Man gau lagale gane Dipak M Kambli द्वारा कविता मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

Man gau lagale gane

बाप्पा मोरया

बाप्पा मोरया रे

बाप्पा मोरया

वंदन मी करीतो

चरणी तूझीया

बाप्पा मोरया...

हे विनायका

हे विघ्ननाशका

हे बुध्दिदायका

चौसष्ट कलांच्या तू स्वामीराया

बाप्पा मोरया...

विघ्नहर्ता तुज म्हणती

शुभकार्या तूज पूजती

पूर्ण होती मनोरथ तूज पूजोनीया

बाप्पा मोरया...

संकट समयी उभा भक्तांच्या पाठी

लाडू आणि मोदक नैवेद्याच्या ताटी

रुप तूझे मनोहर हे गौरी तनया

बाप्पा मोरया...

बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया

करीतो मी वंदन चरणी तुझीया

बाप्पा मोरया...

बाप्पा तुला...

बाप्पा तुला करतो

मी रोज नमस्कार

माझ्या इच्छा कधी पूर्ण करणार

रोज रोज शाळेत जायचा येतो कंटाळा

आई कधी घरी नाही राहू देत मला

ही शाळा तू सांग कधी गायब करणार

माझ्या इच्छा...

शाळेमध्ये बाई रोज शिकवितात अ आ ई

मला मात्र येते झोप आणि जांभई

बाईंना काधी हे कळणार

या बाईंना कधी हे कळणार

माझ्या इच्छा...

परवाच माझी परिक्षा झाली

पेपर लिहिताना मला झोपच आली

मी झालो पास तरच तूला मोदक मिळणार

माझ्या इच्छा...

माझ्या इच्छा आहेत किती मामूली

त्यासाठी तूला याव लागणार खाली

सांग आम्ही किती वेळ वाट पहाणार

माझ्या इच्छा...

गणपती बाप्पा

गणपती बाप्पा गणपती बाप्पा

चल मारु थोडयाशा गप्पा

मोदक लाडू खा पटापट

नाहीतर ओरडतील तूला पप्पा

प्रश्न पडले मला खूप सारे

द्यायची आहेत उत्तर तूला बाप्पा

आमच्याकडे येतो दहा दिवस

मग बाकीच्या दिवशी कुठे असता बाप्पा

गणपती बाप्पा

सर्वांचे अन्याय पोटी घेतोस

मग मकोदकासाठी कुठे आहे कप्पा

आणताना तुला सर्व नाचतात ते कळते

पण विसर्जनाला का नाचतात याचा

लागत नाही पत्ता

गणपती बाप्पा...

म्हणविशी विद्या दाता तू

सर्वांना विद्या देतोस तू

पण कोणाला किती द्यायची विद्या

हे कसे ठरविता तुम्ही बाप्पा

गणपती बाप्पा...

वेदना

वेदनेची जाणिव सर्वांना असते

पण कुणी ती दाखवत नाही कुणी दाखवते

जोडीदार सगळयांना असतात

पण कुणी साथ देतात

कुणी साथ सोडून जातात

प्रेम सगळेच करतात

पण कुणी तन-मनाने करतात

कुणी बुध्दीने करतात

नाते बऱ्याच लोकांशी असते

पण कुणाशी मित्रत्वाचे असते

तर कुणाशी शत्रुचे असते

भावना सगळयांना असतात

कुणाला त्या समजतात

तर कुणी दुर्लक्षित करतात

जिवन सगळेच जगतात

कुणी सर्व मिळविण्यासाठी जगतात

तर कुणी सर्वस्व अर्पण करुन जगतात

मैत्री सगळेच करतात

कुणी मित्रांसाठी जिव देतात

तर कुणी विश्वासघात करतात.

स्वप्न

नदीच्या काठावर बसुन

मी माझ्या स्पप्नांच

प्रतिबिंब पाण्यात पहात होतो

पाणी हलल आणि ते प्रतिबिंब

हलकेच विरताना पहातो

मी पाहीलेली अशी अनेक स्वप्न विरली

पण मी स्वप्नांची पाठ नाही सोडली

स्वप्त असतातच तुटण्यासाठी

असे म्हणतात

पण स्वप्नात डूंबणारे

तर बरेच असतात

जी स्वप्न झोपेत पाहिलेली असतात

ती सकाळी सगळेच विसरतात

पण जागेपणी पाहिलेली स्वप्ने

प्रत्यक्षात उतरवता येतात

म्हणुन अशी कितीही स्वप्न

पाण्यात विरली

तरी मी स्वप्नांची

पाठ नाही सोडली.

लगोरी

आला वेगात चेंडू

विखुरली माझी लगोरी

छान उभी रचलेली

विखुरली माझी लगोरी

विखुरताच ही लगोरी

पळालो सैरावैरा

मागे वळुन पहात

ओरडलो आवरा आवरा

कुणीही नव्हते सोबत

आवरावया लगोनी

आला वेगात....

आलो शोधण्या लगोरी

सापडता सापडेना

डाव कुणावरही मला

चढवता चढवेना

इतक्यात सापडली मला

माझी पहिली लगोरी

आला वेगात...

रचिला पाया ठेवुनी

मी पहिली लगोरी

आणि सापडत पाहिली

एका मागुन एक लगोरी

आला वेगात...

शोधताना जन्म गेला

पण सापडली नाही शेवटची लगोरी

डाव अर्धा राहिला

राहिली अर्धी लगोरी.

आरती

जय जय श्री गणराज

विद्या सुखदाता

आरती करतो तूझीया

सुख मिळे दाता

जय जय.....

तुझी किर्ती दुमदुमे त्रिभुवनी

तुझ्या स्वागता सज्ज ही अवनी

करशी सुखाचा वर्षाव तु दाता

असता सदा तुझे नाम ओठी

कसे राहतील भक्त तुझे कष्टी

सकळ जन्म पावन गित तुझे गाता

जय जय...

गजानना गजानना

आम्ही वंदितो तुम्हा

हो गणपती गजानना

धन्य होईल आमचे जिवन

दे आर्शिवाद आम्हा

गणपती गजानना

मोरया रे...

ऋतु

ओल्या ऋतुची

ओली सुरवात

रिमझिम पावसाची

झाली सुरवात

ओल्या आठवणी

ओल्या मनात

दाटुनी आल्या त्या

ओल्या पापण्यात

रिमझिम...

बिलगल्या लता

तरुंना पावसात

फुलपाखरे उडु

लागली हृदयात

रिमझिम...

असंख्य धारा

वाहू लागल्या डोंगरात

छब सख्याची तरळते नयनात

रिमझिम...

ठुमरी

सख्याशी नजर

माझी भिडली

अन काळजात

कटयार घुसली

रुधीराचा नच थेंब ही पडला

अन जखमेचा व्रण ही न उरला

मन घायाळ जनी मोगरा फुलला

कशाची तमा नाही उरली

अन काळजात..

न कळे मला प्रितीची रीत

न जाणो ही हार आहे की जीत

झाले तुझी मी माझी न उरली

अन काळजात...

मुक्ती

मुक्ती मिळो वा न मिळो

मला भक्ती तुझी करायची आहे

मेवा मिळो वा ना मिळो

मला सेवा तुझी करायची आहे.

माझा कंठ मधुर असो वा नसो

माझा स्वर सुरात असो वा नसो

मला शब्द सुंदर सुचो वा सुचो

मला कविता तुझ्यावर करायची आहे.

मी तुझा मार्ग सोडणार नाही

तुझ्या पासुन दुर जाणार नाही

मला पुण्य कदाचित मिळणार नाही

पण मला पुजा तुझीच करायची आहे.

लाभो जिवनात कडक उन्हाळा

कुठेही न मिळो छाया मला

माझी राहो न राहो काया

मला माया तुझ्यावर करायची आहे.

माझा अंत समय येईल जेव्हा

तु माझ्या डोळयासमोर रहा तेव्हा

शरण तुला यायचे आहे

मला मुक्ती मिळवायची आहे.

गोलपिठा

ही कुठे आली मी

चुकल्या सर्व वाटा

ओलांडला मी तीठा

पदरी पडला गोलपीठा

कितीक चित्रे मी सजविली

खेळ मोडला भातुकलीचा

व्यवहाराच्या जगात या

झाला चुराडा स्वप्नांचा

जिवमाझा तुटतो तटातटा

नाही दुख: मला त्यांचे

ते परकेच होते

ज्यांनी ज्यांनी लुटले मला

ते माझेच होते

कशी सावरु कशी आवरु

जिवनाच्या सारीपाटा

ओलांडला .....

आणि अचानक विज चमकली

सुर मनीचे बेसुर झाले

काय असे मी पाप केले

भोग हे माझ्या नशिबी आहे

दुर झाला दुर राहिला

माझ्या घराचा उंबरठा

ओलांडला ....

पुरवेची रात

पुनवेची रात आज काळरात झाली

काळान हयो घाव घातला

जाणर जी होती पोर मांडवाखाली

डाव तीचा आज मोडला

लेक होती भल्या घरची ती बी तुमावानी

लगनाच सपान बी

होत तीच्या मनी

दोन पतंगाचा तुटला

काळान हयो...

माय भावंडासाठी पोर आली शहरात

सोताच्या मामान तीला इकली बाजारात

काळान हयो...

पोर इक आला व्होता

इथ तीच्या मनी

त्याला बी वाटल

व्हाव तीचा धनी

पर तस नव्हत काळाच्या मनी

रोग तीला मोठा जडला

काळान हयो...

तुझ्या जगात

तुझ्या हया जगात

हे काय घडत आहे?

कुणाच्या हृदयास जखम

तर कुणाच्या पाठीत

खंजीर का आहे?

अस म्हणतात की

तु सगळीकडे आहेस

मग इथे कुठे मंदिर

तर कुठे मसजिद का आहे?

जर इथ रहाणारी

सारी तुझी लेकरे आहेत

तर कुणी कुणाचा मित्र

तर कुणी शत्रु का आहे?

जर तुच लिहितोस सर्वांच नशिब

तर कुणी कमनशिब

कुणी नशिबाचा बादशहा का आहे?

