सगळ्यात आधी माझी आणि सौरभची मैत्री झाली आणि मग आम्हाला भेटली कावेरी.
एकदा मला पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली म्हणून मी कळ सोसून, संयम ठेवून संध्याकाळची वाट पाहीली अणि पाणीपुरी खायला गेले मला पाणीपुरी प्लेट मध्ये घेण्यापेक्षा एक एक बनवून खायला मजा येते म्हणून मी तशीच खात होते माझ्या सहा पुऱ्या झाल्या होत्या पण ते काकांच्या लक्षात आले नाही म्हणून ते मला सातवी पूरी सुद्धा देत होते आणि मी आणखी खुश झाले की मला एक पुरी जास्त मिळणार पण तिथे एक मुलगा सुद्धा पाणीपुरी खायला आला पण तो त्या काकांना म्हणाला 'ओ काका, सहा पुऱ्या झाल्यात त्यांच्या' असं ऐकल्यावर काका मला सॉरी म्हणाले आणि ती पुरी त्यांनी त्या मुलाला दिली जी माझ्या ताटलीच्या अगदी जवळ होती ती त्याच्या ताटलीत आणि मग त्याच्या पोटात गेली. पाणीपुरी हा विषय मुलींच्या अगदी जवळचा, नाजूक असतो त्यात जर अशी कोणी मस्करी , गंमत केली तर आम्हांला राग येतो माझही तेच झालं माझ्या डोक्यात सणक भरली, त्याला दगड मारावा असं वाटलं पण मी शांत होऊन तिथून तर निघाले. पण पुढे जाऊन थांबले मला त्याला धडा शिकवायचा होता पण मला थांबलेलं पाहून माझ्या डोळ्यात डोळे घालून तो हसला आणि त्यानी दुसरा मार्ग निवडला ते पाहून मला आणखी राग आला आणि मी त्याला गाठलं.
मी: ए थांब.
(त्यानी ऐकून न ऐकल्यासारखे करून पुढे चालू लागला. मी पळत जाऊन त्याच्या समोर उभी राहिले)
मी: आवाज दिलेला ऐकायला आला नाही?
सौरभ: माझं नाव सौरभ आहे आणि तू ते घेतल नाहीस.
मी: अतिशहाणपणा करायची सवयच दिसते.
सौरभ: का थांबवलस मला?
मी: मला माझी पाणीपुरी हवी आहे.
सौरभ: काय?
मी: हो ती जिला तू खाल्लस ती माझी होती.
सौरभ: तुझ्या सहा पुऱ्या खाऊन झाल्या होत्या मग ती सातवी तुझी कशी?
मीः ते काका ती पुरी मला देत होते तू मधे आलास.
सौरभ : मग ती कोणाकडे गेली याला म्हणतात 'दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम'.
मी: हे. मी म्हणायला हव होत कारण ती माझी होती तू तिला माझ्यापासून हिसकावून घेतलं.
सौरभः(हसत) तू काय बोलतीयेस कळतंय का तुला असं बोलतीयेस जस मी तुझ्या मुलीला तुझ्यापासून दूर केलंय.
मीः ते काही नाही मला माझी पुरी हवी.
(दहा मिनिटं भांडल्यावर)
सौरभ: बर बाई देतो एक नाही सहा पुऱ्या देतो पण आधी खाल्लेलं तर जिरवूया चल मी एक फेरफटका मारून येतो मग आपण खाऊ.
मी: नाही मी तुला कुठेही जाऊ देणार नाही.
सौरभ: तू चल मग माझ्यासोबत.
मी: पण मला आता हवीये.
सौरभ: आत्ता कसं पोट भरल्यावर जास्त खाऊ नये.
मी: पाणीपुरीसाठी माझ्या पोटात खूप जागा आहे, मी किमान पाच प्लेट पाणीपुरी एकावेळेस खाऊ शकते.
