Miss'tery - भाग 7 lekhani द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Miss'tery - भाग 7

...................??????????

"मी सांगितलेली कामगिरी झाली का?" 
" हो बॉस. फत्तेह झाली. आता उद्या धमाका भेटेल 😂😂😂😂" समोरची व्यक्ती हसली....
दुसरी व्यक्तीही maniac सारखी हसली...

" आता खरा डाव रंगत चालला आहे 😂😂😈😈😈.
या लोकांना असेच धमाके देत राहणार. ते ही त्यांच्या नकळत🤣🤣🤣🤣🤣.
चल फोन ठेव आता नाहीतर मग कोणीतरी ऐकायचे. सगळे हुशार आहेत. 😏"

" ओके बॉस. फक्त उद्या जो धमाका भेटेल ना. त्याला तुम्ही shocked प्लस hurted ऍक्ट करा. "
" काळजी नको करुस. शेवटी आपलच नाणं खोटं निघालं होतं.🙂. चल ठेव फोन. "

त्या व्यक्तीने फोन ठेवला.अंगणाच्या तळ्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब निरखून बघितले. हळूच आपल्या पलंगापाशी जाऊन ती व्यक्ती आडवी झाली. त्या गादीची सवय नसल्याने कूस आलटून पालटून एकदाची झोप लागली.

सकाळी सगळे लवकर उठले होते.अभय आणि शुभम हॉल मध्ये बसले होते. आरोही अंघोळ करून आली तेथे. केसं धुतली होती. तर मग ती केसं हळुवार झटकत बाहेर येत होती. त्या दोन्ही तरुणांचे लक्ष तिच्याकडे गेले. एक प्रेमाने बघत होता आणि एक.......

शुभम न्यूस बघत होता. समोर आलेली न्यूस ऐकताना तो एकदम दचकला.

ब्रेकिंग न्यूस 
" मुंबई पोलीस स्टेशन नंतर आज पुन्हा पण भायकळा पोलीस स्टेशनच्या मागे २० डेड bodies सापडल्या गेल्या आहेत. ह्या डेड bodies ला देखील पूर्वीच्या डेड bodies प्रमाणे मारण्यात आले आहेत.

अजून एक तुफान बातमी समोर आली आहे नुकतीच.
इतर राज्यां मध्येही कित्येक bodies याच हालत मध्ये सापडल्या आहेत.आणि प्रत्येक ठिकाणी चिट देखील सापडल्या गेल्या आहेत. ज्यात सुधारण्याची धमकी दिली जात आहे. नाहीतर यांच्यासारखीच,पण बेकार हालत करेल अशी धमकी देण्यात गेली आहे.

ह्या bodies ची सध्या तपासणी चालू आहे.कोणाच्या आहेत, का यांला टार्गेट केले गेले अद्याप माहिती नाही."

अभय, शुभम, आरोही आणि दुर्गा हे धक्क्यात होते. हे काय चालले होते काही काळात नव्हते.

"ऐका सगळे जाऊया. तिथे कसले clue मिळत आहे का बघूया. दुर्गा तुला काही सापडते आहे का बघ "सगळे होकारात मान डोलवत तयारी ला निघून गेले.

सगळे गाडीत बसले आणि भायकळा पोलीस स्टेशन ला निघाले. अर्ध्या तासात ते पोहोचले. शुभमने आपली id दाखवली प्रवेश मिळावा म्हणून. त्याने सांगितले कि हे माझ्यासोबत ह्या केस साठी अपॉइंट केले गेले आहेत.

आत आले आणि पडलेल्या bodies चा सडा बघून कसेतरी झाले. शुभम विचारपूस करत होता. अभय आणि आरोही त्या bodies चे निरीक्षण करत होते. दुर्गा आपल्या ज्ञानाने काही clue भेटत आहेत का पाहत होती.

Hand gloves घालून ती चेक करत होती. प्रत्येक बॉडी ची सगळी माहिती नोट करत होती.

