Complicated Love ( भाग 1)
रेल्वेच्या खिडकीतून तो बाहेरचा परिसर न्हाहाळत होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसवर त्याने एक कटाक्ष टाकला. मनात कितीतरी प्रश्न झिंज्या पसरून नाचत होते. विचारचक्रांच्या जाळ्यात तो घेरला होता. विचारचक्रही अधिकच क्लिष्ठ बनत चालले होते. उलट - सुलट विचारांचा अग्नी भडकू लागला होता. रक्ताने माखलेल्या ग्लोव्हसची योग्य विल्हेवाट लावून त्याने चेहऱ्यावर थंडगार पाणी मारलं. तो दिसायला सहा फूट उंचीचा, देखणा, रुबाबदार, अतिशय गोरापान चेहरा, लांब वाढलेल्या दाढी मिश्या, अंगात पांढर टी -शर्ट आणि काळा पॅन्ट. त्यावर असलेली काळ्या रंगाची हुडी त्याच्या व्यक्तिमत्वाला अधिकच आकर्षण बनवत होती. सुटलेल्या बुटाची लेस बांधून तो रेल्वेच्या बाहेर पडला. रेल्वे स्टेशनवर लोकांची बरीच गर्दी होती. आपल्या हुडीची टोपी डोक्यावर घेऊन तो त्या गर्दीतून वायुवेगाने मार्गक्रमण करू लागला. विचाराच्या क्लिष्ठ गुंतेत तो परत अडकत चालला होता. इतक्यात एका तरुणीचा त्याला धक्का लागला.
" माफ करा " एका तिरकस नजरेने पाहून तो म्हणाला.
" तू.... कसा आहेस? आणि काय हा अवतार करून ठेवलाय स्वतःचा".
तिच्या त्या मर्मभेदी शब्दांनी त्याच्या हृदयाची प्रेमळ नाजूक अशी एक तार छेडली.
" मी.... तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. मी तर तुम्हाला ओळखतही नाही ".
" माझी कुठलीच गैरसमजूत नाही झालीय.... म्हणजे तू विसरालाही मला " खिन्न होऊन हताश स्वरात ती तरुणी म्हणाली.
जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे त्याच्या डोक्यावरची टोपी उडून खांद्यावर आली. त्याचे लांबसडक केसही अस्तव्यस्त झाले होते . चेहऱ्यावरील क्रूर भाव क्षणार्धांतच कुठेतरी विरून गेले होते.
एवढ्यात दूरवर त्याला काही संशयास्पद हालचाली जाणवल्या. त्याचा मनाच्या आकाशात शंकेचे काळे ढग आरपार जमले. विस्फारलेली त्याची तीक्ष्ण भेदक नजर समोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीवर घिरट्या घालू लागली. त्याच्या भुवया उंचावल्या. तो काही हालचाल करणार एवढ्यात त्या व्यक्तीच्या बंदुकेतून धाडकन..... एक गोळी सुटली. नेम चुकला होता. ती गोळी त्या तरुणीच्या खांद्याला लागली.
" आई ग...... " तिच्या वेदनामय स्वरांनी संपूर्ण स्टेशनच वातावरणच बदलून गेल. सर्वांच्या नजरा आता त्या व्यक्तीवर स्थिरावल्या. तो व्यक्तीही कशालाही न जुमानता सर्वशक्तीनिशी स्टेशनवरून बाहेर धावत होता. काही बलदंड तरुण त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करीत होते. पण त्याने हवेत चालवलेल्या गोळ्यामुळे त्यांचे पायही जागीच थांबले. रेल्वे स्टेशनवरच्या पोलिसांचा फौजफाटाहि आता त्या तरुणाच्या मागावर होता.
ती तरुणी तिथेच वेदनामयी स्वरात कन्हाळत होती. तिच्या खांद्यातून रक्तही भळाभळा ओघळू लागलं होत. त्याने तिला बाहूपाशात घेऊन हॉस्पिटलकडे धाव घेतली. तिला बाहूपाशात घेताच त्याला काहीतरी वेगळंच जाणवलं जणू काही त्याच्या पाषाण हृदयात प्रेम लहरी गुंजराव करीत आहे . सर्व जग जणू एकाच जागी थांबलय असच त्याला भासत होत. कोमल आणि प्रेमाच्या तुषारांनी त्याच पाषाण मन तृप्त झालं होत. परंतु हि भावना फार काळ टिकली नाही. पुढच्याच क्षणी तो भानावर आला. आपल्या जीवनात घेतलेल्या ध्येयरुपी प्रतिज्ञामुळे त्याच्या मनात उमललेल ईवलस प्रेमांकुर क्षणार्धांतच सुकून गेल. धापा टाकत तो हॉस्पिटलमध्ये पोहचला. हॉस्पिटलमध्ये हि एकच गर्दी उसळली होती. डॉक्टरांनी एक कटाक्ष त्याच्याकडे फेकला आणि विचारलं
" काय झालंय हिला? "
" गोळी लागली आहे? " थरथरत्या स्वरात तो म्हणाला.
