आज्जी Reshma द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आज्जी

*जुन्या घराचा दरवाजा* 


लहानपणापासून आजी सांगायची, "आपल्या वाड्याच्या शेवटच्या खोलीचा दरवाजा कधीच उघडू नकोस."

मी हसायचो "आजी, भूत असतात का खरंच?" 
आजी फक्त माळ्याकडे बोट दाखवायची आणि म्हणायची "रात्री 12 नंतर त्या दरवाज्यातून आवाज येतो."

गेल्या महिन्यात आजी गेली. वाडा माझ्या नावावर झाला. 
पुण्यातली नोकरी सोडून मी गावाला आलो... तस मला कधी शहरात जायचच न्हवत.. बाप जादयाचीं इतकी प्रॉपर्टी असताना ही आज्जीनी मला बळच पुण्याला धाडल..
म्हणायची इथं राहिलास तर तिची नजर तुझ्यावर राहील..
कोण ती आणी कसली नजर तिने कधी सांगितलं नाही आणी मला ही जाणून घेण्यात इंटरेस्ट न्हवता..

आज्जी गेली आणी मी गावी परतलो..पुण्यात त्या तुंडपूज्या पगारात भागत न्हवते.. आणी आत्ता तसे गाव देखील गाव राहील न्हवत..
आज्जी होती तो वर तिने या भल्या मोठ्या वाड्याची कधी दुरुस्ती करून दिली नाही की कधी कोनी भाडेकरू ठेवू दिले नाही..
या वीस तीस खोल्यांच्या वाड्यात ती एकटीच राहायची..
म्हणायची ती इथे कोणाला राहू देणार नाही..
पण कोण ती मला कधी कळच नाही..
आणी नाही कधी दिसल नाही..
पण आत्ता ती गेल्यावर मात्र मी ठरवलं... या वाड्याची डागडुजी करून इथच रहायचं..
भाडेकरू ठेवून मस्त आरामात जिवन जगायच..
इतकी प्रॉपर्टी असताना का त्या शहरात रहायच..
पण एकटं राहायचं होतं आणि भाडं पण वाचायचं होतं..

"तसा मी स्वतः इंजिनिअर असल्याने स्वतः जमेल तितक दुरुस्ती सुरु केली... ऐक ऐक खोली ठीक करत त्या रूम समोर आलो..
हिच ती खोली जिथे आज्जी जाऊ द्यायची नाही... की तिच्या कडे पाहू देखील द्यायची नाही...
बसताना ही तिच्या कडे पाठ करुनच बसायची...

पहिल्या दिवशीच मला तो दरवाजा दिसला. 
लाकडी, काळा पडलेला, त्यावर जंग लागलेलं कुलूप...
ऐक दोन प्रयत्नातच मी ते कुलूप दरवाजा पासून वेगळ केल..
दरवाजा उघडला 
तसा मंद दुर्गंधीचा भपका नाकात शिरला... जणू शतकान पासून खोली बंद होती...
कदाचित होती सुद्धा कारण मी जन्मल्या पासून तर मी कधीच ही खोली उघडी पहिली न्हवती...

मी कुलूप तोडलं. आत अंधार. 
फक्त एक जुना पाळणा आणि त्यावर पांढरी साडी..
सगळ कस विचित्र होत... भीती दायक ही काही न्हवत..
खोली सारखी खोली... फक्त आडगळ कमी होती..
तरी ही सगळे का भितात इथे यायला..
याचानक माझ्या डोक्यात ऐक विचार चमकला..
कदाचित..
आमंच्या अती श्रीमंत बापजादयानीं इथं काही घाबड तर लपवले नसेल ना?.

"त्यांनी हुशारी करून भूताटकीचे नाव देवून खोली बंद तर केली नसेल ना...
'अचानक माझ्या अंगात हुरूप आल... आणी उद्याच या खोलीची छान बिन करू म्हणून खोली बाहेर पडलो..
आनंदात रात्री जेवण ही गेल नाही तसाच झोपी गेलो...



पण त्या रात्री 12 वाजता कसल्याश्या आवाजाने जाग आली घड्याळात पाहिलं तर रात्रीचे बारा वाजलेले..आवाज आला...

 "ढ्यांय... ढ्यांय..." 
लहान मुलाचा आवाज होता तो.. त्या बरोबर कोणी तरी हळू आवाजात अंगाई गात असल्याचा आवाज देखील येत होता...
अचानक हे आवाज माझे तर हात पाय थरथरले...
 हिम्मत करून मी बाहेर आलो..
समोरच ती खोली होती... आणी आत्ता मला खोळीतील पाळणा 
पाळणा आपोआप हलतांना दिसत होता...
बाजूलाच ऐक बाई पाळण्याची दोरी ओढतांना दिसत होती...
आज्जी सारखी काष्टी साठी कपाळावर ठसठशीत कुंकू...नाकात नथ...
ओठांची हालचाल करत ती सुरेल आवाजात अंगाई म्हणत होती..
पण अचानक तिने माझ्याकडे नजर वर करून पाहिलं... आणी माझी तनतंरली..

