व्यंजन MB (Official) द्वारा अन्न आणि कृती मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

व्यंजन

रेचीपे


© COPYRIGHTS


This book is copyrighted content of the concerned author as well as NicheTech / Matrubharti.


Matrubharti / NicheTech has exclusive digital publishing rights of this book.


Any illegal copies in physical or digital format are strictly prohibited.


NicheTech / Matrubharti can challenge such illegal distribution / copies / usage in court.

पियुष

४ वाट्या गोड ताजे दही

१०० ग्रॅम साखर

किंचित लिंबाचा रस

जायफळ पूड

केशर

प्रथम दही साखरेसह मिक्सरमधून घुसळून घ्यावे.

त्यात किंचित लिंबाचा रस, जायफळाची पूड व केशर घालून चांगले घुसळून घ्यावे.

हे पियुष ४ जणांना पुरेल.

सर्व्‌ह करताना त्यात बर्फाचा खडा टाकावा.

गोड लस्सी

४ वाट्या गोड दही

१०० ग्रॅम साखर

गुलाब पाणी

मलई

दह्यात थोडे पाणी घालून जाडसर घुसळून घ्यावे.

साखर व दोन टी—स्पून गुलाब पाणी घालून पुन्हा एकदा ते घुसळून घ्यावे व चार ग्लास मध्ये सर्व्‌ह करावे.

सर्व्‌ह करताना वरून मलई घालण्यास विसरू नये.

फ्रूट पंच

४ कप गार पाणी

५०० ग्रॅम साखर

२ कप संर्त्याचा रस

१ कप लिंबाचा रस

२ कप अननसाचा रस

साखरेत पाणी घालून १० मिनीटे उकळ्‌वावे.नंतर गार झाल्यावर सर्व रस त्यात ओतून फ्रीजमध्ये अगदी थंडगार करावा.

आयत्या वेळी त्यात अगदी थंडगार पाणी घालून सर्व्‌ह करावे.

स्ट्रॉबेरी सरबत

१ किलो साखर

४०० मिली.पाणी

अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड

पाव चमचा रासबेरी रेड कलर

अर्धा चमचा स्ट्रॉबेरी इसेंस

प्रथम १ किलो साखरेत ४०० मिली. पाणी घालावे. त्यात अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालावे. एकत्र करून ढवळावे

व गॅसवर १ उकळी येईपयर्ंत ढवळत राहावे. एक उकळी आल्यावर गॅस बंद करून व ते लिक्विड गार झाल्यावर त्यात

इसेंस व कलर घालावा. सरबत देण्याचे वेळी पाव भाग तयार केलेले लिक्विड त्यात पाऊण भाग पाणी किंवा दूध घालावे.

चिंचेचे सरबत

अर्धी वाटी चिंच

२ वाट्या चिरलेला पिवळा गुळ

१ चमचा जिरे पावडर

मीठ

चिंच रात्री भिजत घालून सकाळी कोळून व गाळून घ्यावी. त्यात गूळ मिसळून फ्रिजमध्ये ठेवावी. सरबत देताना ग्लासमध्ये

थोडेसे मिश्रण गार पाण्यात घालावे. चवीप्रमाणे मीठ व जिरे पूड घालावी.

गुलाबाचे सरबत

१ किलो साखर

४०० मिली.पाणी

१ध्२ लहान चमचा सायट्रिक ॲसिड

१ध्४ लहान चमचा रासबेरी रेड रंग

१ध्२ चमचा रोझ इसेंस

प्रथम १ किलो साखरेमध्ये ४०० मिली. पाणी टाकून त्यात १ध्२ चमचा सायट्रिक ॲसिड घालावे. सर्व एकतर करून

गॅसवर एक उकळी येईपयर्ंत टेह्वावे. गार झाल्यावर त्यात रंग व इसेंस टाकावा व गाळून बातलीत भरावे. सरबत देताना

पाव भाग तयाअ केलेले लिक्विड आणि पाऊण भाग पाणी किंवा दूध घालावे

खस चे सरबत

५० ग्रॅम खसच्या काड्या

२ कि. साखर

१ लि. पाणी

२ लहान चमचे खस एसेंस

२ लहान हिरवे रंग

१ध्२ चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट

खस काड्या पाण्यात ८—१० तास भिजवून ठेवावे. नंतर पाणी गाळून घ्या. या पाण्यात साखर घालून पाक तयार करा.

एका तारेचा पाक झाल्यावर गॅस बंद करा. पाक थंड होऊन द्या. थंड झाल्यावर त्यात रंग, एसेंस, व पोटेशियम मेटा बाय

सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्या. सर्व करण्यापूर्वी हलवून ग्लासात अगोदर पाणी, बर्फ व थोडे सरबत मिसळावे.

थंडाई

१५० ग्रॅम बदाम

२० ग्रॅम छोटी वेलची

१ लहान चमचा केशर

१ध्२ कप डांगराच्या सोललेल्या बिया

१० ते १२ काळी मिरी

१ कप गुलाबची पाने

१ध्२ कप खसखस

१ किलो साखर

१ध्२ लि. पाणी

१ चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट

बदाम पाण्यात ५ ते ६ तास भिजवून सोलून घ्यावेत. आता सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून कोरडे वाटून घ्यावे. १ध्२ लि.

पाण्यात ते मिश्रण ८ ते १० तास भिजवून ठेवावे. नंतर याला बारीक वाटून गाळून घ्यावे. यात साखर घालून गरम करावे.

पाक घट्ट झाल्यावर चुलीवर उतरून थंड करावे व नंतर पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्यावे.

सर्व करताना यात दूध टाकून वर बर्फाचा चुरा टाकावा.

कोल्ड टी

दोन लहान चमचे चहा पावडर

५० ग्रॅम हिरवी द्राक्षे

५० ग्रॅम काळी द्राक्षे

४ मोठे चमचे साखर

१०—१२ बर्फाचे खडे

तीन ग्लास पाण्यात चहा पावडर उकळवून घ्यावी.मग गॅस बंद करून उकळलेला चहा झाकून ठेवावा. काही वेळाने गाळून

त्यात साखर घालून थंड करावा.दोन्ही द्राक्षांचा रस काढून तो चहात मिसळावा. जित क्या प्रमाणात थंड हवे त्या प्रमाणात

त्यात बर्फ घाला व कोल्ड टी पिण्यास तयार.....!

अननस थंडाई

अननसाचे चौकोनी तुकडे १ वाटी

अडीच कप अननसाचे सरबत

१०० ग्रॅम बदाम

३ मोठे चमचे खसखस

६ मोठे चमचे साखर

बर्फाचा चुरा

खसखस दहा ते बारा तास आधी भिजवून ठेवावी. बदामाची साले काढून घ्यावी. ५० ग्रॅम बदाम व खसखस वाटून घ्यावी.

उरलेल्या ५० ग्रॅम बदामाचे पातळ—जाड काप करून घ्यावे. वाटलेल्या मिश्रणात पाच ग्लास पाणी घालून ते गाळून घ्यावे.

पाण्यात अननसाचे सरबत व साखर घालून हे मिक्सरमधून काढावे. त्यात अजून १ ग्लास पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून

घ्यावे व आयत्या वेळी अननसाचे तुकडे व बर्फाचा चुरा घालून अननस थंडाई पिण्यास घ्यावी.

लेमन स्क्वॅश

२ किलो लिंबू

२ किलो साखर

१ लि. पाणी

पिवळा रंग

पाव चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट

साखर व पाणी उकळा. एका तारेचा पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा. पाक थंड झाल्यावर लिंबाचा रस काढून यात मिसळा.

पिवळा रंग पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्या. एका ग्लासात पाणी व बर्फ टाका. थोडा स्क्वॅश मिसळून सर्व्‌ह करा.

लिंबाचा रस आधीपासून काढून ठेवल्यास कडवट होतो, तेव्हा ऐनवेळी टाकून मिसळा.

डाळीचे वडे

१ वाटी तुरीची डाळ

१ वाटी हरभर्याची डाळ

१ वाटी उडदाची डाळ

१ध्२ वाटी मसुराची डाळ

मीठ, मिरच्या, हिंग, हळद

२ कांदे बारीक चिरून

सर्व डाळी एकत्र भिजत घालाव्यात. ३ध्४ तासांनंतर बारीक वाटून घ्याव्यात. नंतर त्यांत मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे,

हिंग हळद घालून चांगले कालवावे.

बारीकचिरलेला कांदा घालून, लहान—लहान वडे तळून काढावेत. कांदा न खाणार्यांनी कांद्याऐवजी कोबी घालावा किंवा खूप

कढीलिंब बारीक चिरुन घालावा.

पालकचिरून ह्यात मिसळल्यासही छान लागतात. गाजरे किसून निम्म्या डाळीत घालावी व निम्म्या डाळीत इतर काही तरी

भाज्या घालाव्यात. पोट तर भरतेच, पण जीवनसत्वाने ही मौल्यवान होतात.

कचोरी

२५० ग्रा. मैदा

२ ग्रा. मीठ

सोडाबाईकार्बोनेट

६५ ग्रा. तेल

८० ग्रा. पाणी

१०० ग्रा. उडीद डाळ

३० ग्रा. तूप

२० ग्रा. आले

६ ग्रा. हिरवी मिरची

१ ग्रा. हिंग

१ छोटा चमचा धणे पावडर

१ध्२ चमचा जीरे पावडर

१ध्२ छोटा चमचे साखर

मीठ चवीनुसार

१० मिली लिंबाचा रस

२ ग्रा. कोथिंबीर

तळणासाठी तेल

मैदा, मीठ आणि सोडाबाइकार्बोनेट एकत्र मिळवावे, ६५ ग्रा. तेल टाकावे आणि चांगल्या तर्‌हेने मिळवावे पाणी ( साधारण ८० मिली)

घेऊन नरम मळावे ओल्या कपडाने झाकून एका बाजुस ठेवावे. आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर कापावी. उडदाच्या डाळीस

एक तास भिजवावे. नंतर वाटावे, कढईत तेल गरम करून त्यात वाटलेली डाळ, हिरवी मिरची, आले, हिंग आणि सर्व वाटलेले

मसाले टाकावे. संपेपयर्ंत शिजवावे, साखर मीठ आणि लिंबू मिळवावे. गॅसवर काढुन घ्यावे कोथिंबीर टाकावी आणि मिश्रणास थंड

होऊ द्यावे. मळलेल्या मैद्याचे १२ गोळे करावे. प्रत्येक गोळ्‌यास हातावर घेऊन असे पसरावे कि ते मध्ये जाड व किनारीस पातळ

असावे त्याच्या मध्ये तयार मिश्रण भरावे. किनारीस मोडुन गोल आकार देऊन हलकेच दबून चपटे करावे. कढईत तेल गरम करावे

आणि कुरकुरी होईपयर्ंत कचोरी लालसर आणि कुरकुरी होईपयर्ंत तळावे. चिंचेच्या चटणी बरोबर वाढावे.

ब्रेड पकोडे

८ ब्रेड पीस

२५० ग्रा. उकळलेल्या बटाट्याची पिट्टी

१ध्२ चमचे गरम मसाला

१ चमचा साबुत मसाला

१ध्२ काळी मिरची

१ जुडी कापलेली कोथिंबीर

१ध्२ चमचे अनारदाना

१ चमचा लाल मिरची

कापलेली हिरवी मिरची

१ तुकडा कापलेले आले

तळणासाठी तेल

चवीनुसार मीठ

पिट्ठी मध्ये मीठासहित सर्व सामग्री चांगल्या तर्हेने मिळवावी. ब्रेडचे त्रिकोणी तुकडे आणि दोन तुकड्यांच्या मध्ये मसालेदार पिट्ठी भरावी.

एका भांड्यात बेसनास घट्ट भिजवावे त्यात एक चुटकी मिरची, चवीनुसार मीठ आणि चुटकी भर खाण्याचा सोडा बर्‌यापैकी मिळवावे.

कढईत तेल गरम करावे आणि पिट्ठी भरून त्रिकोनी स्लाइसला बेसनात डुबवून तळावे. सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर नाष्ट्यास गरम गरम वाढावे.

समोसा

साहित्यरू

२०० ग्रा. मैदा

अर्धा चमचे ओवा

४० ग्रा. तूप

मीठ चवीनुसार

भरण्यासाठीरू

२५० ग्रा. बटाट्याचे तुकडे

१०० ग्रा. हिरवे मटार

१ मोठा चमचा कापलेले आले

१ मोठा चमचा कापलेली कोथिंबीर

मीठ चवीनुसार

२ मोठे चमचे तेल तळण्यासाठी

वरील आवरणाच्या साहित्यास मिळवावे व थोडेसे पाणी टाकुन वळावे ओल्या कपड्याने १०—१५ मिनीट झाकुन ठेवावे, तेल गरम करावे. जीरे टाकावे.

रंग बदलणे सुरू झाल्यावर कापलेले आले आणि हिरवी मिरची टाकावी नंतर बटाट्याचे काप, लाल मिरची, मीठ, आमचूर पावडर

आणि थोडासा गरम मसाला टाकावा व चांगल्या तर्हेने मिळवावा.

पाणी शिंपडून बटाटे शिजे पयर्ंत शिजवावे. हिरवे मटर मिळवून ५ मिनीटे शिजवावे. गॅस कमी करून कापलेली कोथंबीर टाकावी. मळलेल्या

मैद्याची छोटे—छोटे गोळे करून लाटावे. मध्ये कापावे आणि अर्धा हिस्सा घेऊन शंकुचा आकार द्यावा व पाणी लावून किनार्यास जोडावे.

भरण्यासाठी तयार केलेली सामग्री भरून थाळीत थोडेसे पीठ लावून मसाल्यास त्यात ठेवावे. कढईत तेलास मध्यम गॅसवर गरम करावे.

कुरकुरीत व लालसर होईपयर्ंत समोसा तळावा तळुन पुदिन्याच्या चटणी बरोबर गरम गरम वाढावे.

दही वडा

साहित्य वड्यासाठीरू

२०० ग्रा. १ कप धुतलेली उडीद डाळ

३ कप पाणी

१ छोटा चमच जीरे

५ ग्रा. कापलेले आले

एक छोटा चमचा मीठ

२५० ग्रा. तेल

साहित्य ( दही मिश्रणासाठी )रू

४०० ग्रा. दही

१ छोटा चमचा साखर

३ध्४ चमचे जीरे भाजलेले आणि बारीक केलेले

१ध्२ छोटा चमचे काळे मीठ

२ ग्रा. सफेद काळी मिरची पावडर

सजविण्यासाठीः

५ ग्रा. आले

५ ग्रा. हिरवी मिरची

५ ग्रा. कोथिंबीर कापलेली

एक चुटकी लाल मिरची पावडर

१ चुटकी भाजून कुटलेले जीरे

४ काडी पुदीना पाने

४० ग्रा. चिंचेची चटणी

धुतलेल्या उडदाच्या दाळीस स्वच्छ करून २ तास पाण्यात भिजवावी व काढून वाटावी. आवश्यकता असेल तर थोडे पाणी टाकावे.

एका वाटीत ठेवून मीठ, जीरे, आले, हिरवी मिरची टाकुन चांगल्या तर्हेने मिळवावे. एकसारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे. कढईत तेल गरम करावे.

थोडे थोडे करून गोळे ओल्या हाताने टाकावे लालसर भुरे होईपयर्ंत तळावे ( तळण्या अगोदर गोळ्‌याच्या मध्ये अंगठ्याने दाबून छिद्रासारखे बनवावे) व काढुन द्यावे तयार वड्यांना पाण्यात नरम होईपयर्ंत भिजवावे फेटलेल्या दह्यात साखर, मीठ, जीरे पावडर, काळे मीठ आणि सफेद काळी मिरी टाकावी व चांगल्या तर्हेने मिळवावे.

वड्यांना पाण्यातून काढुन हळुच निथळून अतिरिक्त पाणी काढुन दह्यात मिळवावे.१०—१५ मिनीट एका बाजुस ठेवावे. थंड करुन आले, हिरवी मिरची, कोथंबीर लाल मिरची पावडर, जीरे पावडर, पुदिना पाने आणि चिंचेची चटणी सजवून वाढावे.

सानतंग न्यूडल्स

१ध्२ कप बारीक कापलेले गाजर

१ध्२ कपलेली काकडी

१ध्२ कप कापलेली शिमला मिरची

१ बारीक कापलेला कांदा

६ तुकडे मशरूम

१ध्२ कप टोफु पनीर किंवा साधा पनीर

२०० ग्रा. सपाट न्यूडल्स (शेवया) जर उपलब्ध नसतील तर गोल न्यूडल्स चा उपयोग करू शकतात

न्यूडल्सला उकळते वेळी १ चमचा तेल टाकावे अणि जेव्हा उकळतील तेव्हा एका भांड्यात टाकावे.

आता भाज्यांना छोट्या छोट्या चौकोन तुकड्यांमध्ये कापावे आणि फ्राई कढईत तेल टाकुन फ्राय करावे. यात २ कप पाणी, चवीनुसार मीठ आणि काळी मिरची पावडर टाकावे.

आता यात २ चमचे सोया सॉस टाकावे घट्ट बनविण्यासाठी कार्नफ्लोर पेस्ट चा उपयोग कराव एक प्लेट मध्ये न्यूडल्स काढुन आणि वरून भाज्यांच्या मिश्रणास टाकावे.

तयार झाल्या मजेदार सानतंग न्यूडल्स स्वतः ही खा आणि इतरांस ही खाऊ घाला.

रवा इडली

१ध्२ किलो रवा

१ लहान चमचा मीठ

१ध्२ लहान चमचा मोहरी

१०—१२ कढीपत्त्याची पाने

३०० ग्रॅम आंबट दही

१ लहान चमचा खाण्याचा सोडा

तेल एका कढईत तेल गरम करून त्याच्यात मोहरी व चिरून कढीपत्ता व रवा टाका. थोडासा भाजून गॅस बंद करा.

गार झाल्यावर एका भांड्यात रवा दहीत भिजवा. मीठ टाकून १ तास झाकून ठेवा. मिश्रण जास्त पातळ असू नये. इडली पात्रांना तेल लावून ठेवा.

एका वाटीत तेल गरम करून त्याचे १ लहान चमचा खाण्याचा सोडा टाका व गरम करा. हे रव्याच्या मिश्रणात टाकून लवकर—लवकर हलवा म्हणजे मिश्रण फुलून जाईल.

आता हे मिश्रण पात्रांमध्ये टाका. प्रेशर कुकरमध्ये १ ग्लास पाणी टाकुन उकळी घ्या. इडली पात्र याच्यात ठेवा झाकण शिटी लावल्याशिवाय बंद करा व झाकण १० मिनीटांनी उघडा.

इडली खोबर्याच्या चटणी व सांबर बरोबर वाढा.

मेथीचे गोड अप्पे

२ वाट्या तांदूळ

२ लहान चमचे मेथी दाणे

आवडीनुसार गूळ

चवीपुरते मीठ

किंचित खाण्याचा सोडा

आदल्या दिवशी सकाळी तांदूळ आणि मेथी भिजत घालावी (जसे आपण ईडलीचे साहित्य पाण्यात भिजत घालतो तसे). रात्री ह्या मिश्रणात आवडीनुसार गूळ घालून किंचित जाडसर (ईडलीच्या पीठासारखे) वाटावे व एका भांड्यात ठेवावे.

त्यामध्ये चवीपुरते मीठ व सोडा टाकून चांगले ढवळुन झाकून ठेवावे. दुसर्या दिवशी सकाळी अप्प्याचे भांडे धुवून कोरडे करुन त्याला तेल लावून ठेवावे.

न्याहरीच्या वेळी अप्प्याचे भांडे गॅसवर ठेवावे, गॅस मोठा करून भांडे गरम करुन घ्यावे. गरम झाल्यावर गॅस मंद ठेवावा. अप्प्याच्या भांड्याच्या गोल गोल वाटीमध्ये थोडं—थोडं तेल ओतावे व त्यामध्ये वरील पीठ ओतावे.

भांड्यावर झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी चांगले शिजल्यावर ते गोल अप्पे त्यामध्येच परत उलटावेत व दोन मिनीटे दुसरी बाजू भाजून ते भांडयातून काढावेत.

ह्याच कृतीप्रमाणे सर्व पीठांचे अप्पे भाजून घ्यावेत आणि गरमागरम अप्पे खोबर्याच्या ओल्या चटणीसोबत किंवा सांबारासोबत खावेत.

सुकी उडीद डाळ

१ कप धुतलेली उडीद डाळ

१ कापलेला कांदा

१ मोठा चमचा तेल

३ध्४ चमचे मीठ

१ध्२ चमचे हळद

२ मोठी वेलची

१ चमचे जीरे

१ जुडी कापलेली कोथिंबीर

२ हिरवी मिरची

१ कापलेला टोमॅटो

१ध्२ चमचे गरम मसाला

डाळीस धुवुन ४ कप पाण्यात हळद व मीठाबरोबर शिजवून द्यावे आणि गाळून पाणी अलग करावे.तेल गरम करून जीरे टाकावे नंतर वेलची टाकून १ मिनीट फ्राय करावे.कांदा टाकुन लालसर फ्राय करावा नंतर डाळ, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर व गरम मसाला टाकुन ३—४ मिनीट गॅस कमी करून शिजवावे आणि उतरवून घ्यावे.

स्वीट कॉर्न उपमा आणि सॅंडविच

२२५ ग्रॅम मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न)

हिरव्या मिरच्या

१ टी स्पू. लिंबाचा रस

१ध्२ वाटी खवलेले नारळ

बारीक चिरलेली कोथिंबीर

चवीपुरती साखर

हळद

मीठ

फोडणीसाठी तेल

कडीपत्त्याची पाने

मोहरी

जीरे

हिंग

बटर किंवा तूप

ब्रेड

मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न), हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून भरडुन घ्या. गॅसवर भांडे ठेवून त्यात थोडं तेल टाकून त्यात जीरे—मोहरी, चिरलेल्या हि. मिरच्या, कढीपत्त्याची पाने, हिंग टाका. नंतर त्यात भरडलेलं मिश्रण टाकून चांगले हलवून घ्या.

भांड्यावर झाकण ठेवून ३—४ मिनीटे ठेवा. डिशमध्ये काढून कोथिंबीर व खवलेले नारळ पेरा. मक्याचा चवदार उपमा तयार..!

हा तयार उपमा २ ब्रेड स्लाईसेसच्या मध्ये भरुन बटर किंवा तूप लावून टोस्टरमध्ये भाजुन घ्या व गरमागरम सॉस किंवा चटणीसोबत खायला द्या. हे तयार आहे तुमचे स्वीट कॉर्न सॅंडविच.

दुधी भोपळ्‌याचे धिरडे

१ध्४ कि. दुधी भोपळा

आले, हिरवी मिरची, लसुण यांची पेस्ट

मीठ

२ वाट्या रवा

२ चमचे तांदळाचे पीठ

प्रथम दुधी किसून घ्यावा व वरील सर्व मिश्रण एकत्र करावे आणि डोसाच्या पिठाप्रमाणे मिश्रण करुन घ्यावे.

नंतर निर्लेप तव्यावर पातळ धिरडे घालावेत.

गरमागरम टोमेटो सॉसबरोबर सर्व्‌ह करावे

ज्वारीचे धपाटे

३ वाट्या ज्वारी पीठ

१ वाटी कांदा किसून

१ टी स्पून लसूण

१ टे. स्पू. प्रत्येकी दाणेकूट व तीळकूट

१ध्२ वाटी कोथिंबीर

तिखट

मीठ

तेल

ज्वारीचे पीठ चाळून घ्या. तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र मळावे.पातळ भाकरीप्रमाणे थापावे. गॅसवर तवा गरम करत ठेवावा.तवा तापल्यावर ही धपाटी तेल टाकून लालसर होईपयर्ंत भाजावे. तयार आहे गरम गरम धपाटी..! दही किंवा चटणी सोबत खावीत. ही धपाटी ७—८ दिवस टिकतात, आणि ही प्रवासासाठी अधिक उपयुक्त.

चीझ व भाजीचा पराठा

१ कप मैदा

१ कप कणीक

६ टे. स्पून डालडाचे मोहन

१ध्४ कप किसलेले चीझ

१ लहानसा फ्लॉवर

१ गाजर

१ वाटी मटारचे दाणे

१ कांदा

३ध्४ हिरव्या मिरच्या

लहानसा आल्याचा तुकडा

२ध्४ लसूण पाकळ्‌या

थोडा पुदिना

कोथिंबीर

सर्व भाज्या किसुन घ्या. मटारचे दाणे व भाज्या थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्याव्यात. नंतर सर्व मिश्रण घोटून घ्यावे. पाणी अजिबात राहू देऊ नये.

नंतर त्यात मीठ, मिरच्या, आले, लसूण, पूदिना वगैरे घालून मिश्रण ढवळावे, चीझही घालावे. नंतर मिश्रण थंड होऊ द्यावे.

पिठात थोडे मीठ व मोहन घालून पोळ्‌यांच्या कणकेसारखी कणीक भिजवावी.

फुलक्याच्या आकाराच्या दोन पोळ्‌या करुन, मधे सारण पसरुन, कातण्याने कापून परोठे शेकावे. बाजूने तूप सोडावे.

उलटताना फार जपून व बेताने उलटावेत. हे परोठे चवीला फारच सुंदर लागतात.

रताळ्‌याची कचोरी

१ मूठ चिरलेली कोथिंबीर

१ वाटी खवलेले खोबरे

४—५ हिरव्या मिरच्या

५० ग्रॅम बेदाणा

मीठ

साखर

२५० ग्रॅम रताळी

१ मोठा बटाटा

थोडेसे मीठ

रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून, हाताने कुस्करून पुरणयंत्रातून काढून घ्यावेत.

त्यात थोडे मीठ घालावे. १ध्२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे.

रताळ्‌याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्या ठेवाव्यात. नंतर आयत्या वेळी वर्याच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात.

गरमगरम खायला द्याव्या. फार सुंदर लागतात. उपवासाला एकदम चांगल्या.

दुधी भोपळ्‌याचा पराठा

३०० ग्रॅम दुध्या भोपळा

३ वाट्या कणीक

१ चमचा तिखट

१ध्२ चमचा हळद

१ चमचा मीठ

२ चमचे धणे—जीरे पूड

१ चमचा गरम मसाला

भोपळा किसुन घ्यावा. पाणी पिळून बाजूला काढून ठेवावे.नंतर सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे. पीठ घट्ट असावे.जरुर वाटल्यास भोपळ्‌याचेच काढलेले पाणी वापरावे.नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करुन दोन्ही बाजूने शेकावेत व नंतर बाजूने तूप सोडावे.