वेळनाही

सगळ काही आहे माणसाकडे

पण एका स्मितहास्यासाठी वेळ नाही

रात्र-दिवसाच्या धावपळीमध्ये

जगण्यासाठीच वेळ नाही

आईच्या आईपणाची कल्पना आहे

पण आईला आई म्हणुन हाक मारण्यास वेळ नाही

नात्यांना तर आम्ही कधीच संपवलय

पण त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास वेळ नाही

मित्रांची नावे मोबाईलमध्ये आहेत

पण मित्रांना भेटण्यास वेळ नाही

परक्यांची काय गोष्ट

इथ स्वकीयांसाठीच वेळ नाही

डोळयावर झोप आहे

पण झोपण्यासाठी वेळ नाही

हृदयात अनेक दुख: आहेत

पण रडण्यासाठी वेळ नाही

पैशाच्या पाठी एवढे धावतोय

की थकण्यासाठी वेळ नाही

दुसऱ्यांच्या भावनेची

कधी कदर करु

स्वत:च्या स्वप्नांसाठी वेळ नाही

तूच सांग हे जिवना

या जगण्याच काय होईल

इथ रोज मरणाऱ्यांना

जगाण्यासाठी ही वेळ नाही.

आठवण

आता नेत्र लागले पैजतीरी

संपला डाव माझ एैलतीरी

ते बागडणे,उडणे

स्वच्छंद फुलपाखरापरी

वाळुत बांधणे इमले

त्यश अवखळ नदीतीरी

आठवते ते सारे कधीतरी

आता..

ते बघणे पक्षांच्या रांगा

एका लयीत उडताना

ते बघणे सायंकाळी

सुर्य पाण्यात बुडताना

आठवते ते सारे कधीतरी

ते रमणे आपल्याच जगात

भान हरपूनी

ते भानावर येणे

कुणाची हाक एैकूनी

आठवते ते सारे कधीतरी

आता..

हे मन झाले आजून जाण्या पैलतीरी

बांधले गाठोडे आठवणीचे हृदय भितरी

आठवण येईल तुम्हाला आमची कधीतरी

आता...

दिसत तस नसत

दिसत तस नसत

म्हणुन जग फसत

निट पहा निरखुन

कोण डावा कोण उजवा

घ्या निट पारखुन

प्रचंड घोळ आहे या जिवनाचा

होत आहे उद्रेक भावनांचा

सोडवा गुंता हा विचारांचा

कारण प्रश्नच आहे हा इभ्रतीचा

शोधायचा आहे खरा सुत्रधार

जो नाचवतो बाहुल्या धरुन दोर

फाडा त्याचा बुरखा

खेचा त्याला बाहेर

येवुदे खरा चेहरा जगासमोर

किती आखले आराखडे

तुम्ही विध्दंसाचे

नियती ठरवित असते

निकाल तुमच्या प्रयत्नांचे

जिंकेल जो करील प्रयत्न शर्थिचे

आणि करावे बलिदान आपल्या प्राणाचे.

आई

दबकत बिचकत गेलो

नात्यांच्या बाजारात

इथे सर्व विकले जात होते

वाट्टेल त्या भावात

दुकानदाराला विचारले

काय भाव आहे नात्यांचा?

दुकानदार म्हणाला

तुम्हाला हवा आहे कुणाचा?

भावाचा की बहीणीचा?

बापाचा की काकाचा?

मी घाबरत विचारले

“आईचा”?

दुकानदाराचा चेहरा

केविलवाणा झाला

गहीवरुन येत

तो म्हणाला

हया नात्यावर तर जग तरलय

अजुनही हे नात विकायच राहिलय

हया नात्याला मोल नाही

हे नाते कुठेच विकल जात नाही.

पाठवू शकलास...

स्मरतात काही गोष्टी

मला तुझ्याकडे राहिलेल्या

पाठवु शकलास तर

पाठव तू त्या मला

आहेत काही रात्री

पावसात चिंब भिजलेल्या

अहोत काही शपथा

तुझ्या सवे घेतलेल्या

पाठवु शकलास तर

पाठव तु त्या मला

तुझ्यासवे ते हिंडणे

एकमेकात गुंग होणे

हे हसणे, खिंदळणे

पाठवु शकलास..

हिरवळीवर अनवाणी फिरताना

पायात रुतलेला काटा

हातात हात गुंफून

ज्यावर चाललो त्या वाटा

किनाऱ्यावर बसुन

अंगावर झेललेल्या त्या लाटा

पाठवु शकलास तर पाठव तु त्या मला

सुखाशी भांडतो आम्ही

सुखाशी भांडतो आम्ही

दु:ख पदरात घेतो आम्ही

दु:खाला झेलतो आम्ही

सुखाला टोलवितो आम्ही

सुख म्हणजे मृगजळ

म्हणते माझ्या पाठीपळ

दु:ख असते अटळ

जे सोसल्याने वाढते बळ

म्हणुन दु:खांना कवटाळीतो आम्ही

सुखाशी भांडतो आम्ही

सुख म्हणजे भास

लावते जीवाला आस

दु:ख म्हणजे सत्य

भोगावे लागते नित्य

म्हणुन दु:खाशी खेळतो आम्ही

सुखाशी भांडतो आम्ही

सुख आणि दु:ख

एकाच नाण्याच्या बाजू दोन

यांना एकमेकांपासून

दुर करील कोण?

घेताना ते एकत्र घ्यावे लागते

देताना ते एकत्र दयावे लागते

म्हणुन सुखाशी भांडतो आम्ही

दु:ख पदरात घेतो आम्ही.

बाहुली

माझी बाहुली दिसते छान

छोटेसे डोळे इवलाले कान

ही हसते फारच छान

अभ्यासाला बसता मी

बाजुस येऊन बसते

जे जे शिकते मला आई

टवकारुन दोन्ही कान ती ऐकते

छोटेसे...

जेवायला बसता मी

माझ्या शेजारी हीचा पाट

आईपण देते तीला

मग छोटेसे एक ताट

पटा पटा जेवते छान

छोटेसे...

शाळेत जाताना म्हणते

मी सोडायला येते

आईपण तीला सोबत घेते

शाळेची बस सुटता

तीच्या डोळयात पाणी येते

मलापण मग रडु येते

शाळेतुन घरी आल्यावर

मला बिलगते छान

माझी बाहुली...

अंगाई

निजरे निजरे लडीवाळा

निज निज माझ्या बाळा

निज रे लडीवाळा

तुज अंगाई गाते मी बाळा

शांत झाले जग सारे

शांत झाले वारे

पाखरे घरटयात अन्

गाई गोठयात झोपल्यारे

बघ हा अंधार झाला

निजरे...

चंद्र चांदण्यासवे

देतो आहे पहारा

सर्व जगाने घेतला

निजेचा सहारा

तु सोड आता चाळा

निजरे...

निजरे नंदलाला

निज यशोदेच्या बाळा

झुलविते मी तुझा झुला

तुज अंगाई गाते मी बाळा

निजरे...

प्रित

जेव्हा जुळते प्रित

तेव्हा जन्मते गित

प्रेमी गातात हे गित

अमर होते संगीत

हा आहे एक रोग

असे म्हणतात सारे

आणि नाही इलाज याला

असेही म्हणतात सारे

तरीही त्यात पडावे हे गित अमर व्हावे

म्हणतात प्रेम आंधळ असत

हे दिसत असत

काय आहे त्यात कळावे

म्हणुन प्रेमात पडावे हे गित अमर व्हावे

गुंततात यात भावना

नकळत या संवेदना

करितो आतुर या मना

हे उर धडधडावे हे गित अमर व्हावे

वाटते प्रेमाच्या गावी जावे

एकदा हे गित गावे

दोघांचे सुर जुळावे

हे गित अमर व्हावे.

पवना सांगना

पवना सांगना

तु शोधतोस कुणा?

इथ तीथ फिरशी

भिरभिर करशी

सांगना पवना

या ढगांशी आहे का

तुझे काही नाते

येता हा पाऊस

का तुझे मन नाचते गाते

का भिरभिर करशी सांगना

सांगना पवना..

कधी फिरशी तु सागर तिरी

कधी नाचशी तु लाटांवरी

उडवित तुषार पाण्याचे

काय कारण भिरभिरण्याचे

का भिरभिर फिरशी सांगना

सांगना पवना..

केवडयाच्या बनातुन तु भिरभिरशी

सुगंध त्याचा तु पसरविशी

धुंद मधुर तु शिळ घालीशी

का भिरभिर फिरशी सांगना

सांगना पवना...

काय झाले

काय झाले सांगा काय झाले सांगा

आमच्या या बबीला काय झाले सांगा

कोपऱ्यात बसली ती फुगवुन गाल

आईचे मात्र झाले पुरते हात

काय झाले...

इवले इवले गाल केवढे मोठ्ठे झाले

नकटे नाक ही खुप वर आले

कशासाठी तीने केली ही धम्माल सांगा

काय झाले...

आता आम्हाला कळले

तीला काय झाले

पप्पा तीला नसांगता

ऑफीसात गेले

पप्पाने हे असे काय केले सांगा

काय झाले...

थांबा आता आपण

एक काम करु

पप्पा घरी आल्यावर

त्यांना शिक्षा करु

असे म्हणता बबडीने पुसले डोळे

आणि म्हणते पप्पा आहेत खुप चांगले

बबडीचा राग कुठे गेला सांगा

महफील

प्रेम करणारे तुला

सारे जग असणार

महफीलीत तुझ्या

पण मी नसणार

घेशील फिरुन तु

हे जग सारे

तरी तोडता येतात का

कधी तारे

तुज भावणारे सारे असणार

पण महफीलीत..

एकवेळ होती जेव्हा

तुला मी आवडायचो

मीही तुला पाहुन

खुप खुष व्हायचो

आता तो काळ कधीच नसणार

पण महफीलीत..

माझ्या स्मारकावर

जेव्हा दिप उजळणार

अश्रु ढाळणारे तेव्हा

खुप असणार

पण त्यामध्ये तु नसणार

प्रेम करणारे तुला सारे जग असणार

पण महफीलीत..

पावसा

येरे येरे पावसा

घेण्या माझा पैसा

पैसा नाही खोटा

पाण्याचा आहे तोटा

येग येग सरी

तळे विहिरी भरी

मरु लागले शेतकरी

होतील उपकार भारी

झाडे वेली सुकल्या

जमीनीस भेगा पडल्या

सुकल्या नदया नाल्या

अन्न नाही खाण्या

तु ये झडकरी

आता सगळेच तुझ्यावरी

भरतील पोटांची खळगी

आता तु आल्यावरी

आई

आई तुझ्यामुळे झाले

माझे स्वप्न साकार

तुच आहेस माझ्या

जीवनाची शिल्पकार

आज फळाला आली

तुझी शिकवण

पदोपदी आली मला

तुझी आठवण

नाही कधी विसरणार तुझे उपकार

जपलेस तळहाताच्या फोडापरी मला

आहे माझी आई

हे दाखवलेस जगाला

जगापुढे घेतलास माझा कैवार

घातली नाहीस कधी

कसलीही बंधने

शिकवले जगणे ताठ मानेने

तुझी शिकवण नाही कधी विसरणार

स्वामी

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

जयजय स्वामी समर्था

जय श्री सदगुरुनाथा

तुझा भक्त आरती करतो

ठेवीतो चरणी माथा

तुची माय बाप, तुच सखा बंधु

तुच वायु आप स्वामी तुची कृपा सिंधु

भक्त तुझे सदा वर्णिती

लव लिलेच्या गाथा

तु उत्पत्ती स्थिती लाय

तुझ्या भक्तंना ना कसले भय

दु:ख,पिडा हरती सर्व नाम तुझे घेता

जयजय...

