'ऍडॉल्फ हिटलर'
२० एप्रिल १८८९, संध्याकाळच्या ६.३० वास्ता जर्मनी सिमेपलीकडे आलेल्या ऑस्ट्रियातील ब्रानऊ नावाच्या एका लहानस्या खेडेगावात हिटलरचा जन्म झाला. ॲलॉइस व क्लारा हिटलर या दांपत्याचा तो सहा मुलान पैकी चौथा मुलगा होता या पूर्वीच्या त्याच्या तीन बहीणभावां गुस्ताव, इडा आणि ओट्टो हांची बाल्यावस्थेत च मृत्यू झाले होते त्यामुळे क्लारा हिटलरची खूप काळजी घाय्यची. आईचा तो अतिशय लाडका होता. लहानपणी सर्वजण त्यांला कौतुकानी एडी म्हणायचे.
जेव्हा तो तीन वर्षाचा झाला तेव्हा ते कुटुंब जर्मनीच्या पसऊ मध्ये स्थलांतरित झाले. इथे तो पाच वर्षाचा असताना १८९३ मध्ये त्याच्या लहान भाऊ एडमंडचा जन्म झाला. पण ह्या कुटुंबा साठी तिथली बोली ऑस्ट्रिया जर्मन लोकान पेक्षा वेगळी असल्या मुळे पुष्कळ त्रास होत होता त्यामुळे ते १८९४ मध्ये परत ऑस्ट्रियातील लीम्ज मध्ये परत आले. १८९५ मध्ये हिटलरचे वडील एलोईस ह्यांचा ऑस्ट्रीयाच्या प्रशासकीय सेवेतून निवृती मिळाली. त्यांला पेन्शन मिळत होती तरी त्याच्या वडिलाने शेती आणि मधमाश्यापालन चा व्यवसाय शुरू केला, १८९६ मध्ये हिटलर तेथील फीचहेम नावाच्या सार्वजनिक शाळेत पहिली ईयते मध्ये प्रवेश मिळवला. १८९६ मध्ये लहान बहिण पोलचा जन्म झाला.
ऍडॉल्फ हिटलर च लहानपण एकदम कष्टदायी होत, वडील प्रशासकीय सेवेत असल्या मुळे त्यांला सतत समोरच्याला आदेश देण्याची आणि सख्ती लादण्याची घाण सवय होती. ऍडॉल्फ हिटलरशी आणि त्याचा सावत्र भाऊ एलोईस जुनिअर बरोबर पण ते तसेच वागायचे कधी कधी ते दोघांवर हाथ पण उचलायचे. एलोईस ह्या सर्व्या जाचाने वैतागला आणि एकेदिवशी तो घर सोडून पळून गेला. ऍडॉल्फला फार वाईट वाटले पण वडीलान समोर तो काय बोलनार? जो प्रयन्त ऍडॉल्फचे वडील जिवंत राहिले तो पर्यंत एलोईस जुनिअर घरी परत आला नाही! आता एकट्या ऍडॉल्फच्या वाट्यात च वडलांचा त्रास सहन करण्याची वेळ आली. त्याचे वडील एलोईस त्याचां पुष्कळ छळ करायचे पण बिचारा हिटलर गपचूप ते सर्व सहन करायचा.
हिटलर चे वडील एलोईस पुष्कळ स्वछंदी आणि धुनी होते ते फक्त स्वतःचा ज विचार करायचे आखिर एक दिवशी त्यांनी लीब्जची ती सर्व शेतीभाती सोडून संपूर्ण परिवार लंबाख शहराकडे निघून गेला. यानंतर ते कोठेही स्थायिक झाले नाही. सतत स्थानांतराची असर ऍडॉल्फच्या शिक्षणावर झाली होती.
लंबाखला संत बेनेडिक्ट केथोलिक यांचा चर्च व मठ मार्फत एक शाळा चालवली जात होती. त्याचा वडिलाने ऍडॉल्फचे नावं ह्या शाळेत टाकल. आता सतत आभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्या मुळे ऍडॉल्फ इतर मुलान पेक्षा मागे पडला होता. शिक्षकांनी पण शेवटी कंटाळून त्याचा कडे दुर्लक्ष केल होत. सर्व इतर विधार्थी त्याला चिडवायचे ऍडॉल्फनी त्यांचे तोंड बंध करण्यासाठी त्या वर्षी जीवलाउन आभ्यास केला पण तो यशस्वी झाला नाही! त्या वर्षी तो नापास झाला! ऍडॉल्फ नापास झाल्याचे कळल्यावर त्याचां वडिलाने त्याला बरोबरचा फटकावला. आस ही त्यांला ऍडॉल्फ वर जाच करण्याच कुठल कारण च पाहिजे होत! १८९८ मध्ये ते पुन्हा लिंज जवळच्या लिओनडिंग गावात राहायला आले. वडीलाने त्याचे नाव ह्या गावातील एका शाळेत टाकले. तेथील अभ्यासक्रम सोपा होता आणि ऍडॉल्फ पण नियमित शाळेत जायचा त्यामुळे त्याचा ह्या शाळेत चांगला परिणाम आला. तो हिथे एकाग्र होत ज होता तेव्हा एक दुखद घटना बनली. त्याचा लहान भाऊ एडमंड वयाच्या सहाव्या वर्षी साधरण आजारी पडला आणि मृत्यू पावला. भावाच्या आकस्मिक देहांतनी तो खूब दुखी झाला.
