Aaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa" या चित्काराने संपूर्ण रूम शहारले. त्या ओरडण्यात दुःख दुथडी भरून वाहत होते. ती देवाला न्यायसाठी साकडे घालत होती.
"Ahhh"या श्रापी स्वप्नातून आरोही ताडकन जागी झाली.घामाने डबडबलेली होती ती. ते स्वप्न तिला पुन्हा पडून गेले. तिचा भूतकाल तिला सोडत नव्हता.असे वाटत होते कि तो भूतकाळ तिच्या सावलीला म्हणत होता.
आरोही:- आई - बाबा, मिनू हा अंधार कितीकाळ माझ्या मागे राहील.तुम्ही गेलात ह्याचा त्रास मला अजून होतो. आणि हा भूतकाळ ते सारखं रिप्ले करून माझे ताण आणखी वाढावंत असतो. केव्हा ही भुयार संपेल? केव्हा मी शांततेने जगू शकेल?
एका कोपऱ्यातून हळूच आवाजात भूतकाळ
(भूतकाळ:- जेव्हा तुझा बदला पूर्ण होईल आणि या तिघांला आणि मुख्य तुला न्याय मिळेल.)
तिच्या डोळ्यांचा बांध फुटला. कित्येक काळ डोळ्या आड लपलेले हे पाणथेंब सामोरे येऊन आत्म्याची वेदना घेऊन गालाच्या खाली ओघळले.ते अश्रू बाहेर येण्याचीच वाट बघत होते. म्हणतात ना रडून दुःखाचे ओजे कमी होते. हे खरे आहे. जितके लपवाल तितकी वेदना ते देणार. किती तरी वेळ ती रडत होती. पण हळू हळू ती शांत होऊ लागली.काही वेळानी ती पूर्ण शांत झाली.तिच्या कुटुंबाची तिला आठवण आली म्हणून तिने बाजूच्या स्टॅन्ड वर असलेल्या त्यांच्या फॅमिली फोटो ला घेऊन हृदयशी कवटाळून पुन्हा पण शांततेत
झोपी गेली.
सकाळी लवकर उठून घरातली कामे आवरून ती आपल्या ड्युटी साठी रवाना झाली.बस मध्ये जाता जाता तिने दुर्गाला कॉल लावला.
" हॅलो, दुर्गा? "
" हा बोल ना गं. पण जरा लवकर हा. मी घरातले आवरतेय आणि मला माझ्या क्लिनिक मध्येही जायचे आहे... "
" हो. अगं आज तु जरा घरी येशील का? तुझी गरज आहे आज. "
" अगं पण तु ड्युटी वर आहेस ना? "
" हो पण मी माझी मीटिंग संपल्यावर leave घेईल आजसाठी. तसेही मी आज साठी apply केलते पण मग ही मीटिंग आली म्हणून मग काही जमलं नाही. पण मीटिंग संपल्यावर भेटेल. तु फक्त ये.. "
" बर ठीके. कधी पर्यंत येऊ? "
" ६ नंतर ये. "
" ठीके मी पण माझ्या clients ला सांगेल कीं मी ६ नंतर उपलब्ध नाही. ठीके चल बाय. "
" हा बाय "
तिने फोन ठेवला. खरेतर आरोहीला तिच्या पास्ट ट्रौमा बद्धल तिला सांगायचे होते. आधी कधी तिने दुर्गाला सांगितले नाही. पण सतत दुर्गा तिला विचारात होती कि तु काही लपवतेस का माझ्यापासून. पण प्रत्येक वेळेस तिने मोकळे होणे टाळले; आणि आता तिची गरज आहे मोकळे होणे.आणि हे दुर्गा पेक्षा चांगले कोणीच करू शकत नव्हते.
आरोही पोलीस स्टेशन ला पोहोचली. आपण आल्याची वर्दी तिने सिनियरला द्यायला सांगितली.सिनियर ने तिला आपल्या केबिन मध्ये बोलावले.
" जय हिंद सर 🫡. तुम्ही सांगितल्या प्रमाणे सगळ्या अधिकाऱ्यांना मी लवकर बोलावून घेतले आहे. सगळेच आले असतील. "
" हो नक्कीच सगळे आले असतील.ऐकाणा मला एक तुम्हाला गोष्ट विचारायची होत-"
"aaaaaa" बाहेरून लोकांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. काय झाले ते बघण्यासाठी आरोही लगेच बाहेर आली. एक हवालदार सरांजवळ आला.
