" ऐका, मी दुर्गाला सगळी हकीकत सांगते.आलेच मी."
ती फोन करायला बाहेर गेली.
इथे अभय आणि शुभम तो पत्ता वाचून विचारात पडले होते. जणू तो पत्ता काहीतरी त्यांला वेगळेच सांगू पाहत होता.
" नाव खूप वेगळे नाही का अभय? असे वाटते मुद्दाम हे नाव ठेवले आहे कोणत्यातरी वेगळ्या कारणांनी. "
" असेल पण माहित नाही हो. कदाचित असेच ठेवले असेल. जाऊन विचारूया तिला म्हणता तर 😄"
आरोही आता आली. ती म्हणाली कि दुर्गाने परमिशन दिली त्या तिघांला." कधी येणार आहात ते विचारते ती."
" आपली ड्युटी संपल्यावर जाऊया का. जवळच आहे ही जागा. आणि आपण तिघे एक leave घेऊया या कामासाठी. आपल्या सिनियर्स ला तसे लेटर देता येईल आणि सांगू कि आम्ही हा केस वर काम करत आहोत. आणि daily रिपोर्ट देत राहू तुम्हाला असे आश्वासन देऊया. "
" हरकत नाही. तुम्ही आपापले लेटर्स मला लगेच लिहून द्या. मी त्यांला पाठवून देतो लगेच. उद्या पर्यंत परवानगी मिळेल. मग आपण जाऊया तिथे. तिला सांग कि उद्या येऊ आम्ही."
" जी sir.. " तिने लगेच सांगितले.
" आता तुम्ही लेटर्स घेऊन या माझ्याकडे "
" yes sir आलोच आम्ही. " त्यांनी लेटर लिहून शुभम कडे सोपावले. त्याने लगेच शिक्का मारून आपल्या सिनियर ऑफिसर ला पाठवून दिले.
दुसऱ्यादिवशी त्यांचा leave approve झाला. त्यांनी संध्याकाळी 6 वाजे पर्यंत तिथे पोहोचायचे ठरवले. आवरण्यासाठी ते आप आपल्या घरी लवकर निघून गेले.आरोहीने दुर्गाला सांगून ठेवले होते कि ते सगळे 6 पर्यंत जमतील तिथे.
दुर्गा थोडी लवकर येऊन तिथली आवारा-आवर करत होती. नीट स्वछ करून काढत होती.गाणे ऐकता ऐकता सगळी कामे करत होती.
तिच्या क्लिनिची बेल वाजली. ती त्या तिघांला बघायला गेली.दार उघडल्या उघडल्या दोन हात येऊन तिला बिलगले. तिन्हेही तिला मिठी मारली.😊
मिठी सोडून तिने अभय आणि शुभम ची ओळख करून दिली.
" हे अभय sir. माझे सिनियर-"
" नावाने हाक मारलीस तरी चालेल. 😊"
" बर ठीके. आणि हा शुभम. माझा कॉलेज चा मित्र. "
" माझी ओळख special नाही का. मी DSP असून मला मान नाही दिलास तु 🙄डायरेक्ट 'हा' म्हणालीस😑ये कौनसा अन्याय है भगवान 😢"
" चूप. माझा जवळचा आहेस. तुला कश्याला मान देऊ मी आणि तसही आपण युनिफॉर्म मध्ये नाही आहोत. तर मग इथे नियम लागू होत नाही😉😌"
ते तिघे खुलून हसले. पण इथे एकाला राग येत होता शुभमचा. अभय रागाने त्याच्याकडे पाहत होता. पण कोणाचेच लक्ष नव्हते.
" हा शुभम माझा प्लॅन चोपट करेल सगळा. ह्याला दूर ढकलले पाहिजे आरोही पासून, नाहीतर हा तिला माझ्यापासून लांब नेईल. " मनातच शिव ओरडला.
"🤭🤭😄😄 चला खूप झाली मस्करी आत या सगळे."आत आले आणि क्लिनिक चे इंटिरियर बघताच आवसून बघू लागले.
" तुझे क्लिनिक खूप छान आहे गं. निसर्गाच्या सानिध्यात राहायचा वेगळाच आनंद असतो. तु का क्लिनिक शिफ्ट केलेस? ". या अचानक आलेल्या प्रश्नाने दुर्गा गोंधळली. ती या तिघांला पाठमोरी होती म्हणून तिच्या चेहऱ्याचा भाव कोणाला दिसला नाही.
" अगं हे क्लिनिक माझ्या बऱ्याचश्या क्लायंट्स ला लांब पडत होते. म्हणून मग मी जरा शहराच्या जवळ घेतले. पण तिथेही असच निसर्गाच्या मध्ये आहो असे वाटावे म्हणून इंटिरियर आणि एक्सटिरियर दोन्ही तसेच केलेत."
" हो ते आहे खरे 😊. पण छान आहे हे.हो कि नाही शुभम आणि अभय."
" हो खरे बोललीस. "
दुर्गानी कोणाच्या नकळत निश्वास सोडला. " नशीब माझ मला हे पटकन सुचले. नाहीतर काही खरे नव्हते माझे.😮💨😮💨😮💨"
" अं...मला आणखी एक सांगायचे होते. इथे राहण्यासाठी रूम्स देखील आहेत. तर मग तुम्ही राहू शकता. 6 रूम आहेत. तीन तुम्ही घ्या."
" रूम केलेस तु? 😮"
" हो कधीच करून घेतले. इथे मग कधीतरी फक्त मी नाहीतर मग आई - बाबा,रुद्र आम्ही सगळे येतो मन आणि तन दोन्ही रिलॅक्स करायला. कधी कधी मसलती करत असतो. "
" कोणत्या मसलती?🤨"अभयने संशय व्यक्त केले.