ब्रेडची कचोरी

स्लाईस ब्रेड

१ नारळ

१ १/२ कप साखर

७—८ वेलदोडे

१/२ चमचा रोझ इसेन्स

थोडासा बेदाणा

नारळ खवून साखर घालून त्याचे सारण तयार करुन घ्यावे व साखर विरघळेपयर्ंत शिजवून घ्यावे.त्यात वेलची पूड, बेदाणा व रोझ इसेन्स घालून गार होऊ द्यावे.ब्रेडच्या स्लाईसच्या कडा सुरीने काढून टाकाव्यात. नंतर एकेक स्लाईस पाण्यात टाकून हाताने दाबून पाणी काढून टाकावे.नंतर वरील सारण १ चमचा घेवून ब्रेडच्या स्लाईसवर ठेवून हाताने सर्व कडा जवळ आणून कचोरीसारखा गोल आकार द्यावा.अशा सर्व कचोर्या तयार करुन ताटात ठेवाव्यात व अगदी आयत्या वेळी तळाव्यात.फार सुंदर लागतात.

भेळ—पोहे

५—६ वाट्या पातळ पोहे

आतपाव खारे दाणे

५० ग्रॅम शेव

३—४ हिरव्या मिरच्यांचे तुकडे

अर्धे लिंबू

२ मध्यम कांदे

थोडी कोथिंबीर

खोबरे

साखर

मीठ

तुपाची हिंग—जिरे घालून फोडणी करावी. (हळद घालू नये.)नंतर त्यात पोहे घालून मंदाग्नीवर परतावेत.चांगले कुरकुरीत झाले की उतरावेत.कांदा बारीक चिरावा. नंतर सर्व एकत्र करुन भेळेसारखे कालवावे.ही भेळ चवीला अतिशय सुंदर लागते. चुरमुरे न मिळाल्यास पोहे वापरुन भेळ करावी.

ब्रेड रोल्स

स्लाईस ब्रेड

उकडलेले बटाटे

मीठ

हिरव्या मिरच्या

कोथिंबीर

थोडे आले

ब्रेडच्या कड्या कापून घ्या. ऊकड्‌लेले बटाटे सोलून घ्या. नंतर किसणीवर किसा.त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व मीठ घालावे. थोडी कोथिंबीर घालून सारण तयार करावे.उथळ पातेलीत पाणी घेवून त्यात एकेक स्लाईस टाकाव्यात.नंतर दोन्ही हाताच्या तळव्याने दाबून पाणी काढून टाकावे. त्यावर सारण घालून गुंडाळी करावी. कडा बंद कराव्यात.ब्रेड ओला झाल्यामुळे छान गुंडाळी होते. नंतर तव्यात तूप टाकून त्यात हे रोल्स तळून काढावेत.छान कुरकुरीत होतात.हे गरमागरम रोल्स सॉस सोबत सर्व्‌ह करावेत.

भाजीचे रोल्स

साहित्य रू

३ कप मैदा

२ कप दूध

२ अंडी

चवीपुरते मीठ

सारणासाठी भाजी रू

२—३ गाजरे

१ध्२ वाटी मटारचे दाणे

७—८ बटाटे

२ कांदे

मीठ

मिरची

आले

लसूण

कोथिंबीर

अर्धे लिंबू

बटाट्याची साले काढून बारीक फोडी कराव्यात. गाजर व कांदाही बारीक चिरुन घ्यावा. आले, लसूण, मिरच्या वाटून घ्याव्यात.

थोड्या डालडयावर कांदा बदामी रंगावर येईपयर्ंत परतून घ्यावा. नंतर त्यात बाकीच्या भाज्या घालून अगदी थोडे पाणी घालून, शिजवून घ्याव्यात.

भाज्या मऊसर शिजल्यावर सर्व पाणी आटवून घ्यावे. नंतर त्यात मीठ, वाटलेला मसाला, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून भाजी थाळीत काढून ठेवावी.

दुधात अंड्यातले पिवळे घालून फेटावे. नंतर त्यात मैदा घालून पीठ तयार करावे. मीठ घालावे. एक तासभर मिश्रण तसेच ठेवावे.आयत्या वेळी अंड्यातले पांढरे खूप फेसून त्यात घालावे व डोशाप्रमाणे लहान लहान डोसे करावेत.प्रत्येक डोशावर वरील भाजी मध्यभागी १ डावभर घालून जरा पसरुन त्याची डोशाप्रमाणे घडी घालावी.दोन्ही कडेची टोके पुन्हा दुमडुन चौकोनी घड्या घालून सर्व डोसे ठेवावेत. आणि सॉससोबत खाण्यास द्यावे.

अंडा पराठा

२ वाट्या कणीक

मीठ

४ टेबलस्पून मोहनासाठी पातळ डालडा

३—४ अंडी

१ कांदा

४—५ हिरव्या मिरच्या

थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर

१ध्२ चमचा गरम मसाला

मीठ

अंडी फोडुन घ्यावीत. थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा. नंतर त्यावर फोडलेली अंडी, मीठ, मिरच्यांचे तुकडे, मसाला घालून हलवावे.

अंड्याचे मिश्रण शिजल्यासारखे वाटले की उतरवावे. कोथिंबीर घालावी व थंड होऊ द्यावे.

कणकेत मीठ व डालड्याचे मोहन घालून घट्ट भिजवावी. १ध्२ तास पीठ झाकून ठेवावे. नंतर त्याच्या दोन पुर्या लाटून घ्याव्यात.

एकावर वरील अंडयाचे मिश्रण थोडे पसरुन त्यावर दुसरी पुरी ठेवावी.

कडा जुळवून घ्याव्यात व जरा लाटावे. नंतर तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्यावी व बाजूने तूप सोडावे.

टोमॅटोचा मसाला डोसा

१२५ ग्रॅम मैदा

१ अंडे

१ मोठा टोमॅटो

२—३ हिरव्या मिरच्या

१ १ध्२ कप दूध

१ध्४ चमचा मीठ

थोडेसे किसलेले चीझ

मैदा व मीठ एकत्र करुन त्यात अंडी फोडून घालावीत व दूध घालून पीठ भिजवून ठेवावे. जरुर वाटल्यास थोडेसे पाणी घालावे. अर्धा तास पीठ भिजवून ठेवावे. टोमॅटो बारीक चिरावेत. चीझ किसून घ्यावे. नंतर टोमॅटो, मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या व चीझ एकत्र करुन ठेवावे. सपाट तव्याला तेल किंवा तूप लावून त्यावर कपाने पीठ ओतून डोसा घालावा. झाकण ठेवू नये. डोसा शिजला की बाजूने तेल सोडून जरा कुरकुरीत करावा. मध्यभागी टोमॅटोचे थोडेसे मिश्रण भरुन डोशाप्रमाणे घडी घालावी व गरमगरम सर्व्‌ह करावा. चवीला फार छान लागतो.

कांचीपुरम इडली

चदोन वाट्या उकडा तांदूळ

च१ वाटी उडीद डाळ

चअर्धी वाटी चणा डाळ

चपाव चमचा हिंग

च१ चमचा काळे मिरे

च१ टी. स्पून जिरे

चथोडे आले किसून

चथोडा कढीलिंब

चथोडे काजूचे तुकडे

चचवीनुसार मीठ

तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे. जिरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ पिठात घाला. थोडे तेल गरम करुन काजू तुकडे व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला. आले किसून टाकून पीठ खूप फेटावे. पीठ फेटून स्टॅंडवर इडल्या वाफवून घ्याव्यात, चटणीबरोबर सर्व्‌ह कराव्यात.

कोथिंबीरीचे वडे

२ जुड्या कोथिंबीर

च८ हिरव्या मिरच्या

च५—६ लसूण पाकळ्‌या

च१ इंच आले बारीक वाटून

च१ वाटीभर डाळीचे पीठ

च२ टेबलस्पून बारीक रवा

चमीठ

च१ चिमूट खायचा सोडा

चतळण्याकरता तेल

कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरणे. एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, मिरची, आले, लसूण वाटलेली गोळी, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवणे. कढईत तेल तापवून तयार पिठाचे चपटे वडे करून खरपूस तळावेत.

आलू पराठा

च२ वाट्या कणीक

चअर्धा चमचा मीठ

च२ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन

च३ मोठे उकडलेले बटाटे

च७—८ लसूण पाकळ्‌या

च५—६ हिरव्या मिरच्या वाटून

च१ चमचा अनारदाणा पावडर किंवा आमचूर पावडर

चमीठ

चसाखर चवीनूसार

चपराठे तळ्‌ण्याकरता तेल अथवा तूप

कणीक कडकडीत तेलाचे मोहन, मीठ, साखर घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी.

बटाटे गरम असतानाच सोलून किसणीला तेलाचा हात लावून किसून घ्यावेत, किंवा पुरणयंत्रातून काढून घ्यावेत.

किसलेल्या बटाट्यात वाटलेली लसूण, मिरची, साखर, मीठ, अनारदाणा पावडर किंवा आमचुर पावडर घालून गोळा तयार करावा.

भिजलेली कणीक हातानी मळून घ्यावी व तिचे आठ समान भाग करावेत. बटाट्याच्या सारणाचेपण तेवढेच सारखे भाग करावेत.

कणकेच्या एका भागाची हाताने खोलगट वाटी करावी. त्यात सारणाची एक लाटी भरून लाटीचे तोंड सर्व बाजूंनी बंद करुन हलक्या हाताने गोल पराठा पोळपाठावर पिठी लावून लाटावा.

जाड अथवा नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा रिफाइंड तेल टाकुन दोन्ही बाजूंनी खमंग परतावा.

झटपट रवा डोसा

डोसे करायच्या आधी

२ तास

१ वाटी बारीक रवा

१ वाटी तांदळाची पिठी

१ वाटी मैदा

१ वाटी आंबट दही घालुन सरसरीत भिजवावे.

त्यात २ टेबलस्पून कडकडीत तेल व चवीला मिठ घालावे.

डोशाकरता मिठाचे पाणी लावून तयार केलेल्या तव्यावर डावाने पातळ धिरड्याप्रमाणे डोसा घालावा व पाव चमचा तेल सोडून हलकेच काढून चटणीबरोबर खाण्यास द्यावा.

ब्रेडची भजी

चब्रेड

चबेसन

चलाल तिखट

चहिंग

चहळद

चचिरलेली कोथिंबीर

चमीठ

प्रथम एका भांड्यात बेसन घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, तिखट, हळद, हिंग व चिरलेली कोथिंबीर घालावी. त्यात पाणी घालावे. मात्र पीठ जाडसर राहील, याची काळजी घ्यावी. नंतर ब्रेडचे त्रिकोणी तुकडे कापून त्या पिठामध्ये बुडवावे व तळून घ्यावे. चटणी किंवा सॉससोबत खाण्यास द्यावी.

पोळ्‌यांचा चुरमा

च५—६ पोळ्‌या (चपात्याध्भाकर्या)

च१ कांदा

चतिखट

चमीठ

चहळद

च१ चमचा साखर

चकडीपत्ता

चजीरे

चमोहरी (फोडणीसाठी)

पोळ्‌यांचा बारीक चुरा करावा (अगदी बारीक होण्यासाठी मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालेल.) त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे.कांदा बारीक चिरावा.

पातेल्यात तेल टाकून त्यात हिंग, कडीपत्ता, जीरे. मोहरीची फोडणी द्यावी. नंतर त्यात कांदा टाकावा व मऊ शिजवावा. त्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवावे.कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ टाकून चांगले परतून घ्यावे.

त्यामध्ये सर्व चुरमा टाकावा व चांगला परतून घ्यावा. वरुन साखर व बारीक चिरुन कोथिंबीर पेरावी व झाकण ठेवून २—३ मिनीटे शिजवावे व गरमागरम वाढावे.

पोळ्‌या शिल्लक राहिल्या असल्यास अशा प्रकारचा चुरमा चांगला लागतो. त्यामूळे शिल्लक पोळ्‌या टाकून द्याव्या लागत नाहीत. ह्यात तुम्ही शेंगदाणे, शिल्लक भात किंवा इतर आवडीच्या वस्तू घालून चव वाढवू शकता.

मेथीचे गोळे

१ मध्यम आकाराची मेथीची जुडी

१ वाटी डाळीचे पीठ

५—६ हिरव्या मिरच्या

थोडी कोथिंबीर

१ध्२ चमचा धणे कुटून

मीठ

हळद

मोहनासाठी तेल

मेथी बारीक चिरुन घ्यावी व धुवून चाळणीवर निथळत ठेवावी. मिरच्या बारीक चिराव्यात.नंतर सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करावेत व किंचित लांबट आकार द्यावा.नंतर कुकरमध्ये चाळणीला तेलाचा हात लावून त्यावर हे गोळे वाफवून घ्यावेत.गार झाल्यावर कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करुन त्यावर परतावेत.फार छान लागतात. लहान मुलांनाही फार आवडतील.

मिक्स दाल पराठा

३ वाट्या कणीक

१ध्४ वाटी बारीक रवा

मीठ

१ध्२ तेल

ओवा

१ध्४ वाटी प्रत्येकी तूर, चणा, मसूर, हरभरा डाळ

१ टे.स्पून आले—लसूण—मिरची पेस्ट

तिखट

मीठ

अनारदाणाध्आमचूर पावडर

कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून १ तास ठेवावे.नंतर मळून एकसारखे गोळे करावे. डाळी भिजवून २—३ तासांनी रवाळ वाटाव्यात.तेल तापवून ओव्याची फोडणी करावी.

डाळीचे मिश्रण घालून परतून २ वाफा आण्याव्यात. त्यात आले—लसूण—मिरची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, ग. मसाला घालून परतावे.आमचूर पावडर घालून उतरावे.

कणकेचे व सारणाचे सारखे भाग करुन पराठा करुन लाटावे.हे पराठे पौष्टिक व चवदार होतात.

मजेदार कटलेट्‌स

१ वाटी तयार भात

१ वाटी सुक्या वाटाण्यांची उसळ

४ ब्रेडचे स्लाईस

१ वाटी वाफवलेला कोबी

२ मोठे कांदे

१ इंच आले

४ध्५ हिरव्या मिरच्या

२—३ डाव चण्याच्या डाळीचे पीठ

थोडा रवा

मीठ

कांदा बारीक चिरुन घ्यावा व थोड्या तेलावर परतवून घ्यावा. आले व मिरच्याही बारीक चिराव्यात.

नंतर रवा सोडून इतर सर्व वस्तू एकत्र कराव्यात व त्याचे लिंबाएवढे गोळे तयार करावेत.

एका छोट्या डिशमध्ये थोडासा रवा टाकून वरील तयार केलेल्या पिठाचा एक गोळा त्यात ठेवून बोटांनी जरा जरा चपटा करावा. वरही थोडा रवा घालावा व कागदावर उपडे करावे म्हणजे छान गोल आकाराचे कटलेट तयार होईल.त्याच्या कडाही रव्यात घोळाव्यात.

३—४ कटलेट तयार झाली की तव्यावर १ डाव तेल टाकून तांबूस रंगावर तळून घ्यावीत.चिंचेच्या चटाणीसोबत खावीत.

फार छान लागतात.वाट्याण्याची उसळ नसल्यास इतर कुठलीही उसळ चालेल.

ब्रेडचे गुलाब जामून

१०—१२ स्लाइस ब्रेड

१ध्२ वाटी दूध

१ वाटी पाणी

पाऊणे दोन वाट्या साखर

वेलची पूड

तळण्यासाठी तेल

ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून घ्या. ब्रेड कुस्करा.त्यामध्ये थोडेसे दूध घालून ब्रेड मळून घ्या.नंतर साखर व पाणी एकत्र करुन साखर विरघळेपयर्ंत उकळी आणा आणि पाक तयार करुन घ्या.नंतर मळलेल्या ब्रेडचे छोटे छोटे गोळे करुन मंद आचेवर तळून घ्या.गरमागरम गोळे पाकात घाला.तयार आहेत ब्रेडचे गुलाब जामून.

हिरवे कबाब

पालकाची ५ मोठी पाने

५० ग्रा. मेथी (बारीक कपलेली)

५० ग्रा. गाजर (बारीक कापलेले)

५० ग्रा. फ्रेंच बीन्स ( बारीक कापलेली)

५० ग्रा. मटार ( वाटलेले )

२०० ग्रा. बटाटे ( शिजलेले )

४ हिरव्या मिरच्या

५ ग्रा. जीरे पावडर ( भाजलेले )

१०० ग्रा. आले

५ ग्रा. लसूण

२० ग्रा. कांदा

चवीनुसार मीठ

ब्रेड क्रम्ब्स आवश्यकतेनुसार

पालक, मेथी, गाजर, फ्रेंच बीन्स, मटार, उकळलेली बटाटे, हिरवी मिरची, जीरे पावडर, आले, लसूण, कांदा, मीठ इ. मिळवून एक मिश्रण बनवुन घ्या.

ह्या मिश्रणाचे छोटे—छोटे गोळे बनवावे. दोन्ही बाजूस चांगल्या तर्हेने ब्रेड र्क्म्‌ब्स लावल्यानंतर चांगल्या तर्हेने तळावे परंतु लक्षात ठेवावे इतकेच तळावे कि त्याचा रंग हिरवाच राहील, आता आपल्या मनपसंद चटणी बरोबर खावे.

व्हेज ब्रेड

ब्रेड

टोमॅटो

टोमॅटो केचप

काकडी

स्वीट कॉर्न

चाट मसाला

शेव

एका ब्रेडच्या स्लाइसवर काकडी व टोमॅटोचे गोल काप ठेवा. नंतर ब्रेडच्या कडांवर अगदी थोडा केचप लावा.मधोमध डाळिंबाचे दाणे, स्वीट कॉर्न दाणे टाका.त्याचबरोबर आवश्यकतेनुसार चाट मसाला आणि शेव टाका. नंतर दुसर्या ब्रेडची स्लाइस त्यावर ठेवा.टोस्टरमध्ये भाजा. गरमागरम सॉस सोबत खा.

बटाटा वडा

अर्धा किलो बटाटे

४ हिरव्या मिरच्या

कढी पत्ता

२ चमचे मोठे कापलेली कोथींबीर

अर्धा चमचा मोहरी

पाव चमचा हिंग

पाव चमचा हळद

१ चमचा तेल

१ लिंबू

मीठ

१ कप बेसन

१ध्२ चमचा धणा पावडर

चिमुटभर सोडा

तळण्यासाठी तेल

बटाटे उकडून सोलून घ्या व कुसकरून ठेवा. आले, हिरवी मिरची, कोथिंबीर यांचे बारीक तुकडे करा. एक चमचा तेल गरम करा. हिंग, आले व मोहरी टाका.

तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद टाका, आता बटाटे मिसळून चांगले हलवा. थोडी साखर, लिंबू रस व मीठ टाका. चुली वरून उतरून घ्या.थंड झाल्यावर छोटे—छोटे लाडू सारखे गोळे करा.

बेसन, धणा पावडर, एक चमचा गरम तेल व मीठ टाकून लापशी बनवा. जाडसर लापशी तयार झाल्यावर तळण्यासाठी तेल गरम करा. बटाट्याचे गोळे बेसनात बुडवून तेलात तळा. सोनेरी लाल झाल्यावर काढून घ्या व गरम—गरम वाढा.

फळांचा रायता

२ कप दही

४ लहान चमचे साखर पावडर

१ संत्री

१ध्२ कप सोललेले डाळिंब

१ध्२ कप द्राक्षे

१ लहान सफरचंद

संत्री सोलून घ्या. सफरचंद सोलून लहान चौकोनी चिरा.

दही रवीने एकत्र करा. साखर व सर्व फळे टाकून एकत्र करा.

फ्रिज मध्ये ठेवा व गार वाढा.

मेदूवडा सांभर

२ वाटी उडीद डाळ

१ध्२ वाटी हरभरा डाळ

१ध्२ वाटी तांदूळ

१ लहान चमचा मीठ

२ हिरव्या मिरच्या

१ तुकडा आले

तेल तळण्यासाठी

उडीद डाळ, हराभरा डाळ व तांदूळ एका भांड्यात एकत्र १० तास भिजत ठेवा. नंतर धुऊन वाटून घ्या. मिश्रण जाडसर ठेवा. नाहीतर वडे तळायला अवघड जातील.

या मिश्रणात हिरवी मिरची, आले वाटून टाका. मीठ टाकुन व्यवस्थित एकत्र करा. हातावर थोडेसे तेल लावून मिश्रण टाका व चपटा वडा तयार करा.

याच्या मधोमध एक खड्डा करा व गरम तेलाच्या कढईत सोडा लाल—लाल तळून घ्या. सांभर व खोबर्याच्या चटणी बरोबर वाढा.

उपवासाचे डोसे

१ वाटी मुगाची डाळ

पाव वाटी साबुदाणा

२—३ मिरच्या

पाव चमचा जीरे

मीठ चवीनुसार

प्रथम मुगाची डाळ आणि साबुदाणा धुवून घ्या, नंतर एका भांड्यात थोड्या जास्त पाण्यात २—३ तास भिजवत ठेवा.

भिजल्यावर त्यामध्ये मिरच्या, जीरे व मीठ घालुन वाटून घ्या.

आणि नॉनस्टिक तव्यावर पसरवून कुरकुरीत डोसे काढावेत.

नाचणीचा उपमा

१ वाटी नाचणी

१ टी.स्पून मेथी

१ टे.स्पून मोडाचे मूग

१ टे.स्पून गाजर—टोमॅटो प्रत्येकी

२ बारीक चिरुन मिरच्या

हिंग

मोहरी

आलं—लसूण पेस्ट

तेल

जीरे

हळद

कढीपत्ता

कोथिंबीर

लिंबूरस

नाचणीला भिजवून मोड आणून वाफवावे. थोड्या तेलात मोहरी, जीरे घालून फोडणी घालावी.

यात मिरच्या, कढीपत्ता घालावा. आलं—लसूण पेस्ट घालवी. गाजर किसून, टोमॅटो चिरुन, मूग, मेथ्या सर्व घालून पाच मिनीटे शिजवावे.

२—३ वाफा आल्या की नाचणी घालावी. मीठ व लिंबूरस घालून ढवळून परत २ मिनीटे गॅसवर ठेवावे.

गरम गरम उपम्यावर कोथिंबीर व वाटल्यास शेव घालून खायला द्यावे.

सांभर

२५० गॅम तुरडाळ

१ध्२ लहन चमचा मोहरी

१ध्२ लहान चमचा हळद पावडर

१ लहान चमचा धणे पावडर

५० ग्रॅम चिंच

१ध्२ लहान चमचा गरम मसाला

१ लहान चमचा दाणा मेथी

१ लहान चमचा तांदूळ

१ध्२ लहान चमचा लाल तिखट पावडर

४ कांदे

१ हिरवी मिरची

२ मोठे चमचे तूप

४ टॉमॅटो

१ तुकडा आले

तूरडाळ १ तास भिजवून नंतर मीठ हळद टाकून कुकरमध्ये शिजवून घ्या. आता एका कढईत तेल—तूप न टाकता दाणा मेथी, उडद डाळ, चणे डाळ, व तांदूळ भाजून घ्या. गॅस बंद करून धणे पावडर व लाल तिखट टाकून ५ मिनीटे झाकून ठेवा. हे सर्व वाटून घ्या. कांदा, टॉमेटो, आल व हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. एका कढईत तूप गरम करून मोहरीची फोडणी द्या. कांदा परतून, आलं, हिरवी मिरची, कढी—पत्ता टाका. आता टॉमेटो टाकून नीट परतून घ्या. सर्व मसाले टाकून भाजून घ्या व गॅस बंद करा. हे सर्व मसाले उकडलेल्या डाळीत मिक्स करा.

मसाला डोसा

१ वाटी उडीद डाळ

२ वाटी तांदूळ

२ लहान चमचे मीठ

१ध्२ किलो बटाटा

१ध्२ लहान चमचा मोहरी

१ध्२ लहान चमचा हळद पावडर

१ध्२ लहान चमचा धणे पावडर

१ध्२ लहान चमचा आमसूल पावडर

१ध्२ लहान चमचा लाल मिरची पावडर

थोडीशी हिंग पावडर

तेल भाजण्यासाठी

तांदूळ व डाळ वेगवेगळे ८—१० तास भिजवून ठेवा. नंतर दोन्ही धुऊन वेगवेगळे मिक्सरमधून काढून घ्या.

आता दोन्ही एकत्र करून चवीनुसार मीठ टाका. हे मिश्रण १२ तास झाकून ठेऊन द्या. उन्हाळ्‌यात मिश्रण लवकर आंबट पडते तरी ६ तासानंतर तपासून पहा. बटाटा उकडून चिरून घ्या.

तेलात मिरीची फोडणी देऊन बटाटा व सर्व मसाले टाकून एकत्र करा. आता एका मोठ्या चपट्या तव्यावर डोसा भाजा. डोश्याच्या मधोमध बटाट्याचा मसाला घेऊन दुमडा व खोबर्याच्या चटणीबरोबर वाढा.

पीझ्झा

पीझ्झा ब्रेड साठीरू

२५० ग्रॅम मैदा

१० ग्रॅम खमीर

१ छोटा चमचा साखर

४ लहान चमचे तूप

१ध्२ छोटा चमचा मीठ

मसाल्यासाठीरू

१ध्२ किलो टोमॅटो

२ कांदे

४ कळी लसूण

१ तुकडा आले

१ ढोबळी मिरची

१ कप बारीक चिरलेली पत्ता कोबी

मीठ चवीनुसार

१ध्२ लहान चमचा लाल मिरची पावडर

१ध्४ लहान चमचा गरम मसाला

१ लहान चमचा साखर

१ लहान चमचा कॉर्नफ्लावर

१०० ग्रॅम चीज

मैद्यात मीठ, साखर व मीठ व खमीर टाका व तूप आणि पाणी टाकून मळून घ्या. अर्ध्‌या तास ठेवल्यानंतर त्यचे चार लहान गोळे तयार करा. थोडे जाड लाटून घ्य.

ओवन २०० डिग्री से. ला गरम करा. १० मिनीटे १—२ करुन चारी पोळ्‌या ( पीझ्झा ब्रेड ) भाजून घ्या.टॉमेटो, कांदा, आल, लसूण बारीक चिरुन एका कढईत टाकून भजून घ्या.

पूर्ण पाणी शिजल्यावर लाल मिरची पावडर, साखर, मीठ व गरम मसाला टाका. एका वाटीत थोडे पाणी घेऊन त्याच्यात कॉर्नफ्लावर टाका. हे मिश्रण गॅसवरील टॉमेटोच्या मिश्रणात टाका. मिश्रण जाडसर झाल्यावर त्याच्यात ढोबळी मिरची व गाजर बारीक चिरुन टाका. २ मिनीटे भाजून गॅस बंद करा.

