अबोला मनातले सारे काही - भाग 1 Amol Meshram द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अबोला मनातले सारे काही - भाग 1

एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं पळसगाव होतं त्या गावाच्या कडेने एक सत वाहणारी खडखळणारी पवित्र नदी होती नदीच्या दोन्ही बाजूला हिरवी घनदाट झाडे होती आणि उंच उंच पळसाची झाडे होती गावातील माणसं सकाळी सकाळी या नदीकाठी यायची नदीचे पाणी इतके स्वच्छ आणि पारदर्शक होते की त्या सत पाण्यामध्ये गावाचे आणि झाडांचे प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसायची या नदीमुळे संपूर्ण गावात एक वेगळाच जिव्हाळा आणि शांतता पसरलेली होती

त्या गावांमध्ये सचिनचा कुटुंब आणि सायलीचा कुटुंब राहत होतं सायलीच्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती होते सायली ही घरची छोटी मुलगी होती 
तसेच सचिनच्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती होते सचिन हा घरचा छोटा मुलगा होता 

त्याच काळात सायली आठवीला होती आणि सचिन नववीला होता ते दोघेही बाहेरगावी सायकलने शाळेत जात होते ते एकाच गावचे असल्यामुळे एकमेकांना ओळखत होते आणि मिळून शाळेत जात होते असंच करता करता त्या दोघांमध्ये प्रेम झालं पण हे कुणालाच माहीत नव्हतं  सचिनला दोन बेस्ट फ्रेंड होते त्यांच्यापैकी एकाचे लग्न झाले होते आणि एक कुवारा होता तसेच सायलीला पण एक मैत्रीण होती तिच्यासमोर सायली जेव्हा सचिन सोबत बोलायची तेव्हा तिच्या मैत्रिणीला ते अजिबात आवडत नव्हते 

त्यांचे हे प्रेम पूर्णपणे गुपित असल्यामुळे गावातील किंवा शाळेतील कोणालाच याबद्दल काहीच माहीत नव्हते सायकलने एकत्र शाळेत जाणे चोरून एकमेकांकडे बघणे आणि मित्रांची नजर चुकवून गुपचूप बोलणे यातच त्यांची तीन वर्षे कशी निघून गेली काही कळलंच नाही पण आता शालेय जीवन संपूर्ण पुढे एक मोठे वादळ येणार होते 

मैत्रीचे कर्तव्य आणि नवीन जबाबदारी 

सचिनला जो विवाहित मित्र होता त्याला घराच्या ओढाताणीमुळे बाहेरगावी कामासाठी जावे लागले होते मित्राने जाताना सचिनवर पूर्ण विश्वास टाकून जबाबदारी दिली होती सचिनही अगदी मनापासून तो विश्वास जपत होता मित्राच्या पत्नीला कधी डॉक्टर कडे न्यायचे असो किंवा बाजारातून काही आणायचे असो किंवा इतर कोणतेही काम असो सचिन नेहमी मोठ्या भावासारखा किंवा खऱ्या मित्रासारखा धावून यायचं 

सायलीच्या मनात वाढलेला आधार साईलीला जेव्हा तिच्या गुप्त मित्राकडून समजले की सचिन आपल्या मित्राच्या पाठीशी किती खंबीरपणे उभा आहे तेव्हा तिच्या मनात सचिन बद्दलचे प्रेम आणि आधार अजूनच वाढला 

सचिनच्या त्या विवाहित मित्राच्या पत्नीला आता सातवा महिना सुरू होता दुपारची वेळ होती त्यामुळे ती सावकाश पणे छतावर गेली तिथे सचिन आधीपासूनच बसून मोबाईलवर कोणाशी तरी बोलण्यात मग्न होता त्याला पाहून तिच्या मनात एक सहज विचार आला तिने अचानक विचारले सचिन तू सायलीच्या मेहुणी सोबत बोलत आहेस का जी रंगाने गोरी आहे ती सचिन एकदम गडबडला त्याने पटकन नाकार दिला आणि मनाला नाही वहिनी मी तिच्याशी नाही तर माझ्या एका मित्रासोबत बोलत आहोत 

दोघांचा हा स्वाद सुरू असतानाच तेवढ्या मध्ये अचानक सचिनचा तो विवाहित मित्र तिथे आला आपल्या गरोदर पत्नीला दुपारच्या वेळी छतावर सचिन सोबत बोलताना पाहून त्याच्या डोक्यात एकदम संशयाची पाल चुकली त्याला त्या दोघांना एकत्र पाहून आला पण तो तिथे काहीच बोलला नाही त्याच्या मनात संशयाचे भूत एवढे जड झाले होते की त्याने रात्री घरी आल्यावर जराही विचार केला नाही आणि आपल्या पत्नीला खूप मारले 30 7 महिन्याची गरोदर आहे याचेही भान त्याला राहिले नव्हते 

सचिन त्याच्या त्या विवाहित मित्राच्या आईला आत्या म्हणायचा त्यामुळे या कुटुंबाशी त्याचे घरचे आणि आपुलकीचे संबंध होते आज्ञा रात्री मित्राच्या घरात काय भयानक प्रकार घडला आहे याची सचिनला कल्पना नव्हती 

दुसऱ्या दिवशी सकाळी सचिन नेहमीप्रमाणे आत्याच्या घरी आला तिथेच समोर आत्याची सून त्या मित्राची पत्नी बसली होती आदल्या रात्री झालेल्या मारहाणीमुळे ती आतून पूर्णपणे तुटली होती आणि प्रचंड घाबरली होती सचिनने तिथे आल्यावर नेहमी सारखं तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला बोलताना बघून ती अजून थर कापली