तुझ्या चरणाची धुळ भाळी

तुझी विभ्रुती लावली कपाळी

तुझ्या कृपेचा प्रसाद घेता

हरती भव भय चिंता

जयजय...

वांझेला पुत्र देशी कुळांना देशी काया

निर्धनांन धन देशी भक्तांवर तुझी अपार माया

आंम्हावर राहुदे तुझी छाया हे दिनानाथा

जयजय...

आतातरी

आतातरी देवा मला पाव

सुख ज्याला म्हणतात ते दाव

पेट्रोल डिझेलचे दर वाढले

कांदा,बटाटयाचेही भाव चढले

भेंडी झाली बारा रुपये पाव

आता तरी..

रेशनच्या दुकानात वाढतात रांगा

दर्शनाला तुमच्या कोण येईल सांगा

बीपीएल यादीत टाका नांव

आता तरी...

बस महागली, रेल्वे कडाडली

एसटी ही आमची तोटयात आली

लाल डब्याचा वाढला भाव

आता तरी..

हॉटेलात चहा मिळतो पंधरा रुपयाला

मिसळचा भावही तीस रुपये झाला

दहा रुपयाला वडापाव

आता तरी...

निवडुन दिलेले मंत्री

रहातात बंगल्यावर

गिरणीकामगार मात्र

आले रस्त्यावर

भल त्यांच करायला लाव

नाचतोय सारा कोलीवारा

गणपती बाप्पा

आले घरा

नाचतोय सारा कोलीवारा

लाडु मोदक पेऱ्यांचे

ताट भरले प्रसादाचे

खातान सागरी पोरा-टारा

नायतोय..

शेवंती, मोगरा, जासवंदी

फुले घेऊन या मोप सारी

गणपती बापच्या पुजेची

चला करु तय्यारी

पारो नेस गो नवा सारा

नाचतोय...

बाप्पा मोरया करतो तुमची सेवा

दया आर्शिवाद

साऱ्या कोळी बांधवा

पुऱ्या होऊ दे इच्छा साऱ्या

नाचतोय सारा..

जेजुरी

चला जाऊया जाऊया

जेजुरीला

खंडोबा रायाच्या

दर्शनाला

जेजरी गडावर सारे

भक्त जमू लागले

ढोल वाजु लागले

भक्त नाचु लागले

भंडारा गडावर उधळुया

चला जाऊया...

खंडेराया गडावर

मुर्तीत्याची मनोहर

मुर्तीत्याची मनोहर

रुप त्याचे डोळयामध्ये साठवुया

चला जाऊया...

मल्हारी राया माझा

भक्तांचा कैवारी

बसतो गडावरी

किरपा त्याची सगळयांवरी

आर्शिर्वादा त्याचा चला घेऊया

चला जाऊया...

आसवे

सांगती माझ्या मनाची

व्यथा ही असावे

मी रडलो तर

रडती ही आसवे

मी हसलो तर

हसती ही आसवे

दिवस कसा तरी

ढळतो या कामात

रात्र मात्र कठीण

जाते या जिवनात

तु येत नाहीस

तुझी आठवण मात्र

सदैव असते हृदयात

जसे चमकती अंधारात काजवे

सांगती माझ्या..

कधीतरी माझे होते

जे आता झाले परके

सुंदर चेहऱ्यांवरचे

आता दुर झाले बुरखे

धन-संपत्तीपुढे प्रेमानेही झुकावे?

पुजा

जरुरी नाही सारख

प्रार्थना करत रहावे

आणि त्यात प्रभुच नाव घ्याव

हे जीवन म्हणजेच एक पुजा आहे

ते कुणाच्यातरी कामी याव

कामावर श्रध्दा हवी

काम म्हणजेच देव

फावल्यावेळेत

देवाच नांव घ्याव

मंदीरात शोधण्यापेक्षा

माणसात शोधावा देव

फार महत्वाची गोष्ट आहे

हे पक्क लक्षात ठेव

जेव्हा कुणी करत विश्वासघात

तेव्हा हृदयावर पडतात घ्याव

पण माथेची फुंकर घालताय

भरुन येतात सर्व घाव

फार महत्वाची गोष्ट आहे

हे पक्क लक्षात ठेव

आनंद

मन हे वेडे झाले

ते आनंदे न्हाले

सुर्यप्रकाशात तळपले

कैवल्याच्या चांदण्यात झळकले

त्यास कळाले आदी अंत

नाही कसली उरली खंत

तुकयाच्या गाथे परी ते

भिजुनी अलिप्त राहिले

नुरला स्वर्ग पुरला नरक

जिवनाचा त्या कळला अर्क

दु:खाचे डोंगरही त्यास

कस्परासम भासले

आता कळे खरा आनंद

पाहतो आनंद वाटतो आनंद

स्वर्गसुखाच्या कल्पनेपेक्षा

जिवनाचे सत्य सुंदर वाटले

आता ना कसले वाटे भय

मृत्युवरही मिळवला विजय

मनी आनदं, वनी आनंद

जग आनंदयम झाले.

वेध बदलीचे

एप्रिल महिना सुरु होता

वेध लागतात बदलीचे

तारांबळ मग उडुन जाते

करण्या प्रयत्न शर्थिचे

असतात जे बदलीस नियत

ते चर्चेत सामिल होतात

पण जे नियत नसतात

तेही सल्ले देत सुटतात

कुठुन कुठुन येतात बातम्या

पेवच फुटते अफवांचे

तु तीथे आणि मी इथे

सारे आडाखे मनोराज्यांचे

बदलीचे दिवस येतात

जवळ तसे तसे

ब्लड प्रेशर मग सर्वांचे

वाढते तसे तसे

जरी एकमेकांना देती धीर

हे बदलीचे विर

तरी चित्त थाऱ्यावर नसते कुणाचे

मग उजाडतो बदलीचा दिवस

जस शाळेतील रिर्झल्टचा दिवस

येतात आदेश बदलीचे

वाचताच चेहरे फुलतात काहींचे

तर चेहरे पडतात काहींचे.

यु जष्ट वेट

हे जग छोटे आहे

कुठे तरी होईल भेट

हृदय भिडेल हृदयाला थेट

एै दिल यु जष्ट वेट

समजावले मनाला

नको सोडुस धीर

हरलास इतक्यात तर

तु कसला प्रेमवीर

संयम ठेवुन आपण पहायची वाट

एै दिल...

समजायचे आपण

हृदय वाहिले दगडाला

सहज मिळते का

कधी प्रेम कुणाला?

एकदा मिळाले की पहा आपला थाट

एै दिल...

प्रेमाच्या या धनाला

नको मारु ठोकर

अब हम तो रहेंगे

बस तेरे होकर

रात्रीची होतेच पुन्हा पहाट

एै दिल...

वेड

कसली जिवाला जडली पीड

हरी न लावलेस मला वेड

कुणाचीही राहिली न मला भीड

हरी तु लावलेस मला वेड

कामकाज मला काही न सुचे

दिवस राज बस ध्यान हरीचे

पहा ही लागली रे मला ठेच

हरी तू...

एकांत हा मला प्यारा लागे

वाटे तु आहेस माझ्या संगे

अन्न ही तुजवीण गोड न लागे

अशी झाली जीवाची परवड

हरी तू...

सतत हरीचे होती भास

वाटे तो आहे आसपास

भेटण्या तुझ करते सायास

उरात माझ्या कसली धडधड

हरी तू...

प्रलय

भन्नाट हा सुटला वारा

जगी प्रलय का आला?

दिवस वाटती सालांपरी

साल वाटती युगांपरी

भीती दाटली ही अंतरी

प्राण कंठाशी आला

नाही बाळगली तमा कशाची

भरकटली ही नांव जिवनाची

आता का करावी अपेक्षा कुणाची

मनी विचार हा आला..

नाटक हे, तीन प्रवेशांचे

आता संपले हे सारे

जण विराण झाले रे

भन्नाट हा सुटला वारा

जगी प्रलय का आला?

पहिलटकरीण

सखी तु आहेस पहिलटकरीण

धडधडत असेल ऊर उसवित हृदयाची विण

सखी तू..

रंगवीली असशील स्वप्ने

तु बाळाच्या आगमनाची

सदैव असेल चिंता तुला

त्या गोड क्षणाची

होत असेल गुंता मनाचा

एैकुन भडीमार सर्वांच्या सुचनांचा

पण एैकावे जनाचे करावे मनाचे

हे लक्षात ठेव आणि घे सल्ला सर्वांचा

नको करुस चिंता

घे काळजी स्वत:ची

सर्वांना आहे प्रतिक्षा

त्या गोड बातमीची

गोपाळा

गोपाळा गोपाळा

देवकीनंदन गोपाळा

नाम तुझे आले या ओठा

नाही आनंदाला तोटा

राजमहाली तु रहाशी

सुदाम्याचे पोहे खाशी

नंदाघरच्या गाई राखीशी

गोप गोपीका होती गोळा

गोपाळा...

मथुरेच्या गवळणी अडवीशी

दही,दुध,लोणी चोरुन खाशी

गोपीकांची वसने पळविशी

अगाध आहे तव लीला

गोपाळा...

पार्थाचा होऊनीया सारथी

कौरवांशी रणी खडे चारीशी

कुरुक्षेत्री मग तु पाथी

भगवतगीता सांगशी

सहज उचलशी गोवर्धन गिरीला

गोपाळा..

जरा विसावु या वळणावर

वळणा वळणाच्या या वाटा

जशा सागरी अथांग लाटा

कळेना कशी मी आले उथवर

जरा विसावु या वळगावर

सोडवु कसा मनाचा गुंता

कसली यास लागली चिंता

मन वेडे उलते या लागेवर

जरा विसावु...

आली अवचित समोर पहाट

याचीच तर पहात होते वाट

आता उरले थोडे अंतर

जरा विसावु...

अगम्य असला जरी हा अंधार

थांबत नाही तरी यात विचार

वाट पहाटेची पाहु कुठवर

जरा विसावु...