आता पीझा बेसवर हे मिश्रण पसरून त्याच्यावर चीज किसा. हा ब्रेड ओव्हनमध्ये १५० डिग्री से. ला ७ ते ८ मिनीटे ठेवा. आता बाहेर काढून त्याच्यावर टोमेटो सॉस टाकून गरम वाढा. खाण्याच्या सोईकरता चाकूने चिरुन लहान तुकडे करा. जर पीझ्झा बेस बाजारात मिळत असेल तर तेही आणून वर दिल्यानुसार मसाला टाकून पीझ्झा तयार करा.

चट्ट

१ कैरी,

१ मोठा कांदा,

१ चमचा तिखट,

दीड चमचा मीठ,

पाव चमचा हळद,

एक अष्टमांश चमचा हिंग,

२ चमचे साखर किंवा लिंबाएवढा गूळ

कांदा, कैरी व वांगे कच्चे किसून घ्यावे. बाकी सर्व पदार्थ मिसळून लहान तसराळ्‌यात कालवावे. आवडत असल्यास चमचाभर तेलात हिंगमोहरीची फोडणी करावी व गार झाल्यानंतर चटणीत मिसळावी. पोळीपुरीशी छान लागते.

नारळाची चटणी

अर्ध्‌या नारळाचा चव,

पाव वाटी चणा डाळ

६ हिरव्या मिरच्या

अर्धा चमचा मोहरीची पूड

१ वाटी दही, चवीनुसार मीठ

२ चमचे तेल

पाव चमचा मोहरी

एक अष्टमांश चमचा हिंग

१०—१२ कढीलिंबाची पाने

पाव चमचा हळद (घातली नाही तरी चालेल)

आदल्या रात्री दोन्ही डाळी वेगवेगळ्‌या भिजत घालाव्या. सकाळी उपसून ठेवाव्या. तेल तापले की त्यावर मोहरी, हिंग व हळद घालून दोन्ही डाळ फोडणीस टाकाव्या. जरा ढवळून आंच कमी करावी व झाकण ठेवावे.

अधूनमधून ढवळावे. मिरच्या व कढीलिंब चिराव्या, डाळी अर्धवट शिजल्या की त्यात मिरची—कढिलिंबाचे तुकडे घालावे. पुन्हा जरा परतून झाकण ठेवावे.

डाळी शिजत आल्या की त्यात खोबरे घालावे व दोनतीन मिनिटे परतावे. मीठ घालून ढवळावे व चटणी उतरवून गार होऊ द्यावी. निवाली की त्यात दही घालून कालवावी व वाढावी.

ओल्या नारळाची चटणी

१ वाटी ओले खोबर

५—६ हिरव्या मिरच्या

३ चमचे तेल

अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे (घातले नाही तरी चालते) एक अष्टमांश चमचा हिंग

पाव चमचा हळद

अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर

मिरच्यांचे लहान तुकडे करावे. तेल तापले की मोहरी, जिरे, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर मिरच्या घालाव्या. आंच कमी करून झाकण ठेवावे. दोन मिनिटांनंतर झाकण काढून मिरच्या परताव्या (झाकण ठेवले म्हणजे मिरचीचा खकाणा घरभर उडत नाही.) मिरच्या चुरचुरीत झाल्या की त्यावर खोबरे घालावे. मीठ व साखर घालून दोन मिनिटे ढवळावे.

सर्व नीट मिसळून आंच मंद ठेवावी. खोबरे कोरडे दिसू लागले की चटणी खाली उतरवावी. गार झाल्यानंतर काचेच्या भांड्यात किंवा स्टीलच्या डब्यात ठेवावी. फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर टिकते.

ही चटणी वाटायची नाही. त्यामुळे काम सोपे होते. तसेच त्यात आंबट पदार्थ नसल्यामुळे संतोषी शुक्रवारचा उपास असल्यास त्याला उपयोगी पडते.

सणसणीत चटणी हवी असल्यास मिरच्याचे प्रमाण वाढावावे व त्या बेताने मीठही थोडे जास्त घालावे.

सफरचंदाची चटणी

१ किलो मोठी दळदार आंबट सफरचंदे

३०० ग्रॅम गूळ

२ मोठे चमचे बेदाणे ( थोडे कमी चालतील)

२ मोठे चमचे मीठ

३२५ मिली व्हिनीगर

४—५ लाल सुक्या मिरच्या

अर्धा चमचा मोहरी

२ मोठे चमचे लिंबाचा रस

अर्धा चमचा किसलेली लिंबाची साल

१ कांदा

६ लसूण पाकळ्‌या

४ तमालपत्रे

२ चमचे सुंठीची पूड

अर्धा चमचा लाल तिखट

सफरचंदाची साल बिया व गाभा काढून गर किसावा. लाल मिरच्या थोड्या व्हिनिगरमध्ये भिजत ठेवाव्या. कांदा व लसूण बारीक चिरावी.

गूळ चिरावा. सफरचंदाचा कीस, मिरच्या (व्हिनीगरसकट), तिखट, मोहरी, गूळ, लिंबाची साल वरस, सुंठीची पूड व तमालपत्रे एका मोठ्या पातेल्यात एकत्र करून चुलीवर ठेवावे.

झाकण असू द्यावे. पण अधूनमधून ढवळत राहावे. मिश्रण मऊसर शिजले की उरलेले पदार्थ त्यात घालावे. मंद आंचेवर उकळू द्यावे. मधून ढवळावे. बुडाला लागू देऊ नये.

चटणी जॅमसारखी दाट झाली की पृष्ठभाग चकचकीत दिसू लागला की खाली उतरवावी. लगेच तमालपत्रे काढून टाकावीत. स्वच्छ बाटल्या किंवा बरण्यामध्ये ही चटणी घालावी व झाकण लावून मेणाचे सील करावे.

खजुराची चटणी

५—६ खजुराच्या बिया

३ हिरव्या मिरच्या

४ चमचे कोथिंबीर

२ चिमट्या हिंग

लहान लिंबाएवढी चिंच

अर्धा चमचा मीठ

२ चमचे तेल

पाव चमचा मोहरी

तेल व मोहरीखेरीज सर्व जिन्नस थोडे पाणी घालून एकत्र वाटावे.

पळीत तेल तापवून मोहरी व हिंग घालून फोडणी करावी व चटणीवर ओतावी.

आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालून चटणी सरबरीत करावी.

चिंचेची चटणी

१०० ग्रॅम चिंच,

अर्धा चमचा सुंठीची पूड,

पाव चमचा मिरपूड,

२ मोथे चमचे बारीक चिरलेला गूळ,

२ चमचे भाजलेल्या जिर्‌याची पूड अर्धा चमचा लाल तिखट,

दीड चमचा मीठ,

१ चमचा पुदिन्याची पाने ( वाळलेली चालतील),

२ केळी, १०—१२ बेदाणे (असल्यास)

तीन वाट्या पाण्यात चिंच कुस्करून तासभर भिजत ठेवावी. हे पाणी फडक्यात किंवा बारीक गाळणीने गाळून घ्यावे. केली व बेदाणे सोलून नंतर सर्व जिन्नस त्यात मिसळावे. ४—५ मिनिटे उकळावे. सतत ढवळावे.

पुदिना कुस्करून घालावा. बेदाणे अर्ध्‌या तास पाण्यात भिजत घालावे. घट्ट पिळून चटणीत घालावे. चटणी खाली उतरवून काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ओतावी. वाढायच्या वेळेला केळ्‌याच्या चकत्या निवालेल्या चटणीवर अलगद चटणीवर घालाव्या. ही चटणी वडे, पकोडे, दहीवडे याबरोबर चांगली लागते.

लाल भोपळ्‌याचे आंबाळ (आंबटगोड)

२५० ग्रॅम लाल भोपळा,

१ चमचे मेथीदाणे,

दीड चमचा बडीशेप,

अर्धा चमचा जिरे,

पाव चमचा हिंगपूड, १—१ चमचा धनेपूड व जिरेपूड, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, २ चमचे मीठ, ४ चमचे गूळ, लिंबाएवढी चिंच, १ वाटी पाणी

वाटीभर पाण्यात चिंच व गूळ तासभर भिजत घालावी. हाताने चांगली कुस्करून कोळावी व रस गाळून घ्यावा. भोपळ्‌याची साल काढून त्याचे २ सें.मी. रुंदीचे चौकोनी तुकडे चिरावे. कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मेथी घालावी. बदामी रंगावर मेथीदाणे आले की भोपळा आणि बडीशेप घालावी. हळद, तिखट, धनेपूड व जिरेपूड घालून अवसडावे किंवा अलगद ढवळावे. झाकण ठेवून ८—१० मिनिटे शिजू द्यावे. वाटल्यास थोडे गरम पाणी घालावे व अलगद ढवळून पाण्याचे झाकण ठेवावे. शिजत आले की चिंचगुळाचे पाणी घालावे व पाच मिनिटे उकळू द्यावे. आवडीनुसार तिखट किंवा मीठ जास्त घालावे.

हा डोग्री प्रकार आहे आणि लग्न समारंभात आवर्जून करतात.

वांग्याचे कोरडे भरीत

३ मोठी कोवळी वांगी,

२ कांदे,

१ चमचा आमटीचा मसाला,

२ चमचे मीठ,

१ चमचा साखर,

३ चमचे ओले खोबरे,

२ चमचे कोथिंबीर, अर्धा चमचा तेल

वांगी धुवून पुसावी. अर्धा चमचा तेलाचा पुसट हात वांग्यावरून फिरवावा व नंतर भाजावी. भाजल्यानंतर ताटलीत ठेवून पातेले उघडे घालावे. निवाल्यानंतर साल व देठे काढावी.

गर हाताने किंवा जेवणाच्या काट्याने कुस्करावा. कांदे बारीक चिरावे व गरात कच्चेच मिसळावे. इतर साहित्य घालून भरीत कालवावे. पोळीभाकरीबरोबर छान लागते.

काबुली चण्याचा चटका

२ वाट्या शिजलेले चणे,

३ लिंबे (रस),

४ चमचे भाजलेल्या तिळाची पूड,

२ चमचे तिळाचे तेल किंवा रिफाईंड तेल,

२—३ लसूण पाकळ्‌या, अर्धा चमचा मीठ.

१ वाटी काबुली चणे आदल्या रात्री भिजत टाकावेत. दुसर्‌या दिवशी किंवा १०—१२ तासानंतर निथळावे व दुसरे पाणी व मीठ घालून कुकरमध्ये शिजवावे. काबुली चणे डब्यातले वापरल्यास ही खिटखिट करावी लागत नाही.

लिंबाचा रस काढावा. लसूण पाकळ्‌या वाटाव्या. सर्व जिन्नस मिक्सरमधे घालावेत व मिश्रण एकजीव होईपयर्ंत मऊ वाटून घ्यावे. लहान वाडग्यात झाकून ठेवावे व गार करावे.

एका डिन्नर प्लेटमध्ये गाजरे, मुळा, काकड्या, पातीचे कांदे, कॉलीफ्लॉवरचे अर्धवट उकडलेले तुरे अशा भाज्याचे उभट लांबट तुकडे मांडावे, मध्यभागी छोट्या वाटीत किंवा बोलमध्ये हा चटका ठेवावा. पार्टीमध्ये हा प्रकार जेवणाआधी ड्रिंक्सबरोबर देता येतो.

मटार चाट

१ किलो कोवळे मटार ( त्याचे सुमारे ३५० ग्रॅम मटारदाणे पडतात),

अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग,

१ चमचा मीठ,

अर्धा चमचा ताजी मिरपूड,

२ चमचे चाट मसाला,

अर्धा चमचा वाळलेल्या पुदिन्याची पूड,

४ चमचे चिरलेली कोथिंबीर,

३—४ हिरव्या मिरच्या,

८—१० भेळेच्या किंवा पाणीपुरीच्या पुर्‌या किंवा खारे शंकरपाळे,

१ वाटी दही ( जास्त चालेल),

४ चमचे तेल

मिरच्या उभ्या चिराव्या. पातेल्यात तेल तापवावे. त्यावर जिरे व मिरच्या घालून धुतलेले मटारदाणे फोडणीस टाकावेत. अर्धी वाटी गरम पाणी घालून वर पाण्याचे झाकण ठेवावे. उकळी आल्यावर आंच मंद ठेवावी.

सुमारे २०—२५ मिनिटांनंतर मटार शिजतील त्यात मीठ व जरून वाटल्यास झाकणीवरचे गरम पाणी घालावे. खाली उतरवुन मिरपूड, पुदिनापूड व चाट मसाला घालून ढवळावे.

गार झाल्यानंतर वाढावच्या भांड्यात काढून ठेवावे. दह्यात पाणी व घालता नुसतेच घुसळावे किंवा चमच्याने फेसावे. हे दही भाजीवर घालावे. कोथिंबीर वरून शिवरावी. खायला देताना पुर्‌या कुस्करून वरून घालाव्या व द्यावे.

कोथिंबीरची चटणी

२५० ग्रॅम कोथिंबीर

थोडासा पुदीना

१ कांदा

३—४ पाकळी लसूण

३ हिरवी मिरची

१ तुकडा आले

१ छोटीशी चिंच

थोडा गुळ

१ चमचा शेंगदाणा

मीठ चवीप्रमाणे

कांदा, लसूण व आले सोलून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.

शेंगदाणे भाजून सोलून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधे चटणी पिसून घ्या.

तयार आहे कोथिंबीरची चटणी.

कोहिनूर चटणी

१—१/२ कि. साखर

१/२ चमच गुलाबपाणी

२०० ग्रा. टिन अननस रस व तुकडे किंवा १ध्२ अननस २०० ग्रा. साखरेत शिजवलेले

१ चिक्कु

१ सफरचंद

२ बब्बुगोशे किंवा नरम नाशपाती

५० ग्रा. चेरी

एका डाळिंबाचे दाणे

४ केळी

आंबा

१ आलुबुखार

२० बदाम

५ अक्रोड

बारीक कापलेले ५० ग्रा. द्राक्षे

थोडेसे मगज

एक ग्लास पाणी जाड बुडाच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवा त्यात साखर टकुन हलवावे व १० मिनिट शिजवावे.

एका लिंबाचा रस टाकुन वरून फेस काढुन गॅसवरून उतरून घ्यावे. पाहिजे तर गाळुन घ्यावे. नाहीतर थंड झाल्यावर एक एक लिंबाचा रस काढुन मिळवित जावा. नंतर त्यात गुलाबपाणी मिळवावे.

जेव्हा सर्व लिंबाचा रस मिसळेल तेव्हा अननसाचा रस टाकुन हलवावे. चाचणीचे मिश्रण पारदर्शक दिसेल तेव्हा रंग पिवळा होईल आता सर्व फळे बारीक कापुन डाळिंब दाण्यासहीत त्यात मिळवावे. अननसाचे तुकडे आसपास सजविण्यासाठी ठेवू शकता.

शेवटी सुखे मेवे टाकुन बरणीत बंद करून ठेवावे. जर अधिक वेळ म्हणजे एक वर्षापयर्ंत ठेवायचे असल्यास त्यात पोटेशियम मेटा बाय सल्फाइट चा अर्धा चमचा मिळवून ठेवावे.

टिपः ताजे फळे उपलब्ध तेच टाका.

लिंबाचे गोड लोणचे

२०० ग्रा. काळी मिरची

१०० ग्रा. मोठी वेलची

५० ग्रा. जीरे

१० ग्रा. प्रत्येक दालचिनी

तेजपान

जावित्री

५० ग्रा. लवंग

५ नग जायफळ

१०० ग्रा. सिरका

३ कि. साखर

५०० ग्रा. आले

४०० ग्रा. सेंधा मीठ

१०० ग्रा. काळे मीठ

मोठ्या आकारात लिंबू घ्यावे. धुवून पुसून उन्हात सुकवावे नंतर चार चार खापा या प्रकारे कापाव्या की त्या एका बाजुने जोडलेल्या राहतील.

आल्यास सोलुन बारीक करावे. सर्व मसाल्यांना अर्धवट कुटुन घ्यावे. नंतर त्यात साखर व विनेगर मिळवून लिंबामध्ये भरून लिंबाना बरणीत ठेवावे व बरणीस चांगल्या तर्हेने बंद करून उन्हात ठेवावे.

१०—१५ दिवसात लोणचे तयार होऊन जाईल.

करवंदाचे लोणचे

१ मोठा शेंगदाणे

१ चमचा हळद

१ मोठा चमचा मीठ

१—१/२ चमचा मिरची पावडर

तेल आवश्यक तेवढे

संपूर्ण करवंद धुवून उन्हात सुकवून भांड्यात भरावीत. शेंगदाणे अर्धवट बारीक करावे आणि हळद, मीठ व मिरची बरोबर भांड्यात टाकावे.

त्यात इतके तेल टाकावे की करवंद भिजतील व १०—१५ दिवस उन्हात ठेवावे.

रोज त्यास हलवत रहावे. हे लोणचे बरेच दिवस राहु शकते.

भाज्यांचे लोणचे

सलगमचे साल काढून तुकडे १ वाटी

गाजर १ वाटी तुकडे

कांदा १

आले—लसूण बारीक चिरून २ टे.स्पून

तिखट

मीठ

गरम मसाला चवीनुसार

मोहरी पूड २ टी स्पून

व्हिनेगर २ टे.स्पून

साखर किंवा गूळ १ध्२ वाटी

मोहरी तेल २ टे.स्पून

भाज्या उकळत्या पाण्यात दोन मिनिटे शिजवून चाळणीवर ओताव्यात. कापडावर पसरून पूर्ण कोरड्या कराव्यात.

कांदा किसावा. गूळ व व्हिनेगर एकत्र करून मंद गॅसवर मधाप्रमाणे होईपयर्ंत उकळावे. गार करावे.

तेल तापवून कांदे किस, लसूण, आले परतावे. लालसर झाले की उतरवून त्यात मीठ, मोहरी पूड, तिखट व गरम मसाला एकत्र करावा.

बरणीत भरून पुन्हा थोडं तेल घालावं. हे लोणचे उन्हात ठेवूनही करतात. कांदे ऐच्छिक आहे.

आपल्याला मोहरीऐवजी शेंगदाणा तेल व लोणच्याचा मसाला वापरून हे लोणचे करता येते. लिंबूरस घालून तात्पुरते लोणचे छान लागते.

पांढरे कांदे व कैरीचे लोणचे

३ वाट्या कैर्‌या उभ्या फोडी

मीठ

तिखट

साखर चवीनुसार

हळद

कांद्याच्या व कैरीच्या फोडी एकत्र कराव्यात. त्यात मीठ, तिखट, साखर व हळद घालावी. बरणीत भरून दर दोन दिवसांनी हलवावं. छान रस सुटतो तेलाशिवाय केलेले लोणचे चवीला छानही लागते.

मिरचीचे लोणचे

२ वाट्या मोहरीची डाळ

अर्धा चमचा मेथीची (कच्ची) पूड

दीड चमचा हळद

चमचे हिंग

२—१/२ ते ३ वाट्या मीठ

१२ लिंबांचा रस

१ वाटी तेल

एका मध्यम आकाराच्या परातीत किंवा ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. लहान पातलीत तेल कडकडीत तापवावे. धूर दिसेपयर्ंत तापले की परातीतल्या जिनसांवर ओतावे व झार्याने ढवळावे. मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावा.

मिरच्या धुवून फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. त्यांचे आपल्या आवडीनुसार बेताचे तुकडे करावे. मिरची यंत्रात बारीक केली तरी बिघडत नाही. त्यात ४ चमचे वगळून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा.

उन्हात ठेवलेल्या बरणीत तळाला २ चमचे मीठ घालावे. बरणी गार असावी. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून दोन चमचे मीठ घालावे. दु्‌सर्या किंवा तिसर्या दिवशी बारा लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा.

लिंबाच्या साली फेकून देऊ नयेत. सालीचेही चवदार लोणचे बनवता येते.

लिंबाच्या सालीचे लोणचे

२०—२५ लिंबांच्या साली

१ वाटी,

पाव वाटी लाल तिखट,

२ वाट्या साखर,

६ लिंबाचा रस व साली.

एका वेळेस इतकी सगळी लिंबे हवीत असे नाही. रोजच्या वापरात लिंबाचा रस काढून झाला की सालीचे चार तुकडे जराशा मीठात घोळवावे व एका घट्ट झांकणाच्या मोठ्या बाटलीत भरावे. साली साठत जातील तशा मीठात घोळवून बाटलीत भराव्या आवश्यक वाटल्यास थोडे जास्त मीठ घालावे.

सर्व जिन्नस एका थाळ्‌यात किंवा तसराळ्‌यात कालवावे. बाटलीतल्या सालीही त्यात मिसळाव्या. रुंद तोंडाच्या बरणीत हे मिश्रण भरावे. चौपदरी मलमली फडल्याचा दादरा बांधावा व बरणी ८—१० दिवस उन्हात ठेवावी.

संध्याकाळी उचलून घरात ठेवताना बरणी हलवावी. दहा दिवसांनंतर दादरा सोडून झाकण लावावे. झाकणावरून दुसरा दादरा बांधांवा. लोणच्याचा रंग बदलला की ते तयार झाले असे समजावे. आवश्यक वाटल्यास मीठ व साखर थोडी जास्त घालावी.

आवळ्‌याचे लोणचे

१ किलो मोठे आवळे,

२५० ग्रॅम मीठ,

२५० ग्रॅम तेल,

१० ग्रॅम मोहरीची डाळ,

१०० ग्रॅम लाल तिखट ( थोडे कमी चालेल),

४ चमचे ओवा,

४ चमचे जिरे,

५० ग्रॅम सैंधव

आवळे जरा कोचवून दहा मिनिटे वाफवून घ्यावेत. जिर्‌याची कच्चीच पूड करावी. चमचाभर तेलात ओवा जरा परतून घ्यावा. मोहरीची डाळ बाजारात मिळते ती मोठी असते.

थोडा वेळ उन्हात ठेवून जरा कुठावी. त्यात थोडे ( अर्धा वाटी) पाणी घालून फेसावी व त्याची गुळगुळीत पेस्ट करावी. या फेसलेल्या मोहरीत सर्व मसल्याच्या पुडी, तिखट व हळद घालावी. मीठ सैंधव मिसळावे.

एका स्वच्छ बरणीत तळाला थोडे मीठ घालावे. त्यावर थोडे आवळे घालावे. त्यावर मसाल्याचा एक थर द्यावा. त्यावर पुन्हा आवळ्‌याचा थर व त्यात पुन्हा मसाल्याचा थर द्यावा. शेवटचा थर मसाल्याचा असू द्यावा.

तेल कडकडीत तपवून गार करावे व या मिश्रणावर ओतावे ७—८ दिवस ती बरणी दिवसा उन्हात ठेवावी पंधरा दिवसानंतर वापरायला घेण्या जोग लोणचे तयार होईल.

टोमॅटोचे गोड लोणचे

४—५ टोमॅटो,

२ चमचे तेल,

पाव चमचा मोहरी,

पाव चमचा जिरे,

२ चिमट्या हिंग,

पाव चमचा हळद,

अर्धा चमचा तिखट,

३ चमचे दाण्याचे कुट,

१ चमचा मीठ

टोमॅटोच्या चार किंवा आठ फोडी चिराव्या, कल्हईच्या मध्यम पातेल्यात तेल तापले की मोहरी, जिरे व हिंग व हळद घालून त्यावर टोमॅटो घालावे. जरा अवसडून किंवा अलगद ढवळून मंद आंचेवर शिजू द्यावेत.

वर पाण्याचे झाकण ठेवावे, ८—१० मिनिटांनंतर दाण्याचे कूट, तिखट, मीठ व गूळ घालून पुन्हा ढवळावे दोन उकळ्‌या आल्या की खाली उतरावे. ३—४ दिवस फ्रीजमध्ये टिकते. सॉसऐवजी देखील वापरता येते.

सूचनाः टोमॅटोची साल पुष्कळ मुलांना व मोठ्या मंडळींनाही आवडत नाही. तसे असल्यास प्रथम टोमॅटो मिनिटभर उकडीच्या पाण्यात ठेवून नंतर थंड पाण्यात ठेवावे.

पाच मिनिटांनंतर बाहेर काढावे. साल सुटून येते. ती काढून टाकावी व आतल्या गराचे तुकडे करून फोडणीस टाकावे व शिजवावे म्हणजे खाताना सालपटे येणार नाहीत.

कारल्याचे लोणचे

४०० ग्रॅम कारली,

४—५ चमचे मीठ,

अर्धी वाटी लोणच्याचा मसाला,

२ लिंबे

कारली सोलून त्याच्या पातळ चकत्या कराव्या, त्यांना दोन चमचे मीठ चोळून एका फडक्यात बांधून साधारण एक तास पोळपाटाखाली दाबून ठेवाव्यात.

तासानंतर त्या फोडी एका तसराळ्‌यात घ्याव्यात. सुटलेले पाणी घेतले नाही तरी चालेल. त्यात लोणच्याचा मसाला, २ चमचे मीठ घालून कालवावे.

लिंबाचा रस काढून त्यावर घालावा. दोन दिवसानंतर खायला घ्यावे. महिनाभर हे लोणचे फ्रीजमध्ये ठेवल्यास टिकते.

खजूर—सफरचंदाचे लोणचे

५०० ग्रॅम आंबटसर सफरचंदे,

२५० ग्रॅम बिनबियांचा खजूर,

५०० ग्रॅम साखर,

२ मोठे चमचे तिखट,

२ मोठे चमचे मीठ,

१ वाटी किंवा कप व्हिनीगर

सफरचंदाच्या मधला भाग व बिया काढून पातळ तुकडे करावे. साल काढू नये.

५ मिनिटे चाळणीवर तुकडे वाफवावे व गार होऊ द्यावे. खजुराचे बारीक तुकडे चिरावे. साखरेत व्हिनीगर घालून जाडासर पाक करावा. त्यात तिखट, मीठ, सफरचंद व खजूर घालून ढवळावे.

मिश्रण मंद आंचेवर ५—७ मिनिटे उकळू द्यावे. खाली उतरवून गार करावे. स्वच्छ बरणीत भरून ठेवावे. पोळी, पुरीशी किंवा ब्रेड सॅंडविचेसमधे चांगले लागते.

फ्लॉवर—गाजराचे लोणचे

१ किलो कॉलीफ्लॉवर,

५०० ग्रॅम गाजरे,

१०० ग्रॅम, आले,

१०० ग्रॅम लाल सुक्या मिरच्या ( कमी तिखट असलेल्या),

१ जुडी पुदिना,

२५ ग्रॅम दालचिनि,

२० ग्रॅम मिरी,

२० ग्रॅम लंवगा ( थोड्या कमी चालतील),

५ कप व्हिनीगर,

२५० ग्रॅम गूळ,

२५० ग्रॅम तेल,

२५० ग्रॅममीठ,

५० ग्रॅम लसूण

कॉलीफ्लॉवर स्वच्छ करून बारीक चिरावा. पाने व मधला दांडोरा टाकून द्यावा. किंवा सूपमधे उपयोग करावा. गाजराच्या इंचभर लांबीच्या पातळ व बारीक कापट्या चिराव्या. धुतलेली भाजी पातळ फडक्यावर पसरून कोरडी होऊ द्यावी.

