Money Tai books and stories free download online pdf in Marathi

मनी ताई

आई, तु ये ना परत…..

मी इंजिनियरिंग च्या शेवटच्या वर्षाला होती. कॉलेज ला जायची गडबड होती जरा . माझ्या ताई ची तब्बेत खराब होती. ताई म्हणजे माझी आई. तेव्हा बहुतेक लोक आईला ताई च म्हणायचे. माझ्या मोठ्या वहिनीला ती म्हणत होती की काही खायची इच्छा होत नाहीये , आणि ते ऐकून मी तिला म्हणले की काय तू , नाटक करतेस अस वाटतंय, चांगलीच तर दिसतेय . जेवण करून घे , गोळ्या घे मग बर वाटेल. तेवढ्यात डॉक्टर आले घरी ताईला सलाईन लावायला. आमचे अण्णा म्हणजे माझे वडील शिक्षक सेवानिवृत्ती नंतर त्यांना परत ऑफर आली होती मूल्यवाचन साठी , तर ते शाळेत गेले होते सकाळीच आणि घरी सांगून गेले होते की मी येऊ पर्यन्त सलाईन लाऊन घ्या मग नंतर आपण तालुक्याला डॉ कडे जाऊ.

डॉ ने सलाईन लावली आणि पुढच्या ५ मी नि माझी ताई बेड वरून वरती खाली थरथर कापायला लागली. भाऊ वाहिनी आम्ही सगळे होते. मी तर हे दृश्य पहिल्यांदा बघितले होते. सगळे घाबरलो. डॉ ने पटकन सलाईन काढली. एक गोळी ताईला पटकन दिली. तिला खूप तहान लागली होती .ती पटकन उठली आणि मडक्यातल पाणी पिली.आमच्या साठी हा पहिलाच अनुभव होता म्हणून आम्हाला कळलं नाही की तिला पाणी पिऊ द्यायला नको होत. भाऊ ने पटकन गाडी बोलवली आणि तिला तालुक्याला घेऊन गेले. मी एकटी घरी थांबली. दवाखान्यात पोहचे पर्यंत तिची अवस्था बिघडली होती. 

दवाखान्यात पोहचले आणि डॉ ने ट्रिटमेंट चालू केली. तिला खूप जास्त ताप पण भरला होता. तेवढ्यात माझी मावशी पण आली दवाखान्यात . आणि मझ मोठा भाऊ खूप हळवा आहे . त्याला हे अस सगळ बघितलं जात नाही म्हणून तो दवाखान्याच्या पायरी वर जाऊन रडत बसला. इकडे डॉ माझी ताईला बर्फाच्या लादी वर झोपाऊन ताप कमी करायचा प्रयत्न करत होते . तिच्या डोक्यावर बर्फाचे पाणी टाकत होते . १ तास प्रयत्न केल्यावर म्हटले की आता जिल्यातील दवाखान्यात घेऊन जा. पटना ॲम्ब्युलन्स बोलावले. जिल्हा होता ६० किमी लांब. तिला ॲम्ब्युलन्स मधे टाकलं आणि दवाखाना ५ मी लांब होता अस तिने रिस्पॉन्स करायला बंद केलं . सलाईन मधलं पाणी तिच्या शरीरात जात नव्हतं. ते नाक तोंडातून परत येत होत. दवाखान्यात पोहचले आणि डॉ म्हणाले ५ मी उशीर झाला. 

इकडे मी एकटी घरी होती. माझ घरी चित्त लागत नव्हत. बाजूच्या वहिनीला सोबत घेऊन मी जिल्ह्याला जायला निघाली . तेवढ्यात फोन आला . पण या लोकांनी मला काही सांगितलं नाही . घरी परत जायला निघालो . मी विचारलं घरी परत का जातोय, तर म्हटले ताई बरी झाली , घरी आणतोय. पण मझ मन काही मानत नव्हतं. गल्लीत पोहचली तर घरासमोर लोकांची गर्दी जमा होती आणि ते बघताच मला कळलं की काय झालंय. 

मी तशीच जमिनीवर खाली बसली आणि रडायला लागली. माझं सगळच संपलं . माझं आयुष्यच संपलं अस झालं मला. मी तिला का बोलली असेल की नाटक करतेय अस . तिला खरच त्रास होत होता पण तिने समोर दाखवला नाही. तिला ३ स्मूथ हार्ट अटॅक येऊन गेले होते आणि आम्हाला कळलच नाही. मार्च महिना होता , खूप ऊन होत अंक अशी बातमी पसरली की स्ट्रोक आला. न्यूज वाले आमच्या घरी रोज गर्दी करत होते. दुसऱ्या दिवशी १० चा प्रेतयात्रे चा टाइम होता..रात्र भर ताईला शीतपेटी मध्ये ठेवलं होत. लोक येत होती. अख्खा गाव जमा झाला होता . माझ्या मैत्रिणी सगळ्या माझ्या सोबत होत्या पण माझ्या आयुष्यातला काळा दिवस होता तो. अस वाटत होत मी तिच्या जवळ जाऊ . देवाला विनवण्या करत होती की काहीतरी कर आणि तिला परत आण किंवा मला तिच्या जवळ घेऊन जा. पण अस काहीच झालं नाही. लोक आली लोक गेली .मी एकटी पडली. सतत तेच तेच विचार सुरू होते डोक्यात. माझ्या लहान भावाला त्याच्या मामानी ऑफिस वरून अस सांगून आणलं की ताई ची तब्बेत खराब आहे तुला न्यायला आलोय. आणि जेव्हा तो आला आणि त्याने ताईला शीतपेटी मध्ये बघितलं तो चक्कर येऊन पडला . दुसऱ्या दिवशी तो अग्नी द्यायला सुद्धा उठला नाही . 

ही सेम घटना आमच्या घरी २५ वर्षा आधी घडली होती , माझ्या भावांच्या आई सोबत . आता मी अस का बोलतेय की माझ्या भावांची आई ते कळेलच पुढे . सध्या एवढंच की आमची ताई आता नवती . आणि १० वर्ष झाले पण मला रोज तिची आठवण येते . ती असती तर कदाचित माझं चुकीच्या मुलासोबत लग्न झालं नसतं. आणि झालं ही असत तर ती माझ्या सोबत खंबीर पने उभी राहिली असती.

आता मला १ मुलगी आहे , जिच्या मध्ये मला माझी ताई दिसते आणि थोड समाधान वाटत पण तिची उणीव भरून निघत नाही.

आता प्रश्न असा होता की तिला नेमकं झाला काय की अस अचानक झालं. सगळे लोक सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते. कोणीतरी करणी केली होती म्हणतात. बाकी म्हणतात की तिला पहिली आई घेऊन गेली कारण तिचापण सेम दिवशी , सेम वार आणि अगदी तशीच मेली जशी माझी ताई मेली . मला कोणावर विश्वास ठेऊ कळत नव्हत . खरं म्हणजे मी सायन्सला मानणारी मुलगी आहे पण माझ्यासोबत ही भरपूर गोष्टी अशा झाल्या होत्या की मला वाटायला लागलं की खरं पहिली आई तर नाहीना घेऊन गेली माझ्या ताईला ? आमच्या घराला भूत बंगाल नाव पडलं. बाया यायला घाबरत होत्या आमच्या घरी .

हा सगळा गोंधळ नेमका काय आहे मी पुढच्या भागात सांगते 

इतर रसदार पर्याय