" म्हणजे हि पोलीस केस आहे... जोपर्यंत पोलीस इथे येऊन योग्य ती माहित नमूद करणार करेल तेव्हाच तिच्यावर योग्य ते उपचार सुरु होईल " डॉक्टरांनी त्याला ठणकावून सांगितल.
डॉक्टरांचे ते शब्द ऐकुन त्याच्या चेहऱ्यावर क्रोधाच वलय निर्माण झालं. खिशातून आपला मोबाईल काढून त्याने एक कॉल लावला. आधी काही वेळ तो फोनवर बोलला आणि मग फोन डॉक्टरांकडे देण्यात आले. फोनवर बोलताच डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील भाव शीतल झाले. त्यांनी त्या तरुणीला I.C.U मध्ये भरती करण्यास सांगितले. लगेचच तिच्यावर योग्य ते उपचार सुरु झाले.
---------------------------------------------------------------------------------------
ट्रिंग..... ट्रिंग..... ट्रिंग
" हॅलो "
" तो अजूनही जिवंतच आहे. त्याने आणखी एकाचा खूण केलाय ".
"काय? "
" हो... खरं तेच सांगतोय पण तुम्ही काळजी नका करू या वेळेस मी त्याचा पुरता बंदोबस्त करतो ".
" अरे कसा करणार त्याचा बंदोबस्त त्याची कुठलीही ठोस माहिती आपल्याकडे नाही. ज्याप्रमाणे आकाशात कडाडणारी प्रत्येक वीज फक्त आपलं प्रकाशमय अस्तित्व दर्शविण्यासाठी नसते. तर त्यातली एखादी वीज रौंद्र रूप धारण करून सर्वांना भस्म करण्यासाठी कडाडली असते. त्याचप्रमाणे तो हि आपल्यावर रौंद्र रूप धारण करून भस्म करण्यासाठी सज्ज झाला आहे. एखाद्या यमराजाप्रमाणे तो सर्वांना नरकाचे द्वार दाखवत आहे ".
" त्याची काही विशेष माहिती आहे तुमच्या जवळ? "
" विशेष माहिती तर नाही फक्त धूसर झालेले काही स्केच आहे ".
" यावेळेस मी त्याचा पुरता बंदोबस्त करतोच कारण या कुरुक्षेत्रात आता मी स्वतः शस्त्र घेऊन उतरणार आहे ".
" वाह ! आता या युद्धात खरी चुरस निर्माण होईल "
-------------------------------------------------------------------------------
" सर एक वाईट बातमी.... अर्जुनवर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झालंय. मला वाटत आपण त्याच संरक्षण आणखी वाढवायला हवं ".
" त्याची काही गरज नाही. कुठल्याही रोपट्याला चांगल मजबूत विकसित होण्यासाठी पाऊसाबरोबर ऊन्हाचीही गरज असतेच ना ".
" पण सर आपण जे करतोय ते बरोबर आहे? "
" या लढाईत काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे न विचारलेलंच बर. या लढाईत सत्याचा विजय करण्यासाठी कितीतरी असत्याची मदत आपल्याला घ्यावी लागेल ".
" बरोबर आहे सर पण काही गोष्टी...."
" काही गोष्टी गुपित असलेल्याच बऱ्या.... सध्यातरी तोच आपल्यासाठी आशेचा किरण आहे ".
------------------------------------------------------------------------------------------
काचेतून तो तिला मृदू नजरेनी पाहत होता. तिला लागलेले सलाईन आणि ऑक्सिजनमुळे त्याचा जीव वरखाली होत होता. पहिल्यांदा कुणाचीतरी अशी अवस्था पाहून त्याच कठोर हृदय पाझरल होत. या सर्व परिस्तिथितीत तो कमालीचा शांत झाला होता.
" खरंतर आठवणी कश्या असतात..... अगदी निखळ खळखळपणे वाहणाऱ्या झऱ्यासारख्या. मनाच्या गाभाऱ्यात कुठेतरी प्रेम, वात्सल्य, सुख, दुःखाच्या रूपात निखळपणे वाहत असतात. तर कधी वाटत आठवणी ह्या गुलाबाच्या सुमानासारखे असतात सदैव सुंगंधरूपी गारवा देत असतात. पण यापेक्षाही प्रमाणबद्ध उत्तर आहे माझ्याकडे. आठवणी ह्या तीक्ष्ण धारदार बाणासारख्या असतात एकापाठोपाठ एक काळजात नेहमी टोचत असतात. पण आता तर माझ्या सर्व आठवणी धूसर व्हायला लागल्या आहेत " तो स्वतःशीच म्हणाला.
दूर निपचित पडून असलेल्या त्या तरुणीला पाहून त्याच्या मनाची घालमेल होत होती.
" काय विशेष असेल हिच्यात ज्यामुळे माझे पावले अजूनही इथेच थांबले आहे " त्याने परत स्वतःशीच एक प्रश्न विचारला.
आपल्या जड पावलांनी तो हॉस्पटिलच्या बाहेर जाऊ लागला तशी विरहाची एक लहर त्याच्या हृदयात दाटून आली.
क्रमश...
हा भाग आणि हि कथा कशी वाटत आहे he अभिप्रायाने कळवा