दैत्य - भाग 5 Likhasa द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दैत्य - भाग 5

भाग ५

रात्र शहरावर पूर्ण उतरली होती. वर आकाश काळं, खाली दिव्यांचे तुकडे. पण बंदराकडचा भाग वेगळाच होता...जिथे प्रकाशही सावधपणे उभा असतो. ओलसर हवा, लोखंडाचा वास, दूरवर आदळणाऱ्या लाटांचा मंद आवाज… आणि मध्येच भेसूर शांतता.

गाडी सरळ रस्ता कापत पुढे जात होती.अबीर स्टेअरिंगवर स्थिर हात ठेवून ड्राईव्ह करत होता. चेहऱ्यावर भाव नव्हते. बाहेरचे दिवे काचांवरून सरकत होते, पण त्याची नजर पुढेच होती. फोन व्हायब्रेट झाला. त्याने स्क्रीन कडे पाहिलं... मेसेज होता..
स्पॉट रेडी 
दुसरा मेसेज....राणा चेक इन मिस्ड . फोन अनरीचेबल .
त्याची नजर त्या ओळीवर दोन सेकंद थांबली. राणा वेळ चुकवणाऱ्यांपैकी नव्हता.
तो लालची असू शकतो. कपटी असू शकतो. पण बेजबाबदार नव्हता. मग का?
म्हणजे दोनच शक्यता होत्या. तो पळाला होता…किंवा कुणीतरी त्याला आधी गाठलं होतं. फोन लॉक करून त्याने बाजूला ठेवला.
तिसरा रमाकांत ने पाठवलेला अनरीड मेसेज खाली दिसत होता....गर्ल रीच्ड होम..
त्याने तो उघडला नाही. त्याला स्वतःवर चिड आली. कामाच्या रात्री डोक्यात दुसरा विषय नको. पण तरीही तिचे डोळे मध्येच आठवत होते.
भिती होती. पण विनवणी नव्हती.
राग होता. पण तुटणं नव्हतं.
अनेक लोक तो समोर आला की बोलणं विसरत.
ती बांधलेल्या हातांनीही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती.
त्याने विचार बदलण्यासाठी वेग किंचित वाढवला.