पुदिन्याची पानेखुडावी. आले किसावे व लसूण सोलावी. लाल मिरच्यासह आले—लसूण—पुदिना थोडेसे व्हिनीगर घालून बारीक वाटावे. लवंगा, दालचिनी व मिरी यांची कुटून बारीक पूड करावी.

गुळात उरलेले व्हिनीगर घालून जाड पाक करावा व बाजूला ठेवावा. भाज्यांचे तुकडे, वाटलेला मसाला, कुटलेली पूड व मीठ एकत्र मिसळावे. एका रुंद तोंडाच्या बरणीत भरावे.

त्यावर गुळाचा गार झालेला पाक ओतावा व चांगले वळावे. चौपदरी दादरा बांधून ७—८ दिवस बरणी उन्हात ठेवावी. रोज सकाळी हलवावी. संध्याकाळी घरात आणून ठेवावी. आठवड्यानंतर लोणचे वापरण्यास हरकत नाही. मात्र बरणी कोरड्या जागी ठेवावी.

टोमॅटोचे तिखट लोणचे (तोक्कू)

१ किलो लालबुंद टोमॅटो,

२ मोठे चमचे तेल,

१ चमचा मोहरी,

३ चमचे उडदाची डाळ,

२ चमचे तिखट,

३ चमचे मीठ,

२ चमचे गूळ,

अर्धा चमचा हिंग

टोमॅटो धुवून पुसून ठेवावे. त्याचे चार किंवा आठ तुकडे करावेत. कल्हईच्या पातेल्यात तेल तापवावे. त्यात मोहरी व डाळ घालावी. डाळ तांबूस झाली की हिंग व टोमॅटो घालावे. जरा ढवळून आंच मंद करावी व पाण्याचे झांकण ठेवावे.

१०—१२ मिनिटात पाणी सुटून टोमॅटो शिजत येतील. नंतर त्यात तिखट, मीठ व गूळ घालावा. ढवळून पाच मिनिटे उकळलेल की खाली उतरवावे. झांकण ठेवू नये. गार झाल्यानंतर लहान बरणीत भरावे.

वांग्याचे लोणचे

७५० ग्रॅम लहान गोल वांगी,

१० लसूण पाकळ्‌या,

२ इंच आले,

१५ लाल मिरच्या,

११५ मिली व्हिनीगर,

५ चमचे मोहरीची डाळ,

१ चमचा हळद,

१२५ ग्रॅम गूळ,

६ मोठे वेलदोडे,

१ इंच दालचिनी,

४ लवंगा,

१० मिर्‌याचे दाणे,

६ मोठे चमचे तेल,

अर्धा चमचा मोहरी,

५ चमचे मीठ

आले—लसूण बारीक वाटून घ्यावे. लाल मिरच्या चमचाभर व्हिनीगरमधे बारीक वाटाव्या. गूळ व्हिनीगरमध्ये विरघळवून ठेवावा. वांगी धुवून पुसून ठेवावी. व त्यांचे १ सें.मी. जाड काप चिरून ठेवावे. कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मोहरी व हळद घालून त्यावर आले—लसूण तांबूस होईपयर्ंत परतावी. त्यात वांग्याचे काप घालून हलक्या हाताने पातेलीत घालून अवसडावे.

वांगी मंदाग्निवर शिजू द्यावीत. एकीकडे वेलची, लवंगा, दालचिनी व मिरी यांची बारीक पूड करावी. वांगी मधूनच एकदोनदा झार्‌याने अलगद ढवळावीत. वांगी शिजली की गुळाचे मिश्रण घालावे. दाटसर रस होईपयर्ंत शिजवावे. नंतर लवंग—दालचिनी इत्याचीची पूड घालावी. मोहरीची डाळ व मीठ घालावे. खाली उतरवून लोणचे गार होऊ द्यावे. नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवावे. आठदहा दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही.

सफरचंदाचा मुरंबा

१ किलो सफरचंद

१ कि. साखर

२ चमचे मीठ

२ लिंबाचा रस

आवश्यकतेनुसार पाणी

सफरचंद सोलून त्यांचा मधला भाग व बी काढुन टाकावे. साखरेत थोडेसे पाणी व लिंबाचा रस टाकुन एकतारी पाक बनवावा. सफरचंद पाण्यातुन काढावे व पुसून पाकात टाकावे आणि नरम झाल्यावर पाकासहित काचेच्या बरणीत भरावे. हा मुरंबा हृदयाच्या रोग्यांना फायदेशीर आहे.

मिक्स व्हेजिटेबल लोणचे

१—१/२ किलो कोबी

१ कि. गाजर

१ किलो मटार

१—१/२ कि. शालजम

१०० ग्रा. लाल मिरची

१०० ग्रा. सरसो तेल

५० ग्रा. हळद

२५० ग्रा. मीठ

१०० ग्रा. व्हिनेगर

२५० ग्रा. गूळ

सर्व भाज्या ( मटार सोडुन ) धुवून मध्यम आकारात कापल्या त्यानंतर उकळल्या पाण्यात टाकाव्या व थोड्याशा शिजल्यानंतर उतरवून पाणी काढुन उन्हात सुकवाव्या.

नंतर सर्व मसाले वाटुन मिळवावे तसेच गुळास व्हिनेगरमध्ये टाकुन गरम करून तेलही त्यात मिळवावे.

सर्व वस्तु व्यवस्थित मिळवून बरणी मध्ये भरून उन्हात ठेवावे. चार दिवसात लोणचे तयार होईल.

यात तुम्हाला आवडतील त्या भाज्या वापरू शकता.

स्ट्रॉबेरीचा जॅम

४०० ग्रॅम पिठीसाखर

२५० ग्रॅम स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्यात घालून हलक्या हाताने बाहेर काढाव्यात. वरचे हिरवे देठ काढून टाकावे. नंतर त्यात पिठीसाखर घालून हाताने कुसकरावे. साखरेला जरा पाणी सुटले, की गॅसवर ठेवावे.

मंदाग्नीवर असू द्यावे. झाकण ठेवावे. नंतर हलक्या हाताने ढवळत राहावे. जाडसर पाक झाला की उतरावा. हा जॅम जास्त दिवस टिकत नाही.

इंद्रधनुषी सॅलेड

२ बीट

४ गाजर

४ मुळा

२ टॉमेटो

२ लिंबू

७—६ सॅलेडची पाने

४ हिरवी मिर्ची

१ लहान चमचा मीठ

१/२ लहान चमचा काळी मिरी पावडर

१ लहान चमचा चाट मसाला

बीट,

२ मुळा,

२ गाजर,

किसून घ्या.

काकडी लिंबू व टॉमेटो गोल चिरुन घ्या. आता उरलेला २ मुळा व २ गाजर लांब चिरा, एका डिशमध्ये सॅलेडची पाने सजवा मधोमध किसलेला मुळा, गाजर व बीट ठेवा.

चारी बाजुला चिरलेला मुळा, गाजर, काकडी, लिंबू, टॉमेटो व हिरवी मिरची सजवा. वरून मीठ, मिरची व चाट मसाला टाकून सॅलेड तयार.

गाजर द्राक्षे कोशिंबीर

२ वाट्या गाजराचा कीस (गुलाबी गाजरे जास्त छान दिसतात),

१५—२० बिनबियांची सीडलेस द्राक्षे,

१ चमचा खसखस,

१ चमचा मीठ,

अर्धा चमचा साखर,

पाव चमचा लाल तिखट किंवा मिरपूड,

१ वाटी मेयोनेझ किंवा १ वाटी घरचा चक्का,

अर्धी वाटी सायीचे दही

द्राक्षे धुवून अर्धीअर्धी चिरावीत.

सर्व जिन्नस एकत्र करावेत व चार तास कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवावी. शक्यतोवर पांढर्‌या भांड्यात किंवा केळीच्या पानावर ठेवून टेबलावर न्यावी.

चण्याचे सॅलड

२ वाट्या शिजवलेले चणे ( काबुली),

अर्धी वाटी कोशिंबीर,

अर्धी वाटी टोमॅटो,

अर्धी वाटी काकडी ( कोचवलेली)

२ मोठे चमचे व्हिनीगर,

२ लिंबे (रस),

२ चमचे तेल,

२—३ लसूण पाकळ्‌या,

पाव चमचा मोहरीची ताजी पुड,

चवीनुसार मीठ व मिरपूडा

१ वाटी काबुली चणे आदल्या रात्री भिजत घालावेत. दुसर्‌या दिवशी सकाळी निथळून पाणी व मीठ घालून शिजवावेत. कोथिंबीर, टोमॅटो, काकडी व लसूण बारीक चिरावी ( लसूण नसला तरी चालेल) एका मोठ्या भांड्यात सर्व पदार्थ एकत्र करावेत व अलगद हालवावे.

परदेशात शिजलेले काबुली चणे डबाबंद मिळतात. हे डबे वापरण्यास सोयीस्कर आहेत. आपल्याकडे छोले हा एकच प्रकार चण्याचा केला जातो. बदल म्हणून हे सॅलड करून पहा. आवडीनुसार हिरवी मिरची बारीक चिरून वापरावी.

गाजर—काकडीची कोशिंबीर (चायनीज पद्धत)

२ मध्यम काकड्या,

१ अन्नस चकती,

१ चमचा मीठ,

१ चमचा सोया सॉस,

१ चमचा व्हिनीगर,

१ चमचा साखर,

१ चमचा रिफाइंड तेल

काकड्या सोलून व गाजरे खरवडून त्याचे १ इंच लांब व एक अष्टमांश इंच रुंद अशा कापट्या चिरण्याचा प्रयत्न करावा. ओ उमल्यास लहान पातळ तुकडे करावे. त्यावर मीठ शिंपडून बाजूला ठेवावे. एका उथळ प्लेटमध्ये किंवा छोट्या सुबक ट्रेमध्ये निम्म्या काकडीच्या कापट्या ओळीने मांडाव्या. तशाच गाजराच्या कापट्या (निम्म्या) मांडाव्या.

उरलेल्या कापट्या पहिल्या ओळीवर मांडाव्या व आडव्या ओळीत रचाव्या. ओ भांडे फ्रीजमध्ये ठेवावे. एका वाडग्यात साखर, व्हिनीगर, सोया सॉस व तेल मिसलून सॉस तयार करावे. असल्यास चमूटभर अजिनोमोटो घालावे. नसल्यास चिमूटभर साधे मीठ घालावे. सॉसही फ्रीजमध्ये ठेवावे. वाढण्यापूर्वी हे सॉस कोथिंबीरीवर ओतावे व अननसाचे तुकडे वरून घालून सजवावे.

कापट्या चिरंगे जमले नाही तर नेहमीसारखे कोशिंबीर व जमले तर चायनीज सॅलड !

गाजर कोबीचे सॅलड

२ वाट्या बारीक चिरलेली कोबी,

१ वाटी बारीक चिरलेली गाजरे,

१ वाटी बारीक चिरलेली भोपळी मिरची,

२ चमचे किसलेला कांदा,

अर्धी वाटी दही,

अर्धी वाटी क्रीम किंवा मेयोनेझ,

१ चमचा साखर,

१ चमचा मीठ,

पाव चमचा मिरपूड

भाज्या एकत्र कराव्या. दही, क्रीम, साखर, मीठ व मिरपूड घालून वेगळे ढवळावे. बाजारी क्रीम नसल्यास घरची साय घोटून घालावी. तेही न जमल्यास दह्याचे प्रमाण दुप्पट करावे. मात्र दही आंबट नसावे.

पसरट भांड्यात भाज्या घालून त्यावर दही हलकेच ओतावे. अलगद भांडे मिसळावे. फ्रीजमधे ठेवून थंडगार झाल्यानंतर खावे.

आवडीनुसार भाजलेले किंवा भिजवलेले शेंगदाणे, काजू किंवा अक्रोडाचा भरड चुरा किंवा भाजके चणे करून घालावे.

फलमाधूरी

अर्धी वाटी बारीक चिरलेले सफरचंदाचे तुकडे,

१०—१२ हिरवी द्राक्षे,

१—१ मुसुंबे व संत्रे,

१ वाटी घट्ट गोड दही,

२ मोठे चमचे अॉरेंज स्कॉश किंवा स्ट्रॉबेरी क्रश,

पाव चमचा लिंबाचा रस,

१ चमचा मीठ

संत्रे व मुसुंबे सोलून पाकळ्‌या सुट्या कराव्या, द्राक्षे धुवावी, बियांची द्राक्षे असल्यास अर्धी चिरून बिया काढाव्या.

द्राक्षांची साल काही वेळा जाड असते. सोलावी. सफरचंद चिरून त्यावर लिंबाचा रस घालावा म्हणजे तुकडे काळे पडणार नाहीत.

पेरूची कोशिंबीर

३—४ मोठे दळदार पिकलेले पेरू,

३—४ मध्यम बटाटे,

२—३ पातीसह कांदे,

३ हिरव्या मिरच्या,

४—५ कोथिंबीरीच्या काड्या,

४—५ पुदिन्याच्या काड्या,

१ चमचा मीठ,

१ चमचा साखर

बटाटे उकडून सोलावे, बटाटे, कांदे, पात, मिरच्या, कोथिंबीर व पुदिन्याची पाने बारीक चिरावी. पेरूच्या बियांचा भाग टाकून द्यावा. साल काढून टाकून गर बारीक चिराव्या.

सर्व एकत्र अलगद मिसळावे. मीठ व साखर घालावी. लिंबाचा रस पिळावा व गार करून ही कोशिंबीर खायला द्यावी. उपासासाठी करायची असल्यास पुदिना व कांदे वगळावे. त्याऐवजी अर्धा चमचा जिरेपूड घालावी.

कडधान्याची कोशिंबीर

३० ग्रॅम मटकी,

३० ग्रॅम हिरवे मूग,

३० ग्रॅम हरभरे,

अर्धी वाटी सोले खोबरे,

२—३ हिरव्या मिरच्या,

१ लिंबू, दीड चमचा चवीनुसार मीठ,

अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,

अर्धा चमचा साखर

मटकी व मूग आदल्या दिवशी सकाळी भिजत घालावे. रात्री फडक्यात बांधून ठेवावे. हरभरे रात्री भिजत घालावे. मोड आलेली मटकी, मूग व हरभरे वेगवेगळे शिजवून घ्यावे. गार झाले की पाणी काढून टाकावे.

इतर जिन्नस घालून कोशिंबीर एकत्र अलगद मिसळावी.

नारळाचे रायते

अर्धा नारळ ( चव ),

६—७ हिरव्या मिरच्या,

६—७ छोटे लाल सांबार कांदे,

१ इंच आले, चवीनुसार मीठ,

१—१/२ ते २ वाट्या दही

दह्याखेरीज इतर सर्व पदार्थ एकत्र करून त्याची चटणी वाटावी व नंतर दह्यात कालवावी.

जेवणात किंवा भजी, वडे इत्यादी उपहाराच्या प्रकाराबरोबर ही चटणी छान लागते.

काकडी—कांदा रायते

२ काकड्य,

२ कांदे,

२ हिरव्या मिरच्या,

२ वाट्या दही,

१ चमचा मीठ (किंवा जास्त),

अर्धा चमचा साखर,

अर्धा चमचा मिरपूड,

१ चमचा जिरेपूड,

पाव चमचा लाल तिखट,

सजावटीसाठी कोशिंबीर

काकड्या व कांदे सोलून बारीक चिरावे. पाणी न घालता दही घुसळावे. मिरच्या उभ्या चिराव्या व मीठ लावून जरा चुरडाव्या. दह्यात चिरलेले पदार्थ घालावेत. साखर व तिखट घालावे. वाढायच्या भांड्यात काढून ठेवावे. वरून जिरेपूड, मिरपूड व असल्यास कोथिंबीर घालून फ्रीजमध्ये ठेवावे. जेवणाचे वेळी थंडगार असावे.

दुध्याचे रायते

२ वाट्या गोड दही,

१ वाटी दुधी भोपळ्‌याचा कीस ( अंदाजे १०० ग्रॅम),

१ चमचा मीठ,

अर्धा चमचा गरम मसाला,

२ चमचे चिरलेली कोथिंबीर,

पाव चमचा लाल तिखट.

दुधी किसून वाफवून घ्यावा. जिरे भाजून पूड करावी. कीस गार झाला की दही पाणी न घालता घुसळावे. त्यात मीठ व भाजून कुटलेली जिर्‌याची पूड घालावी. ढवळून वाढायच्या भांड्यात काढून ठेवावे. गरम मसाला, तिखट व कोथिंबीर वरून घालून सजवावे. फ्रीजमधे गार करून ठेवल्यास जास्त चांगले लागते. पथ्यासाठी हे रायते चांगले व सोपे आहे.

बटाट्याचे रायते

५०० ग्रॅम ताजे गोड दही

३ मध्यम बटाटे

पाऊणवाटी ओला नारळ

अर्धा चमचा जिरे

अर्धा चमचा मोहरी

१—१/२ चमचा मीठ

फोडणीसाठीः

३ चमचे तेल

१ चमचे उडदाची डाळ

पाव चमचा मोहरी

२ हिरव्या मोरच्या

१०—१२ कढीलिंबाची पाने

१ चिमूट हिंग

२ चमचे कोथिंबीर

बटाटे उकडून सोलून बारीक चिरावे. दही पाणी न घालता घुसळावे. त्यात बटाटे व नारळ घालावा. जिरे व मोहरी छोट्या कढईत कोरडी भाजावी व लाटण्याने त्याची पोळपाटावर भरड पूड करावी.

मीठ व ही पूड दह्यात घालावी. तेल तापवून अनुक्रमाने डाळ, मोहरी, हिरव्या (उभ्या चिरलेल्या) मिरच्या, कढीलिंब व हिंग घालून फोडणी करावी व रायत्यावर घालावी. हे रायते सोपे व पुरवठ्याचे आहे.

बटाट्याचे रायते— प्रकार दुसरा

३०० ग्रॅम बटाटे,

२ वाट्या गोड दही,

अर्धा चमचा, जिरेपूड,

अर्धा चमचा लाल तिखट,

१ पांढरा कांदा,

१ चमचा बेदाणा ( ऐच्छिक),

१ चमचा ओले खोबरे,

१ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर,

२ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, मीठ

मिरच्या उभ्या चिराव्या. बिया काढून सालीचे पातळ काडीसारखे तुकडे सुरीने करावे. बटाटे उकडून सोलावे. हाताने बारीक कुस्करावे. कांदा बारीक चिरावा. दही घुसळून त्यात मीठ, साखर घालावी. सर्व पदार्थ एकत्र करून त्यावर घुसळलेले दही घालावे. हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घालावे.

तिखमिखळं (कोशिंबीर)

१ मोठी किंवा २ लहान सिमला मिरच्या (भोपळी),

अर्धी वाटी ओले खोबरे,

२ चमचे तेल,

पाव चमचा मोहरी,

पाव चमचा जिरे,

१ चिमूट हिंग,

१ चमचा मीठ,

अर्धा चमचा साखर,

१ वाटी दही (कमी चालेल),

१—२ चमचे साय (असल्यास)

मिरच्या धुवून पुसाव्या. दोन फांकी करून देठ, बिया, आतला गर काढून टाकावा व मिरच्या बारीक चिरव्या. लहान कल्हईच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरे व हिंग घालावा. या फोडणीवर चिरलेली मिरची घालून अर्धी वाटी पाणी घालावे. पाचसात मिनिटे मंद आंचेवर मिरच्या शिजू द्याव्यात. नंतर त्यात ओले खोबरे, मीठ व साखर घालून दोन मिनिटे शिजवावे. खाली उतरवून गार झाले की दही व साय घालून नीट मिसळावे फ्रीजमध्ये गार केल्यास जास्त छान लागते.

बुंदीचे रायते

२ कप दही

१ कप बेसन

१ध्२ छोटा चमचा लाल मिरची पावडर

मीठ

तेल आणि तूप तळण्यासाठी

दही सोडुन बाकी सामग्रीस मिळवून पाणी टाकुन लापशी बनवुन घ्या.

तेल कढईत टाकुन लापशीस चाळणीत टाकुन त्याची छोटी छोटी बुंदी तेलात किंवा तुपात तळुन घ्यावी. थंड झाल्यावर घुसळलेल्या दह्यात टाकावी तसेच दिलेला मसाला वरून भुरभुरावा.

वाटलेले जीरे लाल मिरची, चाट मसाला, गरम मसाला, चवीनुसार, बुंदीस अलग वायुरोधक भांड्यात सुरक्षित ठेवली जाऊ शकते.

तसेच जेव्हा पण आवश्यकता असेल तेव्हा फेटलेले दही टाकुन व मसाला भुरभुरून लोणचे तयार करावे.

फळाचे सॅलेड

१ अननस

२ सफरचंद

२ केळी

१ काकडी

२ मोठे टॉमेटो

२ ढोबळी मिरची

२ संत्री

१ आंबा

१ कप दही

२ मोठे चमचे क्रिम

२ लहान इलायची

१ चिमुट लाल तिखट पावडर

मीठ

काळी मिरी चवीप्रमाणे

आंबा सोलून कुसकरून घ्या. इलायची सोलून घ्या. आंबा, दही, क्रिम, इलायची पावडर, मीठ, काळी व लाल तिखट, सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढा व ठेऊन द्या. अननस सफरचंद, केळी व काकडीचे लहान चौकोनी तुकडे करा.

टोमेटो च्या बीया काढून चीरा, ढोबळी मिरची गोल करा. संत्री सोलून तुकडे करा. चिरलेली फळे व भाज्या एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवा. वाढताना बाऊलमध्ये आधी सॅलेड टाका व नंतर परतून आंब्याची एकत्र केलेली पेस्ट टाकून वाढा.

आंबट गोड सॅलेड

१ गाजर

१ टॉमेटो

१ काकडी

१ कांदा

१ मुळा

२ बीट

२ ढोबळी मिरची

२ मोठे चमचे मध

१ लिंबू

१/२ लहान चमचा मीठ

१/२ लहान चमचा काळी मिरी पावडर

गाजर, काकडी, कांदा, मुळा व बीट सोलून गोल तुकडे करा. टॉमेटो व ढोबळी मिरची पण गोल चिरा. एका बाऊल मध्ये सर्व साहित्य एकत्र करा व लिंबू टाकून वाढा.

बनाना सॅलेड

२ केळी

३—४ गाजरे

१/४ नारळाचा चव

कांद्याच्या पातीतील २—३ कांदे

थोडीशी बारीक चिरलेली सेलरी

१ लिंबाचा रस

१ कप मेयॉनीज सॉस

हिरवी मिरची

मीठ

साखर

केळी, गाजर व कांदे बारीक चिरुन घ्यावेत. त्यात नारळाचा चव, बारीक चिरलेली सेलरी, हिरवी मिरची वाटून, मीठ व थोडी साखर घालावी. लिंबाचा रस व मेयॉनीज सॉस घालून, सर्व एकत्र करुन सॅलेड करावे.

मसालेदार खिचडी

अर्धी वाटी मुगाची डाळ

पाऊण चमचा मीठ

१ चमचा आमटीचा गोड मसाला ( काळा )

अर्धा चमचा धनेजिरेपूड

२ हिरव्या मिरच्या ( उभ्या चिरून)

पाव चमचा तिखट

३ चमचे तेल

अर्धा चमचा मोहरी

पाव चमचा हिंग

अर्धा चमचा हळद

पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

पाव वाटी ओले खोबरे (असल्यास)

३ वाट्या गरम पाणी

१ चमचा साजूक तूप

डाळ तांदूळ मिसळून तासभर धुवून ठेवावेत. कुकरच्या पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद, मिरच्या क्रमाने घालून त्यावर डाळतांदूळ घालावेत. आंच कमी करून २—४ मिनिटे परतावेत.

नंतर त्यात तिखट, मीठ, मसाला व गरम पाणी घालावे. कुकरमधे ( साध्या किंवा प्रेशर) खिचडी शिजवावी. वाढताना वरून खोबरे व कोथिंबीर शिवरावी. चमचाभर साजूक तूप वरून सोडावे म्हणजे शिते मोकळी होतात.

घरात असल्यास, मूठभर शेंगदाणे, १—२ मध्यम कांदे किंवा बटाट्याच्या फोडी, मटारदाणे, भोपळी मिरची यापैकी खिचडीत काहीही घालता येते. मिरच्या घातल्यानंतर डाळतांदूळ घालण्यापूर्वी यांपैकी असेल ती भाजी घालावी. दोन मिनिटे परतून डाळतांदूळ घालावेत, मात्र गरम पाणी अर्धी वाटी जास्त घालावे.

मसूर डाळीची खिचडी

१ वाटी तांदूळ

अर्धी वाटी मसूरडाळ

अर्धी वाटी गाजराचे तुकडे

अर्धी वाटी कोबी किंवा कॉलीफ्लॉवर (चिरलेला)

४—५ छोटे कांदे ( ऐच्छिक)

१ टोमॅटो

अर्धा चमचा जिरे

१ हिरवी मिरची

पाव चमचा हळद

दीड चमचा मीठ

२ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर

२ चमचे तूप

२ चमचे ओले खोबरे

डाळ व तांदूळ वेगवेगळे धुवून ठेवावे. पातेल्यात तुपावर जिरे व मिरची फोडणीस टाकून त्यावर भाज्या, मीठ, हळद, टोमॅटो घालून ३—४ मिनिटे परतावे.

त्यात डाळ घालून ५ वाट्या गरम पाणी घालावे. उकळी आली की तांदूळ वैरावे (घालावे). दहा मिनिटांनंतर आंच कमी करावी व झांकण ठेवावे.

मंद आंचेवर खिचडी शिजू द्यावी. भाताची कणी शिजलेली दिसली की खाली उतरवून झाकूण ठेवावी. पाच मिनिटांनंतर कडेने चमचाभर साजूक तूप सोडावे. वाढताना कोथिंबीर व खोबरे वर शिवरावे. पापड, लोणचे, दही व ताक याबरोबर ही खिचडी खावी.

पथ्य करणारांना तसेच रविवारी टीव्हीच्या वेळेला वेळेला ही खिचडी सोयीची आहे.

तूर डाळीचा पुलाव

३ वाट्या तांदूळ

१ वाटी तुरीची डाळ

२०० ग्रॅम कांदे

१०—१२ लसूण पाकळ्‌या

२ इंच आले

२०० ग्रॅम गाजरे

२०० ग्रॅम बीन्स (श्रावणघेवडा)

२ मोठे तुकडे दालचिनी

४ वेलदाडे

७—८ मिरी

२ चमचे (चवीनुसार) मीठ

४ मोठे चमचे तूप

आवडीनुसार सजावट

डाळ व तांदूळ एकत्र धुवून तासभर बाजूला ठेवावी. बीन्सचे लहान तुकडे चिरावे. गाजराच्या चकत्या कराव्या. कांदे उभे चिरावे. आले—लसूण बारीक वाटावे.