हे करता करता जेव्हा तिने एका बॉडी वरची चादर काढली, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अंग थरथरत होते. डोळ्यात पाणथेंब दाटून येत होते. समोरचे सगळे धुरकट होत चालले होते.डोकं गरगरायला लागले होते. ती खाली आपटली. हे बघता क्षणी आरोही तिच्याकडे काळजीने धावत गेली. तिला सावरत होती ती." काय झाले " विचारत असतानाच तिचा डोळे त्या बॉडी कडे वळले. तिला समजून गेले. ती पण शॉक मध्ये गेली.

"सच्या ssss... 😫 उठ ना रे. तुझ्या लाडक्या ताईचे ऐकणा 😖😞. सच्या ss ब- बघ ना एकदा माझ्याकडे.
मला एकटीला सो- सोडून कसा काय गेला तु. हाह😩
ए उठ ना. उठ ना बाळा 🥺🥺" त्याचं निष्प्राण शरीर ती हलवत म्हणत होती.

"उ- उठ ना sss😫. सच्या ssssssssssssssssss 😭😭😭😭😭" ती किंकाळी पूर्ण पोलीस स्टेशन मध्ये घुमली. भिंती शहारल्या. मने  थरारली 🥀.तिथे फक्त एका बहिणीची पीडा प्रत्येक दगडावर कोरली जात होती.

आरोही दुर्गाला बाहेर घेऊन गेली. पण इथे एका भावाचे अश्रू जमिनीला मिसळत होते.स्वतःच्या भावाला अश्या अवसतेथ बघून.. त्याला ते झेपले नाही. तो तोंडावर हात ठेवत बाहेर गेला. शुभम त्याच्या मागे पळत गेला.

" काय झाले अभय? तुम्ही का असे बाहेर आला-"
अभय चे अश्रू अनावर झाले. तो ढापकन गुडघ्यावर खाली बसला आणि त्याच्या तोंडातून आणि डोळ्यातून नैराश्य आपली वाट काढत बाहेर पडले.स्वतःच्या भावाचा खून झाला हे त्याच्या आत्म्याला मुळीच पटत नव्हते. शुभम लगेच येऊन त्याला बिलगला.

एक स्त्री व्यक्त होऊ शकते पण एक पुरुष इथे माती खातो.पुरुष आहोत म्हणून मग मोकळेपणाने व्यक्त होण्याची त्यांची शक्ती ही आपोआपच वाढत्या वयासोबत गायब होत जाते. 
त्यांच्याकडे उरते काय तर फक्त सगळे निमूटपणे सहन करणे आणि इतरांनाला सहानुभूती देणे.🥀

आज एका भावाची आणि एका बहिणीची परीक्षा ह्या पोलीस स्टेशनने घेतली.पण दोघांचे आप आपले नात्याचे गाठ ह्यात घुतमरून मरण पावले.ह्या पोलीस स्टेशन ने दोघांच्या सहानुभूती चा अंत शहारलेल्या मनाने बघितला.

कोणाला वाटले होते कि दोन जण महत्वाचे काम करण्यासाठी आले होते,आणि बॉडी तपास्ता तपास्ता, त्यातली एक बॉडी तर आपल्याच जवळच्या व्यक्तीची आहे हे कळले.

आरोही आणि शुभम त्या दोघांला घरी घेऊन आले. दोघांचे डोळे लाल झाले होते. त्यांला त्यांच्या रूम मध्ये नेऊन झोपवले.

आरोही आणि शुभम दोघे या सगळ्या मुळे दुःखी झालते. हे काय झाले ते process करत होते.

