रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 1 trupti mohite द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रुद्र : द डार्क रिडेम्पशन... ? - 1


भाग १: रक्ताचे ठसे आणि तो

मुंबईत सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता...

रात्रीचे अडीच वाजले होते...साऊथ मुंबईच्या एका जुन्या , ओसाड गोदामाबाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजत होते आणि लाल-निळे दिवे पावसाच्या पाण्यात चमचमत होते...


"मॅडम , प्लीज सांभाळून... आत खूप चिखल आणि रक्त सांडलंय..," कॉन्स्टेबलने पिवळी गुन्हेगारी तपासणीची पट्टी वर करत म्हटले...

चोवीस वर्षांची काव्या सावंत आपल्या अंगावरचा लाँग रेनकोट नीट करत आत शिरली...

काव्या मुंबई पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमची सगळ्यात तरुण आणि हुशार अधिकारी होती... तिच्या हातात एक काळी बॅग आणि डोळ्यांवर तीक्ष्ण नजर होती...


गोदामाच्या आत एक मृतदेह पडला होता...
काव्या मृतदेहाजवळ गुडघ्यावर बसली आणि तिने बॅगेतून ग्लोव्हज काढून हातावर चढवले...तिने टॉर्चच्या प्रकाशात मृतदेहाची तपासणी सुरू केली...


क्राइम सीन पाहून काय वाटतं काव्या..? मागून सिनियर इन्स्पेक्टर सावंत यांनी विचारले...


काव्याने मृतदेहाच्या गळ्यावरील खुणा पाहिल्या आणि शांतपणे म्हणाली ,

हा कोणताही साधा गँगवॉरचा खून नाही सर... एकाच वारामध्ये गळा चिरला आहे... कुठेही झटापट झाल्याच्या खुणा नाहीत... मारणारा प्रचंड प्रोफेशनल आहे... आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट...


तिने मृतदेहाच्या खिशाजवळ हाताने काहीतरी शोधले.. तिथे रक्ताने माखलेले एक काळे पत्ते खेळायचे कार्ड होते , ज्यावर सोन्याच्या रंगाने एक त्रिशूळ कोरला होता...


ते कार्ड पाहताच इन्स्पेक्टर सावंत यांच्या चेहऱ्यावरची लाली उडाली...

रुद्र... हे त्याचेच काम आहे...इन्स्पेक्टर सावंत म्हणाले 


रुद्र...कोण आहे तो..? मी फाईल्समध्ये याआधी हे नाव कधी ऐकलं नाही...काव्याने आश्चर्याने विचारले..


सावंत यांनी आजूबाजूला पाहिले , जणू काही तिथे कोणी ऐकत असावे...

कारण तो पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये अस्तित्वातच नाही.. तो मुंबईच्या अंडरवर्ल्डचा असा अदृश्य राजा आहे , ज्याचा चेहरा आजवर कोणीही जिवंतपणे पाहिलेला नाही... जो त्याच्या आड येतो , त्याच्या आयुष्याचा खेळ असाच संपतो...ते कुजबुजत्या आवाजात म्हणाले..


काव्याने त्या त्रिशूळाच्या कार्डाकडे पाहिले...तिच्या मनात भीतीपेक्षा त्या अज्ञात गुन्हेगाराबद्दल एक वेगळेच कुतूहल निर्माण झाले...


*****************************************


तासाभराने तपास संपवून काव्या आपली बॅग घेऊन गोदामाबाहेर पडली...

पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नव्हता... तिची स्वतःची गाडी बंद पडल्यामुळे ती टॅक्सी शोधण्यासाठी हायवेच्या बाजूला असलेल्या एका निर्जन गल्लीतून चालत चालली होती...


अचानक , एका काळ्या रंगाची आलिशान एसयूव्ही गाडी तिच्या अगदी जवळ येऊन मोठ्या आवाजात ब्रेक दाबून थांबली... गाडीचे टायर चिखलात रुतले... 

तशी काव्या दचकून मागे सरकली... गाडीचा दरवाजा उघडला आणि आतून एक माणूस बाहेर आला...


सहा फुटांपेक्षा जास्त उंची , भेदक काळे डोळे , टोकदार जबडा आणि अंगावर महागडा काळा सूट... पावसाचे थेंब त्याच्या विखुरलेल्या केसांवरून घसरत होते.. त्याच्या एका हातातून रक्ताची बारीक धार वाहून पावसाच्या पाण्यात मिसळत होती.. तो जखमी होता, पण त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा एकही भाव नव्हता.. फक्त एक करारी , भीतीदायक शांतता होती...


तो दुसरा कोणी नसून रुद्र होता.


रुद्रने काव्याकडे पाहिले... त्याचे डोळे इतके खोल होते की काव्या क्षणभर जागची हलली नाही...


तू फॉरेन्सिक डॉक्टर आहेस ना...? रुद्रचा आवाज अत्यंत गंभीर आणि घोगरा होता..तो विचारत नव्हता , तर त्याला आधीच माहित होते...


काव्याने स्वतःला सावरत म्हटले..,
हो.. पण तुम्ही कोण..? आणि तुमच्या हातातून रक्त..."
तिचे वाक्य पूर्ण होण्याआधीच रुद्रने तिचा हात पकडला आणि तिला थेट गाडीच्या मागच्या सीटवर ढकलले..

काव्याला काही समजायच्या आत तो स्वतः आत आला आणि गाडीचा दरवाजा लॉक केला...


ओरडण्याचा प्रयत्न करू नकोस... माझ्या जखमेवर पट्टी बांध , तातडीने... रुद्रने तिच्या फॉरेन्सिक बॅगकडे पाहत हुकूम सोडला...


मी पोलिसात आहे..! तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाशी बोलत आहात..? काव्याने हिंमत एकवटून म्हटले , जरी तिचे हृदय छातीतून बाहेर येईल इतक्या जोरात धडधडत होते...


तसे रुद्रच्या ओठांवर एक थंड , क्रूर हसू आले... त्याने आपल्या कोटाच्या खिशातून हुबेहूब तसेच सोन्याचा त्रिशूळ असलेले काळे कार्ड काढले आणि काव्याच्या समोर धरले...


मला माहित आहे तू कोण आहेस.., काव्या सावंत.. आणि आता तुलाही समजलं असेल की मी कोण आहे.. गुपचूप काम कर , नाहीतर पुढच्या क्राईम सीनवर तुझाच शोध घ्यावा लागेल....तो रागातच म्हणाला 



आता काव्याचे डोळे विस्फारले... तिच्या समोर मुंबईचा सगळ्यात मोठा गुन्हेगार , साक्षात 'रुद्र' बसला होता.. ज्याच्या हातून काही वेळापूर्वीच एक खून झाला होता.. तिचे संपूर्ण शरीर थरथरू लागले , पण एका फॉरेन्सिक सायंटिस्टची बुद्धी वापरून तिने स्वतःला शांत केले...


तिला समजले की या माणसाच्या तावडीतून सुटायचे असेल तर सध्या त्याचे ऐकणेच हिताचे आहे...


तिने थरथरत्या हाताने आपली बॅग उघडली आणि रुद्रच्या जखमेकडे पाहिले... दोन वेगवेगळ्या जगांतील या वादळी प्रवासाची ही फक्त एक सुरुवात होती...!!


To be continue... 😊

पुढे काय होईल वाचत रहा ही कथा...
आणि मला फॉलो करा... म्हणजे माझ्या कथेच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील... 👍