सौरभः हे अति होतय हा.
मी: हो तर, लावायची पैज?
सौरभ: ठीके उद्या संध्याकाळी सहा वाजता ,जर मी जिंकलो तर तू मला...
मी: तशी वेळ येणारच नाही जर मी जिंकले तर त्याचे पैसे तू द्यायचे.
सौरभ: हो का बरं.
मी: भेटू उद्या संध्याकाळी.
(दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता मिनल सौरभची वाट पाहत उभी असते सौरभ तिथे पोहोचतो.)
मी: मला वाटलं घाबरलास की काय?
सौरभ: जिंकणार जर मीच आहे तर का घाबरू? चल सुरु करूया?
मीः हो नक्कीच.
(मिनलनी पाच प्लेट पाणीपुरी खाल्ल्यानंतर)
मी: चल दे पैसे
सौरभ: (पैसे देताना) एक पुरी महागात पडली.
मी: (हसत) म्हणून दुसऱ्याच्या आयुष्यात लक्ष द्यायचं नसत.
सौरभ: आतातरी फेरफटका मारायचा का?
मी: चल
सौरभ: तुला एवढी आवडते पाणीपुरी?
मी: हो खूप जास्त रोज जरी दिली तरी मी खाईन. आयुष्यात कसलाही कंटाळा येईल पण पाणीपुरीचा कधीच नाही.
सौरभ: बापरे, मग तुझे मित्र मैत्रिणी काय चिडवतात तुला पाणीपुरी पगलू?
मी:. (सुस्कारा सोडत) आवडल असतं ते ऐकायला पण तसं चिडवायला कोणी नाहीये.
सौरभ: का एवढी वाईट आहेस?
मी: खूप जास्त. मी अतिविचारी आहे, हळवी आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर खूप रडते, तोंडावर खर बोलते आणि ह्या गोष्टी नाही आवडत आता कोणाला.
सौरभ: हो पण म्हणून तू खराब, चुकीची आहेस अस नाही म्हणायचं. चल आजपासून आपण दोघ मित्र.
मी: मी मुलगी आहे , आपण मित्र अस नाही तर मी तुझा मित्र अस म्हण.
सौरभ: अरे आता तर म्हणालीस ना तू मुलगी आहेस म्हणून, मग एकाच वाक्यात मुलगी मुलगा??
मी: किती पांचट, थांब तुला तर ना (ऐकमेकांना पकडत दोघे पळतात. थोड पुढे गेल्यावर)
सौरभ: ए बास बास. खाल्यावर जास्त नको पळू पोट दुखेल.
मी: (हसत) हो. आपल्याकडे पाहून कोणीच नाही म्हण्णार आपण काल भेटलोत.
सौरभ: हो ना ते म्हणतात ना दोघात तिसरा आता सगळ विसरा.
मी : ए गप. तुला कोणीतरी दिसतंय का तिकडे?
(एक मुलगी रस्त्याच्या कडेला बसली होती)
मीः बहुतेक ती रडतीये.
सौरभ: आता मी हिला पाणीपुरी नाही देणार हा आधीच सांगतोय.
मी: कोणी मागितली पण नाहीये चल बघू.
(दोघे तिथे गेल्यावर)
मी: कोण आहेस तू? काय झालंय? अशी रस्त्यावर का बसलीयेस ?
सौरम: एकावेळी एक प्रश्न विचार ना?
(मिनल त्याला खुन्नस देते.)
मी: अगं बोल तरी.
(ती मुलगी डोक वर करून त्यांच्याकडे बघते. ती होती कावेरी)
सौरभ: ए ही रडत नाहीये.
मी: (सौरभ कडे बघत) मग दुःख होतंय ?
सौरभः सॉरि
मीः काय झालं अशी का बसलीस इथे?
कावेरी: मी किवी.. मी इथे ब...
सौरभः किवी? पण इथे तर झाड नाहीये?