ऍडॉल्फला लहानपणापासून वांचन आणि चित्रकारीचा पुष्कळ शोख होता. लहानपणी ज त्याने में नावाच्या लेखका चे युद्धा विषयीचे ७० पुस्तके वाचले होते. त्याचा वडिलानेचे ग्रंथालय पुस्तकान बाबतीत समृद्ध होते. त्यामुळे त्यांनी लहानपणी च त्याने फ्रांस आणि जर्मनीमध्ये झालेल्या युद्धाचे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचली होती. युद्ध आणि सैनिकाचा संदर्भ असलेली प्रत्येक बाब त्याला प्रोस्ताहित करायची. चित्रकारित पण तो खूब काबिल होता खास करून वास्तू नकाश्यात एकादी वास्तू त्यांनी पाहिली की तो आबेहूब तिचा नकाशा काढायचा. वास्तू कितीही कठीण आसो, गुंतागुंतीची आसो ऍडॉल्फ ती एकदा पाहून घरी येऊन स्मरणशक्तिने त्याचा हुबेहूब नकाशा बनवायचा.
ऍडॉल्फ चे स्वप्न कलाकार बनायचे होत पण त्याचे आणि वडिलानेचे विचार कधीच मिळाले नाही. वडिलाने त्याचां भावनेची कदर केल्या सिवाय सप्टेंबर १९०० मध्ये त्याला लिंजच्या औधोगिक शाळेत टाकला. हिटलरला त्या आभ्यासात गोडी नसल्याने तो आभ्यासात मागे राहिला. पण एकमात्र होत की हिटलरचे वडिलान बरोबर कितीही मतभेद होते तरी त्यांने कधी वडिलांच्या आज्ञाचे उलंघन केले नाही. कितीही चिडक्या स्वभावाचा होता तरी त्याने वडिलांचा अपमान केला नाही.
याच काळात जर्मन राष्ट्रवादाचा जन्म झाला. ऍडॉल्फ जिथे राहत होता तो भाग जर्मन सीमेला लागून होता हीतील नागरिक स्वत:ला जर्मन-ऑस्ट्रीयन समजत ऍडॉल्फच्या मनात पण जर्मनी बदल आदर होता आणि त्या बरोबर ऑस्ट्रीयन हेप्सबर्ग राज्यप्रणाली विरुद्ध विरोध! शाळेत इतिहासाचे शिक्षकांच्या पासून बिस्मार्क आणि फ्रेडरिक सारख्या वीरपुरुषाची गौरवगाथा एकून ऍडॉल्फ जर्मन राष्ट्रवादाने रंगला होता.
आता त्यांचे वडील एलोईस ६५व्या वयी फुफुसाच्या आजाराने त्रस्त होते. सर्व युरोपियना सारखे ते पण सकाळ संध्याकाळ दारू पायचे. मात्र त्यांची एक मर्यादा होती. दारू पेऊन ते कोणालाही त्रास द्यायचे नाही. पण फुफुसाचे आजारपण आसून पण दारू पिणे हे त्यांचा साठी घातक ठरले आणि ३ जानेवारी १९०३ च्या रोजी ते मृत्यू पावले. ऍडॉल्फ वर सर्व कुटुंबाची जवाबदारी आली तेव्हा त्याचे वय होते मात्र १३ वर्ष! पण आता त्याला वडलांनचा जांच नव्हता त्याला आता सल्ला देणारी त्यांची प्रेमळ आई होती.
वडील नसले तरी ऍडॉल्फला घर चालवण्यासाठी काही खास कष्ट करायचे नव्हते कारण वडीलांच्या देहांत नंतर आई क्लाराला आर्धी पेन्शन मिळत होती. त्यांनी मरण्यापूर्वी वारसाहक्क पण तैयार केला होता ज्या प्रमाणे ऍडॉल्फला काही मालमत्तेचा हिस्सा मिळाला. ऍडॉल्फ लिंजच्या टेक्निकल हायस्कूलमध्ये आभ्यास करू लागला. तेथे तो बोर्डिग मध्ये राहायचा हिथे त्याचे अभ्यासात लक्ष नव्हते. तो त्याचा संपूर्ण वेळ चित्रे काढण्यात घालवायचा. शिक्षकांना तो विचित्र प्रश्ने विचारून परेशान करायचा. सर्वेजण त्यांला श्रेष्ठ समाजाव आशी त्यांची कायमची भावना होती. त्यामुळे तो इतरांशी भांडायचा सुद्धा आणि मरेपर्यंत तो तेच करत राहिला.