दालचिनी, मिरी व वेलदोडे एकत्र कुटावे. तुपावर कांदा गुलाबी तांबूस परतावा व त्यावर आले—लसणाची गोळी व भाज्या घालून २—३ मिनिटे परताव्या.

त्यावर डाळ—तांदूळ घालून ३—४ मिनिटे परतावे. ९ वाट्या गरम पाणी, कुटलेली मसाला पूड व मीठ घालावे. पुलाव कुकरमध्ये शिजवावा. वाढण्यापूर्वी चमचाभर साजूक तूप वरून सोडावे.

टोमॅटो भात

२ वाट्या तांदूळ

२५० ग्रॅम टोमॅटो

२ चमचे तूप

४ लवंगा

१ कांदा

१ वाटी ओले खोबरे

४—५ हिरव्या मिरच्या

अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर

४—५ लसूण पाकळ्‌या

१ इंच आले

२ दालचिनीचे लहान तुकडे

८—१० काळी मिरी

१ लिंबू

२ चमचे मीठ ( किंवा जास्त)

१ चमचा साखर

तांदूळ धुवून तासभर निथळत ठेवावेत. टोमॅटो बारीक चिरून ४ वाट्या पाण्यात शिजवावेत. पुरणयंत्रावर पाण्यासकट गाळून घ्यावे. भाताच्या पातलेल्यात तूप तापले की त्यावर लवंगा, काळीमिरी, दालचिनी घालून कांदा परतावा. एकीकडे आले—लसूण वाटून घ्यावे.

मिरच्या उभ्या चिराव्या. कांदा लालसर झाला की तांदूळ परतावेत व वाटलेली गोळी व मिरच्या घालावे. मीठ व साखर घालावी. गाळून घेतलेले टोमॅटोचे पाणी घालावे. मंद आंचेवर भात शिजवावा. वाढताना त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. जास्त आंबट आवडत असेल त्यांच्यासाठी लिंबाची फोड द्यावी.

भाजीभात

२ वाट्या तांदूळ

२ वाट्या कांदा, बटाटा, कोबी, भोपळीमिरची, तोंडली, वांगी इत्यादींपैकी मिश्र फोडी

अर्धी वाटी मोड आलेले मूग किंवा मटकी

पाव वाटी भिजवलेले शेंगदाणे

४ हिरव्या मिरच्या

अर्धी वाटी ओले खोबरे

अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर

६ चमचे तेल

२ चमचे मीठ ( किंवा जास्त)

२ चमचे साखर

४ चमचे धने—जिरेपूड

२ डहाळे कढीलिंब

४ चमचे लिंबाचा रस

फोडणीचे साहित्य.

तांदूळ धुवून तासभर निथळत ठेवावे. निम्मे खोबरे, कोथिंबीर व लिंबूरस वरून सजावटीसाठी वगळून ठेवावा. कुकरमध्ये मावेल अशा मोठ्या पातेल्यात तेल तापले की मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून हिरव्या मिरच्या फोडणीस टाकाव्या.

त्या ९ वाट्या गरम पाणी घालावे. त्यात मीठ, धनेजिरेपूड, कढीलिंब, साखर घालावी. पाण्याला उकळी आली की त्यात दाणे, भाजी, मूग व तांदूळ वैरावे व खिचडी ढवळावी. दोन मिनिटे ठेवावे.

५—७ उकळ्‌या आल्या की नंतर पातेले कुकरमध्ये ठेवावे. झाकणी ठेवून अर्धा तास शिजत ठेवावी. नंतर उघडून पुन्हा उलथण्याच्या टोकाने खालीवर करावी. बाहेर काढून पुन्हा मंद चुलीवर एक वाफ येऊ द्यावी. खाली उतरवून त्यावर लिंबूरस शिंपडून ढवळावे. वाढायच्या भांड्यात काढून त्यावर खोबरे व कोथिंबीर घालावी.

भात मऊ वाटल्यास वरून चमचाभर साजूक तूप घालावे. म्हणजे शिते मोकळी होतील.

पालक भात

दीड वाटी तांदूळ

३ वाट्या बारीक चिरलेला पालक

अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे

२ लाल मिरच्या

मीठ

४ वाट्या पाणी

१ चमचा धणे—जिरेपूड

३ चमचे तेल

पाव चमचा मोहरी

पाव चमचा जिरे

पाव चमचा हिंग

२ हिरव्या मिरच्या

अर्धी वाटी ओले खोबरे

२ चमचे टोमॅटो सॉस ( ऐच्छिक)

हिरव्या मिरच्या उभ्या चिराव्या, तांदूळ धुवून ठेवावे. पालक पाण्यात ठेवावा. त्यात अर्धा चमचा हळद घालावी. पंधरावीस मिनिटांनी पालक चाळणीवर हाताने काढून ठेवावा. म्हणजे माती, कचरा, पाण्यात खाली बसलेला दिसेल, नंतर चाळणीतला पालक नळाखाली धरून खळखळून धुवावा.

हाताने अलगद पाणी जमेल तितके पिळून काढावे. पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, हिंग व लाल मिरच्या फोडणीस टाकून त्यावर पाणी फोडणीस टाकावे.

त्यात मीठ, धनेजिरेपूड, उभ्या चिरलेल्या मिरच्या, शेंगदाणे घालावे. उकळी आली म्हणजे तांदूळ व पालक घालावे. उकळी फुटली की दोन मिनिटे ठेवून नंतर पातेले गरम कुकरमध्ये ठेवावे. झाकण ठेवून भात अर्धा तास शिजवावा.

कुकर उघडला की हाताने शीत दाबून पहावे. मऊसर वाटल्यास चमचाभर तूप कडेने सोडावे. वाढतेवेळी ओले खोबरे वरून शिवरावे व टोमॅटो सॉसचे ठिपक द्यावेत. हा भात चवीला अगदी सौम्य आहे. त्यामुळे मसालेदार भाजी—आमटीबरोबर छान लागतो.

मसालेभात

२ वाट्या तांदूळ

अर्धी वाटी कोणतीही भाजी—मटारदाणे, फ्लॉवरचे तुकडे, चिरलेली कोबी, वांगी, तोंडली, भोपळी मिरच्या, यापैकी काहीच हाताशी नसल्यास ४ कांद्याच्या चौकोनी फोडी

२ चमचे काजू किंवा शेंगदाणे ( ऐच्छिक)

३ हिरव्या मिरच्या

२ चमचे आमटी मसाला किंवा चमचा गरम मसाला

१ चमचा धनेजिरेपूड

पाव चमचा तिखट

२ मोठे चमचे तेल

अर्धा चमचा मोहरी

अर्धा चमचा जिरे

पाव चमचा हिंग

अर्धा चमचा हळद

दीड चमचा मीठ

ओले खोबरे

कोथिंबीर

२ चमचे साजूक तूप

४ १/२ वाट्या गरम पाणी

तांदूळ धुवून तासभर बाजूला निथळत ठेवावेत. भाजी नीट करून ठेवावी. तोंडली किंवा वांगी चिरल्यानंतर पाण्यात ठेवावीत. नाहीतर रापतात ( काळी पडतात). पातेल्यात तेल तापवून मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे उभे तुकडे घालून त्यावर भाजी घालावी.

३—४ मिनिटे परतावेत. गरम पाणी ( या भाताला गार पाणी अजिबात वापरू नये) मीठ मसाला, तिखट इत्यादी सर्व घालून साध्या कुकरमध्ये ४० मिनिटे हा भात शिजवावा. भात तयार झाला की झाकण उघडल्यानंतर दोन चमचे साजूक तूप कडेने भातावर घालावे. म्हणजे तांदळाचे दाणे मोकळे दिसतात.

केशरी भात ( संत्री घालून)

१ वाटी बासमती तांदूळ

२०० ग्रॅम साखर

१ मोठे किंवा २ लहान संत्री

३ मोठे चमचे लोणकढे तूप

४ दालचिनीचे लहान तुकडे

४ लवंगा

४ वेलदोडे

पाव चमचा केशर ( दुधात भिजवावे)

१ मोठा चमचा संत्राच्या सालीचा कीस

८—१० बदाम व काजूचे काप

१०—१२ बेदाणे, खास प्रसंगी चांदीचा वर्ख व चेरीज

३—४ थेंब अॉरेंज रंग

तांदूळ धुवून तासभर बाजूला ठेवावे. ४ कप आधण पाण्यात तांदूळ वैरावे व १२—१३ मिनिटे प्रखर आंचेवर अर्धवट शिजवावे. चाळणीवर निथळावे व त्यावर थोडे गार पाणी ओतावे. एका ताटात भात पसरून गार करत ठेवावा.

साखरेत एक वाटी पाणी घालून एकतारीपेक्षा जरा कमी असा सुधारसाइतपत पाक करावा. एका जाड बुडाच्या पातल्यात तूप तापले की त्यावर लवंगा, दालचिनी व वेलदोडे फोडणीस टाकून त्यावर गार झालेला भात, संर्त्याच्या सालीचा कीस व पाक घालावा.

संर्त्याचा रस काढावा व ताजा रस भातात घालावा. रंगाचे थेंब व काजूबदाम, बेदाणे (निम्मे) घालावे झाकण ठेवावे. पाच मिनिटांनंतर वाफ आली की पातेल्यासारखी एक तवा ठेवावा. केशर शिंपडावे व मंद आंचेवर भात पुरता शिजवावा.

उरलेले काजूबेदाणे, वर्ख, चेरीज इत्यादी सजावट करून शोभिवंत भांड्यात भात ठेवावा.

नवरत्न पुलाव

१—१/२ कप तांदुळ

१०० ग्रा. फ्रेंचबीन

१०० ग्रा. वाटाणे

२ बटाटे

१०० ग्रा. गाजर

३ कांदे

४ टे. तुप

टोमॅटोचे स्लाइज

कोथिंबीर

१०० ग्रा. पनीर

थोडा कोबी

तळण्यासाठी तूप

मीठ

पनीरचे छोटे छोटे तुकडे करून तळावे. तांदळास वेगळे शिजवून घ्यावे. भाजीचे छोटे छोटे तुकडे करून उकळावे.

एका भांड्यात तूप गरम करून वाटलेला मसाला तळुन घ्यावा. २—३ मिनीट तळल्यानंतर भाज्या टाकाव्या व परत तळावे थोड्या वेळाने तांदुळ, मीठ, कांदा, पनीर टाकावे आणि २—३ मिनीट शिजवावे.

उरलेल्या तळलेल्या पनीराने व कांद्याने वरून सजवावे.

बिर्याणी

१ कप तांदुळ

३ कप उकळलेल्या भाज्या

५ कांदा

१ कप घट्ट दही

३ चमचे केशर

२ चमचे दूध

१ चमचा साखर

चवीनुसार मीठ

६ टेबलस्पून तूप

तळण्यासाठी तूप

वाटण्याचा मसालारू

२ मोठे कांदे

६ पाकळी लसूण

२ चमचे खसखस

२ चमचे शोप

१ इंच आले

४ लाल मिरच्या

४ हिरव्या मिरच्या

कडीपत्ता

लवंग

दालचिनी

५ मिरे

२ टेबल स्पून किसलेले नारळ

१—१/२ चमचे जीरे

३ चमचे धणे

तांदूळ मोकळे होईपयर्ंत शिजवावे, तांदळात आणि भाजीत मीठ टाकावे.

एका कढईत कांदा लाल होईपयर्ंत तळावा. कांदा काढून २ चमचे नारळाने दुध टाकावे आणि केसर टाकुन केसर मिसळेपयर्ंत चाळावे.यात भात मिळवून घ्यावा.

एका वेगळ्‌या भांड्यात २ चमचे तूप गरम करून वाटलेला मसाला ३—४ मिनीट भाजावा. थंड करून मीठ, दही व साखर टाकावी.

एका वेगळ्‌या भांड्यात ४ चमचे तूप टाकावे. तसेच थोडासा कांदा टाकावा. आता तांदुळ टाकावे. तसेच तांदुळावर थोडासा कांदा व वाटलेला मसाला टाकावा. त्यावर भाज्या पसरून घ्यावा.

उरलेला भात व कांदा टाकावा. वरून झाकुन द्यावे ४०० फॅ वर २५ मिनीट शिजवावे. वाढण्या अगोदर एका मोठ्या प्लेटमध्ये उलटे टाकावे. गरम गरम वाढावे.

पालक पुलावा

२ वाट्या तांदूळ

२ पालकच्या जुड्या

३/४ वाटी डाळीचे पीठ

२ चमच धणे पूड

४—५ हिरव्या मिरच्या

३ चमचा हळद

लहानसा आल्याचा तुकडा

२५ ग्रॅम काजू

२ कांदे

४—५ लवंगा

दालचिनीच्या ३—४ काड्या

३—४ वेलदोडे

१०—१२ काळे मिरे

मीठ

१ध्२ वाटी दही

पालकाची पाने हातानेच काढून घ्यावीत व धुऊन अगदी थोड्या पाण्यात वाफवून घ्यावीत. नंतर चाळणीवर ओतून सर्व पाणी काढून टाकावे.नंतर पालक, मिरच्या, आले वाटून घ्यावे.

तांदूळ धुऊन निथळत ठेवावेत. थोड्या तुपावर डाळीचे पीठ जरा भाजून घ्यावे.नंतर हळद, मीठ, धणेपूड, वाटलेला पालक व डाळीचे पीठ एकत्र करुन त्याचे छोटे छोटे गोळे करुन तळून घ्यावेत. सर्व मसाला थोड्या तुपावर भाजून घ्यावा.कांदा उभा चिरुन घ्यावा व थोड्या तुपावर कांदा लालसर रंगावर येईपयर्ंत परतून घावा.

काजूही बदामी रंगावर येईपयर्ंत परतून घ्यावेत. कांदा व काजू बाजूला ठेवावेत.थोड्या तुपात २ लवंगा व २ वेलदोडे टाकून फोडणी करावी. त्यात तांदूळ घालून जरा परतावेत.

नंतर त्यावर वाटलेला मसाला घालावा. १ध्२ वाटी दही व मीठ घालून भात करुन घावा.निखार्यावर किंवा कुकरमध्ये भात गरम राहील असाच ठेवा. आयत्या वेळी भात उकरुन काढल्यावर त्यावर पालकाचे गोळे, कांदा व काजू घालून वाढावा. हा भात फारच रुचकर लागतो.

काश्मीर पुलाव

बासमती तांदूळ

२ कप मिक्स फ्रुट टिन

४०० ग्रा. तूप किंवा तेल

२ चमचे काजू

१/२ कप मनुका

१ कांदा

मीठ ( मिक्स फ्रुट मध्ये अननस, चेरी, असावयास पाहिजे )

तांदुळ धुवून अर्धा तास भिजू द्यावे. एका भांड्यात २ चमचे तूप टाकावे. तसेच यात कांदा लाल करावा.

कांद्यास हलकासा भुरा झाल्यावर मीठ व तांदुळ टाकावे. पाणी ४ कापापेक्षा कमी ठेवावे. उकळी आल्यानंतर गॅस कमी करावा.

थोडी कमी राहिल्यावर उतरून घ्यावा. त्यात काजू, मनुके मिळवावे.

दुसर्या भांड्यात १ चमचा तूप टाकुन अर्धा मिक्स फ्रुट टाकावा आणि हलक्या हाताने उलट—पालट करून झाकून ठेवावे.

भांड्यास तव्यावर ठेवून द्यावे वाढते वेळी वरून फळे व काजू, मनुके याने सजवावे आणि जर पसंत असेल तर १ चमचे गुलाबजल किंवा केवडा जल शिंपडावे.

हैद्राबादी भात

५०० ग्रा. बासमती तांदुळ

एक कापलेला कांदा

२५० ग्रा. भेंडी

८—१० पाकळी लसूण

१ चमचा आले

चुटकीभर केशर

अर्धा चमचा बारीक कापलेला संर्त्याचे छिलके

५० ग्रा. मनुके

एक चमचा लिंबाचा रस

तीन मोठे चमचे कॉर्नफ्लावर तेल

सजविण्यासाठीरू

भाजलेले बादाम

बारीक कापलेली कोथिंबीर

तेलास एका पातेल्यात गरम करावे आणि कांदा टाकुन लालसर भाजावे. आता पेपरवर काढुन तेल सुकवून घ्यावे. म्हणजे कांदा कुरकुरीत होईल.

गॅस कमी करून लसूण आणि आले एक मिनीट भाजावे. तांदूळ, भेंडी, तिखट टाकावे, नंतर केशर आणि संर्त्याची साले टाकुन उकळावे.

उकळी आल्यावर गॅस कमी करावा आणि १५ मिनीट शिजवावे. पाणी सुकल्यानंतर मनुके टाकुन वरून लिंबाचा रस टाकावा. पाहिजे तर संर्त्याची साले काढुन टाकावे आणि कोथिंबीर व बदामाने सजवून वाढावे.

मटर पुलाव

१ कप बासमती तांदुळ

१ कप हिरवे मटार

२ कप पाणी

२ मोठे चमचे तूप

२ लवंग

कापलेला टोमॅटो

१ कापलेला कांदा

तेजपान

२ छोटी विलायची

१/२ चमच जिरे

१/२ चमच गरम मसाला

मीठ

बनविण्याच्या ३ मिनीट आधी तांदळास पाण्यात भिजवावे नंतर पाणी काढून फेकावे. तूप गरम करून कांदा लालसर भाजावा.नंतर लवंग, तेजपान, विलायची आणि जीरे टाकुन दोन मिनीट फ्राय करावे.

मटार, टोमॅटो गरम मसाला आणि मीठ टाकुन २—३ मिनीट फ्राय करून तांदुळ टाकावे.

२ मिनीटानंतर २ कप पाणी टाकावे आणि गॅस कमी करून पाणी सुकेपयर्ंत शिजवावे.

णी सुकल्यानंतर गॅस बंद करावा.

पनीर पुलाव

२ वाटी तांदूळ

२५० ग्रॅम पनीर

१ वाटी मटार सोललेले

२ टॉमेटो

२ हिरव्या मिरच्या

मीठ चवीप्रमाणे

१/२ लहान चमचा गरम मसाला

२ तुकडे दालचिनी

२ मोठे चमचे तूप

तांदूळ धूऊन १५ मिनीटे भिजवा. पनीर चौकोनी चिरुन घ्या. टॉमेटो मिक्सरमधून काढा. हिरवी मिरची बारीक चिरा. दालचिनी बारीक वाटून घ्या. एका कढईत तूप गरम करून दालचिनी गरम मसाला टाका.

याच्यात टॉमेटो पेस्ट व चिरलेली हिरवी मिरची टाकूण परता. टॉमेटो चांगला परतल्यावर पनीर, मटार, तांदूळ व ४ कप पाणी टाका. गॅस कमी करून झाकून शिजवा. तांदूळ शिजल्यावर गॅस बंद करा व दह्याबरोबर वाढा.

मशरूम पुलाव

२ वटी तांदूळ

१ डबा मशरूम

२५० ग्रॅम पनीर

३ कांदे

२ ढोबळी मिरची

२ गाजर

१ लहान चमचा मीठ

१/२ लहान चमचा गरम मसाला

५ चमचे तूप

तांदूळ धुऊन स्वच्छ करून तासभर भिजवा. मशरूम धुऊन बारीक व लांब चिरुन घ्या. पनीर चौकोनी चिरुन तळून घ्या. कांदा, ढोबळी मिरची, गाज्रर बारीक व लांब चिरुन घ्या. एका पातेल्यात तूप गरम करा. कांदा टाकून परता.

कांदा गुलाबीसर झाल्यावर गरम मसाला, मीठ व मशरूम टाकून शिजवा. आता ढोबळी मिरची, गाजर व पनीर टाका. तांदूळ टाकून ४ वाटी पाणी टाका व गॅस कमी करुन झाकून शिजवा. शिजल्यावर गरम—गरम वाढा.

मसालेदार बासमती पुलाव

बासमती तांदुळ २०० ग्रा.

हिरवी कोबी २०० ग्रा.

७—८ छोटी विलायची

थोडीशी काळी मिरची

एक—दोन इंच दालचिनी

एक छोटा चमच हळद

५ कप उकळलेले पाणी

६० ग्रा. मनुका

मीठ

६ मोठे चमचे तूप किंवा तेल

तांदळास चांगल्या प्रकारे धुवून घ्यावे. कोबीस कापून घ्यावे. एका कढईत तेल गरम करावे. त्यात कांदा, हिरवी कोबी टाकुन ३ मिनीट भाजावे.

त्यात मशरूम, तांदुळ, लसूण आणि सर्व मसाल्यास टाकुन एक मिनीटापयर्ंत शिजवावे.

उकळलेले पाणी आणि मीठ टाकुन झाकावे. १५ मिनीटपयर्ंत गॅस कमी करून ठेवावे.

आता याला गॅसवरून काढून १५ मिनीटापयर्ंत उघडे ठेवावे. त्यात मनुके टाकुन थोडेसे हलवून गरम गरम वाढावे.

शाही पुलाव

२ वाटी तांदूळ

१०० ग्रॅम पनीर

१ वाटी मटार

१ गाजर

३ कांदे

४—६ कळी लसूण

१ तुकडा आले

२ हिरव्या मिरच्या

१/२ वाटी अननस चिरलेला

१ मोठा चमचा काजू

१ मोठा चमचा बेदाणे

१ चमचा जीरे

४ लवंग

३ हिरवी वेलची

२ तुकडे दालचिनी

६ आख्खी काळी मिरी

मीठ चवीप्रमाणे

१/४ चमचा केशर

६ चमचे तूप

तांदूळ धुऊन तासभर पाण्यात भिजवा. पातेल्यात चार कप पाणी टाकून गॅसवर ठेवा. भिजवलेले तांदूळ पाणी काढून गॅसवरील पातेल्यात शिजवा. तांदूळ शिजल्यावर गॅस बंद करा. पनीरचे चौकोनी तुकडे करा. गाजर सोलून चिरुन घ्या.

मटारचे दाणे काढा. कांदा—लसूण व आले सोलून घ्या. कांदा बारीक चिरावा. आले—लसूण व हिरवी मिरची मिक्सरमधून काढा. केशर २ चमचे पाण्यात भिजवा. एका कढईत तूप गरम करून काजू तळून घ्या.

त्याच कढईत जिर्याची फोडणी देऊन कांदा परतून घ्या. नंतर लवंग, हिरवी वेलची, दालचिनी व काळी मिरी वाटून टाका. आता आले—लसूण—हिरवी मिरचीची पेस्ट टाकून परता.

पेस्ट चांगली परतल्यावर मटार, गाजर, पनीर, अननस, काजू, बेदाणे व चवीनुसार मीठ टाकून एकत्र करा. दोन मिनीटे परतून शिजलेले तांदूळ व केशर टाकून नीट एकत्र करा, गॅस बंद करून गरमा—गरम वाढा.

जिर्नयामिर्नयाची सौम्य डाळ

१ वाटी तुरीची डाळ

वाट्या पाणी

१५० ग्रॅम (१०—१२) फरसबीच्या शेंगा किंवा तोंडली

४ हिरव्या मिरच्या

अर्धा चमचा मिरी

अर्धा चमचा जिरे

१ चमचा मीठ ( किंवा जास्त)

३ चमचे तेल

अर्धा चमचा मोहरी

पाव चमचा हिंग

अर्धा चमचा हळद

अर्ध्‌या लिंबाचा रस

डाळ शिजत ठेवताना त्यात चिमूटभर हिंग, २ चिमट्या हळद, पाव चमचा तेल, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या व फरसबीच्या शेंगाचे तुकडे घालावेत, वांगी किंवा तोंडली असल्यास देठ काढून टाकून मध्य्म तुकडे करावेत व भाजी डाळीत घालून पूर्ण शिजवावी.

तव्यावर किंवा छोट्या कढईत वा पातेलीत पाव चमचा तेलावर जिरे व मिरे बदामी परतावे व त्याची पूड करावी. शिजलेल्या दाळीत ही पूड व मीठ घालावे.

तेलाची फोडणी करून (मोहरी, हिंग व हळद) डाळीवर ओतावी व डाळ खाली उतरवावी. लिंबाचा रस घालून लगेच वाढावी. पथ्यासाठी किंवा आजार्‌यासाठी फार चांगली आहे.

मसूर डाळ

१ वाटी मसूर डाळ

५—६ हिरव्या मिरच्या

४ लसूण पाकळ्‌या

१ सें.मी. आले (बारीक तुकडा)

२ कांदे

२ बटाटे

२ टोमॅटो

अर्धी वाटी ओले खोबरे

अर्धा चमचा साखर

१ चमचा मीठ

४ चमचे तेल किंवा तूप

अर्धा चमचा मोहरी

१ चमचा गरम मसाला पावडर

मिरच्या, आले व लसूण जाडसर खरडावी किंवा कुटावी व डाळीत हा खर्डा घालून डाळ शिजवावी. बटाटे उकडावे व टोमॅटो शिजवावे. कांदे सोलून बारीक चिरावे.

बटाटे सोलून चिरावे. डाळीत टोमॅटो, बटाटे, मीठ, साखर व खोबरे घालावे. एका लहान पातेलीत तेल तापले की त्यात मोहरी घालावी.

कांदा घालून परतावा व गरम मसाला त्यात घालून ही फोडणी डाळीवर ओतावी. ५—७ मिनिटे डाळ मंद आंचेवर उकळू द्यावी. पोळी किंवा भाताबरोबर वाढावी.

मसाला डाळ

१ वाटी तुरीची डाळ

२ वाट्या पाणी

३ चमचे ओले खोबरे

अर्धा चमचा जिरे

अर्धा चमचा मिरे

४—५ सुक्या मिरच्या

४ लवंगा

१ इंच दालचिनीचा तुकडा

१ चमचा धने

मीठ

३ चमचे तेल

१ कांदा

अर्धे लिंबू किंवा २ टोमॅटो व कैरीच्या फोडी

फोडणीचे साहित्य (मोहरी, हिंग व हळद)

तव्यावर चमचाभर तेल घालून सर्व मसाल्याचे जिन्नस निरनिराळे भाजावे. एका ताटलीत काढावे. ओले खोबरे सर्वात शेवटी भाजावे. लवंगा व मिरे फुटताना उडतात व सुक्या मिरच्यांचा खकाणा उडतो.

मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर थोडे पाणी घालून हे पदार्थ एकत्र वाटावेत. डाळ शिजवून घ्यावी. त्यात वाटलेले मसाला व मीठ घालावे. कांदा बारीक चिरावा व उरलेला तेलात फोडणीस टाकावा.

