आता कुठे निघाला आहेस तू.... अंशुल आवरून खाली आला तर शांताई ने त्याला विचारल...
आता झालय ना तुझ्या मनासारखं मोठी आई..
आणि मला खूप सारी कामे आहेत... असंच घरात नाही बसून राहू शकत मी.... रागच आलेला त्याला असं टोकल म्हणून.....
शब्दांवर मर्यादा ठेवा चिरंजीव.... नुकतेच आत आलेले अनंतराव बोलले तसा त्याने सुस्कारा सोडला..... असही घरात गेस्ट होते... त्यामुळे इथे काही इशू क्रिएट नव्हता करायचा त्याला ....त्यामुळे शांतपणे तो बाहेर निघून गेला...
आता पुढे...
अनंतरावांची पत्नी वसुंधरा.. मागच्या चार-पाच वर्षांमध्ये हार्ट अटॅक मुळे गेल्या.... सुरुवातीपासूनच ते आणि त्यांचे मोठे भाऊ आदिश राव एकत्र राहिलेले.... वसुंधरा आणि शांताईंचं पण तसं बऱ्यापैकी जमायचं... शेवटी घर होत.... भांड्याला भांड तर लागणारच... पण दोघा भावांमध्ये खूप प्रेम होतं.... त्यांचे बंधू आदिश राव शिवांश बारा वर्षांचा होता आणि शिवानी म्हणजेच शिवांश ची छोटी बहीण ही नऊ वर्षांची होती तेव्हाच गेले... मग पर्यायी या दोन मुलांची आणि शांताईची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडलेली.... आदिशराव गेल्यापासून वसुंधरा म्हणजेच अंशुल च्या आईने पण तीन मुलांमध्ये कधी फरक केला नाही.... अस तर शांताईंच त्यांना जास्त काही पटत नव्हतं... पण त्यांचे मिस्टर वारल्यापासून मात्र दोघी एका जीवाने राहत होत्या....
पण मध्यंतरी अचानकच वसुंधरा सर्वांना सोडून गेल्या.... अंशुल एकटाच होता त्याला बहिण भाऊ म्हणलं तर शिवांश आणि शिवानी..... तिघांचही एकमेकांवर प्रेम होत....
अनंतराव मात्र शांताईंचा खूप आदर करायचे... त्यांच्या मोठ्या भावाची बायको होती ती... अगदी स्वतःच्या आईप्रमाणेच ते मानायचे त्यांना.... त्यामुळे जेव्हा त्यांनी अंशुलचा लग्नाचा विषय काढला तेव्हा अनंतरावांनी तुम्ही बघा म्हणून सांगितलेल....
आणि विधी तर त्यांना बघता क्षणी आवडली होती...
अंशुल नकोच म्हणत होता... कारण सुरुवातीपासूनच त्याला गरीब लोकांविषयी... किंवा मग लो क्लास... लो स्टॅंडर्ड लोकांविषयी तीटकारा होता..... त्यात त्याचीही काही चुकी नव्हती... कारण त्याच्या मोठ्या आईने तसंच बिंबवलेलं त्याच्या मनावर.....
पण अनंतरावांनी मात्र त्याला इमोशनली ब्लॅकमेल केलेल... त्याचा त्याच्या मॉम वर विशेष जीव होता.... आणि याचा फायदा घेऊन अनंतरावांनी त्याच्या मॉमला ही अशीच मुलगी सून म्हणून हवी होती असं सांगितलेलं.....
तसा तर अंशुल कोणाचच ऐकत नव्हता... त्याची लाईफ त्याची डिसिजन्स असायचे... पण इथे त्याचे डॅड आणि मोठ्या आईच मन एकाच वेळी दुखावण त्याला बरोबर वाटलं नाही आणि तो लग्नाला तयार झाला....
विधीला त्याने एंगेजमेंटच्या वेळी पहिल्यांदा बघितलेल... पण जास्त काही माहिती काढण.. किंवा नंबर वगैरे एक्सचेंज करण्याच्या भानगडीत तो पडलाच नव्हता... कारण त्याच्यासाठी हे लग्न मॅटर करत नव्हत....
पण त्याला एक गोष्ट कळत नव्हती की यामध्ये विधीची काही चुकी नव्हती.... आणि तो जर असाच वागत राहिला तर तिचं आयुष्य मात्र यामध्ये नाहक भरडल जाणार होत....