असो, सप्टेबर १९०४ मध्ये लिंज हून दूर आलेल्या “स्टीमर” नावाच्या शाळेत प्रवेश घेऊन त्यांनी पुढील अभ्यास शरू केला. तिथे तो चांगल्या मार्काने पास झाला तेव्हा मित्रान सोबत दारू पिऊन त्याने आनंदोत्सव साजरा केला आणि शपथ घेतली की कधीही दारू पिणार नाही, आणि मरेपर्यंत त्याने ही शपध पाळली. ह्यानंतर त्याने वयाचा १६व्या वर्षी शिक्षण सोडले. आणि तो परत लिंज शहर मध्ये आला. हिथे तो मौजमजा करून दिवस घालवायला लागला. कितीही आवरागर्दी केली तरी हे मात्र खर की दिसायला तो देखणा होता तरीही त्यांची एकेही प्रेयसी नव्हती! त्याचे सर्व लक्ष आपल्या चित्रकारी वर होते! जर तो युद्धात पडला नसता तर विश्वाला एक श्रेष्ठ वास्तुविशारद मिळाला असता! (कित्येक ठिकाणी त्यांची प्रेयसी असण्याचा उल्लेख आहे, अस म्हणतात की हिटलरने आत्महत्या त्यां दिवशी त्याचां प्रेयसी एव्हा ब्रॉनसह बरोबर लग्न केल होत!)
१९०७ मध्ये वयाचा १७व्या वर्षी त्याला शिक्षणाचे महत्व कळाले. त्याला समजल की काही बनायचे आसेल तर शिकावे लागेल त्या साठी त्यांनी आपल्या आजारी आईची सहमती घेऊन तो व्हिएन्नाला गेला. त्यांची आई स्तनाच्या केंसरनी पिडीत होती निदान तेव्हा ते दोघांलाही माहित नव्हत. ऍडॉल्फ व्हिएन्नाला प्रवेश परिक्षेतच नापास झाला. स्वःता नापास झाला आणि आईचे आजारपण ह्या पासून कंटाळून त्याने व्हिएन्नाला सोडण्याचा निर्णय घेतला. आणि घरी येऊन त्याने आईची खूब सेवा केली पण २१ डिसेंबर १९०७ च्या दिवशी ती मरण पावली. आईच्या मरणाने मात्र ऍडॉल्फ पुष्कळ दुखी झाला होता. आईची लिंज मध्ये आठवण येत होती म्हणून त्याने लिंज सोडून व्हिएन्नाच्या कला अकादमित प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तो व्हिएन्नाला तर आला पण इथे त्यांची हालत फार खस्ता होती वडिलांनी दिल्यास संपतीची तर त्यांनी कधीची खर्च झाली होती. त्याचे हाल फार खराब होते तो सार्वजनिक बागेत झोपून स्वःतचे दिवस काढू लागला. गरीब-अनाथांसाठी मोफत अन्नक्षेत्रात तो जेवून दिवस काढायला लागला. घाल्यायला कपडे नाही. राहला जागा नाही.
۞۞۞
ऍडॉल्फ चा जिवलग मित्र कुबिजेक पण आता नशीब आजमावण्यासाठी व्हिएन्नाला आला. तो आल्यावर ऍडॉल्फ ला थोडेसे बरे वाटले दोघांनी एक खोली भाड्यानं घेऊन त्यांत ते एकत्र राहू लागले. कुबेजेक हिटलरचा लहानपणीचा मित्र असल्याने त्याला हिटलरच्या सर्व चांगल्या वाईट सवई माहित होत्या. त्याचां मते “हिटलरची वागणूक बदलत चालली होती. तो कधी शहाण्या सारखा वागायचा तर कधी अचानक रागवायचा, त्यांची चूक सांगितल्यावर तो फार पिसाळलेला राहायचा. ऍडॉल्फ स्वतः अति उच्च व्यक्ती असण्याचा घमंडीत कुठे च नोकरी शोधायचा प्रयत्न करीत नसे. पण कुबिकेज नोकरी साठी प्रयत्नवादी होता. नोवेम्बर १९०८ मध्ये कुबिकेज दोन महिन्याचे सैनिक प्रशिक्षण साठी जेव्हा गेला तेव्हा हिटलर पण ती खोली सोडून निघून गेला तो एकटाच भटकायचा जवळचे पैसे संपले होते, कधी कधी त्याने पैसा साठी भीख सुद्धा मागायचा. १९१० मध्ये हिटलरने एका गरीबांची मदद करणाऱ्या आश्रमात आश्रय घेतला. रस्त्यावरील बर्फ साफ करुन तथा रेल्वेस्टेशनवर सामान उचलून त्यांने उपजिविका चालवली. त्यानंतर त्याने व्हिएन्नातील प्रेक्षणीय स्थळांची चित्रे तैयार करून विकू लागला. तो दुकानाच्या खिडक्याचे पोस्टर सुद्धा बनून द्याचा. इतके सगळे कष्ट, लहानपणी च आईवडील गुमवणे! लाडक्या लाहान भावाचे मृत्यू ह्या सर्व बाबीने त्याला कठोर आणि रुक्ष बनवला. द्या-माया हे शब्द त्याचा शब्दकोशातून जणू अद्र्ष्य च झाले!
