत जाणवू लागला होता. तो सीटवर थोडा कलला, तसा त्या लेदरच्या सीटचा कुरकुरीत आवाज आला.

"बरं, तू सांगितलं नाहीस, कशापासून तरी पळ काढतेयस?" 

"नाही...काही नाही...तिथे माझं कोणीच नाही. मी...माझ्या...काही नाही. जाऊ दे," ती एक सुस्कारा सोडत म्हणाली. 

"...चारू?"

तिने त्याच्याकडे दचकून पाहिलं. तिचं नाव त्याच्या ओठांवर. त्याच्या राकट आवाजात. त्या नावाची अक्षरं, काना, मात्रा जणू तो चाखत होता. 

"आशा वेळी आपल्याला कोणाचा तरी...सपोर्ट हवा असतो. बघ,?या ट्रकमध्ये बरीच जागा आहे... जर तुला कुठेतरी विसावा हवा असेल, तर तू इथे राहू शकतेस."

ती त्यावर काहीच म्हणाली नाही. ती पुण्याला जाऊन काय करणार आहे हे तिचं तीलाही ठाऊक नव्हतं. पण या ट्रकमध्ये, आणि ते ही या अनोळखी पुरुषाबरोबर? छे! नाही. ति एकटी होती. या जगात तिचं असं कोणीच नव्हतं. पण ती मूर्ख नव्हती.

"घाई कशाला करतेस? खूप दिवसांनी कुणीतरी मनासारखं सोबतीला मिळालंय मला..."

"मी अजून काहीच ठरवलं नाहीये... फक्त शहरात जायचं आणि पुढे काय होतंय ते बघायचं, एवढंच मनात आहे," 

त्याने अचानक ट्रक एका कच्च्या रस्त्याकडे वळवला. 

"विचार करायला खूप वेळ आहे आपल्याकडे. शहर अजून लांब आहे... तोपर्यंत तू तुझं काय ते ठरव."

सूर्य आता बराच खाली झुकला होता, क्षितिजावर जणू रंगांची उधळण झाली होती. पंकजने आपले ते रुंद खांदे सीटवर टेकवले आणि तो थोडा रिलॅक्स झाला.