Miss'tery - भाग 3 lekhani द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Miss'tery - भाग 3

अभय रागात पोलीस स्टेशन च्या बाहेर आपल्या जीप जवळ आला.
" uughhh damnnnn😡.त्या म्हाताऱ्याला जास्तच पंख फुटले आहेत. मोठा आहे वयाने म्हणून सोडले नाहीतर मग कधीच बेदखल केले असतं इथून.
पण जर मी हे केले असते तर मग कोण्हीच माझ्यावर विश्वास ठेवला नस्ता, आणि मला हे नको आहे. सो मग calm down, calm down 😮‍💨😮‍💨😮‍💨." चेहऱ्यावर एक मंद हास्य चिकटवून तो आपल्या कामाला रुजू झाला.

आरोही leave घेऊन आपल्या घरी निघाली. तिची बस आली म्हणून ती पटकन धावत गेली आणि पकडली एकदाची बस! बस मध्ये चडल्यावर तिने लगेच तिकीट काढले आणि एका जागेवर जाऊन उभे राहून दुर्गाला फोन लावला.
" हॅलो दुर्गा, मी निघाले आहे. तु थोड्यावेळात येशील माझ्या घरी." 
" हो ठीक आहे मी येते आवरून." आणि तिने फोन ठेवला.

आरोही घरी पोहोचली.फ्रेश झाली. स्वयंपाक उरकला. तेवढ्यात तिच्या घराची घंटी वाजली. तिला माहित होते कि ही दुर्गाच आहे. तिने किचेन मधनच हाक मारली. " ये,दार उघडे आहे " 

दुर्गा आत आली आणि लगेच आरोहीला जाऊन मिठी मारली. " i missed you🫂🫂"
" मी too😊"
" कशी आहेस? गेला आठवडा तु काही क्लिनिक मध्ये आली नाहीस. " 
" हो अगं काम आलं म्हणून बाकी काही नाही. आज येणारच होते पण मग या meeting मुळे कॅन्सल झाले. पण सोड ना तुला घरी बोलावलंच कि. त्या बहाणे आपण माझ्या घरी भेटलो कि. आता जाऊ नकोस 4 -5 दिवस." 
"अगं नाही गं.मला आमची सगळी कामे आवरायची असतात. आई बाबा busy असतात आणि रुद्र पण busy असतो.त्याला जमत नाही आणि शेवटी काय काय काय करेल तो. म्हणून मग मीच कामे आवरते. Max 2 दिवस राहू शकते मी आणि राहील डोन्ट वरी 😊."

" ओहो आमच्या जीजूला पण कामे जमतात का 😁"
दुर्गा लाजू लागली " हो जमतात पण तो ही busy असतो मग... म्हणून आई बाबांकडे जास्त लक्ष देता येत नाही. आणि आई बाबा भले मला म्हणतात कि नको काळजी करुस आमची आम्ही बघून घेऊ. पण नाही ना, त्यांची सेवा ही पाहिले.!"

" hm बरोबर आहे.आई बाबांची सेवा हे आपले पाहिलं कर्तव्य आहे. पण माझ्या नशिबी कधी तो आलाच नाही 🥺😞. "
" रडू नकोस🫂. माझे आई बाबा तुझे पण आहेत. जेव्हा पाहिजे तेव्हा ये त्यांला भेटायला. मला नेहमी विचारात असतात तुझ्या बद्धल. एकदा ये आणि भेटूण जा 😊" 
" हो नक्की 😄. चल जेवणाची वेळ होतं आली आहे. आपण जेऊन घेऊया आणि गप्पा देखील मारू जेवता जेवता. "
" ये बात sss😁, चल जेऊन घेऊ. "त्या जेवता जेवता गप्पा मारत होत्या. जेऊन झाले आणि दुर्गा म्हणाली " बोलता बोलता कधी वेळ निघून जातो हे कळतच नाही ना? " 
" हो ना आणि वरतून बालपणीच्या आठवणी ताज्या होतं असताना तर मुळीच नाही. "😊 
" चल आपण आवरून घेऊया आणि मग तुझ्या वेदनेला रामबाण उपाय शोधूया."

त्यांनी आवरून घेतले. आरोही च्या बेडरूम मध्ये जाऊन बसले. आणि मग healing ला सुरवात झाली.

" ठीके चल मग आपण सुरवात करूया. सुखासन मध्ये बस. " 
आरोही बोलल्या प्रमाणे करू लागली.

" डोक्यातुन सगळे विचार काढून टाक. रिकामे राहूदे डोक्याला." 
" deep breathing सुरु कर. श्वास हळूच आत घे आणि सोड." हळू पण conscious श्वास आरोही घेऊ लागली.

"ठीके. आता असं विचार कर कि तुला एक मोठी opportunity भेटली आहे सगळे मोकळे करण्याची. जी गोष्ट तुला सगळ्यात जास्त त्रास देते तिला आठव." 

