भाग ५ — स्वप्नांना पंख मिळाले
वर्षं पुढे जात होती.
Princess आता लहान मुलगी राहिली नव्हती.
तिच्या मनात स्वतःच्या आयुष्याबद्दल अनेक स्वप्नं होती.
शिकायचं.
Graduation पूर्ण करायचं.
चांगली नोकरी मिळवायची.
आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं.
तिला स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी करायचं होतं.
विशेषतः आईसाठी.
कारण आईने तिच्यासाठी खूप काही सहन केलं होतं.
Nana-Nani नेही तिला आयुष्यभर आधार दिला होता.
एक दिवस ती स्वतःशीच म्हणाली—
“एक दिवस मी त्यांच्यासाठी काहीतरी करणार.”
ती अभ्यास करत राहिली.
कठीण प्रसंग आले तरी थांबली नाही.
शेवटी तिचं Graduation पूर्ण झालं.
त्या दिवशी घरात आनंद होता.
आईच्या चेहऱ्यावर अभिमान होता.
Nana-Nani च्या डोळ्यांत समाधान.
Princess ने त्या दिवशी मनाशी ठरवलं—
आता पुढचं पाऊल—नोकरी.
आणि काही काळातच तिला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली.
तिच्या आयुष्यात पहिल्यांदा तिला वाटलं—
“आता माझं आयुष्य माझ्या हातात आहे.”
पण आयुष्याला तिच्यासाठी अजून एक परीक्षा ठेवायची होती.
भाग ६ — ज्या घराने तिला वाढवलं, ते घर मागे राहिलं
नोकरी सुरू झाली.
Princess कामात रमली.
नवीन लोक भेटले.
नवीन जबाबदाऱ्या आल्या.
आयुष्य हळूहळू स्थिर होत होतं.
पण अचानक एक दिवस परिस्थिती बदलली.
Nana चं छत त्यांच्या डोक्यावर राहिलं नाही.
ज्या घरात Princess लहानाची मोठी झाली...
जिथे तिच्या बालपणाच्या असंख्य आठवणी होत्या...
ते घर सोडण्याची वेळ आली.
घर आवरताना Princess काही क्षण शांत उभी राहिली.
भिंतीकडे पाहिलं.
जिथे कधीकाळी ती खेळायची.
जिथे वेदिकेसोबत भांडायची.
जिथे Nana तिचं कौतुक करायचे.
जिथे Nani तिच्यावर ओरडायची आणि लगेच प्रेमाने जवळ घ्यायची.
आज ते सगळं मागे सोडावं लागणार होतं.
आईने तिच्याकडे पाहिलं.
“चल बाळा... उशीर होतोय.”
Princess ने एकदा घराकडे पाहिलं.
मनात आलं—
“हे घर मी कधीच विसरणार नाही.”
आता ती, तिची आई आणि वेदिका भाड्याच्या घरात राहणार होत्या.
Princess कडे नोकरी होती.
म्हणून तिने परिस्थिती स्वीकारली.
तिला वाटलं—
“घर बदललं आहे... आयुष्य नाही.”
पण काही दिवसांनी तिला कळणार होतं...
की घर बदलण्यासोबत तिच्या आयुष्यात भूतकाळही परत येणार आहे.
भाग ७ — २५ वर्षांनी आलेली बातमी
नवीन घरात आयुष्य पुन्हा सुरू झालं.
सगळं साधारणपणे चालू होतं.
Princess कामावर जायची.
आई आणि वेदिका आपापल्या आयुष्यात व्यस्त होत्या.
भूतकाळ मागे पडला होता.
किमान तिला तसं वाटत होतं.
पण एक दिवस अचानक त्यांच्या कानावर एक विचित्र गोष्ट आली.
ती तिच्या वडिलांशी संबंधित होती.
Princess शांतपणे ऐकत होती.
आणि मग तिला कळलं—
तिच्या वडिलांनी लोकांमध्ये अशी गोष्ट पसरवली होती की त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न त्यांनी लावून दिलं होतं... आणि ती मुलगी आता या जगात नाही.
Princess च्या अंगावर काटा आला.
तिने वेदिकेकडे पाहिलं.
वेदिका तिच्यासमोर जिवंत उभी होती.
मग...
असं का सांगितलं गेलं होतं?
हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता.
आईच्या चेहऱ्यावर वेदना होत्या.
इतकी वर्षं शांत ठेवलेला भूतकाळ अचानक पुन्हा समोर आला होता.
पण अजून एक गोष्ट बाकी होती.
काही दिवसांनी कळलं की त्यांच्या वडिलांनी property विकली होती.
आता दोन प्रश्न समोर होते.
मोठ्या मुलीबद्दल अशी खोटी गोष्ट का सांगितली?
आणि
property का विकली?
Princess ला मात्र या property पेक्षा एकच गोष्ट महत्त्वाची वाटत होती—
“इतकी वर्षं आम्हाला सत्य का सांगितलं गेलं नाही?”
भाग ८ — अनोळखी नावांची ओळख
भूतकाळाची गोष्ट इथेच थांबेल असं Princess ला वाटलं होतं.
पण तसं झालं नाही.
काही काळानंतर social media च्या माध्यमातून वेदिकेशी एका व्यक्तीचा संपर्क झाला.
सुरुवातीला एक साधा message.
नंतर थोडं बोलणं.
मग जुन्या नात्यांचा उल्लेख.
तो त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती सांगत होता.
Princess ला हे कळल्यावर ती सावध झाली.
“आपल्याला हे लोक इतक्या वर्षांनी का आठवले?”
कोणाकडेच स्पष्ट उत्तर नव्हतं.
त्या व्यक्तीने मात्र property चा विषय पुन्हा काढला.
“तुमचा हक्क आहे.”
हे शब्द ऐकून Princess ला आश्चर्य वाटलं.
तिने मनात ठरवलं होतं—
“ज्यांनी आयुष्यभर आम्हाला त्रास दिला, त्यांच्याकडून मला काही नको.”
पण समोरचे लोक थांबले नाहीत.
त्यांना वाटत होतं की त्यांचा हक्क त्यांना मिळायला हवा.
हळूहळू आणखी काही लोक या संपर्कात आले.
आणि मग एक दिवस...
Princess च्या office मध्ये काही लोक आले.
त्यांच्यासोबत एक ओळखीचा चेहरा होता.
कुलकर्णी सर.
Princess ला ते लगेच ओळखू आले.
पण त्यांच्या सोबत असलेले बाकीचे लोक?
ते पूर्णपणे अनोळखी होते.
Princess ने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
त्यातील एक व्यक्ती पुढे आली.
आणि म्हणाली—
“इरा... आम्ही तुझे काका आहोत.”
Princess काही क्षण स्तब्ध झाली.
काका?
इतकी वर्षं हा शब्द तिच्या आयुष्यात कुठेच नव्हता.
मग आज अचानक...
हे लोक कुठून आले होते?