जरा परतून डालीवर घालावा. खालीवर उतरवून लिंबाचा रस घालावा. कैरी किंवा टोमॅटो वापरायचा असल्यास डाळीबरोबरच शिजवावा.

उडदाचे वरण

२५० ग्रॅम आख्खे उडीद

२ कांदे

१ चमचा वाटलेले आले—लसूण

अर्धा चमचा जिरे

१ चमचे धनेपूड

२ हिरव्या मिरच्या

अर्धा चमचा तिखट

२ मोठे चमचे चांगले तूप किंवा लोणी

२ चमचे मीठ

४ चमचे चिरलेली कोथिंबीर

अर्था चमचा गरम मसाला

डाळ धुवून तीन तास भिजत ठेवावी. कांदे बारीक चिरावे. मिरच्यांना उभी चीर द्यावी. डाळीत कांदा, मिरच्या, आले—लसूण, जिरे, धनेपूड, तिकट घालून प्रेशरकुकरमध्ये डाळ शिजवावी.

(प्रेशरटाईम—१५ मिनिटे) कुकर निवाल्यानंतर उघडून डाळ चांगली घोटावी व पुन्हा चुलीवर मंद उकळत ठेवावी. मीठ घालावे व पुन्हा २—२ उकळ्‌या आल्या की वरून लोण्याचा गोळा, गरम मसाला व कोथिंबीर घालून वाढावी. पार्टीसाठी करायची असल्यास गरम डाळीवर अमूल लोण्याची एक वडी किंवा चमचाभर गोळा घालून टेबलावर ठेवावी. हे वरण अतिशय पौष्टिक आहे व थंडीच्या दिवसात अवश्य करावे.

मुगाची खडी डाळ

१ वाटी सालासकट मुगाची डाळ

अर्धा चमचा मीठ

१ लवंग

१ वेलदोडा

१ जायपत्रीचा लहान तुकडा

अर्धा चमचा जिरे

१ चमचा साजूक तूप

डाळ धुवावी व तुपाखेरीज सर्व जिन्नस घालावे. अडीच वाट्या गरम पाणी घालून डाळ कुकरमध्ये किंवा पातेल्यात शिजवावी. साध्या भाताबरोबर ही डाळ व कढी छान लागते. डाळ पळीएवढी घट्टसर असावी.

आवडीनुसार या डाळीत साधा शिजलेला भात मिसळावा व गरम डाळभात खावा. किंवा वेगवेगळे वाढून घेऊन चमचाभर तूप घालून खावी. वाढण्यापूर्वी गरम डाळीचा एक चमचा साजूक तूप घालावे.

चणाडाळीचे कोफ्ते करी

२५० ग्रॅम चणाडाळ

२ इंच आले

४—५ हिरव्या मिरच्या

मीठ

२ कांदे

६—७ लसूण पाकळ्‌या

२ लवंगा

अर्धा चमचा जिरे

३ वेलदोडे

तमालपत्र

१ वाटी दही

अर्धा चमचा तिखट

अर्धा चमचा धनेपूड

पाव चमचा हळद

अर्धा चमचा गरम मसाला

१ चमचा साखर

२ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर

तेल

डाळ दोन तास भिजत टाकावी. चाळणीत निथळावी. आले, मिरच्या व मीठ एकत्र भरडसर वाटावी. तेलाच्या हाताने या मिश्रणाचे लहान लाडू वळावेत व तेलात हे कोफ्ते तळून कागदावर निथळावेत.

कांदे बारीक चिरावेत. आले—मिरच्या—लसूण व कांदे एकत्र वाटावेत. एका जड बुडाच्या पातेल्यात कढईतल्या उरलेल्या तेलातले थोडे तेल (सुमारे ४ ते ६ चमचे) घालावे. तेल तापले की जिरे, लवंगा, तमालपत्र, वेलदोडे घालावे.

बदामी रंगावर आले की त्यात वाटलेला मसाला घालावा व परतावे. धनेपूड, तिखट, हळद एकत्र करून घुसळलेल्या दह्यात घालावी. नीट मिसळून दही व साखर मसाल्यावर ओतावी. तीन वाट्या पाणी घालून रस मंद उकळू द्यावा.

३—४ मिनिटे उकळल्यानंतर कोफ्ते घालावेत व पाच मिनिटे उकळू द्यावे. आंच अगदी कमी ठेवावी. वरून गरम मसाला व कोथिंबीर घालावी. चमचाभर अमूल किंवा साधे लोणी गरम करीवर घालावे व वाढावी.

पंजाबी डाळ

३०० ग्रॅम आख्खे काळे उडीद

१०० ग्रॅम राजमा

१ वाटी साय किंवा क्रीम

अर्धी वाटी दही

८—१० हिरव्या मिरच्या

अर्धा इंच आले (कीस)

१ चिमूट हिंग

चवीनुसार मीठ

उडीद व राजमा आदल्या रात्री भिजत ठेवावेत. सकाळी डाळ शिजवायच्या वेळी पातेल्यात क्रीम व हिंग एकत्र करून चुलीवर ठेवावे. दोन मिनिटे ढवळावे.

आंच अगदी कमी असावी. त्यात दही, मिरच्या, आले, उडीद, राजमा व मीठ घालावे. ढवळून चार वाट्या गरम पाणी घालावे व प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवावी

पालक सूप

३ वाट्या बारीक चिरलेला पालक

१ मोठा कांदा

अर्धी वाटी मुगाची डाळ

२ कप दूध

चवीनुसार मीठ

मिरपूड

कांदा बारीक चिरावा. डाळ व पालक धुवावा. तिन्ही एकत्र करून दोनकप पाणी घालून शिजवावे. चांगले घाटावे. दूध घालून घुसळावे व सूपच्या गाळणीवर गाळून घ्यावे. चवीनुसार मीठ व मिरपूड घालावी.

प्यायला देताना पनीरचा चुरा, ब्रेडचे तळलेले तुकडे किंवा गाजराचा अर्धा चमचा कीस घालून सजवावे व गरमगरम पिण्यास द्यावे.

टेस्टी कढी पकोडा

२ कप बेसन

१ध्२ कप बारीक चिरलेला कांदा

६ बारीक चिरलेल्या हि. मिरच्या

१ लहान चमचा लाल तिखट

मीठ चवीनुसार

२ मोठे चमचे तेल

पकोडे तळण्यासाठी आणखी वेगळं तेल

५ कप आंबट दही

६ मोठे चमचे बेसन

१ लहान चमचा मोहरी

१ध्२ लहान चमचा हळदपूड

६ उभ्या चिरलेल्या हि. मिरच्या

१ इंच बारिक चिरलेला आल्याचा तुकडा

चिमूटभर हिंग

४ कप गरम पाणी

मीठ चवीनुसार

१ लहान चमचा तेल

२ अख्ख्या लाल मिरच्या

कढी बनवण्यासाठी दह्यामध्ये बेसन व पाणी घालून हॅण्ड मिक्सरने एकजीव करुन घ्या.

एका मोठ्या पातेल्यात तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, हिंगाची फोडणी घाला. मग त्यामध्ये आलं, हि. मिरच्या व हळद घाला.

त्यानंतर दही—बेसनाचं मिश्रण व मीठ घाला. मोठ्या आचेवर मिश्राण उकळा. मग आच कमी करा. जवळपास १५ मिनिटं मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपयर्ंत शिजवा.

आता पकोड्यांसाठी बेसनमध्ये पाणी घालून घट्ट भजीसारखं पीठ तयार करा व ते व्यवस्थित फेटा.

यामध्ये चिरलेला कांदा, हि. मिरच्या, लाल तिखट, मीठ व गरम तेल घाला. पुन्हा एकवार फेटा. मग गरम तेलात याचे पकोडे तयार करा.

शिजलेल्या कढीमध्ये पकोडे टाका व ५ मिनिटं आणखी मंद आचेवर शिजू द्या. यानंतर सर्व्‌हींग बाऊलमध्ये कढी ओता.

एक चमचा तेल गरम करुन त्यामध्ये लाल मिरची परता व ही फोडणी कढीवर ओता.

ही कढी दिसायलाही छान दिसते.

मक्याची कोफ्ता करी

६ मक्याची कणसे

१०० ग्रॅम बेसन

१५० ग्रॅम बटाटे

१/२ वाटी दही

चिमूटभर सोडा

१/२ चमचा मिरपूड

१/२ चमचा जिरे

१/२ चमचा गरम मसाला

१/२ चमचा तिखट

५—६ हिरव्या मिरच्या बारिक चिरलेल्या

हळद, मीठ

१ कांदा

२ मोठे टोमॅटो

४—५ लसणीच्या पाकळ्‌या

१ आल्याचा तुकडा

१ चमचा गरम मसाला

हळद

मीठ

तिखट

मक्याची कणसे किसून घ्यावी. नंतर तो किस कुकरमध्ये वाफेवर शिजवून घ्यावा.बटाटे उकडून, सोलून घ्यावेत. नंतर सर्व वस्तू एकत्र करुन छोटे छोटे गोळे करावेत व तळून बाजूला ठेवावेत.

जजास्त तेलावर कांदा परतून घ्यावा. त्यावर वाटलेले आले व लसूण परतावा. नंतर हळद, तिखट व गरम मसाला घालून परतावे.पाण्याचा शिपका मारावा. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो व मीठ घालावे.

जरा परतावे.ताचे पाणी घालून रस दाटसर वाटाला, की कोफ्ते घालून उतरावे. कोफ्ते घातल्यावर उकळू नये. नंतर वरुन कोथिंबीर घालून सजवावे आणि गरमागरम पोळी किंवा रोटीसोबत खाण्यास द्यावे.

ओसामण

१ वाटी तुरीच्या डाळीचे घट्ट वरण

५—६ आमसुले

मीठ

गीळ

लवंग

दालचिनी

जिरे

कोथिंबीर

कढीलिंब

आल्याचा तुकडा

३—४ हिरव्या मिरच्या

वरणात पाणी घालून सारखे करावे. हिंग, जिरे घालून तुपाची फोडणी करावी.

फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कढीलिंब घालावा.त्यावर वरील वरणाचे पाणी घालावे.

मीठ व गूळ घालावा.लवंग, दालचिनी, जिरे व आले वाटून घालावे. थोडा काळा मसाला घालावा.

चांगले उकळले की उतरावे. वरुन थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

सलगमचा कुर्मा

३०० ग्रॅम सलगम

२ मोठे कांदे

३ चमचे खसखस

५—६ लसूणपाकळ्‌या

१ इंच आले

७—८ काळी मिरी

अर्धा चमचा जिरे

२ चमचे धने

२ तमालपत्र

१ चमचा मीठ

१ वाटी दही

अर्धा वाटी तूप किंवा तेल

अर्धी वाटी साय

आले—लसूण, खसखस, जिरे, मिरे, धने व कांदे थोडे पाणी घालून एकत्र बारीकवाटावे. कढईत तेल घालून त्यात तमालपत्र व वाटलेला मसाला घालावा व वास सुटेपयर्ंत चांगला परतावा.

त्यात सलगम व मीठ घालून अलगद ढवळावे. एक वाफ आली की दही घुसळून त्यात घालावे व दोन मिनिटे शिजू द्यावे. कुर्मा दाट वाटल्यास थोडे गरम पाणी अगोदर घालावे. उकळी आली की खाली उतरवावे.

वाढण्यापूर्वी घोटलेली साय वर घालावी व नंतर पानात किंवा वाटीत कुर्मा वाढावा.

सोपा चना मसाला

२५० ग्रॅम काबुली चणे

इंच आले

४ हिरव्या मिरच्या

२ चमचे गरम मसाला पूड

१ चमचा लाल तिखट

२ चमचे धने—जिरेपूड

अर्धी वाटी तेल

चवीनुसार मीठ

आदल्या रात्री चणे भिजत घालावेत. सकाळी पाणी ओतून निथळावे. आले किसावे, मिरच्या उभ्या चिराव्या. प्रेशर कुकरमध्ये ३ कप पाणी उकळले की चणे घालावेत.

प्रेशर टाईम १५ मिनिटे शिजवावेत. कुकर गार झाल्यावर उघडावा. चणे चाळणीवर ओतून निथळावे. एका पातेलीत घालून सर्व मसाला व मीठ चण्यात घालून मिसळावे.

आल्याचा कीस व मिरच्या वरच्या थरावर पसराव्या. छोट्या पातेलीत तेल कडकडीत तापवावे चण्यांवर ओतावे. पाच मिनिटे मंद आंचेवर उकळू द्यावे. परदेशात शिजलेल्या चण्याचे डबे मिळतात. त्यात मीठ असल्यास मीठाचे प्रमाण थोडे कमी करावे.

सुंदर आमटी

१/२ किलो टोमॅटो मोठे

३/४ बटाटे उकडून

नारळाची १ वाटी

२ कांदे बारीक चिरुन

मीठ

तिखट

साखर

टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी कराव्यात. बटाटे उकडून, साले काढून मोठ्या फोडी कराव्यात. थोड्या बटाट्यांच्या फोडी पाण्यात कुसकरून ठेवाव्यात, म्हणजे आमटी दाट होतो. ओले खोबरे थोडेसे वगळून ठेवावे व बाकीच्या नारळाचे दूध काढून तयार ठेवावे.

तुपावर मोहरी टाकून कांदा परतून घ्यावा. त्यात टोमॅटोच्या फोडी टाकून थोडे पाणी घालावे. जरा दोनचार उकळ्‌या आल्या, की बटाट्यांच्या फोडी, पाण्यात कुसकरलेले बटाटे व नारळाचे दूध घालावे. नंतर त्यात तिखट, मीठ व साखर घालावी. ओले खोबरे घालावे.

रस जरा जास्तच असला पाहिजे. आमटी फार सुंदर होते. (हळद व गुळ घालू नये)

सिंधी बेसन करी

५ टेबलस्पून बेसन (शिग लावून)

१ लिंबाएवढी चिंच

३—४ आमसुले

७—८ भेंड्या

१०—१२ गवारीच्या शेंगा

१०० ग्रॅम दुधी

१—२ छोटी गाजरे

२ मोठे बटाटे

१/२ चमचा मेथी

१/२ चमचा जिरे

१/२ चमचा मोहरी

थोडा हिंग

३—४ हिरव्या मिरच्या

३—४ लाल मिरच्या

थोडा कढीलिंब

१ मूठ चिरलेली कोथिंबीर

थोडे तिखट

मीठ

३—४ टेबलस्पून तेल

थोड्या पाण्यात चिंच भिजत घालावी. १ लिटर पाणी उकळायला ठेवावे. त्यात चिंचेचा कोळ घालावा. भाज्यांचे तुकडे ह्या पाण्यात शिजवून घ्यावेत.

२ टेबलस्पून डाळीचे पीठ १ ग्लास पाण्यात घालून सारखे करावे. एका पातेल्यात तेल तापत ठेवावे. नंतर त्यात मोहरी, जिरे व मेथी घालून फोडणी करावी. त्यावर उरलेले डाळीचे पीठ घालून लालसर होईपयर्ंत परतावे.

नंतर त्यात वरील भाज्यांचे गरम पाणी, हळद, वाटलेल्या मिरच्या, कढीलिंब, तिखट, मीठ, कोथिंबीर घालावी. उकळी आली की गार पाण्यात कालवलेले पीठ ओतावे.आमसुले व भाज्यांचे तुकडे घालावे. करी गरमच

माँ दी दाल

१ कप उडीद डाळ

१/२ कप राजमा

४ कप पाणी

१ तुकडा कापलेले आले

४ पाकळी कापलेला लसुण

१ कापलेला कांदा

३/४ चमच गरम मसाला

२ कापलेली हिरवी मिरची

१/२ चमचे हळद

१ चमचा मीठ

२ मोठे चमचे तेल

३/४ चमचे जीरे

१ जुडी कापलेली कोथिंबीर

२ मोठी कापलेली टोमॅटो

३/४ चमचे लाल मिरची

उडीद व राजम्यास ४ कप पाणी व एक चुटकी मीठ टाकुन उकळावे. तेल गरम करून जीरे टाकावे.

नंतर कांदा, लसूण, आले व हिरवी मिरची फ्राय करावी. मीठ, वाटलेली लाल मिरची व हळद टाकून एक मिनीट फ्राय करावे, नंतर टोमॅटो टाकावे.

३ मिनीटानंतर उकळलेली डाळ टाकावी आणि चमच्याने चांगली घोटावी, ४—५ मिनीट उकळल्यानंतर कोथिंबीर व गरम मसाला टाकावा आणि तंदूरी पोळी बरोबर गरम गरम खावी.

टोमॅटोचे सांबार

५०० ग्रॅम टोमॅटो

१ मोठा कांदा

१/४ वाटी मसुराची डाळ

२ हिरव्या मिरच्या

१ चमचा तिखट

२ चमचे सांबार मसाला

मीठ

साखर

कडीपत्ता

कांदा व टोमॅटो बारीक चिरावेत. नंतर मसुराची डाळ, कांदा व टोमॅटो एकत्र करुन शिजवून घ्यावेत.

नंतर त्यात थोडे पाणी घालून पुरणयंत्रातून काढावे. त्यात तिखट, मीठ, साखर व सांबार मसाला घालावा.

हिंग, मोहरी, हळ्‌द घालून तेलाची फोडणी द्यावी.फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कडीपत्ता घालावा.

गुजराती कढी

८—१० वाट्या बेताचे आंबट ताक

५—६ मिरच्या

आल्याचा तुकडा

२ टेबलस्पून डाळीचे पीठ

मीठ

थोडासा गूळ

२—३ लवंगा

१ दालचिनीचा तुकडा

१/२ चमचा मोहरी

मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावेत. डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घ्यावे व ताकात घालावे. गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी.

थोडा कढीलिंब व कोथिंबीर टाकावी.नंतर हिंग, जीरे व ५—६ छोट्या लाल मिरच्या घालून तुपाची फोडणी द्यावी. ही कढी थोडी दाट असते. हळद घालू नये.

चण्याची डाळ

२०० ग्रा. चण्याची डाळ

कापलेला १ कांदा

२ पाकळी लसूण

१ तुकडा कापलेले आले

२ कापलेली टोमॅटो

१/२ चमचे जीरे

१/२ चमचे गरम मसाला

१/२ चमचे आमचूर

१ मोठा चमचा तेल

मीठ

चण्याच्या डाळीस कमी पाण्यात उकळावे पाणी काढून अलग ठेवावे. तेल गरम करून जीरे व कांद्यास फ्राय करून लसूण व आले टाकुन २ मिनीट भाजावे.

गरम मसाला, आमचूर व मीठ टाकून चाळावे नंतर डाळ टाकावी आणि ३—४ मिनीट शिजवावे, टोमॅटो टाकावा व २ मिनीट शिजविल्यानंतर उतरून ठेवावे.

अख्खी मूगाची डाळ

२५० ग्रॅम मूग

२०० ग्रॅम टॉमेटो

१ तुकडा आले

४ हिरव्या मिरच्या

चवीप्रमाणे मीठ

लाल तिखट

हळद

धणे

आमसूल पावडर

१०० ग्रॅम तूप

मूग निवडून पाण्यात भिजवा. पातेल्यात २ ग्लास पाणी टाकून मूग टाका. हिरवी मिरची, आले चिरुन टाका, टॉमेटो बारीक चिरुन टाका.

मीठ टाकून पातेले झाका. गॅस मोठा राहू द्या. मधे—मधे गरजे प्रमाणे गरम पाणी टाकत रहा.

जर डाळ घट्ट हवी असेल तर वरुन पाणी टाकू नका. डाळ शिजल्यावर गॅस बंद करा. तूप गरम करुन लाल तिखटची फोडणी द्या.

वाढताना कोथिंबीर व आमसूल पावडर टाका.

पंचमेल कढी

१०० ग्रॅम बेसन

१५० ग्रॅम पालक

१०० ग्रॅम हरभर्‌याची पालेभाजी

५० ग्रॅम मेथी

दोन ५० ग्रॅम ची पालेभाजी मिळत असेल ती

हिंग

१ तुकडा आले

तूप

मीठ चवीप्रमाणे

लाल तिखट

हळद

धणे

सर्व पालेभाज्या निवडून बारीक चिरुन घ्या शिजवून मिक्सरमधून काढा. दह्यात बेसन व सर्व मसाले मिक्स करा. कढईत तूप टाकून कांदा व टॉमेटो परतून घ्या. बेसन मिक्स केलेली पेस्ट व पालेभाजीची पेस्ट टाकून भरपूर शिजवा. घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. कढी चविष्ट व प्रोटीन युक्त आहे.

चविष्ट डाळ आणि क

२५० ग्रॅम अख्खी उडीद

१ तुकडा आले

१०० ग्रॅम तूप

१०० ग्रॅम टॉमेटो

२—४ हिरव्या मिरच्या

चवीप्रमाणे मीठ

१/२ लहान चमचा हळद

१/२ लहान चमचा लाल तिखट

उडीद चाळून धुऊन घ्या. पातेल्यात उडद व पाणी टाकून शिजवायला गॅसवर ठेवा. आले—हिरवी मिरची व टॉमेटो बारीक चिरून टाका. मीठ टाकून पातेले झाका. गॅस मोठा ठेवा व पाणी उडीद शिजेल एवढेच टाका.

उडीद शिजल्यावर गॅस बंद करा. कढईत तूप टाकून फोडणी टाका. अख्खी लाल सुकलेली मिर्ची व सर्व मसाले टाका व फोडणी शिजलेल्या उडद मध्ये टाका.

तयार वाढताना लिंबू व कोथींबीर टाकून वाढा.

कढी पकौडा

२०० ग्रा. बेसन

२५० ग्रा. आंबट दही

दीड चमचे मीठ

१/२ चमचे हळ्‌द

१/२ चमचे जीरे

१ चमचा मिरची

१ जुडी कापलेली कोथिंबीर

१ चुटकी हिंग

८—१० पाने कढीपत्ता

२ लाल मिरची

१ मोठा चमचा तेल फोडणीसाठी

तळणासाठी अतिरिक्त तेल

कढईत तेल गरम करण्यास ठेवावे अर्ध्‌या बेसनात मीठ, मिरची, हींग, जीरे टाकून भिजवावे व पकौडे तळून घ्यावे.

दह्यात २ ग्लास पाणी टाकुन मिळवावे नंतर उरलेले बेसन मिळवावे व मोठ्या तोंडाच्या भांड्यात शिजण्यासाठी ठेवावे.

हळद, मिरची, मीठ आणि कोथिंबीर टाकुन आणखी १०—१५ मिनीट ठेवावे नंतर उरतवून पकोडे टाकुन द्यावे.

तेल गरम करून कढी पत्ता आणि लाल मिरची तळून कढीत वरून टाकावी भात व फुलक्यांबरोबर गरम गरम वाढावी.

पंचरत्नी डाळ

५० ग्रॅम तूरडाळ

५० ग्रॅम उडीद डाळ

जीरे

हिरव्या मिरच्या

२ टॉमेटो

हिंग

५० ग्रॅम चणाडाळ

५० ग्रॅम मूगडाळ

५० ग्रॅम मसूरडाळ

आंबट पावडर

१ तुकडा आले

मीठ चवीप्रमाणे

हळद

धणे पावडर

कोथिंबीर

तूप

सर्व डाळी निवडून, धुऊन पाणी टाकून तासभर ठेवा. एका पातेल्यात आवश्यकते प्रमाणे टाकून शिजवण्यासाठी डाळी टाका.

एक उकळी आल्यावर टॉमेटो व मीठ टाका. बाकी सर्व मसाले टाका.

सर्व डाळी शिजल्यावर गॅस बंद करा.

कढईत तूप गरम करून कांदा, आले, हिंग, जीरे परतून घ्या व याची डाळीला फोडणी द्या. कोथींबीर टाकून वाढा.

टोमॅटो सुप

१ किलो टोमॅटो

१/२ कटोरी साखर

१ बीट चमचा मीठ

१/२ चमचा काळी मिरची

ब्रेडचे छोटे तुकडे

सर्वात पहिले टोमॅटो पाण्यात उकळन्यासाठी ठेवावे जेव्हा टोमॅटो गळतील आणि पाणी सुकेल तेव्हा सुईच्या सह्याने त्यास छेदावे.

छेदल्यानंतर गाळुन घ्यावे. त्यात मीठ, काळी मिरची आणि साखर मिळवावी कमी गॅसवर शिजवण्यासाठी ठेवून द्यावे.

सुपास रंग येण्यासाठी थोडेसे बीट टाकावे, जर सुप घट्ट झाले तर थोडेसे पाणी मिळवावे.

१०—१५ मिनीट शिजल्यानंतर गॅस बंद करावा. खाते वेळी वरून तळलेल्या ब्रेडचे छोटे छोटे तुकडे टाकावे.

दुधी व चण्याची डाळ

२५० ग्रॅम चणा डाळ

२५० ग्रॅम दूधी

मीठ चवीप्रमाणे

लाल तिखट

हळद

धणे पावडर

गरम मसाला

आंबट (आमसूल) पावडर

जीरे

हिंग

तूप

चणा डाळ निवडून तासभर पाण्यात भिजवा. एक पातेले गॅसवर ठेऊन, दोन ग्लास पाणी टाका व चणा डाळ टाका. एक उकळी आल्यावर मीठ, हळद व चिरलेलेई दूधी टाका.

आता एकत्र डाळ व दूधी शिजू द्या. डाळ शिजल्यावर त्याच्यात आंबड पावडर व उरलेले सर्व मसाले टाका, तूप कढईत गरम करून जीरे—हिंगची फोडणी द्या व लिंबू पिळून गरम वाढा.

हॉट एंड चिली सूप

१ कप कोबी

१ कप गाजर

२ चमचे व्हिनेगर

२ चमचे कॉर्नफ्लावर

१/२ लहान चमचा काळी मिरी पावडर

मीठ आवश्यकतेनुसार

१/२ लहान चमचा लाल मिरची पावडर

१ मोठा चमचा चिली सॉस

२ लहान चमचे तेल

कोबी व गाजर बारीक चिरुन घ्या. एका भांड्यात तेल व लाल मिरची घ्या.

कोबी व गाजर टाकून परतून घ्या. १ ग्लास पाणी टाकून हलवा.

उकळी आल्यावर चिली सॉस टाका. मीठ व काळी मिरी पावडर टाका. थोड्याश्या पाण्यात कॉर्नफ्लावर टाका.

हे मिश्रण सूपमध्ये टाका व हालवत रहा. ५ मिनीटांनी गॅस बंद करा.

व्हिनेगर टाकून गरम—गरम सूप वाढा.