" पाटील, काय झाले?लोकं का ओरडत आहेत. Any serious problem? 🤨"
" सर तुम्हीच बाहेर येऊन बघा" त्या हवालदाराच्या चेहऱ्यावर भीतीचे आठे उठले होते हे अभय शिर्के ला साफ कळून गेले होते.तो लगेच बाहेर आला.
त्याने १० bodies समोर पडलेल्या बघितल्या.त्याने भुवया आक्रसले. त्याने हवालदाराला इशारेतच' हे काय आहे 'विचारले.
" सर ह्या bodies आपल्या पोलीस स्टेशनच्या मागे कशाबश्या फेकलेल्या भेटल्या. त्याबरोबर एक चिट्ठी ही भेटली. हे पाहा".
त्याने ती चिट्ठी पुढे केली.आरोहीकडे बघितले पण ती अगोदरच धक्केत होती. तिच्या चेहऱ्यावरून साफ कळत होते. ती त्या bodies ला निरखून बघू पाहत होती.शेवटी अभय नेच चिट्ठी वाचायला सुरवात केली.
" ए, विश्वासघातकाssss. जरी तु तुझे काम चोख करत नसशील,तरी या दुनियेत अन्यायला न्याय, पीडितांला आसरा,स्त्रीला स्वतंत्रता द्यायला मी पुन्हा येतेय, पुन्हा प्रयत्न करतेय या जगाला सुखात जगण्याचे ठिकाण बनवायला.
अजूनही वेळ गेलेली नाही. सुधारा नाहीतर यांच्या सारखीच पण याहून बेकार अवस्था केली जाईल. समोरच्याला identify करता येणार नाही एवढी."
'Miss' tery.
ही चिट्ठी वाचताना अभयला वाटले कि ती त्याच्यासाठीच आहे का. त्याने ती चिट्ठी फाडून फेकली. त्याला राग आलता कि ही ' Miss' tery आमच्या कामात का दखलंदाजी करते.तो रागात आपल्या केबिन मध्ये जाऊन बसला.
इथे मीडियाचे लोकं ऑलरेडी जमा झालते.त्यांनी त्यांचे काम सुरु केलते. त्यांला हे ही कळले होते कि द ग्रेट इंडियन woman mafia' Miss' tery ची चिट्ठी या पोलीस स्टेशन ला भेटली होती आणि हे काम तिनेच केले आहे याचा सुगांव देखील त्यांना लागला.
आरोही देखील आपल्या सिनियरच्या मागे गेली. अभय तिथे आपले डोके धरून बसला होता.
" सर हे काय सुरु आहे. या bodies कोणाच्या आहेत.
आणि त्यांला खूप मारहाण देखील केली गेली आहे."
" या bodies त्या ट्रान्सपोर्टर्स च्या आहेत "
🤨" सर तुम्ही कसे काय एवढ्या surely बोलू शकता? "
" अगं पाहिले नाहीस का तु. कालच ती केस बाहेर आली. तिने पाहिले या ट्रान्सपोर्टर्स ला शोधून काढले असणार. आणि हे सगळं ऑलरेडी pre-planned असेल. पण मला या ' Miss' tery वरच संशय आहे. स्वतःच हे सगळं घडवून आणते स्वतःच त्याचं निवारण करते आणि प्रसिद्ध होते. मग नंतर स्वतःची ओळख लपवून ' मी खूप मोठी आहे असे दाखवते '. आणि मग सामान्य लोकांला काय वाटते कि आपण आळशी आहोत."😤तो रागात बोलू लागला.
"पण सर-"
" हिच्यामुळे माझे काम चोख कधीच होत नाही. कधीच कोणी आपल्यावर विश्वास ठेवत नाही.त्यांला वाटतं आपण सगळे माजूर्डे आहोत. 😤"
" सर शांत व्हा.हे घ्या पाणी."तो रडू लागला. का माहित का पण रडू लागला.
आरोहीला पण बघून वाईट वाटले. ती त्यांच्या जवळ आली. गुडघ्यावर बसली आणि त्यांला आधार दिला.त्यांनी आपली मान वर केली तिचा हात हातात घेतला, घट्ट धरला आणि म्हणाले कि " please be by my side forever🥺"
तिला कळत नव्हते काय करावे पण सध्या त्यांची स्तिथी बघता तिने मान डोलावली.