जग हे सारे वैरी झाले

आता माझे कुणीही न उरले

थकलो गात्रे, नेत्रही शिणले

एकटी आता मी लढु कुठवर

जरा विसावु...

क्षणभंगुर जिवन आहे

क्षणभंगुर जिवन आहे

प्रत्येक गोष्टीत खुष रहा

जो चेहरा जवळ नाही

त्याच्या आवाजावर खुष रहा

कुणी जर तुमच्यावर रुसले

तर रुसण्याच्या बहाण्यावर खुष रहा

जे क्षण पुन्हा परत येणार नाहीत

त्यांच्या आठवणींवर खुष रहा

उद्याच कोणी पाहीलय

आपल्या आजवर खुष रहा

सुखाची वाट कशाला पहायची

दुसऱ्याच्या आनंदात खुष रहा

का कोणाच्या सोबतीसाठी झुरताय

कधीतरी स्वत:मध्ये खुष रहा

क्षणभंगृर जीवन असले तरी

कोणत्याही परिस्थितीमध्ये खुष रहा

खुष रहा! खुष रहा! खुष रहा!

कुणी कुणाच नसत

कुणी कुणाच नसत

कोणावाचुन कुणाच अडत नसत

कुणासाठीही जग थांबत नसत

गेलेल्या व्यक्ती परत येत नसतात

त्यांच्या आठवणी मात्र मागे उरतात

आठवणीत मन रमवायच असत

त्या दिवशी दु:ख अनावर होत

कस होणार पुढे हे प्रश्नचिन्ह असत

पण काळ हे दु:खावरच औषध असत.

जसे दिवस जातात तस मन सावरत

जग हळुहळु पुढे सरकत

काळापुढे कुणाचाच काही चालत नसत

पुढे त्या दिवसावर चर्चा होतात

त्यांच्या सवयी, आवडी, निवडी आठवतात

म्हणता म्हणता वर्ष सरत

आणि श्राध्द संपवुन सारे घरी परततात

पुढे सर्व काही सुरळीत होत

मनाच्या कप्यात दु:ख मात्र असत

दु:ख मात्र असतच.

घन बरसले

घन बरसले अंबरातुनी

भेटण्या धरणीस आतुरले

नाचे मयुर पंख पसरवुनी

पाहुनी मन हळवे झाले

झाले हिरवेगार शिवार

लता,तरु,आणि वेली

नदया,नाले,वाहु लागले

मन नाही थाऱ्यावर अशा रम्यवेळी

अंगावर पडता तुषार

रोमांचित होते अंग

फुला फुलांवर फिरती

मोहीत झाले भृंग

स्वर्ग जणु अवतरला

रम्य अशा अवनीवर

डोळे भरुन पहावे

हे रुप तीचे सुंदर

सोनेरी स्वप्न

तो -तुझ्या डोळयात दिसतात

मला सोनेरी स्वप्ने

तुझ्याहुनी सुंदर आहे

तुझे मोहक हसणे

ती – तुझ्या डोळयात आहे

एक गहीर गुपीत

तुझ्याहुनी सुंदर आहे

सजणा तुझी प्रिंत

तो – ओठ उघडता तुझे

मोगऱ्याच्या कळया फुलतात

डोळयात खोल तुझ्या

सागरी किनारे दिसतात

तुझ्या मौनातही असे तुझे बोलणे

तुझ्याहुनी...

ती- तुझ्या नजरेत दिसते

मला जराशी खोडी

उगीच खुशामत करण्यात

तुला नाही गोडी

मला खटकते हे तुझे गोड वागणे

तो- तुझ्याहुनी सुंदर आहे

तुझे मोहक हसणे

ती- तुझ्याहुनी सुंदर आहे

तुझी प्रित सजणा

सांग माझ्या मना

सांग माझ्या मना

जाऊ कुठे मी आता

कोण ऐकेल माझ्या

या हृदयाची व्यथा

माझी साथ सोडुन

जाणाऱ्या ऐक रे

तुझ्याविना जगणे

कठीण आहे रे

मरण आहे सोपे आता

सांग..

हृदय बेचैन आहे

श्वास उतावीळ आहे

तुझ्यावीना जग माझे

सुने सुने आहे

सांग मला कशी मी जगु आता

सांग..

माझे दु:ख आहे

तुझेही दु:ख आहे

या हृदयाचे वाचणे कठीण आहे

माझी नाव वादळात सापडली आता

सांग माझ्या मना कुठे जाऊ मी आता

कोण ऐकेल माझ्या हृदयाची व्यथा

मन सुंदर फुलपाखरु

मन सुंदर फुलपाखरु

स्वच्छंद उडतेय भुरुभुरु

मन धावतय जस वारु

त्याला कशी मी आवरु

मन नदी अवखळ

वाहते पाणी निर्मळ

मधुर आवाजाची खळखळ

म्हणते जशी पळपळ

मन आकाश मोकळे

कधी मेघाने झाकोले

कधी नुसतेच निळे निळे

कधी तारकापुंज वाटोळे

मन ताटवा फुलांचा

जसा गालीच्या हिरवळीचा

जसा गारवा हवेचा

जसा थंडावा छायेचा

जसा उबारा मायेचा

मन आहे एक कोड

ते सुटता सुटेना

खोली आहे किती त्याची

तळ गाठता गाठेना

तुझ्या प्रेमाचा सहारा

तुझ्या प्रेमाचा सहारा

हृदयी तुझ्या निवारा

पर्वा कुणाची कशाला

मज लाभला किनारा

भास तु आभास तु

जिवनाची आस तु

आसमंती दरवळणारा

गंध प्राजक्ताचा तू

भारलेल्या रात्रीचा तु दिपतेवणारा

तुझ्या प्रेमाचा...

हास्य ते लडीवाळ

तनु ती सुकुमार

रुप तुझे माझे

आपल्या घरी येणार

स्वप्नापरी भासे मला जन्म सारा

कधी वाटे हवे हवे

कधी वाटे आता नव्हे

जपता अपुल्या भावना

गवसले ना जे हवे

दुर झालो तरीही नाही सोडला सहारा

ती- सांग कसा असेल तो

सांग कसा दिसेल तो

तो- चंद्र पौर्णिमेचा जसा इवल्या इवल्या डोळयांचा गोजिरवाणा ससा जसा

तुला आई मला बाबा तो म्हणणारा

छोटासा अंकुर

या अंगणात फुलेल

जणु आनंद दुडुदुडु

या घरात फिरेल

खेळण्यांचा दिसेल सर्वत्र पसारा

ती पावसाळी रात

ती पावसाळी रात

तु आणि मी एकांतात

बाहेर कोसळतोय पाऊस

आणि भावना अंतरात

डोळयात चमक नशिली

अंगात तापली बिजली

तन मने दोन्ही होरपळली

काहीच रहात नाही ताब्यात

बाहेर...

भावनांचा बांध कोसळला

बंध नाही कशाचा उरला

शृंगाराचा कळस उभारला

जीव धुंद झाले प्रितीच्या गंधात

बाहेर कोसळतोय...

संपली जीवाची तगमग

झाले शांत जणु जग

तृप्त धरणी झाली तृप्त

या रिमझिम पावसात

बाहेर ओसरला पाऊस

आणि भावना अंतरात

मित्र

दिवस उगवतात

दिवस मावळतात

पण या जगात

मित्र मात्र अभावानेच मिळतात

जेव्हा कुणाचा सखा दुरावतो

त्याचा जणु श्वासच थांबतो

मनावर आठवणींचे पहाड कोसळतात

मित्र मात्र...

स्वत:च्या रुपाचा, वर्णाचा,

गर्व नका करु

मित्राने मागितले तर

प्राण ही देऊ

कारण रुप, रंग, फिके पडतात

मित्र मात्र...

धन, दौलत, यौवन

एके दिवशी सार सरत

मित्र मात्र जिवनात

केव्हाही उपयोगी पडतात

शेवटी जीवाला जीव देणारे

मित्रच असतात.

पंजाबी गीत

तेरे गोरे बदनपे

कुर्ता लाल रंगदा

मुझे लगता है

निशान ये खतरेदा

दुर ही रहना

ना आना पास ओ मुंडीया

तैनु लगजायेगा झटका

चारसो चालीस व्होल्ट दा

तेरी ये चुनरी जालीवाली

मैनु लगताहै तु होगी मेरी घरवाली

मेरे बदनपे ये चुनरी जालीवाली

फस जावेगी इसमे तेरी सारी जिंदगानी

मत जा धुपमे तेरे कुर्तेपे है आईने जडे

तेरा मुखडा लगे तारोमे जैसे चांद सजे

मेरे कुर्तेपे है जो आईने जडे

कितने आशिको के दिल है उसमे पडे

ना इतराना हमारी तारीफ से

डोली लेके आये है हम बडी दुरसे

लेजा डोली मेरी जरा आरामसे

तुझे नही लगेंगे झटके चारसो चालीस व्होल्ट दे

माझी प्रित

सुस्वर अभंग म्हणजे प्रेम

उषेचे रंग म्हणजे प्रेम

माझी प्रित म्हणजे भक्ती

आता नाही यातुन मुक्ती

माझ्या जगण्याचे कारण तुझे नांव

माझे अंतिम लक्ष तुझे नांव

जिवनाच्या प्रवासातील शेवटचे गाव

तुझे नांव तुझे नांव

तुझ्याविना नाही माझ्या जिवनास गती

माझी प्रित..

ज्या वाटेवर साथ सुटेल

अशिवाट नको मला

तुला पाहता रात्र सरेल

अशी रात्र नको मला

कुठे राम आहे, कुठे शाम आहे

जीथे तु आहे तीथ आहे‍ प्रित

माझी प्रित माझी भक्ती

आता नाही यातुन मुक्ती

सुस्वर अभंग म्णजे प्रेम

उषेचे रंग म्हणजे प्रेम

आठवण

कोंबडयाने वांग

दिली होती

दुर देवळात घंटा

निनादत होती

सुर्य रश्मीची पाऊले

धरतीवर उतरत होती

अशा रम्य पहाटे तुझी आठवण

मनात रुंजी घालत होती

सुर्याची किरणे

धरतीचा निरोप घेत होती

पाखरे फिरुन

घरटयात परतत होती

अशा सांजवेळी तुझी आठवण

मनात रुंजी घालत होती

सायंवेळी तुझी आठवण

प्रात:काली तुझी आठवण

मनात तुझ्या नयनरम्य

छबींची गोड साठवण

आपल काय जातय?

