झिरो टू हिरो: किरण गायकवाड...- भाग 3 Mayuri shelar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

झिरो टू हिरो: किरण गायकवाड...- भाग 3

(मागच्या भागात आपण पाहिले किरण चे दहावी पर्यंत चे शिक्षण त्याच्या गावी झाले. पुण्यात परत आल्यावर त्याचा इंजिनिअर मध्ये नंबर लागला पण घरच्या परिस्थिती मुळे तो पुढे जाऊ शकला नाही.आता पुढे.)

किरणला इंजिनिअर मध्ये जाता नाही आले.म्हणून दहावीनंतर पुढे त्याची कॉलेज लाइफ सुरू झाली. अकरावी प्रवेशासाठी कोणत्या शाखेत जावे हा प्रश्न त्याला पडत होता. बरेचजण त्याला वेगवेगळे पर्याय देत होते. कोणीतरी त्याला सागितलं होत की आर्ट्स घेऊ नको.मग त्याच त्याला माहित होतं की, सायन्स त्याला काही झेपणार नाही. आर्ट्स ला जायला नको.मग राहील कॉमर्स.त्याचा निर्णय झाला कॉमर्स शाखेत प्रवेश करण्याचा.

किरणच पहिल प्रेम हे म्युझिक आहे.पण त्याला गाता येत नाही. Dj वर तो ज्या सुपाऱ्या लागायच्या त्यासाठी तो जायचा. Dj ऑपरेट करायचा.dj च खूप आकर्षण होत त्याला. जर सण उत्सव, मिरवणूक असेल मनपा ला तर तो आणि त्याचा मित्र कोथरूडवरून मनपा ला सायकलवर जायचे. ते ऐकायला, बघायला खूप भारी वाटायचं त्याला. योगायोगाने किरण जिथे कामाला होता तिथल्या dj च्या ऑनर चा स्वतः चा साउंड होता. त्याच्याकडे त्याला काम मिळाले साउंड उचलायचे. किरण ने ठरवले की,"चला ऍटलिस्ट साउंड उचलायला जाऊ ऐकायला तरी मिळेल." किरणला dj चा खूप नाद होता. किरण साउंड डोक्यावर उचलून तो जिथे उत्सव, मिरवणूक असेल तिथे न्यायचा.

एक दिवस त्या डीजेचा जो ऑपरेटर होता तो आजारी पडला.

Dj चा मालक म्हणाला," अरे आज ऑर्डर आहे तो शो सुरू होईल आणि आता dj ऑपरेट कोण करील."

किरण तिथेच होता तो लगेच म्हणाला," मी करू का हे काम. मला येत थोड थोड."

मालक म्हणाला," बरं पण जमेल ना तुला व्यवस्थित मी सांगेन तसं कर."

किरण म्हणाला," हो जमेल मला."

तिथे रोज उभ राहून बघून त्याला ते ज्ञान अवगत झालं होत. तर त्यादिवशी किरण dj ऑपरेट करायला उभा राहिला . त्याने त्या दिवशी बऱ्यापैकी ऑपरेट केलं.

त्या साउंडच्या मालकाला त्याचे काम खूप आवडले.

मालक किरणला म्हणाला," किरण, तू खूप छान ऑपरेट केलं."

किरण म्हणाला," थँक्यू सर. मला खूप आवड आहे dj ची. आणि रोज बघतो मी यामुळे dj बद्दल कळत चाललय सगळ."

मालक म्हणाला," अरे वा, किरण यापुढे तूच कर ऑपरेट. इथून पुढे तू dj ऑपरेटर. हे काम आता तुलाच."

किरण म्हणाला," हो चालेल सर. खूप थँक्यू."

तर इथून पुढे किरण dj ऑपरेटर चे काम करू लागला. डीजे त्याच्यासाठी पैसे कमावण्यासाठी तर होतेच पण त्याचे आवडीचे क्षेत्र ही होते. म्हणून त्याने तो पर्याय निवडला. तो पूर्वी Dj ऑपरेटर ला साउंड ऑपरेटर म्हणायचा. मग त्याला कळायला लागलं की ह्याला Dj म्हणतात. मग त्याने त्याची पूर्ण खोलात माहिती काढायला घेतली. त्याला डिस्क जॉकी म्हणजे शॉर्टकट Dj म्हणतात हे कळले. मग त्यानंतर त्याला कळले की Dj च फक्त ऑपरेट करण्याचं काम नाही तर कम्पोजिंग पण करणं असत.मग किरणने कम्पोजिंग करायला सुरुवात केली.म्हणजे त्याने कम्पोजिंग चा एक प्रॉपर क्लास सुरू केला. त्यात त्याने त्याचे नॉलेज घेतले. कम्पोजिंग चा स्टेप बाय स्टेप सर्व शिकून घेतलं. मग त्याने म्यूजिक प्रोडक्शन मध्ये सुरूवात केली.म्हणजे एखाद्याचे ओरिजनल साँग असेल ते तो dj मध्ये तयार करून द्यायचा. त्याच शालेय जीवन त्यानंतर कॉलेज लाइफ सुरू आणि त्यात dj चा प्रवास.