Meeting ची वेळ निघून गेलती पण तरी ती दुपारच्या सत्रात घेण्यात आली होती म्हणून मग सगळे अधिकारी जमले होते. दार बंद करण्यात आले होते.
अभय ने सुरवात केली.
" कालच्या न्यूस नंतर पोलिसांवर जबाबदारी खूप वाढली आहे. आपल्याला लवकरात लवकर ह्या केस मध्ये लक्ष घालायला हवे."
" yess सर "
"मला एक सांगा जेव्हा तुम्ही त्या bodies ला बघितले तेव्हा तुम्हाला काय काय दिसले? कसे मारले गेले होते ते bodies? "
" सर त्या bodies ला चाबूक चे फटके दिले गेले होते. वरतून अंगावर गरम तेल ओतण्यात आले होते असे वाटते. कारण त्यांचे अंग भाजलेले आणि तेलकट होते. वरतून एका तलवारीने तो वार केल्यासारखा वाटतं होता. आणि सगळ्यांच्या छातीवर गोळी लागली होत्या.पण सर हे तर त्या 'Miss' tery ने केले आहे. तुम्ही का हे सगळे विचारात आहात? "
"Isn't it possible कि हे सगळे तिच घडवून आणत असेल. Don't you think she can play innocent card here?"
" Not possible सर कारण अश्या सगळ्या केसेस तिनेच एकटीने सोडवल्या आहेत.आणि प्रत्येक केस मागचा mastermind तिने स्वतः मारला आहे आणि लोकांसमोर दाखवले आहे. "
"But can't she जस्ट plant them and make herself look innocent. पैसा आजकाल सगळे काम करतो."
" but sir कोण का जीव देईल पैश्यासाठी?"
" बर ठीक आहे पण victims खोटे बोलू शकतात
why can't they? तिने यांला धमाकावले देखील असेल."
" नो सर. Mouth can lie but eyes cannot "
" those victims would be great actors 😏"
तिकडून एक रांगडा आवाज वर आला.
" सर आता बस झाले. तुम्ही victims ला ऍक्टर म्हणत आहात. एवढे शेफारलात का तुम्ही कि सरळ ज्यांनी भोगले त्यांला ऍक्टर्स म्हणत आहात 😠. तुम्हाला कोण्ही इन्स्पेक्टर बनवले? साधी अक्कल नाही तुम्हाला आणि डायरेक्ट victims ला actors म्हणताय. Sorry sir but तुम्ही चुकीचे आहात. यासारख्या same केस ची victim होती माझी पुतणी 🥺" त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.
" तिला मार मार मारले त्या नराधमांनी. तिचा आणि इतर मुलींचा ब- बला sss- त-कार करण्यात येणार होता 😖. पण या पोरीनं माझ्या पुतणीचा आणि इतर मुलींचा जीव वाचवला जीव वाचवीला. त्या नराधमांला मृत्युची सजा दिली.. आणि ह्या सगळ्या पोरींला एक कान मंत्र दिला...
"आपण सगळे जिजाऊच्या मुली आहोत.शिवरायांच्या आणि शंभुराजांच्या बहिणी आहोत. आपली रक्षा आपण स्वतःच केली पाहिजे.जिजाऊंचा आशीर्वाद आणि शिवशंभुसारखे बळ, सय्यमता आपल्या मागे नेहमी आहे .त्याला ओळखा आणि तलवारी सारखे घातक, चलाख आणि तीक्ष्ण व्हा 🚩."
माझ्या पुतणीने कधीच तिचा चेहरा नाही बघितला पण तिच्या मनात मात्र एका रक्षकासारखा चेहरा उभा ठाकला गेला आहे 🚩. "
सगळ्यांच्या अंगावर काटे आले होते, शिवाय अभयच्या. तो ताडकन उठून रागात बाहेर गेला आणि शेवटचे शब्द बोलून गेला. " आज साठी एवढेच आता या पुढे फक्त मी आणि आरोही आम्ही एवढेच या केस मध्ये लक्ष घालू. आणखी कोणी लुडबुड केली तर मग पदावरून बेदखल करण्यात येईल 😠"
हे काय झाले कोणालाच काही कळले नाही पण 'Miss' tery साठी एक अभिमानाची जागा त्या सगळ्यांच्या मनात नक्कीच निर्माण झाली होती.🌸