पेपरमध्ये बातमी आली

सिमेवरील गोळीबारात

बरीच माणसे मेली

मेली तर मरुद्यात

आपल काय जातय

रुपया घसरला, महागाई वाढली

टीव्ही वर चर्चा जोरात चालील

चाललीतर चालूदया

आपल काय जातय

महिला-मुलींवरचे अत्याचार वाढलेत

जनतेने सरकारचे वाभाडेच काढलेत

काढलेतर काढुद्यात

आपल काय जातय

लोक म्हणतात सरकार आहे कुचकामी

विरोधी पक्षांना बोंबलायला ही संधी नामी

बोंबलतायत तर बोंबलुद्या

आपल काय जातय

आपल काय जातय म्हणायच

मतदानाच्या दिवशी पिकनिकला जायच

स्वत: काही नाही करायच

सरकारला दोष देत रहायच

जारवडी

धाव पाव माझ्या गणा

नमितो मी तव चरणा

अन्याय आमचे पोटी घालुनी

आर्शिवाद दे भक्तगणां

घोर तुझ्या या संसारी

भक्त फिरती वणोवणी

डोळा तुझ्या येईल पाणी

ऐैकुन त्यांची ही कहाणी

कुणी न वाली तुझ्यावीना

धाव पाव माझ्या गणा

रुपयाचे अवमुल्यन झाले

भक्त तुझे किती कष्टले

सारे काही महागले

जीवन जगणे कठीण जाहले

मंदीची लाट थोपट गणा

धाव पाव माझ्या गणा

भाषा नयनांची

जाणनारे प्रिया

भाषा माझ्या नयनांची

तुला काय सांगते

ही जाणिव नि:शब्दतेची

नाही बोलणार मी

एैक बोली तु हृदयाची

हवेला हुंगता हुंगता

तीची बोली समज

आभाळावर लिहिलेले येईल वाचता

एैक ढगांचा आवाज

आहे एक वेगळी कहाणी त्यांची

जाणनारे...

थांबलेले क्षण

जस साठलेल पाणी

खोडी काढलीस त्यांची

तर होईल एक कहाणी

आणि हरवेल खोली मनाची

जाणनारे...

थांबलेल्या श्वासाच्या जगार

एैक काय सांगतात सावल्या

काय बाकी आहे सांगण्याचे

नयनांनी तर साऱ्या गोष्टी सांगितल्या

वेगळी असते एक बोली चाहुलीची

जाणणारे प्रिया..

काही तरी करु

या जगण्यातील

काही क्षण वेचु

चल जिवनात

काही तरी करु

स्वप्नांची चादर

फाटली आहे

तीला प्रयत्नांची

ठिगळे लावू

चल काही तरी करु

खुप वाट पाहिली त्यांची

या वाट पहाण्यात नजाणे

किती दिवस, महिने, वर्षे

फूकट गेली आमची

आता दुसरे काही शोधु

चल काही तरी करु

आज आपण अनोळखी

आहोत या जगात

पण कदाचित उद्या आपलीही

ओळख असेल या जगात

आपण फक्त काही करत राहू

चल काहीतरी करु.

पिछेमुड

छोटीसे हे मन माझे

अन अफाट ही दुनिया

कसा निभाव लागेल याचा

आहे अजब ही दुनिया

छोटयाशा या प्रवासात

लागतात धक्के मोठ मोठे

भासतात सर्व खरे खुरे

पण प्रत्यक्षात सारे खोटे

धकाधुकीच्या या दुनियेत

हरवते माझे मन

विश्वास बसत नाही

हे खरे माझेच मन

दिसतो समोर तो असतो का?

चेहरा खरा कुणाचा

भासतो नंतर तो

असतो मुखवटा क्षणाचा

क्षणाक्षणाला बदलतो

इथे मुळ प्रत्येकाचा

पाहिल सर्व इथ की वाटत

मनाला म्हणाव पिछेमुड

सांजवेळ

झाली सांजवेळ

लागला सुर्य उतरणीला

भय वाटते का त्याचे

कधी या धरणीला

काही क्षणात आता

होईल अंधार इथे

हे रोजचे तरीही

मन बावरे होते

उगवते जेव्हा चांदणे

येतो हवेत गारवा

कसला सुगंध येतो

कुणी माळला मारवा

येते उरी सूरसूरी

येते हृदय लयीत

मन घेतसे लकेर

गाण्या ओळखीचे गीत

पैसा

पैसा पैसा पैसा

सगळेच करती येथे

याच्या विना न चाले

कुणाचे काही इथे

झाला जन्म बाळाचा

द्या इस्पितळास पैसा

शिकविण्या विद्या त्याला

द्या शाळेस पैसा

महाविद्यालयास जाण्या

लागतो खुप पैसा

ज्याच्या कडे असे हा

त्यालाच लाभे तैसा

गरीब धडपडती इथे

मिळविण्यास पैसा

श्रीमंत तळमळे इथे

मिळविण्यास पैसा

सारेच ज्याच्या मागे

त्यास म्हणतात पैसा

सगळेच करती येथे

पैसा पैसा पैसा

सखी

अस्तालयास जेथे

रवि बिंदु टेकतो

सखी मी तेथे

तुझी वाट पाहतो

अवखळ सरीता

लगबग धावते

धावुनी ती जेथे

सागरास भेटते

सखी मी तेथे

तुझी वाट पाहतो

हरणाची अल्लड मादी

दुडुदुडु धावते

जावुनी ती जेथे

हरणास भेटते

सखी मी तेथे

तुझी वाट पाहतो

त्यावेळी तु तेथे यावे

असे मला वाटते

हुरहुर मनीची

मला बेचैन करते

इथे तीथे सर्वत्र

मी तुला शोधतो

साखी मी तेथे

तुझी वाट पाहतो

पंढरी

चला चला चला चला

चला जाऊया

माउुलीचे मख पाहुया

चला जाऊ पंढरीला

हो चला चला जाऊ पंढरीला

चंद्रभागेच्या तीरी

सारे भक्त जन नाचले

टाळ मृदुंगाच्या साथीने

विठ्ठल नाम गुंजले

आपण ही सारे

त्यात सामिल होऊया

हो चला चला जाऊ पंढरीला

पाहता माऊलीचे रुप

अश्रु वाहु लागले

आनंदाचे भरते येऊन

मन चालु गाऊ लागले

माऊलीचे रुप डोळयामध्ये

साठवुन घेवुया

हो चला चला जाऊ पंढरीला

सांजवेल झाली

सांजवेल झाली

पाखरे घरटयात परतली

सय तुझी आली

पापण्यात साठले पाणी

धडत्या हृदयाने

पाहते मी वाट

तु आल्यावर काय

करायचे याची जुळवा जुळव मनात

घंटा दुर वाजते मंदिरात

निरांजन लावले मी देव्हाऱ्यात

तारकाही दिसु लागल्या गगनात

सख्या लवकर ये ढळु लागली रात

रसिका

रसिका तुझ्याच साठी

केला हा अट्टहास रे

आता माझ्या नशिबी

का हा वनवास रे

संपली इथे नांदी

ना वग ना वतावणी

काळ आळविलो येथे

एक वेगळीच विराणी

एैकु येत नाही

सुर ओळखीचे मला रे

सजविण्या महफिल तुमची

उधळला बहर यौवनाचा

फिरवली पाठ तुम्ही

हा खेळ प्राक्तनाचा

काय चुकले कुणाचे

कुणी सांगेल का मला हे

रीत जगाची आहे निराळी

उगवत्या दिनकरा सारे वंदीती

कुणीही न वंदे भास्कराला

जाता परतुनी मावळती

सुगंध फुलाचा सारे घेती

आणि तुडविती त्या पायी रे

गंध

दरवळला गंध

हरपले भान

मिळेना ठाव

शोधते मन

पसरला चोहीकडे

उगम न कळे

वाढली बेचैनी

जिव तळमळे

शोधले रानीवनी

सापडेना त्रिभुवनी

धडपडलो रात दिनी

दाटले अश्रु लोचनी

अन अचानक

भास झाला

दरवळल्या गंधाचा

उगम मिळाला

उगा शोधतो रानीवनी

वसे तो माझ्या अंतरी

लाच

लाच म्हणजे नेमक काय?

कुणी मला सांगेल काय?

प्रश्न पडतात मला काही

उत्तरे तयांची सापडत नाही

लाच घेणारा दोषी

का लाच देणारा दोषी

लाच घ्यायच काय कारण

कुणाच देण की गरीबीच देण

काय योग्य करणे

उपाशी मरणे

की लाच घेणे

याची सुरवात होते कुठुन

आठवा जरा डोके चालवुन

“बाळा तुला जर 90% मार्क मिळाले

तर मी तुला अमुक-अमुक दिले“

कुणी मला सांगेल काय?

लाच म्हणजे नेमक काय?


ती तशी होती

गुंजली सनई दुर मंदिरात

दाटले अश्रु तिच्या लोचनात

काजळल्या रात्री जळते जशी ज्योती

ती तशी होती

निलनभी जसा पुनवेचा चांद

दुर किणकिणतो जेव्हा मंजिरीचा नाद

स्मरते ती अंतरात नाती

ती तशी होती

भ्रमर गुंग होतो जसा कमल दलात

हरपुन जाते ती तशी प्रणयात

साक्षात अभिसारीका ती

ती तशी होती

वाऱ्यावर विरते विराणी

तीची तशी ही कहाणी

लढली न्यायासाठी ती

पण उलटला डाव नियती

परी नाही खचली ती

ती तशी होती

देव पाहिला कुणी

कुणी न जाणे देवाच्या

काय असते मनी

देव पाहिला कुणी

देव पाहिला कुणी

राजाचा तो करतो रंक

अन रंकाचा करतो राव

कुणी न जाणे रुप त्याचे

कुणी न जाणे गाव

राम म्हणतो कुणी तर रहीम कुणी

देव पाहिला कुणी

कुठुन येतो वारा

कुठुन येतो पाऊस

कशी होते रात्र

कसा उगवतो दिवस

ऋतु बदलती क्रमाने कसे

न जाणे कुणी

देव पाहिला कुणी

निळे मंडप वर दिसे

पण दिसेना कुठेही खांब

निळा समुद्र आहे

पण नाही त्याला बांध

उदभुत नभी विज चमकते

पण तार पाहिली कुणी

देव पाहिला कुणी

मेघ दाटती सर्वत्र गगनी

कुठे पडते पाणी तर कुठे ना त्याची निशाणी

नारळातील ते गोड पाणी

देव पाहिला कुणी

कुणास कळले सांगावे मज

त्या देवाला भेटवावे मज

धरुनी त्याचे पाय

घालीन लोटांगण चरणी

देव पाहिला कुणी

************

दुनिया

ही दुनिया अजब

हिची रित निराळी

दभे कुठली गोष्ट

सहज देत नाही कुणी

देतो देतो म्हणत

झुलवतील कुणी

इथे तुमच्या कोपराला

लावतील लोणी

वा वा म्हणतील

चढवतील झाडावर

उतरायच्या वेळी म्हणतील

आता तु उतर

स्ट्रगलच्या नावाखाली

फिरवतील गरगर

तुमच्या माझ्या सारख्याला

येईल चक्कर

म्हणुन सांगतो

इथली रीत आहे निराळी

समजलात तर ठी क

नाहीतर उडाल वाऱ्यावरी

हे ओठात हासणे

हे ओठात हासणे

ती डोळयात आसवे

हे मना तरी कसे

जगायचे तुझ्यासवे

वाटले होते तुझी झाले तेव्हा

स्वप्न पूर्ण होतील माझी

दिवसांवर दिवस निघून गेले

घोर निराशा झाली माझी

नाही मिळाले मला जे हवे

वाट पहाते कधीतरी

होतील माझी स्वप्ने पुरी

याच एका आशेवरी

जळते मी पणती परी

पतंगाचे पाहते मी थवे

कधीतरी बरसेल

मेघ प्रितीचा

वर्षाव होईल

केवळ सुखाचा

तन मन दोन्ही

त्यात भिजावे

हे तर माझे स्वप्न असावे

लावणी

सख्या सजणा दिलबरा

,किती दिसान भेटला

बोला प्रेमान जरा

घेऊन कवेत मला

तुमची मर्जी हीच माझी खुशी

तुमावीन तळमळते मी बदलते कूशी

चार चौघात रिवसा मला मिरवा मला

बोला प्रेमान..