फक्त ही गोष्ट त्याला वेळेच्या आधी कळणं गरजेचं होतं......
रात्री उशिरापर्यंत तो बाहेरच होता... म्हणजे त्याचा जिवलग मित्र नील सोबत दारू पीत बसलेला... तसा तर ओकेजनली कधीतरी ड्रिंक करायचा तो.... पण आज मात्र रागच एवढा होता की त्याला त्याशिवाय शांतता मिळणार नव्हती....
कधी येऊन रूम मध्ये झोपला तेही कोणाला माहित नव्हतं....
दुसऱ्या दिवशी सकाळीच सत्यनारायणाची पूजा ठेवलेली....
विधी पण लवकरच उठून आवरून बसलेली... आजी होती तिच्यासोबत... आणि शिवानी पण आलेली तिला तयार व्हायला मदत करायला... बाकी शिवानी च्या मैत्रिणी आणि आणखी बऱ्याच मुली होत्या... शिवानी अगदीच गोड वाटली विधीला...
पण विधि शिवानी पेक्षा पण दोन वर्षांनी लहान होती...... त्यामुळे शिवानीला ती खूपच निरागस वाटत होती....
तिच्या लाडक्या भाईचा स्वभाव तिला पण माहित होता... त्याच्यासोबत कशी राहणार होती विधी याचाच विचार तिला पडलेला....
डोअर पाच सहा वेळा नॉक झाला तेव्हा कुठे अंशुलने झोपेतून उठण्याच कष्ट घेतल.....as एक्स्पेक्टेड त्याची मोठी आईच होती.....
उठून. आवरून यायला सांगत होत्या त्या......
नाईलाजाने उठून तयार झाला तो.... नंतर ऑफिसला पण जायचं होतं.....
लवकरच पूजा आवरली... नंतर जेवण वगैरे झाल्यावर विधी मांडव परतावणीसाठी आजी सोबत तिच्या घरी आली.... ड्रायव्हरला पाठवलेलं अनंतरावांनी त्यांना घेऊन.... सोबत जायला तर नव्हतं कोणी..
अंशुल तर केव्हाच गेलेला ऑफिसला... त्याला जणू काही घेणं देणचं नव्हतं...
लग्न होऊन दोन दिवस झालेले तरी दोघांच्यात एका शब्दाचाही संवाद नव्हता झाला....
विधीला तर भीतीच वाटत होती त्याची... कारण जेव्हा बघेल तेव्हा रागातच वाटायचा तो....
विधीला तिकडे जाऊन दोन दिवस झालेले.... शांताई ने एकदा कॉल करून विचारपूस केलेली फक्त.... अनंतराव तर असेही त्यांच्या कामात व्यस्त असायचे.... घराची जबाबदारी तसंही एका स्त्रीवरच असते.... शिवानी चाl ब्युटीक च काम असायच तर शिवांश तर आठवड्यातून चार दिवस बाहेरच असायचा.....
आज विधी परत येणार होती... तिला घ्यायला कोणी जाणार नव्हत पण शांताईने ड्रायव्हरला पाठवलेल...
संध्याकाळी चार पाच च्या आसपास ते पोहोचले विलावर.....
विधीच गाव तसं लांब होत... आणि एकटीने येन जान लगेच तरी शक्य नव्हतं... कारण आतापर्यंत त्यांच्या तालुक्याला सोडलं तर ती बाहेर कुठे गेली नव्हती....
ती आल्यानंतर स्टाफ सोबत तिला अंशुल च्या रूम मध्ये पाठवल .... तिच सामान म्हणजे तशी एकच बॅग होती ती स्टाफ पैकीच कोणीतरी आणून रूममध्ये दिली.....
अंशुल ची रूम म्हणजे एखाद्याच्या स्वप्नातला घर असल्यासारख होती....
मोठा किंग साइज बेड... बाजूलाच एक सिंगल काऊच.... बेडच्या समोर भिंतीवर त्याच्या फोटोची मोठी फ्रेम होती.... त्या फ्रेमने अर्धी भिंत व्यापली असेल.....

बाजूला एक टीपॉय होता... बेड चारही बाजूने व्हाईट पडद्याने पॅक होता जे वर टांगलेले....
आतापर्यंत तिने असं चकचकीत घर आणि रूम कुठेच बघितल्या नव्हत्या.... कुठे चार भिंतींच्या रूममध्ये राहणारी ती तिला या सगळ्या लक्झरीएस गोष्टींबद्दल काहीच माहित नव्हतं....