त्यावेळेस किरणला एक वेगळाच कॉन्फिडन्स होता की, हजार ओडियन्स, लोकांसमोर तो कॉन्फिडंटली dj ऑपरेट करू शकत होता.त्याच्या त्या बोटांवरती ते समोरच पब्लिक नाचत होत, ताल धरत होत. किरण तिथून मग dj ऑर्डर घेऊ लागला. पुण्यात मग जे काही सगळे क्लबस असतील तिथे तो Dj वाजवायला लागला. गणपती सणाच्या वेळी पुण्यात लक्ष्मीरोड,अलका चौक, कुमठेकर रोड इथे सगळीकडे किरण dj वाजवायचं काम करायचा.

किरण कॉलेज सोबतच dj च पण काम करायचा.किरण dj मुळे ऑर्डर्स वर जायचा त्यामुळे कॉलेज कडे फारसे लक्ष्य त्याचे नव्हते. आणि कॉलेज मध्ये वर्गात फारसा तो बसतही नव्हता. सतत मुलांसोबत मस्ती,खोड्या, भांडण,मारामारी होत असे. कॉलेज पेक्षा तो dj कडे जास्त लक्ष्य आणि वेळ देत असे. मित्रांसोबत पुण्यातच हेवन स्नॅक्स सेंटर नावाचा कॅन्टीन तिथे जाऊन बसायचा. एखाद्या कट्ट्यावर किंवा एखाद्या दुसऱ्याच ठिकाणी जाऊन बसणे असच त्याच कॉलेजच वर्ष जात होते.

 किरण dj च्या ऑर्डर मिळाल्या की पुण्यात इकडेतिकडे dj वाजवायला जायचा. एकदा त्याच्या मनात आले की," खूप दिवस झाले कॉलेजला गेलोच नाही.उद्या काही ऑर्डर नाहीत तर चला बघू कॉलेज कस आहे ते." किरण दुसऱ्या दिवशी साधारण एक - दीड महिन्यांनी किरण कॉलेज मध्ये आला. त्याचा मित्र त्याला पाहून त्याच्या जवळ आला.

मित्र म्हणाला," काय रे किरण किती महिन्यांनी आलास कॉलेजला."

किरण म्हणाला," अरे हो. खूप दिवसांनी विचार आला की. चला बघू काय चाललंय कॉलेज मध्ये."

मित्र म्हणाला," पण आता एक्झाम सुरू आहे.आज सेकंड पेपर आहे."

किरण म्हणाला," काय ? अरे पण मी अभ्यास पण नाही केला.आता काय करु."

मित्र म्हणाला," घे आता. एक तर खूप दिवसांनी आलास. तेही पेपर च्या दिवशी. अभ्यास थोडा फार तरी केलास की नाही."

किरण म्हणाला," अरे मी dj वाजवायला जायचो. ऑर्डर्स असायच्या यामुळे जमेल तेवढा थोडा करायचो.पण इतकाही नाही. मला काय माहित आज एक्झाम आहे म्हणून."

मित्र म्हणाला," बरं मग आता काय करशील ?"

किरण म्हणाला," आता काय जमेल तेवढं लिहीन."

मित्र म्हणाला," ठीक आहे मी आता तुला नोट्स देतो.ते वाच आणि जमेल तेवढं पाठ कर."

किरण म्हणाला," हा.. दे.

किरण ने नोट्स घेतल्या.पाठ केलं. पेपर सुरू झाला. किरणने त्यादिवशी जमेल तेवढा पेपर लिहिला आणि दुसऱ्या दिवशी पासून रोज कॉलेज ला यायला लागला.

 ( किरण ने dj ऑपरेटर म्हणून सुरुवात केली त्याचबरोबर कॉलेज पण. आता पुढे तो काय करील जाणून घेऊया पुढच्या भागात )