तुमचा रुबाब तुमचा तोरा

जसा सोन्यात जडला हिरा

आता दागिन्यान मढवा मला

मढवा मला

बोला प्रेमान..

ही रात अशी मखमली

नेसले मी शालू भरजरी

माझ्या नाकात नथ ही घाला

नथ ही घाला

बोला प्रेमान..

नवे वर्ष आले

जुने वर्ष सरले

नवे वर्ष आले

कळले नाही दिवस

कसे आले कसे गेले

जुन्या वर्षाला निरोप दिला

सज्ज झालो नववर्षाच्या स्वागताला

मागील वर्षातील चुकांचा आढावा घेतला

पुढील वर्षात त्या चुका करायच्या नाहीत

असा निर्णय घेतला

तसा तो मागील वर्षीही घेतला होता

सुरवातीला तो काही दिवस पेललाही होता

पण हातातील निसटणाऱ्या वाळु प्रमाणे

तो कणा कणाने निसटत होता.

सरबताच्या पेल्यातील बर्फाप्रमाणे विरघळत होता

पण यावर्षी मी ठरवलय

मनाच्या पाटीवर कित्येकदा गिरवलय

आता अशा चुका करणार नाही

या निर्णयापासुन मी परावृत्त होणार नाही

आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे

माझे वचन मी आज पाळले आहे

आता फक्त 364 दिवस उरले आहेत

अशीच वर्षामागुन वर्षे जात आहेत

काही तरी ठरवायची आणि नंतर ते मोडायच्या

सवयी लागत आहेत.

ग्रेस

असामान्यातील सामान्यपण

तुम्ही आम्ही शिकवले

कवी ग्रेस म्हणुनी तुम्हा

या जगताने ओळखले

नसाल जरी तुम्ही या जगात

अमर अहात तुम्ही कवितेच्हया रुपात

कवितेतील आर्तरुप तुम्ही आम्हा दाखविले

कवि ग्रेस म्हणुनी...

जगाला कळलेला तुमच्या

लेखणीतील सामर्थ

उमजले आम्हा त्या

ओळीतील मर्म

तुम्हा सारखा पुन्हा कुणी नाही होते

कवी ग्रेस म्हणुनी

जेव्हा जेव्हा पडतील कानी

तुमच्या कवितेतील ओळी

सुखद अनुभव येऊनी

पाणी येते आमुच्या डोळी

तुम्हाविना वाटते कवितेच्या जगात काही उणे

कवि ग्रेस म्हणुनी

सावली

असतो सदा सोबत

बनुन तुझी सावली

सांगती मनीचे भाव

तुझ्या डोळयातील बाहूली

फिरते तुझ्या सोबत कुंजवसनी

झुलते तुझ्या सोबत धुंद मनी

सुखातही दु:खातही

असते तुझ्या सोबत तुझीसावली

असतो सदा...

तुझ्या श्वासात घेतो श्वास

उबदार भासती तुझे उच्छवास

कुणी जर केला तुझा दुस्वास

रागे भरते त्याला तुझी सावली

असतो सदा..

कधी न पाहू देते अंतर

तुझा सहवास तीस निरंतर

गरज तुला लागली कधी तर

घुटमळते तुझ्या अवती भवती

असतो सदा..

गुढीपाडवा

गुढीपाडवा आला

उभारुया गुढी उंचावर

सुख, समृध्दी, आनंद

वाटू सर्वांना निरंतर

नवीन वर्षाच्या देऊ

शुभेच्छा भरभरुन

जिवन होऊदे सर्वांचे

नीरोगी-चिरतरुण

वंदन करुनी थोरांना

घेऊ आर्शिवाद

मंगलदिनी या पाडव्याच्या

नको वाद विवाद

नवे मित्र मिळवु

जुना स्नेह वाढवू

प्रेमाची स्निग्धता

मना मनात साठवु

या गुढीपाडव्याच्या

हार्दिक शुभेच्छा

मंगलदिनी सर्वांच्या

पुर्ण होऊ देत इच्छा

घरकुल

प्रत्येकाला वाटते असावे

एक घरकुल आपले

ज्यात निवांत वसावे

सुखी कुटूंब आपले

ते मिळविताना मात्र

जिवाची होते घालमेल

बजेट जमविताना

लागत नाही खर्चाचा ताळमेळ

कर्जासाठी धुंडाळल्या साऱ्या बँका

कमी व्याजदर हा आमुचा हेका

करता करता जुळवी जुळव

होतो विचार पक्का

मजल्यावर मजले चढताना

जिव होतो वरती खाली

कधी मिळणार ताबा

याची वाट पहाण्याची पाळी

शेवटी एकदा हातात

पडते घराची चावी

फर्निचर मांडण्यासाठी

होतात चर्चा भारी

शुभदिनी शुभमुहूर्ते

गृह प्रवेश होतो

सगळयांच्या इच्छापूर्तीचा

दिवस साजरा होतो.

बाजार

या बाजरात तुम्ही

सुख कसे खरेदी कराल

आमच्या अश्रुंनी हसणे

कसे खरेदी कराल

या वाटेवर तुम्ही

पुन्हा पाय ठेवु नका

या भोवऱ्यात तुम्ही

पुन्हा अडकु नका

मरणाच्या या वाडयातून

जिवन कसे खरेदी कराल

एवढया रात्री तुम्ही

का बाहेर आलात

दुख:च्या या पिंजऱ्यात

का परत आलात

या अंधरातुन तुम्ही

चांदणे कसे खरेदी कराल

प्रेमाचा जर सौदा कराल

जरा विचार करा

बाजार आहे हृदयाचा

जरा विचार करा

ही गोष्ट तुम्ही विकली

तर खरेदी कशी कराल.

कुंचला

हाती घेऊनी कुंचला निसर्गाचा

विधात्याने तुझे चित्र रेखाटले

सुर्यरश्मीचे त्यात त्याने

सुंदर गहीरे रंग भरले

तुझ्या मनमोहक पाहूनी अदा

वर्षतो बेभान मेघ कसा

पाहूनी तुला थिरकते तीची चाल

नाचते,कडाडते विसृलता धरुनी ताल

हसणे तुझे हरवते भान

स्पर्शण्या त्या वाहतो पवन

मूर्त मातीची तू

गंध माजीचा तू

निरागस चेहरा तूझा

साजीरा नखरा तूझा

जाशी जिथे जिथै तू

फुलवीशी बहर तीथे तू

वणवयापरी तुझी दाहकता

हिमशीखरांपरीतुणी शितलता

रविकिरणांपरी तुझे तेज

चांदण्यांपरी तुझी शेज

नवरसाने मूर्त तुझी साकारली

छत्तीस नखऱ्याने ती शृंगारली

लालबागचा राजा आरती

आरती गातो तुज हे भक्तांच्या राजा

श्री लालबागच्या राजा

सर्व संकटे हरती सत्वर

गुण तुझे गाता

भक्तांच्या तु पावशी नवसा

नवसाच्या राजा श्री लालबागच्या राजा

दास मी तवचरणांचा

होई शरणागत मी तुझा

लोटला सागर पाहण्या दिनांच्या राजा

श्री लालबागच्या राजा

मुख दर्शन जव घेता

हरती मम भवप,भय, चिंता

मनोकामना होती पूर्ण

कैवारी राजा श्री लालबागच्या राजा

मंगलमय जग सारे होई

आगमन तुझे होता

आरती गातो तुज हे भक्तांच्या राजा

श्री लालबागच्या राजा

काकड आरती

काकड आरती करतो

चेतवुनी भक्तीचा काकडा

उठा, उठा ही श्री लालबागच्या राजा

पूर्व दिशेला गुलाल

उधळूनी आले नारायण

कीरणांनी तुज न्हाऊ घालूनी

केली ही उधळण

मधुर स्वरांनी हाक मारती

तुज गोपी-गोपीका

काकड आरती..

समीर वाजवी मधुर बासरी

करण्या साथ आम्हा

घरटयातुनी खण करती कीलबील

आळवण्या तुम्हा

गोठयामधुनी धेनु हंबरे

जागविण्या तुम्हा

काकड आरती..

उटा उठाहो उठा उठा

लालबागचा राजा उठा उठा

राजा

राजा राजा राजा राजा

लालबागच्या राजा माझ्या

दर्शनाने तुझ्या झाला

जिव माझा वेडा पिसा

मुकूट तुझ्या शिरी शेाभे

किती छान

मोठया मोठया कानामध्ये

कुंडलेही सान

भाळी तुझ्या शोभे हा

कस्तुरी केशरी टीका

मेखला कटी तुझ्या

शोभतो भारी

रुप तुझे कसे मी

साठवु लोचनी

दर्शनाने तुझ्या झाला

जिव माझा वेडा पीसा

कव्वाली

गणपती बाप्पा मोरया

मंगलमुर्ती मोरया

ही शान कुणाची

लालबागच्या राजाची

हा भक्तांचा मेळा कुठे चालला

अजब सोहळा हा कुणी पाहीला

तो पहा तो पहा लालबागच्या राजाचा

दरबार भरला ही शान कुणाची..