जुन्या वेअरहाऊस चं गेट आतून उघडलं गेलं. कंपाऊंड मध्ये दोन ट्रक्स , एक व्हॅन आणि सात माणसं उभी होती. सगळे वरवर शांत. पण प्रत्येकाच्या हालचालीत एक हलकासा ताण होता. अबीरने हे गाडीतून उतरण्याआधीच पाहिलं. तो खाली उतरला. चाल निवांत. एक जाडजूड माणूस पुढे आला.
“सगळं रेडी आहे.”
अबीरने उत्तर दिलं नाही. तो सरळ पहिल्या ट्रक कडे गेला. मागचं दार उघडलं गेलं. आत सील केलेले क्रेट्स रचलेले होते. नंबर, खडूने केलेल्या खुणा फेक कंपनी स्टिकर्स. तो आत चढला. पहिल्या क्रेट वर हात ठेवला. धूळ जुनी होती. दुसऱ्यावर हात ठेवला. धूळ हललेली. तिसऱ्यावर सील नवीन होतं. त्याने सील वर नख फिरवलं. वरचं नवं सील जुन्यावर बसवलं गेलं होतं. तो खाली उतरला.
“उघडा.”त्याच्या आवाजात जरब आली.
क्रेट उघडलं. वर मशीन पार्टस ठेवलेले होते. त्याने बाजूचा मेटल फ्रेम दाबला. फॉल्स पॅनल सरकला. आत वेलवेट रॅपिंग मध्ये गोल्ड बार्स.
जाडजूड माणूस...समीर...जबरदस्ती हसला.“कन्सिलमेंट सेफ्टी .”
“वेट शीट ”अबीरने त्याच्याकडे पाहिलंही नाही.
फाईल हातात आली. त्याने पानं उलटली. मेंशन वेट आणि ऍक्च्युअल लोड जुळत नव्हता. थोडाच फरक. जाणकाराला दिसेल इतकाच. त्याने फाईल बंद केली.
“दुसरा ट्रक .”
दुसऱ्या ट्रक चं दार उघडलं. तो आत गेला. फ्लोअर वर ट्रॉली व्हील चे मार्क्स होते.
ताजे. या ट्रक मधून क्रेट्स काढून पुन्हा ठेवले गेले होते. तो खाली उतरला. कंपाऊंड च्या मातीकडे पाहिलं. दोन हेवी ट्रक मार्क्स होते. त्यावरून ताजे छोटे टायर मार्क्स कंपाऊंड च्या मागच्या बाजूला गेले होते. त्याने विचारलं नाही फक्त कंपाऊंड च्या मागे चालू लागला. बाकीचे त्याच्या मागे गेले. लोखंडी पत्र्याच्या शेडमागे एक छोटा कव्हर्ड ट्रक उभा होता. एकाने हबकून म्हणायचा प्रयत्न केला,“तो रिकामा आहे....”अबीरने कव्हर ओढून बाजूला केलं. आत तीन क्रेट्स. पहिलं उघडलं. गोल्ड .दुसरं उघडलं. त्यात पण गोल्ड . तिसऱ्यात कॅश पॅकेट्स. जाडजूड माणसाचा चेहरा पांढरा पडला. प्लॅन स्पष्ट होता. मुख्य डील मध्ये काही माल दाखवायचा. बाकी वेगळ्या ट्रक ने काढायचा. नंतर ब्लेम रेड , चोरी , मिसिंग शिपमेंट वर टाकायचा. अबीर काही क्षण शांत राहिला. त्याने कव्हर्ड ट्रक च्या दारावरची धूळ हाताने पुसली. फिकट अक्षरं दिसली. N.R. Carrier. त्याच्या डोळ्यांत हलकी चमक आली. तीन दिवसांपूर्वी गल्लीत मारलेल्या खबऱ्याच्या फोन नोट्स मध्ये शेवटची एन्ट्री होती: 
NR /11:40/ डॉकयार्ड. 
खबर्या फक्त नावं देत नव्हता. तो ट्रान्सपोर्ट चेन पर्यंत पोहोचला होता. म्हणून तो संपवला गेला. अबीरने पिसेस जोडले. लीक खालच्या स्तरावर नव्हता.वरपर्यंत गेला होता. अबीर त्या जाड्या माणसाजवळ, समीरजवळ गेला.
“राणा कुठे आहे?”अबीरने शांतपणे विचारलं.
“मला माहीत नाही.”जाड्याच्या आवाजात थरथर होती.
अबीर शांत. तो माणूस थरथरला. “फोन लागत नाही… तो चेक-इन ला आला नाही…”
“का?”अबीरने थंड नजरेने त्याला विचारलं.
“म..मला खरंच...” त्याचा आवाज कापायला लागला.
अबीर आता त्याच्या अगदी जवळ उभा राहिला,“तो पळाला?” अबीरने मान तिरकी करत विचारलं.
“कदाचित…” थोडं चाचरत जाड्या समीर म्हणाला.
“की कुणी उचलला?”अबीरचा आवाज अजूनही खूप शांत होता.
समीर गप्प. त्याचा घाम गळू लागला. अबीरने मागे पाहिलं.
“दोघांना वेगळं ठेवा. ह्या समीर ला आपल्या तिकडे घ्या. दोन जण पुढे आले.
“माल?” एकाने विचारलं.
“सगळा आपल्याकडे.”
“समीर ?”
अबीर गाडीकडे चालत म्हणाला, “जिवंत हवा.”
क्षणभर थांबून...“हा बोलण्याआधी मेला…तर तुमच्यापैकी कुणीतरी बोलेल.” 
कंपाऊंड मध्ये पुन्हा शांतता पसरली. तो गाडीत बसला. इंजिन सुरू झालं. रस्ता रिकामा होता. या वेळेला शहराचाही श्वास मंदावतो. गाडी पुढे सरकत राहिली.
अबीरने आरशात एकदा मागे पाहिलं. रिकामा रस्ता. पण त्याच्या डोक्यात मात्र रिकामेपणा नव्हता.
राणा जर पळाला असेल…तर तो एकटा पळाला नव्हता. कोणीतरी वरचा हात त्याच्या मागे होता. आणि जर कुणीतरी त्याला उचललं असेल… तर खेळ अजून मोठा होता.
त्याने फोन उचलला. एक मेसेज टाईप केला.
राणा चं जुनं ठिकाण, डॉक रेकॉर्ड्स , कॉल लॉग्स. आत्ताच...... मेसेज सेंड झाला.
फोन परत ठेवताना त्याची नजर काही क्षण स्क्रीन वर स्थिर राहिली. दुसरं नाव मनात आलं.....अंबिका.
ती चौकशी करेल. प्रश्न विचारेल. धागे पकडेल. आणि चुकीच्या धाग्याला हात लावला… तर....तर ती थेट नरकाच्या दारात जाईल. त्याने हलकेच डोळे मिटले. मग पुन्हा उघडले.
“दूर राहा…” तो स्वतःशीच पुटपुटला.
पण मनातल्या दुसऱ्या आवाजाने उत्तर दिलं...ती ह्या सगळ्यापासून लांब राहणारी नाही. दूरवर शहर पुन्हा उजळू लागलं होतं. अबीर एकटाच ड्राईव्ह करत होता. फोन बाजूला पडला होता.
त्याच्या डोक्यात नंबर्स , रूट्स , नावं सगळं एकामागोमाग एक फिरत होतं.
राणा 
N.R. Carriers.
इन्फॉर्मर 
डॉक रूट 
पण मध्येच दुसरा चेहरा घुसत होता......
अंबिका.
तो स्वतःवरच चिडला. ती या खेळाचा भाग नव्हती. ती असायला नको होती.
मग का तिच्यावर नजर ठेवायला रमाकांतला सांगितलं मी ?
का तिचा मेसेज पॅटर्न कळवला जात होता?
का “ती घरी पोहोचली” हे जाणून घ्यायची गरज वाटली?
त्याने स्वतःला उत्तर दिलं.
कारण ती चौकशी थांबवणार नव्हती....ते प्रॅक्टिकल कारण होतं.
पण... ते पूर्ण सत्य नव्हतं.
बाकी लोकं त्याच्यापासून वाचायचा प्रयत्न करत होते.
ती मात्र परत त्याच्याकडे येणार होती. जाणीवपूर्वक. हे धोकादायक होतं.
आणि विचित्रपणे… त्याला हे आव्हानासारखं वाटत होतं. पण तितकंच पहिल्यांदाच त्याच्याही नकळत मनातून आवडलं होतं.