बटर पनीर मसाला

१०० ग्रा. पनीर

५० ग्रा. दही

२५ ग्रा. काजू

कोथिंबीर

मिरची

५० ग्रा. लोणी

कसुरी मेथी

२ कांदे

कांद्याला तळावे, पनीर तळावे, काजू दुधाने थोडे वाटून घेणे मग टोमॅटो व तळलेला कांदा बरोबर वाटावा. एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात जीरे व खडा मसाला टाकावा. त्यात आले व लसणाची पेस्ट टाकवी.

नंतर वाटलेला कांदा व टोमॅटो टाकावे या सवार्ंना मिक्स करून मीठ, मिरची व गरम मसाला टाकावा. कसुरी मेथीही टाकावी. वरून पनीर, दही व क्रीम टाकुन सजवावे.

पंचमेल सब्जी

२५० ग्रॅम बटाटा

४ वांगी

२०० ग्रॅम दूधी

१५० ग्रॅम वाटाणे

१ गड्डी कोथिंबीर

३—४ हिरव्या मिरच्या

थोडासा गरम मसाला

धणे पावडर

लाल तिखट

काळी मिरी

मेथी दाणा

जीरे

कांदाच्या बीया

बडीशेप

१०० ग्रॅम दूध

लाल तिखट पावडर

तूप फोडणीसाठी

तूप कढईत टाकून फोडणी द्या. मसाले परतून झाल्यावर कोथिंबीर व मिरची चिरून टाका. थोडा वेळ परतून सर्व भाज्या चिरून टाका. मीठ व बाकी मसाले टाकून परता. भाजी थोडी शिजल्यावर दूध टाका. आता कढई झाकून भाजी शिजवा.

गॅस कमीवर ठेवा. पाणी शिजल्यावर गरम मसाला टाका व गरम गरम वाढा.

बटाट्याची ठेचाभाजी

५०० ग्रॅम मध्यम आकाराचे बटाटे

अर्धा चमचा तिखट

१ चमचा मीठ (किंवा जास्त)

५ चमचे तेल

अर्धा चमचा मोहरी

अर्धा चमचा जिरे

पाव चमचा हिंग

अर्धा चमचा हळद

२ चमचे ओले खोबरे

२ चमचे चिरलेली कोथिंबीर

अर्धा चमचा वाटलेली हिरवी मिरची (ऐच्छिक)

अर्धा चमचा साखर

अर्धा लिंबू

बटाटे स्वच्छ धुवून सोलावे. खलात किंवा पाट्यावर बटाटे बारीक ठेचावे. ठेचल्यानंतर बटाटा काळा पडतो म्हणून लगेच पाण्यात घालावा. सर्व बटाटे ठेचल्यानंतर पुन्हा स्वच्छ धुवावे.

पातेल्यात तेल तापले की त्यावर मोहरी, जिरे, हिंग व हळद घालून ठेचा फोडणीस टाकावा. अर्धी वाटी पाणी त्यावर शिंपडून झांकण ठेवावे व भाजी शिजू द्यावी. अधूनमधून थोडे पाणी शिंपडून भाजी परतावी.

शिजत आली की तिखट, मीठ, साखर व जास्त तिखट हवी असल्यास हिरवे तिखट घालावे. ढवळून भाजी पूर्ण शिजवावी. वाढताना वरून लिंबू पिळावे. ओले खोबरे व कोथिंबीर घालून वाढावी.

पनीर टिक्का

२०० ग्रा. पनीर

१०० ग्रा. दही

२५ ग्रा. मैदा

लसूण

१/२ चमचा जीरे पावडर

१/२ चमचा गरम मसाला

१ मिली. अॉरेंज कलर

५० ग्रा. बटर

७५ ग्रा. टोमॅटो

३० मिली. क्रीम

१/२ चमचा लाल मिरची

१/२ चमचा कसुरी मेथी

मीठ

दह्यामध्ये अॉरेंज कलर, मैदा, मीठ, जीरे व गरम मसाला घुसळावा. पनीरचे तुकडे तळावे, एका पातेल्यात लोणी टाकून त्यात अदरक—लसूण टाकूण २ मिनीट भाजल्यावर कापलेले टोमॅटो, लाल मिरची पावडर टाकून परत भाजावे.

नंतर दही क्रीम टाकून भाजावे. त्याने तूप सोडल्यानंतर कस्तूरी मेथी टाकावी. पनीर बाउलमध्ये जमवावे. नंतर क्रीम व कोथिंबीर सजवावे.

कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी

१ किलो कॉलीफ्लॉवर

१ वाटी धने

अर्धा चमचा हळद

१ चमचे तिखट

१० लसूण पाकळ्‌या

५ चमचे तेल

अर्धा चमचा मोहरी

१ चमचा मीठ (किंवा जास्त)

फ्लॉवर नीट करून बारीक चिरावा किंवा आवडीनुसार मध्यम तुरे ठेवावे. धुवून पंधरा मिनिटे पाव चमचा हळद घातलेल्या पाण्यात बुडवून ठेवावा. नंतर चाळणीवर निथळत ठेवून पुन्हा त्यावर साधे पाणी घालावे.

एकीकडे लसूण, धणे, हळद व तिखट कच्चेच पाट्यावर वाटून घ्यावे. पातेल्यात तेल तापलेकी त्यात मोहरी घालवी. तडतडला की वाटलेला मसाला खमंग परतावा. खाली उतरवून त्यात कॉलीफ्लॉवर घालावा व अलगद ढवळावे.

थोडा पाण्याचा शिपका देऊन पाण्याचे झांकण ठेवावे व मंद विस्तवावर भाजी ठेवावी. दहा मिनिटांनंतर मीठ व वाटल्यास थोडे पाणी घालून भाजी पूर्ण शिजवावी.

मसाला राजमा

५०० ग्रॅम राजमा

१ कप ताजे दही

३ कांदे

३ इंच आले

४ हिरव्या मिरच्या

१ चमचा धणे पावडर

अर्धा चमचा हळद

अर्धा चमचा तिखट

अर्धा चमचा गरम मसाला

२ चमचे क्रीम

तीन चमचे तेल

मीठ

कोथिंबीर

राजमा रात्र भर पाण्यात भिजवून ठेवा. पाण्यात चिमूटभर सोडा मिसळा. याच पाण्यात सकाळी राजमा उकळा. नंतर पाणी काढून टाका. पातेल्यात तूप गरम करा. त्यात आले.

कांदा, हिरवी मिरची गरम करा. आता त्यात दही आणि राजमा टाका. थोडा वेळ भाजा नंतर पाणी टाकून उकडा. एक दोन उकळ्‌या आल्यावर गरम मसाला व क्रीम टाका. कोथिंबीर टाकून चूली वरून उतरून घ्या.

भरली टोमॅटो

१/२ कप दही

५ टोमॅटो

५० ग्रा. वाटाणे

२ मोठी चमचे टोस्टचा चुरा

१ मोठे चमचे लोणी

२ उकडलेले बटाटे

कापलेला कांदा

मीठ

मिरची

धणे

हळद

हिरवी मिरची

कोथिंबीर

जीरे

गरम मसाला

बटाट्यामध्ये पनीर, हिरवी मिरची, कोथींबीर, उकडलेले वाटाणे, टोस्ट चूरा, लोणी, मीठ मिरची, चांगल्या रीतीने एकत्र करावे व टोमॅटोच्या आतमध्ये भरावे.

कढईत तेल टाकून जीरे, कापलेली मिरची, कांदा टाकून लाल करावे. त्यानंतर यात टोमॅटो भरण्याआधी टोमॅटोच्या आतील काढलेला भाग एकत्र करावा व दही टाकून भाजावे.

आता भरलेली टोमॅटो यात सोडून पाणी टाकून झाकावे. गरम झाल्यावर कोथिंबीर, क्रीम, गरम मसाला टाकावा.

मेथी मटर मलाई

१०० ग्रा. हिरवे मटार

२ चमचे मलाई

२ छोटे जुडी मेथी

४ हिरवी मिरची

एक टोमॅटो

२ चमचे साखर

२ चमचे मावा

१ कप दूध

४ चमचे वाटलेला पालक

थोडी हळद

२०० ग्रा. काजू

५० ग्रा. खरबुज बी

२ कारले

४ चमचे तेल

१०० ग्रा. मावा

४ लवंग

४ छोटी विलायची

४ काळे मिरे

२ तेज पान

२ चमचे आले लसणाची पेस्ट

१ लि. पाण्यात काजू आणि खरबूज बी मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावी. कढईत तेल टाकून लवंग, विलाईची, तेजपान काळीमिरे आणि आले लसणाची पेस्ट टाकून भाजावे. यात मावा टाकून व्यवस्थित मिळवावे.

१ ग्लास पाणी, काजू—खरबुज पेस्ट आणि एक कप दूध टाकावे. १०—१५ मिनिटे परतून शिजवावे म्हणजे मिश्रण फाटणार नाही.

चांगल्या तर्हेने उकळ्‌ल्यावर चवीनुसार त्यात मीठ टाकावे, आता कमी गॅस करून अर्धा तास शिजवावे. काजू ग्रेवी तयार आहे.

हिरवे मटर व मेथीची पाने तोडून उकळावे थंड झाल्यावर त्यास पिळून घ्यावे आता या मिश्रणात काजू ग्रेवी टाकावी. यात थोडीसी हळद, पालक, मेथी, हिरवे मटार, मलाई, टोमॅटो, हिरवी मिरची टाकून चांगल्या प्रकारे मिसळावी.

५—१० मिनिट शिजवावे. २ चमचे क्रीम टाकावे. डिशमध्ये ठेवून क्रीम आणि कारल्याच्या तुकड्यांनी सजवावे.

मुगलई दम आलू

८ बटाटे

११५ ग्रा. मावा

तळणासाठी तूप

४ कापलेली काजू

६ कापलेली मनुका

१ हिरवी मिरची

मीठ

काळे मिरे

२ कांदे

२ हिरवी मिरची

१ आल्याचा तुकडा

१/२ चमचा हळद

२ चमचे मीठ

५ लाल मिरची

५ पाकळी लसूण

बटाट्यांना सोलून शिजेपयर्ंत तुपात तळावे. आतील काढलेला भाग कुस्करून घ्यावा बटाट्यांना भरण्यासाठी बनविलेल्या मसाल्याने भरावे. बटाटे कुस्करलेल्या बटाट्याने टोमॅटोला २ कप पाण्यात टाकून सूप बनवून घ्यावे.

एका पातेल्यात तूप गरम करून वाटलेला मसाला टाकावा व ३—४ मिनिटे तळावे. लवंग, दालचिनी व वेलची टाकावी व तळावे, टोमॅटो सूप, क्रीम व मीठ टाकून भाजावे. १ध्२ चमचे साखर टाकावी. जेव्हा आपणास वाढायचे असेल तेव्हा उकळत्या रसात तळलेले बटाटे टाकावे तसेच गरम—गरम वाढावे.

भरलेली शिमला मिरची

शिमला मिरची

३ उकडलेले बटाटे

अर्धा कप वाटाणे

एक टोमॅटो

सुके मसाले

तूप इच्छेनुसार

कांदा

शिमला मिरची पोकळ करून पाण्यात उकळवून घ्यावी. उकळल्यानंतर शिमला मिरची उलटी ठेवावी म्हणजे पाणी निघून जाईल.

आता एका कढईत एक पळी तूप टाकून जिरे भाजावे. दिड चमचा मीठ, २ चमचे धणे, एक चमचा हळद, १ध्२ चमचा तिखट, २ चमचे खटाई टाकुन भाजावे.

उकळलेले बटाटे व उकळलेले वाटाणे टाकुन हलवावे. टोमॅटो टाकावे व चांगल्या तर्हेने फेटावे मिश्रण बिलकुल सुके झाले पाहिजे.

आता शिमला मिरचीत हे मिश्रण चांगल्या तर्हेने दाबून दाबून भरावे.

आता एक कढईत तूपात शिमला मिरची तळावी. पाहिजे तर ओव्हन मध्ये बेक करावी.

मक्याची कोफ्ता करी

६ मक्याची कणसे

१०० ग्रॅम बेसन

१५० ग्रॅम बटाटे

१/२ वाटी दही

चिमूटभर सोडा

१/२ चमचा मिरपूड

१/२ चमचा जिरे

१/२ चमचा गरम मसाला

१/२ चमचा तिखट

५—६ हिरव्या मिरच्या बारिक चिरलेल्या

हळद

मीठ

१ कांदा

२ मोठे टोमॅटो

४—५ लसणीच्या पाकळ्‌या

१ आल्याचा तुकडा

१ चमचा गरम मसाला

हळद

मीठ

तिखट

मक्याची कणसे किसून घ्यावी. नंतर तो किस कुकरमध्ये वाफेवर शिजवून घ्यावा.बटाटे उकडून, सोलून घ्यावेत. नंतर सर्व वस्तू एकत्र करुन छोटे छोटे गोळे करावेत व तळून बाजूला ठेवावेत. जजास्त तेलावर कांदा परतून घ्यावा. त्यावर वाटलेले आले व लसूण परतावा.

नंतर हळद, तिखट व गरम मसाला घालून परतावे.पाण्याचा शिपका मारावा. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो व मीठ घालावे. जरा परतावे.ताचे पाणी घालून रस दाटसर वाटाला, की कोफ्ते घालून उतरावे.कोफ्ते घातल्यावर उकळू नये.

नंतर वरुन कोथिंबीर घालून सजवावे आणि गरमागरम पोळी किंवा रोटीसोबत खाण्यास द्यावे.

दही मिसळ

५०० ग्रॅम मटकी

७—८ हिरव्या मिरच्या

१ध्२ नारळ

लिंबाएवढा गूळ

मीठ

२ मोठे बारीक चिरलेले कांदे

२ मोठे उकडलेले चौकोनी तुकडे करुन बटाटे

१०० ग्रॅम बारीक शेव

१०० ग्रॅम चिवडा

२ वाट्या दही

आदल्या दिवशी मटकी भिजत घालावी. तिला मोड आल्यावर मटकी निवडून घ्यावी. तेलात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी द्यावी. त्यात मोड आलेली मटकी घालावी. जरा परतून थोडे पाणी घालावे व मटकी शिजू द्यावी.

मटकी शिजल्यावर त्यात वाटलेल्या मिरच्या, गूळ व मीठ घालून उसळ बनवावी. कोथिंबीर व नारळ घालून उसळ खाली उतरवावी. उसळीत पाणी अजिबात राहता नये. उसळ गार होऊ द्यावी. आयत्या वेळी प्लेटमध्ये २ डाव उसळ घालावी.

नंतर त्यावर थोडा बारीक चिरलेला कांदा घालवा. बटाटाच्या फोडी घालाव्यात. नंतर त्यावर चिवडा व बारीक शेव घालावी. वरती १ टेबलस्पून गोड व घट्ट दही घालावे व बटर लावून भाजलेल्या पावाबरोबर सर्व्‌ह करावे.

लाल भोपळ्‌याचे कबाब

५०० ग्रॅम लाल भोपळा

२ लिंबू

१ वाटी डाळीचे पीठ

१ चमचा गरम मसाला

१ कांदा किसून

१ चमचा धणे जिरेपूड

१ लहान आल्याचा तुकडा वाटून

थोडेसे लाल तिखट

मीठ

२ अंड्यातले पांढरे

थोडा पुदिना

२ टेबलस्पून दही

भोपळ्‌याची साले काढून अगदी बारीक चिरुन घ्यावा. नंतर ह्या चिरलेल्या फोडी लिंबाचा रस घातलेल्या पाण्यात थोडा वेळ ठेवाव्यात. नंतर त्याच पाण्यात भोपळा शिजवून घ्यावा.

फोडी शिजल्या पाहिजेत, पण पाणी अजिबात राहता कामा नये. गार झाल्यावर सर्व मिश्रण पुरणयंत्रातून काढावे. नंतर त्याचे पेढ्याएवढे गोळे करुन हाताने जरा चपटे करावेत व तळावेत. टोमॅटो सॉससोबत खाण्यास द्यावे.

हरभरे बटाट्याची चटपटी

दीड वाटी चणे (हरभरे)

३०० ग्रॅम बटाटे

२ मोठे चमचे तेल

२ तमालपत्रे

१ चमचा जिरे

३ हिरव्या मिरच्या

३ लाल मिरच्या

७—८ लसूण पाकळ्‌या

१ सें.मी. आल्याचा तुकडा

१ वाटी चिरलेली कोथिंबीर

अर्धी वाटी सुक्या खोबर्याचा कीस

चवीनुसार मीठ

मोठ्या लिंबाएवढी चिंच

४ चमचे गूळ

हरभरे रात्रभर भिजत घालावे व सकाळी उपसून चाळणीवर निथळावे. बटाटे उकडून सोलावे. हरभरे कुकरमध्ये शिजवून घ्यावे. चिंच अर्धी वाटी पाण्यात तासभर भिजत ठेवावी. आले, लसूण, लाल व हिरव्या मिरच्या, खोबरे, निम्मी कोथिंबीर व जिरे एकत्र वाटावे.

चिंचेचा घट्ट कोळ काढावा. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापले की त्यावर तमालपत्र घालावे. वाटलेला मसाला त्यात घालून परतावा. शिजलेले चणे पाण्यासकट त्यावर घालावेत. मीठ घालावे व मंद आंचेवर ७—८ मिनिटे उकळू द्यावे.

नंतर त्यात चिंचेचा कोळ, बटाटे, गूळ, उरलेली कोथिंबीर घालून आवश्यक वाटल्यास थोडे गरम पाणी घालावे. पाच मिनिटे चुलीवर ठेवावे व नंतर खाली उतरवून जरा मुरले की पोळी, पुरीसोबत खायला द्यावे.

सरसोची भाजी

५०० ग्रा. सरसो

१५० ग्रा. पालक

५० ग्रा. पीठ

२ लाल मिरच्या

१ तुकडा कापलेले आले

२ कापलेल्या हिरव्या मिरच्या

१ कपलेला कांदा

१/२ चमचा गरम मसाला

४ पाकळी लसूण

१ चमचा लिंबाचा रस

१/२ कप ताजे क्रीम

३ मोठे चमचे तूप

चवीनुसार मीठ

सरसो व पालक धुवून बारीक कापावे. २ कप पाण्याबरोबर कूकरमध्ये तीन शिट्‌ट्या होईपयर्ंत शिजवावे. गव्हाच्या पिठास थोड्या पाण्यात मिळवून मीठ, तिखट, गरम मसाला, आले आणि क्रीम मिळवावे.

एक चमचा तुपातं पीठाच्या मिश्रणास सोनेरी भाजून उतरवून घ्यावे. एका दुसर्या कढईत उरलेले तूप गरम करून जीर, कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या तोडुन टाकावी व फ्राय झाल्यावर पिठाच्या मिश्रणास मिळवावे.

२ मिनीटानंतर सरसो व पालक टाकुन चांगल्या तर्हेने घोटावे. पाच—सात मिनीट शिजवून उतरवून घ्यावे वरून लोणी टाकावे आणि मक्याच्या चपातीबरोबर वाढावे.

फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी

कोफ्त्यासाठीः

१/२ किलो फ्लॉवर

३—४ हिरव्या मिरच्या

१/२ लिंबाचा रस

६० ग्रॅम चीझ

३ ब्रेडचे स्लाईस

१/४ चमचा गरम मसाला

थोडेसे वाटलेले आले

थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर

मीठ

ग्रेव्ही रू

२ मोठे कांदे

१ मोठा टोमॅटो

मसाला रू

५—६ लसूण पाकळ्‌या

१ आल्याचा लहानसा तुकडा

१/२ चमचा धणे

१ चमचा जीरे

१/४ चमचा हळद

१ चमचा हळ्‌द

१ चमचा तिखट

मीठ

फ्लॉवर किसून घ्यावा व अगदी थोड्या पाण्यात शिजवून घ्यावा. सर्व पाणी आटले पाहिजे. नंतर त्यात किसलेले चीझ बारीक चिरलेल्या मिरच्या, लिंबू रस, मीठ, आले, लसूण, गरम मसाला घालावा.

ब्रेडचा स्लाईस पाण्यात भिजवून हाताने दाबून त्यातले पाणी काढून टाकावे व तो फ्लॉवरच्या मिश्रणात घालावा. मिश्रण चांगले मळून घ्यावे व त्याचे छोटे छोटे गोळे करुन तळून घ्यावेत. ग्रेव्हीसाठी मसाला बारीक वाटून ठेवावा.

थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा. त्यावर वाटलेला मसाला घालून परतावे. नंतर त्यावर टोमॅटोचा रस घालावा. रस जरा दाटसर झाला की त्यात तळलेले कोफ्ते घालावे. आयत्या वेळी वरुन थोडासा गरम मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

हुसैनी कबाब मसाला

प्रमाणरू ४ व्यक्तिसाठी.

२ उकळलेले बटाटे

२ गाजर

१०० ग्रा. फेंच बीन्स

१ कांदा

२ चमचे टोमॅटो सॉस

५० ग्रा. काजू

१०० ग्रा. वाटाणे

थोडासा पुदीना

२ चमचे लाल मिरची

एक लिंबाची खाप

१ चमचे साखर

१०० ग्रा. कॉर्नफ्लोअर

चवीनुसार मीठ

थोडासा गरम मसाला

पालक ग्रेवी

हिरवी चटणी

चीज

गाजर, वाटाणे आणि फ्रेंच बिन्स उकळून घ्यावे त्यानंतर व पाण्यात काढून कुस्करून घ्यावे.

बटाटे आणि पुदीना बारीक कापून यात टाकावा आणि सर्व सामाग्रीस व्यवस्थित मिळवावे. नंतर यात लिंबू पिळून साखर व मसालाही टाकावा.

आता याचे छोटे छोटे गोळे बनवावे आणि ह्या गोळ्‌यांना कॉर्नफ्लोअरमध्ये गुंडाळून लालसर होईपयर्ंत तळावे.

नंतर पालक ग्रेवी, हिरवी चटणी व चीज याबरोबर गोळे प्लेटमध्ये सजवावे.

व्हेज सीग कबाब

१ वाटी शिजवलेले हिरवे वाटाणे

२ उकडलेले बटाटे

१ किसलेले गाजर

१ किसलेला बीट

२ टे. स्पू. पुदिन्याची पानं

२ टे. स्पू. चिरलेली कोथंबीर

आलं—लसुण—हिरवी मिरचीची पेस्ट

१ टी.स्पू. आमचूर पावडर

१ टी.स्पू. कसूरी मेथी

मीठ

अर्धी वाटी ब्रेडचा चूरा

तेल.

वरील सर्व साहित्य एकत्र करुन चांगले मळून घ्या. मिश्रण थोड घट्ट असावं. लोखंडी सीगवर हे मिश्रण दाबुन लावा. सीगं सेफ ग्लास ट्रे किंवा नॉनस्टिक ट्रे वर ठेवून वरुन थोडे तेल सोडून खरपूस ग्रिल करा.

ओल्या काजूची भाजी

२ कांदे

२ बटाटे

१ टोमॅटो

अर्धा ओला नारळ किसून

लसुण

आले

गरम मसाला पावडर

तिखट

हळद

मीठ

कोथिंबीर

तेल

काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत.

प्रथम कढईत तेल टाकून जीरे—मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे.

चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत.

नंतर भाजलेल्या कांदा — खोबर्याचे वाटप करुन ते त्यामध्ये घालावे व पुन्हा चांगले शिजवून घ्यावेत. उकळ्‌या आण्याव्यात.

उतरताना गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावे.

गोड भाकरी

दीड वाटी कणिक

अर्धी वाटी गूळ

पाव चमचा मीठ

२ चमचे साजूक तूप

अर्धी वाटी पाणी

तळण्यासाठी तूप

गूळ पाण्यात विरघळला की पाणी गाळून घ्यावे. कणकेत तुपाचे मोहन, मीठ घालून गुळाच्या पाण्याने पीठ भिजवावे. पीठ घट्ट असावे. लागल्यास थोडे पाणी किंवा कणिक यांचे प्रमाण वाढवावे.

अर्धा तास झाकून ठेवावे. त्याच्या नेहमीसारख्या भाकर्‌या लाटून तव्यावर भाजाव्या. दोन्ही बाजूंवर थोडे तूप सोडून चुरचुरीत परताव्या. एका ताटात पसरून गार होऊ द्याव्यात.

गंमत म्हणून एखादेवेळी त्यावर काजूचे काप भाकरी लाटतानाच पसरावेत म्हणजे लाटण्याने दाबले जातात. ही काजूची गोड भाकरी लोणी किंवा तूप व लोणचे, कोशिंबीर याबरोबर खावी.

पालक पुर्या

एक जुडी पालक

१ ते १—१/२ वाटी ओले खोबरे

३ मोठे चमचे डाळीचे पीठ

८—१० हिरव्या मिरच्या

२ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर

अर्धा चमचा हिंगची पूड

दोन चमचे तेल (फोडणीसाठी)

एक मोठा चमचा लिंबाचा रस

चवीनुसार मीठ

तळणीसाठी तेल

२—१/२ वाट्या कणिक

१—१/२ चमचा मीठ

कणकेत मीठ घालून पाण्यानी घट्ट भिजवावी व तासभर झाकून पालकाचे पाणी खुडून धुवावी व बारीक चिरावी. हिरव्या मिरच्या चमच्या भर मीठ एकत्र वाटावे त्यात कोथिंबीर, ओले खोबरे व लिंबू रस घालावा व हाताने मिसळून कालवावे.

पातेल्यात तेल तापले की त्यावर मोहरी घालावी. तडतडली की हिंग घालावा. त्यावर पालक घालून ५ मिनिटे परतावा. पालक शिजला की, नारळाचे मिश्रण व डाळीचे पीठ घालावे. तीन चार मिनिटे ढवळावे व खाली उतरवावे.

कोमट झाले की मिश्रणाचे लिंबाएवढे लहान गोळे वळावे. तेलाच्या हाताने कणिक जरा मळून घ्यावे. फुलक्या घेतो तेवढी कणकेची गोळी घेऊन त्याची जाडसर पुरी लाटावी त्यावर पालकाची एक गोळी ठेवावी. कडा एकत्र जुळवून पुन्हा गोल कचोरी सारखी वळावी.

पोलपाटावर किंवा ताटात थोडे पीठ भुरभुरावे. त्यात पीठावर बोटाने भाकरी थापत तशी जरा जाडसर पुरी थापावी. व कढईत बदामी रंगावर येईपयर्ंत तळावे.

या पुर्या गरमगरम तळून संध्याकाळच्या चहाबरोबर चांगल्या लागतात.

भटुरे

३२५ ग्रा. मैदा

१ चमचा मीठ

२ चमचे खमीर

फेटलेले अंडे

१२५ ग्रा. दही

२—३ मोठे चमचे गरम पाणी

तळणासाठी तेल

मैदा, मीठ आणि खमीर एका पेल्यात ठेवून व्यवस्थित मिळवावे. अंडे, दही आणि गरम पाणी टाकुन पीठास मळुन घ्यावे आणि ४—६ तासासाठी गरम ठिकाणी ठेवावे.