तुझ्या दरबारी आलो घेऊनी मागणे मी

पण पाहुनी तुला विसरलो भान मी

तुझे भक्त सांगती कथा तुझी

नवसाने सावरले संसार किती

न मागता दिले मला सर्व तू

कशाला मला चिंता उदयाची

ही शान..

मिरवणुक निघाली विसर्जनाची

झाली गर्दी भावीकांची

राजाला निरोप द्यायला

झाली गर्दी सेवकांची

किती घेतले श्रम ना थकवा कुणा

निरोप घेताना लागतो चटका मना

कशा सांगु तुला अंतरीच्या कळा

तुझ्याचसाठी फुलला हा भक्तांचा मळा

तुला आहे जाणिव भक्तांच्या दुख:ची

ही शान कुणाची

देवांचा देव

देवांचा तू देव

लालबागचा राजा

तुझ्या चरणी ठेवतो

मी माथा माझा

नवसाच्या या देवाची

एैक गाथा

भक्त सांगती तुम्हा

त्यांच्या कथा

अंधाना तु देशी नयनांच्या ज्योती

निपुत्रीकांना देशी संतान भरशी ओटी

नाम तुझे आज सगळयांच्या ओटी

हरती सर्व चिंता तुझे गुण गाता

तुझ्या चरणी..

करीशी पूर्तता तू स्वप्नांची

जाणुनी मनीची तु इच्छा सर्वांची

आर्शिवाद घेवुनी तुझा करीता

सुरुवचात शुभकार्याची

त्वरीत प्राप्त होते आशा यशाची

जेथे ठेवा सुरवात ठेवा ही विनंती आमची

स्वर्गप्राप्त होते तुज पुजीता

तुझ्या चरणी...

पिंपळ

गावा बाहेरील वेशीवरचे

जे झाड पिंपळाचे

वाटे मला भय भारी

त्या विशाल वृक्षाचे

शाळा सुटल्यानंतरची

ती वेळ भर मध्यान्हीची

रणरणत्या उन्हात त्या

उनाड खेळ खेळण्याची

माझ्यावर जेव्हा येई पाळी

मित्रांना शोधण्याची

लक्ष वेधुनी घ्यायचे ते झाड पिंपळाचे

सायंकाळी घरी निघताना

जेव्हा घ्यायचो दप्तरे आमुची

जाता जाता नजर पडे

त्या वृक्षावर माझी

वाटे कुणीतरी विशाल मुर्ती

राक्षसा समान अंधरात त्याची

केस मोकळे सोडून जणु ते मला पहात राही

मान फिरवुनी मी मग धावत सुटे

एकदा आजोबांना सांगितले मी भय माझे

खो खो हसत त्यांनी माझे गाल ओढले

खुशाल मज ते वृक्षाठायी घेवुनीया गेले

वृक्षातळीच्या माजीचा टिळक माथी केले

आणि म्हणाले नाही वाटणार आता भय त्याचे

आणि खरोखरच भिती वृक्षाची

नंतर मला ना कधी वाटली

त्याला बिलगता ममता माझ्या

हृदयामाजी कशी दाटली

कल्पवृक्षा समान आता ते मला भासे

वाटे मला भय भारी त्या विशाल वृक्षाचे गावा बाहेरील वेशीवरचे ते झाड पिंपळाचे

जिवन

जिवनाचे आपण सारे

रंग उघळू चला

भेद मनाचे विसरुनी

एक होऊ चला

आयुष्याच्या वळणावर

येती अनेक चिंता

मिळून सारे सोडवुया

हा भवनांचा गुंता

धरतीला या स्वर्ग बनऊ

असा करु इरादा

थोरांच्या वाटेवर आपण

चालत राहू

यशाच्या शिखरावर आपुले

उंच निशाण फडकवू

मेहनतीला पर्याय नाही

हा विचार करु पक्का

अहो जॉकी भाऊ

एका रसिक श्रोत्यांची

आहे ही विनंती

नकोत नुसत्या गप्पा

हवी अवीट गाणी

माहिती तुम्ही सांगता

असली उपयुक्त जरी

लांबी संवादाची

कमी असलेली बरी

काय हवे आम्हा दया त्यास पसंती

ओघात बोलण्याच्या तुम्ही बोलता फार

कार्यक्रम एैकण्याचा

आम्हा पडतो विसर

वाटत नाही गोडी आम्ही कार्यक्रमाची

पहा जमल तर करा याचा विचार

जॉकी आहात तुम्ही

व्हा आमच्या हृदयावर स्वार

गाण्यासाठी कार्यक्रम एैकतो आम्ही

हे ध्यानात ठेवा तुम्ही

हृदय

आज हृदय माझे जाहले विशाल

त्याला पाहुन समुद्रास वाटली कमाल

अन्याय कितीही झाले

तरी घालतो मी पोटी

वेदना कितीही‍ तिव्र

तरी रहातात ओठी

सहन करतो सगळयांचे हाल

त्याला....

झाली कितीही महागाई

मी बोलतच नाही

वाढले कितीही कर

मला आवाजच नाही

चूपचाप सहन करतो सगळण्यांचा जाच

त्याला...

सगळ जरी झाले डोईजड

जिवन जगण झाले अवघड

तरीही मी मूकाट बसतो

कर्ज डोक्यावर घेऊनी जगतो

जरीही मला येत नाही राग

कारण माझे हृदय झाले विशाल

पाहूनी त्यास समुद्रास वाटली कमाल

मी अनुभवलेला पाऊस

कोकणातील पाऊस

धो धो कोसळतोय पाऊस

विजा करतायत थयथयाट

कोकणातील हा पाऊस पाहून

तंबुत आमच्या झाली घबराट

घराच्या छपरावर वाजतोय ताशा

निजेने कधीच गुंडाळलाय गाशा

मध्यरात्रा सरली तरी

आम्ही जागुन पहातोय तमाशा

वा-याने वाजले घराचे फाटक

जो तो करतोय झोपेचे नाटक

उरात माझ्या वाढलीय धकधक

बेडकांची बाहेर चाललीय पकपक

वाऱ्याच्या झोक्यावर झाडे हलतात

पक्षी घाबरुन शिरले घरटयात

थंडीने गारठली गुरे गोठयात

सारे बसले धरुन जिव मुठीत

पाऊस थांबण्याची वाट पहात

मुलगी झाली

मुलगी झाली मुलगी झाली

बांधा तोरणे वाटा मिठाई

मलगी झाली..

सुरवात झाली सुख समृध्दीची

भविष्याची काळजी मिटली

मुलगी झाली..

मुलगी शिकुन होईल मोठी

वार्धक्याची होईल काठी

मुलगी झाली..

आजारी असता घरी कुणी

सर्वांची ती घेईल काळजी

मुलगील झाली..

सवय झाली आता तिची

जाता सासरी पापणी ओली

जरी गेली ती सासरी

नजर तीची आमच्यावरी

मुलगी झाली...

जखमा

जग भुलते पाहुनी

बाहेरील रुप रंग

कुणासही कळेना

खरे माझे अंतरंग

सलतात जखमा जुन्या

काय सांगु कुणा

कशाचीही न धरली कास

कसलीही न उरली आस

कुणीही नाही आसपास

तरी होती मला हे भास

कशी आवरु कशी सावरु

माझ्या तळमळत्या मना

संसाराची स्वप्ने सारी

उलथून धरेस मिळाली

न बोलले तरी काही

पण पापणी ओली झाली

भार उचलूनी जिवनाचा

मोडला माझा कणा

सरतील हे ही दिवस

घातले समजुत मनाची

न जाणे मन हे माझे

वाट पाहते कुणाची

अश्रु गोठुन माझे

जाहल्या निरस भावना

एैक माझ्या फुला

तो- एैक माझ्या फुला

मला सांगुदे जरा

माझा जिव तुझ्यावर

किती जडला

कसे दाखवु मी तुला

ती- सांग माझ्या प्रिया

माझ्या प्रित फुला

तुझे प्रेम खरे आहे

जरा कळुदे मला

तो- जसे गगन हे विशाल

तशी माझी प्रित

जसा अथांग हा सागर

तसे माझे प्रेम

माझ्या हृदयात तुझा वास

किती आहेस तु खास

कसे दाखवु मी तुला

ती- जरा कळुदे मला

ती- तुझ्या नयनांची भाषा

कधीच कळली मला

पण मानत नाही

हा जीव माझा भोळा

तुझ्या धुंद मिठीतली

ही गोड संवेदना

जरा समजाऊदे त्याला

तो- कसे दाखवु मी तुला

आला श्रावण

आला श्रावण हा हीरवा

मन हिरवे झाले

लता, तरु, नभ हिरवे

तन हिरवे झाले

हरीत तृणांच्या मखमालीचे

गालीचे जणु हिरवे

पाणी ही हिरवे

मन हिरवे झाले

जलचर ही हिरवे

खग हिरवे झाले

चराचर हे हिरवे

मन हिरवे झाले

रिमझिम बरसतो

हिरवा श्रावण

त्यात भिजले

अमुचे तन मन

मन हिरवे झाले

श्रावण

श्रावण रिमझीमला

पडल्या श्रावणधारा

पिसाहुनही हलक्या मना

नाही उरला थारा

कधी इथे कधी तीथे

धावे मन बावरे

किती घ्यावे किती लुटावे

हे लुभावणे सोहळे

इंद्रधनुतील रंग साजीरे

नभांगणातील जणु रांगोळी

त्या सृष्टीच्या निर्मात्याची

ही सारी किमया न्यारी

आला रावण हा गहीरा

शालु हिरवा ल्याली वसुंधरा

बरसला मेघ सावळा

किती साजीरी हा सोहळा

पांडूरंगा

पांडूरंगा तुझ्या रंगात

रंगले माझे मन

सावळया तुझ्या भक्तीत

दंगले माझे मन

स्वामी तू चराचराचा स्वामी तू तीन्ही जगाचा

कळेना कुणा तुझी लीला

का असे सुख दु:खाचा फेरा

करीतो मी तुज नमन

जनी करते तुझे भजन

अर्पूनी चरणी तन मन धन

तीच्या घरची होती कामे

होती कशी दळण,कांडण

अखंड तुझे नामस्मरण

चोख्याची तु राखशी गुरे

नामा तुझ्या दर्शना धावे

का सवे संतानी ही

तुझेच रे गुण गावे

वंदीता मी तुझे चरण पांडुरंगा तुझ्या रंगात

रंगले माझे मन

तो दिप एक विझला

तो दिप एक विझला

उजळुनी कैक राती

स्वत: जळला समईपरी

उजळूनी कैक राती

हरवुनी आज गेला

श्वासातला सुगंध

उरला उदास येथे

ताला वीना मृदंग

उल्का जशी निखळली

त्या निलमंडपातली

तो दिप..