व्हिएन्ना शहरात त्याचे खूब चांगले संबंध यहुदी तरुणांशी झाले तरीही त्यांची यहुदी विरोधात निर्माण झालेली धृणा कमी झाली नव्हती. १९१३ मध्ये पहिले विश्वयुद्ध सुरु होणार होते यामुळे सताधारी सक्तीने तरुण मुलांना उचलून नेऊन लष्करात भरती करू लागले, ऑस्ट्रियात पण आशी भरती निघाली त्यामुळे तो व्हिएन्ना सोडून जर्मनीच्या म्युनिच शहरात पळून आला. तेथे त्यांनी चित्रकामा चा व्यवसाय परत शुरू केला. प्रसिद्ध आणि ऐतिहासिक चित्रे काढून तो दुकांनावर नेऊन विकायचा आशा रीतेनी त्याचां गरजा पुर्या होत होत्या.
१ ओगस्ट १९१४ मध्ये जर्मनी कडून युद्धाच्या घोषणेचा आनंदोत्सव साजरा करण्या साठी म्युनिचमध्ये एक विशाल सभा झाली. हिटलर पण ह्या सभेत गेला. तिथे त्याचे विचार बदलले आणि तो दोन दिवस विचार केल्या नंतर बवेरीयन रेजिमेंट मध्ये भरती झाला.
२८ जून १९१४ रोजी पिहल्या विश्वयुद्धाचा भडका झाला सब्रीयाच्या एका आतंकवादी तरुणाने ऑस्ट्रियाचा राजकीय वारस आर्क ड्युक फ्रांज फर्डिनंडची गोळी मारून हत्या केली जर्मन सम्राट विलियमने ऑस्ट्रियाला सब्रीयावर आक्रमण करायला फुसलवल. रशियाला हे समजल त्याने ऑस्ट्रिया विरुद्ध मोर्चा बांधला. मग जर्मनीने रशियावर हल्ला केला. मग फ्रांस आणि इंग्लेंडने जर्मनीवर आक्रमण केले! समग्र युरोप आणि इंग्लेंड युद्धाच्या लपेट मध्ये आला. युद्ध कल्पना विरुद्ध पुष्कळ लांबवल खूब विनाश झाला, लाखो सैनिक शहिद झाले.
हिटलरच्या रेजिमेंटमध्ये आणि ब्रिटीश बेल्जियम सैन्यात पहिले युद्ध साईप्रस जवळ झाले ज्यात ३००० सैनिकान पैकी २५०० सैनिक ठार झाले. १९९८ मध्ये सायप्रस जवळ जो क्लोरीन गेसचा हल्ला झाला त्यांत हिटलर काही दिवस आंधळा झाला होता. त्यामुळे तो युद्धात सैनिकांचे टपाल पाहोचोवण्याचे काम करू लागला. ७ ऑक्टोंबर मध्ये सोग्याचा युद्धात त्याचा पाय जखमी झाला. त्यानंतर त्यांची कामगिरी सैन्यात फार कमी करण्यात आली. मार्च १९१७ मध्ये तो पुन्हा युद्धाच्या मोर्च्यावर हजर झाला. ओगस्ट १९१८ मध्ये ज्या यहुदींच्या प्रत्ये त्याला वैमनस्य होत त्याचं यहुदी लेफ्टनंटच्या सिफारीशी मुळे हिटलरला पहिल्या क्रमांकाचे आयरन क्रोस हे पदक मिळाले. आता युद्ध थांबल होत जर्मन सम्राट हालेजोलन्रच्या वंशाचा विनाश झाला होता त्याचा मातृभिमीचा पराभव झाला होता. जर्मनीत आता राजेशाही संपून लोकशाही उदयला आली होती.