"मी बेशुद्ध होता होता राहिलो... आणी लगेच देवघरा कडे धाव घेतली..
तसा मी घाबरट न्हवतो... पण असलं दुष्य आयुष्यात पहिल्यांदा पहिल्याने हात पाय थोडे थरथरत होते...

"पूर्ण रात्र भर तो खेळ चालू होता... दरवाजा उघडा होता पण ती बाई बाहेर येत न्हवती... पण मला दिसेल अशी त्या खोलीत बाळाला घेऊन उभी होती...
आपल्या बाळाच्या पाठीवरून हात फिरवत अंगाई म्हणत ती माझ्याकडे पहात होती..
दरवाजा बंद करण्याची ही माझ्यात ताकद न्हवती...
मी तसाच मान खाली घालून बसलेलो..
आत्ता मला कळत होते...
आज्जीने मला इथून का हक्कल होत...
का ती कोणाला इथे राहू देत न्हवती...
पण तरी ही मला हे समजतं न्हवते... वयाचे वीस वर्षे मी इथे रहात होतो तेव्हा का बर ती मला दिसली नाही..

उत्तर होत... कारण तेव्हा माझ्या पाठी माजी आज्जी होती... आणी कोणी कधीच त्या खोलीचे दार ही उघडले न्हवते...
सकाळ होता होता ती बाई गायब झाली.. तसा हिम्मत करून मी बाहेर आलो... 
पण रात्रीचा प्रसंग आणी ती बाई डोळ्यासमोरून जात न्हवती....

"कोण होती ती इथे का?"..

आणी आज्जी तिला का घाबरत न्हवती?...आणी मला ती थोडी ओळखीचीं का वाटतं होती.. अचानक मला काहीतरी आठवले आणी मी पळत आज्जीच्या खोलीत गेलो... कपाटावर असलेल्या ऐका मोठ्या ट्रकं मध्ये जुने फोटो ठेवलेले होते... 
मि झर झर ते डोळ्यां समोरून बाजूला केला आणी अचानक ऐका फोटोवर माझी नजर पडली..
माझ्या आजोबांच्या बाजूला तीच बाई उभी होती..
म्हणजे ही सुद्धा माझी आज्जी होती... माझ्या आज्जीचीं सवत... बाबांची मोठी आई...
बाबा सांगायचे ती खूप चांगली होती म्हणून पण तिला ऐका पाठोपाठ ऐक मुलीच होत होत्या...
म्हणून आजोबांनी दुसर. लग्न केल..
माझ्या आज्जी बरोबर... आज्जीला पहिलाच मुलगा झाला माझे बाबा त्यांचे ति खूप लाड करायची ..

तिला ही स्वतःचा मुलगा हवा होता पण आज्जीला सातवी सुद्धा मुलगी झाली आणी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली..

झरझर सगळ डोळ्यासमोरून सरकलं..
कदाचित त्याच मुळे ती माझा राग करत असेल...

मी लगेच त्या रूम जवळ गेलो आणी दरवाजा बंद केला.. आत्ता दरवाजा बंद झाला म्हणजे सगळ शांत झाल अस वाटल...
पण नाही रात्री पुन्हा तोच खेळ सुरु... कदाचित ती खोली उघडून मी चूक केली होती... पण आत्ता मी थोडा सावरलो होतो...
ती माझ्या कडे पहात होती... तेव्हा मी ही तिच्याकडे पाहिले..
जणू मला आत्ता तिची मला भीती वाटतं न्हवती... बाबांनी तिच्या प्रेमा बद्दल इतक सांगितले होते की...
मला तिची भीती वाटतं न्हवती उलट.. तु मला म्हणजे तुझ्या नातवालाच भीती दाखवतेस.. म्हणून तिलाच भावुक करण्याचा प्रयत्न करत होतो...

"अचानक तिने मला इकडे ए म्हणून खुणावले..
आणी मलाच माहित नाही कस पण इतकी भीती वाटतं असताना ही मी तिच्याकडे गेलो ही...

माझ्या अंगावर काटा आलेला..
पण मी ठरवलं, घाबरून जाणार नाही.



मी धीर करून खोलीत गेले. मोबाईलचा टॉर्च लावला.
पाळणा रिकामा होता. पण जमिनीवर ओले पायांचे ठसे होते. 
ठसे सरळ माझ्यापर्यंत आले... आणि थांबले 
अचानक माझ्या कानात कुजबुज आली ..

"जस हे घर तुझ आहे तसच तीच ही आहे पण तुला सगळ मिळाल तिच्या वाट्याला मात्र मरण आले ..."
मला काहीच समजतं न्हवते...
तो आवाज भीतीदायक रागीट होता... पण मला भीती वाटतं न्हवती... कारण मला तिच्यात माझी मोठी आज्जी दिसत होती....