" अहो. काय मसलती असणार,नेहमीचे.पाळणा कधी हलणार घरी..!!" दुर्गा खोटे खोटे लाजू लागली. पण तिच्याशिवाय हे कोणालाच माहित नव्हते कि हे खोटे आहे.
" अरे वा sss!! मग आना कि मला भाचा. मावशी व्हायचे भाग्य येउदे कि माझ्या नशिबी.🤭"आरोही चिडवीत होती..
" ए गप गं. तुझं आपलं काहीतरीच. "तिला मारत म्हणाली.
"पण मग तुमच्या घरी का नाही होत या मसलती?" अभय ला आणखी संशय आला.
" अहो घरी कोणालाच वेळ नाही भेटत. मी दिवसभर क्लिनिक ला असते. आई-बाबा संस्कार शिबीर घेतात. मग बराच वेळ ते ही घरी नसतात.आणि रुद्र सायंटिस्ट आहे. तो घरी लवकर जरी आला तरी तो दमलेला असतो. म्हणून मग जास्त बोलने होत नाही कोणाचे.म्हणून मग वर्षातून 15 दिवसांसाठी तरी आम्ही सुट्टी घेऊन येतो.मी नेहमी येत राहते पण हे तिघे कधीतरी. "
" अच्छा "😯
" ह्याच्याशी जपूनच राहावे लागेल. खूप हुशार आहे हा.खास लक्ष द्यायला लागेल ह्याच्यावर.याला काहीच कळता कामा नये ". त्याच्याकडे बघत ती मनातच म्हणाली.
" संशय का घेता तुम्ही तिच्यावर? "
" सतर्क असलेले बरे आहे 🙂". तिच्याकडे पुन्हा संशयास्पद नजरेने बघत तो म्हणला.
" अगं राहूदे. तुमच काम आहे सतर्क राहणं. ते मला personally ओळखत नाही तर मग संशय येणारच. हरकत नाही "😊" तसही तुम्हाला काही सापडणारच नाही कितीही शोधायचा प्रयत्न केला तरी. सो bad😏😏😂😂.तुझ्यावर जास्त लक्ष असणार आहे आता माझे.🤭😄" मनातच हसत ती म्हणाली.
" हे बघ समोर किचेन आहे. हा लिविंग रूम. तुम्ही लिविंग रूम मध्ये discuss करू शकता किंवा मागे अंगणात. चला तुम्हा प्रत्येकाला तुमचा रूम दाखवते. "
दुर्गाने प्रत्येकाला त्याचे रूम दाखवले.
" आम्ही उद्या पासून इथेच राहू. आज नाही जमणार. कोणाला घरी माहित नाही. आणि कपडे पण नाहीत " शुभम रूमला निरखीत म्हणला.
" जशी तुम्हा सगळ्यांची इच्छा 😊."
" तुम्ही discuss करा मी तो पर्यंत जेवण बनवते. 😊"
" अगं तु ही ये.तुझा अनुभव उपयोगी पडेल. "
" अग नाही गं, तुम्ही discuss करा तुमचे. "
" हो ना. ती नाही म्हणते तर कश्याला फोर्स करतेस तु. आणि तिची आपल्याला गरज नाही. " अभय रागाने दुर्गाकडे बघत म्हणाला. दुर्गानी ते हेरले. ती आतूनच हसत होती.
" असं का बोलता तुम्ही. जरा गप्प बसा. तुम्हाला काही माहित नाही तर शांत बसा 🙄😒"आरोही रागाने म्हणाली.
" अभय तुम्ही तुमचे कोणाबद्दलचे मत मांडू नका. आपण काहीतरी महत्वाचे करायला आलो आहोत. आणि ज्यांच्याकडे आपण राहतो त्यांलाच वाकडे बोलण्याचा काही हक्क नाही तुम्हाला. शांत बसा 😒😠". शुभम ही चिडला होता.आरोही त्याला शांत करू पाहत होती. पण तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी एक तेज दिसत होते.
" ओके sir 😠". तो तिरस्कारणे शुभम आणि दुर्गाकडे पाहत होता. दुर्गा ला मज्जा येत होती.दुर्गा आतूनच smirk करत होती.
" ऐका भांडू नका. मी स्वयंपाक करते. काही वाटले तर तुम्ही विचारा मला. मी नक्की सांगेल. पण तुमच्या discussion मध्ये नका घेऊ. हा.. पण कधीतरी वाटले तर मग मी नक्की बसेल तुमच्यासोबत 😉😊"
" हो नक्की " शुभम आणि आरोही खुश होत म्हणाले.
दुर्गा गेली स्वयंपाक करायला. इथे यांचे काम सुरु झाले.
" बर, आरोही आणि अभय. मला एक सांगा. तुम्ही त्या bodies बघितल्या होत्या बरोबर. तर मग त्या bodies सोबत काही चिट वैगरे आलती का...? "
" हो sir.अभय सरांनी वाचली होती."
" हो.ती 'Miss'tery ची होती. त्यात ती कोण्हाला तरी specifically धमकी देत होती. त्यात ती म्हणाली कि तुम्ही तुमचे काम नीट नसेल करत, तरी ती आहे या जगात सुधारणा आणायला. वरतून नाही सुधारले तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. "
" अच्छा. तर असे आहे. आणि त्या bodies पण तिने मारल्या होत्या ना. आणि ते ही सगळे ड्रायव्हर्स होते त्या ट्रक, टेम्पोचे जे किडनॅपिंग चे काम करत होते............................. "