" आरोही.तो जवळचा भाऊ होता का दुर्गाचा? "
" नाही. तो चुलत भाऊ होता. पण तिचा खूप लाडका होता.त्याच्यावर सख्ख्या भावासारखा जीव लावला आहे तिने.दोघे एकच वयाचे आहेत.पण तो ९महिने लहान आहे तिच्याहून.. आज असं काही होईल हे तिला स्वप्नात देखील वाटले नसेल.... 😕. पण अभय sir का रडत होते.? "

" दुर्गासारखंच त्याच्या भावाचा मृत देह होता तिथे. त्यानी ही ते बघितले.आणि तो त्याचा सख्खा भाऊ होता. त्याने सांगितले कि फक्त तोच एक होता जो त्याच्या अत्यंत जवळचा होता... "

" ओह....मग हे खूप traumatizing आहे ते त्यांच्यासाठी.. 😔"

" हो खूप. But since प्रत्येक ठिकाणी धमकीच्या चिठ्या आल्या होत्या म्हणजे नक्कीच हे 'Miss' tery चा काम आहे. भलेही अभय म्हणत असेल कि ती संशयी आहे. पण माझा मुळीच ह्यावर विश्वास नाही. पण सांगू नाही शकत ना.😫. " त्याने फ्रस्ट्रेशन मध्ये डोके धरले.

"Sir काय खरे काय खोटे माहित नाही पण सध्या आपण ह्या सगळ्या bodies कोणाच्या आहेत हे शोधायला हवे."

" हो जाऊया. पण आज नको. मी इतर कर्मचारी धाडतो. आज ह्या दोघांना जवळ असणे खूप गरजेचे आहे.वाटले तर तु राहा घरी मी जातो तेथे. "

" तसेच कर. मी थांबते घरी. तुझ DSP म्हणू कर्तव्य आहे कि तु ह्यात मदत केली पाहिजेस. लगेच जा."

" हो... " शुभम निघून गेला..

दुर्गा आणि अभय शांत झाले होते. पण मनातून ते दृश्य काही निघत नव्हते. त्यांच्या डोळ्यांवरून कळत होते कि ते पुन्हा रडले होते.

आरोहीने त्या दोघांला चहा दिला. चहा पिऊन त्यांना जरा बरे वाटले.

शुभम आपली ड्युटी संपवून लगेच आला. तो फ्रेश झाला.हॉल मध्ये येऊन त्या दोघांला विचारले " आता जरा बरे आहात का तुम्ही दोघे?".

दोघांनी मान डोलावली.शुभम म्हणला " मी तपासणी साठी पुन्हा गेलतो. तर तिथे कळले कि हे सगळे त्या किडनॅप झालेल्या सगळ्या माणसांवर लक्ष ठेऊन असायचे. त्यांची सगळी माहिती पुरवायचे. म्हणजे कुठे जातात, काय करतात, बाहेर निघण्याची वेक काय. घरी येण्याची वेळ काय हे सगळे. परत lawyers वगरे पण होते बरेच. जे हे सगळे कोर्टात येऊ देत नव्हते आणि personally देखील या सगळ्यांवर लक्ष ठेऊन होते.."

हे ऐकून त्या दोघांचे डोळे मोठेच्या मोठे झाले.पण दुर्गा शांत होती.

" ' Miss' tery ने जर त्या सगळ्यांला मारले आहे तर नक्कीच काहीतरी कारण आहे म्हणून मारले आहे.माझा भाऊ पण.. 😖पण... त्यात सामील असेल म्हणून तिने त्याचा जीव घेतला असेल-"

"कोणत्या कॉन्फिडन्स ने म्हणतेस तु कि तिने हे सगळे बरोबर केले?" अभयच्या या करड्या आवाजाने सगळे घाबरले. हे बोलता बोलता देखील त्याच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते.

" पाहिलंतर स्वतःच सगळं करायचं. मग नंतर स्वतःच्या पापाचा घडा दुसऱ्या लोकांच्या डोक्यावर फोडायचा आणि स्वतः खुशाल राहायचे असे चिट्ट्या पाठवून. लोकं मग काय लगेच समजतात कि ही चांगले काम करते.."

" तुझा भाऊ निर्दोष नसेल म्हणून तर-"

" माझा भाऊ निर्दोष होता, आहे आणि असणार...... "

कथेला प्लीज नक्की रेट करा ✨