Miss'tery - भाग 6 lekhani द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Miss'tery - भाग 6

दुर्गाच्या जुन्या क्लिनिक मधली गोष्ट....

शुभम विचारपूस करत होता.
" अच्छा. तर असे आहे. आणि त्या bodies पण तिने मारल्या होत्या ना. आणि ते ही सगळे ड्रायव्हर्स होते त्या ट्रक, टेम्पोचे जे किडनॅपिंग चे काम करत होते.
वरतून काही लोकल्स ने confirm पण केले आहे कि हेच होते ते. Victim च्या कौटुंबियांनी चेहरा ही बघितला होता. मग हे confirm आहे कि हेच आहेत ते ड्रायव्हर्स.. "

" हो sir. "

" आता तुम्हाला कोणावर संशय आहे का? म्हणजे कोण हे करू शकते. Any guesses? "

"Sir हे बघा. आता भारतात मुख्यातः 4 माफिया आहेत.
पहिला,डॅनी.....
हा १९७९- १९९६ पर्यंतचा ह्याचा वेळ होता. मुळातच तेव्हा political बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असल्यामुळे, त्याला कसली भीती नव्हती. म्हणून मग त्याने खूप अन्याय ही केला त्या काळात. सत्ता मिळावी म्हणून बापाला विष पाजून मारून टाकले, आणि सत्ता हातात घेतली...."

" हो पण हे का सांगते आहेस तु... एवढे जुने -"

"कारण ह्याचे connection आहे. पुढे ऐका...
आता त्याच्या तीन बायका होत्या. प्रत्येकीला १ मुलगा होता. मुलींला टिकूच दिले नाही. २ ऱ्या बायकोला जी मुलगी झालती तीही मारून टाकली. ३ ला तर २मुली झालत्या पण त्यांला जमिनीत जिवंत गाडले होते.

आता ती तीन मुले.मोठीचा हेनरी, मधलीचा विक्रम, आणि धाकटीचा सय्यद.हे तीन सध्या मोस्ट वॉन्टेड आणि ऍक्टिव्ह क्रिमिनल माफिया आहेत.

आता जेवढी माहिती आहे त्या प्रमाणे हे तिघेही भारताचे तीन भाग करून राज्य करतात.
हेनरी हा उत्तराचे सगळे राज्य कंट्रोल करतो.
विक्रम हा पूर्व आणि पश्चिम चे राज्य कंट्रोल करतो.
आणि सय्यद हा दक्षिण भारत आणि काही श्रीलंकेचे भाग पण कंट्रोल करतो.
हे सगळे अंडरग्राऊंड माफिया आहेत. ह्यांचे धंधे म्हणजे,बेकायदेशीर वस्तू यांची देण घेण,ड्रग्स चा व्यपार आणि सगळ्यात मोठा धंदा म्हणजे मुली, बायका आणि लहान मुले.

Survive केलेल्या victims प्रमाणे. हे त्यांला बाहेर गावी sex slaves म्हणून विकतात, नाहीतर मग अजून कोणते बेकायदेशीर काम करण्यासाठी भाग पडतात. ह्यात सगळेच येते मग. ड्रग्स and ऑल सगळे.
कधी कधी स्वतःची आणि इतर काम करणाऱ्यांची हवस मिटावी म्हणून मग मुलींचा बलात्कार देखील केला जातो. आणि ज्या survive नाही करू शकत हे सगळे. त्यांला मारून, त्यांचे बॉडी पार्टस जे कंडिशन ने चांगले आहेत ते काढतात आणि विकतात. उरलेल्या शरीराला जाळले जाते नाहीतर मग दफन केले जाते. पण दफन कुठे करतात हे माहित नाही." 

" पण हे कसे करतात हे सगळे 😣🤬"

आरोही नैराश्यात हसली. " sir one the big reason is corruption 😞.sir तुम्हीच विचार कराना, आपली लोकं मुळातच पैश्यासाठी काहीही करायला तयार असतात. काही जण गरज म्हणून करतात काही जण लोभ म्हणून करतात आणि काही जण दबावाखाली करतात.या सगळ्यांचा फायदा ही अशी माणसे उचलतात.