आता याचे बरोबर ६ भाग करावे आणि पुर्यांसाठी गोल—गोल लाटावी. तेल गरम करून भटूरे लालसर तळावे नंतर छोल्यांबरोबर गरम गरम खावे.

कांद्याचा पराठा

२ वाटी कणिक

६ कांदे

१ लहान चमचा वाटलेली बडीशेप

२ लहान चमचे मीठ

१/२ लहान चमचा लाल तिखट

१/२ लहान चमचा गरम मसाला

तूप आवश्यकतेनुसार

कांदा चिरुन घ्या. एका कढईत दोन मोठे चमचे तूप गरम करून कांदा परता. गुलाबी परतल्यावर गरम मसाला, लाल तिखट, बडीशेप व मीठ टाका. गॅस बंद करा. कांदा एकदम गार होऊ द्या.

कणिक मीठ टाकून नेहमीप्रमाणे मळून घ्या. अर्धा तास झाकून ठेवा. आता पिठाचे लहान—लहान पेढे करुन लाटा. १ पेढा पोळपटावर लाटा. थोडा लाटून त्याच्यावर तूप लावा.

थोडेसे कांद्याचे मिश्रण मधोमध ठेऊन बाजूने पीठ ताणून मिश्रण झाका व लाट, दोन्ही बाजू तव्यावर तूप लावून चांगल्या भाजा.

मुळ्‌याचा पराठा

२ ताजे किसलेले मुळे

१/२ चमचे लाल मिरची

१/२ चमचे वाटलेले अनारदाने

१ कांदा बारीक कापलेला

१ कापलेली हिरवी मिरची

१ जुडी कापलेली कोथिंबीर

१ कप तूप तळणासाठी

२५० ग्रा. गव्हाचे पीठ

१ चमचा तूप पीठात मळण्यासाठी

मीठ चवीनुसार

पीठात तुप व मीठ मिळवावे. नंतर किसलेले मुळे, कांदा, हिरवी व लाल मिरची व कोथिंबीर व मीठ मिसळून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन घट्ट मळावे.

मळलेल्या पिठाचे बरोबर सहा गोळे करून गोल पराठे लाटावे व दोन्ही बाजुस तूप लावून शेकावावे.

दही, हिरवी चटणी किंवा लोणच्या बरोबर गरम गरम वाढावे.

दुधी भोपळ्‌याचे धिरडे

१/४ कि. दुधी भोपळा

आले, हिरवी मिरची, लसुण यांची पेस्ट

मीठ

२ वाट्या रवा

२ चमचे तांदळाचे पीठ

प्रथम दुधी किसून घ्यावा व वरील सर्व मिश्रण एकत्र करावे आणि डोसाच्या पिठाप्रमाणे मिश्रण करुन घ्यावे.

नंतर निर्लेप तव्यावर पातळ धिरडे घालावेत.

गरमागरम टोमेटो सॉसबरोबर सर्व्‌ह करावे

दशमी पुरी

१ किलो पीठ

१/२ लीटर दूध

१/४ चमचे मीठ

१०० ग्रा. साखर

५० ग्रा. खसखस

१०० ग्रा. तूप किंवा तेल मोहना साठी

तळण्यासाठी वेगळे

दुधात साखर आणि थोडेसे पाणी मिळवून इतके गरम करवे की साखर विरघळावी आणि दूध फक्त कोमट रहावे. आता पिठात खसखस, मीठ आणि मोहन चांगल्या र्तहेने मिळवावे आणि दुधाच्या मिश्रणाने खुप कडक मळावे.

ओल्या कापडात अर्धा तास झाकावे. पुरी बनवते वेळी परत चांगले मळावे ज्यामुळे नरम होईल छोटी छोटी गोळी बनवून पुरी लाटावी. गरम तुपात किंवा तेलात तळावी.

ह्या दशमी र्पुया प्रवासात जाण्यासाठी उपयोगी आहेतच शिवाय घरी येणार्पुया पाहुण्यांना वाढण्यासाठीही मनमोहक आहेत. प्रवासात जात असाल तर थोड्या वेळ थंड करण्यासाठी ठेवून केळीच्या पानात पॅक कराव्या. बरेच दिवस र्पुया मुलायम आणि स्वादिष्ट राहून प्रवासात आपल्याला साथ देत राहतील.

चीझ व भाजीचा पराठा

१ कप मैदा

१ कप कणीक

६ टे. स्पून डालडाचे मोहन

१/४ कप किसलेले चीझ

१ लहानसा फ्लॉवर

१ गाजर

१ वाटी मटारचे दाणे

१ कांदा

३/४ हिरव्या मिरच्या

लहानसा आल्याचा तुकडा

२/४ लसूण पाकळ्‌या

थोडा पुदिना

कोथिंबीर

सर्व भाज्या किसुन घ्या. मटारचे दाणे व भाज्या थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्याव्यात. नंतर सर्व मिश्रण घोटून घ्यावे. पाणी अजिबात राहू देऊ नये.

नंतर त्यात मीठ, मिरच्या, आले, लसूण, पूदिना वगैरे घालून मिश्रण ढवळावे, चीझही घालावे. नंतर मिश्रण थंड होऊ द्यावे.

पिठात थोडे मीठ व मोहन घालून पोळ्‌यांच्या कणकेसारखी कणीक भिजवावी.

फुलक्याच्या आकाराच्या दोन पोळ्‌या करुन, मधे सारण पसरुन, कातण्याने कापून परोठे शेकावे. बाजूने तूप सोडावे.

उलटताना फार जपून व बेताने उलटावेत. हे परोठे चवीला फारच सुंदर लागतात.

दुधी भोपळ्‌याचा पराठा

३०० ग्रॅम दुध्या भोपळा

३ वाट्या कणीक

१ चमचा तिखट

१/२ चमचा हळद

१ चमचा मीठ

२ चमचे धणे—जीरे पूड

१ चमचा गरम मसाला

४ चमचे डालडयाचे मोहन

भोपळा किसुन घ्यावा. पाणी पिळून बाजूला काढून ठेवावे.नंतर सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे.

पीठ घट्ट असावे.जरुर वाटल्यास भोपळ्‌याचेच काढलेले पाणी वापरावे.नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करुन दोन्ही बाजूने शेकावेत व नंतर बाजूने तूप सोडावे.

नागौरी पुरी

२५० ग्रा. मैदा

५० ग्रा. सुजी

मीठ

ओवा चवीनुसार

तळणासाठी तूप

मैदा, रवा मिळवून पाणी टाकावे नागौरी पुरीची साईज पूरीपेक्षा थोडीशी मोठी असते, या अंदाजाने गोळे बनवा आणि लाटा.

कढईत तूप गरम करून अशा तर्हेने पुर्या तळाव्या की त्या फुटु नये.

नागौरी पुरी सुजी हलव्या बरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट लागते. यांना भाजी बरोबर देखील खाता येते.

हे एक स्वदिष्ट व्यंजन आहे.

सांज्याची पोळी

१ मोठी वाटी रवा

१—१/२ वाटी बारीक चिरलेला गूळ

१—१/२ वाटी पाणी

५—६ वेलदोड्यांची पूड

२—१/२ वाट्या कणीक

३ टेबलस्पून तेलाचे मोहन

थोड्या तूपावर रवा खमंग भाजावा व बाजूला ठेवावा. १—१/२ वाटी पाण्यात बारिक चिरलेला गूळ घालून गॅसवर ठेवावे. गूळ विरघळला की त्यात भाजलेला रवा घालून उलथण्याच्या टोकाने ढवळून झाकण ठेवून वाफ आणावी.

व मऊ शिरा करावा. वेलची पूड घालावी. रवा जाड असेल तर पाणी थोडे जास्त घालावे. कणकेत मीठ व तेलाचे मोहन घालून रोजच्या पोळीच्या कणकेसारखी कणीक भिजवून ठेवावी. शिरा निवला की चांगला मळून घ्यावा.

नंतर कणाकेची पारी करुन त्यात वरील सांज्याचे पुरणा भरुन उंडा तयार करावा. नंतर तांदळाच्या पिठीवर पोली लाटावी. दोन्हीकडून चांगली खमंग भाजावी व वरुन तूप सोडावे.

मिक्स दाल पराठा

कव्हरचे

३ वाट्या कणीक

१/४ वाटी बारीक रवा

मीठ

१/२ तेल

ओवा

सारणासाठी साहित्य रू

१ टे.स्पून आले—लसूण—मिरची पेस्ट

तिखट

मीठ

अनारदाणाध्आमचूर पावडर

कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून १ तास ठेवावे.नंतर मळून एकसारखे गोळे करावे. डाळी भिजवून २—३ तासांनी रवाळ वाटाव्यात.तेल तापवून ओव्याची फोडणी करावी. डाळीचे मिश्रण घालून परतून २ वाफा आण्याव्यात.

त्यात आले—लसूण—मिरची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, ग. मसाला घालून परतावे. आमचूर पावडर घालून उतरावे. कणकेचे व सारणाचे सारखे भाग करुन पराठा करुन लाटावे. हे पराठे पौष्टिक व चवदार होतात.

मिस्सी रोटी

१ वाटी कणिक

१ वाटी बेसन

१/२ लहान चमचा ओवा

१ चिमुट हिंग

१/२ लहान चमचा लाल तिखट

१/२ लहान चमचा मीठ

तूप गरजेप्रमाणे

पाणी पीठ मळण्यापुरते

कणिक व बेसन एकत्र करून बाकी सर्व मसाले टाका. एक मोठा चमचा तूप व पाणी टाकून पीठ मळून घ्या.

अर्धा तास ओल्या कापडाने झाका पीठाचा एक मध्यम आकाराचा पेढा घेऊन पोलपाटावर लाटण्याने लाटा गरम तव्यावर दोन्ही बाजूने भाजा.

एक बाजू पूर्ण तव्यावर भाजा व दुसरी थोडी भाजून झाल्यावर गॅसवर फुलवा. गरमागरम तूप लावून वाढा.

कोबीचा पराठा

५०० ग्रा. पीठ

२०० ग्रा. किसलेली कोबी

१ जुडी कापलेली कोथिंबीर

१ चमचा गरम मसाला

१/२ चमचा मीठ

३/४ चमचे लाल मिरची

१ तुकडा बारीक कापलेले आलं

२ कापलेली हिरवी मिरची

तूप तळण्यासाठी

पीठात एक चिमूटभर मीठ मिळवून घट्ट मळावे. कोबीत कोथंबीर, गरम मसाला, उरलेले मीठ, लाल मिरची, आले व हिरवी मिरची टाकुन थोड्याशा तुपात दोन मिनीट फ्राय करून उतरावे.

पिठाचे बरोबर ८ गोळे करावे. एकास लाटून कोबी भरावी व तव्यावर शेकावी. अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून दह्याबरोबर गरम गरम वाढावे.

भाजणीचे थालिपीठ

१ लहान कांदा

अर्धा चमचा मीठ

तिखट

पाव चमचा हळद

कोथिंबीर

१ पळी तेल

भाजणीमध्ये कांदा व कोथिंबीर चिरून घालावी. लाल तिखट, हळद, मीठ, तेल घालून मऊसर भिजवावी.

तव्याला तेल लावून थालिपीठ थापावे. मंद भाजावे व उलटून पुन्हा भाजावे.

टीप रू कांदा घालायचा नसल्यास हिंग घालावा.

उकडीचे मोदक

२ भांडी पाणी

चिमूटभर मीठ

१ चमचा लोणी किंवा साजूक तूप

अर्धा चमचा साखर

पुरणाचे साहित्य रू

१ नारळ

पाव किलो गूळ

५० ग्रॅम खवा (आवडीनुसार)

पुरणासाठी असणारा नारळ थोडा भाजून घ्यावा (पाणी सुटू नये म्हणून) त्यात गूळ, खवा व १ चमचा तांदूळ पीठी घालावी. याप्रमाणे पुरण आधीच तयार करून ठेवावे. २ भांडी पाणी उकळत ठेवावे.

पातेल्यातील पाण्याला अर्थवट उकळी आल्यावर त्यात लोणी, साखर घालावी. नंतर पाणी ढवळून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने एकाच बाजूने ढवळावे. झाकण ठेवून वाफ आणावी.

पंचा ओला करून तयार झालेली उकड गरम असतानाच मळून घ्यावी. तयार झालेल्या उकडीची पारी करुन त्यात पुरण भरावे व मोदकाचा आकार द्यावा. असे मोदक तयार करून १५—२० मिनिटे वाफवावेत.

हळदीच्या पानात वाफवल्यास स्वाद चांगला येतो.

पुरणाची पोळी

अर्धा किलो चणा डाळ

अर्धा किलो गूळ

अर्धा किलो कणीक

१ वाटी तेल

अर्धा चमचा मीठ

वेलची किंवा जायफळाची पूड

पाव किलो तांदूळ पीठ

डाळ २ तास भिजत घालावी. कुकरमध्ये चांगली शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ चाळणीत ओतून त्यातील पाणी (कट) काढून उरलेले पाणी निघून जाईपयर्ंत चांगली परतावी.

नंतर त्यात किसलेला गूळ घालून त्याचे पाणी होऊन ते आटेपयर्ंत कोरडी करावी व पुरणयंत्रात घालून वाटावी. वाटतानाच ७—८ वेलचीची पूड किंवा जायफळाची पूड घालावी.

त्यानंतर कणीक मैद्याच्या चाळणीने चाळून त्यात अर्धा चमचा मीठ व १ पळीभर तेल घालून कणीक सैल भिजवावी. ती भिजवून झाल्यावर त्यात थोडे तेल घालून मळावी. लिंबाएवढा गोळा घेऊन वाटीसारखा करून त्यात वाटलेल्या पुरणाचा गोळा घालून तांदळाच्या पिठावर लाटावी व मंद आचेवर भाजावी.

खरवस

१ लिटर चीक (खरवसाचे दूध)

१ कप दूध

३०० ग्रॅम गूळ

१०० ग्रॅम साखर

वेलची किंवा जायफळाची पूड

चीकाचे दूध घेऊन त्यात बारीक केलेला गूळ व साखर चांगले ढवळावे. त्यात १ कपभर दूध घालून गाळावे.

मग त्यात वेलचीची पूड किंवा अर्धे जायफळ किसून घालावे.

कुकरच्या २ भांड्यात सारखे घालावे.१५—२० मिनिटे शिटी न लावता वाफेवर ठेवावे. थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

खरवस उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाण्यास उत्तम.

कडबोळी

२ भांडी कडबोळ्‌याची भाजणी

दीड चमचा मीठ

अर्धा चमचा हळद

अर्धा चमचा हिंग

२ चमचे लाल तिखट

२ चमचे धने पूड

१ चमचा जिरे पूड

१ चमचा ओव्याची पूड

पाव वाटी तीळ

४०० ग्रॅम तेल

भाजाणीत अर्धी वाटी गरम तेल व वरील सर्व साहित्य घालून पीठ चकलीच्या भाजणीप्रमाणे भिजवावे.

हाताने चकलीप्रमाणे छोटी छोटी भुईचक्राएवढी कडबोळी करून मंद आचेवर तळावीत.कडबोळी १०—१५ दिवस छान टिकतात.

खव्याचे मोदक

खवा २०० ग्रॅम

पिठीसाखर १०० ग्रॅम

गुलाबपाणी दोन चहाचे चमचे

दूध चारध्पाच चहाचे चमचे भरून

केशर दोन कांड्या

एका भांड्यात खवा थोडा फेटून घ्या. केशर दुधात कलून ठेवा.खवा कोरडा झालेला दिसला की कोरड्या पाट्यावर चांगला वाटा. त्यावर थोडे केशर दूध टाका. मंद आचेवर कढई ठेवा. त्यात खवा घालून परता.

खवा घट्ट होऊ लागल्यावर त्यात थोडी साखर बाजूला काढून बाकी साखर टाका. मिसळा. थोडे घट्ट झाल्यावर उतरवा.हातावर थोडी थोडी साखर घेऊन खव्याच्या गोळ्‌यातून थोडे थोडे तयार मिश्रण घेऊन त्याचे मोदक वळाध्तयार करा. खा.

हळदीच्या पानात वाफवल्यास स्वाद चांगला येतो.

गव्हाच्या रव्याचा उपमा

पाव किलो गव्हाचा जाडसर रवा

१ वाटी चणा डाळ

४ चमचे खोबरे

कोथिंबीर

४—५ हिरव्या मिरच्या

मीठ

अर्धी वाटी तेल

चवीपुरती साखर

फोडणीचे साहित्य

गव्हाचा रवा थोड्या पाण्यात कुकरमध्ये शिजवून घ्यावा. डाळ भिजवून ती जाडसर वाटून घ्यावा. मिरची डाळीबरोबरच मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी. अर्धी वाटी तेलात हिंग, जिरे, हळद, मोहरी घालून फोडणी तयार करावी व त्यात वाटलेली डाळ परतून घ्यावी.

नंतर त्या डाळीत शिजवलेला रवा, मीठ व चिमूटभर साखर घालून मंदाग्नीवर परतावे. १५ मिनिटानंतर उपमा तयार होईल. त्यावर कोथिंबीर पसरून खाण्यास द्यावे. ह्यामध्ये मटार, काजू वगैरे घालून स्वाद वाढवू शकता.

रताळ्‌याची कचोरी

१ मूठ चिरलेली कोथिंबीर

१ वाटी खवलेले खोबरे

४—५ हिरव्या मिरच्या

५० ग्रॅम बेदाणा

मीठ

साखर

२५० ग्रॅम रताळी

१ मोठा बटाटा

थोडेसे मीठ

रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून, हाताने कुस्करून पुरणयंत्रातून काढून घ्यावेत.

त्यात थोडे मीठ घालावे. १ध्२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे.

रताळ्‌याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्या ठेवाव्यात. नंतर आयत्या वेळी वर्याच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात.

गरमगरम खायला द्याव्या. फार सुंदर लागतात. उपवासाला एकदम चांगल्या.

सुरळीच्या पाटवड्या

१ मोठी वाटी डाळीचे पीठ (बेसन)

१ मोठी वाटी आंबट ताक

१ मोठी वाटी पाणी

तिखट

मीठ

हळद

हिंग

१/२ वाटी ओले खोबरे

१ मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर

१ मोठा बारीक चिरलेला कांदा

१ बारीक चिरुन हिरवी मिरची

मीठ

थोडी साखर

थोडे लाल तिखट

१ पळी तेलाची फोडणी (थंड करुन घालावी)

जाड बुडाच्या पातेल्यात डाळीचे पीठ, ताक, पाणी, तिखट, मीठ, हिंग, हळद घालुन मिश्रण सारखे करावे. गुठळी राहु देऊ नये. नंतर हे पातेले गॅसवर ठेवून मिश्रण डावेने ढवळत रहावे.

खाली लागू देऊ नये. मिश्रण दाटसर होत आले की झाकण ठेवून वाफ आणावी. वरील पातेल्यातील १ध्४ चमचा मिश्रण एका स्टीलच्या थाळीला पसरुन लावून पहावे.

गार झाल्यावर जर ते उचलले तर चटकन निघाले पाहिजे. ही मिश्रण शिजल्याची खूण आहे. जर असे चटकन निघाले नाही तर पुन्हा एक वाफ आणावी. नंतर मंद गॅसवर मिश्रण ठेवून द्यावे.

स्टीलची ३—४ ताटे पुसून अगदी कोरडी करावीत. नंतर प्रथम ताटाच्या आतल्या बाजूला मोठा डावभर मिश्रण घालावे व टेबलस्पून ताटाला सारवल्यासारखे करावे. हे काम खूप झटपट व कौशल्याने करावे लागते.

मिश्रण ताटभर होत आले की हाताला थोडे तेल लावून ताटभर सारवल्यासारखे करावे. नंतर ताट पालथे घालून त्यावर पुन्हा डावभर पीठ घालुन सारवावे. असे सर्व करुन घ्यावे.

सारणासाठी कांदा चिरावा. सर्व वस्तू एकत्र करुन त्यावर गार फोडणी घालावी. जेवढी ताटे झाली असतील त्याप्रमाणे सारणाचे भाग पाडून एकेका ताटावर सारण पसरवावे. सूरीने कापून अलगद हाताने वड्या गुंडाळाव्यात.

चुरमुयांचा खमंग चिवडा

२ शेर चुरमुरे (मापी)

पावशेर चणे (मापी)

पावशेर खारे दाणे (मापी)

पावशेर तळलेली डाळ (मापी)

१ चमचा मीठ

१ चमचा तिखट

चमचा साखर

१ चमचा मेतकूट

थोडा कढिलिंब

२ डाव तेल.

तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करा.

त्यात कढिलिंब घालून परता.

त्यावर चुरमुरे घालून परता.

त्यावर तिखट, मीठ, साखर व मेतकूट घालून परता.

त्यावर चणे, दाणे व डाळ घाला. जरा परता व उतरवा.

चुरमुरे विकत घेताना नेहमी मापाचा भावातच मिळतात.

बीटाच्या वड्या

२५० ग्रॅम स्ट्रॉबेरी

४०० ग्रॅम पिठीसाखर

स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्यात घालून हलक्या हाताने बाहेर काढाव्यात. वरचे हिरवे देठ काढून टाकावे. नंतर त्यात पिठीसाखर घालून हाताने कुसकरावे. साखरेला जरा पाणी सुटले, की गॅसवर ठेवावे.

मंदाग्नीवर असू द्यावे. झाकण ठेवावे. नंतर हलक्या हाताने ढवळत राहावे. जाडसर पाक झाला की उतरावा. हा जॅम जास्त दिवस टिकत नाही.

मुगाच्या डाळीचा हलवा

२ वाट्या मुगाची डाळ

२ वाट्या साखर

३ वाट्या दूध

१—१/२ वाटी डालडा

१५० ग्रॅम खवा

७—८ वेलदोड्याची पूड

२५ ग्रॅम बेदाणा

थोडा पिवळा रंग

मुगाची डाळ भिजत घालून वाटावी. नंतर वाटालेल्या डाळीत २ वाट्या दूध घालून कालवावे व तूप तापल्यावर त्यात हे डाळीचे मिश्रण घालून चांगले मोकळे होईपयर्ंत परतावे.मग त्यात रंग घालावा.

नंतर साखर घालून मिश्रण जरा घट्ट झाले कि उतरावे.नंतर त्यात बेदाणा व वेलचीपूड घालावी. खव्यामध्ये १ वाटी दूध घालून सारखा करावा व खवा गॅसवर ठेवून जरा आटवून घ्यावा.आयत्या वेळी मुगाच्या डाळीच्या हलव्यात खवा घालून सर्व्‌ह करावे.

शिंगाड्याच्या पिठाचा

२ वाट्या शिंगाड्याचे पीठ

१ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट

२ वाट्या आंबटसर ताक

मीठ

मिरची

आले

जिरे

खायचा सोडा

सकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून भिजवत ठेवावे. २—३ तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या व आले, थोडेसे जिरे व सोडा घालून हाताने चांगले ढवळून घ्यावे.

नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तूपाचा हात लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये १ध्२ तास वाफवून घ्यावे. जरा निवल्यानंतर वड्या कापाव्यात. वरती थोडेसे ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. हा ढोकळा फार सुंदर लागतो.

मेतकूट

२५० ग्रॅम चणाडाळ

५० ग्रॅम उडीद डाळ

मूठभर तांदूळ

१ चमचा मोहरी

१ चमचा जिरे

८—१० लाल सुक्या मिरच्या

अर्धा इंच सुंठेचा तुकडा

१ चमचा हळद

१ चमचा हिंग

चणा डाळ, उडीद डाळ, तांदूळ, मोहरी, जिरे हे पदार्थ वेगवेगळे भाजावेत.मिरच्या गरम असलेल्या कढईत ठेवाव्यात.सुंठेचा तुकडा कुटून बारीक तुकडे करून हळद व हिंग हे सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक दळावेत.दळल्यावर पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे व कोरड्या बाटलीत भरावे.वसाळ्‌यात मेतकुटाचा फार उपयोग होतो.

पंचामृत

१०० ग्रॅम हिरव्या मिरच्या

१०—१२ पाने कढीलिंब

अर्धी वाटी भाजून सोललेले दाणे

कोथिंबीर

सुक्या खोबर्‌याचे कातलेले १५—२० तुकडे

पाव वाटी तिळाचे कूट

पाव वाटी दाण्याचे कूट

अर्धा चमचा मीठ

अर्ध्‌या लिंबाएवढी चिंच

१ लिंबाएवढा गूळ

अर्धा चमचा गोडा मसाला

अर्धी वाटी तेल

फोडणीचे साहित्य

तेलावर दाणे व खोबर्‌याचे तुकडे अर्धवट तळून झाले की त्यात १ चमचा मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीलिंब, मिरच्याचे तुकडे घालून परतून घ्यावे.त्यात दीड भांडे पाणी घालून तिळाचे व दाण्याचे कूट घालावे.

मीठ, चिंचेचा कोळ, मसाला, गूळ घालून उकळावे. उतरल्यावर कोथिंबीर घालावी. पंचामृत ५—६ दिवस चांगले टिकते.

कुळीथ पिठले

अर्धी वाटी कुळीथ पीठ

८—१० कढिलिंबाची पाने

३—४ हिरव्या मिरच्या

अर्धा चमच मीठ

कोथिंबीर

२ आमसुले

२ पळ्‌या तेल

फोडणीचे साहित्य

तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढिलिंबाच्या पाने घालून फोडणी करावी.त्यात ३ भांडी पाणी घालावे. ते थोडेसे उकळायला लागल्यावर त्यात मीठ, आमसुले घालावीत.

कुळथाचे पीठ पाण्यात कालवून घालावे व ढवळत राहावे. उकळी आली की खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व जेवताना गरम गरम द्यावे.

कारल्याचे पंचामृत

२०० ग्रॅम कारली

अर्धी वाटी खोबर्‌याचे पातळ तुकडे

अर्धी वाटी तीळ

अर्धी वाटी दाण्याचे कूट

५—६ हिरव्या मिरच्या

५—६ कढीलिंबाची पाने

अर्धी वाटी चिंचेचा कोळ

१ मोठा गुळाचा खडा

मीठ

तेल

मोहरी

हळद

हिंग

प्रथम कारली बिया काढून बारीक चिरावीत व धुवून पिळून घ्यावीत. नंतर तेलाची हिंग, हळद, मोहरी, कढीलिंब घालून फोडणी करावी आणि त्यात कारली व पाणी घालून चांगले शिजवावे.

चिंचेचा कोळ,तिळाचे कूट, दाण्याचे कूट व खोबर्‌याचे तुकडे शिजत आलेल्या कारल्यात घालावेत. नंतर त्यात मिरचीचे तुकडेमीठ व गूळ घालावा. चांगले शिजल्यावर पंचामृत तयार होते.