मी: तू जरा गप्प बसशील का? तू बोल.
कावेरी: माझ नाव कावेरी आहे पण मला सगळे किवी म्हणतात. माझ आताच ब्रेकअप झालय.
सौरभ: मग तुला रडायला येत नाहीये?
कावेरी: कारण सांगू? मी तरी शांत बसलीये तू तर हसशीलच.
(सौरभ मांडी घालून बसतो)
सौरभ: सांग सांग
कावेरी: मला सगळे जण ओळखतात तिथे ते पाणीपुरी वाले काका आहेत ना ते सुद्धा आणि पलीकडे बागेत जे जे लोक असतील ना ते सुद्धा.
मी: पण आम्ही तुला ओळखत नाही.
सौरभ: गप्प बसशील का?
(मिनल सौरभला खुन्नस देते.)
कावेरी: पण मी तुम्हाला ओळखते. तू सौरभ आणि तू मिनल, मिनलला कोणी मित्र- मैत्रिणी नाहीत आणि सगळ्या मुलींना तू आवडतो.
सौरभ : अरे आंतरयामी कावेरी की जय हो?
कावेरी: कावेरी नाही किवी म्हण.
सौरभः अंतरयामी किवी ..की.. जय हो.
मी: बेकअप का झाल पण
किवी: त्याला सगळे विचारतात कि तो माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून. त्याला पण सगळे ओळखतात. तो कुठे गेलाय काय खातोय हे मला समजत म्हणून.
सौरभ : ओ. बिचारा एकांतच नाही त्याला.
मी : आग लावू नकोस.
सौरभ: अरे पण हे कारण ? एका बॉयफ्रेंडनी द्यावं ब्रेकअपसाठी?
नाही म्हणजे जर लोक ओळखतात तर मस्त खाऊन पिऊन राहायचं ना फुकटचं.
(सगळे शांत बसतात)
सौरभ: नाही आवडला का विनोद?
मी: नाही अजिबात नाही. पण मग आता काय करणार?
किवी: आता? आता मी माझी माझी जगणार सध्या तरी सिंगल राहीन बाकी नंतर च नंतर.
(असे म्हणून किवी सौरभकडे पाहते)
सौरभ: ए ए मिनल चल इथून मला हिची लक्षण चांगली नाही दिसत.
किवी: मस्करी करतीये रे.
(किवी आणि मिनल दोघी हसतात)
किवी: ए मी पण तुमच्यात सामील होऊ? मला तुमच्याशी मैत्री करायची होती म्हणून मी तुमची माहिती शोधून काढली. पण बर झालं दोघं एकत्रच भेटलात.
सौरभ: आम्ही कुठे बँकेत दरोडा नाही टाकत.
मी: काहीतरी बोलायलाच हवं का?
सौरभ: असं काही नाही ते तू..
मी: मग शांत बस.
किवी: तू तिला घाबरतोस का?
सौरभ: छे छे..थोडासा ती एक न पचलेली पाणीपुरी आहे.
किवी: म्हणजे?
मी: काही नाही तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ आजपासून आपण तिघ मित्र-मैत्रिणी.
(दोघी एकमेकींचा हात धरून चालू लागतात)
सौरभ: ऐ लक्ष नको देऊ म्हणजे रात्र झालीये आणि तुम्ही दोघी मुली आहात तुम्हाला माझी गरज पडली तर?
(दोघी त्याच्याकडे लक्ष न देत पुढे जाऊ लागतात)
सौरभ: ऐ थांबा मी पण येतोय.
अशी झाली माझी, सौरभ आणि कावेरीची मैत्रि एकदाच भेटलोत पण असे जसे जन्मापासून एकमेकांना ओळखतो. त्या पाणीपुरीनी बहुतेक मला आयुष्यभराची एक मैत्री दिली. पुढील भागात पाहूया नेहा, माधव, सचिन, पंकज कसे भेटतात.