आरोहीला फक्त एकच गोष्ट आठवते. ती म्हणजे तिचे कुटुंब आणि त्यांच्यासोबत झालेला अन्याय. आरोही ला ते सगळे आठवू लागले. तिचे उर भरून येत होते. श्वास वर खाली होतं होता.

" घाबरू नकोस शांत हो. जे काही येत असेल त्याला येउदे. आणि वाहून जाऊदे एकदाचे. धरूज ठेवण्यात काही अर्थ आहे का ते? स्वतःच्या मनाला एकदा विचार. हे विचार कुठेतरी दडून ठेवल्यामुळे किती त्रास होतोय तुला. आता ही संधी तुझ्यापशी चालत आली आहे.
मोकळे होण्याची आणि पुन्हा नवीन श्वास घेण्याची." 

आरोहीचा बांध हळू हळू फुटत होता त्या सर्व आठवणींनी.दुर्गा तिच्या जवळ आली. आपली सकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरवली.आपले हाताचे तळवे rub करून त्यांला पॉसिटीव्हली चार्ज केले. आणि आरोहीच्या तळव्यांवर ते ठेवले.

तो स्पर्श अनुभवताच आरोहीला मायेची उभ तिला कवटाळत आहे असे तिला वाटले आणि त्या उबाने तिचे हृदय भरू आले. ती ढसा ढसा रडू लागली.

दुर्गाने तिचा हात सोडला नव्हता. ती डोळे बंद करून आपली healing energy ट्रांसफर करत होती आरोहीला. आपले हृदय कोणीतरी पहिल्यांदा प्रेमाने उघडू त्यात लपलेले भावना बघू आणि त्याला आसरा देऊ पाहत आहे असे आरोहीला वाटले. तिने स्वतःला थांबवले नाही. मनसोक्त दुर्गेच्या कुशीत ती रडली.

बऱ्याच वेळानी तीचे रडणे थांबले.दुर्गाने तिला विचारले.
" आरोही. किती दुःख साठवले आहेस गं तु मनात. मला ते फील होतेय. खूप ट्रौमा आहे तुझ्यात. मला का नाही सांगत तु. मी तुझी या बाबतीत मदत करेल. जर नसेल होतं तर मग एका डायरी मध्ये ते लिहायचे. पण ते मनात ठेवायचे नाही. " 

" मला तुला हेच सांगायचे होते. त्यासाठीच तुला आज मी बोलावले. माझे आई बाबा आणि मिनू accident ने नाही तर एका शैतानाने त्यांला मृत्युच्या दारात ढकलले. " हे बोलताना तिच्या डोळ्यात लाव्हा उसळताना दुर्गा ला दिसला.

" म्हणजे तु माझ्याशी खोटे बोललीस 😧" 
" हो, कारण मला ते सांगणे खूप कठीण जात होते. "
" बर हरकत नाही तु सांग आत्ता काय झालते ते. " दुर्गा मुळीच हे सगळे जेव्हा घडले तेव्हा बाहेरगावी होती म्हणून मग तिला काहीच माहित नव्हते.आणि जेव्हा आली तेव्हा आरोहीने सगळ्यांला accident मध्ये ते वारले असे सांगितले.

" तो उमेश होता. माझा जुना क्रश.तो पोरगा एक लफंगा होता. मी ड्युटी वर असताना, त्याला एका मुलीला छेडताना पाहिले होते. त्या मुलीला वाचण्यासाठी मी तिथे गेले. पाहिले बोलण्यात समजावू पाहिले पण तो मलाच छेडायला लागला होता.मला म्हणला ' मॅडम ये गुस्सा छोड दो.आप ऑलरेडी hot हो.क्यू इतना temperature बढा राही आजू बाजूका और हमारा 😉. एक ऑफर देऊ का. बाई माझ्या वाड्यावर या. तुम्हाला स्वर्गात नेईल 😁😉' माझे तिथेच डोके सरकले आणि मी त्याला थोबाडीत मारली. नंतर 1000 लोकांसमोर.

तो शरमला होता पण जाता जाता मला म्हणला ' तुला मी सोडणार नाही, you will pay for this😈'. मला माहित नव्हते कि तो एवढ्या खालच्या थराला जाईल. आणि मला कळले होते कि तो कोणाच्या खाली तरी काम करतो. पोरी छेडणे, त्यांला मोलेस्ट करणे हा सगळा त्याचं धंदा होता. किती तरी केस आलते त्याच्या विरुद्धात पण त्याचा तो बॉस खूप पॉवरफुल आहे. आणि तूच विचार कर. पोलीस, lawyers, political लीडर्स यांला पैसे देऊन विकत घेतो.आणि मग समजा जरी कोण्ही त्याचं माणूस कोर्टाच्या केस मध्ये अडकलं तरी ते सुटायचे. मग कोण्ही परत यांच्या विरुद्धात केस केलीच नाही. 