सन १९१९ मध्ये हिटलर सक्षिदार झाला म्युनिच मध्ये आंदोलन करणाऱ्या आणि समर्थन देणाऱ्याची नावे त्यांनी वरिष्ठांना सांगितली. त्यां सर्व्यानला फांसीची शिक्षा झाली. त्यानंतर ऍडॉल्फ जर्मन सैन्याच्या गुप्तचर विभागात सदस्य झाला. त्याचं काम मार्क्सवादी समर्थक आणि राजकीय विरोधक संघटनाच तपास करण्याच होत. त्यानंतर त्याला आजून एक जवाबदारी सोपवली ज्यामुळे त्याचं महत्व फार वाढले. युद्धभूमीवरून परत येणाऱ्या युद्धबंदीना साम्यवाद, शांतीवाद आणि लोकशाहीचे दुष्परिणाम सांगण्याचे तो हे परिणामाचे भाषण एकदम प्रभावी द्याचा ज्यामुळे एक चांगल्या वक्ता तरीके त्यांची कीर्ती पसरली. एकदा सामान्य कपडे घालून ऍडॉल्फ “जर्मन वर्कर्स पार्टी” ची गुपित चौकशी करण्या साठी त्यांचा एका सभेत गेला. तेथे एक वक्ता म्हणाला “जर्मनीचे बवेरीयन राज्य जर्मनी पासून वेगळे करून त्याला ऑस्ट्रियाशी जोडावे ज्या मुळे स्वतंत्र दक्षिण जर्मन राज्याची निर्मती होईल” हे आईकून हिटलर चिडला आणि त्याने ह्याचा विरुध्द त्या सभेत १५ मिनिट भाषण दिले, त्याचे भाषण आईकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. तिथे डेक्सस्लर पण हाजीर होता त्याला हिटलरची बोलण्याची विलक्षण क्षमता फार आवडली त्याचा उपयोग करून घेण्याकरीता तो हिटलरला भेटला, त्याने हिटलर ला “माझी राजनैतिक जागृती” ही पुस्तक भेट देत स्वतःचा पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. काही दिवसानंतर हिटलरला “जर्मन वर्कर्स पार्टी” कडून एक पत्र मिळाले त्यांची संमती सिवाय त्याला सदस्य बनवलेले होते. काही दिवस विचार केल्या नंतर त्यांनी ही पार्टीत जोडण्याचा विचार केला. आश्या रीतेनी झाला त्याचा राजकारणात प्रवेश!
(हिटलरचे जर्मन वर्कर्स पार्टीचे मेंबरशीप कार्ड)
त्यानंतर त्याचां भाषणांनी प्रभावित होऊन जर्मन कामगार पार्टीचे सर्व भाषण तोच देऊ लागला. जानेवारी १९२० मध्ये पार्टीची सर्व जवाबदारी त्याने घेतली. लष्करात ज्या तरुणाशी ओळख झाली होती त्यांला पार्टी घेतले. आता पर्यंत ह्या पार्टी च्या सभेत निम्मे २५ ते ५० माणसं असायची. २४ फेबृआरी १९२० रोजी हिटलरने म्युनिचच्या सभागृहात २००० माणसाची सभा घेतली! पार्टीचे चांगले विचार मांडून त्याने साम्यवादी लोकांचा विरोध पण शांत केला. १९२० मध्ये त्यांनी पार्टी साठी स्वस्तिक प्रतिक ठेवले, आणि पार्टी च नाव बदलून राष्ट्रीय समाजवादी कामगार पार्टी ठेवल (नाझी)”
पार्टीचे मुख मुद्दे ठेवले
जर्मनी विशाल शक्तिशाली राज्य आणि जर्मनवास्यांच ऐक्य व्हावे.
जातीच्या आधारावर तरुणांना नागरिकत्व देणे
यहुदीचा जर्मनी मध्ये कायमचा प्रवेश निषेध
काम न करता मिळवलेले उत्पन्न जप्त करणे
राष्ट्रीय शिक्षण प्रणालीचे संपूर्ण पुनगठन
धार्मिक स्वतंत्रता
ह्या सर्व बदलावाने रातोरात त्यांची पार्टी लोकप्रिय झाली.
नाझी पार्टी म्युनिच मध्येच होती त्याचा फेलावा करण्या साठी तो बर्लिनला आला. समितीचे काही लोकांला हिटलरचे जोहुक्मी वर्चस्व पसंद नव्हते तो म्युनिच मध्ये नाही ह्या संधीचा फायदा घेऊन त्याने कट रचायची शुरुआत केली! हिटलरला ह्याची चाहूल लागली. बर्लिनचे काम अर्धवट सोडून तो म्युनिच परत आला. आणि हिथे येयून विरोधकांना धक्का देण्यासाठी त्याने ११ जुलै १९२१ ज्या रोजी राजीनामा ठेवण्याची गोष्ट केली. हे एकून सर्वे घाबरले सर्वांला माहित होते की हिटलर सिवाय नाझी पार्टी च काही अस्तित्व नाही. सर्वायानी त्याला पार्टीत परत येण्याची विनवणी केली तेव्हा तो पार्टीचा निरंकुश अधिकार असणारा अध्यक्ष बनवा या अटी वर परत पार्टी मध्ये आला. २१ जुलै १९२१चा रोजी हिटलर सर्वानुमते नाझी पार्टीचा नेता निवडण्यात आला.