Sir तुम्हाला सांगू. गरजू पेक्षा जास्त तर लोभी माणसे आहे या गटात सामील! एवढा पैसा कमावतात पण तरी त्याची भूक काही मिटत नाही. काही जणांला हवस आहे. या सगळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे या गटात.

आता जे ड्रायव्हर्स होतेना मारले गेलेले, त्यातील जवळ जवळ ७ जण हे छेड काढणे, बलात्कार ह्या केसेस मधून सुटलेले होते. नक्कीच याचा फायदा त्या तिघांनी उचलला आहे. त्यांला bribe दिली असणार कि आमचे काम केले तर मग तुम्हाला पैसा आणि तहान भागवण्यासाठी एक मुलगी देईल. 😣

त्या तिन्ही माफिया ने नक्कीच सगळे सरकारी कर्मचारी विकत घेतले असणार आहेत. जे त्यांचे सर्व काम करतात. आणि ह्यामुळे त्यांचे सगळे बंदे सुटतात.त्यांलाही तसलीच bribe देत असणार.जगाचे एक कडू सत्य आहे. पैसा आणि मुलगी बघितली कि माणूस वेडा होतो आणि भान नसल्यासारखे काहीही काम करतो.

Sir तुम्हाला तो केस माहित आहे का ६ महिन्यांपूर्वीचा. एका रिपोर्टर चा होता.मर्डरची केस होती. आणि मी ठाम पणे सांगू शकते कि त्याचा मर्डर ह्या लोकांनीच केला आहे. कारण त्याच्याकडे ह्यांच्या बऱ्याच्याश्या काळ्या कारनाम्यांचे प्रूफ गोळा केले गेले होते. ह्या लोकांनी त्या- त्याला, मार मार मारले आ - आणि जिवंत जा- जाळलं😖.
आपल्या लोकांनी काय केले. त्याला आत्महत्या म्हणून खपवून सोडून दिले 😖🥺"तिला अश्रू अनावर झालते. कारण तो तिचा जवळचा मित्र होता.त्याने हे व्हायच्या आधी तिला सगळे सांगितले होते. पण अन्यायाच्या विरुद्धात लडताना तो मरण पावला. शुभमलाही हे माहित होते.पण हे कारण होते, हे आज कळले!!!

तिच्या खांद्यावर थोपटत त्यांनी तिला शांत केले.

" Okay, सो आता आपल्यालाकडे ३ confirm suspects आहे.यांची इतर सगळी माहिती काढण्यासाठी आपल्याला गुप्त हेर पेरावे लागणार. आणि सगळे प्लॅन करून execute करावे लागणार-"

" sir मला आणखी एक suggestion द्यायचे आहे.
'Miss'tery हिला देखील confirm suspect लिस्ट मध्ये ठेवा. "

" पण अभय, ती क्रिमिनल नाहीये. ती एक माफिच्या रूपात देश सैनिक आहे. " अभिमानाने शुभम बोलला.

" sir तिच्यावर विश्वास ठेऊन कसे चालेल. तुम्हला नाही वाटतं का कि तिने हे सगळे plant केले असेल innocent card मिळण्यासाठी. पण मागून तिच हे सगळे करत असेल. वाचवण्यासाठी ती फक्त तिचे दर्शन घडवते. मग जेव्हा वाचवते तेव्हा चार मोटिवेशनल गोष्टी बोलते म्हणजे मग समोरचा त्या शब्दांला बळी पडतो आणि तिला डोक्यावर घेऊन नाचू लागतो.

पण खरे मध्ये तर हीच आहे जी गेम खेळत आहे. Psychological गेम. डोन्ट you think sir? "

" but victims never lie u know. आणि जेवढेही victims होते मागच्यावेळेस ते सगळे परत आले होते."