आता तो ज्या mafia च्या अंडर होता त्यानेच नक्की माझी सगळी डिटेल्स वगरे काढली असणार. तो कसा बसा माझ्यापर्यंत पोहोचला होता. त्याने पहिले माझ्या कुटुंबाला किडनॅप केले. त्याला सगळे माहित होते कि हे कुठे जाणार आहेत वगरे. त्याने मग बरोबर रस्त्यात पकडले. मला unknown नंबर वरणं कॉल लावला आणि धमकी दिली. कि कुटुंबाला वाचवायचे असेल तर मग कोहिनुर बिल्डिंगच्या बेसमेंट मध्ये ये. मी तिथे लगेच गेले. आत घुसले तेव्हा बेशुद्ध पडलेले आई बाबा आणि मिनू ला बघितले. त्यांच्याकडे जायच्या आधीच मागून कोणीतरी माझ्या डोक्यावर लोखंड मारले आणि मी बेशुद्ध झाले.

मी जेव्हा उठले तेव्हा तोच चेहरा माझ्या समोर मिनूला मारत होता. ती ओरडत होती ' ताई मला वाचवं ', माझ्या आई बाबा माझ्याकडे आशेने बघत होते पण मला खुर्ची वर बांधले होते. मी काहीच करू शकत नव्हती. शेवटी तो मला म्हणाला ' तु माझ्याशी पंगा घेऊन चूक केलीस. पण उफसोस तुला याची किंमत फेडावी लागेल.'मी त्याला म्हणाली कि माझ्या कुटुंबाला का ओढले जाते आहे. तुला माझ्याशी problem आहे तर माझ्याशी लढ. त्यांचा काही दोष नाही.

तो म्हणला कि ' त्या मुळेच तर. ज्यांचा दोष नाही त्यांला त्रास देऊन तुला किती त्रास देऊ शकतो हे मला माहीत आहे. भोग तुझ्या कृत्याची फळे.' 

आ-आणि माझ्या डोळ्यांसमोरच त्यानी त्या तिघांला चाक- चाकूने " तिचे शब्द अडकत होते.' मारून टाकले "😖तिचे अश्रू पुन्हा बाहेर आले.

दुर्गाने तिला घट्ट मिठी मारली." रडू नकोस. मी देवाकडे प्रार्थना करेल कि तुला न्याय मिळूदे आणि त्या हरामखोराला शिक्षा "😡

काही वेळाने ती शांत झाली.
" तुझ्याशी बोलून खूप हलके वाटले. मनाचे ओझे हलके झाल्यासारखे वाटले. थँक्स यार 🥺"
" shhh. दोस्ती मै नो सॉरी नो थँक्स 😊"
" चल झोपूया आपण "
" hm"

रात्री २ वाजता.
" तुला सगळे कळले ना काय करायचे ते? " 
" हो कळले,don't वरी सगळे काम नीट होईल. पण तिला काही संशय नाही ना आला? "
" नाही.ती गाढ झोपली आहे 😉.आणि अशीच जे तिने ऐकले नाही पाहिजे तेव्हा तेव्हा तिने गाढचं झोपावे. 😄😄😏" 
" hmm😏😏😏 "
" आणि-......आणि ऐक जर गरज पडली तर मग लाल तिखट आणि चिमूटभर गरम मसाला पण घाल भातात. त्याने आणखी चव येते त्याला. काही लागले तर मेसेज कर मी आहे जागी. " 
त्या व्यक्तीने तो ईशारा हेरला.
"ठीक आहे. झोप आणि सांभाळून.."
" हा. बाय darling 😉".

आरोही ला तिने आरश्यात्न पाहिले होते.
" काय गं कोणाशी बोलत होतीस? " अर्ध्या झोपेत आरोहीने विचारले.
" अगं माझा नवरा, त्याचा कॉल होता.त्याचा कसं असतंय माहितीये, काम करता करता उशीर झाला कि मग जेवण बनवायचे विसरतो. म्हणून मग मला कॉल करतो कधी कधी. आणि हे काय आत्ताच कॉल केलता. तु झोपली होतीस गाढ म्हणून मग मी बाहेर येऊन बोलत होते. " 
" बर. मी जाऊन झोपते." जांभळी दिली 🥱." तु येतेस कि थांबतेस? "
" हो आलेच. जा तु झोप ". आरोही गेली. दुर्गाने निश्वास सोडला.
" बाई जपून राहावे लागेल हिच्यापासून. नाहीतर सगळे पितळ उघडे पडेल 😏."

" good night sweetheart. शांत झोपून राहा आणि कधी पण मी माझे काम करत असताना उठू नकोस😈"
.......................
कथा आवडली तर मग नक्की rate करा.
तुमचीच
Lekhani