ही वेळ राजकीय प्रभाव जमण्यासाठी हिटलर साठी एकदम उपयुक्त होती सर्वत्र जर्मनी मध्ये महागाई वाढलेली, लोकांना जगण अशक्य झाल होत स्टे समोर लोकांना भरपूर संताप होत. आणि ह्यात काही खोट पण नव्हत! झाल आस होत की ठरवल्या प्रमाणे फ्रांस आणि इंग्लेंडनी जर्मनी जवळ युद्धात झालेली नुकसानीची रक्कमची मांगणी केली होती आणि ती होती ३३ अब्ज डॉलर! घोषणा झाली तेव्हा १ डॉलर = ४ मार्क होते आणि ती रक्कम नोवेंबर १९२३ पर्यंत झाली १ डॉलर = ४०,००,००० मार्क! सर्वांच मत होत की जर्मननी फ्रांस आणि इंग्लेंडला ही रक्कम द्यायची नाही. आणि हिटलर सारख्या लोकांनी ही संधी बरोबर साधली. त्यांनी लोकांला भडकावून देशात गोंधळ घातला. १९२३ पर्यंत नाझीचे अनुयायी पण ५५ पासून ५५००० झाले होते. जर्मनीत हा गट सर्व्यात मोठा होता. सदस्यात ह्याचा एक जोश होता. हिटलरने ह्या सर्वाचा फायदा घेण्यासाठी सर्वसमंतीने एक कट रचला, कटाचा अंमलबजावणी करण्या साठी त्यांनी आपल्या सोबत पहिला विश्वयुद्धाचा पराक्रमी असा सेनापती “एरिक ल्युडेड्रोफ” घेतला. कट प्रमाणे बवेरीयन सरकारच्या नेत्यांना अपहरण करायचे आणि बंदुकीच्या नळीने त्यांना हिटलरच्या नेतृत्व आधीन करायचे. बर्लिनमधील लोकशाही सरकार उलथवल्याचा ह्या कटचा उद्देश होता. पण तो ह्या कटात यशस्वी झाला नाही १ नोवेंबर १९२३ रोजी सकाळी ११.०० वास्ता हिटलर च्या नेतृत्वा खाली ३००० नाझीची एक तुकडी म्युनिचच्या युद्ध मंत्रालयाला कब्ज करण्यासाठी निघाला, तिथे पोलिसान मध्ये तांची झपाझपी झाली, गोळीबार झाला आणि हिटलर कसाबसा तेथून जीव वाचवून पळाला. आणि त्याचा जुन्या मित्र हंपस्तेग्लोच्या घरी येऊन लपला तो फार निराश झाला होता. सरकारने ही तो दिसेल तिथे ठार करण्याचा आदेश दिला होता. तिसर्या दिवशी २० फेब्रुवारी १९२४ रोजी तो पोलिसाच्या ताब्यात आला. त्याचा वर देशद्रोहाचा खटला चालला आणि त्याला पाच वर्षाची कैद झाली. हिटलर कुल १३ महीने जेल मध्ये राहिला हिथे त्यांनी आपली पुस्तक “माईन केम्फ” तैयार केली. जेल मधून सुटल्या वर हिटलरनी पहिले की जर्मनी विश्वव्यापी आर्थिक मंदीत सापडलं होत. जर्मनी मध्ये बेरोजगारी फार वाढली होती. जनता मध्ये सरकार विरूध आक्रोश होता. हिटलरनी जनते च्या आक्रोशचा फायदा उचलला. लोकांला प्रभावी भाषणे देऊन त्यांनी परत स्वतः चा जम बसवला. तो परत लोकांन मध्ये प्रसिद्ध झाला. १९३२ मध्ये त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. पण त्याला राष्ट्रपतिच्या त्या निवडूनकित सफलता मिळाली नाही. पण १९३३ मध्ये ते जर्मनी चे चान्सलर बनले. आता हिटलरचा अत्याचार शुरू झाला त्यांनी साम्यवादी पार्टीला बेकायदेशीर घोषित केले. याहुदियाचा शिरच्छेद केला. त्याचं वेळी राष्ट्रपतिचे अचानक देहांत नंतर हिटलरने स्वतःला राष्ट्रपति तथा सर्वोच्च न्यायाधीश घोषित केले. सत्ता मिळवल्यानंतर हिटलरने राष्ट्र जोडण्या साठी भविष्यात होणाऱ्या युद्धानला लक्षात घेऊन जर्मनीची सैन्य शक्ति वाढवण्याची शुरुआत केली त्यांनी सर्व जर्मन लोकांना सैनिक प्रशिक्षण देण्याचा आदेश दिला. विशाळ जर्मन साम्राज्य ची स्थापना चे लक्ष्य ठेवून हिटलरने सर्व संधिची अहवेलना करून शेजारी देशान वर हल्ले केले जयाच परिणाम हे आल की १९३९ मध्ये द्वीतीय विश्व युद्ध भडकल