" पण sir कोण मोजायला गेलते का, कि किती victims हरवले होते आणि किती परत आले. तुम्ही विचार करा ना. ती माफिया आहे. हमखास पैसा असणार तिच्याकडे. मग ती मरण पावलेल्या victims च्या कौटुंबियांला का नाही धमकी देऊन आणि पैसा देऊन गप्प बसवू शकत. ".पॉईंट चे बोलला तो.

" u are right though 🤔she can be but necessarily not tooo.suspect म्हणून ठेऊ शकतो.but i डोन्ट think. माझे मन पण मला सांगत आहे कि ती नाहीये. "

" but sir जर मनाचे ऐकून काम केले तर मग किती नाश होऊ शकतो तुम्हाला ही माहित आहे. शेवटी डोके लागते इथे. आणि sir मला शंका आहे तिच्यावर.म्हणून आणि सावध राहिलेले बरे नाही का? 🙂"

" yess. तु बरोबर बोलत आहेस आपण ठेऊया तिच्यावर नजर. भलेही ती दिसत नाही पण तरी काहीतरी करूया नक्की. But मला मेन suspect तर
हे तीन... हेनरी, सय्यद आणि विक्रम वाटत आहेत. हे तिघे नक्की इन्व्हॉल्व्हड आहे या केस मध्ये.माझे मेन टार्गेट तर हेच असणार आहेत." हे बोलताना त्याचे डोळे आग ओकत होते.

"Sir आता ह्या केस साठी इतर trusted officers हातात घेतले पाहिजे. दुसऱ्या स्टेट्स मध्ये कामाला लावले पाहिजे." 

" yess, मी सिनियर ला लगेच हे सगळे मेसेज करतो आणि सांगतो."

दुर्गा किचेन मधनं बाहेर आली. " चला आता बस झाली चर्चा. जेवण तयार आहे. जेवून घ्या आणि आराम करा घरी जाऊन. "

" मला जायचा पण कंटाळा आला आहे. मी काम करतो माझे कपडेच घेऊन येतो एकदाचे. "
"हो sir मी पण येतो तुमच्यासोबत."

" जावा पण पाहिले जेऊन घ्या. ". त्यांनी सगळ्यांनी जेऊन घेतले.आरोही आणि दुर्गा कामे आवरत होती. शुभम आणि अभय आपले कपडे घेऊन आले.

अभय जाऊन रूम मध्ये झोपला. दुर्गा गाणी ऐकत होती. शुभम आणि आरोही अंगणात होते.

दोघांमधील अबोला मिटावा म्हणून शुभम ने प्रश्न केला " आरोही, आई बाबा कसे आहेत तुझे? " त्याला माहित नव्हते काय काय घडून गेले ते.

आई बाबा हे ऐकताच आरोही वरती आकाशात पाणावल्या डोळ्यांनी बघू लागली. नैराशी हास्य तिच्या तोंडून निसटले. " ते बघ ते तीन तरी दिसत आहेत का चमकणारे तिथे आहेत माझे आई बाबा आणि मिनू. "
त्याला समजले. नकळतच त्याने तिला एक घट्ट मिठी मारली. तिला आधार मिळावा म्हणून का कश्यासाठी ते नाही माहित पण मारावी वाटली.

तिला देखील एक आधार वाटला.
" हे बघ, तुला जेव्हा काही वाटेल तेव्हा माझ्याशी येऊन नक्की बोल. मी कायम तुझ्यासाठी उपलब्ध आहे. "❤️

तिला त्यातला प्रेमाचा ओलावा जाणवला. तिने मान डोलावली." चल खूप रात्र झाली आहे. आत जाऊन झोपूया. उद्या कामगिरीला लागायचे आहे. "
तिने मान डोलावली आणि दोघे आप आपल्या रूम मध्ये निघून गेले.......



....................??????????

"मी सांगितलेली कामगिरी झाली का?" 
" हो बॉस. फत्तेह झाली. आता उद्या धमाका भेटेल 😂😂😂😂" समोरची व्यक्ती हसली...........
कथेला नक्की रेट करा ✨🙏