ती पूर्णच रूम जणू चकचकीत काचांणीच बनलेली होती.... त्या फरशीवर पाय ठेवायला पण तिने थोडा विचार केला..... उगाच आपण पाय ठेवला आणि फरशी खराब झाली तर असा विचार येऊन गेला तिच्या डोक्यात....
बाजूलाच स्लाइडिंगचा दरवाजा होता... तिथून पाठीमागे त्याची स्टडी रूम आणि मोठा स्विमिंग पूल होता....
पण रूम मध्ये तिला कपाट कुठे दिसल नाही.....
आता तिला कोण सांगणार... या मोठ्या लोकांच्यात राहणं एवढंही सोपं नाही ग बाळा... त्यांच सगळच कसं अगदी पद्धतशीर असतं.... जेव्हा ती पूर्ण रूम व्यवस्थित फिरून बघणार होती तेव्हा तिला तिथली सेटिंग समजणार होती.....
बॅग पण उचलून तिला कुठे ठेवावीशी नाही वाटली त्यामुळे तिने तिथेच साईटला एका कोपऱ्यात तिची बॅग ठेवली.... आणि त्यातून घरून येताना आणलेली एक साडी काढली घालण्यासाठी.....
फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये कुठे जावं तेही तिला समजलं नाही.......
पण स्टाफ पैकी जी लेडीज तिला सोडवायला रूममध्ये आलेली ती अजून तिथेच होती..... कारण शांताईने तसं सांगितलेलं..... तिला काही समजणार नाही ते माहीत होतं त्यांना... आणि उगाच कुठे हात लावला तर अंशुलच्या रागाचा सामना कोणी करावा....
विधीला तिच्यापेक्षा तर ती स्टाफ मधली मुलगीच मॉडन दिसत होती... स्वतःबद्दल खूपच कमीपणा वाटला तिला....
त्या मुलीने तिला बाथरूम वगैरे दाखवल.... आतली सेटिंग समजावून सांगितली.....
मग ती फ्रेश होऊन तिच्यासोबतच खाली आली....
आत्या... हे... हे आजीने दिलय...... ती आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आली तेव्हा शांताई हॉलमध्ये सोफ्यावर बसून पुस्तक वाचत होत्या तेव्हा तिने त्यांना सांगितल...
तिच्या आजीने तिच्यासोबत काही खाण्यापिण्याच्या वस्तू पाठवलेल्या.... गावाकडे भूतीचा प्रकार असतो... नवरी लग्नानंतर पहिल्यांदा सासरी जाताना तिच्यासोबत शिधा पाठवला जातो.....
आणि सासरी आल्यावर बायकांना बोलावून हळदीकुंकू वगैरे झाल्यावर ते पदार्थ वाटले जातात.....
आणि हे विधीला पण माहीत होत.... म्हणूनच ती फ्रेश होऊन लगेचच बाहेर आलेली....
ठेव तिथे बाजूला....
लीसा ते बघ काय आहे ते.... आणि स्टाफ मध्ये देऊन टाक.....
शांताईंनी लीसा म्हणजेच त्यांच्या घरात असणाऱ्या स्टाफची हेड तिला सांगितलं....
तसं जेमतेम चाळीस-पंचेचाळीस वर्ष वय असणारी एक बाई ते सगळं घेऊन गेली...
पण विधीला मात्र खूपच वाईट वाटलं...
हा शिधा देण्यासाठी तिच्या आजीने पैशांची कशी कशी जुळवन केलेली हे तिला माहीत होत...... पण इथे त्या भावनांना काडीची किंमत नव्हती....
पण तरीही मोठे लोक आहेत... आणि शेवटी शहरात अशा प्रथा नसतील अशी तिने स्वतःच्याच मनाला समजुत घातली.... आणि शेवटी स्टाफने खाल्लं तरी कोणाच्यातरी मुखात जाणार होत त्यामुळे ते एक समाधान होतच......
Stay connected lovelies ❤️ 🤗
Enjoy the reading ....
All all rights are reserved ...no part of the story or publication maybe or can be reproduced , transferred in any other forms with digitally or in the form of print or anything without the permission of author , expect for the quotation in the book review...
copyright ©️ Shivanjali Kakade (Tanu)...