सप्टेंबर १, १९३९ रोजी हिटलरने पोलंडवर आक्रमण करण्यापूर्वी जाहीर केले की व्हर्सायच्या तहात गमावलेला सगळा प्रदेश जर्मनीने जिंकलाच पाहिजे. शिवाय, ज्या ज्या प्रदेशात जर्मनवंशीय व्यक्तींचे बहुमत असेल, ते प्रदेशही जर्मनीचेच भाग झाले पाहिजेत. जर्मनीच्या अधिकृत परराष्ट्र धोरणात म्हणले होते की पोलंड व झेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेशात जर्मन बाहुल्य होते व तेथील जर्मनवंशीय व्यक्तींच्या हक्कांची पायमल्ली होत होती. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी असे प्रदेश जर्मनीत असले पाहिजेत. युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान नेव्हिल चेम्बरलेन बरोबरच्या चर्चासत्रात हिटलरने अनेक पुरावे दाखवले ज्यानुसार जर्मनीच्या शेजारी राष्ट्रातील जर्मनवंशीय लोकांवर अत्याचार होत होते. या सबबीवर हिटलरने असे प्रदेश जर्मनीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला. हिटलरच्या या युक्तिवादाला जर्मन जनतेचा पूर्ण पाठिंबा होता. जर्मनीला पहिल्या महायुद्धात नामुष्की पत्करावी लागली होती. व्हर्सायच्या तहातील काही कलमे जर्मनीच्या आर्थिक व सैनिकी विकासाला जाचक होती. याच सुमारास जगभर आर्थिक मंदी सुरू होती, त्याचा प्रभाव जर्मनीवरही पडला होता. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला सैन्य बाळगण्यावर कडक निर्बंध होते व प्रत्येक सैनिकी हालचालीबद्दल लीग ऑफ नेशन्स द्वारे परदेशी राजवटींना जबाब द्यावा लागत होता. ततः जर्मनीत गरीबी, बेकारी व असंतोषाचे लोण सर्वदूर पसरलेले होते. याचे भांडवल करून हिटलर व नाझी पक्षाने सत्ता मिळवली व हळूहळू लोकशाही व्यवस्थेत बदल करून अधिकाधिक हुकुमशाहीगत व्यवस्था जर्मनीत आली. नाझींनी जर्मनीला पटवून दिले की अनिर्बंध सत्तेशिवाय जर्मनीचा उद्धार कोणीही करू शकणार नाही. हळूहळू हिटलरने र्हामइनलँड व रुह्र प्रदेशात सैन्य उभारणीलाही सुरुवात केली. याशिवाय अश्या अनेक कृती केल्या ज्या व्हर्सायच्या तहाविरुद्ध होत्या परंतु जर्मन राष्ट्रहितकारक होत्या. याचा परिणाम जर्मन जनता हिटलरच्या मागे एकमुखाने उभी राहण्याचा झाला. हिटलर व नाझी पक्षाने याचे पूरेपूर फायदा घेतला. जर्मनवंशीयांवर अन्याय होत असल्याचे भासवून त्यांनी याकाळात अनेक इतरवंशीय व्यक्तींचे (रोमा जिप्सी, ज्यू, इ.) सर्रास शिरकाण सुरू केले. सप्टेंबर १, १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले.
जर्मनीचा नेता एडॉल्फ हिटलर व त्याच्या नाझी पक्षाने सोवियेत संघाशी त्यापूर्वी मैत्री-करार केला होता. त्यानुसार सोवियेत संघाने सप्टेंबर १७च्या दिवशी पूर्वेकडून पोलंडवर चाल केली. याला प्रत्युत्तर म्हणून युनायटेड किंग्डम व फ्रांसने सप्टेंबर ३ला जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले. सुरुवातीला हे युद्ध मुख्यत्त्वे सागरी युद्ध होते. काही महिन्यातच जर्मनीने पोलंड काबीज केले. त्यानंतर १९४०मध्ये जर्मन सैन्याने नॉर्वे, नेदरलँड्स, बेल्जियम व फ्रांस पादाक्रांत केले व १९४१मध्ये युगोस्लाव्हिया आणि ग्रीसचा पाडाव केला. इटलीने उत्तर आफ्रिकेतील ब्रिटीश वसाहतींवर हल्ला केला. काही महिन्यांनी त्यांना जर्मन सैन्याची कुमक मिळाली. १९४१च्या मध्यापर्यंत जर्मनीने बहुतांश पश्चिम युरोप आपल्या टाचेखाली आणले होते परंतु युनायटेड किंग्डम जिंकणे त्यांना जमले नाही. याचे मुख्य कारण होते रॉयल एर फोर्स व रॉयल नेव्हीने दिलेली कडवी झुंज. आता हिटलर सोवियेत संघावर उलटला व जून २२, १९४१ रोजी त्याने अचानक सोवियेत संघावर चाल केली. ऑपरेशन बार्बारोसा या सांकेतिक नावाने योजलेल्या या मोहिमेत जर्मनीला सुरुवातीला भरभरुन यश मिळाले. १९४१ शेवटीशेवटी जर्मन सैन्याने मॉस्कोपर्यंत धडक मारली परंतु येथे ही मोहीम अडकून पडली. सोवियेत सैन्याने कडवा प्रतिकार करीत जर्मनीचा रेटा मोडून काढला.
