Death Script book and story is written by Dr Phynicks in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Death Script is also popular in थरारक in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
डेथ स्क्रिप्ट - कादंबरी
Dr Phynicks
द्वारा
मराठी थरारक
स्टॉकहोमच्या ग्रँड कॉन्सर्ट हॉलमधील भव्य व्यासपीठावर एक व्यक्ती उभे होते. सभोवतालचे वातावरण विजेच्या प्रवाहाप्रमाणे सळसळत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कौतुक, आदर आणि कुतूहल स्पष्ट दिसत होते. हजारो डोळे एकाच माणसाकडे लागले होते, ज्यांनी मानवतेला भविष्याचा आरसा दिला होता.
ते होते "डॉ. फिनिक्स" (Dr. Phynicks)
ज्यांचे वय ३० या आसपास होते. साडेपाच- सहा फूट उंच. चांगली व्यायामाने कसलेली शरीर यष्टी. त्यांचे केस आधीच काही प्रमाणात चांदीचे झाले होते, ते आज मंचावरील दिव्यांच्या प्रकाशात आणखीनच चमकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते आणि डोळे असे की जे कित्येक निद्राहीन रात्री आणि अथक परिश्रमाची साक्ष देत होते, ते डोळे आज अभिमानाने उजळले होते. त्यांनी काळ्या रंगाचा सूट घातला होता, जो त्यांच्या गंभीर व्यक्तिमत्वाला एक अनोखी शान देत होता. त्यांच्या हातातील नोबेल पुरस्काराचे पदक त्यांच्या संघर्षाचा अंतिम विजय दर्शवत होते.
अध्याय १---------------स्वप्न आणि सिद्धी-----------------------स्टॉकहोमच्या ग्रँड कॉन्सर्ट हॉलमधील भव्य व्यासपीठावर एक व्यक्ती उभे होते. सभोवतालचे वातावरण विजेच्या प्रवाहाप्रमाणे सळसळत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कौतुक, आदर आणि कुतूहल स्पष्ट दिसत होते. हजारो डोळे एकाच माणसाकडे लागले होते, ज्यांनी मानवतेला भविष्याचा आरसा दिला ...अजून वाचाहोते "डॉ. फिनिक्स" (Dr. Phynicks)ज्यांचे वय ३० या आसपास होते. साडेपाच- सहा फूट उंच. चांगली व्यायामाने कसलेली शरीर यष्टी. त्यांचे केस आधीच काही प्रमाणात चांदीचे झा
अध्याय २---------------पापाचा पहिला डाग----------------------------स्टॉकहोमच्या कॉन्सर्ट हॉलमधील टाळ्यांचा आवाज आता प्रयोगशाळेतील भिंतींमधून पूर्णपणे नाहीसा झाला होता. डॉ. फिनिक्स नोबेल पुरस्कार सोहळ्यासाठी परदेशात गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत, प्रयोगशाळा एका विचित्र, भयाण शांततेने भरली होती. या शांततेत फक्त वातानुकूलित यंत्राचा मंद आवाज ...अजून वाचा'क्रोनोस' यंत्राच्या आतून येणारी सूक्ष्म गुंजारव ऐकू येत होती. यंत्राचा निळा प्रकाश मंद झाला होता, जणू काही तेही आपल्या निर्मात्याच्या अनुपस्थितीने उदास झाले होते.पण या शांततेत, निशा मेहताच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. एका क्षणात, तिचे आयुष्य, तिची स्वप्ने आणि तिचे उद्देश बदलले होते. तिच्या डेस्कवर एक लॅपटॉपची स्क्रीन चमकत होती, ज्यावर एका ऑनलाइन लॉटरीच्या वेबसाइटचे पृष्ठ उघडले होते. तिच्या
अध्याय ३--------------डेथस्क्रिप्ट सक्रिय-------------------------काही दिवसांपूर्वी म्हणजे डॉ. फिनिक्स हे स्टॉकहोम ला जाण्याआधी, डॉ. फिनिक्स यांच्या प्रयोगशाळेतील शांततेत अचानक एक नवीन व्यक्तिमत्व दाखल झाले. त्याचे नाव होते कर्नल विक्रम सिंग. तो सैन्यात होता आणि अनेक गुप्त मोहिमांचा भाग होता. त्याच्या खांद्यावर ...अजून वाचाएक नवीन जबाबदारी होती - 'क्रोनोस' प्रकल्पावर आणि त्यात काम करणाऱ्या लोकांवर बारीक लक्ष ठेवणे. त्याला या प्रकल्पाच्या प्रचंड शक्तीची आणि संभाव्य धोक्याची जाणीव होती. सरकारने ‘क्रोनोस’च्या सुरक्षिततेसाठी एका विश्वासार्ह व्यक्तीची निवड केली होती आणि ती व्यक्ती म्हणजे कर्नल विक्रम सिंग होता.विक्रम सिंग एक उंच, मजबूत बांध्याचा माणूस होता. त्याचा चेहरा शांत आणि गंभीर होता, पण त्याच्या डोळ्यात एक तीक्ष्ण
अध्याय ४--------------जागरूकता--------------------डॉ. फिनिक्स स्टॉकहोममधून एक आठवड्यानंतर परत आले होते आणि त्यांच्या लॅबमध्ये कर्नल विक्रम सिंग यांची भेट झाली होती. नोबेल पुरस्काराचा सोहळा आणि जगभरातील कौतुक सोडून ते परत आपल्या प्रयोगशाळेत, आपल्या ‘क्रोनोस’ कडे आले होते. पण त्यांच्या मनात शांतता ...अजून वाचाएका मेसेज वरील संभाषणाने त्यांच्या मनातील शांतता भंग केली होती. ‘क्रोनोस’ च्या इंटरफेसमधील बदल त्यांना काहीसा अस्वस्थ करत होते. त्यांना वाटत होते की निशाच्या उत्तरामध्ये काहीतरी लपलेले आहे. तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी तिने असे बदल केले आहेत, हे त्यांना पटत नव्हते.प्रयोगशाळेत पोहोचल्यावर त्यांनी लगेचच ‘क्रोनोस’ ची तपासणी सुरू केली. त्यांना यंत्राकडून मिळणाऱ्या भविष्यातील दृश्यांमध्ये विसंगती जाणवू लागली. काही दृश्ये अधिक
अध्याय ५-------------गुपित उलगडले--------------------प्रयोगशाळेच्या दिशेने निघालेल्या गाडीत, डॉ. फिनिक्स, कर्नल विक्रम सिंग आणि रिया मल्होत्रा यांच्यात गहन शांतता होती. ही शांतता केवळ प्रवासाची नव्हती, तर एका मोठ्या सत्याच्या ओझ्याखाली दबून गेलेली होती. डॉ. फिनिक्स अजूनही विश्वास ठेवू शकत नव्हते की ...अजून वाचामुलीवर त्यांनी इतका विश्वास ठेवला होता, तिने असा विश्वासघात केला. त्यांच्या मनात रागापेक्षा निराशेची भावना अधिक होती.“सर, तुम्ही ठीक आहात का?” विक्रमने विचारले.डॉ. फिनिक्सने मान हलवली. “हो, मी ठीक आहे, कर्नल. फक्त... मला विश्वास बसत नाहीये की निशा असे करू शकते. माझ्या डोळ्यांवरची पट्टी पूर्णपणे काढली गेली आहे. मला आता आठवतंय, 'क्रोनोस' ने दिलेली काही दृश्ये अस्पष्ट आणि भेसूर का