अंबिका टेरेस वर उभी होती. रात्रीची हवा थंड होती. शहराचे दिवे दूर चमकत होते. तिने हात मनगटांवर फिरवले. वेलक्रो चा दाब अजून जाणवत होता. खाली घरात आई आणि आशू टीव्ही पाहत होते. बाबा झोपले होते. सगळं नेहमीसारखं होतं. फक्त ती नेहमीसारखी राहिली नव्हती.
तिने डोळे मिटले......
गाडीचं दार बंद होण्याचा आवाज.
सेंट्रल लॉक 
त्याचा आवाज, “शांत बस.”
तिने डोळे उघडले. भिती अजून होती. पण त्या भितीसोबत राग उभा राहिला होता.
“कोण समजतो हा माणूस स्वतःला…” ती पुटपुटली.
फोन हातात घेतला. नोट्स उघडले.
ती टाईप करू लागली.....
SUV इंटिरियर क्लीन 
डॅशबोर्ड निअर गियर होलस्टर गन व्हिजिबल 
रूट अंदाजे 12-15 मिनिट्स 
लेफ्ट टर्न आफ्टर फ्लायओव्हर 
व्हॉइस काल्म 
नोज माय डिटेल्स 
नीता टू 
ती थांबली.
नीताला मेसेज केला....उद्या बोलायचंय. इम्पॉर्टन्ट.
रिप्लाय लगेच आला....काय झालं?
ती काही सेकंद स्क्रीन कडे पाहत राहिली. मग टाईप केलं...भेटलो की सगळं सांगते.
फोन खिशात ठेवून ती मागे वळली. पण वळताना जाणवलं टेरेस च्या समोरच्या इमारतीच्या सावलीत कुणीतरी तिच्याकडे पाहत उभं आहे. थोडीशी बुटकी जाड आकृती. असं तिला क्षणभर वाटलं. ती पुन्हा नीट पाहू लागली. क्षणभर तिच्या अंगातून पुन्हा थंड शिरशिरी गेली. अंबिकाने डोळे बारीक केले. काहीच नव्हतं. रिकामी भिंत.
ती स्वतःशीच हसली,“आता मीच जास्त विचार करतेय…”
पण तिला माहीत नव्हतं...की तिथून कोणीतरी खरंच तिच्यावर लक्ष ठेवून होतं.

आणि त्याच क्षणी शहराच्या दुसऱ्या टोकाला अबीरच्या फोनमध्ये मेसेज नोटिफिकेशन दिसलं...ती टेरेस वरून घरात गेलीये.
त्याने स्टीअरिंग वरची पकड घट्ट केली. दोन धागे आता त्याच्या हातात होते. एक गुन्हेगारी जाळ्याचा. आणि एक तिचा...
दोन्हीही सुटू द्यायचे नव्हते.


To be continued…
                          *******************