पुढे सोवियेत सैन्याने स्टालिनग्राडला वेढा घालुन बसलेल्या जर्मनीच्या सहाव्या सैन्यालाच प्रतिवेढा घालुन पूर्ण सैन्याला युद्धबंदी बनवले.
कुर्स्कच्या युद्धात सोवियेत सैन्याने जर्मनीचा प्रतिकार मोडून काढला व लेनिनग्राडचा वेढा उठवला. जर्मन सैन्याने अखेर माघार घेतली. लाल सैन्याने त्यांचा बर्लिनपर्यंत पाठलाग केला. ही टोळधाड शेवटी ओडर नदीच्या किनारी बर्लिनपासून ६० कि.मी.वर येउन थांबली.
युद्धाचे पारडे आपल्या बाजूला झुकत असल्याचे पाहून फेब्रुवारी १९४५ मध्ये
विन्स्टन चर्चिल, फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट व जोसेफ स्टालिन यांनी याल्टा येथे भेटून युद्धानंतर युरोपची राजकीय व भौगोलिक स्थिती काय असावी यावर चर्चा केली. यात अनेक दूरगामी निर्णय घेण्यात आले.
•एप्रिल १९४५मध्ये संयुक्त राष्ट्रांची स्थापना करणे.
•पोलंडमध्ये मुक्त निवडणूका घेणे.
•पोलंडची पश्चिम सीमा पूर्वेकडे सरकवणे यासाठी जर्मनीच्या पूर्व भागाचा लचका तोडून पोलंडमध्ये समाविष्ट करणे.
•सगळ्या सोवियेत नागरिकांना सोवियेत संघाकडे सोपवणे.
•जर्मनी शरण आल्याच्या तीन महिन्यात सोवियेत संघाने जपानवर आक्रमण करणे.
एप्रिल १६ रोजी लाल सैन्याने पोलिश सैन्याच्या ७८,५५६ सैनिकांसह बर्लिनवर आक्रमण केले. एप्रिल २४ला सोवियेत सैन्यातील तीन फौजांनी बर्लिनला पूर्णपणे वेढा घातला. शेवटचा शर्थीचा प्रयत्न म्हणून हिटरलने शहरातील आबालवृद्ध नागरिकांना फोक्सस्टर्म या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले व चढाई करीत येणाऱ्या लाल सैन्याशी झुंज घेण्याचे हुकुम सोडले. त्यांच्याबरोबरीने सीलोच्या लढाईत पराभूत होऊन आलेली जर्मन फौज होती. लाल सैन्य बर्लिन शहरात घुसल्यावर झालेल्या असंख्य झटापटी दारुण होत्या. घराघरातून व रस्त्यातून आमनेसामने सैनिक व नागरिकांच्या चकमकी होत होत्या व बळींची संख्या लाखांच्या घरात गेली. सोवियेत सैन्याने ३,०५,००० सैनिक गमावले तर ३,२५,००० जर्मन नागरिक व सैनिक फक्त बर्लिनमध्ये मृ्त्युमुखी पडले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून ॲडॉल्फ हिटलर व त्याचे मंत्रीमंडळ फ्युह्ररबंकरमध्ये आश्रयाला गेले.
२८ तारखेला बरीच रात्र होई पर्यंत हिटलर जगाज होता तो त्याला समजत ज नव्हत की त्याचां आगेवानी मध्ये आशी कुठली चूक झाली की त्याला हार चा सामना करावा लागला. तो आता स्वतःच्या हार ची कारणे दुसऱ्यान वर टाकू लागला. २९ एप्रिल पर्यंत सोव्हिएत सैन्य फ्युह्ररबंकर पासून १ मैल अंतरावर आल. हिटलरने सांभाळून ठेवलेला विषाचा प्रयोग आधी आपल्या अवद्याता कुत्र्या वर केला मग ते विष आपल्या महिला सचिवाना सायनाईड विषाचे केप्सूल देऊन त्यांला सांगितले की रशियन सैनिकांनी बंकर मध्ये प्रवेश केल्या ची माहिती मिळाली की ह्या केप्स्युल खाऊन आपली आबरू वाचवा ३० एप्रिल दुपारी २.०० वास्ता हिटलरने आपले शाकाहारी भोजन केले त्यानंतर आपल्या सर्व स्टाफला तो भेटला आणि मग हिटलर त्याची सोबतीण एव्हा ब्रॉनसह सोबत खाजगी कक्ष मध्ये गेला. दुपारच्या तीन वास्ता त्या दोघाने स्वःतला गोळी मारून आत्महत्या केली.
ॲडॉल्फ हिटलरच्या मृत्यूनंतर ॲडमिरल कार्ल डोनित्झने जर्मन सैन्याचे सूत्रे हातात घेतली पण लवकरच हा डोलारा कोसळला. बर्लिनमधील जर्मन सैन्यबलाने मे २, इ.स. १९४५ रोजी सोवियेत सैन्यासमोर शरणागती पत्करली.
प्रशांत सुभाषचंद्र साळुंके