हरपला आज एक

ज्वालामुखी शब्दांचा

जाहला पोरका

समुदाय सैनिकांचा

जनसागराने दिपला

तो सूर्यही गगनी

तो दिप..

तो कुंचलाही फिरला

उमटले त्यात व्यंग

ओतुनी त्यात जीव

केले ते सजीव

हळुवार त्या क्षणांची

ती संपली कहाणी

हरवले काही क्षण

हरवले काही क्षण

जे जपायचे होते

राहिले असे काही

जे करायचे होते

ते अधुरे राहिले

काही प्रश्न अजुनी

जीवनापुढे होते

ते सारे कधीचे

सोडवायचे होते

ते प्रश्न माझे राहिले

आदर्श ज्यांना मानले

ते खुपच होते मोठे

आम्हा त्यांच्या पुढे

पठतो फार थिटे

त्यांचा कित्ते

गिरवायचे राहिले.

वर्दी

भावनांच्या गर्दीतही

भान असते

खाकी वर्दीतही

मन असते

अंगावरील खाकीला

मान असतो

त्यात वावरणाऱ्याचा

प्राण असतो

जनतेच्या हिताची जाण असते

खाकी..

समाजात त्यांचा

धाक असतो

गुंडावर त्यांचा

वचक असतो

जीवन त्यांचे धोक्याचे असते

खाकी..

जगणे यांचे थाऱ्यावर नसते

स्वत:च्या तब्बेतीकडे लक्ष नसते

कुटूंबासाठीही वेळ नसते

पण खाकी वर्दीनही मन असते.

महफील

महफीलीत माझ्या

अंधार हो झाला

जीवनाचा माझ्या

येथे अंत झाला

तुही गेलीस निघूनी

मी ही गेलो निघूनी

तू तुझ्या पावलानी

मी चार खांद्यांनी

तिथेही आवाज आहे

इथेही आवाज आहे

तीथे हसण्याचा आहे

इथे रडण्याचा आहे

फुले तिथेही आहेत

फुले इथेही आहेत

तू सजली आहेस

मला सजवले आहे

रात्र पहिली तूझीही

रात्र पहिली माझीही

तू मीठीत आहेस

मी माजीत आहे.

जागर

झाला जागर हरीनामाचा

आला राजा पंढरीचा

दिवस आहे हा भाग्याचा

क्षण असे हा सुखाचा

वारकरी आम्ही पंढरीचे

आम्हा नाही लोभ कशाचे

उपकार आम्हावर संताचे

करतो जागर हरी नामाचे

करण्या लाभ हरी दर्शनाचा

आलो आम्ही पंढरीचे

आम्हा नाही लोभ कशाचे

उपकार आम्हावर संताचे

करतो जागर हरी नामाचे

करण्या लाभ हरी दर्शनाचा

आलो दुरुनी आम्ही बापडे

आम्हा वाट ही न सापडे

तोडून भक्ससाराचे कडे

घेतो धाव विठूकडे

करण्या उध्दार या जीवाचा

हरतील इथे सर्व चिंता

जीव ना कशात गुंतला

आता ध्यास आम्हा लागला

घेण्या दर्शन हरी चरणांचा

बाध सुटला मनाचा

धन्य ती पंढरी

विठू उभा विटेवरी

कर घेऊनी कटीवरी

कृपा त्याची आम्हावरी

कीती पाहू कसा साठवू

लोचनी हा सोहळा

विठू

विठू तुझ्या राऊळात

घंटा मी वाजवली

मला तुझ्या भक्तीची

खरी ओळख पटली

पाती नयनांची लवली

मी विठूमय झाली

विठू तूझी पहीली भेट

हृदयात शिरलास थेट

पायाखाली सरकली रेत

पटकन भानावर येत

भरकटलेली जीवनाची नाव

तुझ्या मंदीरी स्थीरावली

विसरले मी देहभान

न सुचे काही काम

दिवस रात्र तुझेच ध्यान

मुखी सदा तुझेच नाम

एका क्षणात तुझीच जाहली

तुझ्या प्रेमात नाहली

विठ्ठल विठ्ठल..

चूल

चूल पेटली संसाराची

धूर झोंबला डोळयास

कवराची उपसतो रारु

तेव्हा मिळतो हा घास

काही दूरवले खुपले

तरी करेना आवाज

सहन करी सारे काही

नाही सांगे कधी काज

पोट भरी दूसऱ्याचे

स्वत: राही उपाशी

नाही बोल नशिबाले

त्याले जुंपले कामाशी

कष्टकरी माणसाचे

जग आहे कामाचे

कामावीना त्याला नाही

गोडी दुसऱ्या कशाचीही

क्षण

निसटले काही क्षण

माझ्या ओंजळीतूनी

ओंजळी भरली फिरुनी

परी क्षण ते गवसले नाही

क्षण होते ते अनमोल

क्षणात त्या गुरफटले मन

आता उरले आठवणीचे

काही सुंदर छोटे कण

शोधत फिरतो मी वणवण

हरवलेले ते काही क्षण

परी ना मिळती काही केल्या

गेलेले ते अदभूत क्षण

म्हणून जगतो मी

आता प्रत्येक क्षण

कळले मला गेला काळ

पुन्हा न ये फिरुन

प्रकाशित संध्याकाळ दि. 7 जुलै, 2014

अंकूर

मातेच्या गर्भात उमलतो

इवलासा अंकूर

हळूहळू तो फुलतो

अन पालटतो नूर

गर्भलिंग चाचणी करुन

नका त्यास चूरगळू

पुरुषांच्या या जगात

नका राक्षस बनु

आई,बहीण, मावशी

ही नातीच संपतील

सगळया विवाह संस्था

कोलमडतील

तीच नसेल तर संपून

जाईल जग सारे

तीच्या विना नाही कुणा

जनन क्षमता हे लक्षात ठेवारे

आषाढातील चांदणे

आषाढात रात्री नभी

जेव्हा दिसले चांदणे

हृदयात धस्स झाले

मन कावरे बावरे झाले

असे नव्हते झाले या आधी कधी

आषाढात असायचे सावळे जलद नभा

जोरदार बरसायच्या आषाढ धारा

हिरवा शालू नेसायची ही वसुंधरा

पण मग का असे विपरीत घडले

कशासाठी हे नभ उघडे पडले

विचारांनी होतो जीव कासावीस

कशी व्हायची पाण्याची तजवीज

बळीराजाच्या तोंडचे पळाले पाणी

डोळयात सगळयांच्याच आले पाणी

वाटते पुनहा नभ भरुन यावे

आषाढ सरींनी जग भिजुन जावे

आषाढात कधी न चांदणे दिसावे

आषाढात कधी न चांदणे दिसावे

मरण

मरण असे असावे

की सरण ही सजावे

काही मरती रोगाने

तर काही वार्धक्याने

मरणापूर्वी असे काही करावे

की करणाने ही थरथरावे

मरण स्मरण व्हावे

जगण्यास असावी किंमत

जगण्यात असावी डिफन

जण्यात मरण नसावे

मरण्यात जगणे असावे

जगणे इतिहास व्हावे

मरणाची भीती कसली

कधीही त्याने यावे

रडत आलो तरीही

जाताना हसत जावे

मरण असे असावे

की दगडाने रडावे

चाळ

चाळ म्हणजे नसतात

नुसत्या इमारती

त्यात जपलेली असते

एक सुंदर संस्कृती

येथे नसतात नुसते रहिवाशी

येथे असतात जिवाभावाची नाती

इथेच दिसते तुम्हाला

परंपरा आणि रुढी

इथेच दिसतील तुम्हाला

जुन्या चाली-रिती

स्वत:चा चाखण्या आधी येथे

शेजाऱ्यांना वाटतात पदार्थ

यात दडला असतो शेजारधर्म

इथे काही उणे पडत नाही कुणा

कारण नसतो कुणाला इथे भलताच माज

अशाच एका चाळीत एकेकाळी

रहायच भाग्य लाभले मला

म्हणुन धन्य समजतो मी स्वत:ला

रंगमंच

रंगमंच म्हणजे नसतो

नुसता देखावा

इथे अभिनयात जीव

लागतो ओतावा

नसावा टाळया आणि

हशाचा हव्यास

भुमिकेला न्याय देण्याचा

असावा ध्यास

कस लागुन तयार होते

येथे कलाकृती

प्रेक्षकांना येथे मिळते

एक वेगळीच अनुभूती

सावकाश पण हमखास

यश मिळतेच सर्वांना

सावकाश पण हमखास

नका करु घाई

यश मिळेल तुम्हालाही

सावकाश पण हमखास

जगण्यास श्वास लागतो

म्हणुन तो एकदाच

घ्यायचा नसतो

नसेच वरच्या मजल्यावर जाताना

जीना एकदम चढायचा नसतो

यश असेच मिळते

पाचऱ्या पायऱ्यांनी

सावकाश पण हमखास

आज काल आहे

टव्हेंटी टव्हेंटीचा जमाना

सगळ लागत फास्ट आपल्याला

ये भी माना

पण विकेट जाण्यासाठी

लागतो फक्त एकच बॉल

तर सेंचुरी करायला

बरेच काही बॉल

सेंच्युरी आपली ही होईल

सावकाश पण हमखास

नश्वर

जग नश्वर आहे

पिसाचा मनोरा झूलतो आहे

तो हेच सांगतो आहे

जग नश्वर आहे

वाचुन पहा ईतिहास

काहीच नसते चिरकाल

किती आले किती गेले

प्रत्येकाचा ठराविक काल

जग्गजेता म्हणविणारे

धरेस मिळाले

गडगंज संपत्ती जमविणारे

रिकाम्या हाताने गेले

जमिनी खाली गाडले

गेले मोहेंजोदडो

इश्वर चरणी प्रार्थना

पुन्हा असे न घडो

ही हेच सांगतो आहे

जग नश्वर आहे.

रजिस्टर

जन्मापासुन मागे

लागलेले एक नष्टर

रजिस्टर

जन्म झाल्यावर

करण्यात येते नोंद इथे

शाळेत नाव टाकण्यासाठी

करण्यात येते नोंद इथे

कॉलेजात जातानाही

करण्यात येते नोंद येथे

लग्न झाल्यावरही नोंद

करण्यात येथे नोंद येथे

लग्न झाल्यावरही नोंद

करण्यात येथे इथे

एवढच काय निधन

झाल्यावरही नोंद

करावी लागते येथे

जन्मापासुन मागे

लागलेले एक नष्टर

जिस्टर