'मी समोर पाहिलं त्या लाकडी पाळण्यात पांढऱ्या वास्त्रात गुंडाळलेले छोटे बाळ होते... हळू हळू ते वस्त्र रक्ताने माखले..
मी जोरात ओरडलो.... 
पण भीतीने बाहेर न येता... अनावध पणे पुढे धावलो... त्या बाळाच्या डोक्यातून रक्त वाहत होते... अस वाटतं होते कोणी तरी आत्ताच प्रहार केलाय...
मला काहीच समजतं न्हवत.. समोरचा भास आहे हे ही विसरलो होतो..
खिश्यातून रुमाल काढून मी गडबडून त्याच्या कपाळाला लावला..

"आज्जी काय झाल या बाळाला?.. मी वाचवेल याला "..
माझ्या ही नकळत मी त्या बाळाला उचलल आणी खोलीच्या बाहेर धावलो... पण दरवाजा पर्यन्त येताच सगळ कस पूर्व व्रत झाले तीच कुबाटलेली खोली.. तोच जाळ्यानीं माखलेला पाळणा इतकंच काय खांद्यावरच बाळ ही गायब होते...

"मी आश्चर्याने समोर पाहिलं... आज्जी माझ्याकडे पाहत होती... तिच्या डोळयांत आश्रू होते...
मला ते आश्रू पाहून वाईट वाटलं..
लहान पणा पासून मी ऐकटाच होतो... फक्त आज्जी होती माझ्या बरोबर... आत्ता ती ही न्हवती..
आई बाबा लहानपणीच गेले... आत्त्या चुलते कोणीच न्हवते... मोठ्या आज्जीच्या मुली ही कुठे होत्या माहित न्हवत्या..
अश्यात आपल्या माणसा बद्दल खूप आसक्ती होती मला आपली माणसं हवी होतीत मला..
आज्जी सांगायची पूर्वी आपल घर भरलेल असायच मोठा गोतावळा होता..
पण आत्ता मी ऐकटाच का?.. कोणीच का नाही माझ्या सोबत..
अश्यात ते पाळण्यातले बाळ ही मला आपलस वाटल...


"आज्जी बाळ "..
माझ वाक्य ऐकून तिने डोळे मिटले डोळयांतील ऐक थेंब तिच्या गालावरून वाहिला..

"बस हेच ऐकायचे होते मला"..

"कोणी तरी माझ्या मुलींना ही आपलस म्हणाव"..
आज तु त्यांना न्याय दिलास...

अचानक माझ्या समोर ऐक दुष्य दिसल... आज्जीचीं डिलिव्हरी झाली होती... तिच्या कडेला छोट बाळ होत...

"सातवी पण मुलगीच झाली... आज्जीची सासू म्हणजे आमंच्या पंजीच्यां कानात कोणी तरी कुजबुजल..
तशी ती तरा तरा चालत स्वयपाक खोलीत गेली आणी हातात वरवंटा घेऊन खोलीत आली... आज्जी हळूहळू शुद्धीत येत होती... त्याच वेळी तिच्या मुलीच्या डोक्यात तिने तो वरवनंटा घातला... त्या बाळाने हलका आवंडा ही गिळला नाही की रडल नाही क्षणात ते संपूण गेले..."..
आज्जीला हे पहावल नाही तिला वेड लागल आणी त्या वेडेपणातच तीने फास घेतला...
फास घेतला की दिला...
हे ही सांगता येत न्हवते..
कारण जी त्या लहानग्याला मारू शकते ती काहीही करू शकते....

"आज्जीने तिचा मृत्यू तर दाखवला नाही... पण त्या लहानग्याच्या न्याया साठी मात्र तडफडली..
कदाचित तिनेच रागात माझ कुटूंब ही संपवले होते.. पण मला तिच्यावर कसलाच राग न्हवता...

डोळयांतील आश्रू पुसत मी पूर्ण खोली साफ केली... ते रक्ताने माखलेले वस्त्र छातीशी लावल 

मोठ्या आज्जीचा फोटो उचलला आणि माझ्या आजीच्या फोटो शेजारी ठेवला..
ती या घरातील ऐक होती आणी कायम राहणार होती...
हे घर तीच ही होत..
त्या दिवसा पासून कधीच मला घरात कसलाच त्रास जाणवला नाही... उलट सगळ कस सुरळीतच चालू लागले..
घराची डागडुजी झाली भाडेकरू आले...
मी मात्र आज्जीच्या खोलीतच राहू लागलो..
आयुष्यात ऐकटाच होतो..
आपल अस कोणीच न्हवते... ती तरी पहाते यात खुश होतो..
कधी तरी रात्री ती केसांतून हात फिरवते भास व्हायचा पण मी डोळे उघडायचो नाही... तिचा सहवास हवा होता मला....

"प्रेमाच्या भुकेल्याला मला तिने ऐकट राहू दिल नाही.. दुसऱ्या दिवशी ऐक सुंदर मुलीने माझ्या आयुश्यात प्रवेश केला... तिला रूम हवी होती... एकटीच होती.. तिच ही कोणीच न्हवते...





कदाचित काही दरवाजे उघडायचेच असतात... 
मुक्त करण्यासाठी.

*समाप्त*